ईशान्य भारत व आंतरराष्ट्रिय षडयंत्र

ईशान्य भारतातील समस्यांची पहिली चार कारणे खालील प्रमाणे आहेत:-

१) संपर्काचा अभाव - उर्वरित भारतवासीयांमध्ये या भागाबद्दल प्रचंड अज्ञान आहे. या अज्ञानासाठी आपल्या देशाची शिक्षणपध्दती व प्रसार माध्यमे जवाबदार आहेत. देशाच्या कानाकोपर्‍यातील संपूर्ण माहिती सुव्यवस्थीतपणे समाजापर्यंत पोचवण्याची जवाबदारी या दोहोंवर असते. ईशान्य भारताबाबतित त्यांनी उर्वरित भारताला अंधारातच ठेवले आहे.

२) राजकिय उपेक्षा :- स्वातंत्र्यप्राप्ती पासून आजपर्यंत पूर्वांचल राजकीय उपेक्षेचा गंभीर सामना करतांना दिसतो. पूर्वांचल म्हणजे भुतान, चीन, ब्रम्हदेश व बांगलादेश या चार देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमा लाभलेला व केवळ ७० किलोमीटर रुंदीच्या 'सिलीगुडी ग्रीवा' नामक चिंचोळ्या पट्ट्याने उर्वरित भारताशी जोडलेला प्रदेश! वास्तविकपणे राजकीय पुढार्‍यांनी सर्वप्रथम ज्या प्रदेशाच्या विकासांची व संरक्षणाची योजना करावयास पाहिजे होती त्या प्रदेशाला दुर्दैवाने सर्वाधिक उपेक्षित ठेवले गेले.

३) बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी :- पूर्वांचलातीस सात राज्यांपैकी बरोबर मध्यभागी असलेला आसाम व बांगलादेशास लागून असलेला त्रिपुरा ही राज्ये बहुतांशी मैदानी राज्ये आ॑हेत. निम्मा त्रिपुरा डोंगराळही आहे पण तो भाग मिझोरम व बांगलादेशाच्या चकमांनी व्यापलेल्या चितगौंग हिल्सट्रैकला लागुन आहे. प्रामुख्याने मैदानी असलेल्या या दोन्ही प्रदेशांमध्ये घुसखोरीने अक्राळविक्राळ् स्वरुप धारण केल्याचे दिसते. २ कोटी २६ लाख लोकसंख्या असलेल्या आसाममध्ये आजमितीस ७५ लाख बांगलादेशी मुसलमान घुसलेले आहेत. तर ३० लाख लोकसंख्या असलेल्या त्रिपुरामध्ये १० लाख बांगलादेशी घुसलेले आहेत.

४) ख्रिस्ती मिशनर्‍यांचे षडयंत्र - मतांतरणाबरोबर समाजामध्ये फुटीरता निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांच्या मदतीने सुमारे दिडशे वर्षापूर्वी ख्रिश्चनिटीने शिक्षण पध्द्तीचा आधार घेतला शिक्षणाद्वारे पुढील असत्य गोष्टी शिकवून त्यांनी फुटीरता वाढवायला सुरुवात केली. १`) पूर्वांचलातील जनजाती हिंदू नसून मैंगोलॉईडस आहेत. २) हिंदू (भारतीय) समाज हा त्यांचा शत्रू आहे, कारण तो त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या परंपरा नष्ट करतोअ व् आर्थिक शोषण करतो. ३) म्हणुन आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी या हिंदूंना आपल्या राज्यांतून घालवून स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे हा आपला स्वतंत्रता संग्राम आहे. शिक्षणातून हा विचार देण्यासाठी त्यांनी पूर्वांचलातील जनजातीय बंधुंवर रोमन लिपी लादली आणि स्वाभाविकपणे त्या लिपीतील त्यांना उपलब्ध साहित्य फक्त बायबलच असे.

वर पाहिलेली पूर्वांचलातील समस्यांची पहिली चारही कारणे तेथे स्पष्ट दिसतात; पण पडद्यामागे दडलेल्या आंतरराष्ट्रीय शक्तींचा या फुटीर कारवायांना असलेला पाठींबा हे पाचवे कारण अत्यंत महत्वाचे आहे. या प्रदेशाला भारतापासून वेगळे करण्यास अमेरिका, पाकिस्तान , चीन उत्सुक आहेत व त्यांचे मोहरे बनून भुतान, बांगलादेश, म्यानमार ही छोटी छोटी राष्ट्रे षड्यंत्रात सहभागी झाली आहेत. अमेरिकेसारख्या महासत्तेला भारताच्या पूर्वांचलत रुची असण्याची तशी बरीच कारणे आहेत. त्यांतील पुढील काही कारणे अधिक महत्वाची आहेत.

