तुम्हाला मराठी येते?
तुम्हाला मराठी येते? येत असेल तर मग मला 18 वाक्यरचना मांडून द्या.
खरतरं! 'तुम्हाला मराठी येते का?' हा प्रश्न हे पहाण्यासाठी विचारला कि आधी, 'मला किती मराठी येतेय?' येथे मी केवळ माझ्या आभ्यासासाठी माहिती गोळा करीत आहे. त्यासाठी मला तुमचा येथे सहभाग हवा आहे.
मला तुमच्याकडून येथे इंग्रजीच्या ऍक्टीव व्हाईस व पॅसिव व्हॉईस मधून तीन काळात व त्यांच्या तीन उपप्रकारात चालणार्या वाक्यरचना हव्या आहेत.
ऍक्टीव व्हाईस
- वर्तमान काळ - सामान्य, चालू, पूर्ण
- भूत काळ - सामान्य, चालू, पूर्ण
- भविश्य काळ - सामान्य, चालू, पूर्ण
पॅसिव व्हॉईस
- वर्तमान काळ - सामान्य, चालू, पूर्ण
- भूत काळ - सामान्य, चालू, पूर्ण
- भविश्य काळ - सामान्य, चालू, पूर्ण
उदाहरणासाठी वापरण्याचे तीन शब्द :- सरकार, श्री. तिवारी, निलंबन
त्या तीन शब्दांचा संदर्भ =
'सरकार'= महाराश्ट्र सरकार - मालक
'श्री.तिवारी'= सरकारी अधिकारी - नोकर
'निलंबन'= पदावरून दूर करण्याची प्रक्रिया
Comments
या घ्या
रावले यांना हव्या असलेल्या काही वाक्यरचना. त्यांनी दिलेल्या शब्दांऐवजी रावले, अशुद्धलेखन, करणे हे तीन शब्द मी वापरले आहेत. (त्यांची परवानगी गृहित धरून) चू.भू.द्या.घ्या.
ऍक्टिव्ह व्हॉइस
वर्तमान काळ
सामान्य :- रावले अशुद्धलेखन करतात
चालू:- रावले अशुद्धलेखन करत आहेत.
पूर्ण:- रावल्यांनी अशुद्धलेखन केले
भूत काल
सामान्य:- रावले अशुद्धलेखन करत
चालू:- रावले अशुद्धलेखन करत होते.
पूर्ण:- रावल्यांनी अशुद्धलेखन केले होते.
भविष्य काल
सामान्य :- रावले अशुद्धलेखन करतील
चालू :- रावले अशुद्धलेखन करत असतील
पूर्ण:- रावल्यांचे अशुद्धलेखन करून झाले
पॅसिव्ह व्हॉइस दुसर्या कोणासाठी तरी ठेवला आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
एराटा
भविष्य काल
पूर्ण:- टींब टींब ह्यांचे अशुद्धलेखन करुन झालेले असेल
गृहित राहून गेलेली बाब दाखवून दिल्याबद्दल आभारी!
मी जे तीन शब्द दिले आहेत, त्यांमध्ये व तुम्ही घेतलेल्या तीन शब्दांमध्ये फरक आहे.
'करणे' हा शब्द पद वाक्य बनवण्यासाठी माझ्याकडून गृहित धरलेला होता.
या कारणास्तव, वरील उदाहरणात चार शब्द वापरता येतील.
उदाहरणासाठी वापरण्याचे शब्द :- सरकार, श्री. तिवारी, निलंबन, करणे/होणे
त्या चार शब्दांचा संदर्भ =
'सरकार'= महाराश्ट्र सरकार - मालक
'श्री.तिवारी'= सरकारी अधिकारी - नोकर
'निलंबन'= पदावरून दूर करण्याची प्रक्रिया
'करणे'/'होणे'= हा किंवा तत्सम शब्द वाक्यरचना पूर्ण करण्यासाठी
चंद्रशेखरजी,
मराठीतील 'पॅसिव व्हॉईस' समजून घेण्यासाठीच तर हि खटपट करतोय. तेव्हा तीची उदाहरणे तुम्हाला द्यायची आहेतच. सूट मिळणार नाही.
ठीक आहे
अशुद्धलेखन हा शब्द एकत्र न वाचता अशुद्ध व लेखन असे दोन निरनिराळे शब्द वाचावे.
पॅसिव्ह व्हॉइसवर नंतर
चन्द्रशेखर
काही वाक्ये चुकली; दुरुस्त वाक्ये
चंद्रशेखरांनी दिलेली काही वाक्ये येथे दुरुस्त करून लिहिली आहेत.
पूर्ण वर्तमानकाळ(कर्तरी); दुरुस्त वाक्य :- रावले अशुद्ध लेखन करते झाले आहेत. (अशी वाक्यरचना मराठीत रूढ नाही.)
सामान्य भूतकाळ(कर्तरी); दुरुस्त वाक्य : रावले अशुद्ध लेखन करले.(अवामरूना)
पूर्ण भूतकाळ(कर्तरी); दुरुस्त वाक्य : रावले अशुद्ध लेखन करते झाले.(अवामरूना)
पूर्ण भविष्यकाळ(कर्तरी); दुरुस्त वाक्य :रावले अशुद्ध लेखन करते झाले असतील.(अवामरूना)
कर्मणी वाक्ये :
वर्तमानकाळ. १. रावल्यांकडून अशुद्ध लेखन केले जाते. २. केले जात आहे. ३. केले गेले आहे.
भूतकाळ. १. रावल्यांनी अशुद्ध लेखन केले. २. रावल्यांकडून अशुद्ध लेखन केले जात होते. ३. रावल्यांनी अशुद्ध लेखन केले होते.
भविष्यकाळ. १.रावल्यांकडून अशुद्ध लेखन केले जाईल. २. केले जात असेल. ३. केले गेले असेल.
--वाचक्नवी
स्वतःचे स्वतःच मराठी शिकावे.
येथे लिहिलेले "पण मी स्वत:ला मोफत कोणाकडून 'शिकवून घ्यायला' येत नाही. आजपर्यंत मीच माझा गुरू आहे" हे वाक्य आठवले.
अवांतर: आम्हाला वाटे की सदर चर्चाप्रस्तावक अगोदरच भाशातद्न्य आहेत म्हणून ते ज्ञ आणि क्ष वगैरे चुकीची अक्शरे वापरणे टाळतात.
नितिन थत्ते
तुम्ही मराठीच्या परीक्शेत नापास!!!
माझे ते वाक्य तुम्ही पूर्ण वाचले नव्हते. बघा! तुम्हाला नीट वाचता देखील येत नाही. अन् तुम्ही इतरांना शी.......!
तुम्ही माझे जे वाक्य इथे दिलेत त्याच्या आधी मी हे वाक्य लिहीले होते....'मी अंतरजालावर, उपक्रमवर मनोरंजनासाठी येतो, जमलंच तर काही शिकायला मिळाले तर शिकायला येतो.'
