उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
जीवन जगण्यालायक करणार्या गोष्टी
डार्क मॅटर
December 26, 2010 - 7:41 pm
वुडी ऍलनच्या मॅनहॅटन ह्या चित्रपटात एक स्वगत आहे. ज्यात कथेतील पात्र एक यादी बनवते, की हे आयुष्य का जगावेसे वाटते कारण; (why is life worth living?)
ज्यामधे काही कलाकार, खेळाडू, संगित, सिनेमे, पुस्तके, वैयक्तिक गोष्टी अशी यादी हे पात्र सांगते.
ती यादी खालील प्रमाणे:
१. ग्राउचो मार्क्स (विनोदी अभिनेता)
![]() |
२. विली मेज (खेळाडू)
![]() |
३. ज्युपिटर सिंफनी (मोझार्ट)
४.लुई आर्मस्ट्राँग : पटेटो हेड ब्लूज (जॅझ म्युझिक)
५.स्वीडीश सिनेमे
![]() |
६. फ्लोबेरचे, 'सेंटीमेंटल एज्यूकेशन' पुस्तक
![]() |
७.मार्लन ब्रँडो
![]() |
८. फ्रँक सिनात्रा
Frank Sinatra - For Once in My Life
९. सेझान चे ऍपल्स अँड पेअर्स (चित्र)
![]() |
१०. आवडत्या उपाहारगृहातले खेकडे (वैयक्तिक)
११. प्रेयसीचा चेहरा (वैयक्तिक)
--------
तुम्हालाही जर असाच प्रश्न विचारला तर तुमची यादी काय असेल?
why is life worth living?
दुवे:
Comments
अवघड प्रश्न
खूप अवघड प्रश्न विचारला राव. . थोडा विचार करुद्या. .
थोड्या विचाराने भागत नाहीये. .
सध्या फक्त कुटुंब, मित्रपरिवार आणि काही वस्तु यापलिकडे यांच्यापेक्षा प्रिय काही वाटत नाही. .
सुंदर प्रश्न
डार्क मॅटर, आपला हा प्रश्न वाचून मी उपक्रमची सदस्य झाले. (अर्थात प्रियाली यांचा "सिकंदरावरचा" अप्रतिम लेख देखील अंशतः कारणीभूत आहेच आहे. ).
जीवन जगण्यास लायक बनविणारी माझी काही कारणं -
(१) बाबांनी घेतलेले कपाळाचे चुंबन(वैयक्तिक)
(२) आईचे मायेने थोपटणे(वैयक्तिक)
(३) माझ्या बाळाची अगदी लहान असतानाची पालथे पडून, कुल्ले वर करून गाढ झोपण्याची पोझ(वैयक्तिक)
(४)"गाय दि मोपासा" या थोर लेखकाच्या लघुकथा
(५)बालाजी तांबे यांची "दत्तात्रेय" ही सी डी
(६)गणित
(७)प्रार्थनेनंतर रोज अनुभवता येणारी शांती (वैयक्तिक)
(८) अत्तरे, रात्री घालण्याचे इटसी बिटसी सुंदर कपडे (लाँजरी) ..... इट मेकस लाईफ अ ब्युटी!!!!
(९) कॉफी
(१०) खाली दिलेल्या फीतीसारख्या मजेशीर चित्रफीती
सुखाचा शोध
खांडेकरांचा 'सुखाचा शोध' हा लघुनिबंध आठवला. सकाळच्या चहाचा पहिला घोट, डाकेने आलेले चारच ओळींचे पत्र, कुठूनतरी येताना 'हरीभजनावीण काळ घालवू नको रे' या ऐकू आलेल्या ओळी अशी काहीशी ती यादी आहे. त्यावर मी विचार केला असता मला माझ्या वैयक्तिक आनंदाच्या काही गोष्टी सुचल्या होत्या. त्यांत थोडी भर घालून ती पार्शल यादी अशी असेल..
