संचित

आपल्याला रस्त्या मधून जाताना एखादा रोगाने त्रस्त असह्य भिकारी दिसतो, कोणाला जन्मताच असाध्य वेदना देणारा रोग असतो, कोणी अंबानीचा पोर असतो जो हजारो करोडोंचा मालक असतो कोणी राहुल गांधी जन्मताच एका साम्राज्याचा धनी असतो (पुढे ते टिकेल, नाही टिकणार तो मुद्दा सोडला तर) (अशी अजून टोकाची भरपूर उदाहरणे मिळतील).

ह्या पार्श्वभूमीवर चर्चेचा प्रस्ताव मांडलेला आहे.

१. संचित (हा जन्म व पुर्वजन्म) मानायचे का. नसेल तर वर वर्णन केलेली टोकाची परिस्थिती उपभोगण्याला कारणे कोणती. २. जे आस्तिक आहेत त्यांचे काय मत आहे (व काय उत्तर आहे ह्या टोकाच्या परिस्थितीवर).
३. जे धर्म पुर्वजन्म मानत नाहीत (क्रिस्त धर्म) त्यांचे काय उत्तर असेल.
४. अशी टोकाची परिस्थिती काहीच का उपभोगतात म्हणजे हे जर रँडमली (मराठी पर्यायी शब्द) होत असेल तर त्यांनाच का उपभोगायला लागते इतरांना का नाही. लॉटरी समजण्या सारखे सोपे आहे का इत्यादी.
५. शास्त्रीय समर्पक उत्तर आहे का ह्याला - की काहीच लोकांना का भोगायला लागतात हे भोग.

काही शब्दांच्या परिभाषा दिल्या आहेत.

संचित – मनुष्याने आजच्या क्षणा पर्यंत केलेले सर्व कर्म (त्या कर्मांच्या परिणामांचा साठा). त्याचे दोन भाग प्रारब्ध आणि अनारब्धकार्य.

प्रारब्ध (किंवा प्रारब्धकार्य) – संचितापैकी जेवढ्या कर्माची फळे भोगण्यास सुरवात झाली त्याला म्हणतात.

अनारब्धकार्य – ज्या कर्माची फळे भोगायला अद्याप सुरवात झाली नाहीत त्याला म्हणतात.

Comments

ज्या ज्या - त्या त्या

ज्या ज्या गोष्टींना उत्तर नाही त्या त्या गोष्टींना तुम्ही संचित म्हणता का?

ज्या ज्या गोष्टींना उत्तर नाही अशा सगळ्या नाही - आपला विषय ह्या आढळणा-या टोकाच्या परिस्थीतीवरचा आहे त्या मुळे अशा गोष्टींना संचित असे नाव.

नाही

ज्या ज्या गोष्टींना उत्तर नाही अशा सगळ्या नाही - आपला विषय ह्या आढळणा-या टोकाच्या परिस्थीतीवरचा आहे त्या मुळे अशा गोष्टींना संचित असे नाव.

"उत्तर नाही" असा तुमचा दावाच नाही. "पूर्वजन्मातील कृत्यांमुळे" हे तुमचे उत्तर आहे.

पूर्वजन्मातील कृत्यांमुळे

उत्तर नाही" असा तुमचा दावाच नाही. "पूर्वजन्मातील कृत्यांमुळे" हे तुमचे उत्तर आहे.

पूर्वजन्मातील कृत्ये हा संचिताच भाग - माझ्या कडे उत्तर आहे ज्यांना माहीत नाही अजुन त्यांना मी शब्द सुचवला

अपेक्षाच चूक

पूर्वजन्मातील कृत्ये हा संचिताच भाग - माझ्या कडे उत्तर आहे ज्यांना माहीत नाही अजुन त्यांना मी शब्द सुचवला

"असे उत्तर असू शकते" ही अपेक्षाच आम्ही चूक ठरवितो आहोत. "परिस्थितीमागे काहीतरी नियम असेल पण आपल्याला माहिती नाही" असे नाही. "नियमच नाही" हे बर्‍यापैकी खात्रीलायक उत्तर आहे (अन्यथा, "उद्या सूर्य उगवेल" याचीही १००% खात्री नसते).

