एक कोडे

एक मोठा आयत अनेक छोट्या आयतांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक छोट्या आयताच्या कमीत कमी एका बाजूची लांबी पूर्णांक एककात आहे.

यावरून मोठ्या आयताच्या कमीत कमी एका बाजूची लांबी पूर्णांक एककात आहे हे कसे सिद्ध करता येईल?

कृपया उत्तरे व्यनिने कळवावीत. कोड्यासंबंधीचे प्रश्न येथे विचारावेत. धन्यवाद.

Comments

अपडेट

राजेश घासकडवी आणि रिकामटेकडा यांच्या साहसी प्रयत्नांबद्दल अनेक आभार. परंतु दोन्ही सिद्धता अचूक नाहीत असे आता सिद्ध झाले आहे.

__________
रिकामटेकडा यांचे उत्तरही बरोबर आहे. राजेश व त्यांची पद्धत जरी निराळी असली तरी अंततः तर्क एकसारखाच आहे.

_____________
राजेश घासकडवी यांचे उत्तर बरोबर आहे. त्यांनी दिलेली सिद्धता अतिशय खुबीदार आहे.

रिकामटेकडा यांनी 'प्रुफ बाय काँट्रॅडिक्शन' पद्धत वापरलेली आहे. त्यांची सिद्धता समजावून घेण्यास थोडासा विलंब होत आहे.

________________
आत्तापर्यंत रिकामटेकडा आणि राजेश घासकडवी यांची उत्तरे आलेली आहेत. दोन्ही उत्तरांमध्ये वेगवेगळ्या पद्धती वापरलेल्या आहेत. उत्तरे समजावून घेत आहे.
_______________

गुगलवर शोध घेतल्यास कोड्याचे उत्तर सापडते, असे एक उपक्रमी कळवतात. तो पर्याय उपलब्ध असूनही न वापरता कोडे सोडवण्याचा प्रयत्न करावा ही विनंती. ज्या सदस्यांनी गुगलवर उत्तर शोधले आहे त्यांना तिथे दिलेल्या तीन उत्तरांऐवजी दुसरी पद्धत शोधून कोड्याचा आनंद घेता येईल.
_____
डोन्ट आस्क डोन्ट टेल

उत्तर केव्हा द्यावे?

कोड्याचे उत्तर केव्हा द्यावे याविषयी विचार करतोय. कोडे सोडवणार्‍यांपैकी ज्यांना अधिक अवधी हवा असेल त्यांनी कृपया व्यनिने कळवावे. भारतीय प्रमाणवेळ दिनांक १४ डिसेंबर (मंगळवार) रात्री ११:३० पर्यंत अवधीसाठी निरोप न आल्यास उत्तर प्रसिद्ध केले जाईल.
______________________
हिंट?

२४ तासाहून अधिक वेळ होऊनही कोड्याचे एकही उत्तर आलेले नाही.

सोमवारी हिंट द्यावी असा विचार करतोय.

_____
डोन्ट आस्क डोन्ट टेल

प्रश्न

छोटे आयत मोठ्या आयतांशी प्रपोर्शनल आहेत का? आणि सर्व छोटे आयत समान आकाराचे आहेत का?

नितिन थत्ते

नाही

१. छोटे आयत मोठ्या आयतांशी प्रपोर्शनल आहेत का?

नाही.
('सर्व आयत मोठ्या आयताशी प्रपोर्शनल आहेत' याचा अर्थ मी सर्व छोटे आयत हे मोठ्या आयताची छोटी प्रतिमा आहेत असा घेत आहे.)

२. सर्व छोटे आयत समान आकाराचे आहेत का?

नाही.
(अर्थातच नाही. तसे असल्यास कोड्यात काहीच मजा राहणार नाही.)

____
डोन्ट आस्क डोन्ट टेल

उत्तरे

कोड्यात विचारलेली सिद्धता इंडक्टिव रिजनिंग वापरून करून दाखव असे मला सांगण्यात आले होते. इंडक्टिव नसलेले उत्तरही कोड्याबरोबरच होते. मी तशी सिद्धता अजुनही देऊ शकलेलो नाही पण प्रयत्न सुरू आहेत.

राजेश घासकडवी यांचे उत्तर
मोठ्या आयताचं एक टोक घ्या. (समजा डावीकडचं खालचं) तिथे एका छोट्या आयताचं टोक असेल. त्याची एक बाजू पूर्णांकात असेल. समजा डावी उभी बाजू. त्या बाजूने वरपर्यंत जा. जिथे असाल तिथून खालचा संपूर्ण आयत कापून टाका. (ती जर खालची आडवी बाजू असेल तर उजवीकडे जा व डावीकडचा संपूर्ण आयत कापून टाका) आता तुम्ही पुन्हा नवीन मोठ्या आयताच्या डावीकडच्या खालच्याच टोकावर असाल. पुन्हा हीच प्रक्रिया करा. असं करत गेलात तर शेवटी राहाणाऱ्या आयत हा मूळ आयताच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातला आयत असेल किंवा त्याचा पूर्णांकात एक बाजू कापलेला भाग असेल. अर्थातच उरलेल्या आयताची एक बाजू पूर्णांकात असेल. तेव्हा तुम्ही मूळ आयताच्या दोन्ही बाजूंतून फक्त पूर्णांक वजा केल्यामुळे एक बाजू तरी पूर्णांकात आहे हे सिद्ध होतं.

रिकामटेकडा यांचे उत्तर
दोन्ही बाजू अपूर्णांक असलेला मोठा आयत असतो असे गृहीत धरू. त्यातील सर्व आयतांच्या पूर्णांक बाजूंना एक-एक एकक अंतरावर कापून १ जाडीच्या झिरमिळ्या बनवू. आता कोणत्याही एका कोपर्‍यातील झिरमिळी काढून टाकू. त्या आयताची एक संपूर्ण बाजूभर तिची लांबी असेल तर प्रश्नच नाही. नसेल तर, तिच्यापुढे, मोठ्या आयताची लांबी बनविणार्‍या काही समांतर झिरमिळ्या असतील तर काही लंबरूप. तिच्या 'पुढे असलेल्या' सर्व समांतर झिरमिळ्या काढून टाकू. लंब झिरमिळ्यांतून १x१ आकाराचे चौरस कातरू. अशा प्रकारे मूळ आयतातून आपण १ जाडीची एक पट्टी कातरली आहे. मूळ आयतातील प्रत्येक आयताची एक बाजू पूर्णांक असेल तर नव्या आयतातील प्रत्येक आयताची एक बाजू पूर्णांक असेलच (कारण तोही केवळ मूळ आयतातून उरलेल्या झिरमिळ्यांचाच बनला आहे) आणि जुन्या आयतातून पूर्णांक जाडी कातरलेली असल्यामुळे नवा आयतही अपूर्णांकxअपूर्णांक असाच असेल. परंतु त्यात किमान एक झिरमिळी कमी आहे. असे करताकरता आयतातून एकएक झिरमिळी कातरता येईल आणि शेवटी एकच झिरमिळी उरेल. परंतु असा आयत अपूर्णांकxअपूर्णांक असणे शक्यच नाही (कारण झिरमिळीची जाडी पूर्णांक आहे). QED.