थंडी - हिवाळा, पावसात भिजून आल्यावर भजी खाणे, तेंडुलकरची बॅटिंग, स्वतः लावलेल्या झाडांना आलेली फुले, मुगाची उसळ, शेंगदाण्याची चटणी, तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि लोणी, तंदुरी चिकन, ओल्ड मंक रम आणि स्कॉच व्हिस्की, शब्दकोडी, पहिली नोकरी लागल्यावर विकत घेतलेली वुडहाऊसची पुस्तके, जेरमी ब्रेटचा शेरलॉक होम्स, 'बेस्ट ऑफ जयवंत दळवी' हे पुस्तक, तलत महमूदची गाणी, नसिरुद्दिन शहाचा गालिब, 'सेहर' हा चित्रपट, इंटरनेट, मिलिंद बोकील आणी आशा बगे यांचे नवे लिखाण, करदंट, अमिताभ बच्चन....
अवांतरः आयुष्यात निरर्थक वाटणार्या गोष्टी असा एक धागा तयार करावा काय?
सन्जोप राव
तुझसे नाराज नही जिंदगी, हैरान हूं मैं
तेरे मासूम सवालोंसे परेशान हूं मैं
स्वतःसाठी!
ही यादी पूर्ण देण्याची अपेक्षा आहे काय? म्हणजे, त्या यादीतील सर्व वस्तू नष्ट केल्या तर आत्महत्या केली जाईल असे अपेक्षित नाही काय? त्या यादीत सर्वात आधी स्वतःचाच समावेश नको काय?
Me... me... me... -- Agent Smith
:-)
रिटे, मोठ्या मोठ्या लोकांनी त्यांच्या आवडीनिवडी लिहलेल्या वाचायच्या इतकेच.
अन्न-वस्त्र-निवारा असे एकेकाळी ऐकल्याचे स्मरते.
मग कधीतरी देव, देश अन धर्मासाठी असे सांगीतले गेले.
आता माहीत नाही सध्या काय यादी आहे पण पोटापाण्याची सोय, घरदार-टिव्ही-कॉम्युटर्, थोडेफार शौक इ. असले तरी (मरत मरत) जगावे म्हणतात.
मैंही मैं हूं !
त्या यादीत सर्वात आधी स्वतःचाच समावेश नको काय?
Me... me... me... -- Agent Smith
अगदी, अगदी. सहमत.
माझ्यामते बाकी जीवन जगण्यालायक करणाऱ्या बहुतेक गोष्टी काळानुसार आणि वयानुसार बदलत असतात. असो. काही नावे ड्रॉपायची आहेत पण ड्रॉपणार नाही. सुदूर जंगलात घर हवे, किमान वर्षभर पुरेल इतका शिधा आणि अतिजलद इंटरनेट जोडणी हवी.
आणि अर्थातच आवडत्या व्यक्तीची सोबत आणि अशी गाणी:
( छे. फारच हळवेहळवे झाले बुवा हे सगळे. शिवाय थालीपीठ, लोणी, गुटगुट्या भात वगैरेही हवाच ना.)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
गोष्ट?
धाग्याचा विषय आहे: जीवन जगण्यालायक करणार्या गोष्टी.
तुम्ही स्वतःला 'गोष्ट' समजता हे गोष्ट रोचक आहे.
नुक्ता
सदस्यनामातील नुक्ता जवळजवळ दिसतच नाही!
मजा आहे :-) किंवा :-(
नुक्ता
स़द़स्य़ना़मा़ती़ल़ नु़क्ता़ म़ला़ही़ दि़स़ला़ ऩव्ह़ता़
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
नक्कीच!
आम्ही मटेरिअलिस्ट आहोत.
--
शुद्धलेखनविषयक चर्चेसाठी विषय: रिकामटेकडा की रिकाम़टेकडा?
--
क्लोनिंगविषयीचे उद्गार असलेल्या प्रतिसादाला तुमचा प्रतिप्रतिसाद येणे समर्पक वाटते.
