बिगफूट: प्रकाशचित्र

ज्यांनी कोणी हा धागा उघडला त्यांची माफी मागून सर्वांनी पुढील लेखन हलकेच घ्यावे अशी विनंती करते.

आमच्या या घरात जमिनीवरचे राक्षसी चेहरे, अवेळी उमलणारी फुले, राक्षसी भाज्या असे अनेक प्रकार घडले आहेत आणि बरेचसे उपक्रमी हे जाणून आहेत. आता बाकी काय होते तर बिगफूट अवतरणे. तर तोही आज अवतरला की काय असे वाटून गेले.

सध्या आमच्या घरासभोवती २ इंच कडक बर्फाचा थर असून त्यावर सुमारे ४ इंच हिमवर्षाव झाला आहे. आजूबाजूचा परिसर 'घोस्ट टाउन" म्हणावा असा आहे. शाळा बंद आहेत. बरीचशी सरकारी हापिसे बंद आहेत. आम्ही बाहेर पडतो तेही अगदी सावकाश आणि कामापुरते. गाडी बाहेर यावी म्हणून फक्त ड्राईववे कसाबसा साफ केला आहे. तो करताना कुदळीने बर्फ तोडावा लागला. अशा परिस्थितीत आज मला बॅकयार्डात पुढील पावले दिसली.

आमच्या बॅकयार्डात कधीतरी हरिण, कोल्हे, रक्कून आणि ससे येतात परंतु ही पावले त्यापेक्षा वेगळी आहेत हे निश्चित. मानवी पावले नाहीत हे ही कळून येते. चार पायी प्राण्याचे चार खूर दिसत नाहीत. दोन पावलांमध्ये सुमारे ३ फूटांचे अंतर आहे. हा कोण प्राणी येऊन गेला असावा असा सध्या प्रश्न पडला आहे? उत्तर आहे का?

DSC02568

DSC02569

Comments

पावलाचे ठसे

छायाचित्रावरून हे पावलाचे ठसे नसावेत असे वाटते कारण पहिल्या चित्रात पाहणार्‍याच्या दृष्टीने उजवीकडचा ठसा डावीकडच्या ठशापेक्षा बराच मोठा आहे. माझ्या मताने जिथे हा ठश्या सारखा आकार दिसतो आहे तिथे जमिनीवर उंचवटा किंवा दगड वगैरे असावा. त्यामुळे तिथे बर्फ कमी जमा हो ऊन तो वितळला असावा.
अर्थात फोटो बघणे आणि प्रत्यक्षात बघणे यात फरक असतोच.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

पावलांचेच ठसे

ठसे पावलांचेच आहेत. माझ्या बॅकयार्डात दगड नाहीत. वर तीन वेगळे ठसे दिलेले आहेत. प्रत्येक पाऊल सुमारे १० ते १२ नंबरचा बूट असावा इतके मोठे आहे. पहिल्या चित्रातील पाऊल किंचित पसरले आहे आणि ते शक्य आहे कारण हिमाखाली बर्फ आहे त्यामुळे पाय सटकतो.

असो. बर्फ वितळलेला नाही. तापमान शून्याखाली ५-६ असावे आणि काल रात्रीपर्यंत हिमवर्षाव होत होता तेव्हा सूर्यदर्शनही झालेले नाही.

ससा उड्या मारत गेला असावा अशी एक शंका घरात ऐकली. म्हणजे उडी मारली आणि ससा बसला तिथे हिम दबले,मग पुढली उडी. :)))) असे काही 'उडी...उडी..' झाले ही शक्यताही मला पटत नाही.

मी स्वतः बाहेर जाऊन या पावलांचा आताच मागोवा घेतला तेव्हा दिसले की ही पावले माझ्या बॅकयार्डातून शेजारच्यांच्या बॅकयार्डात गेली आहेत आणि पावलांतील अंतर वाढले आहे. काही ठिकाणी ते ६-८ फूट होते पण प्रत्येक ठिकाणी पावले द्विपाद प्राण्याची असावीत असे वाटले.

शंका

तेथे उड्या मारणारा/उडणारा प्राणी गेला असल्याचे मीही सुचविणार होतो.
ठसे एकाच सरळ ओळीत आहेत की द्विपाद/चतुष्पाद चालतात तसे अर्धे डाव्या ओळीत आणि उरलेले उजव्या ओळीत?
कुंपणापर्यंत ठसे आहेत काय?

मी आताच जाऊन पाहिले

हा प्रतिसाद आधी वाचायला पाहिजे होता पण ठसे एका ओळीत नाहीत असे वाटते. मी पुन्हा एकदा तपासून बघते. (पुन्हा पुन्हा बाहेर गेले तर मला चांगलीच पडणार आहे)

दुर्दैवाने स्नो पुन्हा सुरु झाला आहे त्यामुळे कितीवेळ हे ठसे राहतील हे सांगता येत नाही.

मी माझ्या बुटांशी हे ठसे जुळवून पाहिले तर खूप मोठे दिसले नाहीत म्हणजे १०-१२ नंबरच्या बूटांएवढे नसावेत ७-९ नंबर पर्यंत वाटले पण हे ठसे मानवी नाहीत एवढे नक्की.