दुवा*
या दुव्यावर कोड्याची तीन उत्तरे आहेत.

*उपक्रमी रिकामटेकडा यांचे दुव्याबद्दल आभार.

_____
डोन्ट आस्क डोन्ट टेल

शंका

राजेश घासकडवी यांचे उत्तर
मोठ्या आयताचं एक टोक घ्या. (समजा डावीकडचं खालचं) तिथे एका छोट्या आयताचं टोक असेल. त्याची एक बाजू पूर्णांकात असेल. समजा डावी उभी बाजू. त्या बाजूने वरपर्यंत जा. जिथे असाल तिथून खालचा संपूर्ण आयत कापून टाका. (ती जर खालची आडवी बाजू असेल तर उजवीकडे जा व डावीकडचा संपूर्ण आयत कापून टाका) आता तुम्ही पुन्हा नवीन मोठ्या आयताच्या डावीकडच्या खालच्याच टोकावर असाल. पुन्हा हीच प्रक्रिया करा. असं करत गेलात तर शेवटी राहाणाऱ्या आयत हा मूळ आयताच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातला आयत असेल किंवा त्याचा पूर्णांकात एक बाजू कापलेला भाग असेल. अर्थातच उरलेल्या आयताची एक बाजू पूर्णांकात असेल. तेव्हा तुम्ही मूळ आयताच्या दोन्ही बाजूंतून फक्त पूर्णांक वजा केल्यामुळे एक बाजू तरी पूर्णांकात आहे हे सिद्ध होतं.

हे पटले नाही. समजा, पायरी १ मध्ये आपण डाव्या उभ्या बाजूने वर गेलो, आयत कापला. पायरी २ मध्ये आपण खालच्या आडव्या बाजूने उजवीकडे गेलो आणि आयत कापला. आता, पायरी ३ साठी कोपर्‍यात असलेला आयत मुळात पहिल्या पायरीच्या कापाकापीत अपूर्णांकच उरला असेल तर?

प्रयत्न

आडवी बा़जू असल्यास उभे कापायचे. उभी असल्यास आडवे कापायचे. तसे केल्यास कायमच डाव्या कोपर्‍यात पूर्ण आयत असेल.

खुलासा

तसे नव्हे, समजा पहिल्या पायरीच्या कोपर्‍यातील आयत ०,० येथे सुरू होऊन ०,१० येथे संपतो. म्हणून पहिल्या पायरीत y=१० येथे कात्री चालेल. दुसर्‍या पायरीत x=३ येथे कापले असे समजू. परंतु, तिसर्‍या पायरीतील आयत ३,२.७१ येथे सुरू होऊन ३, १५.७१ येथे संपत असेल (आणि त्याची उभी बाजू हीच पूर्णांक असेल) तर पहिल्या कात्रीनंतर त्याची उंची ५.७१ अशी उरेल.

पुन्हा बघू

(०,०) ते (०,१०) आयत
पहिल्या कात्रीनंतर
(०,१०) ते (३,१०+some unknown number) आयत
दुसर्‍या कात्रीनंतर
(३,१०+some unknown number) ते (३+some unknown number,१०+some unknown number+some unknown number)

तेव्हा तिसर्‍या आयताचा कोपरा (३,१०) कोऑर्डिनेटच्या खाली असू शकत नाही.

_____
डोन्ट आस्क डोन्ट टेल डोन्ट आस्क डोन्ट टेल डोन्ट आस्क डोन्ट टेल डोन्ट आस्क डोन्ट टेल
डोन्ट आस्क डोन्ट टेल
डोन्ट आस्क डोन्ट टेल
डोन्ट आस्क डोन्ट टेल
डोन्ट आस्क डोन्ट टेल

तरीही

तिसर्‍या आयताचा कोपरा (३,१०) कोऑर्डिनेटच्या खाली असू शकत नाही.

होय, तिसर्‍या पायरीच्या सुरुवातीला तिसर्‍या आयताचा कोपरा (३,१०) येथेच असेल परंतु पहिल्या पायरीच्या सुरुवातीला तो (३,२.७१) येथेपर्यंत असू शकेल. तिसर्‍या आयताची खालची बाजू पहिल्या आयताच्या वरच्या बाजूपेक्षा कमी पातळीवर सुरू होऊ शकते.
उदा., न्यू मेक्सिको हा पहिला आयत, कोलोरॅडो हा दुसरा आयत आणि 'कॅन्सास + त्याच रुंदीची ओक्लाहोमा/टेक्सास यांची थोड्या उंचीची पट्टी' हा तिसरा आयत असेल तर पहिल्या पायरीनंतर तिसर्‍या आयतातील केवळ कॅन्सासच शिल्लक राहील!

तथ्यांश

अधिक विचार करता तुम्ही म्हणता तसा कोपर्‍यात अपूर्ण (काही भाग कापला गेलेला) आयत असणे शक्य आहे. पण तरीही शेवटचा रिजल्ट तसाच राहील असे माझे प्रायमा फेसी मत आहे. विचार करतो आहे.

____________
कोपरा
प्रत्येक कोपर्‍यातील आयत हा संपूर्णच असेल. त्याचा कुठलाही भाग कापण्याच्या प्रक्रियेत कापला जाणार नाही. टंकून हे आर्ग्युमेंट करणे कठीण जात आहे.

सहमत

ज्या प्रमाणे श्री. राजेश घासकडवी यांचे येथे उत्तर दिलेले आहे, मला ते तर्कशुद्ध म्हणून समजलेले नाही.

उत्तर

राजेश घासकडवींचे उत्तर जसेच्या तसेच येथे दिलेले आहे.

