महेश्वर व पुण्यश्लोक अहिल्याबाइ होळकर्

नर्मदाप्रसाद् यांचे "श्री नर्मदा परिक्रमा अंतरंग" या नावानी नर्मदा परिक्रमेवर् फार सुंदर् व माहितीपर पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले. महेश्वर संदर्भात दिलेली माहिती मी त्यांच्याच शब्दात साभार खाली देत आहे."

"मैया किनारी कुणला यावेसे वाटत नाही? आलेला परत जात नाही, किमान स्थान तरी निर्माण करणारच असच एक अभिमान वाटाव - मराठी कर्तुत्व.

महेश्वरच्या खालच्या अंगाला एक क्षेत्र आहे सहस्त्रधारा. केवळ ८ कि.मी.अंतर. दोन्ही ठिकाणावरुन दोन्ही स्थान पाहता येतात. रात्री लाईट पाहण्यात मजा यावी. सहस्त्रधार आता या पुढे अधिक चांगल्या रितीने ओळखल्या जाईल ते नारायण आश्रमामुळे. मैया किनारी खुप आश्राम् आहेत.मोठे आश्रम् आहेत. परंतु हा एक खरोखरी अतिभव्य आश्रम. सासवडजवळ जे नारायणपुर आहे त्या ठिकाणच्या नारायण महाराजांनी या आश्रमाची निर्मीती केली अगदी नारायण पुरची प्रतिकृती असलेली एकमुखी भव्य दत्तमुर्ती, समोर शिवपिंड मागे गणपती आणि मैयाची दोन मंदिरे. काही हजार माणसे रात्रवस्तीस राहू शकतील अशी व्यवस्था.

(source:-http://www.google.co.in/imgres?imgurl=http://sphotos.ak.fbcdn.net/hphoto)
मराठी माणसाने अभिमान बाळगावा आणि अवश्य भेट द्यावी असे ठिकाण.

अहिल्याबाई होऴकर-प्रत्यक्ष नर्मदाच

सती जाणे जिथे परंपरा होती, त्या देशीच्या एका सासर्‍याने आपल्या सुनेला म्हणावे- तू सती जाऊ नको. तुझी, मला आणि राज्याला गरज आहे. धन्य तो सासरा अन् धन्य ती सून-देवी अहिल्या.

त्यांचा कालखंड विचारात घ्या. सन १७६१ पानीपत युध्द आपण हरलो - सर्वत्र त्या अपयशाचे पडसाद उमटलेले. अशा सुमारास म्हणजे १७६५ साली देवींनी राज्यकारभार हाती घेतला. तब्बल ३० वर्षे म्हणजे १७९५ पर्यंत त्यांनी राज्याची धुरा वाहिली.

एक विधवा स्त्री. इंदौरला राजधानी, मात्र नर्मदा मैयाचा किनारा निवडून महेश्वरलाच राहून राज्यकारभार केला. हातात सदैव महादेवाची पिंड, असे दुसरे उदाहरण नाही. काय उद्देश असावा? त्यांनीच स्वतः त्याचा खुलासा केलेला - "माझ्या प्रत्येक कृतीचा मला ईश्वराकडे जाब द्यावयाचा आहे." काय तोलुन मापुन राज्य केल् असेल? कधी कुणावर अन्याय होइल काय ? त्यांच्या राज्यात मुसलमान देखील गुण्यागोवींदाने राहत.

राज्य निर्मीती ही श्रींची इच्छा असे म्हणणार्‍या शिवाजी-राजांशीच तुलना करावी असा राज्यकारभार देवींनी केला. देवींचा कारभार पाहून इंग्रज देखील स्तीमीत झालेले आहेत.

राघोबादादा होळकरांवर चालून जाण्याचा बेत आखत होते. देवींना कळलं देवींनी निरोप पाठवीला. या, माझ्या राज्यावर चालुन् या. जिंकलात तर स्त्रीशी युध्द् जिंकुन काय बहादुरी दाखविता म्हणुन जनता तुमची हेटाळणी करील. हरलात तर बेअब्रु होईल. निरोप पाठवितांना बांगड्या पाठविण्यास् देवी विसरल्या नाहीत. परिणाम अपेक्षेप्रमाणे झाला. राघोबादादा माघारी फिरले. देवी अशा मुत्सद्दी होत्या.

आपल्या राज्यातच नव्हे तर राज्याबाहेर जवळपास आसेतू हिमाचल त्यांनी मंदिराचा जिर्णोध्दार केला. त्यामुळे राज्याबाहेरच्या जनतेची त्यांच्याविषयी आश्वासक राज्यकर्त्या अशी भावना होती. स्वतःसाठी महाल बांधणारे राजे/महाराजे गेले. मात्र जनतेसाठी केदारेश्वर ते रामेश्वर आणी द्वारकेपासून पुर्वेकडे पार दूरवर् देवींनी मंदिरे बांधली. अशा १९ ठिकाणांची यादी महेश्वर येथील महालात पहावयास मीळते. आजही ती चांगल्या स्थितीत आहेत आणी त्यारुपाने देवींना आमच्या हृदयात स्थान आहे.

स्वतःसाठी रत्नजडित सिंहासने बनविणारे स्वतः गेले, सिहासने गेली; मात्र स्वतः पांढर्‍या चादरीवर बसुन राज्यकारभार करणार्‍या देवींनी कृष्णाकरिता सोन्याचा पाळणा केला तो आजही पहावयास उपलब्ध आहे."

लेखनविषय: दुवे:

Comments

राघोबा अहिल्या

राघोबा आणि अहिल्याबाई यांच्यातील हा वाद पूर्वी वाचला होता पण विसर पडला होता. त्याची आठवण करून दिलीत. धन्यवाद.

 
^ वर