भ्रष्टाचार व लॉबीइंग

१ निरा राडीया ह्या मोठ मोठ्या कंपन्यांसाठी लॉबीइंग करायच्या. अर्थातच पैशाच्या मोबदल्यात. अशा लॉबीइंगला भ्रष्टाचार म्हणता येईल का. सिग्नलला पोलिसाने पकडले तर काही लोक पैसे देऊन सुटतात - हे एक प्रकारचे लॉबीइंगच झाले.
माझे उत्तर - हा भ्रष्टाचारच आहे. -- सोयी करता कोणी ह्याच गोष्टीला लॉबिइंग हे नाव ठेवतात. काहींचे म्हणणे पडते की अमेरीकेत (व प्रगत राष्ट्रात) सुद्धा असेच चालते (म्हणजे ते बरोबर) किंवा हल्ली चे मॅनेजमेंट चे एक तंत्र आहे असे म्हणतात.
२. निरा राडीया केंद्रात कोणते मंत्री पाहिजे हे ठरवू शकते (पंत प्रधान ठरवतात असे मला वाटायचे). हे अराजक नाही का. मग लोकशाही कोठे गेली.

आपल्याला काय वाटते.

लेखनविषय: दुवे:

Comments

इन्सोर्स केलेला कॉन्सेप्ट

लॉबिंग हा इन्सोर्स केलेला कॉन्सेप्ट आहे. त्यात नवे काही नाही. राजकारण सोपे नाही.

हा भ्रष्टाचाराचा प्रकार आहे का

त्यात नवे नाही, राजकारण सोपे नाही. पण हा भ्रष्टाचार आहे का. इन्सोर्स किंवा आऊटसोर्स हे भ्रष्टाचारात मोडते का.

http://rashtravrat.blogspot.com

लॉबिंग-एक कला की गरज ?

सर्वच कंपन्यांना आपली व्यावसायिक उद्दीष्टे लवकर गाठण्यासाठी / धोरणे ठरवण्यासाठी सरकारी निर्णय/ धोरणे प्रत्यक्ष ठरण्याआधीच समजणे,जमल्यास ती आपल्याला अनुकूल राहातील अशी व्यवस्था करणे, हे अत्यंत गरजेचे वाटते.हा व्यवस्थापन तंत्राचाच भाग मानण्यात येतो, नपेक्षा हजारो कोटी रुपयांचे व्यवहार ( गुंतवणूक ) मोडीत काढण्याची वेळ येते.याला व्यवहार-चातुर्य समजण्यात येते.अर्थात पैशाची देवघेव होतेच व त्याअर्थी हा भ्रष्ट व्यवहारच होतो. लोकशाहीतील सर्व व्यवहार सामान्य लोकांसाठी होत नसून मोजक्या विशेष मान्यवर लोकांसाठीच होतात. स्व-कल्याणालाच बरेच वेळा लोककल्याणाचा मुलामा दिला जातो.

भ्रष्ट व्यवहार

हा व्यवस्थापन तंत्राचाच भाग मानण्यात येतो, नपेक्षा हजारो कोटी रुपयांचे व्यवहार ( गुंतवणूक ) मोडीत काढण्याची वेळ येते.
म्हणुन भ्रष्टाचार चालु द्यावा का.

लोकशाहीतील सर्व व्यवहार सामान्य लोकांसाठी होत नसून मोजक्या विशेष मान्यवर लोकांसाठीच होतात.
लोकशाही ही लोकांसाठी, लोकांनी राबवलेली संकल्पना मग रहात नाही ती मोजक्या लोकांसाठी, मोजक्या लोकांनी राबवलेली होते.

स्व-कल्याणालाच बरेच वेळा लोककल्याणाचा मुलामा दिला जातो.

छान वाक्य

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

+१

लॉबिंग हा भ्रष्टाचार आहे याच्याशी सहमत. पण तो भ्रष्टाचार नाही असा स्टॅण्ड घेतला की पाश्चात्य देशांना "सर्वात भ्रष्ट देशांच्या यादी"तून वगळता येते.

नितिन थत्ते

+१

सहमत आहे.

आपल्या देशाचे काय

लॉबिंग हा भ्रष्टाचार आहे याच्याशी सहमत. पण तो भ्रष्टाचार नाही असा स्टॅण्ड घेतला की पाश्चात्य देशांना "सर्वात भ्रष्ट देशांच्या यादी"तून वगळता येते.

