ऐलपैल
नमस्कार!
जागतिक मराठी भाषा दिन आणि कुसुमाग्रजांची जन्मशताब्दी असे दुहेरी औचित्य साधून मराठी जालरसिकांसाठी ऐलपैल डॉट कॉम हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. जगभर विखुरलेल्या मराठीजनांच्या आरपार अभिव्यक्तीचं मनमोकळं व्यासपीठ म्हणजे ऐलपैल.
अनेकाविध विषयांवरील सकस आणि दर्जेदार लेखन ह्या संकेतस्थळाच्या उभारणीमागचा प्रमुख उद्देश. ज्या भाषेने आपल्याला समृद्ध बनवले आणि आनंदाचा ठेवा दिला त्या भाषेला आपणही काही देऊ शकतो ह्या भावनेतून ह्या स्थळाची कल्पना उदयास आली. काहीतरी चांगले लिहावे, वाचावे, सहभागी व्हावे आणि आपली हौस मनसोक्त पुरववावी असे वाटणार्या सर्वांसाठी ऐलपैल डॉट कॉमचे सदस्यत्व खुले आहे. कथा, कविता, अनुभव, स्फुटलेखन, प्रवासवर्णन, चर्चा, चालू घडामोडी, पाककृती, परीक्षणे, छायाचित्रे अश्या कुठल्याही प्रकारच्या लेखनाचे ऐलपैल डॉट कॉमवर स्वागत आहे. ह्या संकेतस्थळाविषयी तुमचा अभिप्राय, सूचना, अडचणी , प्रश्न ऐलपैल ह्या आयडीला अवश्य कळवा.
ऐलपैल डॉट कॉमवर आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे!
Comments
शुभेच्छा
संकेतस्थळ रोचक वाटते. नवीन प्रकल्पास शुभेच्छा.
अभिनंदन
उद्देश सफल होवो ही इच्छा!
सध्या जरा कामात आहे पण वेळ मिळाला की फेरफटका मारेनच.
स्वागत
'ऐलपैल' चे स्वागत. संकेतस्थळ आवडले.
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक
शुभेच्छा......!!!
ऐलपैल डॉट.कॉमला हार्दिक शुभेच्छा......! मराठी भाषेचे ऋण व्यक्त करण्यासाठी संस्थळ उभारणी होते ही आनंदाची गोष्ट. संस्थळ जरा अधिक रंगसंगतीने आकर्षक बनविले पाहिजे असे वाटले. आपल्या संस्थळावर उत्तम लेखन वाचायला मिळेल त्याचबरोबर संस्थळावर अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होणार नाही अशी अपेक्षा आहेच. द्वेषापोटी लेखन उडविणे, खरडी उडविणे, विनाकारण लेखन-प्रतिसाद संपादित करणे , अशा गोष्टी तिथे घडणार नाही यासाठी संस्थळाची काळजी घेणारे उत्तम लोक तिथे असतील अशी अपेक्षा आहे.
-दिलीप बिरुटे
धन्यवाद
धन्यवाद.
अभिप्रायाबद्दल आभार. पण संस्थळाची रंगसंगती आणि मध्यवर्ती कल्पना जाणूनबुजून संकेतस्थळाच्या प्रकृतीला साजेशी अशी 'मिनिमलिस्टिक' ठेवलेली आहे.
आरपार अभिव्यक्ती म्हणजे काय?
संस्थळ बघितले. पहिले पान तरी फारसे ठसा उमटवणारे वाटले नाही. एक दोन किरकोळ लेख आणि फुटकळ कविता दिसल्या. गोष्टी आणि कविता यांना महत्व देणारे संस्थळ प्रथम दर्शनी तरी दिसते आहे. आरपार अभिव्यक्ती म्हणजे काय? त्याचा अर्थ समजला नाही. अभिव्यक्ती म्हणजे स्वत:चे मन मोकळेपणे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असा अर्थ (चू.भू.द्या.घ्या.) मी घेतला आहे. हे स्वातंत्र्य आरपार आहे म्हणजे काय? एकमेकाशी संबंध नसलेले कोणते तरी दोन शब्द एकमेकाला जोडून लिहिणे म्हणजे अभिव्यक्ती असा अर्थ संपादक मंडळास अभिप्रेत असावा अशी शक्यता आहे.
नवीन प्रकल्पाबद्दल या संस्थळाच्या मागे असणार्या मंडळींना शुभेच्छा.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
धन्यवाद.