मी वर 'तुम्हाला मराठी येते का?' असा मी प्रश्न विचारला तुम्ही काय उत्तर दिलेत? ....'स्वतःचे स्वतःच मराठी शिकावे.'
तुम्हाला दहा पैकी...शून्य गूण मिळाले! म्हणजे तुम्ही मराठीच्या परीक्शेत नापास!!!
असो
बरं बुवा....
तरीही जमलंच तर काही शिकायला येतो
आणि
कोणाकडून मोफत शिकून घ्यायला येत नाही
दोन्हीचा मिळून अर्थ आमच्या मराठीत "स्वतःचे स्वतः शिकता आले तर शिकायला येतो" असाच होतो. परंतु या प्रस्तावात मात्र तुम्ही इतरांकडून शिकण्याची अपेक्षा धरत आहात म्हणून तुम्हाला तुमच्या तत्त्वाची आठवण करून दिली. :)
परीक्शेत शून्य मार्क म्हणजे काय ते कळले नाही. कारण मी आजवर कधी परीक्शा दिली नाही...परीक्षाच देत आलो.
नितिन थत्ते
मराठी शब्द असताना उसनवारी का?
ऍक्टिव्ह व्हॉइस = कर्तरी प्रयोग
पॅसिव्ह व्हॉइस = कर्मणी प्रयोग
१० पैकी ० गुण
त्यान्नाही १० पैकी ० गुण.
कर्म्मणिप्रयोगाची उदाहरणे!
कर्म्मणिप्रयोगाची उदाहरणे!
कर्त्तरिप्रयोगाची उदाहरणे श्री. चंद्रशेखरांच्याकडून मिळालेलीच आहेत, ही घ्या कर्म्मणिप्रयोगाची उदाहरणे!
वर्तमानकाल
सामान्य:- रावल्यांकडून अशुद्धलेखन (केले जाते) / (होते).
चालू:- रावल्यांकडून अशुद्धलेखन (केले जात आहे) / (होते आहे).
पूर्ण:- रावल्यांकडून अशुद्धलेखन (केले गेले) / (झाले).
भूतकाल
सामान्य:- रावल्यांकडून अशुद्धलेखन (केल्या जात असे) / (होत असे).
चालू:- रावल्यांकडून अशुद्धलेखन (केले जाई) / (होई).
पूर्ण:- रावल्यांकडून अशुद्धलेखन (केले गेले होते) / (झाले होते).
भविष्यकाल
सामान्य:- रावल्यांकडून अशुद्धलेखन (केले जाईल) / (होईल).
चालू:- रावल्यांकडून अशुद्धलेखन (केले जात असेल) / (होत असेल).
पूर्ण:- रावल्यांकडून अशुद्धलेखन करून झालेले असेल.
चूकभूल देणेघेणे!
(हाप्पाडा! येन्ना क्कोडुमै! यिदुक्कुत्तान नान अडिक्कडि मराट्टियिल येऴुदरदिल्ल!)
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
मराठी
मला मराठी येते असे वाटते; कदाचित तसा माझा गैरसमज आहे परंतु मला रावल्यांसारखे मराठी येत नाही आणि हा माझा गैरसमज अजिबात नाही.
मराठी येणे म्हणजे काय?
मराठी येणे म्हणजे काय? हे रावल्यांनी समजावून सांगायला हवे. स्वत: रावल्यांना काय येते बरे? कारण रावल्यांचे जाणूनबुजून केलेले अशुद्धलेखन बघून, वाचून मात्र कुणाला हसू येते तर कुणाला शिसारी येते.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
व्हॉईस ही संकल्पना मराठीला थेट लागू नाही
इंग्रजीमधली "व्हॉईस" (ऍक्टिव्ह-पॅसिव्ह) ही संकल्पना मराठीला थेट लागू नाही. याच्याशी थोडीफार समांतर कल्पना म्हणजे "प्रयोग" (कर्तरि-कर्मणि-भावे). पण सामांतर्य फार रेटता कामा नये. दोनच "व्हॉईस" पण तीन "प्रयोग" येथे संख्याच वेगळ्या आहेत, तर एकास-एक समांतर मांडणी जमणारच नाही.
शिवाय "प्रयोग" हे मराठीत आख्यातरूपानुसार ("काळा"नुसार) मर्यादित असतात. येथेसुद्धा इंग्रजी-मराठी सामांतर्यात अडचण येते. इंग्रजीमध्ये आख्यातरूपे ("काळ") दोनच आहेत, आणि बाकीचे कालवाचक अर्थ शब्द-जोडणीने सांगतात. मराठीत आख्यातरूपे ८ आहेत. शिवाय शब्दरूपे जोडून व्याज अर्थ सांगितले जातात ते जातातच. येथेसुद्धा आख्यातरूपांची संख्या वेगवेगळी असल्याकारणाने इंग्रजी-मराठी सामांतर्य फारसे रेटता येत नाही, एकास-एक समांतर मांडणी जमणारच नाही.
- - -
मात्र इंग्रजी वाक्यांचे सुयोग्य मराठी भाषांतर बहुधा शक्य आहे. ("भावानुवाद" - वक्त्याकडून श्रोत्याला तोच मथितार्थ पोचवणारे भाषांतर, पण शब्दांच्या रूपातले बदल एकास-एक समांतर नाहीत.) तुम्ही १८ वेगवेगळे वाक्यप्रकार सांगितले आहेत. त्यांची इंग्रजी उदाहरणे दिल्यास उपक्रमी त्यांचा मराठी भावानुवाद देऊ शकतील, याबाबत खात्री वाटते.
- - -
संदर्भ :
१. आख्याते आणि प्रयोगांबद्दल सध्याचे व्याकरणमत माझ्या "मराठी भाषेतील नकारात्मक वाक्यरचनेतील क्रियापदे" लेखात थोडक्यात दिले आहे. (हा लेख पूर्वी उपक्रमावर दिलेला होता, पण त्यातील काही चुका सुधारून, आणि तक्ते सुवाच्य करून तो लेख "भाषा आणि जीवन" मध्ये प्रकाशित झालेला आहे.)
२. पारंपरिक आख्यात/प्रयोग विश्लेषणातले काही दोष, आणि त्यात सुधारणा प्राध्यापक अशोक रा. केळकरांनी सुचवल्या आहेत. त्याचे तपशील त्यांच्या "Language in a Semiotic Perspective: The Architecture of a Marathi Sentence" पुस्तकात बघावे. (शुभदा सारस्वत प्रकाशन, प्रकाशनवर्ष १९९७) त्यांनी केलेल्या सुधारणा मराठी भाषेचेच सुयोग्य वर्णन करतात, त्यातून इंग्रजीशी सामांतर्य साधत नाही. त्यांचे विश्लेषण माझ्या प्रतिसादाच्या भूमिकेच्या आड येत नाही. आणि भावानुवादाबद्दल माझे मत त्यांच्याकडूनच घेतलेले आहे.
