चंद्राचा पुष्यनक्षत्रात प्रवेश

चंद्राचा पुष्य नक्षत्रात प्रवेश
"या ! परवा तुम्ही गुरुपुष्यामृत योगाची बातमी वाचून दाखवली. त्यावर चांगली चर्चा करता आली.आज कोणती बातमी आणली आहे?"
.
"आज बातमी नाही.एक शंका आहे म्हणून आलो.परवा तुम्ही म्हणालात की चंद्र आकाशात
कुठेही असला तरी तो पुष्य नक्षत्रापासून सारख्याच अंतरावर असतो.तो पुष्याच्या जवळही जात नाही.त्यापासून दूरही जात नाही."
.
"हो. ते खरे आहे.सर्वच नक्षत्रांना लागू आहे.इथे नक्षत्र म्हणजे प्रत्यक्ष तारकासमूह.क्रांतिमार्गाचे २७ समान भाग पाडून होणारा (360/27=40/3=) 13.33 अंशाचा अवकाशाचा विशिष्ट पट्टा नव्हे.तसेच नक्षत्रापासून चंद्राचे अंतर म्हणजे त्या नक्षत्रात चंद्राला निकटतम असलेल्या तार्‍यापासून चंद्राचे अंतर.
भिन्न भिन्न तार्‍यांपासून वेगवेगळी अंतरे असणार.त्यांत मोठा फरक असणार.म्हणून किमान अंतर घ्यायचे.ते असो.तुमची शंका काय आहे?"
.
"पुष्य आणि स्वाती या दोन नक्षत्रांत किती अंतर आहे?"
.
"निश्चित माहित नाही. पण कित्येक अब्ज किलोमीटर असावे."
.
"चंद्र रोज नक्षत्र बदलतो. तो पुष्यातून स्वातीत गेला. तरी अजून पुष्यापासून तेव्हढ्याच
अंतरावर आहे?"
.
"हो.चंद्र कुठल्याही नक्षत्रात जात नाही.त्याच्यापासून नक्षत्रे खूप,खूप म्हणजे खूपच दूर
आहेत.तो पृथ्वी भोवती फिरतो.सत्तावीस दिवसांत एक फेरी पूर्ण करतो.पृथ्वी,चंद्र आणि पुष्य एका रेषेत आले की आकाशाच्या पडद्यावर चंद्र पुष्य नक्षत्राच्या तारकापुंज्यात दिसतो.
पुष्याजवळ आला आहे असे भासते. पण तो पुष्यापासून किमान ४०हजार अब्ज कि.मी.दूर असतो.चंद्राची पृथ्विप्रदक्षिणेची कक्षा साधारण सहा लाख किमि.व्यासाची असेल.हे अंतर नगण्यच. म्हणून तो त्या भ्रमण मार्गावर कुठेही असला तरी कोणत्याही नक्षत्रापासून त्याचे अंतर बदलले असे म्हणता येत नाही."
.
"पण चंद्र पृथ्वीसह सूर्याभोवतीही फिरतो ना? "
.
"हो.पृथ्वीपासून सूर्य १५ कोटी किमी दूर आहे. पृथी-चंद्र सूर्या भोवती फिरतात त्या
कक्षेचा अधिकतम व्यास ३०कोटी किमी असेल.म्हणजे अवकाशात चंद्र एका
स्थानापासून तीस कोटी किमी दूर असलेल्या दुसर्‍या स्थानी जातो हे खरे आहे."
.
"मग? त्याचे नक्षत्रापासूनचे अंतर बदलणार नाही? आपलं उगीच काही तरी काय?
अंतर बदलत नाही, अंतर बदलत नाही! "
.
"चंद्रापासून पुष्याचे किमान अंतर आहे चाळीस हजार अब्ज किमी.सध्याच्या आर्थिक
घोटाळ्यांतील रकमा वाचून चाळीस हजार अब्ज ही संख्या मोठी वाटत नसेल तर एक
उदाहरण देतो.समजा पुण्यात एक वर्तुळाकार क्रीडांगण आहे.त्याच्या परिघावर पूर्व,उत्तर,
पश्चिम,दक्षिण अशा चार दिशांना चार ध्वज रोवले आहेत.एक खेळाडू या मैदानाच्या
परिघावरून धावत फेर्‍या मारत आहे.तो पूर्वेच्या झेंड्याकडून पश्चिमेच्या झेंड्याकडे आला
म्हणजे त्याचे न्यूयॉर्क शहरापासून अंतर बदलले का? तो न्यूयॉर्कच्या अधिक जवळ
आला असे म्हणणार का? तो दक्षिणे कडून उत्तरेकडे गेला म्हणजे त्याने हिमालय पर्वतात
प्रवेश केला का?
पृथ्वी,चंद्र, पुष्य एका सरळ रेषेत येऊन आकाशाच्या पटलावर चंद्र पुष्य नक्षत्रात दिसू लागला की "आला ,आला,! चंद्र आला! त्याने पुष्य नक्षत्रात प्रवेश केला! चला चला! आज गुरुवार आहे.गुरुपुष्यामृत दुर्मिळयोग!.सोने खरेदीला चला! असे ओरडत होरारत्‍नांनी उड्या मारणे म्हणजे वरच्या उदाहरणातील मैदानाच्या मध्यभागी बसलेल्या माणसाने "आला आला! धावपटू उत्तर ध्वजाकडे आला! त्याने हिमालय पर्वतात प्रवेश केला." असे म्हणण्यासारखे असमंजसपणाचे आहे."
.
"अहो तीस कोटी किमी कुठे आणि मैदानाचा दीड-दोनशे मीटर व्यास कुठे?"
.
"अंतरांची गुणोत्तरे काढून बघा म्हणजे लक्षात येईल की तीस कोटी किमी च्या तुलनेत मैदानाचा व्यास फार मोठा आहे.चंद्र त्याच्या भ्रमण मार्गात कुठेही असला तरी त्याचे कुठल्याही नक्षत्रापासूनचे अंतर बदलले आहे असे म्हणता येणार नाही.
म्हणून पृथ्वीवरून पाहाताना चंद्र रोज वेगळ्या नक्षत्रात दिसतो तरी प्रत्यक्षात तो सगळ्याच नक्षत्रांत असतो अथवा कोणत्याच नक्षत्रात नसतो हे खगोलशास्त्रीय सत्य आहे.यात कोणतीही शंका संभवत नाही.जे पृथ्वी वरून आकाशाच्या द्विमिती पटलावर दिसते ते खरे की जे प्रत्यक्ष त्रिमितीय अवकाशतअसते ते खरे याचा विचार करावा. म्हणजे "चंद्राचा कन्या राशीत प्रवेश",गुरूचे कृत्तिकेत पदार्पण"."रोहिणीशकटभेद" इत्यादि सगळे अज्ञानमूलक शब्दप्रयोग असल्याचे समजेल."
.
"आता एक शंका अशी की जन्मपत्रिकेत चंद्रासाठी कोणत्या तरी एका राशीत ’चं.’अक्षर
असते.तो जर सर्वच नक्षत्रांत असेल तर सर्व राशींतही असणार. कारण २७ नक्षत्रांच्याच
बारा राशी असतात."
.
"वा! वा! छान मुद्दा काढलात.कुंडलीत सर्व राशींत चं लिहायला हवे! आणि चंद्रच का?
सर्वच ग्रह सदैव सर्व राशींत असतात (अथवा कोणत्याच राशीत नसतात).इथे सुद्धा
राशी म्हणजे अवकाशातील ३० अंशाचा विशिष्ट पट्टा नव्हे तर प्रत्यक्ष तारे.)कारण
सूर्यमालेचा व्यास नक्षत्राच्या किमान अंतराच्या तुलनेत नगण्य आहे."
.
"आता जन्मपत्रिकेत सर्व ग्रह सर्व राशींत दाखवले तर त्या पत्रिकेला काय अर्थ राहिला?
सर्वच पत्रिका मंगळाच्या निघतील.अशा पत्रिका करायच्या तरी कशाला?"
.
"अगदी बरोबर! जन्मकुंडली निरर्थक असते. ती करूच नये.जगातील सगळ्या मुली(खरेतर
सगळ्या व्यक्ती) मंगळाच्या असतात अथवा एकही मंगळाची नसते हेचखरे. खगोलशास्त्राच्या निर्विवाद सत्यांचा थोडा जरी विचार केला,कागदावरील कुंडलीकडे बघत न बसता प्रत्यक्ष अवकाशाच्य पोकळीत पृथ्वी,चंद्र, सूर्य,इतर ग्रह,नक्षत्रे ,राशी कुठे आहेत याचे चित्र डोळ्यांसमोर आणले, त्यांच्या अंतरांचा विचार केला तर कुंडली निरर्थकच ठरणार."
.
"तुम्ही सांगता ते बरेचसे पटते.पण अजून दोन शंका आहेत.त्या उद्या परवा विचारीन.
आता निघतो."
.
"शंका विचारायला अवश्य यावे.स्वागत आहे."
****************************************************

