६५ वर्षापूर्वी नागपूर येथे पंतप्रधान पं. नेहरूंवर भर रस्त्यावर झालेला सुरीहल्ला..

हे तुम्हाला माहीत आहे का?

आज 13 मार्च 2011. बरोब्बर 65 वर्षांपूर्वी म्हणजे 13 मार्च 1955 रोजी नागपूर शहरात भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आले होते. सोनेगाव विमानतळावरून ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री रमाशंकर शुक्ल यांच्या घरी निघाले होते. नागपूर तेव्हा मध्य प्रदेशचा भाग होते. तो काळ आजच्या सारखा झेड सिक्युरिटीचा नव्हता. नेहरू उघड्या मोटारीतून नागपूरच्या रस्त्यावरून प्रवास करीत होते. लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या जवाहरलाल नेहरूंवर हल्ला होईल असं कोणाच्या स्वप्नातही नव्हतं. पण, अचानक एक 32 वर्षांचा तरूण नेहरूंच्या त्या गाडीच्या दिशेने गेला. त्याच्या हातात चाकू होता. तो नेहरूंवर झेपावला. पण चाकू चालवणार इतक्यात नेहरूंनी त्याला आपल्या हाताने जोराने ढकलले. नेहरूंच्या सुरक्षा व्यवस्थेतले काही पोलीस त्या तरूणाच्या दिशेने झेपावले. त्या तरूणाला त्यांनी ओढले. क्षणभर लोकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला होता. त्या तरूणाचे नाव होते बाबू राव. तो साधा रिक्षा चालक होता.
हा हल्ला झाला तरी नेहरू हंसतमुख होते. नेहरू पत्रकारांना म्हणाले "अहो, तो तरूण साधा होता. त्याचा तो सुरा फक्त सहा इंचीच होता. त्याने मला काहीही झालं नसतं."
त्या तरूणाला नंतर मानसिक तपासणीसाठी नेण्यांत आलं.
अधिक माहिती आणि ही बातमी ह्या दुव्यावर पहा.
हे वाचून मी चाटच झालो..तुम्ही?

लेखनविषय: दुवे:

Comments

:-)

त्या तरूणाला नंतर मानसिक तपासणीसाठी नेण्यांत आलं.

हे वाचून मीही चाट झाले. ;-) तुम्ही नेमके कशामुळे चाट पडलात?

१९५५ च्या या घटनेनंतर सुमारे आठ वर्षांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही उघड्या गाडीतून गेले असता त्यांची हत्या झाली. तो काळ झेड सिक्युरिटीचा नव्हता हे खरेच पण अशा अनेक अनुभवांतून झेड सिक्युरिटी बोकाळली.

असो. माहितीचा तुकडा आवडला.

कोपी-पेष्ट

तिकुडलं कोपी-पेष्ट केले आहे. बडे-बडे शहरोंमें ऐशी छोटी-छोटी घटनाए होती रहती है.

दुर्दैव

अरेरे !!!
हल्ला अयशस्वी झाल्यामुळे भारत महासत्ता होण्यापासून चुकला. ;-)

नितिन थत्ते

:)

हॅहॅहॅ.
--
नवी, रोचक माहिती. धन्यवाद.

+१

थत्ते चाचांशी सहमत आहे. चाचा नेहरु आपल्याला लाभले हे खरंच मोठं भाग्य आहे . आहो त्यांच्या सारखा पवित्र आत्मा गेल्या शेकडो वर्षांत झाला नाही. स्वातंत्र्यासाठी चाचा नेहरु जेवढे झिजले तेवढे एखाद्या पोस्टमन चे बुटही झिजले नसतील . चाचा नेहरु कित्येकदा तुरुंगवासात गेले. त्यांनी कित्येकदा उपोषण करुन इंग्रजांच्या नाकी नौ आणले होते . त्यांच्यावर् इंग्रजांनी एवढे अत्याचार करुनही ते टस से मस् झाले नाहीत् ह्यावरुनंच त्यांच्या दृढनिश्चयाची प्रचिती येते.
लेखात नमुद केल्या प्रमाणे नेहरु सहा इंची सुर्‍याच्या हमल्यातुन बचावल्या गेले असे नमुद केले आहे , परंतु गुगल वर शोधले असता त्यांच्या मृत्युचे कारण तेच् असावे असे दिसले आहे.