अ ) पूर्वी रशिया जेव्हा अमेरिकेचा पहिला शत्रू होता तेव्हा रशियापासुन जवळ असा प्रदेश, जेथून अनेक प्रकारच्या गुप्त हालचाली करता येतील , त्यांना हवा होता. आशिय खंडात आपले प्रभाव क्षेत्र असलेला प्रदेश म्हणून भारतचा ईशान्य प्रदेश अमेरिकेला अत्यंत आवश्यक वाटला, तर चीनने पैन-मंगोलाईड चळवळीद्वारे ईशान्य भारतातील जनतेला आपल्या जवळ खेचण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यास प्रांरभ केला.

ब्) जगातील फक्त ४% लोकसंख्या असलेला अमेरिका जो जगातील ४०% नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपभोग घेतो , त्याला 'पुर्वांचल भारत' महत्वाचा वाटतो कारण भारताच्या एकूण नैसर्गिक साधनसंपत्तीच्या २०% महत्वाची खनिजे फक्त पूर्वांचलात आहेत. खनिज तेल, दगडी कोळशापासुन ते युरेनियम पर्यंत सर्व खनिजे पूर्वांचलात मुबलक प्रमाणात आहेत. शास्त्रज्ञ म्हणतात, 'आसाम खनिजतेलावर तरंगतो आहे.'

क) भारतातील बुध्दिमत्ता, श्रमशक्ती, नैसर्गीक साधनसंपत्ती यांचा सुरेख संगम झाल्यास भारत देखिल जगातिल एक प्रमुख महासत्ता बनू शकतो, याची अमेरिका, पाकिस्तान व चिनला भीती वाटते. म्हणून भारतातील सर्व प्रकारच्या भेदांना व असंतोषाला खतपाणी घालून भारतास कायम अशांत व अस्थिर ठेवणे या आंतरराष्ट्रिय शक्तींना आवश्यक वाटते.

ड्) अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र निर्मिती करणार्‍या, तसेच मादक द्रव्यांचे उत्पादन करणरृया कंपन्या आहेत. त्यांचा धंदा चालावा यासाठी जगामध्ये दहशतवाद जोपासणे ही त्यांची आर्थिक गरज आहे.

खालील कारनांमुळे पूर्वांचलात आंतरराष्ट्रीय शक्तींचे काम अधिक सोपे आहे.

अ) मोठ्या प्रमाणात असलेली भाषांमधील विविधता, भौगोलिक दुर्गमता, राजकीय उपेक्षा आणि यामुळे निर्माण झालेले संघर्ष आधीच मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. त्यांना अश शक्तिंच्या पाठबळाची आवश्यकता असतेच.

ब्) चार देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमा लागलेल पूर्वांचलाचा हा भाग उर्वरित भारताला केवळ ७० कि.मी रुंदीच्या सिलीगुडीने जोडला आहे.

आंतरराष्ट्रीय शक्ती पुढील पाच मार्गातून येथे सुरु असलेल्या आंदोलनास पाठबळ देतात.

विद्यार्थी आंदोलन - पूर्वांचलात अशा अनेक विद्यार्थी संघटना उभ्या राहिलेल्या दिसतात की ज्यांच्या मागण्यांतून फुटीरता डोकावत असते. आंदोलनात्मक मार्गांनी या संघटना अस्थिरता व अशांतता पसरवतात्. विद्यार्थी आंदोलनाला समाजाची सहानुभूती लगेचच मिळत असते.

प्रसार माध्यमे - स्थानीय बुध्दिजीवी, वृत्तपत्रे व अन्य प्रसार माध्यमे तेथील समाजाची दिशाभूल करतात. विद्यार्थी आंदोलनाच्या देशद्रोही मागण्यांना स्वातंत्र्य संग्रामाची संज्ञा देऊन जनमत जागृत करण्याचे काम या मार्गातून केले जाते.