हळूहळू सुधारणा होतील अशी आशा आहे. आता मुखपृष्ठ बदलले आहे. मिनिमल
हे संकेतस्थळ प्रामुख्याने ललित लेखनासाठी आहे. कथा आणि कविताच नव्हे तर अनुभव, प्रवासवर्णने, स्फुटलेखन, परीक्षणे, छायाचित्रे, चित्रे/रेखाटने ते पाककृती असा ह्या संकेतस्थळाचा पसारा असेल.
प्रकट होणे, स्पष्ट होणे, जाहीर होणे, व्यक्त होणे ह्या अर्थाने अभिव्यक्ती हा शब्द घेतला आहे. (इंग्रजीत आर्टिक्युलेशन, एक्सप्रेशन, मॅनिफेस्टेशन, वॉइस). मनमोकळेपणा त्यात गृहीत धरलेला नव्हता. कुठलाही आडपडदा न ठेवता व्यक्त व्हावे म्हणून आरपार हा शब्द योजला आहे. ऐल आणि पैल तीरावर वसणाऱ्या मराठी भाषकांना 'ऐलपैल' ह्या सेतूवर एकत्र येऊन आपल्या भाषिक गरजा समृद्धपणे पूर्ण करता याव्यात अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद.
अहो,मग पडदा हटवा की!
कुठलाही आडपडदा न ठेवता व्यक्त व्हावे म्हणून आरपार हा शब्द योजला आहे.
अहो मग पडदा हटवा की...दिसू देत की मालक,संचालक,विश्वस्त इत्यादि मंडळी.
करून टाका 'आरपार!'
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
मालक
अहो काका त्याने काय फरक पडतो? मालक माहित असला काय नसला काय तुम्हाला गाशा गुंडाळावा लागलाच ना?
प्रमोद देव यांना विनंती
नवीन संकेतस्थळ आले की प्रमोद देव अचानक उठून आरडाओरडा करताना दिसतात. ही त्यांची जुनीच सवय. उपक्रमाची निर्मिती झाली तेव्हाही त्यांनी असेच केले होते. नंतर सर्वांची माफी मागितली होती. मिसळपावावरील त्यांची वाटचालही पाहण्याजोगी आहे. आपल्या अशा अनावश्यक सवयीला खीळ लावावी अशी मी त्यांना विनंती करते.
कुणी काही नवे सुरु करत असेल तर पाय खेचण्याची प्रवृत्ती त्यांनी दूर ठेवावी. उपक्रमावरील इतर अनेक लेखांत-चर्चांत त्यांचा सहभाग दिसत नाही .
त्यांना पुन्हा एकदा विनंती की एखादी गोष्ट आपल्याला पसंत नसेल तर दुर्लक्ष करावे.. इतर वेळेस उपक्रमाकडे ते करतात तसेच.
काही मजकूर संपादित.
नवीन?
संकेतस्थळ नव्याने चालू झाले आहे की जुन्या संकेतस्थळाचे नाव बदलले आहे. माझ्या नावाचे खाते २८ आठवड्यापासून असल्याचे दिसते. मीच ते ऍक्सेस् करू शकत आहे.
नितिन थत्ते
बरोबर.
बरोबर. नाव बदलले आहे. जुने संकेतस्थळ चाचणीसाठी चालू होते.
आधी काय नाव होते?
हे कळेल काय?
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
का?
कशा करता हवे आहे? कळले नाही. तुम्हाला प्राणवायु हवा आहे ना? मराठी भाषा आहे म्हणजे झाले. :)
जुनंच असेल् तर...
मग आधीचं नाव का बदललं? इतके दिवस त्याच्याबद्दल कुठेच काही जाहिरात का नाही झाली...वगैरे उत्सुकता आहे..म्हणून विचारतोय....
सांगायला लाज वाटावी असे काही आहे काय त्यात? ;)
बा,चाणक्या,तुला नक्कीच माहीती दिसतेय तेव्हा ती देऊन आम्हाला उपकृत करावे ही विनंती.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
लाज नाही खाज
अहो तुम्ही तर देव आहात. सर्वज्ञानी. मला काहीच माहित नाही बॉ. आम्ही कचेरीत वेळ मिळाला की मराठी संकेतस्थळे पाहतो. आमचा प्राणवायु हा सामान्य माणसाचा प्राणवायु असतो तोच आहे. भाषा वगैरे काही नाही. तुम्हाला तो प्राणवायु वाटतो म्हणून बाकीची चांभार-चौकशी कशाला असे वाटलो. बाकी चालुद्यात.
ते मला काय माहित नाही. पण काही प्रतिसाद वाचून लोकांना कसली तरी खाज आहे असे नक्की वाटते. :)
आमच्या अपेक्षा आम्ही इथेच लिहिल्या आहेत.