...मला ते तर्कशुद्ध म्हणून समजलेले नाही.

उत्तर अपूर्ण आहे असे माझे मत मी राजेश यांना कळवल्याचे स्मरते. काही बदल केल्यास ही सिद्धता परिपूर्ण होईल असा माझा अंदाज आहे. तुम्हाला काही शंका असल्यास कृपया त्या नोंदवाव्यात. मी माझ्या परीने त्यांच्यावर विचार करीन. राजेश यांनाही शंकांचे निरसन करण्याची विनंती करत आहे.

_____
डोन्ट क्रिटिसाइज व्हॉट यु डोन्ट अंडरस्टँड

एक अंदाज

श्री. घासकडवी म्हणतात त्याच्याऐवजी "एक"या एककाची झिरमिळी कुठल्याही कोपर्‍यातून कापावी, आणि उरलेले छोटे आयत - कापलेले का असेनात - पूर्वीसारखेच आहेत (एक बाजू पूर्णांक, तर एक अपूर्णांक) असे सिद्ध करावे. हे श्री. घासकडवी यांनी स्पष्ट सिद्ध केलेले नाही. बहुधा त्यांना सिद्धता स्पष्ट दिसते आहे.* जर असे असेल, तर मग इन्डक्शनने बाकी सर्व सिद्ध होते. कोपर्‍याच्या आयताच्या पूर्णांक बाजूचा एक पूर्णांक काढला तर शुद्ध इंडक्शन, नाहीतर नुसत्याच झिरमिळ्या काढल्या रेडुक्टियो. (असे वाटते.)
- - -
माझ्या मते पूर्णांक-अपूर्णांक आयतांऐवजी रॅशनल-इर्रॅशन आयत असले तरी हेच कोडे लिहिता येते. अधिक सामान्यीकृत होते. कोडेही खरे तर तेच आणि सिद्धताही तीच आहे.

- - -
*मात्र याची असिद्धता मी आताच स्वतःसाठी पडताळून बघितली आहे. म्हणजे श्री. घासकडवी यांची पद्धत बहुधा चूक आहे.

अंशत: सहमत

श्री. घासकडवी म्हणतात त्याच्याऐवजी "एक"या एककाची झिरमिळी कुठल्याही कोपर्‍यातून कापावी, आणि उरलेले छोटे आयत - कापलेले का असेनात - पूर्वीसारखेच आहेत (एक बाजू पूर्णांक, तर एक अपूर्णांक) असे सिद्ध करावे. हे श्री. घासकडवी यांनी स्पष्ट सिद्ध केलेले नाही.

सहमत. हा लेमा सुरूवातीला सिद्ध करायला हवा.

मात्र याची असिद्धता मी आताच स्वतःसाठी पडताळून बघितली आहे. म्हणजे श्री. घासकडवी यांची पद्धत बहुधा चूक आहे.

एक एककापेक्षा अपूर्णांक बाजू लहान असलेल्या केससाठी (इतर केसेसही असू शकतील.) लेमा लागू नाही. परंतु छोट्या आयतांच्या बाजू अपूर्णांक, पूर्णांक अशा नोंदवून ठेवल्यास अडचण होऊ नये.

_____
डोन्ट क्रिटिसाइज व्हॉट यु डोन्ट अंडरस्टँड

त्याच तर कळीच्या पायर्‍या

एक एककापेक्षा अपूर्णांक बाजू लहान असलेल्या केससाठी (इतर केसेसही असू शकतील.) लेमा लागू नाही.

एका एककापेक्षा जास्त मितीचेच आयत जर झिरमिळीत कापले जाणार असतील तर लेमा इतका सहज-सिद्ध आहे, की त्याबद्दल श्री. घासकडवी यांना मी दोष देणे योग्य ठरले नसते.

मात्र झिरमिळ्या कापता-कापता एक एककापेक्षा कमी मिती असलेले आयत निर्माण होणारच. त्यामुळे अशा पायर्‍यांसाठी लागू लेमा हवा, हे कळीचे. अशा परिस्थितीमध्ये झिरमिळी कापली तर उरलेले आयत "बिघडू" शकतात - हे सिद्ध करता येते.

(छोट्या आयतांच्या बाजू नोंदवल्यामुळे काय फरक पडतो, ते मला कळलेले नाही.)

खुलासा

बाजू नोंदवल्याने फक्त पूर्णांक बाजू असलेल्या भागानुसार कापता येईल.

दुसरे म्हणजे सर्व आयतांमध्ये लघुत्तम बाजूच्या लांबीपेक्षा लहान पूर्णांक एकक वापरल्यास अडचण दूर होईल. (असे वाटते.)

_____
डोन्ट क्रिटिसाइज व्हॉट यु डोन्ट अंडरस्टँड

दुसरी, तिसरी झिरमिळीसुद्धा कापायची आहे ना?

दुसरी, तिसरी झिरमिळीसुद्धा कापायची आहे ना?

प्रत्येक झिरमिळीनंतर एकक पुन्हा ठरवायचे - लघुतम मितीपेक्षा लहान - म्हटले, तर दर थोड्या झिरमिळीनंतर एकक लहान होत जाईल. कातरायची प्रक्रिया संपायची शाश्वती नाही. (नॉट गॅरंटीड टु टर्मिनेट.)

एकक एकदा सुरुवातीला कोडे सोडवण्यापूर्वी ठरवले (खरे तर एकक काय ते गृहीत म्हणून दिलेले असते, ठरवता येत नाही), बदलले नाही, तर काही झिरमिळ्या कापल्यानंतर एककापेक्षा कमी मिती असलेली झिरमिळी आपोआप तयार होऊ शकते.

टर्मिनॅलिटी

सुरूवातीला ठरवलेले एकक कापतांना बदलायचे नाही हे तर आहेच.

टर्मिनॅलिटी सिद्ध करायला हवी.

राजेश यांची पद्धत चूकीची आहे, असा निष्कर्ष मी काढू शकलेलो नाही. छोटे-मोठे बदल सूचवून नवीन प्रश्न मात्र निर्माण होत आहेत.

_____
डोन्ट क्रिटिसाइज व्हॉट यु डोन्ट अंडरस्टँड

शंका

उरलेले छोटे आयत - कापलेले का असेनात - पूर्वीसारखेच आहेत (एक बाजू पूर्णांक, तर एक अपूर्णांक) असे सिद्ध करावे.

