कोडे : दोन बाटलीत विष

हे कोडे शुची यांनी सांगीतलेल्या कोड्याचे थोडेसे मॉडीफिकेशन आहे :

इथे चोर दोन बाटलीत विष घालतो (शुची यांच्या कोड्यात फक्त एका बाटलीत विष घातले आहे)

ह्या कोड्याच्या उत्तराची चर्चा इथेच करूयात. व्य.नी. पाठवायची आवश्यकत नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

माफ करा ,

मला शुचि असे म्हणायचे होते.
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

पुनर्शब्दित

माझ्या कोड्यातून हजार पळवाटा निघाल्या आहेत.
आपण तेच कोडे पुनर्शब्दित कराल काय?
उदाहरणार्थ - माकडे की सेवक?
राजाला एकाच बाटलीतील मद्य प्यायचे आहे की सर्व? वगैरे. आणि माझ्या कोड्यात राहीलेल्या इतर काही चूका देखील सुधारून अर्थात कृपया पुन्हा ते कोडे इथे द्याल काय?

बहुतेक एवढी गरज नाही

आपण दिलेल्या कोड्यात मला तर पळवाटा सापडल्या नाहीत.
:)

ज्याला खरच समजले नाही त्याने कृ. व्य.नी. धाडावा.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

अवांतर

आपण तेच कोडे पुनर्शब्दित कराल काय?

ह्या वाक्यात व्याकरणाची चूक आहे.
''आपण त्याच कोड्याचे पुर्नशब्दांकन कराल का?" असे तरी व्हायला हवे किंवा
"तेच कोडे आपणाकडून पुर्नशब्दीत होईल का?'' (पॅसिव व्हॉईसमध्ये क्रियापदाला 'ईत' (जसे इंग्रजी 'ईडी') प्रत्यय लावायला हवे. )

---
गर्व मधला अर्धा 'र' (उलटा 'र') 'अर्' असतो म्हणून 'न' च्या आधि 'अर्धा र' टंकायला हवा होता.

धन्यवाद

होय माझ्या ते नंतर लक्षात आले होते पण मी ऑफिसला निघायच्या गडबडीत होते. धन्यवाद.

धनंजय यांना सल्ला

शुद्धलेखनाविषयीची टीकाटिपण्णी टाळावयाची असल्यास रावले यांचा आदर्श ठेवावा, त्यांच्याशी नडण्याचे धारिष्ट्य येथे कोणातही नाही असे दिसते!

१३

द्विमितीय पद्धत (२० माणसं)
बाटल्यांना १ ते १०० आकडे द्यायचे
पहिल्या दहांना (१ ते १०), (११ ते २०), (२१ ते ३०).... (९१ ते १००) अशी मद्यं द्यायची
दुसऱ्या दहांना (१,११,२१.....९१), (२,१२,२२...९२), (३,१३,२३...९३).... (१०,२०,३०....१००) अशी मद्यं द्यायची
म्हणजे १ ते १०० आकडे १० बाय १० मध्ये क्रमाने लिहिले तर एका दहाच्या गटातून उभ्या ओळी कळतील व दुसऱ्या दहाच्या ओळीतून आडव्या ओळी कळतील.
ही द्विमितीय पद्धत खर्चिक आहे.

त्रिमितीय पद्धत
५ बाय ५ बाय ४ च्या घनामध्ये जर १०० आकडे लिहिले तर प्रत्येक बाटलीला ३ कोऑर्डिनेट्स असतील. १४ लोकांना या तीन अक्षांवर उभं करायचं. द्विमितीय पद्धतीत जशा ओळी वाटून दिल्या तशा तो तो कोऑर्डिनेट स्थिर असलेल्या चकत्यांमध्ये येणारी २५ अथवा २० मद्यं द्यायची. कोण मरतात त्यावरून त्या घनांमधल्या बाटल्यांचे कोऑर्डिनेट्स मिळतील.

चतुर्मितीय
हेच तत्व वापरून
३ बाय ३ बाय ३ बाय ४ च्या चतुर्मितीय 'घनात' विभागणी करायची. त्यासाठी ३ + ३ + ३ + ४ = १३ माणसं लागतील.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

त्रिमितिय पद्धत वापरून (?) : -

त्रिमितीय पद्धत जरा समजायला अवघड चालली आहे.