आत्ता माझी बाजू स्पश्ट करतो.
हो! मला मराठी येते.
मला मराठीतून व्यक्त होता येते. मराठीतून लिहीताना नव्हे धावत सुटताना मराठीच्या शूद्धलेखनासंबंधिचे नियम माझ्या पायात बेड्या घालू पहातात, मराठीचे प्रचलित व्याकरण माझ्या कल्पनांना मुक्त भरार्या घेताना आडकाठी आणतात. पण मी देखील तितक्याच बेगुमानपणे ही बंधने तोडण्याचा प्रयत्न करतो. त्यात कधी यशस्वी होतो तर कधी भाशेचे वेगळेच रूप अवतरते आणि माझा पोपट होतो.
परवाच्या दिवशी लोकसत्तेच्या बातमीमध्ये <एक मथळा< दिला होता. त्या मथळ्याचे व्याकरणीरूप मला योग्य अर्थ देत नसल्याचे वाटले. ते व्याकरणीरूप अयोग्य असेल तर मग योग्य काय? हे मला जाणून घ्यायचे होते. वर्तमान पत्रे, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे भाशेचे 'आशयसूचक औपचारीक रूप' त्यागत आहेत. आणि ते सामान्य जनांच्या 'रोजच्या व्यवहारातील कार्यसूचक रूपे' बेधडक पणे वापरत आहेत. भाशेची ‘आशयसूचक औपचारीक रूपाची’ होणारी ही हेळसांड भाशेच्या अस्तित्व व विकासाच्या दृश्टीने अयोग्य आहे. मराठीच्या बाबतीत तसे होवू नये ही माझी अपेक्शा आहे.
‘समजणार्यांना संदर्भाने सगळे समजते, मग व्याकरणाची झंझट कशाला?’ हा समज आज कळत-नकळत सगळीकडे पसरू पहातोय.
आपल्या नेहमीच्या सर्वसाधारण बोलण्यातील वाक्यरचना ह्या 'कार्यसूचक' (इ.:डीस्क्रीप्टीव) असतात.
कार्यसूचक वाक्यरचनेत व्याकरणाच्या चूकाही असू शकतात, तर त्यात अलंकारीक शब्द, रूपके चांगल्या अर्थाने वा वाईट अर्थाने, ‘स्थानिय-जातीय-वैयक्तिक रचना’ येवू शकतात. अशा वाक्यरचनांमधून वेगवेगळे अर्थ निघू शकतात. उदा.- पोलिसांनी चौकीत आमदाराला सॉलिड बदडबदड बदडले.
आणि म्हणून जिथे ‘औपचारीक संभाशण’ अपेक्शित असते, तिथे 'आशयसूचक वाक्यरचना' च असायला हवी.
उदा. पोलिसांनी चौकीत आमदाराला खूप मार दिला.
माहिती प्रसारण, शिक्शण-प्रशिक्शण, न्यायालयी - सरकारी - निमसरकारी कार्यालये, चाचणी-संशोधन विभाग इत्यादी ठिकाणी मराठी भाशेचे औपचारीक रूपच वापरले गेले पाहिजे. कारण अशा वाक्यरचनातून वेगवेगळे अर्थ निघू शकण्याची शक्यता खूपच कमी असते. भाशेचे 'औपचारीक रूप' हे 'आशयसूचक वाक्यरचनेने' (इ.:प्रीस्क्रीप्टीव) साकारलेले असते. आणि 'आशयसूचक रूप' हे 'प्रमाणित व्याकरणाच्या' पद्धतीनेच साकारलेले असावे लागेल. आता प्रश्न उभा राहतो, 'मराठीचे प्रमाणित व्याकरण' म्हणजे काय? आणि ते ‘प्रमाणित’ कसे-कसे होत गेले?
कोणत्याही गोश्टीच्या पुढील काळात येणार्या यश वा अपयशाच्या मर्यादा त्या गोश्टीच्या उत्पत्तीसोबतच जन्म घेतात.
मराठीचे व्याकरण हे इंग्रजीच्या व्याकरणावरच बेतलेले आहे. मराठी-व्याकरणाच्या उत्पत्तीकाळात ज्या शास्त्रीबुवा, पंडितजींनी ते घडवण्याचे काम केले ती मंडळी संस्कृतच्या व्याकरणाचे जाणकार होते. त्यांनी त्याकाळात, त्याकाळातील इंग्रजी भाशा व त्यातील वाक्यरचना शिकून घेत मराठी-व्याकरणाची मांडणी केली. त्या संस्कृत जाणकार आजोबांनी त्यांच्याकडून जशी इंग्रजी आकळली गेली होती, त्यानुसार त्यांच्याकडून मराठी-व्याकरणाची पायाभरणी होत होती.
इंग्रजी ही भाशा तिच्या आभ्यासकाला बहिर्मखी करते, याउलट संस्कृत ही भाशा तीच्या आभ्यासकाला अंतर्मुख करून टाकते. दोन भाशांचे विश्व सर्वस्वी भिन्न होते/ आहे.
वाक्याचे 'कर्ता', 'कर्म', 'क्रियापद' हे तीन प्रमुख भाग म्हणून इंग्रजीची नक्कल करीत मराठीसाठी ठरले गेले. पण त्या भागांच्या आधी आकलनात आणि मग (बहुधा त्यामुळेच) नामकरणात चूक झाली. व तिथूनच 'सर्वसामान्यांच्या आकलन व उपयोगिते’ बाबत मराठी-व्याकरणाच्या मर्यादा ठळक होत गेल्या, दरी वाढत गेली.
माझ्या मते - 'आधारपद', 'विशयपद', 'अर्थपद' हे तीन भाग स्विकारले गेले पाहिजेत.
1.आधारपदाचे दोन भाग होतात.
= कारक - जो क्रिया करतो तो.
= धारक - ज्याच्यावर क्रिया घडते तो
2.विशयपदा मध्ये
= उपविशय
= क्रियाविशेशण
= क्रियापद - जे घडणारी क्रिया दर्शवते. हे एकाच शब्दात ही असू शकते वा एकापेक्शा जास्त शब्दात असू शकते.
3. अर्थपद = वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठीचे पद. जे काळ, कारकाचे/धारकाचे लिंग, आदरार्थी वचन दर्शविते.
इंग्रजीच्या 'ऍक्टीव व्हाईस/ पॅसिव्ह व्हॉईस चे मराठी-व्याकरणात कर्ता, कर्म या नामाभिदानामुळे -'कर्तरी प्रयोग', 'कर्मणी प्रयोग' म्हणून आकारले गेले. परंतु इंग्रजीच्या 'ऍक्टीव व्हाईस/ पॅसिव्ह व्हॉईस' चे बहीर्मुखी गुण होते ते मराठीतल्या कर्तरी, कर्मणी प्रयोगात उतरले गेले नाहीत म्हणून त्यातून ते गुण व्यक्तही होत नाही.