अपूर्णांक बाजूची लांबी कापल्यानंतर पूर्णांक होऊ शकते, हे सिद्ध करता येते पण कॉन्वर्स पण सिद्ध करता येते का? (मला जमलेले नाही.)

_____
डोन्ट क्रिटिसाइज व्हॉट यु डोन्ट अंडरस्टँड

?

?
माझे उद्धृत वाक्य आणि तुमच्या शंकेचा संबंध कळला नाही.

माझे उद्धृत वाक्य मी असिद्ध केलेलेच आहे. (बाय कन्स्ट्रक्शन.) म्हणून तुमची शंका कळलेली नाही.

=

एक बाजू पूर्णांक, तर एक अपूर्णांक अशा आयताच्या कापल्यानंतर दोन्ही बाजू पूर्णांक हा बदल होऊ शकेल, हे सिद्ध करता येते. दोन्ही बाजू अपूर्णांक होतील हे सिद्ध करता येते का?

_____
डोन्ट क्रिटिसाइज व्हॉट यु डोन्ट अंडरस्टँड

पट्टी कापण्याचे वेगवेगळे पर्याय

मूळचा छोटा आयत जर कापलेल्या पट्टीपेक्षा मोठा असेल, आणि जर तो आयत मोठ्या आयताच्या कडेला असेल, तर उरलेला आयत "एक बाजू पूर्णांक, एक बाजू अपूर्णांक" असाच राहील.

जर कापण्यापूर्वी छोटा आयत मोठ्या आयताच्या कडेला नसेल, तरी तो झिरमिळीत कापला जाऊ शकतो. हे कधी होईल? कडेचा आयत एका-एककापेक्षा कमी रुंदीचा असा पातळ असेल तर असे होऊ शकते. अपूर्णांक एका एककापेक्षा कमी असू शकतो...

म्हणजे त्या कडेच्या आयताच्या वर काही "क्ष"<१ इतकी रुंद पट्टी कापली जाईल. क्ष हा अपूर्णांक आहे, हे आलेच. हा भाग त्या कडेच्या पातळ आयताच्या "आतल्या" आयतामधून कापला जाईल. (without loss of generality, या आयताची कापलेली मिती >क्ष इतकी असू दे. या आयताची मिती लहान असेल, य<क्ष, तर त्याहून आतल्या आयतातून क्ष-य इतका भाग कातरला जाईल. त्याचा विचार करू शकतो. तर्क तोच.)

या "आतल्या" आयताचा विचार करूया.
१. याची कापली जाणारी मिती पूर्णांक असेल, तर दुसरी मिती अपूर्णांकात असेल - गृहीतकच आहे. पूर्णांक मितीमधून क्ष पट्टी कातरली, तर दोन्ही मिती अपूर्णांक झाल्या.
२अ. याची कापली जाणारी मिती पूर्णांक+क्ष इतकी असेल (म्हणजे अपूर्णांक), तर त्याची दुसरी मिती पूर्णांकात असेल. याच्यामधून क्ष पट्टी कातरली, तर उरलेल्या आयताच्या दोन्ही मिती पूर्णांक होतात.
२आ. कापली जाणारी मिती अपूर्णांक असेल, मात्र हा अपूर्णांक ><पूर्णांक+क्ष असेल, तर त्या आयताची दुसरी मिती पूर्णांकात असेल. क्ष रुंदीची पट्टी कापली तरी एक मिती पूर्णांक, एक मिती अपूर्णांक अशी राहील.

मात्र १, किंवा २अ मुळे प्रयोजित लेमा असिद्ध होतो. तो लेमा नसल्यामुळे पूर्णच सिद्धता बाद होते.

समजले नाही

आकृत्यांशिवाय तुमचा प्रतिसाद समजणे अवघड होत आहे. 'कडेचा आयत' आणि 'आतला आयत' यात माझा गोंधळ होत आहे.

जर कापण्यापूर्वी छोटा आयत मोठ्या आयताच्या कडेला नसेल, तरी तो झिरमिळीत कापला जाऊ शकतो.हे कधी होईल? कडेचा आयत एका-एककापेक्षा कमी रुंदीचा असा पातळ असेल तर असे होऊ शकते.

निळ्या आणि लाल अक्षररंगातील आयत एकच आहेत की वेगळे आहेत?

_____
डोन्ट क्रिटिसाइज व्हॉट यु डोन्ट अंडरस्टँड

वेगळे आहेत

वेगळे आहेत.
निळ्या रंगाचा आयत पट्टी कापण्यापूर्वी कडेला नाही. लाल रंगाचा आयत पट्टी कापण्यापूर्वी कडेला आहे. मात्र पट्टीची रुंदी लाल रंगाच्या आयतापेक्षा मोठी आहे. (पट्टीची रुंदी १ एकक आहे. लाल रंगाच्या आयताची कडेपासून पर्पेंडिक्युलर मिती १ एककापेक्षा कमी अशा पूर्णांकाची आहे.)

चित्र काढण्याबाबत बघतो... चित्र काढायचे, त्याचा जेपेग बनवायचा, फ्लिकरवर चढवायचा, त्याचा दुवा द्यायचा... सगळ्या प्रकाराचा थोडा कंटाळा येतो.

सापडला

अपूर्णांक-अपूर्णांक असा आयत दिसला आहे.

__________________
घोडे कुठे आडते आहे?

माझे घोडे कुठे आडले आहे ते प्रथम स्पष्ट करतो. फक्त पूर्णांकच कापले जात आहेत तर पूर्णांक अपूर्णांक कसा होईल?

तुम्हाला अधिक त्रास देण्याची इच्छा नाही. म्हणून मी विविध केसेसचा पुन्हा एकदा विचार करतो आहे. अजून थोडा प्रयत्न केल्यास तुमचा प्रतिसाद कळावा अशी अपेक्षा आहे.

_____
डोन्ट क्रिटिसाइज व्हॉट यु डोन्ट अंडरस्टँड

पुस्तकातल्या सिद्धता वाचल्या

पैकी दुसरी सिद्धता झिरमिळ्या कापणारी आहे. परंतु एका एककाच्या नव्हे, तर ०.५ एककाच्या झिरमिळ्या कापल्या जात आहेत! अतिशय सुंदर.