१२ बाटल्यांसाठी या आपल्या म्हणन्याप्रमाने ३ x २ x २ अशी मांडणी करावी लागेल.
म्हणजेच ७ माणसे वापरावी लागतील.

आपण या ७ माणसांना कुठल्या कुठल्या बाटलीतील मद्य द्यावे लागेल हे फोड कऊन सांगाल काय?

(इथे कोडे सोपे करण्यासाठी १२ बाटल्या वापरल्या आहेत)

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

बारा बाटल्या

बारा बाटल्यात १ च विषारी असतं तर ४ माणसं लागणारच. दोन असतील तर ४ + ३ लागताहेत. यात काही सूत्र आहे का? अजूनही सर्वसाधारण उत्तर हाती येत नाही.

फोड करून सांगणं थोडं किचकट आहे. त्यापेक्षा ३ x २ x २ च्या उभट (३ ही उंची धरू) विटेमध्ये १२ छोटे १ x १ चे घन आहेत. त्यातल्या प्रत्येक घनात बाटलीचा एक आकडा टाका. आता या घनाच्या उभ्या ३ x २ आकाराच्या २, उभ्या ३ x २ आकाराच्या २, व आडव्या २ x २ आकाराच्या ३ अशा एकंदरीत ७ चकत्या होतील. प्रत्येक व्यक्तीला एका चकतीमध्ये असणारी मद्य द्यायची.

१२ साठी ३ बाय ४ या द्विमितीय पद्धतीनेदेखील ७ जणांत काम भागतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

१३ प्रायोगिक एकके* याबद्दल ऊहापोह

दोन बाटल्या कुठल्या त्यांच्या १००*९९/२ = ९९००/२ = ४९५० शक्यता होतात.
मृत विरुद्ध जिवंत म्हणजे द्विमानपद्धती पद्धतही कोड्यातच लादलेली आहे.
दशमान ९९०० = द्विमान १०,०१,१०,१०,१०,११० (या द्विमान संख्येत १३ जागा आहेत.)
आदल्या कोड्याप्रमाणेच प्रत्येक दोन-बाटली संचाला क्रमांक द्यावा. मग १३ प्रायोगिक एककांत* त्या संचांचा प्रयोग करावा.

- - -
*प्रायोगिक एकक = नोकर, माकड, उंदीर वगैरे.
- - -
याचे सामान्यीकरण करता येईल का?
म्हणजे ३ बाटल्यांत विष घातले असल्यास १००*९९*९८/३/२ = १,६१,७०० आणि २१७<१,६१,७००<२१८
त्यामुळे १८ प्रायोगिक एकके लागतील...

माझ्या या सामान्यीकरणात तर्कदोष आहे हे उघड आहे. कारण ९९ बाटल्यांत विष घातले असल्यास कोंबिनेशन शक्यता फक्त १०० आहेत. पण प्रायोगिक एकके पुरती १०० लागतील हेसुद्धा उघडच आहे.
- - -
असे असल्याकारणाने त्याच तर्काने साधलेले मूळचे "२ विषारी बाटल्यांसाठी १३ एकके लागतील" हे गणितही साशंकतेने बघायला हवे. त्रांगडेच आहे...

सहमत

राजेशघासकडवी यांचे उत्तर समजले नाही. उत्तर शोधण्यासाठी मीही धनंजय यांचीच पद्धत वापरली: ४९५० नव्या बाटल्यांमध्ये सर्व मिश्रणे केली की log४९५० < १३ हे उत्तर मिळेल.
दुरुस्ती: तुम्ही दिलेले १०,०१,१०,१०,१०,११० हे द्विमान रूप ९९०० चे नसून ४९५० चे आहे कारण त्याला द्विमान १०० (=४) ने भाग जात नाही. ९९०० > ९१९२ म्हणून ती १४ अंकी संख्या आहे.
तर्कदोष नाही, ९९ बाटल्यांमध्ये विष असल्यास १००C९९ म्हणजे १०० नवी मिश्रणे बनतील आणि ७ उंदीर लागतील.

