सैतानी चेहरा : छायाचित्र

डिस्क्लेमर १: चित्राच्या आधीच डिस्क्लेमर टाकते की मला कॅमेरा पकडून कळ दाबण्याखेरीज कोणतेही अधिक ज्ञान नाही.

डिस्क्लेमर २: या चर्चेला टीका असे म्हटलेले नाही कारण कोणी टीका करावी अशी कलाकृती नाही असे वाटते. :-) परंतु, टीका करण्यास ना नाही.

भित्यापाठी ब्रह्मराक्षस, मनी वसे ते स्वप्नी दिसे अशा म्हणींतील तथ्यांश जाणून घ्यायचा असेल तर खालील चित्र हा त्याचा उत्तम नमुना आहे असे मला वाटते. घरातील लाकडी जमिनीवर हे चित्र लाकडाच्या नैसर्गिक गुणधर्मांतून उमटलेले आहे. गेले अनेक दिवस हा फोटो काढून ठेवायचे मनात होते पण तो कसा काढावा, किती अंतरावरून, किती प्रकाशात वगैरे हे कळत नव्हते. याबाबत सुचवण्या असतील तर अवश्य कराव्यात.

चित्र काळ्या-पांढर्‍या रंगात का टाकले याचे स्पष्टीकरण विचारू नये कारण उत्तर माहित नाही. ;-)

trial

डिस्क्लेमर ३: आमच्या घरात भुताटकी नाही. ;-)

लेखनविषय: दुवे:

Comments

उच्च!

फाउंड आर्टचा उच्च नमुना!

थोडासा आउट-ऑफ-फोकस असल्याचा या चित्राला चांगला फायदा होतो आहे.

लै भारी !

मस्त खेचलाय फोटो,
भूताचा चेहरा अगदी स्पष्ट दिसतोय !

अवांतर : भयकथा लेखिकेला अशा आर्टमधे आणखी काय दिसणार ! :)

डेक्कन क्वीनमधील भुते.

हे चित्र पाहून आठवले. डेक्कन क्वीनच्या आतील भिंतींना पहिल्यांदा लॅमिनेटेड लाकडाच्या चादरीने मढवले, त्या काळात मी त्या गाडीने नित्यनेमाने प्रवास करीत असे. तेव्हा डब्याच्या त्या भिंतींवर विविध प्रकारच्या भुतांचे असंख्य आकार आहेत असे मला भासायचे. गाडीच्या प्रत्येक प्रवासात मला एखादेतरी नवे भूत सापडायचे. त्या भुतांचे निरीक्षण करताकरता प्रवासाचा काळ कसा भुर्रकन उडून जायचा.--वाचक्‍नवी

अरेवा !

हेहेहे... प्रियाली भूतकथा लिहीण्यासाठी कायमची प्रेरणा आहे म्हणजे घरात!! आता तो चेहरा पाहून एखादी कथा येऊदेत !
बाकी... ते भूत तुझ्या कथांना घाबरून थिजल्यासारखे वाटते आहे! :))
मस्त आहे ! :)

प्रेरणा

धन्यवाद. अशा प्रेरणा माझ्या घराच्या आजूबाजूलाही ठासून भरल्या आहेत. ;-)

उदा.

मिसळपावावरील या गोष्टीतील हुबेहुब वळण माझ्या घराशेजारी आहे. फक्त वळणावर ती येत नाही, तिथे दीडशे वर्षे जुने एक ग्रेव्हयार्ड आहे. :-)

बापरे...!

अरे बापरे !!! :|
मज्जाय तुमचे घर म्हणजे.. हे असं भूत, वेळी-अवेळी फुलणारी झाडं, घराशेजारी 'ते' वळण!! :O

सैतान?

चेहर्‍याला नावच द्यायचे तर आइनस्टाइन (सर्दी झालेला ?! ) किंवा काही प्रमाणात मध्यपूर्वेकडचा चेहरा दिसतो आहे.

आईनस्टाईन

काय असते की प्रत्येकाला आपल्या आवडीप्रमाणे (समजूतीप्रमाणे, धारणेप्रमाणे) समोरची गोष्ट दिसते किंवा माणूस प्रत्येक गोष्ट आपल्या साच्यात घालून बघतो त्यामुळे तुम्हाला आईनस्टाईन दिसला, मला सैतान. (मला असेच काहीतरी दिसते यात नवल नसावे ;-) )

(आईनस्टाईनच्या डोक्यावरचे जंगल मला दिसले नाही.)

मध्यपूर्वेकडील चेहर्‍याबद्दल असे म्हणेन की मलाही हा चेहरा पाहून आधी तुरीनच्या कफनाची आठवण झाली होती....पण नको बॉ! उगीच गोंधळ नको त्यापेक्षा भुतं, सैतान परवडतात.

गैरसमज

गैरसमज होतो आहे असे दिसते आहे, माझा साचा आइनस्टाइनचा कसला?! आणि तुमचाही सैतानाचा आहे असे सुचवायचे नव्हते!
चित्रातील डोळ्यांखाली विशिष्ट खोलगटपणा दिसला त्यावरून म्हटले एवढेच. चित्र पाहताच जे सहज मनात आले ते तसेच लिहीलेले आहे.. त्याला तेवढेच महत्त्व द्यावे. त्यात अर्थ शोधूनही सापडणार नाही!

आणि मध्यपूर्वेतला म्हणावासा वाटला, तर म्हणा की.
त्यावरून कोणाला गोंधळ करावासा वाटला, तर करेल. ज्यांना सोडून द्यायचे ते सोडून देतील. ज्यांना तुम्हाला असे का वाटते असे विचारावेसे वाटेल ते तसे विचारतील किंवा पटत नाही असे म्हणतील. असो.