साधा
माझ्या मते संकेतस्थळाचे मालक-चालक कोण हा साधा आणि नैसर्गिक प्रश्न आहे. त्यात लपवण्यासारखे काही असू नये अशी अपेक्षा आहे.
--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/
बरोबर् आहे
नैसर्गिक प्रश्न आहे आणि शोधायचे नैसर्गिक मार्ग सुद्धा आहेत.
शोध
शोध घेण्यापेक्षा संकेतस्थळाची घोषणा करतानाच ही माहिती दिली तर अधिक प्रशस्त वाटते.
नैसर्गिक मार्ग - डोमेन कुणाच्या नावावर आहे - यातून सर्व माहिती मिळतेच असे नाही. माहिती दिली नसल्यास विचारणे हा एक नैसर्गिक मार्ग आहे असे वाटते.
--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/
वादासाठी वाद
वादासाठी वाद असे प्रतिसाद होत आहेत. प्रश्न अनैसर्गिक नक्कीच नाहीये. पण मला स्वतःला गुणवत्ता जास्त महत्वाची वाटते. असो. स्थळ व्यक्तिसापेक्ष पहावे की लेखन सापेक्ष हे मला महत्वाचे वाटते. तसेच स्थळावर कितपत चांगले लेखन होते आणि कितपत गोंधळ होते हे सुद्धा मला महत्वाचे होते. लोकायत बद्दल चांगल्या अपेक्षा होत्या. चालक मालक सुद्धा चांगले आहेत/होते. पण अपेक्षीत उंची गाठता आली नाही.
ठीक
ठीक. पुढील संवाद खवमध्ये.
आपलीसाइट डॉट कॉम
प्रमोदराव, आधी आपलीसाइट हे नाव होते. पण चांगल्या नावाचा शोध सुरू होता. त्यामुळे आणि इतर कारणांमुळे काम रखडले होते. अखेर नाव सापडले आणि मराठी भाषा दिनाचा आणि कुसुमाग्रज जन्मशताब्दीचा चांगला मुहूर्त बघून हाती घेतलेले कामी तडीस नेले. संकेतस्थळावर चाचण्या सुरू आहेत.
धन्यवाद!
ऐलपैलसाहेब,माहितीबद्दल धन्यवाद!
अजूनही काही माहीती देऊ शकाल काय?
ह्या संस्थळाचे मालक,चालक, विश्वस्त आणि संपादक कोण आहेत ?
काय आहे की,ते माहीत असलेलं बरं असतं...उगाच, आधीचेच नामचीन लोक ह्यात असतील तर मग आम्ही आपले दूरूनच पाहात राहू.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
+१
+१
--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/
मस्त
ऐलपैलराव,
ते काय मिनिमलिष्टीक प्रकार आवडला.
छान आहे.
या नवीन व्यासपीठासाठी धन्यवाद.
बाकी वर प्रमोदराव आणि राजेंद्राने म्हंटले आहे तसेच या संस्थळाचे मालक,चालक, विश्वस्त आणि संपादक कोण आहेत ते कळलेले बरे.
मागे काही मालकांच्या पैश्याच्या भानगडी झाल्या. त्या पार्श्वभूमीवर तुम्हीही ते मोकळेपणाने जाहीर केलेलेच बरे असे वाटते.
अर्थात मर्जी तुमची कारण तुम्ही मालक! असे न सांगितल्यास आमचा सहभागही तुमच्या थीम प्रमाणेच मिनिमलिष्टीक ठेवलेला बरा, असेच मलाही वाटते! :)
आजच्या घडीला मिसळपाव डॉट कॉम हे एकच स्थळ असे आहे की जेथे संपादक मालक चालक हे सर्वांना माहिती आहे. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी कारणासाठी कुणाकडे जायचे हे पक्के माहिती असते.
त्यामुळे एकप्रकारचा आपलेपणा तेथे वाटतो हे नक्की.
उपक्रमावर तर खरडवह्यांच्या संपादनाचे प्रकार सुरु झाल्याने हे स्थळ चीन मधून चालते की काय अशी शंका हल्ली आम्हाला येते. ;)
आपला
गुंडोपंत
?
मालक असल्याचा फायदा घेऊनच (पक्षी: 'हॉटेल बंद पडेल' अशा आशयाची भीती सदस्यांच्या मनात निर्माण करून) आर्थिक भानगडी झाल्या ना? जर मालकच माहिती नसतील तर ते गैरफायदा कसे घेऊ शकतील?