पुर्ण पणे सहमत पण मग आपल्या देशाचे काय.
त्यांच्या देशांमध्ये ते चालते म्हणुन आपल्या देशांमध्ये चालवून घ्याचचे का.

http://rashtravrat.blogspot.com

नाही

>>त्यांच्या देशांमध्ये ते चालते म्हणुन आपल्या देशांमध्ये चालवून घ्याचचे का.

नाही. अजिबात नाही.

नितिन थत्ते

नाही.

>>>त्यांच्या देशांमध्ये ते चालते म्हणुन आपल्या देशांमध्ये चालवून घ्याचचे का.
अजिबात नाही.

-दिलीप बिरुटे

काही उपाय सुचतात का

हे थांबवण्या साठी काही करता येण्या जोगे उपाय सुचतात का कोणाला

कठिण प्रश्न आहे

अगदी आयुष्याभराची नेमणूक असलेला राज्यकर्ता घेतला तरी : त्याच्याकडे मर्यादित वेळ असतो, त्यामुळे ती वेळ (व्याख्येने) अर्थशास्त्रीय "माल" होते. तिचे नियोजन कसे करावे? बहुधा रेशनिंगने. दुर्लक्ष केले तर आपोआप या मालाची खुली बाजारपेठ उभी होते.
- - -
पुन्हापुन्हा निवडणुकीत उभा राहाणारा विधिमंडळाचा सदस्य घेतला, तर त्याच्या जाहिरातबाजीचा खर्च कोणी उचलावा? माझ्या मते पुन्हा रेशनिंग, आणि खर्च शासनाने उचलावा. नियोजनात दुर्लक्ष केले, तर आपोआप या मालाचीही खुली बाजारपेठ उभी होते.
- - -
चर्चा वाचतो आहे.

कठिण प्रश्न

सहमत आहे. दिलेल्या परिस्थीत कठिण प्रश्न म्हणून सोडून द्यायचे का. मला वाटते कठिण असला तरी झुंज दिलीच पाहिजे.

१. जनतेला जाकरुक करुन.
२. राजकारणाच सक्रिय होऊन.
३. शालेय अभ्यासक्रमाबरोबर भ्रष्टाचार (कोणत्याही प्रकारचा) कसा हानीकारक आहे, चांगला नाही हे मुलांना बाळकडू सारखे शिकवले पाहिजे. तसेच मुलांमध्ये चुक झाल्यावरच्या पश्चातापाची नैसर्गिक भावना जी असते ती बोथट न होऊ देणे. मुल बिघडण्यामागचे हमखास कारण म्हणजे त्यांच्यातली पश्चातापाची नैसर्गिक भावना नाहिशी होणे. पश्चातापाची भावना तेवत ठेवणे फार महत्वाचे.

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

चांगले/वाईट

चांगले आणि वाईट हा दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. पश्चात्तापाची भावना कमी होणारे मूलच उत्क्रांतीत अधिक टिकेल ना? बाह्य शिक्षा हा एकच मार्ग आहे. पकडले न जाण्याचे शिक्षण आपल्या मुलाला देऊन भगतसिंग शेजार्‍याकडे व्हावा असा प्रयत्न करणार्‍यांवर काय उपाय शक्य आहे?

समजले नाही

चांगले आणि वाईट हा दृष्टिकोनाचा प्रश्न आहे.

बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. पण सदसदविवेक बुद्धी एखाद्याला सांगत असते त्या परीस्थितीत, त्या घटकेला काय योग्य आहे. आपण ब-याच वेळेला तीचे ऐकत नाही आणि क्षणिक लोभा मुळे एखादे कृत्य करतो. करुन झाल्यावर जो विवेक होतो व भुरभुर लागते तो पश्चाताप. गीतेत एक सुंदर शुभाषीत आहे -

ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते।
सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते॥

क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति॥

अध्याय २ श्लोक ६२, ६३ ह्या वर प्रकाश टाकणारे.

पश्चात्तापाची भावना कमी होणारे मूलच उत्क्रांतीत अधिक टिकेल ना?

ह्याता अर्थ कळला नाही.

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

खुलासा

पश्चात्तापाची भावना कमी होणारे मूलच उत्क्रांतीत अधिक टिकेल ना?
ह्याता अर्थ कळला नाही.