स्थानीय राजकीय पक्ष - काँग्रेस, भाजपा सारखे अखिल भारतीय पक्ष हे विदेशी लोकांचे पक्ष व त्यांचे राज्य म्हणजे भारताची गुलामगिरी असे चित्र उभे करुन विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्यांना आपल्या घोषणापत्रकावर घेउन स्थानीय राजकीय पक्ष निवडणुका लढवतात . विद्यार्थी आंदोलन व प्रसार माध्यमे यांच्याद्वारे निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणावर हे स्थानीय राजकीय पक्ष निवडून येतात व सत्तेत बसून सर्व फुटीरतावादी कारवायांना पूर्ण मदत करतात.

दहशत वाद - प्रत्यक्ष कृतीचा मार्ग हा दहशत वादाचा मार्ग असतो. समाजातील असंतुष्ट तरुण वर्गाला चिथावून अद्ययावत शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून नेले जाते. गेली पन्नास वर्षे अशाप्रकारे दहशतवादी निर्माण करणारी प्रशिक्षण केंद्रे शेजारी राष्ट्रांमध्ये चालू आहेत. हे दहशतवादी प्रशिक्षण घेऊन आल्यावर आंदोलने व मगण्यांच्या पूर्तीसाठी समाजामध्ये दहशत निर्माण करतात. लुटालूट, हत्यासत्र यांचे दुष्टचक्र चालूअ करतात.

ढोंगी शांतिदूत - वरील चारही मार्गांतून निर्माण झालेल्या अशांततेने व अत्याचाराच्या परिसीमेने सामान्य जनता मात्र त्रस्त होते. तेव्हा 'ख्रिश्चन मिशनरी' शांततेचे दूत बनुन 'येशू' चा शांतिसंदेश पोचवण्यसाठी रस्त्यावर उतरतात. प्रशासन , अतिरेकी, विद्यार्थी , पत्रकार इत्यादींचा समेट घडवून आणण्याचे ढोंग केले जते. या नाटकाचा प्रयोग दरवर्षी डिसेंबर महिना जवळ आल्यावर होतो. कारण ख्रिसमसचा सण शांततेत पार पडणे त्यांच्या दृष्टीने आवश्य क असते.!

अतिरेकी बनण्यासाठी प्रशिक्षण व शस्त्रास्त्रे इत्यादीसाठी लागणारा पैसा खाली दिलेल्या अनेक मार्गांनी येत् असतो.

१) उर्वरित भारतातून व्यापाराच्या निमित्ताने पूर्वांचलात येऊन राहिलेले सर्व भारतीय हे विदेशी आहेत व त्यांनी येथील समाजाला वारेमाप लुटून पैसा कमावला आहे असे मनात बिंबवले असल्याने, अशा व्यापार्‍यांना बळजबरीने उचलून नेणे, खंडण्याच्या चिठ्ठ्या पाठवणे, त्यांच्या हत्या करणे इत्यादी मार्गांतून पैसे लुबाडले जातात. एक लक्षणीय उदाहरण देता यील . उनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या आसामातील अतिरेकी संघटनेने १५ वर्षात व्यापार्‍यांना लुटून मिळवलेली रक्क्म २१५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

२) मादक द्रव्यांचा व्यापार व त्यांचा प्रसार करुन त्या बदल्यात कोट्यावधी रुपये अतिरेक्यांना पुरविले जातात. मादक द्रव्यांच्या प्रसारातून आपल्याच समाजाच्या युवा पिढीला बरबद करण्याचे काम अतिरेकी करतात. पूर्वांचलातील प्रामुख्याने पहाडी राज्यांच्या शहरी भागांत द्रव्यांचे प्रमाण भयंकर वाढले आहे. काही शहरातील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या ६०% विध्यार्थी मादक द्रव्यांचे सेवन करतात. मादक द्रव्यांचा व्यापार करण्यास नकार दिल्यास प्रशिक्षण केंद्रे व परकीय मदत ताबडतोब बंद करण्याची धमकी देण्यात येते.

३)बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे कोट्यावधि रुपये अतिरेकी संघटनांना मिळत असतात.

