संगणका विषयी माहिती हवी आहे.

संगणका विषयी माहिती हवी आहे.

LiveCD म्हणजे काय?
LiveCD च्या जन्माची कारणे काय?
त्यांचा उपयोग आणि त्यांची गरज काय?
त्यांचे प्रकार व त्यांचे गुण-दोष कोणते?
उपलब्ध असलेल्यांमध्ये टॉप टेन कोणत्या?

लेखनविषय: दुवे:

Comments

लाइव्ह सीडी

इंस्टॉल न करता वापरता येणारी आणि सहज वाटप करता येण्याजोग्या साधनांवरून (सीडी, डिव्हिडी, युएसबी ड्राइव्ह इ.) चालणारी नियंत्रण प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम) म्हणजे "लाइव्ह डिस्ट्रो" किंवा (सीडीवर असेल तर) "लाइव्ह सीडी" होय. लाइव्ह सीडी मध्ये संपूर्ण नि. प्र. असते. लाइव्ह सीडी संगणकात टाकून त्या सीडीवरून जर संगणक बूट केला तर ती नि. प्र. थेट वापरता येते. पडद्यामागे ही लाइव्ह सीडी आपल्या आज्ञावल्या संगणकाच्या रॅममध्ये हलवते आणि संगणकात आधीच असलेल्या माहितीला किंवा साधनांना धक्का न लावता संगणक चालवता येतो (आपल्याला वाटल्यास संगणकात आधीच्याच असलेल्या माहितीत बदल करता येऊ शकतो) लाइव्ह सीडी हा प्रकार लिनक्स क्षेत्रात जास्त प्रमाणात प्रचलित आहे. लिनक्स लाइव्ह सीडी मध्ये जालजोडणी, न्याहाळक (ब्राउज़र), निरोप्या (मेसेंजर), ऑफिस आज्ञावल्या इ. इ. सर्वकाही असते.

लाइव्ह सीडीचे उपयोगः
१. नि. प्र. इंस्टॉल करण्याचे वेळखाऊ काम वाचते. जाळ्यांची जोडणी तपासणे वगैरे कामे करताना लाइव्ह सीडी चा चांगला उपयोग होतो.
२. नि. प्र. क्रॅश किंवा इतर कोणत्याही कारणाने संगणक नेहमीसारखा सुरू करता येत नसेल तर लाइव्ह सीडीतून बूट करून डेटा दुसरीकडे हलवता येतो.
३. काही लाइव्ह डिस्ट्रो विशिष्ट उद्देशाने बनवलेले असतात. उदा. संगणक सुरक्षा क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा/साधने असलेली लाइव्ह सीडी.

लाइव्ह सीडीच्या मर्यादा:
१. संगणकाच्या रॅमचा काही भाग लाइव्ह सीडीच्या आज्ञावल्यांसाठी वापरला गेल्याने इतर आज्ञावल्यांना (ऍप्लिकेशन्स) उपलब्ध असणारी रॅम कमी असते. त्यामुळे रॅम कमी असणार्‍या संगणकांवर लाइव्ह डिस्ट्रो हळू चालेल.
२. वर उल्लेखलेल्या विशिष्ट प्रसंगात किंवा एखाद्या नव्या नि. प्र. ची चाचणी करण्यासाठी लाइव्ह सीडी वापरली जाते. अधिक कालावधीसाटी संगणक वापरताना लाइव्ह सीडी पेक्षा इंस्टॉल केलेली नि. प्र. वापरलेली चांगली.

लिनक्स क्षेत्रामध्ये नॉपिक्स हे सुप्रसिद्ध लाइव्ह डिस्ट्रो आहे जे डेबियन लिनक्स वर आधारित आहे. "डॅम स्मॉल लिनक्स" हे फक्त ५० मे.बा. आकार असलेले डिस्ट्रो युएसबी पेन ड्राइव्ह वगैरे वरून चालवता येते. याशिवाय उबुन्टू, सुसे आणि फेडोरा यांच्यावर आधारित बरेच लाइव्ह डिस्ट्रोज़ आहेत. विकिपिडियावर केलेली तुलना इथे पाहता येईल.