--
Imitation is the sincerest (form) of flattery. -- चार्ल्स कोल्टन
यादी
वैयक्तिक जिव्हाळ्याचे नातेसंबंध वगळता खालील गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत
इंटरनेट :-), सचिन तेंडुलकरची फलंदाजी, जीए, मिलिंद बोकील, नेमाडे यांची पुस्तके, एलेन बेनेस, जॉर्ज कुस्टांझा आणि साईनफेल्डमधील इतर पात्रे, ऍलन शोअर, डेनी क्रेन आणि बोस्टन लीगल मधील इतर पात्रे, जेरेमी ब्रेटचा शेरलॉक होम्स, अनेक इंग्रजी चित्रपट, भरपूर व्यायाम केल्यानंतर पोटभर पिकलेली केळी खाणे :-)
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
माझी यादी
१. मित्र
२. फोटोग्राफी
३. ट्रेकींग
४. शिवाजीराजांच्या स्मृतींतून मिळणारी स्फूर्ती
५. शेन वॉर्न, सचिन तेंडूलकरच्या काळात जन्मल्याचे भाग्य
६. मराठी पुस्तके: इरावती कर्वे, त्र्यंबक शेजवलकर, पु ल देशपांडे, अवचटांचं "कार्यरत", सुरेश भटांचे गझल/कवितासंग्रह.
७. काही सिनेमे शॉशँक, गॉडफादर, सेहेर, गर्दीश, दिल चाहता है.
८. चहा-क्रिमरोल, दापोलीच्या रुपेशच्या टपरीवरचा वडापाव(कॉलेजला तिकडे होतो.)
९. आईच्या हातचं जेवण.(वैयक्तिक)
१०. कराडचा कोयना-कृष्णेचा प्रीतीसंगम(वैयक्तिक)
यादी बरीच मोठी होऊ शकते... पहिल्या पाच मिनीटात ज्या गोष्टी आठवतात त्याच खर्या मानाव्यात..म्हणून एवढीच दिली.
अभिजित यादव
ता. कर्हाड जि. सातारा
जीवन जगण्यालायक करणार्या गोष्टी
१. पलंगावर अंग टाकल्याक्षणी येणारी झोप
२. खेकडे, कोलंबी आणि मासे (वैयक्तिक)
३. इतरांच्या खोड्या काढण्याची प्रवृत्ती (वैयक्तिक)
४. फटकळपणा (वैयक्तिक)
५. आळशीपणा करता येण्याजोगी परिस्थिती
६. कुटुंब
७. सचिन तेंडूलकर आणि पीटन मॅनिंग
८. आवडीचे चित्रपट, पुस्तके, स्थळे
१ ते ६ मधली एकही गोष्ट नसती तर आयुष्यात घुसमट झाली असती असं वाटतं. असो.
७ आणि ८ नसते तर तडजोड करून आवड बदलली असती.
यादी जमेल तशी अपडेट करू.
कलाकार
जॉन होम्स
खेळाडू
संगित
सिनेमे
डिप थ्रोट, इन द रिल्म ऑफ सेन्सेस, हेन्री अँड जुन
पुस्तके
द रोजी क्रुसिफिक्शन, द वन ट्वेंटी डेज ऑफ सॉडोम
वैयक्तिक
बसस्टेशने, रेल्वेस्टेशने, एअरपोर्ट्स, कॉन्ट्रॅसेप्टीव्ज
झोलॉफ्ट, लेक्साप्रो
कमोड
पॉर्नोग्राफी, अल्कोहोल
ऍसिटामिनोफेन, प्रेशर कुकर, मायक्रोवेव, हस्तमैथुन
_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.
सॅडिस्टिक आधुनिकोत्तर यादी
तुमची सॅडिस्टिक यादी आधुनिकोत्तर दिसते आहे. किंबहुना कविताच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अरेरे
तुम्ही उपप्रतिसाद दिल्याने यादी अपडेट करणे थांबवावे लागत आहे.
_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.
निराशा
आत्तापर्यंत इतक्या याद्या आल्या त्यात शेरलॉक होम्सच्या कथेतल्या कुत्र्याच्या न भुंकण्याप्रमाणे अभावामुळे काही गोष्टी खटकून गेल्या.
- प्रेम, प्रियकर, प्रेयसी (गेला बाजार पती, पत्नी ) या पकारापैकी एक तरी. मोघम कुटुंब वगैरे काय?
- ते नाहीतर निदान शुद्ध काम वगैरे तरी? एकच कोणीतरी पॉर्न वगैरे म्हटलं आहे. (या बाबतीत कदाचित सभ्यतेच्या मर्यादा पाळणं वगैरे आड येऊ शकलं असेल)
- गुलाब, वसंत, निसर्ग, शेत वगैरेसारख्या गोष्टी. (महानोरांच्या कविता मात्र चवीने वाचतील. वा.)