४) खोट्या एन जी ओ (खाजगी स्वयंसेवी संस्था) कागदोपत्री दाखवुन केंन्द्र व राज्य सरकारची त्यांना मिळणारी कोट्यावधी रुपयांची आर्थिक मदत लुबाडुन त्याचा वापर अतिरेकी संस्थांसाठी केला जातो. मणिपूरच्या चुडाचंद्रपूर जिल्याचेच उदाहरण बघू. फक्त पावणे दोन लाख जनसंख्या असलेल्या चुडाचंद्रपुर जिल्ह्यात अकरा हजार एन जी ओ काम करतात. प्रत्यक्षात या संस्थापैकी फार थोड्या अस्तित्वात आहेत पण अधिकतर संघटना बेनामी आहेत.(फेक) मणिपूर मध्ये सर्वांत अधिक दहशतवाद व अतिरेकी प्रशिक्षण चुडाचंद्रपुरमध्ये असण्याचे वेगळे कारण काय असू शकते.

५) ख्रिश्चन मिशन्स जेव्हा एखाद्या क्षेत्रात काम सुरु करतात तेव्हा तेथे ओतलेला पैसा ही त्यंची 'गुंतवणुक' असते. मात्र पुरेसे मतांतरण झाल्यावर ते त्या समाजावर अनेक प्रकारच्या वर्गण्या लादून आर्थिक शोषणास सुरुवात करतात. 'मेघालय ' राज्यातील सर्व चर्चेसना मिळणारा मासिक निधी दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.या व्यतिरिक्त परदेशातून येणारा पैसा! मिशनर्‍यांना मिळणार्‍या पैशावर सरकारचे नियंत्रण नाही. घटनेतील अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या सवलतींनुसार या पैशाचा जमाखर्च सरकारला दाखविण्यास ते बांधिल नसल्याने या पैशाचा वापर अतिरेकी कारवायांना उत्तेजन देण्यासाठी देखील होत असतो.

आंतरराष्ट्रीय षडयंत्र हे किती भयंकर आव्हान आहे याची कल्पना वरील विवेचनावरुन येऊ शकते. एका विशिष्ट मागणीवर हे चार मार्ग कसे अंमलात येतात याचे मेघालयातील उदाहरण लक्षणीय आहे.

मेघालयातील पश्चिम खासी पहाड जिल्यामध्ये काही वर्षापूर्वी युरेनियम हे खनिज मोठ्या प्रमाणावर आढळले. भारत सरकारने तेथे अणुऊर्जा प्रकल्पाची योजना सुरु केली. मात्र त्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय षडयंत्राचे चारही मार्ग काम करु लागले. सर्व प्रथम 'खासी स्टुडंट्स युनियन' या विद्यार्थी संघटनेने या प्रकल्पास विरोध करुन 'मेघालयातील' युरेनियम काढण्याचा 'भारताला ' अधिकार नसल्याचे घोषित केले. व त्यासाठी आंदोलन छेडले. त्यानंतर बुध्दिजीवीनी स्थानीय प्रसार माध्यमांच्या दुसर्‍या मार्गांद्वारे ही मागणी योग्य असल्याचा प्रचार केला व जनमत जागृती केली. तिसरा मार्ग म्हणजे स्थानीय राजकीय पक्षांनी या मागणीस राजकीय घोषणा पत्रकावर स्थान दिले व चौथ्या दहशतवादाच्या मार्गाद्वारे धमकावण्यात आले की मेघालयातील अणूर्जा प्रकल्पात जर शास्त्रज्ञ व इंजिनिअर्स आले तर त्यांच्या जिवास धोका असेल. मात्र काही दिवसातच बातमी आली की बांगलादेशाच्या सीमेवर अडीच किलो युरेनियमचे खनिज चोरुन ने असलेले अतिरेकी पकडले गेले व अधिक चौकशीनंतर ते खनिज पुढे अमेरिकेत जाणार असल्याचेही लक्षात आले!

पूर्वांचलातील परिस्थिती ही वर उल्लेखलेल्या पाच कारणांची परिणती आहे. पूर्वांचलाल या दुष्ट पंजामधून सोडवण्यासाठी सर्व भारतियांनी विचार मंथन करुन केंन्द्र सरकारवर् लवकरात आवश्यक कृती साठी दबाव आणणे गरजेचे आहे.

संदर्भ -पूर्वांचलाचे आव्हान आणि आवाहन-२००८-श्री सुनिल देवधर यावरुन साभार.