एक नवीन विश्व

१) संगणक हार्ड डिस्क वरून सुरू न करता सीडी वरून सुरू करता येतो. या विशिष्ट प्रकारच्या सीडीला लाइव्ह सीडी असे म्हणतात.

२ व ३) नोपिक्स ही खूप प्रसिद्ध अशी आद्य लाइव्ह सीडी आहे. तिचा मुख्य उपयोग संगणक चालू होत नसेल तर त्यात काय बिघाड झाला आहे हे शोधणे, बॅक-अप घेणे व विंडोज मध्ये केलेले काम पुढे चालू ठेवणे अशा कारणांसाठी होतो.

४) त्यांचे सुमारे शंभर (शेकडो?) प्रकार आहेत. प्रत्येक सीडीचे स्वतः:चे गुण दोष आहेत. उदा. नोपिक्स सुरू होण्यास खूपच वेळ घेते. आणि त्यात असंख्य सॉफ्टवेअर ठासून भरलेली आहेत जी अनेकांना अनावश्यक वाटतात. विविध भाषिक लाइव्ह सीडीज तर खूप प्रसिद्ध आहेत. समजा तुम्हाला हिंदीत काम करायचे आहे तर तुम्ही ही लाइव्ह सीडी संगणकात टाकून संगणक सुरू करा. आपल्याला परिपूर्ण भारतीय संगणक वापरल्याचे समाधान मिळेल. काम झाल्यावर सीडी काढून संगणक पुन्हा सुरू केल्यावर विंडोज परत नेहमीसारखे पूर्वपदावर येईल.
विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या लाइव्ह सीडी मिळतात. जसे विज्ञान, गणित, खेळ
धार्मिक लोकांसाठी - उदा. मुस्लिम लाइव्ह सीडी
वाद्यप्रेमींसाठी - म्युझिक एक्स, मूव्ही एक्स
संगणक तज्ज्ञांसाठी - लाइव्ह सीडी राउटर / जीपार्टेड लाइव्ह सीडी
५) सर्व लाइव्ह सीडींची नोंद डिस्ट्ऱोवॉच या साईटवर पाहायला मिळेल. माझ्या संग्रहात नोपिक्स व पपी लाइव्ह सीडी या दोन सीडी नेहमी असतात. आपण आपली स्वतःची लाइव्ह सीडी सहजगत्या बनवू शकता. याला "रीमास्टर" असे म्हणतात.

लाईव्ह

मी एक अशी तबकडी वापरून पाहिली आहे. जी तबकडी चालकात टाकून विंडोज प्रणाली असलेला संगणक पुनःश्च सुरू करताच लिनक्स प्रणालीवर सुरू होतो. या तबकडीलाच वरिल Live CD म्हणतात का?


मराठीत लिहा. वापरा.

उबंटू

मी काही दिवसांपुर्वी उबंटूची लाईव्ह सीडी वापरून पाहिली. छान आहे.

नोपिक्स ही खुप लोकांची आवडती आहे असं दिसतंय. माझ्या माहितीतील नोपिक्स ही सुरवातीच्या काळातील लाईव्ह सीडी आहे.

लायनेक्स साठी चे एक मासिक प्रसिध्द आहे, 'लायनेक्स फॉर यु' त्यांनी ह्या लाईव्ह सीडी(नोपिक्सच्या) तीन वर्षांपूर्वी आपल्या मासिकासोबत दिल्या होत्या. त्यावेळी हा प्रकार नवा होता.

लाईव्ह सीडी ही नवीन लायनेक्स वापरणार्‍यांसाठी पहिला प्रयोग म्हणून उत्तम आहे.

नीलकांत

सीडीज

उबंटूच्या संकेत स्थळावर नोंदणी केली असता पाहिजे तेवढ्या सीडीज मोफत घरपोच पाठवतात (निदान काही दिवसांपूर्वी पर्यंत तरी.. सध्याचे माहित नाही!). मध्यंतरी मला अश्या बर्‍याच सीडीज पोष्टाने आल्या होत्या.

-वरूण

मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे मी समर्थन करतो.