- देश, इमान, धर्म, अस्मिता, देव वगैरेसारख्या ज्यांच्यासाठी जान कुर्बान केल्यावर आत्मिक संतोष मिळतो (कधी कधी ७२ कुमारिका सुद्धा) तसल्या गोष्टी
आयला म्हणजे हे सगळे कवी लोक काहीतरी खरडत असतात आणि आपण वा वा म्हणतो ते सगळं खोटंच का? एक बौद्धिक कसरत? की शिवाजी दुसऱ्या घरी जन्माला यावा म्हणतात त्याप्रमाणे ते व्हायकॅरिअस काहीतरी आवडतं?
छे छे, मला तर काहीच कळेनासं झालंय. लोकं नक्की खरं बोलताहेत ना, की नुसताच 'यादीत काय चांगलं दिसेल' असा विचार करत आहेत?
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
अब आया उंट पहाड के नीचे
म्हणूनच मला कविता आवडत नाहीत. ;-) थापा आणि बंडला सगळ्या!
तुमच्या लग्नाला किती वर्षे झाली हो? ;-) उत्तर दिले नाहीत तरी चालेल पण माझ्या एवढी झाली असतील तर तुम्हीही कुटुंबच म्हणाल. पती किंवा पत्नी हे काय जीवन जगायला लागणार्या गोष्टी असतात काय? काहीही!! इन्शुरन्स पॉलिसी हे उत्तर बरं त्यापेक्षा.
डेंजरस पॉलिसी
तुमच्यासाठी नसतील. पण माझ्यासाठी माझी पत्नी ही जीवन जगायला लायक करते. आणि माझी प्रेयसीसुद्धा. ;)
इन्शुरन्स पॉलिसी? काय भलतंच बोलताय? पॉलिसीमुळे जीवन जगण्यालायक कसं काय होतं? तीमुळे तुम्ही तुमच्या पती/पत्नी च्या दृष्टीने तुमचं जीवन संपवायला लायक ठरता! :) आता लक्षात येतं तुम्हाला जागोजाग भुतं कोणामुळे दिसतात ते ;) रद्द करा हो तुमची पॉलिसी...
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
हेहेहे!
मी माझ्या पॉलिसीबद्दल नव्हते बोलत. माझी पॉलिसीच नाही. मी मेल्यावरही इतरांना सुखीबिखी करायचा विचार करेन असे वाटलेच कसे तुम्हाला? :प्
पाठ खाजविणे
आम्हाला एक धडा होता मला नीट आठवत नाही पण बहुतेक अत्रे की केशवसुत यांनी "पाठ खाजविण्यातील आनंद" यावर केलेले भाष्य त्या धड्यात होते.
सर्वांचा अनुभव हाच असावा की पाठ खाजवल्याने अतिशय आनंद मिळतो. वेळप्रसंगी आम्ही नखं खाणारी माणसं कंगव्याने पाठ खाजवतो :) पण घासकडवी, ते इथे 'प्रामाणिकपणे' लिहीलच पाहीजे का हा वेगळा मुद्दा झाला. :)
सभ्यतेच्या, औपचारिकतेच्या मर्यादा आड येतात खर्या. आणि मग धाग्यांवर हे तुम्ही म्हणता तसे छापील प्रतिसाद येतात
आमचे व्यसन
तरूण व सुंदर स्त्रीयांकडे (सामाजाच्या अलिखीत मर्यादा सांभाळून) पहायला, डोळे भरून पहायला आवडते.
'सुंदर स्त्रीचे लावण्य व सळसळते तारुण्य' सोडून जगातील बाकी सगळ्या गोश्टी नश्वर आहेत, असेच वाटते.
नश्वर
'सुंदर स्त्रीचे लावण्य व सळसळते तारुण्य' सोडून जगातील बाकी सगळ्या गोश्टी नश्वर आहेत, असेच वाटते.
सुंदर स्त्रीचे लावण्य व सळसळते तारुण्य नश्वर नसते, हे नव्यानेच कळाले. असो.
