ईशान्य भारत

मेघालयाची नाकेबंदी

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आसामच्या ग्वालपाडा व मेघालयाच्या ईस्ट गारो हिल्स जिल्ह्याच्या सीमेवर रभा व गारो जमातीतील हिंसाचारात रभा जमातीच्या अंदाजे तीस हजार नागरिकांनी आपली घरे सोडून पलायन केले आहे. तब्बल आठवडाभर चाललेल्या हिंसक घटनात १२ जण ठार तर ५७ बेपत्ता झाले आहेत. १ जानेवारी रोजी घडलेल्या लहानशा घटनेचं पर्यवसान वांशिक दंगलीत होवून , मेघालयात वर्षानुवर्ष रहाणार्‍या रभा जमातीच्या गावांवर गारो जमातींच्या लोकांनी एकत्रितपणे हल्ला केला. शेकडो घरांना आगी लावल्या . अनेक घरे उद्धस्त केली. ह्या हिंसाचाराचा भडका इतका भयानक होता की, मेघालयाचे मुख्यमंत्री मुकूल संगमा यांनी, दंगल आटोक्यात आणण्यासाठी केंद्राकडे, लष्करी तुकड्यांची मागणी केली(Sangai Express Imphal 09 January 2011)

ईशान्यतील राज्यांतील विविध जमातीत, वांशिक हिंसाचार, अधून मधून उफाळून येत् असतो. परंतु आसाम-मेघालयाच्या सीमेवरील या हिंसाचाराचे स्वरुप, अधिक भयानक आणि त्यामागची कारणे अधिक चिंताजनक आहेत. नजीकच्या भविष्यात आसाममध्ये काय घडणार आहे, याची ही केवळ चुणूक आहे. धर्मांतरित ख्रिस्ती जमाती आणि बांग्लादेशी मुसलमान असे धार्मिक समीकरण जुळून आले तर त्यातून केवढा आगडोंब उसळू शकतो, याचे हे उदाहरण आहे.

आसाममधील ग्वालपाडा (गोलपारा) जिल्ह्यात, भौगोलिक परिस्थितीमुळे बांग्लादेशी मुसलमानांची, प्रचंड प्रमाणात घुसखोरी झाली आहे . त्यांचे लोकसंख्येतील प्रमाण ७०% झाले आहे. तर मेघालयातील ईस्ट गारो हिल्स, वेस्ट गारो हिल्स या पहाडी जिल्ह्यात, धर्मांतरीत झालेल्या ख्रिस्ती गारोंची लोकसंख्या ९०% झाली आहे. ख्रिस्ती झालेल्या गारोंची बहुसंख्या झाल्यावर आज हेच गारो, शेकडो वर्षे एकत्रितपणे जगलेल्या आपली पारंपरिक श्रध्दा आणि धर्म पाळणार्‍या, रभा जमातीच्या जिवावर उठले आहेत.

एका बाजूने बांग्लादेशी मुसलमान व दुसर्‍या बाजूने ख्रिस्ती गारो यांनी योजनापूर्वक घडवून आणलेल्या हिंसाचारात पारंपारिक जमातधर्म पाळणार्‍या रभा जमातीच्या लोकांची लांडगेतोड झाली आहे. खरं तर कोच घराण्यातील महाप्रतापी राजा नरनारायण , संस्कृत महापंडीत, मोगली आक्रमणाशी दोन हात करणारा वीर चिलाराय आणि भागवत धर्माची पताका आसाममध्ये उंच फडकवणारे संत शंकरदेव यांची ही भुमी! परंतु राज्यकर्ते अदूरदर्शी असले, सामजिक परिस्थीती आणि धार्मिक संतुलन यात घडणार्‍या बदलांकडे त्यांचे लक्ष नसले, की स्थानिक जनतेवर केवढे भयंकर संकट ओढवते याचेच हे ज्वलंत उदाहरण आहे.

साभार-ईशान्य वार्ता -फेब्रुवारी २०११.

लेखनविषय: दुवे:

Comments

बरर

कोणत्या कलमाखाली?

नैतिक दृष्टया, बाकि मारहाणीसाठी पाहिजे ते कलम लावा, हरकत नाही.

तर?

कुमार केतकरांची वाक्ये आम्ही पण खपवू शकतो, त्यात काय मजा नै.