हे कोडे क्षेत्रफळाच्या हिशोबानेच सुटणारे आहे, अशी माझी आधीची अटकळ मी सांगून टाकतो. (त्या अटकळीनंतर सिद्धता केली नाही, म्हणजे काय? अटकळ बापुडी केवळ वारा.) पण क्षेत्रफळाचे सांख्यिक वैशिष्ट्य काय हे मला समजत नव्हते. पुस्तकातील दुसर्‍या सिद्धतेने ती गोम ओळखली. मोठी डौलदार सिद्धता आहे!

आणि माझी आदली चूक दुरुस्त करतो : रॅशनल-इर्रॅशनल-आयत हे या पूर्णांक कोड्याचे विशेष आणि मर्यादित रूप आहे. कोडे पूर्णांकाच्या हिशोबातच अधिक व्यापक आणि विलोभनीय आहे.

बरोबर, पण...

माझी सिद्धता चुकली आहे अशी अधूनमधून शंका येत होती. विशेषतः कोपरा तोच ठेवणं हे अधिकच मर्यादा घालणारं आहे. त्यात आयत कापून टाकला की उरलेल्या सर्व आयतांना अपूर्णांक - पूर्णांक बाजू असतील हे सिद्ध करावं लागेल. किंबहुना तसं होणार नाही याची काही उदाहरणं कल्पना करता येतात.

मी अजून दुव्यावर जाऊन उत्तरं बघितली नाहीत, माझं उत्तर अपूर्ण आहे याची खात्री पटली आहे. पण हाच प्रश्न रिकामटेकडा यांच्या सिद्धतेबद्दल देखील विचारता येतो. आख्खा आयत कापला काय आणि झिरमिळ्या कापल्या काय -दोन्ही पद्धती एकच तत्व वापरतात. (पूर्णांकाऐवजी प्रत्येक छोट्या आयताची एक बाजू १ लांबीची आहे असं म्हटलं तरी कोड्यात फारसा फरक पडत नाही. त्या स्पेशल केसला रिटेंची व माझी पद्धत समान होते) एका रेषेतल्या आयतांच्या एककाच्या झिरमिळ्या कायमच ओव्हरलॅप होतील असं नाही. अशी वेळ येऊ शकेल की आडवी झिरमिळी कापता येणार नाही कारण उभ्या 'रेषे'तल्या आयतांची उंची एकपेक्षा कमी अपूर्णांकाची असू शकेल. जाड स्वस्तिक सामावून घेणाऱ्या आयताची (खरं तर चौरसाची) कल्पना करा. मधले रिकामे चौकोन ५ बाय ५ चे आहेत. अगदी मधला चौरस १ बाय १ चा आहे. स्वस्तिकाच्या कोपऱ्यातले चार हातांचे आयत ५ बाय ०.५ आहेत. मग सलग झिरमिळी कशी कापणार? मुळात अशा झिरमिळ्या कापताना मोठ्या आयताची लांबी (वा रुंदी) स्पॅन करणारी (सलग नसली तरी चालेल) अशी झिरमिळी शोधता येते हे सिद्ध करायला हवं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

होय

तुम्ही म्हणता तसे असावे. मी अजून रिकामटेकडा यांच्या सिद्धतेचा विचार केलेला नाही. एका कटाक्षात झिरमिळ्या कशा कापल्या आहेत ते लक्षात आलेले नाही. म्हणून त्या सिद्धतेवर मी टिप्पणीही केलेली नाही :-)

हे कोडे थेट सिद्धतेपेक्षा रेडुक्टियो पद्धतीस आमंत्रण देणारे आहे. पण थेट पद्धत समजायला (आणि चुका काढायलाही :-D -- ) सोपी असते. म्हणून तुमची सिद्धता आधी बघितली.

आता रिकामटेकडा यांची सिद्धता समजायचा प्रयत्न करतो...

मान्य

माझी सिद्धता तुम्ही सांगता तशी चुकलेली आहे.
"गणितातही ठाम सत्य असे काही नसते" असे ठामपणे म्हणता येते काय? ;)

चित्र

हा प्रतिसाद "का" यांना आहे. तिरक्या प्रतिसादात चित्र मावणार नाही, म्हणून वेगळा प्रतिसाद लिहिला आहे. येथे चित्र बघावे :

aaa

राखेच्या रंगाचा मोठा आयत आहे. विशेष लक्ष कातरल्या जाणार्‍या पट्टीकडे द्यायचे आहे. आणि त्या पट्टीचा प्रभाव पडणारे वेगवेगळ्या प्रकारचे छोटे आयत दाखवलेले आहेत. आधीचे गडद निळे आयत छाटले जाऊन फिकट निळे आयत उर्वरित आहेत. पूर्णांक एकक रुंदीची पट्टी कापली जात आहे. लाल आयत असा आहे, की त्याची पट्टीच्या रुंदीतली मिती पट्टीच्या रुंदीपेक्षा कमी आहे. पट्टीत तो आयत पुरता कातरून बाजूला पडतो.

स्पेशल केस १ एकक रुंदीची मानावी. स्पेशल केसचे वैशिष्ट्य असे, की कातरलेल्या पट्टीपेक्षा अरुंद पट्टी ही अपूर्णांक मितीचीच असते. पूर्णांक मितीचा लाल आयत असला तर चित्र तुमचे तुम्ही काढा... कंटाळवाणे आहे :-) छो१ आणि छो२ आयतांच्या उदाहरणापेक्षा काही वेगळे नाही. छो१ आणि छो२ यांच्या आणि कडेच्या मध्ये पूर्णांक "०" रुंदीचा आयत आहे, ही स्पेशल केस समजली तर ते बिगरशून्य पूर्णांक रुंदीच्या लाल आयताचे गणित सोपे-स्पष्ट आहे, हे लक्षात येईल, आणि मला आणखी उपचित्रे काढली नाहीत, ते समजून घेऊन माफ कराल.

धन्यवाद

अपूर्णांक-अपूर्णांक सापडणे फारसे कठीण नव्हते. अपूर्णांकाच्यावर बसलेला पूर्णांक तरळत नव्हता. तो शेवटी चित्र पाहण्यापुर्वीच तरळला.

चित्र विलक्षण आकर्षक झाले आहे.