लेखनविषय: दुवे:

Comments

माझ्या अल्पमाहिती प्रमाणे,

१. पत्रिकेत कायमच पृथ्वी केन्द्र स्थानी धरली जाते.
२. चन्द्र, पुष्यनक्षत्रात आला म्हणजे, "पुष्य" नावाच्या १३.३ अंशाच्या सेक्टर (३डी मधे विचार केला तर हा सेक्टर एका संत्र्याच्या फाके प्रमाणे वाटेल.)मधे आला.
३. पुष्य नक्षत्र दूर आहे त्यामुळे चं. ते पुष्य यातलं अंतर फारसं बदलणार नाही. हे खरं आहे, पण पत्रिका करताना कोनीय अंतरंच विचारात घेतली जातात. रेषीय नाही. आता चं आणि गुरू यांची युती आहे असं म्हणतात तेव्हा ते रेषीय अंतराच्या दृष्टीने जवळ आलेले नसतात. तसं असतं तर त्यांची टक्कर नसती का झाली? (पुढची शंका याच संदर्भात होती का?)

ही ढोबळ माहिती "पत्रिका कशी करावी" ते सांगणार्‍या कित्त्येक पुस्तकांत दिलेली आहे. पुस्तक वाचल्यास माहिती मिळू शकेल्.

हम्म!

आज चंद्रग्रहण आहे किंवा सूर्यग्रहण आहे असे एखादा शास्त्रज्ञ सांगतो तेव्हा त्याला चंद्र किंवा सूर्याचे कोणीही ग्रहण करणार नाही हे माहित असते. तरीही सूर्यग्रहण-चंद्रग्रहण हे मान्यताप्राप्त शब्द आहेत कारण "ग्रहण" हा सर्वमान्य (खर्‍या खोट्या अर्थासहित) शब्द असतो.

पृथ्वीवरून माणसाच्या नजरेला चंद्र त्या नक्षत्रात गेलेला दिसतो का याचे उत्तर "हो" असे देण्यास हरकत नसावी. इंजिनिअरींग ड्रॉइंगच्या वर्गात एखाद्या त्रिमित गोष्टीचा द्विमित टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू काढणे किंवा टॉप व्ह्यू, फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू वगैरे वरून त्रिमित गोष्ट ओळखणे ही चाचणी असे कारण "जे डोळ्याला दिसते त्याच्यापेक्षा प्रत्यक्षातील गोष्ट वेगळी असली" तरी "जे डोळ्याला दिसते" त्याला ग्राह्य मानणे आणि ग्राह्य मानून पुढील गोष्टीची कल्पना करणे ही एक मान्यताप्राप्त पायरी आहे.

चंद्र प्रत्यक्षात पुष्य नक्षत्राच्या आसपास फिरकत नाही हे विज्ञान-शास्त्र शिकलेल्या सर्वांना माहित असावे; परंतु पृथीवरून आकाशाचे निरीक्षण केल्यास चंद्र पुष्य नक्षत्रात असल्याचे भासू शकते आणि त्या भासमान दृश्यावरून कल्पना मांडल्या जाऊ शकतात.

------

काही संकल्पना गृहित धरून गृहितके मांडलेली असतात. त्यांचा खरेखोटेपणा ही वेगळी गोष्ट. पत्रिकेच्या खरे-खोटेपणाविषयी किंवा फलितांविषयी यापूर्वीही चर्चा झाल्या आहेत आणि तो वेगळा विषय वाटतो.