शक्य. माझा मुद्दा इतकाच आहे की त्यांनी मुंबई महाराष्ट्रात राखून मुंबईवर/देशावर उपकार केले नाहीत, स्वार्थ साधला.

शक्य, किंवा दुसर्याच्या स्वार्थात स्वतःचा बळी जाऊ नये म्हणून प्रयत्न केले.

सनातन प्रभातची नांदी म्हणू.

योग्य कृती म्हणू.

समाजाला धर्माच्या गुलामगिरीत नेण्यासाठी त्यांना ब्रिटिशांपासून मुक्ती हवी होती, त्यांना लोकशाहीचे तत्त्व म्हणून स्वातंत्र्य नको होते

ह्यासाठी स्वात्यंत्र मिळाले असेल तर भलतेच भारी म्हणले पाहिजेत ते स्वात्यंत्रवीर. मग नक्कीच त्यांचे नाव द्यायला हवे.

पुन्हा सांगतो, 'नैसर्गिक निवड' हे तुम्ही दिलेले उत्तर ही 'अपील टू नेचर' या प्रकारची चूक आहे आणि ते उत्तर अग्राह्य आहे.

अपील टू नेचर हे सर्वच बाबतीत ग्राह्य नाही, त्यामुळे तुम्हास ते ग्राह्य वाटू शकते हे तुमचे मत आहे.

?

कुमार केतकरांची वाक्ये आम्ही पण खपवू शकतो, त्यात काय मजा नै.

तुम्ही दिलेले वाक्य हे इंटरप्रिटेशन आहे, त्यामुळे ते सरळपणे स्वीकारू नये. मी दिलेली माहिती ही मॅटर ऑफ फॅक्ट प्रकारची आहे.

योग्य कृती म्हणू.

रॅडने अत्याचार करविल्याचे आरोप असत्य होते ना? मग योग्य कृती का म्हणता?

ह्यासाठी स्वात्यंत्र मिळाले असेल तर भलतेच भारी म्हणले पाहिजेत ते स्वात्यंत्रवीर. मग नक्कीच त्यांचे नाव द्यायला हवे.

सतीप्रथासुद्धा सुरू करावी असे तुमचे मत आहे काय?

अपील टू नेचर हे सर्वच बाबतीत ग्राह्य नाही, त्यामुळे तुम्हास ते ग्राह्य वाटू शकते हे तुमचे मत आहे.

मी 'अग्राह्य' असा शब्दप्रयोग केला आहे, 'ग्राह्य' नव्हे!

प्रति

तुम्ही दिलेले वाक्य हे इंटरप्रिटेशन आहे, त्यामुळे ते सरळपणे स्वीकारू नये. मी दिलेली माहिती ही मॅटर ऑफ फॅक्ट प्रकारची आहे.

मॅटर ऑफ फॅक्ट मुळे "महाराष्ट्र" हा संदर्भ बदलत असेल तर त्याचे इंटरप्रिटेशन कसे करतो ह्याला महत्व येते. त्यामुळे संदर्भ देत असाल तर इंटरप्रिटेशनहि त्यांचेच असू देत.

रॅडने अत्याचार करविल्याचे आरोप असत्य होते ना? मग योग्य कृती का म्हणता?

रॅडने ने अत्याचार केले कि नाही ह्यास पुरावा नाही, निपक्षपाती पुरावा तुम्हाला/मला सदर करता येणे शक्यच नाही. त्यामुळे मी गुलामाच्या कृतीचे समर्थन केले. ते योग्यच होते.

सतीप्रथासुद्धा सुरू करावी असे तुमचे मत आहे काय?

नाही, सतीप्रथा मान्य नाहीच, नव्हती, त्याचा आणि धर्माचा संबंध देखील नाही. धर्मातील गोष्टींचा अयोग्य अर्थ लावला गेला, ते चूकच आहे.

मी 'अग्राह्य' असा शब्दप्रयोग केला आहे, 'ग्राह्य' नव्हे!

मी ग्राह्य नाही असा शब्दप्रयोग केला, तो ह्यार्थी - अपील टू नेचर चा अर्थ नैसर्गिक म्हणजे'च' बरोबर नसून नैसर्गिक बरोबर असू 'शकते' व नसू देखील शकते. त्यामुळे इथे तुम्हास ते बरोबर नाही असे म्हणावायचे असेल तर ते तुमचे मत आहे.

