आगर वृक्षांच्या नावानं ओळ्खलं जाणारं शहर - आगरतला
आगरतला ही त्रिपुरा राज्याची राजधानी. नकाशा पाहिला तर हा प्रदेश आपल्या महाराष्ट्राच्या खूपच दूर आहे. मुंबई पश्चिम किनार्यावर वसलेली तर त्रिपुराचि राजधानी थेट पूर्वेच्या टोकापाशी. आपल्यापैकी फार थोड्या लोकांना आगरतळा ह्या शहराला भेट देण्याचा योग आलेला असतो, तरीही ह्या आगरतलाशी सम्बधित एक शब्द आपण रोज नित्यनेमाने वापरत असतो , तो म्हणजे 'अगरबत्ती'. खरं तर हा शब्द 'आगरबत्ति असा आहे. ह्या आगरबत्तीतलं पारम्परिक द्रव्य म्हणजे ह्याच आगरवृक्षापासून काढलेलं सुगन्धी द्रव्य. बांबुच्या अगदी पातळ काडीला कोळशाच्या , शेणाच्या नि तत्सम द्रव्यांच्या अत्यंत बारीक भुकटीत आगरांचं सुगन्धी द्रव्य मिसळुन जी काण्डी बनवली जाते तिच आगरबत्ती. आज अनेक प्रकारची सुगन्धी द्र्व्यं वापरली जात असली तरी मूळच्या आगराची स्मृती म्हणून ह्या वस्तुला आजही आपण आगरबत्ती म्हणूनच ओळखतो.
आगर नावाचं एक सुगन्धी द्रव्य निर्माण करणारा वृक्ष आहे. हा हल्ली मुख्यतः पूर्वांचलाच्या प्रदेशांमध्ये होतो. आगर झाड मुख्यतः पूर्वांचलाच्या प्रदेशांमध्ये होतो. आगर झाड साधारणतः पंधरा वर्षाचं झालं की त्याच्या खोडात एक प्रकारचं सुगन्धी द्रव्य तयार व्हायला लागतात. चांगली वाढ झालेल्या आगर वृक्षाच्या खोडापासुन सुगन्धी द्र्व्य काढलं जातं. खैरापासून कात काढतात त्याच पध्द्तीनं आगरवृक्षापासून सुगन्धी द्रव्य काढतात.
एके काळी त्रिपुरात आगरवृक्षांची जंगलं होती, त्यातल्या एका भागात तर ती फारच मोठ्या प्रमाणात होती, म्हणुनच त्या भागातल्या शहराला 'आगरतला' असं नाव ठेवण्यात आलं तेच आजचं 'आगरतला' ज्या भागात एखाद्या विशिष्ठ प्रकारची झाडं किंवा असंच काही मोठ्या प्रमाणावर असेल तर त्याचं नाव त्या भागाला देण्याची पध्दत बंगाल-आसाम मध्ये दिसते. उदा. गुवाहाटीच्या पुर्वेच 'बेलतला', कलकत्यातलं 'धरमतला'.
आगरवृक्षापासून हे द्रव्य काढायचा उद्योग हल्ली असममधल्या होजाई ह्या शहरात प्रचंड प्रमाणात चालतो नि त्यासाठी लागणारे आगरवृक्ष मुख्यतः असमच्या वरच्या भागातून येतात (एका झाडाची किंमत सुमारे २०/२५ हजार रुपये इतकी असते.)
साभारः ईशान्य वार्ता - जानेवारी २०११
Comments
सामाजिक्
वा!छान् माहिति दिलित्
सामाजिक्
वा!छान् माहिति दिलित्
अरे वा...!
छान माहिती........!
-दिलीप बिरुटे
चांगली माहिती
आगरताळा आणि अगरबत्तीच्या संबंध आहे हे माहित नव्हते.
आगरी
आगरबत्तीचं माहीत नव्हतं आणि कधी विचारही केला नव्हता. अगरबत्तीला आमच्या इकडे उदबत्तीही म्हणतात.
रायगडच्या आगरी लोकांचा काही संबंध आहे का? नसल्यास आगरी लोकांना आगरी का म्हणतात? दिवेआगर नावाचं गावही आहे रायगड जिल्ह्यात. अजित आगरकर पण आठवला.
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
खरेच की
"अगर" शब्द संस्कृतोद्भव ("अगुरु" पासून), आणि "ऊद" शब्द अरबी-उद्भव आहे.
"ऊद" शब्द बहुधा फक्त त्या झाडाच्या चिकापासून नैसर्गिक प्रक्रिया झाल्यामुळे तयार केलेल्या सुगंधी पदार्थांपुरता मर्यादित आहे - म्हणजे ऊद, ऊदबत्ती वगैरे.
"अगर" शब्द वृक्ष आणि लाकडाला सुद्धा लागू आहे.
- - -
:-) "आगर" शब्द आठवला ही तर गंमतच. अवांतर : आगर म्हणजे संदर्भाप्रमाणे बागायत किंवा मिठागर. आगरी जमातीतील (जातीतील?) लोकांचा मागच्या पिढीत मिठाच्या "आगरां"शी संबंध असे, नाही का?
आगरकर नावाच्या लोकांचा पूर्वी आगरांचे पालनकर्ते म्हणून व्यवसाय असावा.
ओके
लहानपणी डास हाकलणे आणि सुवास ह्या दुहेरी हेतूने घरात ऊदाचा(तुम्ही दुसरा ऊ वापरलात म्हणून) धूर करायचो.
कोकणात बागेला आगर हा शब्द रुढ आहे हे जरा उशिरा आठवलं. धन्यवाद.
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
चांगली माहिती
मुलीची भरतनाट्यमची शिक्षिका नृत्यातील पाय विवक्षित पद्धतीने उचलण्याच्या पद्धतीला "आगरतला" म्हणते.
http://www.kuchipudi.com/grammar/hamsasya येथे याला अग्रतला असे म्हटले आहे.
आभारी आहे!
माहिती पूरवल्या बद्दल आभारी!
मला कधी-कधी उगीचच प्रश्न पडायचा, 'गर नसलेली बत्त्ती ती, अगरबत्ती' असे नाव कसे?
चला! थोडे का होईना, पण अद्न्यान दूर झाले. द्न्यानाचा सुगंध पसरला.