एका वाक्यात उत्तरे द्या..

राम राम मंडळी,

आमचे कलानगरीतले दोस्त रावशेठ यांच्या समुदायावर आमचे हे पहिलेच लेखन. आम्ही आपल्या सर्वांकरता एक छोटासा गृहपाठ देत आहोत. ते विकासचं की नवनीतचं वर्कबुक नसतं का? तस्संच हेही एक वर्कबुकच आहे म्हणा ना! ;)

आपल्याला आपापल्या प्रतिसादातून हे वर्कबुक भरायचं आहे. मला खात्री आहे, सर्व प्रतिसादींची उत्तरे एकापेक्षा एक भारी असतील. ती सर्व उत्तरे वाचण्यास मी उत्सुक आहे.

इथे प्रश्नरुपात काही संगीततकारांची नांवे द्यायची आमच्या हातून राहण्याची शक्यता आहे. आपल्याला ती द्यायची असल्यास आपण अवश्य देऊ शकता! आम्हालाही त्याची उत्तरे द्यायला आनंद होईल!

आमची अट एकच! कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे कमीत कमी शब्दात, फार तर एका लहानश्या वाक्यातच द्यायचं आहे! त्यातच सदर संगीतकाराच्या कलेबद्दल तुमच्या नेमक्या भावना आम्हास कळू शकतील असा आमचा विश्वास आहे. सबब, कृपया कोणीही पाल्हाळ लावू नये. नाहीतर वर्कबुकातले मार्क कापले जातील! ;)

चला तर, सुरू करुया मग?

प्रश्न : राहूलदेव बर्मन?
माझं उत्तर : The One & Only...

प्रश्न : सचिनदेव बर्मन?
माझं उत्तर : प्रेमात पाडणारा माणूस!

प्रश्न : मदनमोहन?
माझं उत्तर : अजब रसायन! मेंदू काम करत नाही!

प्रश्न : जयदेव?
माझं उत्तर : अवलिया कलाकार!

प्रश्न : नौशाद?
माझं उत्तर : नौशादसाब? क्या केहेने!

प्रश्न : ओ पी ?
माझं उत्तर : जो बादलको दिवाना बना दे!

प्रश्न : वसंत देसाई ?
माझं उत्तर : Just Classic!

चला तर मंडळी, भरा पाहू आपापली वर्कबुकं आणि पाठवा प्रतिसाद..
अनेक प्रश्न विचारायचे राहिले आहेत याची आम्हाला जाणीव आहे. आपण त्यात अवश्य भर घालू शकता. आम्हालाही उत्तर द्यायला आवडेल!

आपला,
(हिंदी चित्रपटसंगीतप्रेमी) तात्या.

Comments

माझी उत्तरे...

प्रश्न : राहूलदेव बर्मन?
माझं उत्तर : कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना

प्रश्न : सचिनदेव बर्मन?
माझं उत्तर : शोखियोंमे घोला जाये फूलोंका शबाब, उसमें फिर मिलायी जाये थोडीसी शराब
होगा यूं नशा जो तैयार, वो आप है

प्रश्न : मदनमोहन?
माझं उत्तर : समझ ना के था एक सपना सुहाना
वो गुजरा जमाना, मुझे भूल जाना

प्रश्न : जयदेव?
माझं उत्तर : जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया,
जो खो गया मैं उसको भुलाता चला गया

प्रश्न : नौशाद?
माझं उत्तर : पूछो ना मुहब्बत का असर, हाये ना पूछो
दम भर में कोई हो गया परवाना किसीका

प्रश्न : ओ पी ?
माझं उत्तर : यूं तो हमने लाख हंसी देखे है, तुमसा नही देखा

प्रश्न : वसंत देसाई ?
माझं उत्तर : नेकी पर चले, और वहीं से टले, ताकि हसते हुवे निकले दम

सन्जोप राव

रावसाहेब,

प्रश्न : वसंत देसाई ?
माझं उत्तर : नेकी पर चले, और वहीं से टले, ताकि हसते हुवे निकले दम

क्या बात है रावसाहेब! देसाईसाहेबांचं हे गाणं हृदयाला हात घालतं हो! आणि साला याच कारणाकरता आपण 'प्रभुकुंज' वरून पुढे जातांना पायातल्या चपला हातात घेऊन हृदयाशी धरतो!

आपला,
(लतादीदीचा बंदा!) तात्या.

तुमची सगळी उत्तरं आवडली.

आता 'ए मालिक तेरे..' चा विषय निघालाच आहे, तर हातासरशी 'दो आखे बारा हात' वरती पण लिहा पाहू काहितरी. माझा आवडता चित्रपट आहे तो. मला संध्या ही बया फार थोड्या ठिकाणी आवडली. 'दो आखे..' आणि 'अमरभुपाळी' या दोन चित्रपटात ती चक्क छान दिसते. बाकी सर्व चित्रपटात भयाण दिसते..

वणकुद्रे साहेबांबद्दलपण लिवा काहितरी. 'पिंजरा' आणि 'कुंकू' हे अण्णा वणकुद्रेंचे माझे सर्वात आवडते चित्रपट! कुंकू मधली शांता आपटे दिल खल्लास करते हो!

आपला,
(शांता आपटे प्रेमी!) तात्या आपटे! ;)

बरं का राव साहेब, कुंकू मधल्या शांता आपटेची जी केशरचना आहे ना, (म्हणजे हेअर ष्टाईल हो!,) ती ष्टाईल आमच्या नारायणराव बालगंधर्वांची बरं का! कारण कुंकू प्रदर्शित झाला तेव्हा मराठी संगीत रंगभूमी नारायणरावांच्या एकछत्री अंमलामुळे भारावून गेली होती!

असो..

आपला,
(बालगंधर्वप्रेमी) तात्या.

"वहीं से" नव्हे, "बदी से"

दुरुस्ती: "वहीं से टले" नव्हे, "बदी से टले". अर्थ पूर्ण बदलून जातो ना.
बाकी छान.

- दिगम्भा

 
^ वर