नाही

मॅटर ऑफ फॅक्ट मुळे "महाराष्ट्र" हा संदर्भ बदलत असेल तर त्याचे इंटरप्रिटेशन कसे करतो ह्याला महत्व येते. त्यामुळे संदर्भ देत असाल तर इंटरप्रिटेशनहि त्यांचेच असू देत.

शिवाजीचे 'साम्राज्य' किती जिल्हे होते ही तपासण्याजोगी बाब आहे. 'शिवाजीचे राज्य वेल्फेअर स्टेट होते (आणि ते जगातील सर्वात आधीचे वेल्फेअर स्टेट होते)' हा दावा मात्र, अनेक निरीक्षणांवरून काढलेला निष्कर्ष आहे. शिवाय, तो तकलादू आहे. अशोकाच्या शिलालेखांमध्येही प्रजेच्या भल्याचा उल्लेख असल्याचे वाचल्याचे स्मरते. शिवाय, केतकरांच्या निरीक्षणाचे एक उदाहरण येथे आहे. 'मुद्रा भद्राय राजते' या विधानाचा 'कल्याणकारी राज्य' असा अर्थ काढणे पोरकट वाटते. ती मुद्रा शहाजीने (शिवाजी १४ वर्षांचा होण्याआधी) बनविली होती, केतकर म्हणतात त्याप्रमाणे शिवाजीने राज्याभिषेकासाठी बनविलेली नव्हती.

रॅडने ने अत्याचार केले कि नाही ह्यास पुरावा नाही, निपक्षपाती पुरावा तुम्हाला/मला सदर करता येणे शक्यच नाही.

गोखल्यांना माफी मागावी लागली होती.

त्यामुळे मी गुलामाच्या कृतीचे समर्थन केले. ते योग्यच होते.

बेंटिक ने सतीबंदी केली त्याचीही हत्या आवश्यक वाटते काय?

त्याचा आणि धर्माचा संबंध देखील नाही. धर्मातील गोष्टींचा अयोग्य अर्थ लावला गेला

तसाच चाफेकर बंधूंनीही लावला आणि रँडला मारले असे म्हणा की!

मी ग्राह्य नाही असा शब्दप्रयोग केला, तो ह्यार्थी - अपील टू नेचर चा अर्थ नैसर्गिक म्हणजे'च' बरोबर नसून नैसर्गिक बरोबर असू 'शकते' व नसू देखील शकते.

सहमत.

त्यामुळे इथे तुम्हास ते बरोबर नाही असे म्हणावायचे असेल तर ते तुमचे मत आहे.

"अस्मिता सोकावू का द्यावी?" या प्रश्नावर तुम्ही 'नैसर्गिक निवड' हे उत्तर दिले आहे. माझा युक्तिवाद इतकाच की नैसर्गिक बरोबर असू 'शकते' व नसू देखील शकते, म्हणूनच "अस्मिता सोकावू द्यावी" या तुमच्या मताला 'नैसर्गिक निवड' या विधानाने काहीही समर्थन मिळत नाही.

प्रति

शिवाजीचे 'साम्राज्य' किती जिल्हे होते ही तपासण्याजोगी बाब आहे. 'शिवाजीचे राज्य वेल्फेअर स्टेट होते (आणि ते जगातील सर्वात आधीचे वेल्फेअर स्टेट होते)' हा दावा मात्र, अनेक निरीक्षणांवरून काढलेला निष्कर्ष आहे. शिवाय, तो तकलादू आहे. अशोकाच्या शिलालेखांमध्येही प्रजेच्या भल्याचा उल्लेख असल्याचे वाचल्याचे स्मरते. शिवाय, केतकरांच्या निरीक्षणाचे एक उदाहरण येथे आहे. 'मुद्रा भद्राय राजते' या विधानाचा 'कल्याणकारी राज्य' असा अर्थ काढणे पोरकट वाटते. ती मुद्रा शहाजीने (शिवाजी १४ वर्षांचा होण्याआधी) बनविली होती, केतकर म्हणतात त्याप्रमाणे शिवाजीने राज्याभिषेकासाठी बनविलेली नव्हती.