आणखी भर

१. सूर्य मृगनक्षत्रात आला, मृग नक्षत्र लागलं की पाऊस येतो हा सरधोपट ठोकताळा अमान्य आहे का?

२. मृग तारकासमूहातला काक्षी तारा मरायला टेकला आहे. रोहिणी नक्षत्रातला रोहीणी हा ताराही मरायला टेकला आहे. अशा तार्‍यांचा स्फोट दिसला तर त्या तार्‍यांची आकाशातली जागा नक्की कशी वर्णन करावी? शेजारी उभ्या असणार्‍या माणसाला हात उंच करून, किंवा चांगला लेझर टॉर्च वापरून दाखवता येईल. उपक्रमावर लेख लिहीताना हे कसं जमावं?

३. दोन तेजस्वी अवकाशस्थ वस्तूंमधलं सरळ रेषेतलं अंतर काही शे-हजार प्रकाशवर्ष, किंवा जास्तच असलं पण कोनीय अंतर खूपच कमी असेल तर इमेजेस बनवताना विशेष काळजी घ्यावी लागते.

४. एका सरळ रेषेत आल्यामुळे गुरूत्वीय भिंग दिसतात.

गुरूत्त्वीय भिंग दाखवणारा दीर्घिकांचा समूह 0024+1654

ही भिंग खोटी आणि निरर्थक समजावीत का? (माझ्या मते नाही. गुरूत्त्वीय भिंगांचा अभ्यास करून दीर्घिकांची रचना, विश्वरचनाशास्त्रा इत्यादींबद्दल बरीच माहिती मिळते.)

लाईन ऑफ साईट (मराठी शब्द?) ही संकल्पनाच मोडीत काढायची आहे का संबंधित अंध(?)श्रद्धा?

+१

सहमत.

कोणतीही गोष्ट पूर्णपणे नाकारणे चूकच. अवकाशाची संदर्भ चौकट आणि शक्यता ह्याचा मेळ १००% वेळा बरोबर असेलच असा नाही पण असू शकेल हा ठोकताळा सांगता येतो. जसे ह्या लेखात घासकडवी ह्यांनी म्हणल्याप्रमाणे सूर्य आज उगवला तर तो उद्या किंवा अजून "काही" वर्षांनी पूर्व दिशेलाच उगवेल हा ठोकताळा आहे.

ठोकताळे व सत्य

कोणतीही गोष्ट पूर्णपणे नाकारणे चूकच.

यातला पूर्णपणे हा शब्द थोडा फसवा आहे. सामान्य व्यवहारात एखाद्या गोष्टीची शक्यता ९९.९९९९९९९९९९९९९%+ असेल तर आपण बिनधास्त त्याला पूर्णपणे स्वीकारणं म्हणतो. व एखादी गोष्ट सत्य असण्याची शक्यता ०.००००००००००१ पेक्षा कमी असली तर ती आपण पूर्णपणे नाकारणं म्हणू शकतो. (शून्यांची संख्या महत्त्वाची नाही, पुरेशी कमी असली तर नाकारतो, असं म्हणायचं आहे). जे ठोकताळे आपल्याला तपासून पहाता येतात, ज्यांच्यामुळे आपल्याला अनेक उपयुक्त (तपासून बघता यावीत अशी) भाकितं करता येतात, व अब्जावधी निरीक्षणांनंतरही ती अचूक येतात ते ठोकताळे सत्य म्हणायला काय हरकत आहे? विशाल अवकाशात पृथ्वी सूर्याभोवती फिरते व चंद्र पृथ्वीभोवती फिरतो हे असंच सत्य आहे. सूर्य पूर्वेला उगवणं हा त्याचा परिणाम. पृथ्वी स्वतःभोवती फिरायची थांबली तर तो परिणाम बदलेल, पण ती का थांबली या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. त्यासाठी संपूर्ण चित्र फेकून द्यायची गरज नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

मान्य

मान्य.

पण मृग नक्षत्र आणि पाऊस ह्यांचा ठोकताळा देखील अशा य (अब्जावधी) निरीक्षणानंतर बांधला असावा/आहे हे मला सूचित करायचे होते. पर्यावरण बदलानुसार ठोकताळे देखील बदलतील(य निरीक्षणानंतर).

नेमेचि येतो मग पावसाळा..

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अदिती ३_१४ विचारतातः ". सूर्य मृगनक्षत्रात आला, मृग नक्षत्र लागलं की पाऊस येतो हा सरधोपट ठोकताळा अमान्य आहे का?"

पृथ्वी सूर्याभोवती फिरते.(परिभ्रमण) त्यामुळे ऋतू होतात. पृथ्वीची गती नियमित आहे. तदनुसार आपले ग्रेगोरियन कॅलेंडर अचूक आहे. प्रतिवर्षी ७ जून या दिनांकाला पृथ्वी, सूर्य आणि आकाशातील मृग नक्षत्र एका सरळ रेषेत येतात. तेव्हा ते नक्षत्र लागले असे आपण म्हणतो.पावसाळ्याचा आरंभ ७ जूनला होतो.हा सरधोपट ठोकताळा नव्हे. हे ऋतू आपण ठरवले आहेत. ते अमान्य करण्याचा प्रश्न कुठे येतो? पृथ्वी वरून सूर्य मृग नक्षत्रात दिसू लागला की वर्षाऋतू सुरू होतो.सूर्य मृग नक्षत्रात दिसतो हे पाऊस पडण्याचे कारण नव्हे.ज्यादिवशी सूर्योदय सात वाजता असतो त्या दिवशी घड्याळात सकाळचे सात वाजले म्हणून सूर्य उगवतो का?

+१

नक्षत्रे आणि ऋतूंचा संबंध तोडण्यासाठीच तर ग्रेगरीने दिनदर्शिका बनविली! दर ७२ वर्षांनी नक्षत्रे ऋतूसापेक्ष एक-एक दिवस उशिरा येतात.

होय

ज्यादिवशी सूर्योदय सात वाजता असतो त्या दिवशी घड्याळात सकाळचे सात वाजले म्हणून सूर्य उगवतो का?

सूर्य जर सतत काही/हजार वर्षे ७ वाजता उगवला तर "७ वाजले की सूर्य उगवणार" असे विधान नक्कीच करता येते. "सूर्य पूर्वेला उगवतो" हे विधान देखील तसेच आहे.