_____
डोन्ट क्रिटिसाइज व्हॉट यु डोन्ट अंडरस्टँड

अपडेट २

कोड्यावर समरसून झालेल्या चर्चेबद्दल धनंजय, रिकामटेकडा, घासकडवी आणि नितिन थत्ते यांचा ऋणी आहे. घासकडवी आणि रिकामटेकडा यांची उत्तरे कल्पक होती परंतू काही स्पेशल केसेसमध्ये ही वरवर पटू शकणारी उत्तरे अचूक नव्हती. त्यांच्या उत्तरात बदल करून सिद्धता होत असल्यास मला विशेष आनंद होईल पण मला तो प्रयत्न सोडून द्यावा लागत आहे. धनंजय यांनी फलदायी चर्चेसाठी केलेले सचित्र प्रयत्न विशेष कौतुकण्यासारखे आहेत. दोन्ही उत्तरे तपासतांना मी सखोल विचार केला नाही त्याबद्दल क्षमस्व.

_____
डोन्ट क्रिटिसाइज व्हॉट यु डोन्ट अंडरस्टँड

अचूक उत्तर

काल वाचताना ही उत्तरे चुकल्याचे जाणवत होते. पण प्रत्यक्षात चित्र काढल्याशिवाय ते सिद्ध करता येत नव्हते.
दुव्यावरील उत्तरे/सिद्धता रिडिक्युलस वाटली. (फारशा खोलात न जाता.) रात्री त्याचे उत्तर सुचले माझ्या मते या उत्तरात कुठेही चूक नाही.

पद्धतः मोठा आयत हा दोन अपूर्णांक संख्यांनी बनलेला आहे हे अशक्य आहे असे सिद्ध करणे.
गृहितक: सर्व आकडे हे पूर्णांक वा पूर्णांकाच्या विभाजनाने बनली (रॅशनल) आहेत. (इरॅशनल संख्यांची सिद्धता कदाचित जास्त सोपी असावी. पण येथे तो विचार नाही.)
(संगणकाच्या भाषेत त-न आणि त्यांचे विभक्ति प्रत्यय पूर्णांक आहेत. क ते ग हे नेहमीच अपूर्णांक आहेत. तर च-झ हे इरॅशनल?)

पहिल्यांदा मोठा आयताची लांबी आणि रुंदी समजा त+क आणि थ+ख आहे असे समजू.
हा आयत न विविधांगी आयतांनी बनलेला आहे असे समजू.

आता न विविधांगी आयतांचे तुकडे करायचे आहेत. हे तुकडे अशा रितीने करायचे आहेत की सर्व आयतांचे सर्व तुकडे सारखे असतील.
हे सहज शक्य आहे.
पहिल्यांदा पूर्णांकांना एककात तुकडे पाडा.

आता समजा ग गा... असे अपूर्णांक उरलेले अपूर्णांक आहेत. त्यांच्या विभाजकांचा लसावि काढा. हा लसावि समजा द आहे. तर १/द या आकाराचे सर्व अपूर्णांकाचे तुकडे पाडता येतात.
(हे आकडे देऊन समजवत नाही. पण बहुदा स्वाभाविक वाटावे.)

आता न विविधांगी आयतांचे ना तुकडे पडले (एन वन लिहिण्यापेक्षा हे जास्त सोपे आहे.) प्रत्येक तुकड्याची लांबी १ तर रुंदी १/द असेल.

या न विविधांगी आयतांचे क्षेत्रफळ ना एकरूप आयतां एवढे असेल म्हणजे ना/द.

आता मोठ्या आयताकडे जाऊ.
मोठ्या आयताचा जो क आणि ख भाग आहे तो स्वाभाविक पणे १/द च्या पटीत असेल.
समाजा या पटी आपण नि आणी नी अशा मानल्या. (त+क = त+नि/द आणि थ+ख = थ+नी/द)
या आयताचे क्षेत्र फळ = त गुणिले थ (गुणिले चिन्ह कसे आणायचे?) + तनी/द + थनि/द + (निनी)/दवर्ग (गुणिले काढल्यावर जास्त सोपे झाले)

ना/द बरोबर हे मांडून दोन्ही बाजूला द ने गुणून

ना = तथ + तनी + थनि + निनी/द

यातील डावीकडच्या आणि पहिल्या तिन्ही संख्या पूर्णांकात आहेत. म्हणजे निनी/द हे नेहमीच पूर्णांक हवेत. हे अशक्य आहे. (का?) फक्त नि/द वा नी/द पूर्णांक असतील तर.
निनी/द हे पूर्णांक नाहीत. द हा लसावी आहे म्हणून. हे कारण खरे वाटते पण नेमकी सिद्धता नाही.)

प्रमोद
(प्रतिसाद विचार करता करता लिहिला. विचार करून लिहिला नाही. याबद्दल क्षमस्व.)

प्रमोद

शंका

आता समजा ग गा... असे अपूर्णांक उरलेले अपूर्णांक आहेत. त्यांच्या विभाजकांचा लसावि काढा. हा लसावि समजा द आहे. तर १/द या आकाराचे सर्व अपूर्णांकाचे तुकडे पाडता येतात.

'अपूर्णांकांच्या विभाजकांचा लसावि' हे अपरिमेय संख्यांसाठी समजले नाही. √२, e आणि π यांच्या विभाजकांचा लसावि किती? √२ x e x π हे उत्तर आहे काय?
--------
नोटेशन आवडले :)

इरॅशनल

क ख ग - इर्रॅशनल नाहीत हे आधी स्पष्ट केले आहे.

प्रमोद

अभिनव नोटेशन्स

सिद्धता समजावून घेत आहे.

दुव्यावरील उत्तरे/सिद्धता रिडिक्युलस का वाटल्या? दुसरी आणि तिसरी सिद्धता दोन्ही समजण्यास सोप्या तसेच खुबीदार आहेत. या कोड्याचे मला देण्यात आलेले उत्तर दुव्यावरील दुसर्‍या सिद्धतेप्रमाणे होते.

_____
डोन्ट क्रिटिसाइज व्हॉट यु डोन्ट अंडरस्टँड

रिडिक्युलस

दुव्यावरील उत्तरे/सिद्धता रिडिक्युलस का वाटल्या? दुसरी आणि तिसरी सिद्धता दोन्ही समजण्यास सोप्या तसेच खुबीदार आहेत. या कोड्याचे मला देण्यात आलेले उत्तर दुव्यावरील दुसर्‍या सिद्धतेप्रमाणे होते.

माझ्या एका माईंडसेट (संदर्भ चौकट) वरून तसे वाटले.
मी असे मानतो की एका थियरमच्या दोन सिद्धता असल्या तरी त्या एकरूप असतात. म्हणजे त्यातील आर्ग्युमेंट हे तथ्यांशाने सारखे असते.
कदाचित माझे हे विचार बरोबर नसतील. पण बहुतकरून मला तसे आढळले आहे. (जिथे आढळले नाही तिथे मी एकरूप आहेत की नाही यावर फारसा विचार केला नाही.)