मुद्दा राज्यविस्ताराच्या अक्षांश आणि रेखान्शाचा नसून प्रभावाचा आहे, तसे पाहता १७६० पर्यंत मराठा साम्राज्य बर्यापैकी मोठे होते पण ते टिकाऊ नसल्याने त्याचा मराठा साम्राज्याला फारसा उपयोग झाला नाही. बाकी वेल्फेर राज्यावर तुमच्या चर्चेत प्रतिसाद देतो.

गोखल्यांना माफी मागावी लागली होती.

टिळकांना ह्यासाठी तुरुंगवास भोगावा लागला, त्यांनी माफी मागितली नाही. तुमचे म्हणणे काय आहे? "नैतिक इंग्रजी राज्याविरुद्ध केलेली अनैतिक कृती" असे काही काय?

बेंटिक ने सतीबंदी केली त्याचीही हत्या आवश्यक वाटते काय?

बेंटिक ने जे केले त्यामागचा हेतू चांगला होता पण एकूणच तुम्ही माझ्या घरात मला कसे वागायचे(भले ते बरोबर असेल) हे सांगणार असाल तर ते खपवून घेतले जाणार नाही हा सर्वसाधारण पावित्रा होता. म्हणूनच टिळकांचे म्हणणे होते कि आधी आम्हाला स्वराज्य द्या मग आम्ही ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्या करू, त्याउलट आगरकरांचे असे मत होते(ह्यार्थी) कि आधी सुधारणा करू आणि हळू हळू तुम्ही स्वराज्य देत चला. सती चळवळ किंवा बालविवाहास मान्यता केवळ सपोर्ट मिळवण्यासाठी वापरले गेले असावेत(जे चूक होते हे मान्य). त्यामुळे अमुक एक गोष्ट करू नका अथवा करा असे म्हणणे नसून काहीच करू नका, फक्त चालते व्हा हाच मुद्दा होता.

तसाच चाफेकर बंधूंनीही लावला आणि रँडला मारले असे म्हणा की!

नाही, रँडने अधिकाराचा गैरवापर करून प्लेगच्या निमित्ताने जनतेला त्रास दिला (प्लेग चे निराकरण केले हे मान्य). आता तुम्हाला रँडने त्रास दिला हेच मान्य नाही त्यामुळे चापेकरांचे वागणे अयोग्य वाटणार. तरीदेखील मी असे म्हणालो कि - जरी रँड योग्य वागला असेल, तरी गुलामाने स्वातंत्र्यासाठी केलेली कोणतीही कृती योग्यच आहे.

"अस्मिता सोकावू का द्यावी?" या प्रश्नावर तुम्ही 'नैसर्गिक निवड' हे उत्तर दिले आहे. माझा युक्तिवाद इतकाच की नैसर्गिक बरोबर असू 'शकते' व नसू देखील शकते, म्हणूनच "अस्मिता सोकावू द्यावी" या तुमच्या मताला 'नैसर्गिक निवड' या विधानाने काहीही समर्थन मिळत नाही.

अस्मिता सोकावू द्यावी ह्यातील "सोकावू" हा शब्दप्रयोग मला अमान्य, काही अंशी अस्मिता असावी हि नैसर्गिक निवड आहे आणि ती अस्तित्व टिकविण्यासाठी गरजेची असते. तसे नसेल तर राज्याला तोटा होतो म्हणून राज्यातील ऐतिहासिक ठेवी/इमारती विकून पैसे काढावेत आणि तिथे सोयीची आणि फायद्याचे दुकाने काढावीत हे देखील तुम्हाला मान्य असावे. तसे असेल तर तिथे मी असहमत आहे.

असहमत

मुद्दा राज्यविस्ताराच्या अक्षांश आणि रेखान्शाचा नसून प्रभावाचा आहे

होय, आणि मुंबईवर शिवाजीचा नगण्य प्रभाव होता.

टिळकांना ह्यासाठी तुरुंगवास भोगावा लागला, त्यांनी माफी मागितली नाही. तुमचे म्हणणे काय आहे? "नैतिक इंग्रजी राज्याविरुद्ध केलेली अनैतिक कृती" असे काही काय?

स्वातंत्र्यासाठी हिंसाचार क्षम्य असू शकतो, असत्यकथन गर्हणीय आहे.