होय

मी २००६ साली ( ५, ५ सीडीज दोन वेळा) व या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ५ सीडीज येथून मागवल्या व त्या पोस्टाने सुखरूप पोहोचल्या. एक परिपूर्ण ऑपरेटिंग सिस्टिम, ओपन ऑफिस सारख्या सॉफ्टवेअरसकट (सर्व आवश्यक ड्रायव्हरदेखील अर्थात त्यात आलेच!) पूर्णपणे मोफत! - सीडीचाही खर्च नाही आणि वर पोस्टाचा खर्चही तेच करणार! आश्चर्याचा का काय म्हणतात तो धक्काच बसला.

पण युबंटू विंडोज ऐवजी (अथवा विंडोज सह - ड्युएल बूट) म्हणून वापरावी.
लाइव्ह सीडी म्हणून वापरली तर तिला सुरू होण्यास खूपच वेळ लागतो व जुन्या अथवा (भारतीय "अर्थाने") नवीन संगणकांत ही लाइव्ह सीडी काही वेळा नीट चालत नाही असा माझा अनुभव आहे.

तबकड्या

या चर्चे दरम्यान मी मागवलेल्या युबंटूच्या तबकड्या आज मला घरपोच (पुण्यात) मिळाल्या. एकुण ३ तबकड्या आहेत. त्यातली एक ६४ बिट्सची आहे. इतर दोन नक्कि काय असाव्यत? आत्ताच लखोटा फाडला आहे. ३ तबकड्या पाहून काही प्रश्न पडले.
१. मिळालेल्या ३ पैकी २ कशासाठी आहेत? या लाइव्ह सीडीज आहेत की मी त्यांचे माझ्या संगणकावर संस्करण करणे अपेक्षीत आहे?
२. जर संस्करण करणे अपेक्षीत असेल तर मी ते माझ्या यु एस बी हार्ड डिस्कवर करू शकतो का? आणि माझा संगणक ड्युएल बुट करू शकतो का?

आपले प्रतिसाद मला नक्किच उपयोगी पडतील.





मराठीत लिहा. वापरा.

माझी उत्तरे

>> मिळालेल्या ३ पैकी २ कशासाठी आहेत?
प्रचारासाठी

>> या लाइव्ह सीडीज आहेत का?
होय

>> की मी त्यांचे माझ्या संगणकावर संस्करण करणे अपेक्षीत आहे?
अपेक्षीत नाही पण आपल्याला युबंटू आवडल्यास करू शकता.

>> जर संस्करण करणे अपेक्षीत असेल तर मी ते माझ्या यु एस बी हार्ड डिस्कवर करू शकतो का?
नाही.

>> आणि माझा संगणक ड्युएल बुट करू शकतो का?
होय. पण ड्युएल बूट करण्याच्या नादात पूर्ण संगणक युबंटू याच प्रणालीत इनस्टॉल झाल्याची बरीच उदाहरणे माझ्या पाहण्यात आहेत. अशा काही वेळा विंडोजमधील महत्त्वाच्या फाइल्सही डिलीट झाल्याची उदाहरणे आहेत. तेव्हा ड्युएल बुट पण जपून.

धन्यवाद

धन्यवाद, शंतनू. ड्युएल बूट न करण्याचा निर्णय घेतो आहे. तसे लाइव्ह सीडी वापरणे चांगले आहे आणि सोयीचे सुद्धा.





मराठीत लिहा. वापरा.

ड्युएल बुट

तुमि जारुर ड्युअेल बुट करा
मि गेली अनेक महीने ड्युअेल बुट मधे विंडौज वापरत अाहे
काही करायच्या अाधी वाचा हि लोक खुप मदत करतील
https://help.ubuntu.com/community/Beginners/FAQ?highlight=%28Beginners%2...
http://ubuntuforums.org/showthread.php?t=706813
३ विडीयो क्लिप = http://ubuntuclips.org/collections_3.html
अात्त पुरते अेवडे पुरे
काहि मदत लागल्यास
rahul_bhise_says@yahoo.com
मला मदत करायला खुप अावडेल

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
्ह ह्ह्िु्ह कजदस्हह् जह्ि्ह्हे क्होिे्िो्सकजद् ोि्स्कदह् ोिद्जकह्िोु् ्िो्जस हकसह्टे जह्ुिह््िु्जकहद ुिेजकिुे्हन
जकहह्िु् दह्ह्ु ह्िु्ज जदस्हुिह् दसजह्िे् ह्िु्हजहिुसओ्कजस स्िु्कजसजकसह् े्ह्हजसह्कज

लाईव्ह सीडी मुळे वाचलो

एकदा विंडोज ने चमत्कारिक एरर दाखवुन काम बंद पाडले होते. त्यावेळी लाईव्ह सीडी च्या वापराने वाचलो होतो हे आठवले.
त्यावेळी ही उबंटू वापरले होते!