मराठी-व्याकरणाची वैयक्तिक व सामाजिक स्तरावरील उपयोगितता:
मराठीत ज्या वाक्यात 'कारक' व 'धारक' उपस्थित असतो तिथेच 'ऍक्टीव व्हाईस/ पॅसिव्ह व्हॉईस' चे वेगळे गुण दिसून येवू शकतात, ते सामान्यांना त्यांच्या (आयुश्यातील मोक्याच्या प्रसंगी) बोलण्यातून जाणतेपणाने वापर करून 'आयुश्यातील अनावश्यक संघर्श, भांडणे, फसवणूक इत्यादी बाबी' टाळता येवू शकतात. तसेच वर्तमान पत्रे, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे यांच्याकडून ‘सत्य’ थेट मांडून ‘बोंबाबोंब-हलकल्लोळ’ करण्याऐवजी ‘आडवळणाने’ मांडून सत्याची वेगळी बाजू संयमितपणे सादर होवू शकते.
ऍक्टीव व्हॉईस मधला गूण – ‘आधारपदामुळे जी कृती घडली’, ती स्थिती दर्शवण्याची पद्धत.
पॅसिव व्हाईस मधला गूण – ‘आधारपदावर अमूक एका कृतीचा काय परीणाम झाला’, ती परीस्थिती दर्शवण्याची पद्धत. या पद्धतीत कारक पद (प्रचलित: कर्ता) गौण असते व धारक - ज्यावर क्रिया घडते/ बेतलेली असते ते पद वाक्यरचनेतील आधारपद असते.
उदा.: पांडवांना वनवासात धाडण्यात आले. ('कौरवांकडून' ही बाब नाही लिहीली तरी वाक्यरचनेतील अर्थ बदलत नाही. 'धाडण्यात येणे' हे क्रियापद व 'आले' हे अर्थपद )
ऍक्टिव्ह व्हॉइस किंवा स्थितीदर्शी रचनेची उदाहरणे
वर्तमान काळ
सामान्य :- महाराश्ट्र सरकार तिवारींचे निलंबन करतात.
चालू :- महाराश्ट्र सरकार तिवारींचे निलंबन करीत आहे.
पूर्ण :- महाराश्ट्र सरकारने तिवारींचे निलंबन केले.
भूत काल
सामान्य :- महाराश्ट्र सरकार तिवारींचे निलंबन करीत असे.
चालू :- महाराश्ट्र सरकार तिवारींचे निलंबन करत होते.
पूर्ण :- महाराश्ट्र सरकारने तिवारींचे निलंबन केले होते.
भविश्यकाल
सामान्य :- महाराश्ट्र सरकार तिवारींचे निलंबन करेल.
चालू :- महाराश्ट्र सरकार तिवारींचे निलंबन करत असेल.
पूर्ण :- महाराश्ट्र सरकारने तिवारींचे निलंबन केलेले असेल.
पॅसिव व्हाईस - किंवा - परीस्थितीदर्शी रचनेची उदाहरणे
वर्तमानकाल
सामान्य:-
- महाराश्ट्र सरकारकडून तिवारींना निलंबित केले जाते.
- महाराश्ट्र सरकारकडून तिवारी निलंबित होतात.
- तिवारींना निलंबित केले जाते.
- तिवारी निलंबित होतात.
चालू: -
- महाराश्ट्र सरकारकडून तिवारी निलंबित ‘केले जात आहेत’ / ‘होत आहेत.
- तिवारी निलंबित केले ‘जात आहेत’ / ‘होत आहेत’.
पूर्ण: -
- महाराश्ट्र सरकारकडून तिवारी निलंबित झाले.
- तिवारी निलंबित झाले.
भूतकाल
सामान्य:-
- महाराश्ट्र सरकारकडून तिवारी निलंबित होत असत.
- तिवारी निलंबित होत असत.
चालू:- -
- महाराश्ट्र सरकारकडून तिवारी निलंबित होत होते.
- तिवारी निलंबित होत होते.
पूर्ण:-
- महाराश्ट्र सरकारकडून तिवारी निलंबित झाले होते.
- तिवारी निलंबित झाले होते.
भविश्यकाल
सामान्य:-
- महाराश्ट्र सरकारकडून तिवारी निलंबित होतील.
- तिवारी निलंबित होतील.
चालू:
- महाराश्ट्र सरकारकडून तिवारी निलंबित होत असतील.
- तिवारी निलंबित होत असतील.
पूर्ण:-
- महाराश्ट्र सरकारकडून तिवारींना निलंबित व्हावे लागेल.
- तिवारींना निलंबित व्हावे लागेल.
कढई आणि किटली
कर्तरी प्रयोग
कढई किटलीला काळी म्हणते.
कढई किटलीला काळी म्हणाली.
कढई किटलीला काळी म्हणेल.
कर्मणी प्रयोग
कढईकडून किटलीला काळी म्हटले जाते.
कढईकडून किटलीला काळी म्हटले गेले.
कढईकडून किटलीला काळी म्हटले जाईल.
नितिन थत्ते
हा प्रतिसाद आधि द्यायला हवा होता.
नितिनदादा,
मला वाटते, आपली येथील चर्चा माझ्या प्रतिसादानंतर पुढे सरकली आहे. तुम्हाला संधी दिली होती तेंव्हा तुम्ही, 'स्वतःचे स्वतःच मराठी शिकावे.' असे म्हटले. मग हा प्रतिसाद कशासाठी?
मेरी मर्जी
काय प्रस्ताव लिहावा याचे स्वातंत्र्य जसे प्रस्तावकाला असते तसेच कोणता प्रतिसाद कधी द्यावा याचेही स्वातंत्र्य प्रतिसादकाला असते.
नितिन थत्ते
अनेक अंश विचारार्ह असलेले विश्लेषण
अनेक विचारार्ह अंश असलेले विश्लेषण मांडलेले आहे.
परंतु मराठीमधील उपलब्ध वैज्ञानिक-विश्लेषक व्याकरणाच्या संशोधनाशी संबंध न जुळवल्यामुळे यातील अनेक चांगले मुद्दे पुनश्चक्रकल्पन्यायाने ओबडधोबड झाले आहेत. (उदाहरणार्थ : "कारक - जो क्रिया करतो तो. \ धारक - ज्याच्यावर क्रिया घडते तो" या तर्हेचे कारक-विश्लेषण आधीच उपलब्ध आहे, आणि हे विश्लेषण खूप खोलपर्यंत झालेले आहे.)
