माझा नुकताच झालेला प्रवास

पुणे- इंदुर गाडीने मी ७ डिसेंबरला गाडीत बसलो. सोबत सगळे म.प्र.चे कुटुंब होते आणी मी एकटाच पुणेरी. नाही म्हटले तरि थोडा पुणेरी खाष्टपणा माझ्या अंगात भिनत चालला आहे. केवळ दोन वर्षात. मला देवास ला जायचे होते म्हणजे उद्या सकाळी ८.३० ला. गाडी दुपारी पुण्यावरुन ३.२० ला सुटली. म्हणजे १७ तासांचा प्रवास. सोबत बोलण्यास कुणीच नाही. सोबतच्या कुटुंबात दोन जावा त्याच्या दोन मुली व तीन मुले.त्याच्यातील दोन पुरुष वेगळ्या बर्थला होते. आणी शक्यतोवर ते इकडे फिरण्याचे टाळत असल्याचे जाणवत होते. मी शेवटी पुस्तक चाळण्याचा प्रयत्न केला पण त्यात मन रमेना. मग मी येणारे प्रत्येक स्टेशन चे नाव व वेळ माझ्या मोबाईल च्या नोटबुक वर लिहीण्याचा निष्चय केला. त्या नोंदि अशा:-

पुणे सुटल्यावर पहिले श्टेशन - खडकी -मग- दापोडी-पिंपरी-चिंचवड-१५.५३-अकुर्डी -देहुरोड-बेगडेवाडी-घोरवाडी-तलेगाव- १६.०८-वडगाव-कान्हे-कामशेत-माळवली-१६.२३-लोणावळा-१६.३० या स्टेशन वर आम्हाला मुम्बई-चेन्नाई ही गाडी दिसली. नंतर खंडाळा-नागनाथ-पळसदरी-कर्जत. कर्जत ला आम्हाला मुम्बई-भुवनेश्वर ही कोनार्क एक्स्र्प्रेस् भेटली. नंतर भिवपुरी रोड-नेरुळ जं.-शेलु-वान्गनी जं.१७.४०- बदलापुर-१७.४६ -अंबरनाथ१७.५९-उल्हासनगर-१८.०४-विठ्ठलवाडी १८.०६-कल्याण१८.१० ठाकुरली १८.२५- डोम्बीवली १८.२८- कोपर- भिवंडी रोड १८.४९ - खारबाव -१९.०८ - कामन रोड १९.१८ - वसई रोड १९.५३ - मग मी कंटाळुन खालचा बर्थ माझा असतांना निवांतपणा मिळावा म्हणुन वरच्या बर्थवर झोपावयास गेलो. पण थंडी सुरु झाली होती. जवळ असलेल्या तुटपुंज्या पुणेरी पांघरुणात झोप लागत नव्हती. मध्येच जाग आले तेंव्हा बरोडा ०.१.३३ पहाटे आले त्याची नोंद घेतली पुन्हा झोपलो पुन्हा उठलो ते रतलाम ५.३० - नागदा-६.३४ उज्जैन ७.३५ आणी शेवटी देवास ८.२९. गाडीतुन उतरुन आटो केला ५० रु. त घरी पोचलो.

तिथे मरणाची थंडी होती. देवास काय पुर्ण् म्.प्र त हिवाळ्यात तिळापासुन बनविलेले गजक फारच चविष्ट असते. रविवारी ओंकारेष्वर - महेश्वरचा कार्यक्रम ठरला. नर्मदा नदिवर स्नान एक पर्वणी असते. अहिल्याबाईंचा इतिहास वाचला होता त्यांनी ज्या वाड्यात ३० वर्षे राहिल्या ती जागा फिरुन डोळ्याचे पारणे फिटले.

त्याच्या काळातील पुजेचे देव व इतर साहित्य पाहिल्यावर आपण इतिहास जगत असल्याचे जाणवते. १४ ला मी इंदुरहुन बसने अमरावती ला जिथे मी २० वर्ष कार्य केले तिथे गेलो जुन्या मित्रांना भेटणे हा एक अवर्णनीय अनुभव असतो. तो अनुभवुन १८ ला पुण्याच्या बसमध्ये बसलो व १९ ला पुण्याला पोचलो २० ला अष्टविनायकाचे शेवटचे ४ गणपती करण्याचा योग आला तो पुर्ण करुन पुन्हा आपल्या १ बि एच के च्या खुराड्यात विसावलो.

maheshwar
maheshwar fort
लेखनविषय: दुवे:

Comments

माहितीप्रद

"नेरुळ जं" ऐवजी "नेरळ जं" असे नाव हवे.
वेळा सेकंदात नोंदविल्या असत्या तर दीडशे वर्षांनंतर अभ्यासकांना अधिक उपयोगी पडू शकल्या असत्या असे वाटते.