अशी लाईव्ह सीडी हाताशी असणे उपयोगी ठरले.

-निनाद

उबंटू

मागच्या वर्षी मी ही उबंटूच्या सीडी मागवल्या होत्या, मोफत भेटलेल्या ह्या पाच आणि त्यावरून बनवलेल्या पाच अश्या सीडीज मी माझ्या अश्या मित्रांना दिल्यात ज्यांना लायनेक्स काय ते ठाऊक नव्हते. मुक्तस्त्रोत प्रणालींचा प्रसार करावा हीच यामागची प्रेरणा.

पुण्यात एक लायनेक्स युझर ग्रुप आहे.
प्रत्येक महिण्याच्या पहिल्या शनीवारी या ग्रुपची बैठक असते. पुण्यातील मुक्तस्त्रोत/लायनेक्स उपयोगकर्त्यांना उपयोगी असा हा ग्रुप आहे. हा ग्रुप मुक्तस्त्रोत चालणा प्रणालींच्या सीडीज सुध्दा उपलब्ध करून देतो.

यांचे संकेतस्थळ www.plug.org.in

नीलकांत

मराठी लायनेक्स

भारतीय भाषांमध्ये लायनेक्स :
मात्र मराठी ग्रुपची सदस्य संख्या फक्त ५ आहे.

लिनक्स की लायनक्स?

Linux चा उच्चार लिनक्स, लायनक्स आणि इतरही वेगळ्या प्रकारे केला जातो. पण मूळ/बरोबर उच्चार कोणता? लिनक्स चा निर्माता लिनस टोरवाल्ड्स यालाच विचारले तर? उत्तर या गूगल व्हिडीओत मिळेल.

ह्या सीडीने विंडोज मधील दोष कसा दूर करतात?

कधी कधी विंडोज एक्सपी नीट सुरु होत नाही तेव्हा उबुंटू अथवा तत्सम लिनक्स लाईव्ह सीडीमधून त्यातील दोष काढून ती कशी चालू करतात? ह्याबद्दल काही माहिती मिळेल काय?
अजूनपर्यंत कुणीच प्रतिसाद दिला नाही? हे कसे काय?

विंडोजचा दोष

कारण विंडोजचा दोष लाईव्ह सीडी वापरून दूर करता येत नाही. मात्र त्यात अडकलेल्या आपल्या फाईल्स (वर्ड वा एक्सेल) आपण यूबंटू वा तत्सम लाईव्ह सीडी वापरून उघडू शकता, इ-मेल करू शकता अथवा फ्लॉपी / सीडीवर साठवून घेऊ शकता.

धन्यवाद शंतनुजी!

माझा गैरसमज दूर केल्याबद्द्ल!
विंडोजमधे अडकलेल्या इतर(उदा. एमपी ३ अथवा तत्सम )फाईल्सही आपल्याला उघडता/दुसरीकडे पाठवता येतात काय?
मला अशा तर्‍हेची अडचण जेव्हा जेव्हा आली होती तेव्हा तेव्हा माझा आधीचा डेटा मी पुन्हा मिळवू शकलो नव्हतो(कारण निव्वळ अज्ञान). त्यावेळी 'हाडि फॉरमॅट करणे इतकेच माहित होते.मात्र आता अशाच एका प्रसंगी मी विंडो पुन्हा चढवताना 'अपग्रेड' असा पर्याय दिला आणि माझा जुना डेटा अबाधित राहून (अपवाद फक्त ऍंटी व्हायरस प्रोगॅमचा... तो पुन्हा चढवावा लागला.)संगणक पूर्ववत चालू लागला.

होय

>> विंडोजमधे अडकलेल्या इतर(उदा. एमपी ३ अथवा तत्सम )फाईल्सही आपल्याला उघडता/दुसरीकडे पाठवता येतात काय?
होय!

पुन्हा एकदा धन्यवाद!

शंतनुजी त्वरित उत्तराबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!