लाईन ऑफ साईट

चंद्राचं पुष्य तारकासमूहापासूनचं अंतर बदलत नाही तसंच सूर्य आणि मृगातल्या तार्‍यांमधलं अंतर बदलत नाही.
"सरधोपट ठोकताळा" एवढ्यासाठीच म्हटलं कारण दरवर्षी मृग नक्षत्रं 'लागलं' की पाऊस सुरू होत नाही.
होरारत्नांवर टीका करताना "लाईन-ऑफ-साईट"लाही अवैज्ञानिक म्हटल्यासारखं वाटत आहे.

+१

लाइन ऑफ साइटमुळेच आइनस्टाइनच्या सामान्य सापेक्षतावादाचा पहिला पुरावा मिळाला.
--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

ठकसेन

पृथ्वी सूर्याभोवती फिरते

बहुधा सूर्य आणि पृथ्वी दोघेही , आज यनावाला (आणि त्यांचे पुरोगामी शिष्य) कोणाचा समाचार घेणार आहेत ले लक्षात घेऊन कोणी कोणाभोवती फिरायचे हे ठरवत असावेत. ज्यावेळी ते अध्यात्मिकांचा समाचार घेतात तेव्हा सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आणि जेव्हा ते ज्योतिष्यांचा समाचार घेतात तेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पुरावा हवा असेल तर त्यांच्या "भ्रमाचा भोपळा", "भ्रमसेन आणि ठकसेन" आणि आरागॉर्न यांची "पृथ्वी खरेच सूर्याभोवती फिरते का?" या चर्चा वाचाव्यात.

प्रतिसाद

छान लेख व अपेक्षित प्रतिसाद. फिक्सेशनचा आरोप झाला तर, यनावालासर, त्याकडे दुर्लक्ष करावे.

सन्जोप राव
ऑल प्रतिसाद आर इक्वल, बट सम प्रतिसाद आर मोर इक्वल दॅन अदर्स.

लेख छान पण उपयोग शून्य

कॉणताही शास्र्तीय आधार नसलेल्या काव्यात्मक संकल्पना मूळ धरून निरनिराळ्या राशी (मुळातील ग्रीक कवीकल्पना), ग्रह व सूर्य यांचा निरनिराळ्या नक्षत्रांच्यात प्रवेश व निर्गमन या कल्पित समजुतींवर आधारित असलेली चर्चा निष्फ़ळच ठरणार आहे. ज्या लोकांचा या असल्या कल्पनांच्यावर अंधविश्वास आहे ते यनावाला यांचे तर्कशास्त्र कधीच मान्य करणार नाहीत. त्यामुळे लेखाचे फलित शून्यच ठरेल.
Learning is not compulsory... neither is survival.

सहमती

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.चंद्रशेखर यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.

प्रचंड मनोरंजन

पृथ्वी,चंद्र, पुष्य एका सरळ रेषेत येऊन आकाशाच्या पटलावर चंद्र पुष्य नक्षत्रात दिसू लागला की "आला ,आला,! चंद्र आला! त्याने पुष्य नक्षत्रात प्रवेश केला! चला चला! आज गुरुवार आहे.गुरुपुष्यामृत दुर्मिळयोग!.सोने खरेदीला चला! असे ओरडत होरारत्‍नांनी उड्या मारणे म्हणजे वरच्या उदाहरणातील मैदानाच्या मध्यभागी बसलेल्या माणसाने "आला आला! धावपटू उत्तर ध्वजाकडे आला! त्याने हिमालय पर्वतात प्रवेश केला." असे म्हणण्यासारखे असमंजसपणाचे आहे."

हाहाहाहाहा. प्रचंड मनोरंजन! पण ज्यांना ह्या प्रबोधनाची गरज आहे ते हे वाचतील काय? त्यांनी वाचले तरी ते वाचतील काय? असो. प्रयत्न केले तर हा धागा किमान शतकी होणार हे निश्चित.

एका मराठी वाहिनीवर एक विनोदवीर (की विदूषक?) ज्योतिषी भविष्यावर काहीबाही बोलत असतो. कुंभेची सासू, मेषेची सून वगैरे वगैरे. हा कार्यक्रम आणि त्यातले बायकी विनोद महिला वर्गात प्रचंड लोकप्रिय आहेत. ह्या विदूषकावर आपल्या विद्यार्थिनींशी सलगी करण्याचे प्रयत्न केल्याचे आरोप झाले आहेत असे दोन वेगवेगळ्या खात्रीलायक गोटांतून कळले आहे. असा हा विदूषक ज्या समाजात लोकप्रिय होतो त्या पुरोगामी समाजाचे भविष्य फारसे उज्ज्वल नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

उपाध्ये

एका मराठी वाहिनीवर एक विनोदवीर (की विदूषक?) ज्योतिषी भविष्यावर काहीबाही बोलत असतो. कुंभेची सासू, मेषेची सून वगैरे वगैरे. हा कार्यक्रम आणि त्यातले बायकी विनोद महिला वर्गात प्रचंड लोकप्रिय आहेत. ह्या विदूषकावर आपल्या विद्यार्थिनींशी सलगी करण्याचे प्रयत्न केल्याचे आरोप झाले आहेत असे दोन वेगवेगळ्या खात्रीलायक गोटांतून कळले आहे. असा हा विदूषक ज्या समाजात लोकप्रिय होतो त्या पुरोगामी समाजाचे भविष्य फारसे उज्ज्वल नाही.
हा सावध पवित्रा कशासाठी, धला? पोलिटिकली करेक्ट स्टँड घेणे आणि सस्ती लोकप्रियता मिळवणे हा काही तुमचा हातखंडा नाही.उपाध्येंचा फ्यानक्लब तुमचा नेटशत्रू झाला तर तुम्हाला काही फरक पडतो का?
विदूषकाबाबत सहमत. समाजाचे भवितव्य उज्ज्वल आहे असे गृहित धरावे असे तुम्हाला का वाटते? ज्या समाजात असे अनुभवही काही टाळ्या घेऊन जातात, त्याबाबत आशावादी रहावे हा स्वप्नाळूपणा तुमच्याकडून अपेक्षित नाही.