शुभेच्छा
शुभेच्छा. पण रंगसंगती नाही आवडली, उपक्रमच्या ठेवणीला त्यामानाने तोड नाही, हे मिनिमिलीस्टिक असून आकर्षक देखील आहे. तरीदेखील प्रयत्नाचे कौतुक आहे. आपण हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याबद्दल आभार.
भडक वाटले.
वेबसाईटची थीम जराशी बोल्ड आणि अंगावर येईल अशी वाटली.
अजुन टेस्टिंग चालु आहे असे म्हटले असल्याने वाट बघतो, शुभेच्छा आणि जमेल तसा सहभाग असेलच.
- शंत्रुंतप
अपेक्षा
ऐलपैलवर दर्जेदार लेखन वाचायला मिळावे हि अपेक्षा. उगाच मराठी मराठी नावाखाली नसती वटवट नसावी ही अपेक्षा आहे. त्याच बरोबर, अनुदिन्या, पुर्वप्रकाशित चांगले लेखन वगैरेची लेखकांची पुर्वपरवानगी घेऊन येथे सुद्धा प्रकाशित करता येते का पहावे. नाहितर अनेक मराठी संकेतस्थ़ळांपैकी एक अशी ओळख बनायची.
संकल्प आहे.
संकेतस्थळावर चांगल्या मराठी लेखनाचा गौरव करण्याचाही मानस आहे. अनुदिन्या आणि वेगवेगळ्या संकेतस्थळांवरून असे लेखन वेचून , लेखकांची पूर्वपरवानगी घेऊन, ते ऐलपैलवर ठळकपणे प्रकाशित करण्याचा संकल्प आहे.
शुभेच्छा !
संस्थळाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. माझे यथाशक्ती योगदान असेलच.
सुधारणा
संकेतस्थळ नवीन आहे आणि अनेक सुधारणा करायच्या राहिल्या आहेत हे ध्यानात घेतले तरी त्या सुधारणा करणे आवश्यक वाटते. त्यासाठी संकेतस्थळावरच चर्चा सुरु करायला हवी पण सध्या ती तेथे नसल्याने येथे काही सुचवण्या करते.
१. प्रतिसादांना उपप्रतिसाद देण्याची सोय व्हावी.
२. प्रतिसादांना बॉर्डर हवी. (अपना इलाका समजण्यासाठी ;-))
३. नवे लेखनच्या यादीत दुवे (लेखांची नावे) बोल्ड असण्यापेक्षा वेगळ्या रंगात असावीत (उपक्रमाप्रमाणे)
४. काही ठिकाणी एडिटरची बटणे टिंबांप्रमाणे दिसत आहेत, ते सुधरवायला हवे. (ब्राउजरः आयई७ आणि आयई८)
५. उपक्रमाप्रमाणे समुदायांची सोय दिसते पण समुदाय दिसत नाहीत (किंवा हे मॉड्यूल कसे वापरायचे ते मला कळलेले नाही)
धन्यवाद
प्रतिसाद आणि सुचवण्यांबाबत आभारी आहे. त्यासाठी संकेतस्थळावरच चर्चा सुरु करायला हवी पण सध्या ती तेथे नसल्याने येथे काही सुचवण्या करते.
तिथे चर्चेचा दुवा दिला आहे. तिथेही हा प्रतिसाद टाकावा.
१. प्रतिसादांना उपप्रतिसाद देण्याची सोय व्हावी.
ह्या थीमवर तिरपे प्रतिसाद कसे दिसतील हे तपासावे लागेल. करता येईल.
२. प्रतिसादांना बॉर्डर हवी. (अपना इलाका समजण्यासाठी ;-))
पण बॉटम बॉर्डर आहे ना. थीमसोबत कसे दिसते हे बघायला हवे.
३. नवे लेखनच्या यादीत दुवे (लेखांची नावे) बोल्ड असण्यापेक्षा वेगळ्या रंगात असावीत (उपक्रमाप्रमाणे)
बोल्डनेस घालवला आहे. चांगल्या रंगाचा शोध सुरू आहे.
४. काही ठिकाणी एडिटरची बटणे टिंबांप्रमाणे दिसत आहेत, ते सुधरवायला हवे. (ब्राउजरः आयई७ आणि आयई८)
ह्याला थोडा वेळ लागू शकतो. चाचण्या घ्यावा लागतील.
५. उपक्रमाप्रमाणे समुदायांची सोय दिसते पण समुदाय दिसत नाहीत (किंवा हे मॉड्यूल कसे वापरायचे ते मला कळलेले नाही)
चाचण्या चालू आहेत. लवकरच होईल.
