इजिप्त क्रांती : पुढे काय?

गेले २-३ आठवडे ताणून धरलेली क्रांती अखेर फळाला आली. कालच जाहीर भाषणातून 'हटणार नाही' अशी दर्पोक्ती करणार्‍या मुबारक ह्यांनी अचानक राजीनामा दिला. कैरोमधे चाललेली निदर्शनांचे रुपांतर जल्लोषात झाले आहे. (बातमी) सध्यातरी मुबारक ह्यांनी राजीनामा देऊन लष्कराकडे सुत्रे सोपावली आहेत. पण पुढे काय?

सध्याच्या जगाच्या एकमेकात गुंतलेल्या स्वरुपामुळे इजिप्तमधील क्रांतीचा प्रत्येकावर परिणाम होणार आहे असे ओबामा म्हणाला होता. ह्या नविन घडामोडीचा इजिप्तमधे, अरब जगात आणि नॉन अरब देशात काय परीणाम दिसून येईल? एकविसाव्या शतकात 'एकाधिकारशाही' ही आउटडेटेड होत जाणार एवढे नक्की.

लेखनविषय: दुवे:

Comments

सावध

तेथील देशांतील बदलाची १८५७ च्या उठावाशी तुलना करता येईल, दोन्हींमध्येही आधुनिक लोकशाहीच्या प्रेरणा नव्हत्या. मुस्लिम ब्रदरहूड वाढण्यापेक्षा हुकूमशाही परवडेल असे मला वाटते.

उलटेही होऊ शकेल

उलटेही होऊ शकेल. उठावात मोठ्या संख्येने सहभाग घेणारे तरूण लोक आहेत. (त्यामूळेच ट्वीटर/फेसबुक वगैरेने मोठी भुमिका बजावली.) तरुणांच्या धर्मांधतेचे प्रमाण बहुदा कमी असते त्यामुळे आज इजिप्त उद्या इराणमधे अँटी ग्रीन रेव्हल्युशन होण्याचे नाकारता येत नाही.

आनंदाची बातमी

ह्या क्रांतीची लाट अरब जगात पसरल्यास कच्च्या तेलांच्या किमती भडकतील. आणि त्यामुळे इतर देशांतही महागाई वाढून अस्थिरता येणारे हे निश्चित. तसेच भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढदरावर प्रतिकूल असर होऊ शकतो. सध्याच भारतातल्या सरकारी तेल कंपन्या रोज जवळपास ३०० कोटीचे नुकसान सहन करीत आहेत अशी माहिती वाचण्यात आली होती.

फेसबुक, यूट्यूबच्या ह्या नव्या जगातल्या अशा प्रकारच्या यशस्वी क्रांतीने (म्हणजे किमान पहिले चरण तरी यशस्वी झाले आहे. ) अरब जगातीलच नव्हे तर इतर हुकूमशहांचे, हुकूमशाही राजवटींचे धाबे थोडे किंवा फार नक्कीच दणाणले असतील. इजिप्शियन जनतेचे अभिनंदन. पण सत्तापालटानंतर इजिप्तमध्ये अस्थिरता, यादवी माजल्यास ती शोकांतिका ठरेल. पण तिथली जुनी व्यवस्थाही बदलायला हवी आहे. त्यामुळे पुढील काही वर्षे महत्त्वाची. असो.

चीनमध्ये अशी क्रांती शक्य आहे का? बहुधा तूर्तास नाही. पण व्हायला हवी. चीनमध्ये लोकशाही येणे भारतासाठी गरजेचे आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सध्यातरी आनंदाचीच

आधुनिक चीनमधेही अशी क्रांती शक्य असावी. तिनामेन स्क्वेअरचा तेहरीर स्क्वेअर होईल तो दिवस भारतासाठी (जगासाठी) सुदिन!

--
चीनचे हु जीन टाव अमेरिकेत आले असता ओबामाने त्यांना इंप्रेस करायला घरी नोबेल पुरस्कार मांडून ठेवलेला दाखवला, तर हु जीन टाव म्हणाले की 'त्यात काय विशेष? माझ्यकडे अक्खा नोबेल प्राइज विजेता बांधून ठेवला आहे!