सन्जोप राव
ऑल प्रतिसाद आर इक्वल, बट सम प्रतिसाद आर मोर इक्वल दॅन अदर्स.

कुणाकुणाचे नाव घ्यावे?

हा सावध पवित्रा कशासाठी, धला? पोलिटिकली करेक्ट स्टँड घेणे आणि सस्ती लोकप्रियता मिळवणे हा काही तुमचा हातखंडा नाही. उपाध्येंचा फ्यानक्लब तुमचा नेटशत्रू झाला तर तुम्हाला काही फरक पडतो का?

आमचा स्टँड पोलिटिकली करेक्ट आहे असे वाटत नाही. प्रश्न फक्त नाव घेऊन जोडे हाणण्याचा असावा. पण कुणाकुणाचे नाव घ्यायचे. उपाध्यांसारखे बरेच आहेत. बाय द वे, पुण्यनगरीतल्या आदिनाथ साळवी नामक ज्योतिष्याच्या जाहिरातीही अत्यंत वाचनीय असतात. असो.

समाजाचे भवितव्य उज्ज्वल आहे असे गृहित धरावे असे तुम्हाला का वाटते? ज्या समाजात असे अनुभवही काही टाळ्या घेऊन जातात, त्याबाबत आशावादी रहावे हा स्वप्नाळूपणा तुमच्याकडून अपेक्षित नाही.

हाहाहा. अनुभव वाचून एवढेच म्हणावेसे वाटते, "अरेरे, कर्व्यांच्या पुतळ्यालाही सोडले नाही."

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

तेच आणि तेच

काय यना? बरंय ना?
घाटपांडेंच्या पुस्तकातले मुद्दे उचलून लिहिताय?
का लोकांना शहाणे करण्याच्या नादात चोर्‍या केल्या तरी चालतील असे वाटते?

किमान संदर्भ देण्याचे सौजन्य तरी दाखवायचे होते. अगदी मैदानातील उदाहरणही जसेच्या तसे उचलले आहे!

बाकी लेख नेहमी प्रमाणे तेच आणि तेच - सरपटी चेंडू सारखी तरकटी चर्चा.

नवेन विष्यावर लिहा काही जमत असेल तर.
किती दिवस त्याच त्या ओकार्‍या सहन करायच्या आम्ही?
त्यापेक्षा संपादनेथॉन: मराठी दिनानिमित्त विकिपीडियाचा उपक्रम

येथे तरी काही काम करा, सत्कारणी लागेल तुमचा वेळ.
हां पण आड्यंस नाही मिळायचा टाळ्या वाजवायला... ;)
आपला
गुंडोपंत

गंभीर आरोप

घाटपांडेंच्या पुस्तकातले मुद्दे उचलून लिहिताय?
का लोकांना शहाणे करण्याच्या नादात चोर्‍या केल्या तरी चालतील असे वाटते?

किमान संदर्भ देण्याचे सौजन्य तरी दाखवायचे होते. अगदी मैदानातील उदाहरणही जसेच्या तसे उचलले आहे!

गुंडोपंत, यनांवरील हा आरोप थोडा गंभीर नाही का वाटत? :-( त्यांनी उदाहरणे उचलली असे तुम्ही म्हटलंत तर घाटपांड्यांचे कोणते पुस्तक, पृष्ठ किंवा नेटावर असल्यास संदर्भ दाखवावे. अन्यथा, या आरोपांना काय अर्थ आहे?

आवरा !

का लोकांना शहाणे करण्याच्या नादात चोर्‍या केल्या तरी चालतील असे वाटते?

पुरावा द्या. नाही तर शांत व्हा.

किती दिवस त्याच त्या ओकार्‍या सहन करायच्या आम्ही?

हं. ओकाऱ्या! आवरा!

येथे तरी काही काम करा, सत्कारणी लागेल तुमचा वेळ.

आपण तरी कशाला यायचे उपक्रमावर? त्यापेक्षा ताजे गोमूत्र प्राशन करीत गायत्री मंत्र १००८ वेळा म्हणायचा. आज तसाही गजानन महाराजांचा प्रकटदिन आहे. 'गणगण गणात बोते' करायचे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पंत

हलके घ्या पंत.

यनावाला सर व घाटपांडे यांचा एकमेकांशी चांगला परिचय आहे. अगदी तुम्ही म्हणता त्यात तथ्य असले तरी तुम्ही निदान पुरावा द्यायचात, विचारायचे. श्री घाटपांडे हे, यनावाला सरांनी जरी त्यांची वाक्ये वापरली तरी आक्षेप घेणार नाहीत हे माझे भाकीत आहे :-) लावताय पैज्?

यनावालासरांचा हा लेख उत्तम आहे. त्यातील मताशी सहमत आहे.

कै च्या कै

हलके घ्या पंत.

इथे नक्की कुणी विनोद केला आहे हलके घ्यायला?

यनावाला सर व घाटपांडे यांचा एकमेकांशी चांगला परिचय आहे.

ह्या वैयक्तिक माहितीची इथे सार्वजनिक प्रतिसादात काय गरज होती? उगाच सदस्यांच्या वैयक्तिक गोष्टी चघळायच्या आणि मग माझ्यावर कारवाई झाली म्हणून कांगवा करायचा.

यनावाला सरांनी जरी त्यांची वाक्ये वापरली तरी आक्षेप घेणार नाहीत हे माझे भाकीत आहे :-) लावताय पैज्?

तुमची पैज व्यनि मधून लावा. आम्हाला काही रस नाही त्यात.

यना आणि गुंडो दोघांनी यावे

धला,

आपण तरी कशाला यायचे उपक्रमावर?

उपक्रमावर यना आणि गुंडो दोघांनी यावे. असे होस्टाइल प्रतिसाद का बरे?

सहज,

यनावाला सर व घाटपांडे यांचा एकमेकांशी चांगला परिचय आहे. अगदी तुम्ही म्हणता त्यात तथ्य असले तरी तुम्ही निदान पुरावा द्यायचात, विचारायचे. श्री घाटपांडे हे, यनावाला सरांनी जरी त्यांची वाक्ये वापरली तरी आक्षेप घेणार नाहीत हे माझे भाकीत आहे :-) लावताय पैज्?