सती चळवळ किंवा बालविवाहास मान्यता केवळ सपोर्ट मिळवण्यासाठी वापरले गेले असावेत(जे चूक होते हे मान्य). त्यामुळे अमुक एक गोष्ट करू नका अथवा करा असे म्हणणे नसून काहीच करू नका, फक्त चालते व्हा हाच मुद्दा होता.

तो मुद्दा चूक होता हे तुम्हीच मान्य करीत आहात ना? साप मारण्यासाठी बेडकांनी बगळ्याला (=धार्मिक उन्माद) बोलावू नये.

गुलामाने स्वातंत्र्यासाठी केलेली कोणतीही कृती योग्यच आहे.

हे तत्त्वच अमान्य आहे.

तसे नसेल तर राज्याला तोटा होतो म्हणून राज्यातील ऐतिहासिक ठेवी/इमारती विकून पैसे काढावेत आणि तिथे सोयीची आणि फायद्याचे दुकाने काढावीत हे देखील तुम्हाला मान्य असावे. तसे असेल तर तिथे मी असहमत आहे.

खासगी मालमत्तेवर (उदा., दुकानांवरील पाट्या) अस्मितेचे नियंत्रण नको. युरोपातील काही शहरांमध्ये (तथाकथित वारसा जपण्यासाठी) घराच्या बाह्य भिंतींचा रंग मनपा ठरविते. भारतातही, वाडे 'ऐतिहासिक' जाहीर झाले की मालकांचे हक्क कमी होतात, सोसायट्यांच्या बाल्कनीत कपडे वाळविण्यावर निर्बंध असतात. हे सारे व्यक्तीस्वातंत्र्यावर अतिक्रमण आहे.

गोव्यामध्ये देखील काही ठिकाणी बाहेरील भिंतींची ठेवण मनपा ठरवते, आपल्या विचारांशी काही अंशी मी सहमत आहे, पण सहजवृत्ती म्हणून सोयीचे/स्वार्थाचे असेच अवलंबन केले जाते, "चांगल्या" गोष्टी टिकवण्यासाठी म्हणूनच कायदे करावे लागतात उदा. ताजमहालाचे सौंदर्य जपण्यासाठी परिसरात अमुक गोष्टी नको वगैरे...आता ह्या "चांगल्या" च्या समावेशक व्याख्येमुळे काही अंशी व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येणे हि चांगली गोष्ट टिकवण्याची किमत मानली जावी, त्याची भरपाई काही मोबदला वगैरे देऊन केली जात असावी. तरी सोय/अस्मिता ह्यांचा सुवर्णमध्य असयला हवा असे माझे मत आहे.

तुमचा हेतू

धर्मांतरात मूळचेच असंस्कृत आणि अनैतिक असे काही नाही.

तुमचा चर्च पुरस्कृत हेतू वारंवार स्पष्ट झाला आहेच. तुम्हाला कुणीही धर्मांतराला विरोध केला की लगेच त्रास सुरू होतो हे वारंवार दिसते.

सावरकरांनीही धर्मांतराचे प्रयत्न केले होते असे स्मरते.

आणि तसेच तुमचे बुद्धी भ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न देखील दिसून येतात.
यनावालांनाही तसेच वापरून घेतले आहे का तुम्ही लोकांनी?
की ते ही एक तुमच्या टीमचा डु आय आहेत?

मी आधी एका प्रतिसादात म्हंटले आहे, ते येथे परत लागू आहे -
सदस्य हो, लक्षात घ्या, हिंदू विरोध आणि पर्यायाने भारत विरोधासाठी हे लोक टीम वर्क करून अतिशय कुशलतेने बुद्धीभ्रम उत्पन्न करणारे विचार सामान्य माणसाच्या मनात पेरतात. (येथे सावरकर विषयक वाक्य दिले पेरून. सावरकर हे प्रखर राष्ट्रवादी विचारवंत स्वातंत्र्यसेनानी. त्यांनीच धर्मांतर केले म्हंतले की एका प्रमुख वर्गाचे खच्चीकरण नकळत सुरू!) त्याला खरोखरीचे बुद्धीवादी असलेले लोक बळी पाडतात. इतकेच नाही तर त्यांना आपल्या कार्यासाठी नकळतपणे वापरून घेतात. आशा आहे की चर्च पुरस्कृत रिटे या उदाहरणातून हा मुद्दा स्पष्ट झाला असेल.