विंडोज व्हिस्टा

विंडोज व्हिस्टा ही प्रणाली कुणी वापरली आहे का? असल्यास तिचे गुण-दोष काय आहेत?
व्हिस्टा वापरल्यास कमीतकमी १ जीबीच्या वर रॅम असावी असे ऐकून आहे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

विंडोज व्हिस्टा..

...वापरली आहे. कमीकमी १ जीबी रॅम असलाच पाहिजे हे खरे आहे.. शक्य असल्यास २ जीबी रॅमच घ्यावा. विंडोज व्हिस्टा मध्ये बर्‍याच नविन सुधारणा आढळल्या. (साईड बार आणि त्यावरचे छोटे छोटे गॅजेट्स आवडले जसे की कॅलेंडर, घड्याळ संगणकाचा वेग मोजणारे मिटर इ.इ. परंतू त्याचा संगणकावर अतिरिक्त भार खूप पडतो.) सध्या १ जीबी रॅम आणि ड्युअल कोअर प्रोसेसर असलेल्या लॅपटॉपवर व्हिस्टा वापरत आहे पण तरिही व्हिस्टामूळे संगणक सुरु व्हायला वेळ लागतो आणि खूप हळू चालतो. व्हिस्टा हार्डडीस्कवर जागा देखिल बरीच खातो. व्हिस्टाच्या घरगुती वापरासाठी बेसिक आणि प्रिमीयम अश्या दोन आवृत्त्या असून बेसिक मध्ये 'एरो' नसल्याने व्हिस्टाचा चकचकीतपणा दिसणार नाही. इतर काही गोष्टींची देखिल फेररचना केली आहे त्यामूळे एक्स्.पी ची सवय असणार्‍याना सुरूवातीस अडखळल्यासारखे वाटू शकते. सध्यातरी व्हिस्टा काहिसे पांढर्‍या हत्तीसारखेच वाटत आहे दिसायला देखणे असले तरीलातिशय 'रिसोर्स हंग्री' आहे.

विंडोज व्हिस्टा - एक अनुभवलेली समस्या

विंडोज व्हिस्टाचा संगणक हा केबल मोडम/राउटरशी जोडल्यापासून वायरलेस नेटवर्क नीट चालत नाही आहे. शोधा अंती कळले की हा त्रास अजून पण लोकांना झाला आहे. IPv6 Proptocol मुळे अशंतः काही भानगडी होत आहेत. मायक्रोसॉफ्टने त्यांच्या विंडोज व्हिस्टाच्या पानावर या वरून माहीती ठेवली आहे. काही अंशी उपयोग झाला पण समस्या पूर्णपणे सुटलेली नाही.

चलचित्राचे तुकडे कसे करायचे?

व्हिसीडी स्वरूपात असलेल्या चलचित्राचे प्रसंगानुरुप छोटे छोटे तुकडे करायचे असतील तर कोणते साधन वापरावे? अनुभवी आणि माहितगार सदस्यांनी कृपया मार्गदर्शन करावे.
आपला
(मार्गदर्शनाभिलाषि) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

मूव्हीमेकर

विंडोजचे मूव्हीमेकर वापरून हे साध्य करता येईल. मात्र मुलभूत यात ठराविक साच्याच्याच फाईल्स हाताळल्या जातात. तुम्हाला अपेक्षित फाईल हाताळली जाईल की नाही याची खात्री नाही. मूव्ही एडिटर साठी गूगलवर धुंडाळा बरीच सॉफ्टवेअर्स असणे अपेक्षित आहे. व्हीसीडी कटर नावाचे एक सॉफ्टवेअर हाताळल्याचे अंधुक स्मरते.

अधिक माहिती इथे.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

धन्यवाद!

तो महाशय, आपल्या सुचवणीबद्दल शतशः धन्यवाद!
आपला
(आभारी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

अग्निकोल्हा मंदावला आहे का?

जर तुमचा अग्निकोल्हा मंदावला असेल आणि जर तुमचे आंतरजालाचे कनेक्शन ब्रॉडबँड असेल (डायल अप नाही), तर इथे दिलेल्या युक्त्या करून पहा. स्कूटी आणि होंडामध्ये जो फरक आहे तोच इथे दिसतो. :-)
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

 
^ वर