कोडे

आपल्यापैकी बर्‍याचजणांना हे कोडे माहीत असेल. आशा करते काही लोकांकरता नवीन असेल.

(१) एक राजा आहे.
(२) राजाकडे मद्याचे खूप प्रकार आहेत. १०० प्रकारची उंची मद्यं अनुक्रमे १०० वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये आहेत.
(३) एकदा एक चोर शिरतो आणि या मद्यांच्या बाटल्यांमध्ये वीष मिसळण्याचा प्रयत्न करतो.
(४) पण सुदैवाने चोर १०० पैकी एकाच बाटलीत वीष मिसळतो.
(५) हे वीषयुक्त मद्य जर कोणी घेइल तर त्याचा १० दिवसांनी मृत्यू ओढवतो.
(६) चोराला फासावर चढवतात पण पठ्ठा काही केल्या हे सांगत नाही की कोणत्या बाटलीत वीष मिसळले आहे.
(७) राजाला लवकरात लवकर म्हणजे अगदी ११ व्या दिवशीच मद्य प्यायचे आहे.
(८)पण राजाला कमीत कमी (>०) लोक वापरून हे शोधून काढायचे आहे की कोणत्या बाटलीमध्ये विषारी दारू आहे.

हे कसे शक्य आहे? कमीत कमी किती (>०) सेवक वापरून राजा ही बाटली शोधू शकेल?

लेखनविषय: दुवे:

Comments

अपडेट

रिटे, धनंजय आणि घासकडवी यांची उत्तरे बरोबर आहेत.

फुटणारी घड्याळे आणि मरणारी माणसे

गेल्या शंभर मजली इमारतीतून घड्याळे टाकायची आणि फोडायची होती. आता माणसांच्या जिवाची किंमत न करता कमित कमी माणसे (कमित कमी मरणारी माणसे नाहीत.) वापरायचे कोडे आले आहे. :) नैतिकतेचा केवढा हा अधःपात !
प्रमोद

माकडे

माणसे नाही माकडे धरू यात.

:)

मी ऐकलेल्या कोड्यात किमान उंदरांवर विषप्रयोग करायचा होता.
घड्याळांच्या उदाहरणात मूळ कोड्यात अंडी होती पण "घड्याळाचा वापर करून उंची मोजा" हे पोटकोडे विचारण्यासाठी मी घड्याळे सांगितलेली होती :)
गांधीजींच्या 'नयी तालीम'मध्ये तर, "हौदातून एका नळाने पाणी वाहून जाते आहे आणि दुसर्‍या नळाने भरले जाते आहे तर हौद किती वेळात भरेल/रिकामा होईल?" या प्रकारच्या, नासाडीच्या गणितांवरही बंदी होती!

अपडेट

दिगम्भा यांचे उत्तर बरोबर आहे.
रावले यांनी प्रयत्न करावा. त्यांनी दिलेले उत्तर चूकीचे आहे.

हिंट - ७ लोकांमध्ये (माकडांमध्ये) हे कोडे सुटू शकते.

२४ तासंनंतर उत्तर सांगते

जर कोणी येथे अचूक उत्तर दिले नाही तर उद्या सकाळी म्हणजे २४ तासांनंतर उत्तर सांगते.

मी राजा असतो तर.....!

माझे उत्तरः-
तो राजा मी असतो तर, १०० माकडांना पकडून आणायला सांगून, त्यापैकी प्रत्येकाला १०० बाटल्यांमधील एक-एक पेग पाजावयाचे आदेश दिले असते. कोणत्या माकडाला कोणत्या बाटलीतील मद्य प्यायला दिले आहे यासंबंधित बाबीच्या क्रमवारीची नोंद ठेवायला सांगितली असती. दहा दिवसानंतर जी ९९ माकडे जीवंत राहतील त्यासंबंधित ९९ बाटल्यांमधील मद्य पिण्यास योग्य असे समजले जावू शकेल.

माझे उत्तर चूकीचे कसे?
तुम्ही कोडे बदलत आहात. 'कमीतकमी सेवकांवर विशप्रयोग करायचा' ही आधिची अट होती. मी ती अट पाळली होती. तुम्ही मला सूचक दिशा म्हणून सांगता, ७ लोकांमध्ये हे कोडे सुटू शकते. पण असे कसे?
दर आठवड्याने नव्या माकडावर संभाव्य विशप्रयोग करीत बसायला मी काय खुनशी स्वभावाचा आहे का? तसा विचार मी करू शकत नाही. (कोडे सोडवताना) मी राजा असूनही अशी चिंधीगरी का करू? सेवकांना दिलेल्या कामात काही हलगर्जीपणा झाला तर....? प्रत्येकी सात माकडांना ७-७ दारूचे पेग पाजायचे ते ही जास्तीत जास्त १४-१५ दिवस? त्यांना खायला काहीच द्यायचे नाही? एवढा ताप करीत बसण्या पेक्शा मी नवीन दारूच्या बाटल्या आणीन की. कारण शेवटी मी राजा आहे! पुढच्या मौसमात, जनतेवरील कर थोडासा वाढवता ही येईल.