गंमत म्हणजे मला स्नोमध्ये हरणाचे आणि सशाचे ठसेही दिसले. ते इतरत्र होते आणि सहज ओळखू येणारे होते.

विनंती

जमल्यास टॉप व्यू छायाचित्र घ्यावे कारण या छायाचित्रांत ठशांचा आकार नालासारखा भासतो आहे (इवन टोऽड हूव्ज प्रमाणे).

आणखी काही चित्रे

खालच्या दोन्ही चित्रांत मला खूर व्यवस्थित दिसले. दुसर्‍या चित्रात माझ्या बुटाचा ठसा आहे त्यावरून दुसर्‍या ठशाची लांबी लक्षात येईल. दोन पावलांतील अंतर वर म्हटल्याप्रमाणेच दिसले. सुमारे ३ फूट ते ८ फूटांत बसावे असे.

DSC02570

DSC02571

काहीतरी गोंधळ?

काकड्यांप्रमाणेच इथेही काहीतरी स्केलचा किंवा मोजमापाच्या एककांचा गोंधळ झालेला दिसतो आहे. जर त्या दोन पावलांमध्ये अंतर तीन फुटाचं असेल तर त्या ठशांची लांबी फारतर सहा ते सात इंच असावी. म्हणजे प्रत्यक्ष पाऊल सुमारे पाच ते सहा इंचाचं असावं. याला बिगफूट काय म्हणणार? का खरोखरच बिगफूट होता पण त्याने चालत गेल्यानंतर प्रत्येक मागच्या पावलाच्या खुणेत बर्फ भरून स्वसंपादन केलं? पण तसं असेल तर हे खूपच आश्चर्यकारक आहे. बहुतेकांचा कल आपली पावलं आहेत त्याच्यापेक्षा अधिक लांब आहेत असं दाखवण्याकडे असतो.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

बिगफूट

बिगफूट हा केवळ पीजे आहे. ;-)

माझ्या बुटाचा नंबर ७ आहे त्यावरून वरल्या पावलाचा अंदाज यावा. दोन पावलांतले अंतरही प्रत्येक ठिकाणी मला समान भासले नाही. तीन फूट आणि त्याहून जास्त असे भासले.

असो. सध्या हिमाने पुन्हा संपादन करणे सुरु केले आहे तेव्हा हे ठ्से लवकरच पुसले जातील. :-(

पण गंभीरपणे, मी असे ठसे यापूर्वी पाहिलेले नाहीत.

छायाचित्रं

इकडे अनेक छायाचित्रं सापडतील. काही ओळखीचं दिसलं तर कळवा.

स्टोट सदृश काही असेल का?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सशाच्या उड्या

सशाच्याच उड्या असाव्यात का असे मला राहून वाटते आहे पण मी प्रत्यक्षात या पूर्वी सशाच्या उड्या पाहिल्या आहेत आणि त्याचे ठसेही. ते असे दिसले नव्हते असे म्हणेन.

उड्या मारणारे छोटे जनावर +१

उड्या मारणारे छोटे जनावर असल्यासारखे ठसे दिसत आहेत. +१

समोरचे दोन पाय जमिनीवर पसरट पडतात (जेणेकरून तोल सांभाळला जातो), आणि त्या पाठोपाठ दोन्ही मागचे पाय शरिराच्या मध्येभागी पडतात (बहुधा गुरुत्वमध्याच्या अगदी जवळ). मग पाठीमागच्या पायांच्या रेट्याने पुढली उडी मारली जाते.

पुढल्या पायांनी हिम हलकेच मागच्या दिशेने झटकले जाते, तर पाठीमागल्या पायांच्या "फॉलोथ्रू"मुळे झटकलेल्या हिमाचा लांबट ओरखडा दिसतो.पाठीमागचे दोन्ही पाय जवळ-जवळ रोवल्यामुळे त्यांचे ठसे एकमेकांत मिसळलेले दिसतात.

चुपाकाब्रा

अरेरे! धनंजय यांनी साफ निराशा केली. त्यांनी तरी चुपाकाब्रा सदृश प्राणी येऊन गेला होता असे म्हणायला हरकत नव्हती. ;-)

ससाच असावा हा अंदाज होताच. बिचारा असा टणटणाटण उड्या मारत का गेला असावा हे कोडं आहे. अर्थात, ससाच तो; आभाळ पडलं या भीतीने धावत सुटला असावा. ;-)

चुपाकाब्राच!

चुपाकाब्राच्या पिलाच्या उड्यांचेच वर्णन आहे वरती!

तुमच्या बगिच्यातली हिमाने झाकलेली झुडपे त्याला बकरी-मेंढीसदृश वाटले असणार. रक्त लुचायला त्याने त्या हिमधुडाचा चावा घेतला असणार. पण दात बर्फात रुतून असह्य झिणझिण्या झाल्या असणार. मग पळत सुटणार नाही तर काय?

(चुपा-काब्रा = लुच-बकर्‍या = बकरे-लुचणारा)

पैर बडा गंवार का

बिगफूट चिनी असावी.