काही मुद्दे चुकलेले आहेत. (उदाहरणार्थ "इंग्रजीच्या 'ऍक्टीव व्हाईस/ पॅसिव्ह व्हॉईस चे मराठी-व्याकरणात कर्ता, कर्म या नामाभिदानामुळे -'कर्तरी प्रयोग', 'कर्मणी प्रयोग' म्हणून आकारले गेले." मराठीतील कर्तरि-कर्मणि प्रयोगांची रूपवैशिष्ट्ये आणि नामाभिधान इंग्रजीशी संबंधित नाही.) पूर्वसंदर्भ घेतला असता, तर त्या खंडित मुद्द्यांशिवाय वरील मांडणी नेटकी करता आली असती.
शिवाय उदाहरणे नीट समजली नसल्यामुळे उदाहरणाचा मुद्दा समजून घ्यायचा प्रयत्न करताना फारच त्रास होत आहे.
"महाराश्ट्र सरकारने तिवारींचे निलंबन केले" हे आजकाल "भूतकाळातले रूप" मानले जाते. वर मात्र ते "पूर्ण वर्तमानकाळाचे रूप" म्हणून सांगितलेले आहे. निलंबनाची क्रिया पूर्ण आहे, हे कळले. पण या वाक्याच्या आशयात वर्तमानकाळाचे काय देणेघेणे?
असे असूनही कित्येक मुद्दे नाविन्यपूर्ण आहेत, आणि विचारार्ह आहेत. (उदाहरणार्थ : 'आधारपद', 'विशयपद', 'अर्थपद' असे तीन भागात वाक्याचे विश्लेषण, आणि त्या तीन घटकांच्या व्याख्या. हे मला सध्या पटलेले नसले, तरी विचार करण्यायोग्य मुद्दे वाटतात.) पण तरी उपलब्ध विचारांच्या संहितेशी काहीच जुळवणी न केल्यामुळे त्यात मला नेमके काय पटते, कुठला अंश घेऊन उपलब्ध व्याकरण-वर्णन सुधारता येईल? ते कळणे दुरापरस्त वाटते. सध्यासाठी हा प्रयत्न मी सोडून देत आहे.
- - -
तुमचे विचारचक्र सुरू करणार्या लोकसत्तेतल्या वाक्याकडे बघितले :
हा मथळा मला तरी वर्तमानपत्रात वापरण्याइतपत औपचारिक भाषाप्रयोग वाटतो. अध्याहृत शब्द गाळून अल्पाक्षरी मथळा बनवण्याची पद्धत वर्तमानपत्रांमध्ये रीतसर आहे. या वाक्यांमध्ये अध्याहृते जोडल्यास अनौपचारिक असे काय आहे, ते समजले नाही. ("करणार आहे" हा शब्दप्रयोग अनौपचारिक आहे, असे तुमचे म्हणणे आहे काय?)
मथळ्यानंतर लेखामध्ये वाक्ये सर्व पूर्ण आहेत. (अध्याहृत शब्द गाळलेले नाहीत.) कदाचित या वाक्याबद्दल तुमचा आक्षेप असावा :
तुमच्या १८ उदाहरणांच्या तक्त्यामध्ये "-णार आहे" असे कुठलेच रूप दिसत नाही. परंतु अशी रूपे मराठीच्या औपचारिक भाषाशैलीमध्ये सुयोग्य आहेत. (अ) आशय नेमकेपणाने कळून येत आहे. (आ) "सॉलिड बदडबदड बदडले" सारखे अनौपचारिक शब्दही त्यात नाहीत.
त्या वाक्यात औपचारिक वापरासाठी अनुचित असे नेमके काय आहे? ते मला काही कळलेले नाही.
अजून काहि त्रूटी, दोश, चूका असतील तर जरूर दाखवा!
धनंजय, प्रतिसाद दिल्याबद्दल आपला आभारी आहे!
आपल्या या चर्चेतील पहिल्या प्रतिसादात....'एकास-एक समांतर हि मांडणी जमणारच नाही.' असे म्हणत आपण एकही वाक्यरचना दिलेली नाही. तुमच्या या प्रतिसादावर, माझ्या पुढिल प्रतिसादातून 'मराठीचे व्याकरण हे इंग्रजीच्या व्याकरणावरच बेतलेले आहे.' हे माझ्या परीने पटवण्याचा प्रयत्न केला. तुमच्या दुसर्या प्रतिसादात, 'तुम्हाला माझा प्रतिसाद वाचून त्रास झाला' असेही तुम्ही लिहीले आहे. माझे विचार, संकल्पना अजून स्पश्ट, पक्क्या झालेल्या नाहीत पण तरीही आपल्या निरीक्शणात, चिंतनात, आभ्यासात आपण कुठे कमी पडतोय हे चाचपण्यासाठी ते 'कच्चे चिंतन' इतरांसमोर ठेवावेच लागते, त्यावरील टिका-टिप्पणी समजून घेण्याचा प्रयत्न करावाच लागतो. यासाठीच मी हा चर्चाप्रस्ताव ठेवून 'चर्चेत सहभागी होवून प्रतिसाद द्या! असे सगळ्यांना म्हटलेले होते. फक्त चंद्रशेखरजी, हैयोहैयैयो व सगळ्यात शेवटी 'श्रीयुत नितीनराव थत्तेसाहेब' यांनी आपआपली उदाहरणे माझ्यापुढे सादर केली. मला उदाहरणे आभ्यासण्यासाठीच हवी होती.
मी माझ्या याआधिच्या प्रतिसादात थोडक्यात स्पश्ट केलेले आहे कि 'प्रमाणित व्याकरण' प्रमाणित कसे झाले? आपल्या दुसर्या प्रतिसादात, आपण म्हणताहात कि मराठीत आधिच सगळे/ बहुतेक विश्लेशण खोलपर्यंत झालेले आहे. यावर माझा प्रश्न आहे, कि जे 'प्रमाणित व्याकरणात' शालेय पुस्तकातून शिकवले जाते त्यात तुम्ही म्हणत असलेले, जे 'खोलपर्यंत विश्लेशण आधिच' झालेले आहे, त्यामुळे काही बदल झालेले आहेत का? त्यामुळे काहि फरक पडला आहे का?
कारण माझ्या कडे शाळेत शिकवले जाणारे व्याकरणाचे जे लेटेस्ट पुस्तक आहे, त्यात जी माहिती आहे ती माहिती 1972 साली छापलेल्या 'मराठी व्याकरण' पुस्तकांसारखीच आहे.
प्रचलित व्याकरणात फक्त कर्ता, क्रियापद एवढ्यावरच लक्श ठेवायला शिकवले गेले, बाकिची सगळी बोंबच आहे.
आता आपण फक्त 'प्रमाणित व्याकरणानुसार' (म्हणजे प्रमाण म्हणून स्विकारलेल्या व्याकरणानुसार') जे कर्म आहे व माझ्या व्याकरणाच्या मांडणीनुसार नुसार जे 'क्रियापद' आहे त्याचे आकलन करूया.