ज्याला सद्सद्विवेकबुद्धीच नसेल त्याला अपराधी वाटणार नाही. अशा समाजात बाह्य शिक्षा नसतील तर काय होईल? दुर्जनांना सज्जनांपेक्षा अधिक संपत्ती, स्त्रिया, इ. मिळून त्यांची अपत्ये वाढतील. त्यातही, अपराधी भावना वाटणार्‍या दुर्जनाच्या मनावर थोडातरी अंकुश राहील, त्याला त्या भावनेमुळे अनारोग्यही येऊ शकेल आणि उत्क्रांतीतील यश मर्यादित राहील. पण मनाचे तसे काही निर्बंध नसलेल्या व्यक्ती उत्क्रांतीत सर्वात यशस्वी ठरतील की!

सुचवलेले दोन दीर्घकालिक उपाय

माझ्या वरच्या प्रतिसादात ते स्पष्ट न झाल्यामुळे केवळ "कठिण प्रश्न" म्हणून सोडून दिले असल्याचा आभास झाला असावा.

दोन दीर्घकालिक उपाय सुचवलेले आहेत :
१. विधिमंडळ सदस्याकडे गार्‍हाणे मांडायचा किंवा माहिती पुरवायचा काळ असतो, त्याचे रेशनिंग व्हावे.
२. निवडणुकांमध्ये उमेदवारीची ओळख मतदारांना देण्यात फक्त सरकारी खजिन्यातून रक्कम खर्च व्हावी. (उमेदवाराची मंडळी फक्त वेळ आणि प्रयत्न यांचे दान करू शकतील.)

ही बाजारपेठ वसवण्यास बरेच गुंतागुंतीचे तपशील सोडवावे लागतील.

- - -
भ्रष्टाचाराविरुद्ध शाळेत आणि समाजात बोलबाला असावा, हे तुमचे म्हणणे ठीकच आहे. मला वाटते, असा काही प्रचार सध्या होतही असावा. बहुतेक वर्तमानपत्रांत "भ्रष्टाचार वाईट" अशा प्रकारचे लेखन वाचायला मिळते. कित्येक घरांमध्ये घरगुती चर्चेतही "भ्रष्टाचार वाईट" असे उल्लेख ऐकू येत असावेत. शाळाशिक्षक काही वेगळे सांगत असतील असे वाटत नाही.
या सर्व प्रचाराची मात्रा थोडी अधिक करता येईल.

शंका

उमेदवाराची मंडळी फक्त वेळ आणि प्रयत्न यांचे दान करू शकतील.

या मंडळींना अशा दानासाठी उद्युक्त करण्यासाठी केलेला खर्च ही एका अर्थी वेळ/प्रयत्नांची केलेली खरेदीच असेल की!

बरेच गुंतागुंतीचे तपशील सोडवावे लागतील

बरेच गुंतागुंतीचे तपशील सोडवावे लागतील.

कमीअधिक प्रमाणात (अनर्थक-सूक्ष्मतेचे न होतील इतक्या प्रमाणात) बाजारपेठेचे नियमन होऊ शकते असे वाटते.

कुठल्याही प्राथमिक विश्लेषणात फक्त मर्यादा असलेला माल कुठला, ग्राहक कोण आणि विक्रेता कोण याबद्दल चर्चा केली जाऊ शकते. त्यानंतर दुसर्‍या मजल्याच्या विश्लेषणात ग्राहक-विक्रेता यांच्यापाशी असलेल्या माहिती-असमतोलाची चर्चा केली जाऊ शकते, आणि त्या माहितीस, उपलब्ध कालमर्यादेस "माल" मानून विश्लेषण केले जाऊ शकते. तशीच तिसरी पायरी, चवथी पायरी... यापैकी कुठलीही पायरी चढणे चुकीचे नाही. इन्फिनिट रिग्रेस आहेच. पण प्रत्यक्षात इन्फिनिट गुंतागुंतीची बाजारपेठ न होता, कुठल्याशा पायरीशी "इथे थांबू" म्हणून बाजारपेठेचे नियमन थांबते.