हम्म!

लेखाचे प्रयोजन कळले नाही. क्रमशः आहे का? असल्यास किंवा नसल्यास महेश्वर किल्ला/ राजवाडा वगैरेचे वर्णन वाचायला आणि फोटो बघायला आवडतील.

महेश्वर

महेश्वर हे खूप रम्य स्थळ आहे. नर्मदासरोवर धरणाने त्यातील नर्मदेची पातळी वाढणार आहे (वाढली आहे.).

महेश्वरचा घाट यासोबत अहिल्याबाई होळकरांची कचेरी पहायला मिळते. अतिशय साधेपणाची (बर्‍यापैकी लहान) अशी ती गादी तक्याची जागा आहे. (छायाचित्र घ्यायला बहुदा परवानगी नव्हती.)
नर्मदेतील गोटा या ठिकाणी पात्रात व्यवस्थित दिसतो. अशाच सुंदर गोट्यांचे शाळिग्राम (होळकरांचे कलेक्शन) एका मंदिरात आहेत. चकचकीत विविध आकाराचे आणि रंगांचे गोटे एकत्रित पहायला छान वाटले.

या निमित्ताने एक कथा आठवली. अहिल्याबाई होळकरांचा एक मुलगा उद्दाम होता. त्याने काही गैरकृत्ये (बहुदा बलात्कार) केल्यावर देहांत प्रायश्चित्ताची सजा खुद्द अहिल्याबाईंनी सुनावली होती.

होळकर हे संस्थान खालसा झाले. (असे वाटते) त्यामुळे राजघराण्याची विशेष शानशौकत नाही. याशिवाय सध्याचे होळकरवंशज आंग्ल (विवाहामुळे) झाल्यासारखे आहेत. या किल्याची थोडीफार दखल ते घेतात. याच भागातील हातमागाचे कारखाने आहेत. इथली महेश्वरी साडी प्रसिद्ध आहे. येथे मध्यप्रदेश टुरिजम ने राहण्यासाठी चांगली व्यवस्था केली आहे.

प्रमोद

??

>>अहिल्याबाईंचा इतिहास वाचला होता त्यांनी ज्या वाड्यात ३० वर्षे राहिल्या ती जागा फिरुन डोळ्याचे पारणे फिटले.

म्हणजे नक्की काय याचा खुलासा करावा. तेथील फोटो असल्यास टाकावे. अजुन माहीती येउ दे, मग जरा उपक्रमाचा लेख असल्यासारखे वाटेल. (सध्या ही जालनिशीवर लिहल्यासारखी एक नोंद वाटत आहे.)

अजून

दोन फोटो खरंच खूप आहेत. पण लेख अपूर्ण वाटतो. अजून फोटो आणि वर्णन येउद्या की!

||वाछितो विजयी होईबा||

मस्त! आवडले.

लिखाणाची शैली फेसबुक वर लिहीण्यासाठी योग्य आहे. उलट म्हणायचे झाले तर उपक्रमला मराठीतले थोडे दिर्घ स्वरूपातील फेसबुक म्हणून वापरता येवू शकते हि कल्पना हा लेख वाचून डोक्यात आली.

किल्ल्याचा फोटो बघून हरखून जायला होते. काश! तेथील वातावरण, माणसांच्या आवाजाचा ईको, झाडावरील पक्शांचा आवाज, हवेची झुळूक देखील अनुभता आली असती तर?

सहमत

किल्ल्याचा फोटो बघून हरखून जायला होते. काश! तेथील वातावरण, माणसांच्या आवाजाचा ईको, झाडावरील पक्शांचा आवाज, हवेची झुळूक देखील अनुभता आली असती तर?

अगदी मनातलं बोललात
जयेश

शाळकरी मुलाची सहल.

लेखाचा पहिला भाग एखाद्या शाळकरी मुलाने मास्तरांनी सांगितले म्हणून लिहिलेल्या प्रवास वर्णना सारखा वाटतो.