उदा.:
येत्या अमावास्येच्या दिवशी तो दुश्ट 'जादूगार राजकुमारांना माकड करणार.'
हा उदाहरणात जादूगार हा कर्ता आहे.
'करणार' हे क्रियापद आहे.
'राजकुमारांना माकड ' हे कर्म आहे.
माझ्या व्याकरणाच्या मांडणीनुसार
जादूगार = कारक
राजकुमार = धारक
माकड करणे = क्रियापद
णार= अर्थपद
'राजकुमारांना माकड करणे' म्हणजे काय? यात कोणता अर्थ अध्याहृत आहे?
आता त्यातील अर्थ शोधुया..
'राजकुमार' हे मानवी 'देहाचे' स्वरूप आहे. 'माकड' हे जनावराच्या 'देहा'चे स्वरूप आहे. म्हणजे उदाहरणासाठी घेतलेल्या वाक्यात 'देह' ही संकल्पना सामाईक आहे. यावरून.... जादूगार 'स्वरूपांमध्ये अदलाबदल' करणार, हे आपण ओळखू शकतो.
मग त्याच न्यायाने...
'(शासन) रामानंद तिवारी यांना निलंबित करणार (आहे)' ही भाशा 'औपचारीक' म्हणून योग्य कशी?
'रामानंद तिवारी यांना निलंबित करणे' म्हणजे काय? यात कोणता अर्थ अध्याहृत आहे?
निलंबन हे एक 'अंतर्गत कामकाजातील प्रक्रिया' आहे. जी प्रक्रिया एक कारवाई असते एखाद्या संबंधित व्यक्तीला कामापासून दूर ठेवण्याची. आणि म्हणूनच -
'निलंबन' ह्या शब्दात 'संबंधित व्यक्तीला कामापासून दूर ठेवण्याची कारवाई' हा अर्थ अंतर्भूत आहे...असे मी समजतो.
'निलिंबित' हि अवस्था आहे 'अशा व्यक्तीची जीला तिच्या सद्य पदावरून दूर करण्यात आलेले आहे.'
आणि म्हणूनच 'अमूक-तमूकचे निलंबन' असा शब्दप्रयोग कारवाई शी संबंधित अर्थासाठी होणे योग्य ठरतो.
'अमूक-तमूक निलंबित' हा शब्दप्रयोग एखाद्या 'अधिकार्याची ओळख दाखवत त्याची कारवाई नंतरची स्थिती दाखवण्यासाठी होणे योग्य ठरतो.
आणि म्हणूनच (वर्तमानपत्रात, दुचिवावर) - 'रामानंद तिवारींचे (पदावरून) निलंबन होणार/ होवू शकते.' भाशेचे हे रूपच मला 'औपचारीक' म्हणून योग्य वाटते. व लोकसत्तेतील उदाहरण म्हणून घेतलेले अयोग्य वाटते.
आता वेगळ्या अंगाने त्या वाक्याकडे पाहुया!
कॉंग्रेस हा पक्श आपली जनमानसातील प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी एका प्रशासकीय अधिकार्याला त्याच्या पदावरून दूर करीत आहे. अशा प्रसंगी, जेंव्हा तो अधिकारी म्हणतोय कि भ्रश्टाचारात मी एकटा नव्हतो, तर इतर सरकारी अधिकार्यांपासून ते अनेक मंत्र्यांपर्यंत एका साखळी सारखे सहभागी होते. आणि म्हणून मला त्यात 'सहभागी होणे' भाग होते. (माझ्या दृश्टीने) ही आहे पार्श्वभूमी त्या बातमीची....
आणि म्हणूनच... 'तिवारींना निलंबित करणार.' ही बातमी वर्तमानपत्राच्या निश्पक्शतेला धरून आशयसूचक नाही. यात 'करणार' या शब्दातून वाईट अर्थ निघतो, त्यातून धमकी दिल्याचा अर्थ दिसतो. 'निलंबित'पणाची अवस्था एखाद्याला आधिच कशी काय दिली जाणार? 'मी तुझे वाईट करणार', 'मी तुझी वाट लावणार' यांसारखे ते वाक्य आहे. आधि निलंबन होणार त्यानंतर निलंबित होणार ना? आधिच एखाद्याला 'निलंबित करणार' हे वाक्य चूकिचाच आशय व्यक्त करते.
तसेच त्याच बातमीमध्ये बर्याचदा, 'निलंबित करण्याची कारवाई' हा शब्द अनेकदा आलेला आहे.
----
"महाराश्ट्र सरकारने तिवारींचे निलंबन केले" हे आजकाल "भूतकाळातले रूप" मानले जाते. वर मात्र ते "पूर्ण वर्तमानकाळाचे रूप" म्हणून सांगितलेले आहे. निलंबनाची क्रिया पूर्ण आहे, हे कळले. पण या वाक्याच्या आशयात वर्तमानकाळाचे काय देणेघेणे?
"महाराश्ट्र सरकारने तिवारींचे निलंबन केले आहे" असे हवे होते. चूक दखवून दिल्याबद्दल आभारी आहे.
--
तुमच्या १८ उदाहरणांच्या तक्त्यामध्ये "-णार आहे" असे कुठलेच रूप दिसत नाही. परंतु अशी रूपे मराठीच्या औपचारिक भाषाशैलीमध्ये सुयोग्य आहेत. (अ) आशय नेमकेपणाने कळून येत आहे. (आ) "सॉलिड बदडबदड बदडले" सारखे अनौपचारिक शब्दही त्यात नाहीत.
व्याकरणाच्या पुस्तकात 'णार' हे प्रत्यय अर्थपद ( क्रियापदासाठी) म्हणून दिलेले नाही. मग तुम्ही ते यावे असे का म्हणता?
तुमचा तक्ता भाषांतरासाठी, आणि ते योग्य
तुमचा १८ उदाहरणांचा तक्ता इंग्रजीमधून मराठीमध्ये भाषांतरासाठी सुयोग्य आहे. त्या इंग्रजी वाक्यांचे भाषांतर करण्यासाठी मी तुम्ही दिलेली भाषांतरेच अगदी थोड्या फरकाने वापरेन. उदाहरणार्थ :
- - -
इंग्रजी वर्तमान काळ, ऍक्टिव्ह व्हॉईस
इंग्रजी सामान्य :- The government suspends officers. सरकार अधिकार्यांना निलंबित करते. (मराठीत कर्तरी)
इंग्रजी चालू :- The government is suspending officers. सरकार अधिकार्यांना निलंबित करत आहे. (मराठीत कर्तरी)
इंग्रजी पूर्ण :- The government has suspended officers. सरकारने अधिकार्यांना निलंबित केले आहे. (मराठीत भावे. मराठीत अशा "-ले आख्यात" रूपांत कर्तरी रचना अवैध आहे. आणि या अर्थसंदर्भात कर्मणी रचना अनर्थक आहे. कर्म अचेतन किंवा अचेतनप्राय असले, तर मराठीत कर्मणी रचना वापरली जाते, उदाहरणार्थ : सरकारने योजना थांबवली आहे.)