पण कुठल्याही हालतीत सातही प्रायोगिक एकके मरतील

यातली १००पैकी १०० मिश्रणे विषारी असतील. म्हणजे कुठल्याही हालतीत ७ही प्रायोगिक एकके मरतील. मग कुठली बाटली बिनविषारी ते ठरवायचे कसे?
असा तर्कदोष मला भासतो.
- - -
(अरेरे - आधीच्या वाक्यात ४९५०, आणि द्विमान संख्याही ठीक केला, पण ९९०० कसे अडकून पडले, कोणास ठाऊक...)

होय की!

५१ किंवा अधिक बाटल्यांमध्ये विष असल्यास ही पद्धत फसेल हे माझ्या ध्यानातच आले नाही. १००C९९=१००C हा नियम वापरावाच लागेल असे दिसते! एक्सक्लूजनवर आधारित अशा या पद्धतीने (म्हणजे, एकच बाटली विषारी असेल तर १०० अशी नवी मिश्रणे बनवा ज्या प्रत्येकात ९९ मद्यांचे मिश्रण असेल-उत्तर ७, दोन बाटल्या विषारी असतील तर ४९५० अशी नवी मिश्रणे बनवा ज्या प्रत्येकात ९८ मद्यांचे मिश्रण असेल-उत्तर १३, तीन बाटल्या विषारी असतील तर १००C९७ अशी नवी मिश्रणे बनवा ज्या प्रत्येकात ९७ मद्यांचे मिश्रण असेल-उत्तर १८, ... ९८ बाटल्या विषारी असतील तर १००C अशी नवी मिश्रणे बनवा ज्या प्रत्येकात दोन मद्यांचे मिश्रण असेल-उत्तर १३) सारीच कोडी सोडविता येतील (असे वाटते).

९८ बाटल्यांचे समजले नाही

९८ बाटल्या विषारी असतील तर १००C अशी नवी मिश्रणे बनवा ज्या प्रत्येकात दोन मद्यांचे मिश्रण असेल-उत्तर १३

हे समजले नाही. असे एक मिश्रण असेल, खरे, की त्यात दोन बिन-विषारी मद्ये मिसळलेली आहेत. ते एकच मिश्रण पाजलेले प्रायोगिक एकक मरणार नाही हेसुद्धा खरे. म्हणजे बाकीची ४९४९ मिश्रणे आहेत त्यांच्यापैकी कुठलेही मिश्रण या नशीबवान एककाने अनुभवता कामा नये. ४९४९ मिश्रणे बाकीच्या १२ जणांनी अनुभवावी - आणि मरावे. पण त्या एक-मिश्रणी नशिबवानाला जे एकच मिश्रण द्यायचे आहे, ते मिश्रण कसे ओळखावे?

कबूल

१००C आणि १००C९८ या दोन्ही पद्धती चूक आहेत. केवळ दोन बाटल्या विषारी असतानाही १००C मधून दिलेले १३ हे उत्तर चूक आहे. उदा., C साठी १० नवी मिश्रणे बनतील आणि त्यांच्या तपासणीसाठी ४ उंदीर वापरून उत्तर सापडणार नाही.
"मिश्रणातील सर्व मद्ये विषारी असतील तरच मिश्रण विषारी" असा नियम असेल तर तुम्ही दिलेली पद्धत चालेल.

योगायोग

"मिश्रणातील सर्व मद्ये विषारी असतील तरच मिश्रण विषारी"

हे मान्य.

चतुर्मीती पद्धत वापरून (कसे ते माहित नाहे) आलेले उत्तर (१३) हे योगयोगाने १००C२ या उत्तराला म्याच होतं असावे.

बाकी nCr ही पध्दत जेनेरालाइझ साठी नाही वापरता येणार असे दिसत आहे.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

घासकडवी यांची पद्धत पटली

घासकडवी यांची पद्धत पटली. ३ बाटल्यांत विष घातले असता कमीत कमी ३ मिती लागतील जास्तीत जास्त आपण कितीही मितीपर्यंत जाऊ शकता. ४,५,६,७,८,९...... कितीही पुढे जाऊ शकता.
(i,j,k) हा बिंदू शोधण्यासाठी मला ३ मिती आवश्यक वाटतात.