यनावाला सर व घाटपांडे यांचा एकमेकांशी चांगला परिचय असला किंवा नसला तरी ज्याचे श्रेय आहे ते त्याला देणे आवश्यक आहे. निदान संदर्भासाठी तरी ते द्यावे हे उपक्रमावर अपेक्षित आहे. सर्वप्रथम गुंडोपंतांना आरोप सिद्ध करू द्या मग बघू पुढचे.

नाही

आपण तरी कशाला यायचे उपक्रमावर?
उपक्रमावर यना आणि गुंडो दोघांनी यावे. असे होस्टाइल प्रतिसाद का बरे?

प्रतिसाद वाटतो तसा होस्टाइल नाही. मराठीत 'आपण' हे सर्वनाम सर्वांना लागू होणाऱ्या वाक्यातही केले जाते असे वाटते.

उदा. आपण वडिलधार्‍यांचा आदर करावा. आपण वडिलधार्‍यांपुढे ओकार्‍या काढू नयेत.

वरील विधाने सगळ्यांना लागू आहेत. कुण्या एकाला उद्देशून नाहीत. 'आपण' ऐवजी 'तुम्ही' वापरले असते तर गोष्ट वेगळी होती. ह्यावर तज्ज्ञांनी प्रकाश पाडल्यास उत्तम. चूभूद्याघ्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

ओक्के

आले लक्षात. :-)

अवांतरः आपण आणि आम्ही मधला फरक समजावताना घरच्या अर्धशिक्षित अर्धमराठी माणसांना नाकी नऊ आले आहेत. ;-)

निराधार आरोप

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.गुंडोपंत लिहितातः"काय यना? बरंय ना? घाटपांडेंच्या पुस्तकातले मुद्दे उचलून लिहिताय?
का लोकांना शहाणे करण्याच्या नादात चोर्‍या केल्या तरी चालतील असे वाटते?
किमान संदर्भ देण्याचे सौजन्य तरी दाखवायचे होते. अगदी मैदानातील उदाहरणही जसेच्या तसे उचलले आहे! "

..
श्री.प्रकाश घाटपांडे यांचे पुस्तक वाचलेले नाही.खरे तर पाहिले सुद्धा नाही.त्यांतील एकही वाक्य उचलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.तसेच जे काय लिहिले आहे ते केवळ माझे स्वतःचे आहे जसे सुचले तसे लिहिले. कुठून भाषांतरित करूनही घेतलेले नाही.
हे शत प्रतिशत(१००%) सत्य आहे., कुणाचा विश्वास बसो न बसो.

क्षमस्व!

क्षमा करा!
मला आठवत असलेले लिखाण सापडले नाही. पण ते वाचल्याचे स्मरते आहे.
त्यात मैदानावर उभा असलेल्या व्यक्तीचेच उदाहरण होते हे नक्की.
ते लिखाण सापडत नाही तोवर माझे वरील सर्व आरोप मी मागे घेतो. पुरावा न देता आरोप केल्या बद्दल श्री यनावाला यांची मनापासून माफीही मागतो.

आपला
(दिलगीर)
गुंडोपंत

अभिनंदन!

गुंडोपंत हे दिलदार आहेत हे माहीत होतेच. त्यांनी माफी मागण्याचाही दिलदारपणा दाखविल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

+१

गुंडोपंताचा माफी मागण्याचा व चूक कबूल करण्याचा दिलदारपणा इतरांच्यातही यावा ही सदिच्छा!

हरवले ते गवसले का?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.गुंडोपंत शोधताहेत पण त्यांना सापडत नाही आहे ते लेखन हेच का?
...................................
मंगळाचा कुंभ राशीत प्रवेश
प्रेषक यनावाला (रवि, 04/08/2007 - 23:10)
समजा तुम्ही एका विस्तीर्ण माळावर पूर्वाभिमुख उभे आहात.अजून सूर्योदय व्हायचा आहे,तुमच्या समोर शंभर मीटर अंतरावर एक मोठे वर्तुळाकार मैदान आहे.मैदानाच्या परिघावरून चालत चालत एक माणूस फेरी घालत आहे.सूर्यबिंब क्षितिजावर आले आहे. एवढ्यात मैदानाला फेरी घालणारा माणूस तुम्ही आणि सूर्य यांच्या मधे आला.त्याला सूर्यबिंबाची पार्श्वभूमी लाभली म्हणजे त्याने सूर्यबिंबावर प्रवेश केला असे म्हणणार काय? खरे तर त्या माणसा पासून सूर्य १५कोटी किमी. अंतरावर आहे.
मंगळ त्याच्या कक्षेत फिरताना अशा ठिकाणी येतो की त्याला कुम्भ राशीतील नक्षत्रांची पार्श्वभूमी लाभते.आपल्याला वाटते मंगळाने कुंभेत प्रवेश केला.खरे तर तो कुंभेलील सर्वात जवळच्या तार्‍या पासूनही अब्जानुअब्ज किलोमीटर दूर असतो.
आपल्याला सर्वात जवळचा तारा म्हणजे सूर्य.तो इथून ५०० प्रकाश सेकंद (८मि.२० से) अंतरावर आहे. प्रकाशाचा वेग ३लक्ष किमी. प्रतिसेकंद आहे.दुसरा कोणताही तारा इथून पाच प्रकाश वर्षांपेक्षा कमी अंतरावर नाही.काही तारे तर सहस्रावधी प्रकाश वर्षे दूर् आहेत. या अंतराचा विचार करता मंगळाची कक्षा नगण्य आहे. मंगळ त्याच्या कक्षेत कुठेही असला तरी तो कुंभ राशी पासून कित्येक अब्ज कि.मी .दूरच असतो.हे सर्व वैज्ञानिक वास्तव आहे.
तेव्हा मंगळाचा कुंभेत प्रवेश हा केवळ दृक् भ्रम आहे. तारे इतके दूरस्थ आहेत की आपल्या सूर्यमालेतील कोणत्याही ग्रहावर
कोणत्याही राशीतील कोणत्याही नक्षत्राचा काही सुद्धा परिणाम होण्याची सुतराम शक्यता नाही