लेखनविषय: दुवे:

Comments

तोडगा

जाज्वल्य देशप्रेमाने भारित भारतीयांनी मॅक्डोणल्ड्स ही कंपणी विकत घ्यावी आणि ईशान्य भारतात जागोजागी तिच्या शाखा उघडाव्यात. ईशान्य भारतच काय, सारे जग पादाक्रांत करण्यात मदत होईल.

महत्व

या प्रकारचा लेख जगातील कोणत्याही देशातील कोणत्याही भागासंबंधी लिहिता येईल. सर्वसाधारणपणे साम्यवादी मंडळी अशा प्रकारचे लेख लिहितात अशी माझी आतापर्यंत समजूत होती. परंतु कल्याणकरांचा लेख वाचून माझी ती समजूत चुकीची असल्याचे ध्यानात आले.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

कारणे काय?

या प्रकारचा लेख जगातील कोणत्याही देशातील कोणत्याही भागासंबंधी लिहिता येईल.
खरे आहे.
सर्वसाधारणपणे साम्यवादी मंडळी अशा प्रकारचे लेख लिहितात अशी माझी आतापर्यंत समजूत होती.
अशी समजूत का झाली ? त्यामागची कारणे काय? दाखले दिल्यास उत्तम.
परंतु कल्याणकरांचा लेख वाचून माझी ती समजूत चुकीची असल्याचे ध्यानात आले.
तुम्ही (बहुधा) नकळत नक्की कुणाचा गौरव (?) करीत आहात ह्याबद्दल विचार करतो आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कारणे

पुण्याच्या सकाळमधे येणारे श्रीमती सुलभा ब्रम्हे यांचे लेख आपण वाचले आहेत का? ते साधारण याच धर्तीवर असतात.
माझ्या प्रतिसादात मी फक्त एवढेच दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की या प्रकारची परिस्थिती कमी जास्त प्रमाणात जगातील सर्व देशात आढळते. एक विशिष्ट राजकीय विचारसरणी मनात धरून त्या आधारावर त्या परिस्थितीचे फक्त निगेटिव्ह प्रोजेक्शन करण्याचा उद्योग जसा साम्यवादी करताना दिसतात (त्यांच्या लेखात तथ्य असतेच पण ते संपूर्ण सत्य नसतेच, सोईस्कर सत्य असते) त्याच प्रकारे प्रस्तुत लेखात सुद्धा निगेटिव्ह प्रोजेक्शन करण्याच्या प्रयत्नात कल्याणकर आहेत. कल्याणकरांची एकूण राजकीय विचारसरणी काय आहे हे त्यांच्या प्रत्येक लेखातून इतक्या पारदर्शीपणे दिसून येते की ती समजावून सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही.
पूर्वेकडची राज्ये इतर देशापासून आयसोलेटेड राहिली आहेत याची अनेक ऐतिहासिक कारणे आहेत. कोणत्याही मोठ्या देशात एका कोपर्‍यात असणार्‍या भागात असे हो ऊ शकते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

पटले नाही

पुण्याच्या सकाळमधे येणारे श्रीमती सुलभा ब्रम्हे यांचे लेख आपण वाचले आहेत का? ते साधारण याच धर्तीवर असतात.

सुलभा ब्रह्मे ह्यांचे लेख वाचले आहेत. उदा. 'लवासा लेकसिटी : चंगळवादाचा विनाशकारी रस्ता' हा लेख अजूनही आठवतो. त्या लेखात त्यांनी लवासाविरोधी बाजू प्रखरपणे मांडली आहे. आणि त्यांनी मांडलेली मते, मग ती कुणाला पटली नाहीत तरी, माझ्यामते तथ्यांवर आधारित आहेत. त्यांनी प्रचारकी खोटारडेपणा केल्याचे वाटत नाही. मते नाही पटली तर सोडून देता येतात.

माझ्या प्रतिसादात मी फक्त एवढेच दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की या प्रकारची परिस्थिती कमी जास्त प्रमाणात जगातील सर्व देशात आढळते. एक विशिष्ट राजकीय विचारसरणी मनात धरून त्या आधारावर त्या परिस्थितीचे फक्त निगेटिव्ह प्रोजेक्शन करण्याचा उद्योग जसा साम्यवादी करताना दिसतात (त्यांच्या लेखात तथ्य असतेच पण ते संपूर्ण सत्य नसतेच, सोईस्कर सत्य असते) त्याच प्रकारे प्रस्तुत लेखात सुद्धा निगेटिव्ह प्रोजेक्शन करण्याच्या प्रयत्नात कल्याणकर आहेत.