जितक्या विषारी बाटल्या, कमीतकमी तितक्या मिती हव्यात

जितक्या विषारी बाटल्या, कमीतकमी तितक्या मिती हव्यात.

म्हणजे तीन विषारी बाटल्या असल्यास कमीतकमी तीन मिती हव्यात.
म्हणजेच ९९ विषारी बाटल्या असतील तर ९९ मिती हव्यात -> एकूण १०० प्रायोगिक एकके.

घासकडवी यांची पद्धत सामान्यीकृत करता येते, असे दिसते. (पण समजायला जरा वेळ लागला.)

सामान्यीकृत पद्धत - एकूण् बाटल्या -४ , विषारी -२

कमीत कमी की तेवढ्याच ?
उदा. एकूण बाटल्या = ४
विषारी = २
तर कमीत २ मिती वापरून (२*२) , म्हणजेच ४ माणसे वापरून हे गणित सुटेल
परंतू ४ बाटल्या असतील तर ३ माणसांचीच गरज आहे.
(बा-१ : सेवक १ , बा-२: सेवक २ , बा-३: सेवक ३ , बा-४ : कूणीच पिऊ नका)

याठीकाणी सामान्यीकृत पद्धत चूकीची ठरत आहे :)
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

सर्व बाटल्यांपेक्षा कमी मिती, बरोबर

एक बाटली कोणालाच द्यावी लागत नाही, आणि बाकीच्या बाटल्यांच्या हिशोबाने ती विषारी-बिनविषारी हे कळते. बरोबर.

एकूण चार बाटल्यांपैकी विषारी बाटल्या दोन असतील तर मिती २ किंवा ३ चालतील.

(होय - माझी चूक मान्य १०० पैकी ९९ बाटल्या विषारी असतील तर १०० नव्हे, ९९ प्रायोगिक एकके लागतील. पण ९८/१०० बाटल्या विषारी असतील, तर ९८ किंवा ९९ मिती चालतील -> दोन्ही प्रकारात ९९ प्रायोगिक एकके लागतील हा योगायोग म्हणावा.)

पोएटिक फ्रीडम

मी मूळ कोड्यातील मरणाचा कालावधी दहा दिवस ह्याचा अर्थ १०*२४(तास) असा घेऊन खालील प्रमाणे उत्तर देत आहे.

दर एका मिनिटाला एका सेवकाला एका बाटलीतील मद्याचा एक घोट द्यावा, बाटलीवर वेळेची खुण करावी, अशाप्रकारे २४ तासात (किंवा २३ तास ५९ मिनिटात) सेवकाला १४४० बाटल्यातील मद्य पाजता येईल. आता दहाव्या दिवशी त्याच्या मरण्याच्या वेळेची नोंद घ्यावी. ज्या वेळेस तो मरेल त्यावेळेच्या बाटलीत विष आहे हे उघड होईल.

अशाप्रकारे कमीत कमी सेवक वापरून विष घातलेली बाटली शोधता येईल. सेकंदाचा हिशेब देखील धरता येईल पण एका सेकंदात एक घोट हे जरा जास्तच फ्रीडम घेतल्यासारखे होईल म्हणून मिनिटाचा हिशोब वापरला आहे.

दहा दिवसानंतर मरतो

१. दहा दिवसानंतर मरतो, दहाव्या दिवशी नव्हे
२. १०० बाटलीतील मद्य पाजायला १०० मिनीट लागतील. म्हजेच १००व्या बाटलीत जर वीष असेल तर तो सेवक ११व्या दिवशी सकाळी १.४० ला मरेल. पण आपणास मध्यारात्री १२ वाजल्य-वाजल्या निकाल हवे आहेत.

३. दोन बाटल्यात (१ ली आणि १००वी) मधे वीष असेल तर काय होइल ? दहाव्या दिवशी मध्यरात्री १२ वाजताच सेवक मरेल. मग १००व्या बाटलीत सुद्धा वीष होते हे नाही कळणार अशाने.
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

११व्या दिवशी मरतो?