यु कॅन डू बेटर

एकंदरीत कमीत कमी जीवांचे प्राण घ्यायचे आहेत. तुम्हाला जर असेम्हणायचे असेल की मी कोड्यात कमीत कमी सेवक वापरा लिहीले म्हणून आपण एकाही सेवकाचे प्राण न घेता उलट ९९ "माकडांचे" प्राण घेऊन हे कोडे सोडविले तर मी काहीच युक्तीवाद करू शकत नाही. बट ..... बट यु कॅन डू बेटर. खाली उत्तर दिले आहे.

स्टीक टू यूअर वर्डस, बाईसाहेब!

शुचिबाई,
तुम्ही शब्द फिरवता! अगदी सहजपणे.
१>तुमच्या कोड्यात 'माकडे' हा शब्द आधि होता का?
तो तुम्ही मी उत्तर दिल्यानंतर तुम्हाला सुचला. तुम्ही 01/08/2011 - 12:41 च्या प्रतिसादात बिनदिक्कत तो वापरलात.
२>त्याबद्दल तुम्ही माझ्या कल्पकतेचे आभार मानलेत का?
३>"मी कोड्यात कमीत कमी सेवक वापरा लिहीले म्हणून आपण एकाही सेवकाचे प्राण न घेता उलट ९९ "माकडांचे" प्राण घेऊन हे कोडे सोडविले तर मी काहीच युक्तीवाद करू शकत नाही." तुमचे हे वाक्य कशाप्रकारचे आहे?
एकाच बाटलीतील मद्यात विश आहे. ही तुमची अट तुम्ही कशा काय विसरलात?
४> मी जे उत्तर दिले आहे त्यात ही एकच माकड मरणार आहे. व त्या सगळ्याचा निकाल ११ व्या दिवशी लागणार आहे. तरीही माझे 'उत्तर चूक' असे तुम्ही कसे काय ठरवू शकता?

आपले उत्तर मी ग्राह्य धरते.

अरे खरच ९९ माकडांचे प्राण जात नाहीत तर एकाच माकडाचे जात आहेत.
खरं पाहता मी सेवक अथवा माकड ही अट घालयला हवी होती.
पण ज्याअर्थी मी "कमीत कमी" सेवक ही अट घातली त्या अर्थी कोणीही जास्तीत जास्त माकडे वापरून हे कोडे सोडवू शकते.
आपले उत्तर मी ग्राह्य धरते.
कल्पकतेबद्दल अभिनंदन.

उत्तर

(१) बाटल्यांना ० ते ९९ असे नंबर घाला
(२) हे नंबर बायनरी मध्ये रुपांतरीत करा
(३) ७ सेवकांची /माकडांचीजागा प्रत्येक डिजिट च्या जागी निश्चित करा
(४) अनुक्रमे ० आणि १ यांवर अवलंबून् हे ठरवा की त्या सेवकाला/माकडाला त्या बाटलीतील मद्य द्यायचे की नाही. उदाहरणार्थ ६४ चे बायनरी रुपांतर आहे १००००००. म्हणजे फक्त पहील्या सेवकाला/माकडाला ६४ व्या बाटलीतील मद्य चाखावयास मिळेल बाकी कोणालाही नाही.
(५) जे सेवक/माकडे १० दिवसंनी मरतील त्यांच्या १ ते ७ या क्रमावलीतील जागेवरून निष्कर्ष काढता येईल की कोणती बाटली विषारी होती.

हॅहॅहॅ

तुमच्या पद्धतीने ७ माणसे मरणार! त्यांचे आईवडील वा बायका-मुले तुमच्या कडे रडत येणार.
माझ्या पद्धतीने १ च माकड मरणार.

खरं आहे

खरं आहे.

भावार्थ विरुद्ध शब्दच्छल

पण रावले साहेब मी उपक्रमाचा सध्या अभ्यास करते आहे आणि मी आपल्या एका प्रतिसादात (तो प्रतिसाद मला आता मिळत नाही आहे) असे वाचले की आपण भावार्थ जाणता न की शब्दच्छल करता. आणि तसेच माझेदेखील आत्तापर्यंतचे अनुमान आहे. पण या माझ्या कोड्याच्या धाग्यावर मात्र आपण भावार्थ जाणला नाहीत आपण शब्दच्छल केला. ;) (कृपया ह घे)

जरा हटके : फक्त एक सेवक वापरून.

खालील ओळ वाचता -
(७) राजाला लवकरात लवकर म्हणजे अगदी ११ व्या दिवशीच मद्य प्यायचे आहे.

आपण फक्त १ सेवक मारुन आपण हे साध्य करू शकतो. १ जणाला ५० बाटलीतील दारू पाजायची. तो मेला तर राजाला उरलेल्या
बाटलींतील दारू प्यायला सांगायची (राजाला सगळ्या (शंभर ) बाटलींतील दारू प्यायची नसल्यामुळे हे उत्तर बरोबर ठरते. तो उरलेल्या ५०
बाटलींतील पिउ शकतो. )

आता जर त्याला कुठल्या बाटलीत विष आहे हे जाणायचे असल्यास ७ हे उत्तर बरोबर आहे. तसेच ७ वापरून तो २^७ = १२८ बाटल्या टेस्ट करू शकतो.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

 
^ वर