इजिप्त

तेल आणि कोळश्याची किमंत वाढणार, काही दिवस तरी इजिप्त मधील कॉल सेन्टर्स/ऑफ्शोर डेव्हलपमेंट सेन्टर्स बंद राहतील, फेसबुक वगैरेचा पुढील निवडणुकीत वापर केला जाणार (अखिल जगात). वर श्री. रिकामटेकडा म्हणतात त्याप्रमाणे मुस्लीम ब्रदरहूड त्रासदायक ठरू शकते.

बाकी प्रधान मंत्री असताना लष्कराकडे सत्ता का सोपवावी? अश्याने एकाधिकार फक्त ट्रान्स्फर झाला असे म्हणावे लागेल.

अवांतर - साहेबानी ह्यांना पण लुटलं, त्यात हा होस्नी तरीपण ह्यांचा पर कॅपीटा जीडीपी आपल्या दुप्पट वगैरे आहे. हे विशेष आहे. होस्नी मुबारक ह्यांना आपण (आपल्या देशाने) जवाहरलाल नेहरू नामक पुरस्काराने सन्मानित केले आहे असे विकीवर वाचनात आले. तसेच सद्य परिस्थिती पाहता "साहेबाच्या वेळी बरं होतं" असे म्हणणारे देखील काही असतीलच.

साहाब्

"साहेबाच्या वेळी बरं होतं" असे म्हणणारे देखील काही असतीलच.
>> तसं पण बरच् चाल्लय कि.... देव नामक साहेब आहे वर सगळं बघणारा!
आपण कशाला काळजी करा.....?

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

क्षणचित्रे

क्षणचित्रे: सौजन्य बीबीसी

खरी डीजीटल क्रांती

रणगाड्यावरच विसावा

तेहरीर चौक

रस्त्यावरचा दवाखाना

स्वीस खाती

मुबारकची स्वीस खाती गोठवली. भारतातही अशी क्रांती येऊन आणि भ्रष्ट राजकारण्यांची खाती गोठवली जावीत.

नेमकी अशी क्रांती बहुधा नको

भारतीय निवडणुकांच्या निकालात अजून तरी अशी एकाधिकारशाही नाही. पण जे कोणी निवडून येते, त्यांची "नीयत" खराब असते.

यापेक्षा थोडी वेगळी क्रांती - निवडणुकांमधून वेगळे उमेदवार निवडण्याची प्रक्रिया - झाली तर चालेल.

एक मत

एकंदर इजिप्त मधे ज्या पद्धतीने हे आंदोलन झाले त्यावरून पाश्चात्य मिडीयाने एकंदर मिडल-ईस्ट् मधल्या लोकांबद्दलचा जो स्टीरिओटाईप् बनवला आहे त्याला नक्कीच धक्का पोचला असे म्हणता येईल. लाखो लोक दिडेक महिना रस्त्यावर नेमाने येऊन निदर्शने करत होते. हिंसेचे प्रकार तुरळक होते असे म्हणावे लागते.

अजूनही मुस्लिम ब्रदरहूड् सारख्या संस्थांनी सर्व कारभार आपल्या हाती घेण्याची शक्यता फेटाळून लावता येत नाही.मात्र आतापावेतो ज्या रीतीने सत्तांतर घडवून आणले गेले ते निश्चितच आशास्पद आहे.

हे असे शांततामय मार्गाने घडणे या मागे इजिप्तच्या एकंदर मवाळ सामाजिक वातावरण आहे असे म्हणता येईल. इराणसारख्या इतर अरब देशांपेक्षा जास्त असलेल्या मोकळेपणामुळे इंटरनेट्, सोशल मिडीयासारख्या गोष्टींमधून लोकांना एकंदर आंदोलनाची व्याप्ती, त्यातला लोकांचा सहभाग , एकंदर शांततामय स्वरूप याबद्दलची माहिती मिळण्यास मदतच झाली असावी.