सन्जोप राव
तुझसे नाराज नही जिंदगी, हैरान हूं मैं
तेरे मासूम सवालोंसे परेशान हूं मैं
गाणं: ओम शांती ओम! चित्रपटः कर्ज
चर्चेचा विशय काय आहे?
उत्तरः जीवन जगण्यालायक करणार्या गोष्टी
ह्या वाक्याचा अर्थ काय?
उत्तरः अशा कोणत्या गोश्टींचा आस्वाद घेतला?, की सदस्याच्या वैयक्तिक आवडी-निवडीनुसार त्याला/तीला त्याचे/तीचे जीवन 'जगण्यालायक' वाटते.
नश्वर म्हणजे काय?
उत्तरः जिथे ईश्वर नाही ते नश्वर
ईश्वर कुठे-कुठे असतो?
उत्तर : सगळीकडे असतो. पण मानव समाजात आपल्या आवडीनुसार जिथे निसर्गाच्या रूपात 'ईश्वराचे सुंदर प्रकटीकरण जिथे जिथे होते तिथे तिथे ईश्वर आहे' असे म्हटले जाते.
उदाहरणार्थ?
उत्तरः र्हुतू चार आहेत. पण बहुतेकांना त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रिय असतो 'वसंत'. कारण ह्या र्हुतू मध्ये ईश्वराचे निसर्गाच्या माध्यमातून 'सुंदर प्रकटीकरण' झालेले असते. (जसे कधी-कधी पावसात 'रौद्र प्रकटीकरण' होते.) मानवी आयुश्यात 'तारुण्य' हा वसंत र्हुतू. मी पूरूश आहे. मला स्त्रीचे आकर्शण आहे. (लग्न झालेले असले तरी!) आणी त्यात तरूण स्त्री सुंदर असेल तर....!
त्या 'तारूण्यातील सौदर्याचे प्रकटीकरणा' मध्ये मला ईश्वर दिसतो, जे पाहण्यातून आनंद मिळतो, जो आनंद मिळण्याने जीवन 'जगण्यालायक होते' असे वाटते.
एक सुंदर तरूण स्त्री
असो!
उत्तरः 'असो!' कित्या घ्येता? अर्थ तसो घ्या ना!
एकाच स्त्रीकडे मी आयुश्यभर बघत बसणार असे मी कुठे लिहीलय?
-----------------------------
तूमने कभी किसीसे प्यार किया?
कभी किसीको दिल दिया?
नतमस्तक
सदरहू प्रतिसादातील प्रत्येक वाक्यावर एक परिच्छेद लिहिता येईल
चुकलो, चुकलो.....
ह्या प्रतीसादातल्या परत्येक् वाक्याव्र् एक् प्याराग्राफ् ल्हिता येयील... छे! आपले काम नव्हे!
तूर्त आम्ही रावल्यांसमोर नतमस्तक आहोत.
सन्जोप राव
तुझसे नाराज नही जिंदगी, हैरान हूं मैं
तेरे मासूम सवालोंसे परेशान हूं मैं
प्रतिसाद
या धाग्यावर उत्तर देण्याची आपली कुवत नाही हे मान्य करतो. मात्र, श्री. रावले आणि श्रीश्रीश्री का यांचे प्रतिसाद बेहद्द मनोरंजक आहेत , प्रचंड हसवणारे आहेत इतपत नमूद करतो. विशेषतः श्रीश्रीश्री का यांनी वेळोवेळी परिशीलन करून सुधारत नेलेली यादी वाचताना जी करमणूक झाली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे :-)
याद्या आणि जॉर्ज पेरेक
याद्या पाहिल्या की जॉर्ज पेरेक या साहित्यिकाची आठवण होते. गमतीशीर याद्या वाङ्मय म्हणून प्रसिध्द करण्याचा पायंडा त्यानं पाडला. 'मला स्मरतं' या पुस्तकात त्यानं त्याला स्मरणार्या ४८० गोष्टींची यादी केली होती. उदा:
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
का
जंगल बूकमधल्या अजगराचं नाव आहे - का
का हे नाव अजगराला शोभून दिसत असे हे आम्हाला स्मरते.
अरे वा...
मस्त प्रतिसाद आहेत. :)
-दिलीप बिरुटे