फक्त वेळ लक्षात घेणे गरजेचे आहे, जर आज सकाळी ५.०५ वाजता घोट घेतला तर १० दिवसानंतर ५.०५ वाजता मरणार असे लक्षात घेतल्यास आजचा दिवस पूर्ण व जेंव्हा मरणार तो दिवस पूर्ण ह्यांची जोडी लावता येईल. किती वाजता मरणार हे दिले नसल्याने तो दिवसाअखेर मारेल हा पोएटिक फ्रीडम घेतला आहे. जर वेळ कमी पडत असेल तर सेवकाची संख्या वाढवावी.

>>१०० बाटलीतील मद्य पाजायला १०० मिनीट लागतील. म्हजेच १००व्या बाटलीत जर वीष असेल तर तो सेवक ११व्या दिवशी सकाळी १.४० ला मरेल.

बरोबर, पण तो 11व्या दिवसाच्या सुरुवातीला मरेल हे गृहीतक जसे तुमचे आहे तसे तो १० दिवसानंतर ११वा दिवस संपण्याआधी कधीही मरू शकतो हे माझे गृहीतक आहे. राजाला ११व्या दिवशी रात्री ११:५९ मिनिटाला मद्य मिळाले तरी ते ११व्या दिवशीच मिळाले हे सरळ आहे.

तस पाहिल तर मंगळावरच दिवर की पृथ्वीवरचा + टाइम ट्रावल वगैरे

तस पाहिल तर मंगळावरच दिवर की पृथ्वीवरचा + टाइम ट्रावल वगैरे काहीच म्हणले नाही कोड्यात.

तरी
राजाला ११व्या दिवशी सकाळी १२ पासून कधीही दारू प्यायची आहे.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

:)

>>राजाला ११व्या दिवशी सकाळी १२ पासून कधीही दारू प्यायची आहे.

:) आता एक एक करून कंडीशन वाढवा.

:)

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

हलकेच घ्या :)

श्री.आजूनकोणमी , शब्दात पकडू नका हो.

शब्दातच पकडायचे असेल तर मग सर्वच कोड्यांची वाट लावता येते.
कोडे समजले नसेल तर् तुम्हाला माझा दूरध्वनी माहीत आहेच.

आणि तसेही कोथरूड कितीक लांब आहे येथून :)

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

१३

राजाचे राज्यातील प्रत्येकावर प्रेम आहे, मग तो सेवक असो, माकड असो वा उंदीर! राजाला यांपैकी कोणाचाही बळी द्यायचा नाही, म्हणून या प्रयोगासाठी कठोर शासन ठोठावल्या गेलेल्या कैद्यांची निवड करतो, बहुधा शिरच्छेद वा फाशीसाठीच लायक असलेले अट्टल गुन्हेगार.

वरील प्रतिसादांमध्ये बहुतेक जणांनी सांगितल्याप्रमाणे, १००C (१०० पैकी १) अशा मांडणीकरिता ७ जण लागतील, त्याप्रमाणेच १००C (१०० पैकी २) साठी कमीत कमी ७+६ वा १३ जण लागतील.

---
अवांतर:
- विष विरल करुन प्यायल्याने पिणारा जगू शकतो काय किंवा उशिरा का असेना पण मृत्यू संभवतोच?
- जर असे असेल तर (अथवा नसेल तरीदेखील) मृत्यू कधी होईल, प्यायल्यानंतर अगदी ठरावीक १० दिवसांनी की त्यानंतर केव्हाही? येथे त्याची विषप्रतिकारक शक्ती त्याला अधिक काळ तारू शकेल, असे वाटत नाही काय? जर उत्तर ठरावीक १० दिवस असेच असेल तर प्रेषक आजूनकोणमी यांनी त्यांच्या [या] प्रतिसादात सुचविलेली पद्धती वापरणे शक्य आहे.
- प्रयोगातील सहभागींपैकी एकाला प्रयोगात दिलेले हे विविध मद्यांचे मिश्रण सहन नाही झाले व त्यामुळे त्याचा १० दिवसांनंतर मृत्यू झाला, पण त्याने विष असलेले मद्य मुळात प्यायलेलेच नव्हते, अशा परिस्थितीत हा प्रयोग फसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ही बाब प्रयोगाच्या अगोदर ध्यानात घेतली गेली आहे काय?
- राजाच्या राज्यात अथवा नजीकच्या राज्यात रसायनशास्त्रात निष्णात असणारा एखादा रसायनशास्त्रवेत्ता उपलब्ध नाही काय अथवा असा एखादा मनुष्य ज्याला मद्यांतील भेसळीचा/विषाचा सुगावा लावता येईल? जर असा कोणी तयार झाला तर वरील प्रयोगातील सहभागींचे प्राण वाचतील! अवघ्या काही रासायनिक प्रयोगांद्वारे विषाने भेसळयुक्त मद्ये ओळखता येतील.
- मद्य असलेल्या बाटल्यांचे आधीच वजन केलेले होते काय, जर असेल तर विषयुक्त बाटल्या शोधणे फार कठीण जाणार नाही, तरीही पडताळणीसाठी ज्या जड भरणार्‍या बाटल्यांबाबत शंका आहे, त्यांमधील मद्य प्रयोगातील सहभागी जणांना वरील पद्धतीने रीतसर पाजून निरीक्षणे तपासावीत.