- टारझन

कधी? कुठे?

>>थत्ते चाचांशी सहमत आहे. चाचा नेहरु आपल्याला लाभले हे खरंच मोठं भाग्य आहे

असे मी कुठे म्हटल्याचे आठवत नाही. सहमत नक्की कश्याशी?

नितिन थत्ते

+२

असेच म्हणतो

- टारझन

६५ की ५६?

बाकी नितिन थत्ते यांच्याशी सहमत!

बर पण मग..

त्या तरूणाला नंतर मानसिक तपासणीसाठी नेण्यांत आलं.>>>>

बर पण मग पुढे काय? तो रिक्षावाला बाबु राव विचारवंत निघाला की माथेफिरू? :)

पूर्ण लिहित जा राव, अर्धवट माहिती लिहिणे हा उपक्रम वरचे काही लोक कलम ३०२ चा गुन्हा मानतात. :)

माझे तुम्हाला सावध करायचे काम मी केलेय. पुलेशु!!

दुरुस्ती

'विचारवंत' ऐवजी तुम्हाला 'दधिची' असा शब्दप्रयोग अपेक्षित असावा. विचारवंत फळी निराळी असते, ती संस्थळांवर दधिचीचे गोडवे गाते.

भर

अर्धवट माहिती लिहिणे हा उपक्रम वरचे काही लोक कलम ३०२ चा गुन्हा मानतात. :)

त्याचबरोबर काहींच्या तर प्रतिसादावरही जमावबंदीच्या १९४ कलमाप्रमाणे कार्यवाही होत असते.

-दिलीप बिरुटे

अर्धवट माहिती

जमावबंदीचे कलम 144 हे असावे. कृपया प्राध्यापकांनी चुकीची माहिती देऊ नये.

शिक्षक

संदर्भात विनोदाचे स्मरण झाले -
चुकीची माहिती आत्मविश्वासाने दुसरा कोण देणार? - शिक्षक - इति पुलं.

हा विनोद बिरुटे ह्यांना उद्देशून नाही.

हे कोण?

हा विनोद बिरुटे ह्यांना उद्देशून नाही.

मला वाटते इथे प्रा.डॉ.दिलीप बिरुटे असतात. विनोद बिरूटे, हे नवीन सदस्य आहेत का? ;)

हा कोण?

हा विनोद बिरुटे ह्यांना उद्देशून नाही.

विनोद बिरुटे असे सदस्याचे नाव धरले असेल तर वरील वाक्यातला 'हा' कोण? :)

मलाही

हाच विनोद मलाही आठवला होता. मात्र बिरूटे हे शिक्षक असण्याबरोबरच डॉक्टरही आहेत. आणि डॉक्टरांना अशा चुका सहसा परवडत नसाव्यात म्हणून मी तो विनोद येथे केला नाही.

सॉरी शक्तीमान

जमावबंदीचे कलम 144 हे असावे.
अगदी बरोबर. लिहितांना चूक झाली.
चुकीच्या माहितीमुळे कलम १९४ नुसार माझ्यावर कार्यवाही होऊ शकते असे वाटते. :)

-दिलीप बिरुटे

तपासणी

नेहरू पत्रकारांना म्हणाले "अहो, तो तरूण साधा होता. त्याचा तो सुरा फक्त सहा इंचीच होता. त्याने मला काहीही झालं नसतं."
त्या तरूणाला नंतर मानसिक तपासणीसाठी नेण्यांत आलं.

असं म्हणल्यावर नेहरुंना तपासणीसाठी न्यायला हवा होतं असा वाटतं किंवा सिद्ध करून दाखवा असं तरी म्हणायला हवं होतं :)

हेहेहे!

असं म्हणल्यावर नेहरुंना तपासणीसाठी न्यायला हवा होतं असा वाटतं किंवा सिद्ध करून दाखवा असं तरी म्हणायला हवं होतं :)

आवडलं. त्या तरुणालाही चक्क तपासणीसाठी नेलं म्हणजे त्याकाळी आपली जन्ता एकदम जंटलमन असली पाहिजे. आता मिळाला असता तर त्याला तिथल्या तिथेच बुकलून काढला असता किंवा डोक्यावर बसवून नाचवला असता.

हॅहॅहॅहॅ

खरय..खरय.. बुकलून काढला असता.....साधी सुरी चालवता येत नाही का!!..:)

 
^ वर