कोण
स्थळ कुणाचे, संपादक कोण ते सांगताय ना?
आमचे चित्त त्यातच लागले आहे.
आपला
गुंडोपंत
चित्त कि पित्त
मालक विषयावरुन अनेकांचे चित्त विचलित होते आहे कोणाचे पित्त खवळण्याची वाट पाहात आहात? :) गंमतच आहे. मला एका संकेतस्थळाच्या मालकाचा फोन आला होता. पण आमचे मत असे होते की माणूस महत्वाचा आहेच. पण संकेतस्थळाच्या गुणवत्तेचा मामला जास्त महत्वाचा आहे. असो. तुमचे चित्त लवकरच लागो आणि पित्त शांत होतो.
शुभेच्छा
मला तरी साइट् चांगली वाटती आहे. मालक कोण चालक कोण ह्यापेक्षा साइट कशी बनते ह्यात रस जास्त आहे. मालक चालक ह्यांची नावे उघड करुनही आर्थिक घोटाळे वगैरे करणार्या साइट् आल्यापासून मला त्या माहितीत रस राहिलेला नाही. कुणीही चालवत असो..साइट निवेदनाप्रमाणे दर्जेदार राहील असे बघा.
सदस्यत्व घेतले आहे
नवीन संकेतस्थळाला शुभेच्छा.
हेच म्हणतो
+१
-Nile
शुभेच्छा!
सर्वप्रथम, नवीन संस्थळाला शुभेच्छा!
अजून भरपूर मराठी संस्थळे निघूंदेत आणि वैविध्याने भरलेले मराठी विचार, साहीत्य निर्मिती ही विविध मराठीजनांकडून होउं देत, अशी जिचा दिन साजरा करण्याच्या मुहुर्तावर हे संस्थळ चालू झाले आहे, त्या मराठी भाषेला देखील शुभेच्छा!
ज्या दिवशी फक्त एकच संस्थळ हे सगळ्यांची भूक पुरवायला लागेल तो दिवस मराठी भाषेसाठी आणि केवळ इतरांशी नकारात्मक स्पर्धा करण्यासाठी कुठल्याही संस्थळाचा वापर होईल तो दिवस मराठी माणसासाठी दुर्दैवी असेल. तेंव्हा तशी वेळ येऊ नये ही समस्त जालीय मराठीजनांना शुभेच्छा!
+१
असेच म्हणतो. चार लोक मराठीतून काहीतरी खटपट करत आहेत हेच कौतुकास्पद आहे. संकेतस्थळाला शुभेच्छा!
(ललित लेक्खनाच्या नावाखाली बा** भां** आणि महिला सदस्यांना ऑकवर्ड वाटणार्या टिप्पण्या ह्यापासून दूरच राहता येईल ह्याची काळजी घ्या..)
अजुन एक
हम्म्म अजुन एक...इतरांपेक्षा वेगळे काय ते नाही कळले. सगळे तसेच.
'नवे पण त्यात नवीन काय?'
हेच म्हणतो.
अजून एक नवे संकेतस्थळ पण त्यात नवीन ते काय?
मराठी भाशेतील कम्युनिटी संकेतस्थळांमध्ये आता तोच-तोच पणा येतोय. यापुढील संकेतस्थळांनी आता यापुढे संकेत स्थळांच्या संकल्पनांमध्ये व त्या अमलात आणण्यामध्ये नावीन्य दाखवायला हवे.
असे कोणतेच संकेतस्थळ सध्या नाही आहे जे,
छापाई-माध्यमाशी टाय-अप करून (एक किंवा दोन) त्यांच्या वर्तमान पत्रातील एक पान बुक करून काही भाग विविध कंपन्यांच्या जाहिराती स्विकारून जाहिराती छापून उरलेल्या भागात, त्या संकेत स्थळावरील तेथीलच वाचकांनी 'आवडले' असे इनपूट दिलेले आहे तो लेख, कविता आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून एकदा छापायचा प्रबंध करीतील.
व असे करून संकेतस्थळांच्या दुनियेत स्वत:चे ब्रँडनेम हि तयार करील.
+१
रावले साहेबांशी पूर्ण सहमत (ष ज्या जागी श चा वापर सोडून). ते म्हणतात तसे संस्थळ यायचे आता फक्त राहिले आहे.
चन्द्रशेखर
शुभेच्छा
ऐलपैलचे स्वागत आणि शुभेच्छा.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
असेच म्हणतो.
नवीन संस्थळाचे स्वागत आणि शुभेच्छा!
-सौरभ.
==================
डुंबा हो रे डुंबा हो रे डुंबा हो रे!