दुव्यातील पहिली आणि दुसरी सिद्धता एकसारखी आहे. पहिल्यात साइन वेवच्या इंटिग्रलचा विचार केला आहे जी ३६० अंशात (वा एककात) विरून जाते. १८० मधे अधिक आणि १८० ते ३६० मधे उणी उत्तरे देते. (हे माझे वरवरचे वाचणे असू शकते.) हीच पद्धत काळ्या पांढर्‍या रंगात केली आहे. (अधिक असेल तर उणे असायलाच हवे. काळा असेल तर पांढरा हवाच.)
आता या दोन्ही पद्धतीतील सोपी पद्धत कुठली? तर दुसरी. पण जास्त शब्द कशावार लिहिले आहेत. तर पहिलीत. दुसरीची मांडणी कदाचित जास्त चांगल्या आकृतीने समजवता आली असती. (आकृत्या काढूनही त्यांनी नेमकी आकृती काढली नाही. छोटे आयत आणि मोठा आयत यांच कुठे संबंध लागला नाही. ) यावरून असे वाटले की इंटिग्रलचा वापर केवळ दिशाभूल करायला केला आहे. (मला समजले नाही तर त्यात माझी वा माझ्या ज्ञानाची चूक असेल. हा विचार अंगी बाणवण्यासाठी त्याची निर्मिती केली गेली असे वाटले.)

मला पहिली पद्धत ही फसवेगिरी वाटते. फारसे खोलात न जाता असे म्हणतो एवढेच. तिसरी पद्धत मी वाचलीच नाही. (पण एकदा विश्वास उडाला की उडाला.)

जाता जाता. मी दिलेली पद्धत ही परिपूर्ण नाही. पण विविध आयतांचे एकरूप आयतांमधे रुपांतर केल्याने विचार करणे सोपे जाईल.

हा प्रश्न मांडल्याबद्दल धन्यवाद. (गेल्यावेळी द्यायचे राहिले होते.)

प्रमोद

अमान्य गृहीतक, तरी वेगळे कोडे म्हणून मजा

अपूर्णांक रॅशनल हवेत हे गृहीतक मला अमान्य आहे. यामुळे कोडे इतके बदलते, की ते पूर्वीच्या कोड्यासारखे राहातच नाही.

पण तुमचे हे वेगळेच कोडे, आणि त्याची सिद्धता समजावून घ्यायचा प्रयत्न करत आहे.

आणखी एक मतभेद : दुव्यावरील दुसरी आणि तिसरी सिद्धता मला डौलदार-सुंदर वाटली. "रिडिक्युलस" शब्दाचा अर्थ "कुरूप-म्हणून हास्यास्पद" असा असेल, तर त्याबद्दल माझा आस्वादात्मक विरोध मी नोंदवतो.
"रिडिक्युलस"चा अर्थ "तर्कदुष्ट" असा असेल, तर याबाबत मी त्याहून स्पष्ट विरोध करतो. त्या सिद्धतेतील तर्कदोष मला समजावून सांगाल काय?

कुरुप रचना.

दुव्यात दिलेल्या रचनेत देखिल हे इर्रॅशनल संख्या बाद आहेत (हे ब्रुयनच्या प्रमेयात येते असे मला वाटते.) त्यांचा एक वेगळा वर्ग काढून उत्तर काढता येईल. (आता इतके सोडवल्यावर फारसे कठीण नाही.)

दिलेले उत्तर कुरुप आहे असे माझे मत आहे. तर्कदोष नाहीत. वाचताना पहिला भाग न वाचल्याने तर्कदोष असू शकतील हे माझे मत झाले होते.

पण ब्रुयनच्या प्रमेयाशिवाय हे कोडे जसे मांडले तसे सोडवता येणार नाही. मी दिलेल्या सिद्धतेत ब्रुयन सारखीच सिद्धता आहे. (अनेकविध आयतांचे एकसारखे वा काही भाग एकसारखा असणारे तुकडे करणे.) माझ्या ता.क. सिद्धतेत ब्रुयनची सिद्धता दिली आहे. एकदा ब्रुयनची सिद्धता मांडली तर उत्तर केवळ दोन अंकाच्या गुणाकाराने मांडता येते. त्यासाठी ना इंटिग्रल ना काळे पांढरे चौकोन ना त्रिकोणांची गरज आहे.

ही रचना करून कुरुपता आणली आहे.

माझे कुरुपतेवरचे पहिले मत हंच वर होते. (मी दिलेल्या प्रतिसादात तसे म्हटले आहे.)

प्रमोद

बाद नाही

दुव्यावर दिलेल्या सिद्धतेत इर्रॅशनल बाद होत नाही. दुसर्‍या आणि तिसर्‍या सिद्धतेच्या बाबतीत मी हे पडताळून बघितले आहे.
- - -

तुमची सिद्धता समजावून घ्यायचा प्रयत्न करत आहे. तुम्ही म्हणता :

(#) छोट्या आयतांच्या क्षेत्रफळाची बेरीज = ना/द
(##) मोठ्या आयताचे क्षेत्रफळ = तथ + तनी/द + थनि/द + (निनी)/दवर्ग (गुणिले काढल्यावर जास्त सोपे झाले)

येथवर समजले. तिरक्या ठशातले शब्द तुम्ही टंकलेले नाहीत पण सारांशस्वरूप आहेत. यांच्याबद्दल मतभेद नसावा.
दोन्ही क्षेत्रफळांचे हिशोब समसमान हवेत, अशी तुम्ही पुढची तार्किक पायरी आहे. ती मी हळूहळू करतो, उड्या न मारता...
(#) = (##)
ना/द = तथ + तनी/द + थनि/द + (निनी)/दवर्ग
"द"ने गुणाकार करून
(###) ना = तथ + तनी + थनि + निनी/द
असे माझे गणित आहे.

तुम्ही मात्र दिले आहे :

ना = तथ + तनी + थनि + निनी/द

हे माझ्या (###) समीकरणापेक्षा वेगळे आहे. तुमची चिह्नावली न समजल्यामुळे माझे गणित चुकते आहे काय?

बाकी अजून बघतो आहे.

तथद

तथद बरोबर आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.

