उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
कसं जगाव आता आपण?
मधुलेखा
January 25, 2011 - 2:08 pm
आजच बातम्यांमध्ये पाहिले-यशवंत सोनावणे (अतिरिक्त-अधीक्षक) ह्यांना तेल माफियांनी जिवंत जाळले.क्षणभर खरच पोटात गोळा आला.ज्या भारतीय तरूणांनी अधीक्षक किंवा किंवा कलेक्टर असं होण्याच स्वप्न पाहिलं असेल,त्यांच काय?मुळात महाराष्ट्रात असा प्रकार घडतो,हाच लज्जास्पद प्रकार आहे! कधी कधी काय करायच हा प्रश्न पडतो! तिथे चुक घडतेय म्हणुन त्याला प्रतिबंध करायचा तर प्रकरण जिवाशी येणार ह्याच दहशती खाली गप्प बसायच.कारण प्रवाहाच्या उलट्या दिशेने गेलात तर तुम्ही बुडणार.करायच काय मग?उपाय सुचवा आणि बक्षीस जिंका एस् एम् एस् करा ह्यावरुन हे सुटण्यासारख नाहि.उद्या आपलाही गळा कापयला कमी करणार नाहीत.पण आपण हे सहन करायलाच हवं कारण आपली कॅटेगरी कोणाच्यातच मोडत नाहि.आणि हे पचवायलाच हवं.
दुवे:
Comments
.
काय बोलणार?
ही काही पहीलीच घटना नाही.
ही काही पहीलीच घटना नाही.
असो.
महाराष्ट्र
असं तुम्हाला का वाटलं? महाराष्ट्रात हुंड्यासाठी सुनेला जाळणे, भाऊबंदकीतून खून होणे असे प्रकार होतातच की. तळेगावच्या सतीश शेट्टींनाही मारलंच की. आदर्श सोसायटीचे कागदपत्रं गहाळ होतात उद्या एखादा साक्षीदार असला तर तो गहाळ व्हायचा.
एसएमएस करुनही सुटणार नाही आणि मतदान करुनही. सरकारला पर्यायाने जनतेलाही जर यदाकदाचित आता दुष्कृत्ये बस झाली असे वाटले, लाज वाटली तर सुटेल.
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
अशा परिस्थितीत
अशा परिस्थितीत गुन्हेगारांचा फायदा होता कामा नये. खुनापासून या तेल व्यावसायिकांचा तोटा झाला तर "धंद्यातील एक प्रक्रिया" या प्रकारे खुनाचा पर्याय वापरला जाणार नाही.
जे झाले त्याबद्दल फार वाईट वाटते, हे तर आहेच.
नि:शब्द
अगदी घॄणास्पद.
लोकसत्तेतील त्याच बातमीत ठाण्यामधे बिल्डर्स-राजकारण्यांच्या भानगडी उघडकीस आणणार्या विक्रांत कर्णीकांवर पण प्राणघातक हल्ला झाला असल्याचे म्हणले आहे.
थरकाप उडतो
कधीकधी वाटतं हातपाय तोडायच्या, दगडाने ठेचायच्या शिक्षा हव्यात की काय निदान जरब बसते. काही लोकांची लायकीच तीच असते की काय असे वाटते.
पुन्हा तारखांवर तारखा पडणार, काहीतरी पळवाट निघणार आणि ही हिंस्त्र श्वापदं कदाचित रस्त्यावर मोकाट सुटणार किंवा वाईटात वाईट तुरुंगात पोसली जाणार.
________________________________________
सांमंतर्य - अमेरीकेच्या ऍरिझोना राज्यात, एका काँग्रेस" महीलेला मेंदूत गोळी मारून जबरी जखमी केलेल्या आणि या बातमीमध्ये सांमतर्य जाणवले ते म्हणजे - जे लोक देशाची सेवा करत आहेत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला. एका रिपब्लीकन नेत्याचा त्यावेळचा प्रतिसाद बोलका आणि खंबीर आहे - "An attack on one who serves is an attack on all who serve,"
बदला
झाला प्रकार वाईटच आहे, पण हा रागातून घडल्यासारखा वाटतो. तसा असेल तर तो कोणाबाबतही घडू शकतो. पण इथे एका प्रामाणिक आणि कार्यनिष्ठ अधिकाऱ्याचा जीव जाणे खूपच वाईट आहे.
माझ्या मते इथे कोण माणसाला शिक्षा होण्यापेक्षा त्या जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांचे निरीक्षण करून भेसळ करणाऱ्यांना जबर दंड करावा, सोनावणे ह्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यास तो एकप्रकारे त्या गुंड प्रवृत्ती विरुद्ध बदला घेतला असे असू शकेल.
तसेच सर्व प्रामाणिक आणि निडर माणसांनी एक गोष्ट शिकणे अत्यंत गरजेचे आहे की ताकद ही समूहात असते किंवा संगठीत व्यवस्थेत असते, एकट्या दुकट्याने धाडस करणे साधारणपणे मूर्खपणाचे असू शकते. करकरे, साळसकर, कामटे, सोनावणे हे सर्व ह्या शिकवणीपासून अनभिज्ञ होते.
मला वाटत...
मी आपल्य मताशी पुर्न सहमत् नही. करकरे, साळसकर, कामटे हे धाडस दखवताना गेले नसुन् कचानक् हल्ला झाला म्हनुन् शहीद् झाले. जर सन्धि मिळाली असती तर त्या विरानी १०/१० जनाना लोळवल असत.
आदर्श
"ज्या भारतीय तरूणांनी अधीक्षक किंवा किंवा कलेक्टर असं होण्याच स्वप्न पाहिलं असेल,त्यांच काय?"
त्यांच्या समोर कदाचीत वेगळ्या सनदी अधिकार्यांचे "आदर्श" असतील
फायदा
याचा एक फायदा झालाय... सर्व शासकिय कर्मचार्यांनी स्वयंघोषित सुट्टि घेतलीय! होतं ते चांगल्यासाठीच अस मी नाही मोठी लोकं म्हणतात...