मला खरे तर सद्दाम हुसेनचाही भास झाला, या चित्राकडे पाहून. तसे तुम्हाला पटल्यास, सैतानच होता तो एक प्रकारचा, त्यामुळे तुम्हीही बरोबर आणि मीही!

आइनस्टाइन

चित्रातील डोळ्यांखाली विशिष्ट खोलगटपणा दिसला त्यावरून म्हटले एवढेच.

ओठावरील मिशीसदृश भागसूद्धा आइनस्टाइनसारखा वाटतो.

सापेक्ष आहे...:)

कुणाला हा सैतानाचा चेहरा वाटतो, तर कुणाला आईनस्टाईनचा!
हे प्रत्येकाच्या मनोधारणेला 'सापेक्ष' आहे. :)

एकदा तर मला तो झापडे लावलेल्या झेब्र्याच्या डोक्याप्रमाणे दिसला.;)

:-) सापेक्ष

पुर्वी उमराव्, शिकारी, मोठे लोक यांच्या घरात भिंतीवर मोठ्या जंगली जनावरांची मुंडकी भिंतीवर टांगली असायची तसे बहुदा भयकथाकार / मांत्रीकाच्या भिंतीवर नामशेष केलेल्या भुतांचे असाच विचार आला होता. :-)

किती घाबरवणार

वेळी अवेळी फुलणारी झाडे परसात, घरात हे असे. :-) एकंदर कायमच घाबरुन वचकून राहीले पाहीजे बॉ.

अवेळी फुलणारी फुले

वेळी अवेळी फुलणारी झाडे परसात, घरात हे असे. :-)

हो ती फुले विसरलेच होते. आता त्यांचा सिझन होता तर बाकी सर्व झाडांना फुले आली आणि गेल्यावर्षी अवेळी फुललेली झाडे अजून पाना-फुलांशिवाय भुंडी आहेत. यावेळेस नेमकी कशी गुल खिलवणार आहेत ते बघण्यास आम्हीही उत्सुक आहोत.

वा मस्तच! ठरवूनही करता येईल की नाही सांगता येत नाही! :)

गजलेची जशी जमीन असते तशी ही तुमच्या भयकथांची लाकडी 'जमीन' आहे असे दिसते आहे! ;)

(खुद के साथ बातां : प्रियालीताईं त्यांचा बंगला भूतपट चित्रीकरणासाठी रेंटने देतात की काय? ह.घ्या.!)

चतुरंग

मस्त!

जबरदस्त फोटो! खूप आवडला..
ब्राईटनेस आणि काँट्रास्ट थोडा बदलून अधिक भयावह करण्याचा प्रयत्न केला आहे :)

'भयकथा लेखिका' ह्या प्रतिमेला साजेसा हा फोटो तुम्ही एन्लार्ज करुन लिव्हिंग रुम मध्ये लावला पाहिजे.

मला सुचलेले शिर्षक : "अल्काट्राझच्या गजातुन डोकावणार्‍या कैद्याचे भूत!" :)

अफलातून

सुधारीत चित्र आणि अल्काट्रॅझच्या गजातून डोकावणार्‍या कैद्याचे भूत हे शीर्षक जबरदस्त! खूपच आवडलं. :-) धन्यवाद.

यथा काष्ठं च काष्ठं च

काष्ठपिशाच्चाचा फोटो भारी आहे. लाकडी एकमितीय ग्रोटेस्क म्हणून चालून जाईल :)
कोलबेर रावांनी केलेले 'अल्काट्राझच्या गजातुन डोकावणार्‍या कैद्याचे भूत!' हे 'काष्ठिंग'ही भारी :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

भूत

आमच्या घरी सनमायकावर एका फुलाचे चित्र आहे. लहानपणापासुन ते मला असेच भुताटकीचे चित्र वाटते. मी कित्येक रात्री रामाचे नाव घेत जागुन काढल्या आहेत त्याच्या भितीपाई.

लावा बघू

आमच्या घरी सनमायकावर एका फुलाचे चित्र आहे. लहानपणापासुन ते मला असेच भुताटकीचे चित्र वाटते.

या चर्चेत टाका की. आम्हीही पडताळतो फूल वाटते की भूत वाटते ते. :-)

थोडा वेळ लागेल

घरी गेलो कि फोटो काढून आणीन. (काय आहे मी जरा मागासलेला आहे. कॅमेरा वगेरे नाहीये तिथे. पण कुणाचा तरी मोबाईलचा वगेरे पैदा करीन तिथे.)

परिचित भूत

भूत काय, अवचित फुलणारी फुलझाडे काय!! धमालच आहे.. :)

हेलन गावाजवळ हाँटेड हाऊस म्हणून एक बंगला/खेळ होता. तिथे प्रत्येक खोल्यात भुतं तुमच्यावर हल्ला करून घाबरवतात. मात्र् साधारणतः अश्या खेळात मधेमधे होणारे हल्ले इथे अव्याहत चालु असतात, शिवाय एक भुत रक्तबंबाळ चाकु घेऊन तुमचा पाठलाग सतत करत असतं. तुम्हि हॉरर मुव्हीसारखे रस्ता शोधत वाट काढायची हरवलात . थांबलात की भुताने मारलंच समजा. तर सांगायची गोष्ट अशी ते मागे लागणारं भुत तुमच्या चित्रातल्या भुतासारखंच दिसत होतं ;) फोटो चांगला आहे.

स्वगतः बाकी कधी प्रियालीलाईच्या घरी जायचा योग आला तर रुद्राक्षाची माळ घेऊन आणि रामरक्षा पाठ करून गेलं पाहिजे ;)

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

 
^ वर