रस्त्यावरचे वळण

इजिप्त मधल्या घडामोडी बघता हा देश आता अशा एक वळणावर येऊन पोचला आहे जिथून पुढे दोन रस्ते फुटतात. एक रस्ता असणार आहे लोकशाहीचा. यात अनेक संकटे आहेत असे गेल्या 50 वर्षाच्या भारताच्या इतिहासावरून दिसून येते. विकासाचा मंद वेग, भ्रष्टाचार, गटबाजी, सोदेबाजीचे राजकारण वगैरे लोकशाहीचे दुष्परिणाम देशाने हा मार्ग निवडला तर भोगावे लागतील हे नक्की.
दुसरा मार्ग लष्करी हुकुमशाहीचा आहे. यात सुरवातीला अगदी जलद प्रगती दिसेल. राजकारण व सौदेबाजी फार कमी असेल. कदाचित इजिप्त हा ब्रिक देशातही जाऊन बसेल. परंतु हे थोड्या कालासाठीच होईल. त्यानंतर अशा हुकुमशाहीचे दुष्परिणाम हळूहळू दिसू लागतील व देश पाकिस्तानप्रमाणेच अराजकाच्या उंबरठ्यावर परत एकदा जाऊन उभा राहील.

भारताच्या गेल्या काही दशकांच्या इतिहासावरून हे दिसते की सर्व गुणदोषांचा विचार करूनही लोकशाही हीच मोठ्या कालावधीचा विचार केला तर देशाला प्रगतीपथावर नेऊ शकते. लोकशाही ही हुकुमशाहीपेक्षा अनेक पटींनी जास्त श्रेष्ठ राजकीय पद्धत आहे. त्यामुळे इजिप्त मधे काय घडेल हे फक्त कालच सांगू शकेल. उपक्रमींतर्फे आपण फक्त ते लोकशाही निवडतील अशा शुभेच्छा त्यांना देऊ शकतो.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

लोकशाही आणि हुकुमशाही

ईजिप्तच्या सत्तापरिवर्तनाच्या निमित्ताने हुकुमशाही किंवा एकाधिकारशाही विरुद्ध लोकशाही अशी तुलना होणे क्रमप्राप्त आहे.
दोन्हींचेही फायदे /तोटे आहेत. आदर्श समाजास लोकशाही राज्यपद्धती सर्वोत्कृष्ट आहे.
परंतु एकाधिकारशाही असो किंवा लोकशाही, शेवटी सत्ताधार्‍यांची नितीमत्ता महत्त्वाची आहे.
एकाधिकारशाहीतील भ्रष्ट कारभारात जनतेचा शत्रू जनतेपासून वेगळा असल्याने त्याचा स्पष्ट विरोध करणे सहज शक्य आहे.
पण लोकशाहीत सत्ताधारी म्हणजे जनतेचेच प्रतिनिधी असल्याने आपलेच दात, आपलेच ओठ अशी परिस्थिती असते.
प्रत्यक्षात बहुसंख्य जनतेस पळवाटा हव्या असतात आणि त्यातून अधिकाधिक भ्रष्ट राज्यकर्ते निर्माण होत जातात.
ईजिप्तमधील जनतेस हे माहित असावे अथवा नसल्यास लवकरच माहित व्हावे ही अपेक्षा.
त्यांच्यासमोर भारताचे उदाहरण आहे. पाकिस्तानचेही आहे.

दुसरी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे 'मुस्लिम ब्रदरहूड'. हे ब्रदरहूड जर सत्तेवर आले तर ईजिप्तमध्ये इस्लामी राजवट येईल असे दिसते.
इस्लाम आणि लोकशाही या दोन गोष्टी एकत्र आणण्यासाठी विद्वानांना संशोधन करून ग्रंथ लिहावे लागतात.
ईजिप्तमध्ये इस्लामिक तत्वांनुसार चालणारी लोकशाही (?) निर्माण होईल असे समजले तरी ती पाकिस्तानच्या मार्गाने मार्गक्रमण करेल की इराणच्या? दोन्ही मार्ग योग्य ठरणार नाहीत.

हे सर्व टाळून ईजिप्त जर सुहार्तो पश्चात इंडोनेशियाच्या मार्गाने गेला तर ते सर्वोत्तम ठरेल.

 
^ वर