पुणे सुटल्यावर पहिले श्टेशन - खडकी -मग- दापोडी-पिंपरी-चिंचवड-१५.५३-अकुर्डी -देहुरोड-बेगडेवाडी-घोरवाडी-तलेगाव- १६.०८-वडगाव-कान्हे-कामशेत-माळवली-१६.२३-लोणावळा-१६.३० या स्टेशन वर आम्हाला मुम्बई-चेन्नाई ही गाडी दिसली. नंतर खंडाळा-नागनाथ-पळसदरी-कर्जत. कर्जत ला आम्हाला मुम्बई-भुवनेश्वर ही कोनार्क एक्स्र्प्रेस् भेटली. नंतर भिवपुरी रोड-नेरुळ जं.-शेलु-वान्गनी जं.१७.४०- बदलापुर-१७.४६ -अंबरनाथ१७.५९-उल्हासनगर-१८.०४-विठ्ठलवाडी १८.०६-कल्याण१८.१० ठाकुरली १८.२५- डोम्बीवली १८.२८- कोपर- भिवंडी रोड १८.४९ - खारबाव -१९.०८ - कामन रोड १९.१८ - वसई रोड १९.५३ - मग मी कंटाळुन खालचा बर्थ माझा असतांना निवांतपणा मिळावा म्हणुन वरच्या बर्थवर झोपावयास गेलो. पण थंडी सुरु झाली होती. जवळ असलेल्या तुटपुंज्या पुणेरी पांघरुणात झोप लागत नव्हती. मध्येच जाग आले तेंव्हा बरोडा ०.१.३३ पहाटे आले त्याची नोंद घेतली पुन्हा झोपलो पुन्हा उठलो ते रतलाम ५.३० - नागदा-६.३४ उज्जैन ७.३५ आणी शेवटी देवास ८.२९. गाडीतुन उतरुन आटो केला ५० रु. त घरी पोचलो.
हे सगळे काय आहे? इतके विनोदी प्रवासवर्णन मी उपक्रमवर किंवा कोठेही आजतागायत वाचलेले नाही.
यापुढील एक वाक्य म्हणजे तर असंबद्ध लेखनाची कमाल असे समजता ये ईल.
तिथे मरणाची थंडी होती. देवास काय पुर्ण् म्.प्र त हिवाळ्यात तिळापासुन बनविलेले गजक फारच चविष्ट असते. रविवारी ओंकारेष्वर - महेश्वरचा कार्यक्रम ठरला. नर्मदा नदिवर स्नान एक पर्वणी असते. अहिल्याबाईंचा इतिहास वाचला होता त्यांनी ज्या वाड्यात ३० वर्षे राहिल्या ती जागा फिरुन डोळ्याचे पारणे फिटले.
दोन्ही फोटो मात्र उत्तम आहेत. केवळ फोटोंमुळे लेखावर नजर टाकावीशी वाटते.

लेख उपक्रमच्या प्रतिष्ठेला साजेसा नक्कीच नाही

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

मस्तच !

गोडसे भटजींची शैली आठवली. :)
अजून येऊ द्या.