इंग्रजी पूर्ण-चालू : (हे तुम्ही दिलेले नाही, पण अशा रचना इंग्रजीत असतात) The government has been suspending officers. सरकार अधिकार्यांना निलंबित करीत आले आहे. (मराठीत कर्तरी)
- - -
हे सर्व तुम्ही दिलेल्या उदाहरणांपेक्षा फार वेगळे नाही. (इंग्रजीतले ४*३ = १२ काळ ऍक्टिव्ह व्हॉईसमध्ये विकिपेडियावर येथे बघावेत.) या बारीकसारीक फरकांबाबत माझा काही मोठा आक्षेप नाही. म्हणून वरील चार उदाहरणांवेगळी वाक्ये पुन्हा लिहिण्याची गरज नाही. तसल्याच बारीकसारीक फरकांसह तुमची भाषांतरे माझ्यासाठी ग्राह्य आहेत.
पुनश्च म्हणतो : वरील "काळां"ची यादी इंग्रजी-मराठी भाषांतरकाराच्या सोयीची आहे, नि:शंक. पण मराठीचे व्याकरण-विश्लेषण करताना या तक्त्याचे दोन मोठे तोटे होतात.
१. "करीत आले आहे" वगैरे शब्दरूपे इंग्रही अर्थाचा भावानुवाद करण्यासाठी ठीक आहेत. पण अशा सहायक शब्दप्रयोगांना "काळ" म्हटले तर मराठी व्याकरण बरेच बोजड होईल. याला "काळ" म्हटले तर "करत चालले आहे", "करून टाकले आहे" वगैरेंना "काळ" म्हणावे लागेल.
२. "करणार आहे" वगैरे मराठमोळ्या आणि औपचारिक मराठीस शोभणार्या शब्दप्रयोगांची काहीच व्यवस्था लागत नाही.
मराठीचे व्याकरण-विश्लेषण करताना सुयोग्य पद्धत काय? औपचारिक मराठी भाषेला शोभून दिसतात असे सर्व शब्दप्रयोग मनात आणून (किंवा संशोधनाने, औपचारिक वाङ्मयामधून सूची तयार करून), मग त्यांची व्यवस्था लावली पाहिजे. ही व्यवस्था वरील तक्त्यासारखी मुळीच दिसणार नाही. ("-णार" हे माझ्या मते क्रियारूप आहे, हे पुन्हा सांगणे नलगे. ते रूप त्या तक्त्यांमध्ये येईल.)
तुम्ही म्हणता की मी उदाहरणे दिली नाहीत. मात्र मी एक मोठ्या तक्त्यात उदाहरणे दिली आहेत, त्यांचा दुवा मी दिला होता, नजरचुकीने हा दुवा तुम्ही बघितला नसावा. तोच दुवा पुन्हा देतो -
http://www.marathiabhyasparishad.com/node/94
- - -
तुम्ही म्हणता :
हे योग्य नव्हे, ते कसे तुमच्या उदाहरणातच बघूया.
हे बर्याच अंशी चुकलेले आहे. सध्याच्या व्याकरणाप्रमाणे
क्रियापद - "करणार"
कर्ता - "जादूगार"
कर्म - "माकड"
अन्य कारक (याला "संप्रदान" की "दुय्यम कर्म" की "आधार" म्हणावे याबाबत मतभेद आहे) - "राजकुमारांना" (मूळ रूप "राजकुमार")
हल्लीच्या प्रमाणित व्याकरणातले बारीकसारीक मतभेद काही का असेनात - "राजकुमारांना माकड" हे कर्म नाही. खरे तर तुम्ही चुकून दिलेल्या विश्लेषणात काही घोडचूक आहे, हे तुम्ही ओळखले आहे, यात तुमची चाणाक्ष दृष्टी दिसतेच. (ही जी चूक कोणीच पारंपरिक व्याकरणात करत नाही, ही बाब अलाहिदा.) ती सुधाराचा तुमचा उपाय मात्र अर्धा बरोबर आणि अर्धा चूक आहे.
१. "राजकुमार = धारक" . उत्तम!
२. "माकड करणे" = क्रियापद? हे चूक आहे.
परंतु या चुकीतसुद्धा तुमची उत्कृष्ट निरीक्षणशक्ती लपलेली आहे, असे वाटते. पण त्यासाठी तुमचे उदाहरण न घेता हे उदाहरण घेऊया :
मांत्रिकाने कोंबडी बळी दिली.
येथे "बळी" शब्दाचे विश्लेषण करताना पारंपरिक प्रमाणित विश्लेषण अधू पडते. (संस्कृतात या प्रकाराची "प्रथमासमानाधिकरण" म्हणून जी सोय लावलेली आहे, ती मराठीला लागू नाही.) यासाठी "पूरक" हा नवीन क्रियासंबंध हल्लीच्या मराठी वैयाकरणांनी सांगितलेला आहे. (संदर्भ - अशोक केळकर)
मांत्रिकाने (मांत्रिक) - कर्ता
कोंबडी - कर्म
बळी - पूरक
दिली (देणे) - क्रियापद
पारंपरिक प्रमाणित विश्लेषण बदलण्याची गरज आहे, याबाबत दुमत नाही. तरी पारंपरिक प्रमाणित विश्लेषण सुयोग्य रीतीने समजून त्यातील खरोखरच्या त्रुटी सुधारल्या पाहिजेत.
- - -
तुम्ही म्हणता :
वगैरे. तुमची विश्लेषणपद्धती विचारार्ह आहे. परंतु "औपचारिक भाषेसाठी आधारसामग्री", "पारंपरिक व्यवस्थेच्या मर्यादा" आणि "व्याकरणाचे फलित" या सर्व गोष्टी सुस्पष्ट केल्याशिवाय हे विचारमंथन कार्यक्षम होत नाही.
"सरकार अधिकार्याला निलंबित करणार आहे" यातून सुशिक्षित मराठीभाषकांना आशय नीट कळून येतो की नाही? ओळखीच्या दहा-बारा सुशिक्षित मराठीभाषकांना थेट विचारून बघावे. आणि त्यांना जर आशय कळत असेल, तर "अमुक तर्कानुसार कळायलाच नको" या प्रकारचे युक्तिवाद व्यर्थ होतात.
मात्र जर असे दिसले, की बहुतेक मराठीभाषकांना आशय कळत नाही, आणि मग "अमुक तार्किक त्रुटी असल्यामुळे आशय कळत नाही" अशा प्रकारचा युक्तिवाद केला, तर त्यातून क्रियाशील विश्लेषण उत्पन्न होऊ शकते.