आता या प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी हे लोक कोणत्या थरापर्यंत जातात हे पाहू या.
माझ्या प्रतिसादांचे संपादन तर सुरूच आहे!

आपला
गुंडोपंत

:)

तुमचा चर्च पुरस्कृत हेतू वारंवार स्पष्ट झाला आहेच.

असत्य.

तसेच तुमचे बुद्धी भ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न देखील दिसून येतात.
यनावालांनाही तसेच वापरून घेतले आहे का तुम्ही लोकांनी?
की ते ही एक तुमच्या टीमचा डु आय आहेत?

लोडेड विधाने. अग्राह्य.

सदस्य हो, लक्षात घ्या, हिंदू विरोध आणि पर्यायाने भारत विरोधासाठी हे लोक टीम वर्क करून अतिशय कुशलतेने बुद्धीभ्रम उत्पन्न करणारे विचार सामान्य माणसाच्या मनात पेरतात. (येथे सावरकर विषयक वाक्य दिले पेरून. सावरकर हे प्रखर राष्ट्रवादी विचारवंत स्वातंत्र्यसेनानी. त्यांनीच धर्मांतर केले म्हंतले की एका प्रमुख वर्गाचे खच्चीकरण नकळत सुरू!) त्याला खरोखरीचे बुद्धीवादी असलेले लोक बळी पाडतात. इतकेच नाही तर त्यांना आपल्या कार्यासाठी नकळतपणे वापरून घेतात. आशा आहे की चर्च पुरस्कृत रिटे या उदाहरणातून हा मुद्दा स्पष्ट झाला असेल.

माझ्यावरील आरोप अमान्य. मिशनरी मात्र तसे करीत असू शकतील.

फरक

धर्मांतरात मूळचेच असंस्कृत आणि अनैतिक असे काही नाही.

"मूळचेच" हा फसवा प्रयोग आहे, धर्मांतर करणे आणि करवले जाणे ह्याबद्दल मत सांगा.

धर्मांतर 'करण्यात' गैर काहीच नाही, ते 'करवून' घेणे गैर असू शकते. धर्मांतराचा हेतू धर्मांतर करणाऱ्याचे हित आहे तोपर्यंत काहीच हरकत नाही. छुपा अजेंडा असेल तर ते अनैतिकच.

मानवता हा उद्देश असेल तर धर्मान्तराशिवाय फायदे का दिले जात नाहीत?

सावरकरांनी प्रयत्न केले त्याचा हेतू काय होता? ह्याबद्दल काही माहिती आहे काय?

सारखेच!

सक्ती होत नाही तोवर सारी धर्मांतरे नैतिक ठरावीत. पैसे देऊन करविले तरी त्यात काही आक्षेपार्ह नाही.

मानवता हा उद्देश असेल तर धर्मान्तराशिवाय फायदे का दिले जात नाहीत?

मानवता हा उद्देश नाहीच! मिशनरी पोजिशन हे पुस्तक मी वाचलेले नाही परंतु त्याच्या लेखकाशी मी बाडीस आहे.

सावरकरांनी प्रयत्न केले त्याचा हेतू काय होता? ह्याबद्दल काही माहिती आहे काय?

'लोकांना परत आणणे' असा उद्देश असल्याचे वाचले आहे.

आक्षेप नाही.

सक्ती होत नाही तोवर सारी धर्मांतरे नैतिक ठरावीत. पैसे देऊन करविले तरी त्यात काही आक्षेपार्ह नाही

सक्ती होत नाही आणि हेतू चांगला आहे तोपर्यंत आक्षेप नाही.

मानवता हा उद्देश नाहीच! मिशनरी पोजिशन हे पुस्तक मी वाचलेले नाही परंतु त्याच्या लेखकाशी मी बाडीस आहे

हा एक पैलू झाला, तो तितकासा स्वार्थी नसल्याने विश्वसाहर्य वाटत नाही पण मदर च्या ह्या धर्मांतरास विरोध असायचे कारण नाही, हे असे धर्मांतर फारसे यशस्वी होणार नाही.

'लोकांना परत आणणे' असा उद्देश असल्याचे वाचले आहे

ज्यांना "यायचे" आहे त्यांना येऊ देणे हा उद्देश होता, तो तसाही मान्य आहेच.

^ वर