अहिल्याबाई होळकर-महेश्वर

महेश्वर् हे म.प्र्.तील खरगोन जिल्यातील इन्दुरहुन अदमासे ९१ कि.मी वर नर्मदा नदिच्या काठावरिल एक रम्य ठिकाण आहे. सध्या गाजत असलेल्या "झाशी की रानी" या सिरियल चा काही भागाचे शुटींग या ठिकाणी झाले आहे. माळवा प्रांतावर् त्यांनी जवळ जवळ ३० वर्षे राज्य केले. हा कालावधी माळव्यातील सर्वात सुखाचा होता. त्या अतिशय धार्मीक व्रुत्तीच्या होत्या त्याची झलक त्यांच्या वाड्यात असलेल्या पुजेच्या साहित्य बघुन होते. त्यांनी वास्तव केलेल्या वाड्यात त्यांच्या वापरातील वस्तु सुबक रितीने आजही पहावयास मीळतात. पण तेथे फोटो काढण्यास मात्र मनाइ आहे. भारतात ठिकठिकाणी त्यांनी बांधलेल्या धर्मशाळा व घाट याची ग्वाही देतात. त्यामुळेच त्यांना पुण्यश्लोक राजमाता देवी असे नामाभिमान प्राप्त झाले. येथील किल्ल्याचे आज एका अद्ययावत हॉटेल मध्ये रुपांतर झाले आहे.
अहमदनगर् जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातिल चौन्डी या लहानशा खेड्यात धनगर् कुटुबात त्यांचा जन्म झाला(३१/५/१७२५). पेशव्यांचे मातब्बर सरदार मल्हारराव होळकर यांच्या द्रुष्टिस ही ८ वर्षाची मुलगी धार्मिक कार्यात मग्न असलेली द्रुष्टिस पडली आणी पहाताक्षणी त्यांना ती आपल्या १० वर्षाच्या मुलासाठी खडेरावासाठी पसंद पडली व त्यानी तिला सुन करुन झाली. खंडेरावांचा कुम्भेर च्या लढाइत म्रुत्यु झाला(१७५४) व त्यानंतर १७६७ मध्ये मल्हारराव वारल्यानंतर् राज्याची धुरा अहिल्याबाइंनी समर्थपणे सांभाळली. मल्हाररावांच्या हयातीतच त्यांनी आपल्या सुनेला राज्याच्या कारभाराची माहिती करुन दिली हे तिच्यात् त्यानी पाहिलेल्या अंगभुत गुणामुळेच व त्यांचा तो विश्वास अहिल्याबाइनी समर्थपणे राज्य चालवुन खरा करुन दाखविला. इंदुर् ह्या लहानशा खेड्याला भरभराटिस आणण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. मात्र त्यांनी आपली राजधानी ही महेश्वर येथे स्थापीत केली. त्या आपल्या प्रजेला आपल्या अपत्याप्रमाणे वागवत आणी त्यांच्या भरभराटी साठी अनेक योजना राबवीत. त्या संदर्भात अनेक कथा प्रसिध्द आहेत्. १७९५ मध्ये त्या निपुर्त्रिक वारल्यानंतर त्याच्या नंतर त्याचा सेनापति असलेल्या तुकोजी होळकर यांनी १७९७ मध्ये आपल्या मुलाला काशीराव होळकर ला गादीवर बसवले.

विश्वास कल्याणकर

फोटो

धाग्यात छायाचित्रांची स्तुती करण्यात आलेली आहे. परंतु विश्वास कल्याणकर यांनी त्यानंतर या धाग्यात प्रतिसाद दिला त्यात त्यांविषयी काहीच उल्लेख नाही.
पहिले छायाचित्र अँपरसँड ट्रॅवल्स या सायटीवरील आहे. दुसरे छायाचित्र रामचंद्र पातिदार यांच्या खात्यात आहे. ही छायाचित्रे विश्वास कल्याणकर यांनी काढलेली नसावीत.

खरेच की

मला वाटते की चित्रांचे श्रेय जर अन्य लोकांने देणे योग्य असेल, तर त्याचा उल्लेख लेखकाने प्रतिसादात करावा.

(मला वाटते मागे अशा प्रकारची चूक मी केलेली असेल. शक्यतोवर मी चित्र सापडले त्या स्थळाचा उल्लेख करतो, पण कधीतरी उल्लेख राहिला असेल. माझ्याकडून अशी त्रुटी राहिल्यास वाचक मला चूक लक्षात आणून देतील अशी आशा आहे.)

अपवाद

एखादा मुद्दा सिद्ध करण्यासाठी छायाचित्र, चित्र किंवा व्यंगचित्र दिले जाते तेव्हा बाय डीफॉल्ट गृहीतक असते की ते कोठेतरी सापडलेले असावे. किंबहुना, स्वरचित असते तेव्हा अनेकदा तसे सांगितलेही जाते.
प्रवासवर्णनामध्ये वापरलेली छायाचित्रे हा विशेष अपवाद असावा. (अगदी, नकाशे किंवा इतर काही चित्रे दिली तरी त्यांना स्वरचित समजण्याची पद्धत नाही असे वाटते.)
काही का प्रघात असेनात, स्तुती(/टीका) केल्यावर खुलासा देण्याचा प्रघात मात्र नक्कीच आहे (तोवर तसे स्पष्ट नसले तरी चालेल असे वाटते).

छायाचित्रासंबधी

दिलेली छायाचित्रे अर्थातच मी काढली नाहित ती साभार साईट वरुन उचलली आहेत. महेश्वर व ओंकारेश्वर च्या सौन्द्र्याची कल्पना यावी हाच उद्देश त्या मागे आहे. मला त्या बाबत क्रेडीट घेण्याचा अजिबात उद्देश नाही.

विश्वास कल्याणकर

उद्देश

... मला त्या बाबत क्रेडीट घेण्याचा अजिबात उद्देश नाही.

क्रेडिट नाकारण्याचा उद्देशही नसावा, असे जाणवले.
_____
व्हेन पिपल डोन्ट फियर व्हॉट इज टेरिबल, ग्रेट टेरर कम्स.

 
^ वर