प्रत्येक जण आपली विचारसरणी, मते पटवून देण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो. पण अरुणाचली हिंदू होते, आहेत. माँग्लॉइड नाहीत. (वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या भारतीय लोकांत किती वंशांची सरमिसळ झाली आहे हा वेगळा, मानववंशशास्त्रीय अभ्यासाचा, विषय आहे.) इतिहासाच्या आरंभापासून अरुणाचलपासून गुजरातेपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत -- ह्यात भामरागड, बस्तर, झाबुआ सारख्या इलाख्यांतले आदिवासी किंवा मूलनिवासीही आले -- फक्त हिंदूच हिंदू राहात होते. दुसरे कुणी नव्हते. असला खोटारडेपणा कुणीही साम्यवादी, समाजवादी किंवा/म्हणजेच ज्याचे डोके ताळ्यावर आहे असा कुठलाही व्यक्ती करणार नाही. फक्त हिंदूंचाच ह्या पवित्र भूमीवर अधिकार आहे हेदेखील कुठलाही साम्यवादी, समाजवादी किंवा/म्हणजेच ज्याचे डोके ताळ्यावर आहे असा कुठलाही व्यक्ती करणार नाही.

कल्याणकरांची एकूण राजकीय विचारसरणी काय आहे हे त्यांच्या प्रत्येक लेखातून इतक्या पारदर्शीपणे दिसून येते की ती समजावून सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही.

खरे आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

तूर्तास काही प्रश्न

उर्वरित भारतवासीयांमध्ये या भागाबद्दल प्रचंड अज्ञान आहे.
खरे आहे. माझ्या महाविद्यालयात ह्या भागातले अनेक विद्यार्थी होते. माझ्या अरुणाचली मित्रांना गावातले लोक 'नेपोलियन' किंवा नेपाळीच समजत असत.

२ कोटी २६ लाख लोकसंख्या असलेल्या आसाममध्ये आजमितीस ७५ लाख बांगलादेशी मुसलमान घुसलेले आहेत. तर ३० लाख लोकसंख्या असलेल्या त्रिपुरामध्ये १० लाख बांगलादेशी घुसलेले आहेत.
त्रिपुरातले बांगलादेशी मुसलमान नसून हिंदू आहेत काय? आणि हिंदूनी केलेली घुसखोरी ही घुसखोरी नसते काय? असो. हे सगळे सावरकरांच्या अखंड भारताचेच नागरिक आहेत. त्यामुळे पुन्हा असो.

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे षडयंत्र - मतांतरणाबरोबर समाजामध्ये फुटीरता निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांच्या मदतीने सुमारे दिडशे वर्षापूर्वी ख्रिश्चनिटीने शिक्षण पध्द्तीचा आधार घेतला शिक्षणाद्वारे पुढील असत्य गोष्टी शिकवून त्यांनी फुटीरता वाढवायला सुरुवात केली. १`) पूर्वांचलातील जनजाती हिंदू नसून मैंगोलॉईडस आहेत. २) हिंदू (भारतीय) समाज हा त्यांचा शत्रू आहे, कारण तो त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या परंपरा नष्ट करतोअ व् आर्थिक शोषण करतो. ३) म्हणुन आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी या हिंदूंना आपल्या राज्यांतून घालवून स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे हा आपला स्वतंत्रता संग्राम आहे. शिक्षणातून हा विचार देण्यासाठी त्यांनी पूर्वांचलातील जनजातीय बंधुंवर रोमन लिपी लादली आणि स्वाभाविकपणे त्या लिपीतील त्यांना उपलब्ध साहित्य फक्त बायबलच असे.
तुमची मते सांगा.
१. ह्या जनजाती त्या माँगलॉइड्स आहेत किंवा नाहीत ह्या विषयी तुम्हाला काय म्हणायचे आहे?
२. ह्या जनजाती हिंदू आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? असल्यास कसे ते सांगावे.

ख्रिस्ती मिशनऱ्यांपेक्षा ही हिंदू मशीनरी काही वेगळी आहे असे म्हणता येते का?

अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र निर्मिती करणार्‍या, तसेच मादक द्रव्यांचे उत्पादन करणरृया कंपन्या आहेत. त्यांचा धंदा चालावा यासाठी जगामध्ये दहशतवाद जोपासणे ही त्यांची आर्थिक गरज आहे.
असो. तुमच्या लेखात तुम्ही काही कयास मांडले आहेत. पुरावेही द्यायला हवे होते. ह्या कंपन्यांची नावे द्यावी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

काही गोष्टी

आपल्या डोळ्यासमोर दिसत नसल्या तरी त्यासारख्या इतर गोष्टी जगात कुठेतरी घडलेल्या असू शकतात. तेव्हा डोळ्यासमोर घडत नसल्या तरी इतरत्र बघून आपल्याकडे काय होऊ शकेल, हे समजून घेता येऊ शकते. मादक द्रव्यांचा वापर हा लोकांना शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या पंगू करतो, त्यामुळे होणार्‍या शोषणाचे प्रकार आणि साधने आणि परिणाम वाढतात हे तर नजरेला अगदी सरळ ढळढळीत दिसते. त्यामुळे याचा विरोध करायलाच हवा. हिंदू मिशनरी आणि ख्रिश्चन मिशनरी यात फरक नाही, हा एवढाच मुख्य विरोधाचा मुद्दा असला आणि तो मान्य केला तरीही अजूनही हिंदू मिशनरी या भागात कमीच स्थिरावलेले आहेत असे मला वाटते. फारतर ही ख्रिश्चनांच्या मिशनरी असण्यास दिलेली प्रतिक्रिया/रिऍक्शन आहे एवढेच म्हणता येईल असे वाटते. तेव्हा तो मुद्दा सोडून देऊ. हे झाल्यानंतर जे काही वाईट उरले त्याचा विरोध करायला हवा असे वाटते.

उदा. वरील लेखात जो मादक पदार्थांच्या सेवनाचा मुद्दा आला आहे तो खरा असण्याची शक्यता ५०% आहे असे धरले तरी तो सीरियस प्रश्न आहे. http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/15072813 येथे थोडी माहिती मिळाली.

जगभर मादक पदार्थांचा व्यापार चालतो, त्याला बरेचदा परकीय मदत किंवा हस्तक्षेप असतो असे दिसते. उदा. नॅशनल जिओग्राफिकच्या अलिकडच्या अंकात वाचल्याप्रमाणे -अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर अफूची निर्यात सुरू झाली त्याचे कारण उझेबेकिस्तानची निर्यात वाढावी यासाठी सोविएट रशियाने अफगाणिस्तानच्या निर्यातीवर (फळफळावळ इ) बंधने आणली. मुजाहिदीन आणि रशियन यांच्यातील युद्धात बाकी वाट लागली. ८९-९४ या काळात तालिबान अंमल येईपर्यंत अफगाणिस्तानमध्ये गोंधळच होता. ९४ नंतर Afghan farmers, struggling to regain their standing in the marketplace, discovered that India and Pakistan had developed their own products and were no longer interested in importing Afghanistan's. Those countries had succeeded in cracking down on their own opium production—and drug smugglers began to eye new pockets of instability where illegal trafficking could thrive. Operatives from Pakistan showed up in Nangarhar, then Badakhshan, then the southern province of Helmand. As agricultural consultant Jonathan Greenham describes his work in Pakistan to eradicate its opium production, "We just pushed the problem across the border."

अधिक इथे वाचता येईल
याचे नागरिकांवर होणारे (लहान मुले, स्त्रिया, आणि पुरुष) परिणाम फोटोंमधून तरी भयंकर दिसतात (ड्रग्जचे व्यसन लागलेली लहान मुले झिंगलेल्या बापांशेजारी बसली आहेत, उंदीर आणि सापही ड्रगऍडिक्ट आहेत असे तेथील माणूस सांगतो.). हे भारताच्या कुठच्याही भागात होणे शक्य असले तरी मुळात हे चुकीचे आहे, वर कल्याणकर जे सांगत आहेत त्यात पन्नास टक्के जरी तथ्य असले तरी विचार करण्यालायक आहे असे म्हणायला हरकत नसावी. अशा अंमली पदार्थांमध्ये रंगलेल्या प्रजेला मग ती स्वकीय असो, वा परकीय असो, कसेही वापरून घेणे शक्य असते.

 
^ वर