»
संपादन प्रतिसाद

केंद्रबिंदु

जन्मस्थळी अवकाशात दिसणार्‍या ग्रहांची ( दिवसा सुर्य असतानाही ग्रह दिसत आहे अशी कल्पना करुन) आराखडा सदृष आकृती / नकाशा म्हणजे जन्मकुंडली.
आता जन्मस्थळ व आख्खी पृथ्वी ही वैश्विक दृष्टीने ही बिंदुरुप होते व सर्व भावचक्राची सरमिसळ व गुंतागुंत होते. दिवस रात्र या कल्पनेला सुद्धा तसा अर्थ राहत नाही.
या बाबत पॉवर ऑफ टेन हा आयुकात पाहिलेला माहिती पट खुपच माहितीप्रद आहे.
प्रकाश घाटपांडे

आयुका

आयुकामध्येच आयुकाचा शिलान्यास झाला त्या वेळी ग्रहांची स्थिती कशी होती हे दाखवल्याचे स्मरते.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

घुमट

>> आयुकामध्येच आयुकाचा शिलान्यास झाला त्या वेळी ग्रहांची स्थिती कशी होती हे दाखवल्याचे स्मरते. <<
आयुकात छोटा घुमट आहे. शिलान्यास झाला त्यावेळी आकाशात कोणते तारे कुठे होते हे घुमटात भोकं पाडून दाखवलं आहे.

प्रकाशकाका, पॉवर्स ऑफ टेन आता यूट्यूबवर उपलब्ध आहे, जरूर पहा.

अरे वा!

छानच की!
६४कबपस वर साचवुन साचवुन पाहिला
प्रकाश घाटपांडे

धन्यवाद

ब्येस्ट. धन्यवाद अदिती.

विस्कळित विचार

गुरुपुष्यामृतात सोने घेणार्‍यांच्या गर्दीमुळे सोन्याची किंमत वाढू शकते, या योगावर सोने विकत घेण्याची प्रथा शाहाणी नाही, असे माझे मत आहे.

परंतु :
पृथ्वीवरील निरीक्षकाच्या सापेक्ष ग्रहतार्‍यांची कोनीय स्थिती काय? याचे वर्णनही मला उपयोगी वाटते.
वरील लेखात असे काही मत सांगितलेले दिसते, की या कोनीय स्थितीचे वर्णन पुरते निरर्थक आहे. हे मला पटत नाही.

कोणीय अंतर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
गुरुपुष्य योगाशी गुरुवार,पृथ्वी,चंद्र आणि पुष्यनक्षत्र या चार गोष्टी संबंधित आहेत.गुरुवार हे सप्ताहातील एका दिवसाला दिलेले ऐच्छिक(आर्बिट्ररी) नाव आहे.त्यादिवशी असा योग असू शकतो असे आपण मानू.
समजा एका गुरुवारी गु.पु.योग आहे. म्हणजे पृ.वरून पाहाताना चं. आणि पु. मधील कोणीय अंतर शून्य आहे.
समजा पुढच्या गुरुवारी चं.चित्रा नक्षत्रात आला.आता पृ.वरून चं.आणि पु. मधील कोणीय अंतर साधारण ९२अंश असेल.(कोन पुपृचं=९२).या तीन पिंडांत मागच्या गुरुवारच्या तुलनेत काय फरक पडला? पृचं अंतर बदललेले नाही.पृपु आणि चंपु ही अंतरे बदलली असे म्हणता येत नाही.केवळ कोणीय अंतरामुळे नेमका काय फरक पडला? माझ्यामते काहीही नाही.मग या गुरुवारी गुरुपुष्ययोग का नाही?माझ्या मते आहे.(मागच्या गुरुवारी आहे असे गृहीत धरले म्हणून).कारण पृथ्वी,चंद्र आणि पुष्य या खगोलांच्या संदर्भात सारे गुरुवार सारखे.(वारांची नावे माणसाने सोईसाठी दिली आहेत.) हे तर्क सुसंगत आहे.

डेविल्स ऍडवोकसी

खगोलशास्त्राचे जुजबी ज्ञानही नसल्यामुळे फलज्योतिष्यावर विश्वास ठेवणार्‍यांना तुम्ही दिलेली माहिती उपयुक्तच आहे. परंतु, विज्ञानाचा मुलामा दिलेले 'शास्त्र' मांडणेही फारसे अवघड नाही. उदा., पुष्य नक्षत्र आणि चंद्र या दोन स्रोतांतून विशिष्ट किरण निघतात. दर ७ दिवसांनी त्या किरणांची तीव्रता अत्यंत वाढते आणि त्या दिवसालाच आपण गुरुवार म्हणतो. भले चंद्र-पुष्य अंतर न बदलो, तरीही, जेव्हा पुष्य नक्षत्र-पृथ्वी या रेषेच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा काहीतरी कन्स्ट्रक्टिव इंटरफेरन्स होऊन पृथ्वीवर ते किरण सर्वाधिक पोहोचतात, अन्यथा फारसे पोहोचत नाहीत. असे किरण ज्यावर नुकतेच पडलेले आहेत असे सोने विकत घेणार्‍याला आरोग्यासाठी/बुद्धिमत्तेसाठी/आर्थिक लाभांसाठी त्या सोन्याचा उपयोग होतो, असे शास्त्र सांगून लोकांना गंडविणारे ज्योतिषी असू शकतील.

फरक

उपक्रमचा वाचक यनावालांचा टार्गेट नाही असे मला वाटते. लेखावर टीका करणार्‍यांपैकी बहुतेकजणांचा फलज्योतिष्यावर विश्वास नसावा. फलज्योतिष्यावर विश्वास ठेवणार्‍या अनेकांसाठी मात्र कोनीय स्थितीविषयीची माहिती नवीन असू शकेल. त्या माहितीमुळे त्यांचा फलज्योतिष्यावरील विश्वास डळमळू शकेल. कोनीय स्थितीवर आधारित असा फलज्योतिष्यावरील विश्वास बनू/टिकू शकतोच परंतु तसे घडण्याची शक्यता यनावाला यांना वाटत नसावी.

काय सांगावे?

सहमत आहे.

पण तो विश्वास डळमळीत करण्यासाठी "चंद्र पुष्य नक्षत्रात कधीही प्रवेश करत नाही" या ऐवजी "पुष्य नक्षत्र असा जवळजवळ/एकत्र असलेल्या/एकत्रितपणे फिरणार्‍या तारकांचा कोणताही तारकासमूह नाही" असे सांगणे अधिक योग्य ठरेल.