प्रमोद

नाही

दुव्यावरीत सिद्धतांमध्ये इर्रॅशनल संख्या बाद होत नाही. तशा कुठल्याही गृहितकाची आवश्यक नाहीत. धनंजय यांनी म्हटल्यानुसार हे पडताळून पाहता येते.

_____
डोन्ट क्रिटिसाइज व्हॉट यु डोन्ट अंडरस्टँड

ता.क.

दिलेला दुवा नीट वाचला नव्हता.

यातील सर्व आयत पूर्णांक आणि १/२ आकाराचे आहेत. त्या आधीची सिद्धता डी ब्रुयन् यांच्या नावावर आहे. (ही काय ती दुव्यात दिली नाही.)
हे एकदा समजले की पुढील काळ्यापांढर्‍या रंगांची कथा समजते. पण ही सिद्धता कदाचित मागच्या पानावर दिली असेल असे धरून चालू.

मी वरील दिलेल्या सिद्धतेत सर्व आयत १ आणि १/द मधे मांडता येतात.
त्यांना १/द आणि २/द मधे पण मांडता येतील. (द हा लसावि असल्याने.) आता प्रश्न फार सोपा झाला. याला आपण स्केल फॅक्टरने गुणता येऊन अधिक चांगले लिहू शकतो. स्केल फॅक्टर समजा १=२/द घेतला तर. बाजू आता ०.५ च्या पटीत असतील.

एक बाजू अपूर्णांक आणि दुसरी बाजू अपूर्णांक असेल तर अपूर्णांक केवळ ध.५ धा.५ (येथे ध हा आकडा म्हणून वापरला आहे.).

यांचे क्षेत्रफळ धधा +ध+धा +०.२५ येईल. मूळ सिद्धांता प्रमाणे हा आकडा पूर्णांक असला पाहिजे (माझ्या प्रतिसादातील मुद्दा).

हा आकडा पूर्णांक असू शकत नाही. म्हणून ध.५ आणि धा.५ हे उत्तर असूच शकत नाही. एकतरी पूर्णांक असला पाहिजे.

क्यु.ई.डी.

प्रमोद

आता हे उत्तर अचूक आहे.

हे उत्तर चुकीचे आहे.

हे उत्तर चुकीचे (अपूर्ण) आहे. (मला त्याचा खेद आहे.)

याचे कारण केवळ १/द आणि २/द या बाजू असलेल्या आयतातून हे उत्तर निघाले आहे. जनरलाइज्ड नाही.

प्रमोद

अपडेट ४

प्रमोद सहस्त्रबुद्धे यांचे उत्तर रॅशनल अपूर्णांकांबाबत अचूक आहे अशा निष्कर्षापर्यंत* पोहोचलो आहे. मूळ कोड्यात अपूर्णांक कसे असावेत यावर बंधन नव्हते. तरीही प्रमोद यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

अपडेट ३
प्रमोद सहस्त्रबुद्धे यांची सिद्धता किमान रॅशनल संख्यांकरता लागू होते असे माझे मत होत आहे. मला असलेल्या बर्‍याचशा शंका अधिक विचार करता दूर झालेल्या आहेत. असे असूनही सध्या तरी या सिद्धतेला अचूक म्हणू शकत नाही. अधिक विचार करतो आहे.

_____
डोन्ट क्रिटिसाइज व्हॉट यु डोन्ट अंडरस्टँड

दुव्यातील कोडे सोडवण्याची रीत

दुव्यातील कोडे सोडवण्याची दुसरी रीत समजली.

उत्तर काढायची पद्धत निश्चित विलोभनीय आहे.
पहिले मत मागे घेतो.

(प्रतिसाद् दोनदा संपादित)

प्रमोद

प्र का टा आ

प्र का टा आ

कोड्याचे चिरफळी उत्तर

पहिल्यांदा दिलेल्या उत्तरात प्रत्येक छोट्या आयतांचे एक सारखे १/द आणि १ मापाचे तुकडे पाडले होते.
हे रॅशनल संख्येला लागू होते. त्यानंतर क्षेत्रफळाचे गणित मांडले होते.
आता लक्षात आले की हे करण्याची गरज नाही.

हे उत्तर आता पूर्णपणे देता येत आहे. मधल्या स्टेपस ची सिद्धता न देण्या एवढ्या त्या सोप्या आहेत.

लेमा १. विविधांगी आयतांचे १ आणि १/द बाजूचे तुकडे पाडता येतात. (संदर्भ: मागील सिद्धता) सहजतेने यांना काड्या म्हणता येईल. आणि पुढील खेळ आगपेटीच्या काड्यांनी सहज करता येईल.

लेमा २. आडव्या बाजूला जे गणित होते तसेच उभ्या बाजूचे होते. (सिमेट्री)

लेमा ३. अशा कुठल्याही आयताची कुठलीही एक बाजू न + ना/द (यातील न ना पूर्वीपेक्षा वेगळे आहेत.) याच स्वरुपात राहिल.

लेमा ४. कुठलाही एकक चौरस आडव्या न काड्या वा उभ्या नद काड्याच होतात.

लेमा ५. कुठलाही लहान एकक चौरसाहून लहान आतत हा १ आणि ना/द (ना/द <१) याच स्वरूपात असू शकतो.)

प्रमेय:
न + ना/द आडवी आणि ध + धा/द उभी बाजु असलेला (१, १/द) आयत काड्यांमधे मांडणे अशक्य आहे.

आयताचे चार भाग करा. न ध बाजू असलेला आयत. ध आणि ना/द बाजू असलेला आयत. न आणि धा/द बाजू असलेला आयत. शेवटी ना/द आणि धा/द बाजू असलेला आयत.

यातील पहिले तीन आयत लेमा ४ आणि ५ प्रमाणे काही आयतांचे बनू शकतात. पण शेवटचा चौरस काड्यांनी कधीच बनू शकत नाही. (लेमा ५)

म्हणजे ही मांडणी अशक्य आहे. प्रमेय सिद्ध.

(कुणी काळजीपूर्वक याकडे बघेल तर ही मांडणी आणि काळ्या पांढर्‍या चौरसांच्या मांडणीत लक्षणीय साम्य दिसेल.)

खरे तर इर्रॅशनल बाजू असल्यावर काही अधिक लेमा टाकावे लागतील. मला मार्ग सहज दिसतो आहे. पण येथे मांडत नाही. (एनी टेकर्स?)

प्रमोद

 
^ वर