ही पद्धत चूकीची ठरत आहे (?)

प्रथम चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.

रिटे यांच्या या प्रतीसादातून हे कळते आहे की
ही पद्धत चूकीची ठरत आहे
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

साधारण सूत्राबद्दल काही विचार

१. १०० बाटल्या असतील तर ९९ डिग्रीज ऑफ फ्रीडम. तेव्हा कुठच्याही ज्ञात सीनारिओमध्ये ९९ पेक्षा जास्त माणसं लागू नयेत. (म्हणजे शुचिनी दिलेल्या मूळ कोड्यात १ विषारी बाटलीसाठी ७ लोकांमध्ये खरं तर १२९ बाटल्या तपासून बघता येतील)

२. जितक्या विषाच्या बाटल्या तितक्या किमान मिती. त्यामुळे ९९ विषाच्या बाटल्या असल्या तर ९९ मिती व ते तपासून बघण्यासाठी किमान ९९ माणसं लागणारच. मला असं वाटतं की जितक्या डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत त्यांचे विभाजक तपासून पाहायचे पण त्यातला सर्व विभाजक विषारी बाटल्यांच्या संख्येइतके (अथवा मोठे) असायला हवे. म्हणजे ९३ विषारी बाटल्या असल्या तरी ९९ माणसं लागतील.

३. विषारी बाटल्या जसजशा कमी होतील तशी एक संख्या अशी येईल की त्या बाटल्यांच्या संख्येइतके (किंवा अधिक) अवयव पाडता येतील. प्रत्येक अवयव हा विषारी बाटल्यांच्या संख्येइतका किंवा मोठा हवा. (हा माझा अंदाज आहे - हे बरोबर आहे की नाही याची खात्री नाही.) मग सगळ्या अवयवांची बेरीज करायची - तितकी माणसं प्रयोगासाठी लागणार.

४. याचा अर्थ असा की १०० बाटल्यांपैकी जर चार बाटल्या विषारी असतील ४ बाय ४ बाय ४ बाय ४ अशा सोळा माणसांमध्ये ओळखता येईल. पाच बाटल्या विषारी असतील तर २५ माणसांमध्ये... असं करत ९ विषारी बाटल्यांसाठी ८१ माणसं लागतील आणि त्यापुढे ९९ माणसं लागतील.

५. वरती धक्का यांनी म्हटल्याप्रमाणे ४ बाटल्या असताना ३ माणसं पुरतात - ते जास्तीत जास्त डिग्री ऑफ फ्रीडममधून येतं. मग अवयव पाडण्याची गरज पडत नाही (कारण कुठच्याही दोन अवयवांची बेरीज किमान चार येणार).

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

१२९ नाही

७ माणसे १२८ बाटल्याच तपसू शकतात. कारण २^७ = १२८ ह्यामधे ००००००० ही कंडीशन ग्रहीत धरली आहे.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

बरोबर

हम्म्म. बरोबर आहे तुमचं. ० नंबरची बाटली कोणालाच दिलेली नाही. १२७ डिग्रीज ऑफ फ्रीडमचा हिशोब आधीच अंतर्भूत आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

 
^ वर