नितिन थत्ते

मृगजळ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली लिहितातः--"परंतु पृथीवरून आकाशाचे निरीक्षण केल्यास चंद्र पुष्य नक्षत्रात असल्याचे भासू शकते आणि त्या भासमान दृश्यावरून कल्पना मांडल्या जाऊ शकतात."
..
असल्याचे भासू शकते कशाला? भासतेच.पुष्यनक्षत्राच्या पार्श्वभूमीवर चंद्र दिसतो.त्यामुळे त्याने पुष्य नक्षत्रात प्रवेश केल्याचे दिसते.पण दिसणे /भासणे वेगळे आणि प्रत्यक्ष असणे वेगळे.मृगजळ भासते/दिसते पण असते का? त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी/शेतीसाठी होतो का? तद्वत चंद्र पुष्यात दिसला काय न दिसला काय त्याच्यावर होणारा पुष्याचा परिणाम बदलत नाही.(मुळात काही परिणाम होण्याचा संभव नाही.)
२/मृगजळाचे भासमान दृश्य पाहून एखादी पाणीपुरवठा योजना आखता येईल काय? आखल्यास ते व्यवहार्य ठरेल काय?

पाणीपुरवठा

पूर्ण वाक्य किंवा पूर्ण प्रतिसाद लक्षात न घेता सिलेक्टिव रिडींग करण्याचा यनांचा बाणा जुनाच असल्याने अधिक समजावण्यात स्वारस्य नाही.

मृगजळ नाहीच म्हणून मृगजळ ही संकल्पनाच निरर्थक आहे असा तुमचा दावा आहे. हाच तुमच्या लेखाचा मुद्दा आहे.

मृगजळाचे भासमान दृश्य पाहून एखादी पाणीपुरवठा योजना आखता येईल काय?

नक्कीच आखता येईल.

आखल्यास ते व्यवहार्य ठरेल काय?

नक्कीच नसेल पण व्यवहार्य असणे किंवा नसणे हा पुढला मुद्दा झाला. त्या आधीचा मुद्दा (मृगजळ ही कल्पना निरर्थक आहे) मला पटत नाही. तसेच, मृगजळाची पाणीपुरवठा योजना व्यवहार्य आहे असे म्हणणारे ऑडयन्स येथे नाहीच तेव्हा त्यांचे कन्वर्जन अजून किती दिवस?

ऑडयन्स

तसेच, मृगजळाची पाणीपुरवठा योजना व्यवहार्य आहे असे म्हणणारे ऑडयन्स येथे नाहीच

गुंडोपंत, शशि ओक?

हेहेहे!

गुंडोपंत, शशि ओक?

त्यांच्यासाठी यनांनी येवढी एनर्जी वाया घालवावी? :-(

तुमच्या आणि यनांच्या सकारात्मक दृष्टीकोनाचे कौतुक वाटले. ;-)

एनर्जी

त्यांच्यासाठी यनांनी येवढी एनर्जी वाया घालवावी?

तो यनांचा प्रश्न आहे!

सकारात्मक दृष्टी वगैरे काही नाही. ऑडयन्स नाही ह्या मुद्द्याला वानगीदाखल दोन नावे दिली.

ऑडयन्स नाहीच

मृगजळाने पाणीपुरवठ्याची कल्पना व्यवहार्य असल्याचे गुंडोपंत आणि शशि ओक यांनी म्हटल्याचे आठवत नाही तेव्हा ऑडयन्स नाहीच. उगीचच त्यांची नावे पुढे करून बळीचे बकरे बनवण्याची गरज वाटत नाही, पण असो.

हेहेहे

हा मात्र खरंच विनोद आहे हा. मृगजळ आणि पाणीपुरवठा हे रुपक आहे हे तुम्हालाही माहित आहे. पण असो.

रुपक?

मृगजळ आणि पाणीपुरवठा हे रुपक आहे हे तुम्हालाही माहित आहे.

नाही रुपके वगैरे नाहीत. काही गोष्टी रुपके असतात, काही संकल्पना असतात वगैरे याची यनांना जाणीव असती तर हा लेख आलाच नसता.

माझ्यामते यनांचे खरेच असे समज आहेत की मृगजळाने पाणीपुरवठा होऊ शकेल असे काही लोकांचे गैरसमज आहेत. पुढला 'मृगजळाने पाणीपुरवठा होत नाही' हे सिद्ध करणारा लेख ते टाकतीलही.

जाणीव

नाही रुपके वगैरे नाहीत. काही गोष्टी रुपके असतात, काही संकल्पना असतात वगैरे याची यनांना जाणीव असती तर हा लेख आलाच नसता.

रुपके असतात ही जाणीव यनांना नाही हे धाडसी विधान आहे. एखाद्याची (त्यातही यनांसारख्या जेष्ठ उकक्रमींची) जाणीव वगैरे काढण्याआधी सबळ उदाहरणे द्यावीत अन्यथा तो आकस असू शकतो असे समजायला जागा आहे.

माझ्यामते यनांचे खरेच असे समज आहेत की मृगजळाने पाणीपुरवठा होऊ शकेल असे काही लोकांचे गैरसमज आहेत. पुढला 'मृगजळाने पाणीपुरवठा होत नाही' हे सिद्ध करणारा लेख ते टाकतीलही.

आणि असा लेख आला की मग तिथे तुमचा प्रतिसाद शोभून दिसेल. इथे नाही.

यनांच्या मूळ प्रतिसादातूनः

पण दिसणे /भासणे वेगळे आणि प्रत्यक्ष असणे वेगळे.मृगजळ भासते/दिसते पण असते का? त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी/शेतीसाठी होतो का? तद्वत चंद्र पुष्यात दिसला काय न दिसला काय त्याच्यावर होणारा पुष्याचा परिणाम बदलत नाही.(मुळात काही परिणाम होण्याचा संभव नाही.)

इथे यनांनी मुद्दा समजवण्यासाठी मृगजळाचे रुपक वापरले आहे हे तुम्हाला खरंच समजले नसेल तर चर्चा करणे व्यर्थ आहे.

 
^ वर