परग्रहावरील जीव

आपल्याकडे परग्रहावरील जीव अवतरला असावा. डॉ प वि वर्तक सुक्ष्म लिंग देहाने जाउन अधिक माहिती देउ शकतात.
प्रकाश घाटपांडे

स्नो शूज

:) विशेष वाटते खरे पण - हे असण्याची शक्यता आहे काय?

Snow Shoes
Snow Shoes

अधिक महिती - दुवा

तरीदेखील २ पावलातील अंतर एवढे का ह्याचे काही कारण सापडत नाही. वारा वहात होता का? एक शक्यता कि वाऱ्यामुळे काही ठष्यानावर बर्फ परत जमा झाले असावे?

नाही

नाही वारा वाहत नव्हता. वाहत असता तर आजूबाजूचा स्नोही हलला असता. चित्रात बघा पावलांच्या बाजूला सपाट स्नो दिसतो आहे.

डीअर

डीअर ८ फूट उंच उडी मारू शकते असे नेटवर वाचण्यात आहे, उंचीचे गणित लांबीमध्ये लावले तर डीअर ३-४ फूट लांब उडी मारू शकेल काय? डीअर च्या पावलाचे ठसे आहेत असे गृहीत धरल्यास.

हरिण नाही

हरणाने ८ फूट उडी मारली किंवा चालत गेले तरी चतुष्पाद प्राण्यांचे चारही खूर जमिनीवर दिसतील ते इथे झालेले नाही तेव्हा हरिण बाद.

बिग बेन

बेन रॉथल्सबर्गर येउन गेला असेल. त्याच्या बुटाचा साइझ १४ आहे म्हणे.

काल रात्री आला असता

बेन रॉथल्सबर्गर येउन गेला असेल. त्याच्या बुटाचा साइझ १४ आहे म्हणे.

काल रात्री आला असता तर नक्की बेन रॉथल्सबर्गर असा शिक्कामोर्तब केला असता. सुप्परबोव्ल हरल्याचे दु:ख नाही पण सहकार्‍यांनी ठपका त्याच्यावर ठेवल्याचे दु:ख नक्कीच असावे तेव्हा तो आता बॅकयार्ड टू बॅकयार्ड तेल(?) मागत फिरत असतो असे कोणी सांगितले तर आश्चर्य वाटणार नाही. ;-)

पण हा प्रकार परवा रात्री झाला तेव्हा बेन डलासला होता असे कळते. ;-)

जुनी

सदर लेखिकेची एक कथा , त्यातली सारखी ब्याकयार्ड मध्ये जाणारी नायिका आठवले. कल्जि घेने. ;-)

नितिन थत्ते

थांकु

कल्जि घेने. ;-)

थांकु! पण आमच्या ब्याकयार्डाच्या कुंपणापलिकडे ते मंद लयीत सळसळणारं, वार्‍यावर फेर धरून डोलणारं, सूर्याच्या सोनेरी प्रकाशात चमचमणारं, माणसाला भारून टाकणारं पुरुषभर उंचीचं गवत नाहीये ना.

बाकी या गोष्टीची आठवण मला व्ह्यायला हवी होती पण झाली नाही. तुम्ही दुवा दिलाबद्दल धन्यवाद.:-)

.

१) एक् तर फोटो फार चूकीच्या अँगलने काढले आहेत
२) तसेच् असे ठसे साधारण कीती अंतरावर रीपीट झाले आहेत् याची पण माहीती दीली नाहीये
३) कोठपासून सूरू होवून कोठे संपले तसेच आजूबाजूच्या (जवळच्या लागून् असलेल्या)परीसरात असे ठसे आढळलेत काय ? हे पण् लीहले नाहीये.

अपूर्‍या माहीतीवर अंदाज् बाधंणे कठीन् वाटतेय, म्हणून प्राथमीक् नीष्कर्श हाच् की ते पायाचे ठसे न्हवेत कीव्हां मराठीत् भास्कररावांच्या कूत्र्याच्या पायचे ते ठसे असावेत (आपलं हाऊंड ऑफ् बास्कर्वीले हो). अजून् इनपूट द्यावे.

चतुर मनुष्य

म्हणजे अगदीच चतुर मनुष्य नाही पण मॉथमॅन येऊन गेला असावा अशीही शंका मला आली होती. ;-)

खात्रीने सांगतो

नक्की यती!! खात्री आहे! :)
सध्या हे यती लोक हिमालयात दिसत नाहीत म्हणे.. आम्रिकेला गेले आहेत हे आता समजले :प्

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सध्या ऋषीही गायब..

सध्या हे यती लोक हिमालयात दिसत नाहीत म्हणे.. आम्रिकेला गेले आहेत हे आता समजले :प्

असेल असेल येतीही असेल. आपण सर्व शक्यता ग्राह्य मानू. तसे हल्ली काही ऋषीही गायब झाले आहेत म्हणे... कुठे गेले आहेत हे मात्र समजले नाही. आमच्या ब्याकयार्डात तर नाही ना येऊन गेले? :प्

 
^ वर