ज्या प्रकारात आपल्या लोकशाहीची बाजारपेठ राज्यघटनेने नियमित केली आहे, त्या पहिल्या पायरीत फक्त एक-प्रौढ-एक-मत म्हणून "येथे थांबू" म्हटले आहे. माझे म्हणणे आहे, की त्याहून पुढच्या एक किंवा थोड्या अधिक पायर्‍यांचे नियमन केले पाहिजे. नेमक्या किती पायर्‍या नियमित कराव्या? याबद्दल सिद्धांत असा काही नाही - इन्फिनिट रिग्रेसच आहे. नियमनाचा भार विरुद्ध नियमनाचा फायदा हा हिशोब ज्या पायरीवर उलटेल, त्या पायरीच्या आधी नियमन थांबवावे. असा प्रात्यक्षिक ठोकताळा पुरे. आणि हा हिशोब कालांतराने बदलू शकेल.

फार पूर्वी एकाधिकार-शाश्वत राज्य मिळवण्याचा बाजारपेठ-कायदा होता, आणि अधूनमधून रक्तरंजित क्रांतीने राज्यबदल अशा प्रकारे बाजारपेठ उधळून पुन्हा बसत असे. वरील शृंखलेत ही ०-वी पायरी मानावी काय?

हाहाहा

फार पूर्वी एकाधिकार-शाश्वत राज्य मिळवण्याचा बाजारपेठ-कायदा होता, आणि अधूनमधून रक्तरंजित क्रांतीने राज्यबदल अशा प्रकारे बाजारपेठ उधळून पुन्हा बसत असे. वरील शृंखलेत ही ०-वी पायरी मानावी काय?

"खंडणी द्यावी की जीव गमवावा" हा प्रश्नही मुक्त बाजारपेठेतील गणित म्हणूनच सोडवावा असा काही निष्कर्ष काढता येईल काय?

उपाय आवडले

पण अमलबजावणी करता यायला हवी.

अपरिहार्य

भ्रष्टाचाराचा थांबविणे शक्य नाही असे चाणक्यानेही म्हटले होते. मला वाटते की या प्रश्नावर फारसा काहीच तोडगा शक्य नाही.
मुळात, सजीवसृष्टीची निर्मिती हीच शोषणावर आधारित आहे. जेव्हा संसाधने मुबलक असतात तेव्हा एकाच प्रकारचे सजीवही (प्राप्त परिस्थितील फरकांतून आलेल्या थोड्याफार विषमतेमुळे) एकमेकांचे शोषण करण्याक्षम होऊ शकतील आणि अशी व्यवस्था स्वसंवर्धक (सेल्फसस्टेनिंग) ठरेल. अपौरुषेय सिस्टिमच्या पोषणासाठी (उदा., कम्युनिझम) शोषण केले जाईल की काही उच्चपदस्थ व्यक्तींच्या चैनीसाठी केले शोषण जाईल ते संसाधने आणि संदेशवहनाचे तंत्रज्ञान यांच्या गुणोत्तरावर ठरेल असे मला वाटते. जेव्हा संदेशवहनाचे तंत्रज्ञान स्वस्त होते तेव्हा मेंदू ही खर्चिक व्यवस्था परवडते. मज्जापेशींना त्वचा/आतडी यांच्या पेशींपेक्षा सुरक्षित जगायला मिळत असले तरी मुख्य खर्च 'सिस्टिम'वरच होतो. १९८४ प्रमाणे, २५% लोकांना केवळ लोकांवर पाळत ठेवण्यासाठी पोसणे परवडेल त्या समाजातून बराच भ्रष्टाचार नष्ट होऊ शकेल असे मला वाटते. किंवा, एकमेकांच्या मनातील विचार वाचणे शक्य होईल तेव्हाही भ्रष्टाचार नष्ट होऊ शकेल.

+१

+१ सहमत.

सहमत

आपले विचार पटले.
शेवटी जिसकी लाठी (मग ती लाठी कोणत्याही स्वरुपाची असो) उसकी भैंस हेच की.

लोकशाही, व्यवस्था हे सगळे लोकांना चांगले वाटत रहाण्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत का. त्याचा आड घेऊन लाठी फिरवत रहायचे.

http://rashtravrat.blogspot.com

मनातील विचार वाचणे

किंवा, एकमेकांच्या मनातील विचार वाचणे शक्य होईल तेव्हाही भ्रष्टाचार नष्ट होऊ शकेल.

किंवा वाढेल ही. मनातील विचार वाचायला यायला लागले तर मग जे भ्रष्टाचार करु ईच्छितात ते एकमेकांना लवकर ओळखतील व छान ठरवुन करता येईल.

 
^ वर