धन्यवाद!
- पण मराठीचे व्याकरण-विश्लेषण करताना या तक्त्याचे दोन मोठे तोटे होतात.
मी मराठीचे व्याकरण-विश्लेशण करीत नाही आहे व केलेले ही नाही. मी तर नवीन व्याकरणाची मांडणी मांडू इच्छित आहे. महाराश्ट्रात इंग्रजी शाळा वाढत आहेत. इंग्रजीतूनच बहुतेकांचे शिक्शण होत आहे, होईल. इंग्रजी माध्यमातील मुले मराठी व्याकरणाकडे नव्हे – ‘मराठी व्यक्त करण्याकडे’ इंग्रजीच्या पद्धतीनेच व्यक्त करण्याचे पाहतील.
-("-णार" हे माझ्या मते क्रियारूप आहे, हे पुन्हा सांगणे नलगे. ते रूप त्या तक्त्यांमध्ये येईल.)
हे अर्थपद (प्रत्यय) माझ्या मते असभ्य आहे. ते औपचारीक आशय व्यक्त करू शकत नाही.
--परंतु "औपचारिक भाषेसाठी आधारसामग्री", "पारंपरिक व्यवस्थेच्या मर्यादा" आणि "व्याकरणाचे फलित" या सर्व गोष्टी सुस्पष्ट केल्याशिवाय हे विचारमंथन कार्यक्षम होत नाही.
माझ्याकडून आत्ताच हि अपेक्शा इथे अनाठायी आहे. इंग्रजांच्या काळात ज्यांनी मराठी-व्याकरणाची पुस्तके लिहीली त्यांना असा कोणी प्रश्न केला होता का? ज्यांच्या जास्त पुस्तक-प्रती विकल्या गेल्या. त्यांचे विचार ‘मराठीचे व्याकरण’ म्हणून जनमानसात रुजत गेले. कर्तरीप्रयोग, कर्मणी प्रयोग हा मुळातच ऍक्टीव-पॅसिव्ह ची चूकीची मांडणी आहे. जास्त खप झालेल्या पुस्तकांवर टिका-टीपण्णी करणारी पुस्तके लिहीली गेली त्यातूनच ‘भावे प्रयोग’ अस्तित्वात आला. कर्तरी-कर्मणी-भावे प्रयोग थोतांडं आहेत, असे मी मानतो. वर वाचक्नवी (अशी वाक्यरचना मराठीत रूढ नाही.) असा प्रतिसाद देवून अप्रत्यक्श दुजोरा देत आहेत असे मला वाटते. मी माझ्या संकल्पनेवर ठाम आहे.
--"सरकार अधिकार्यायला निलंबित करणार आहे" यातून सुशिक्षित मराठीभाषकांना आशय नीट कळून येतो की नाही? ओळखीच्या दहा-बारा सुशिक्षित मराठीभाषकांना थेट विचारून बघावे.
मी दिलेल्या उदाहरणातून ‘आशय कळून येत नाही.’ असे मी कुठे म्हटलेले आहे? मी या व अजून एका संकेतस्थळावर हा लेख सादर करून लोकांची मतेच आभ्यासत आहे. पण सकारात्मक प्रतिसाद देणारे दोघे-तीघेच मिळाले हे माझे अल्पयश. शब्दांमध्ये शक्ती असते. त्या शक्तीचा सुयोग्य वापर कळत पणे व्याकलनाच्या (व्याकरणाच्या आकलनाच्या) पद्धतीनेच मराठी समाजात पोहचवाता येईल असे मेरेको वाटता हैय!
--मांत्रिकाने कोंबडी बळी दिली.
मांत्रिकाने (मांत्रिक) - कर्ता
कोंबडी - कर्म
बळी - पूरक
दिली (देणे) - क्रियापद
आपले ह्या उदाहरणात बरेच दोश राहून गेलेले आहेत. बळी देण्यासाठी माझ्या माहितीनूसार कोंबडा, बकरा वापरला जातो. त्यात ही उलट्या पिसाचा कोंबडा जास्त निवडपात्र असतो. असो.
म्हणून – ‘मांत्रिकाने कोंबडा बळी दिला.’ हे उदाहरण घेवूया!
माझ्या व्याकरण मांडणीनुसार -
मांत्रिक= कारक
कोंबडा बळी (म्हणून) देणे = क्रियापद ( क्रियापदातील ‘क्रिया ओळखणे’ हेच व्याकरणातली प्राथमिक शिकवण असायला हवी.)
ईला= अर्थपद
या उदाहरणात धारक कोण आहे? बळी कोणाला मिळाला? ह्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी वर म्हटल्याप्रमाणे अगोदर ‘क्रियापदातील क्रिया ओळखणे’ गरजेचे आहे. ते कसे त्यांना शिकवायचे?
‘एखादा पशू बळी देणे.’ म्हणजे विशिश्ठ हेतू मनात बाळगून एखाद्या पशूची हत्या करणे. ‘बळी देणारा’ इथे ‘मांत्रिक’ ह्याला त्याच्या इश्ट देवापासून काहितरी प्राप्त करावयाचे असते याकरीता तो हे कृत्य करतो. ‘पाप केल्याशिवाय यश मिळत नाही.’ ही विचारपद्धती स्विकारणार्यांना यश, पैसा, सत्ता हा मार्ग स्विकारावा लागतो. मारलेल्या जीवाच्या बदल्यात आपले इप्सित साध्य होईल ह्यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. मग मुलांना कळू शकेल कि येथे धारक पदी कोण आहे ते?
मुलं उत्तरतील... ‘देव’! शिक्शक म्हणावे लागेल...’मांत्रिकाचा देव’! ---------
आता माझी संकल्पना समजून घेण्यासाठी अजून एक (शेवटचे) उदाहरण घेवूया!
‘आणि खूप तपश्चर्या केल्यानंतर सतीशला ‘तू शब्दांशी खेळशील व तो खेळ इतरांना ही शिकवशील’ हा वर मिळाला.’
या उदाहरणात..
सतीश = धारक
उपविशय = ‘तू शब्दांशी खेळशील व तो खेळ इतरांना ही शिकवशील’ हा
वर मिळणे = क्रियापद
ला= अर्थपद
तर, मग सांगा पाहू धनंजय, येथे ‘कारक’ कोण आहे ते?
=========================
जन गण मन अधि नायक जय हे भारतभाग्यविधाता.....
जय हिंद! जय महाराश्ट्र!
+१
>>मी तर नवीन व्याकरणाची मांडणी मांडू इच्छित आहे.
माझ्यातर्फे या युगप्रवर्तक उपक्रमास शुभेच्छा. :-)
अवांतर : धनंजय यांच्या संयमाचे कौतुक वाटते.
नितिन थत्ते