नियमच नाही

"असे उत्तर असू शकते" ही अपेक्षाच आम्ही चूक ठरवितो आहोत. "परिस्थितीमागे काहीतरी नियम असेल पण आपल्याला माहिती नाही" असे नाही. "नियमच नाही" हे बर्‍यापैकी खात्रीलायक उत्तर आहे (अन्यथा, "उद्या सूर्य उगवेल" याचीही १००% खात्री नसते).

ब-यापैकी खात्रीलायक - म्हणजेच खात्रीलायक नाही आणि हे सगल्यांना माहित आहे की काही गोष्टींना उत्तर नाहीत. त्या काही गोष्टी इथे जो विषय आहे त्यात प्रारब्ध येते.

नाही

ब-यापैकी खात्रीलायक - म्हणजेच खात्रीलायक नाही

म्हणूनच, मी त्याची "उद्या सूर्य उगवेल" याच्या खात्रीशी तुलना केली.

आणि हे सगल्यांना माहित आहे की काही गोष्टींना उत्तर नाहीत. त्या काही गोष्टी इथे जो विषय आहे त्यात प्रारब्ध येते.

"उत्तर नाही" आणि "उत्तर आहे पण माहिती नाही" यांत फरक आहे. तुम्ही "उत्तर आहे पण माहिती नाही" असे सांगत आहात. आम्ही म्हणतो की "काही लोकांचे चांगले होते आणि काहींचे वाईट त्यामागे काहीही उत्तर नाही, निव्वळ लॉटरी आहे".

कारणे

खुलाश्या बद्दल धन्यवाद.

ज्या गोष्टींची कारणे माहित आहेत त्यांना तुम्ही संचित म्हणणार नाहीत असे समजले.

आईवडिलांमुळे (आनुवंशिकतेने) येणारे काही असाध्य आजार यांची कारणे आज विज्ञानाला माहित आहेत. आणि यातील कित्येक टोकाची उदाहरणे असू शकतात. या आजारांचे कारण तुम्ही संचित म्हणणार नाही असे धरून चालतो.

बरोबर आहे?

प्रमोद

काहीतरीच बुवा सहस्रबुद्धे साहेब.

हॅ हॅ हॅ.

साफ चूक.

त्या व्यक्तीचे संचित (का काय असेल ते) खराब होते म्हणून त्याच्या आई-वडिलांना ते दोष होते आणि त्याच्यात ते उतरले.
किंवा त्याचे संचित तसे होते म्हणून डिफेक्ट असलेला शुक्राणु स्त्रीबीजाशी संयोग पावला.(किंवा संयोगानंतर डिफेक्ट निर्माण झाला).

अजून एक थिअरी मांडता येईल. जेव्हा बीज/शुक्राणु संयोग होतो तेव्हा त्या गर्भात आत्मा नसतो. याचा (वाईट संचित असलेल्याचा) आत्मा भटकत असतो तो असा डिफेक्टिव्ह गर्भ शोधून त्यात प्रवेश करतो.

:-)

नितिन थत्ते

ग्राह्य

अजून एक थिअरी मांडता येईल. जेव्हा बीज/शुक्राणु संयोग होतो तेव्हा त्या गर्भात आत्मा नसतो. याचा (वाईट संचित असलेल्याचा) आत्मा भटकत असतो तो असा डिफेक्टिव्ह गर्भ शोधून त्यात प्रवेश करतो.

ते लोक असेच सांगत असावेत.

छान चर्चा चालली आहे

आत्मा असतो का. मानता का. शास्त्राला शोधता आलाय का.
आत्मा, प्राण, मन, बुद्धी ह्यांचा एकमेकांशी संबंध काय आहे. आत्मा कोठे असतो यायला. खरेच एक गोष्ट दुस-याशी निगडीत असते का (ह्या संदर्भात)

http://rashtravrat.blogspot.com

संचित

जे जे लिहिले संचिति|ते ते न चुके कल्पांति|| असे तुकाराम महाराजांनि आपल्या अभंगात म्हटले आहे. आपण श्रीमद्भगवतगीता हा आपला धर्म ग्रंथ आहे. त्यामधे हि संचित मान्य केले आहे.

विनोदी प्रतिसाद

2010 मधील सर्वात विनोदी प्रतिसाद श्री योगेश पारठे यांचा आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन

चन्द्रशेखर

 
^ वर