कानपुर आय आय टी मधील मध्यरात्रीनंतरची ईंटरनेट बंदी

आय आय टी मधील आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांवरील मानसीक दबावामुळे व ते पुरे करु शकत नसलेल्या अभ्यासामुळे. असे का होते तर ते वर्गात झोपा काढतात. का, तर ते रात्री झोपत नाहीत म्हणुन. का झोपत नाहीत तर ईंटरनेट सुरु असते. उपाय? रात्री १२ ते सकाळी ८ सगळ्यांचे ईंटरनेट बंद.

मला असे करणे मुळीच पटले नाही. जे सुयोग्य पद्धतीने वापरु पाहतात ते ही भरडल्या जातात.

तुम्हाला काय वाटते व का? दूसरे काय करता येऊ शकेल?

Comments

इंटरनेट

इंटरनेट आणि मोबाईल फोन ही दुधारी शस्त्रे आहेत. त्यांचे व्यसन लागणे अगदी शक्य आहे. त्यामुळे अभ्यास होत नाही, म्हणून आत्महत्त्या, हे मलाही पटत नाही.
वरील माहितीचा दुवा द्याल का?
सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान

दुवा

सहमत

आयआयटी मुंबई येथे २००६ साली एका लोकप्रिय विद्यार्थ्याने आत्महत्या केली, प्येप्रात बरीच बोंबाबोंब झाली आणि या तात्कालिक कारणामुळे गेली ३-४ वर्षे तेथेही लॅनबॅन आहे. तेथे हा खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे. (varta.iitb.ac.in या (माझे 'पहिले प्रेम') चर्चासंस्थळावर श्रद्धा/अंधश्रद्धा या विषयापेक्षा अधिक मारामारी लॅनबॅनविषयी होते.)
झाले असे की त्याचे चित्रपटांचे सर्वर होते, तो संगणकीय खेळ खेळे, इ. बातम्यांनंतर प्रशासनाला "आम्ही काहीतरी उपाय केले" असे दाखविणे आवश्यक वाटले. मैदानी खेळ खेळावे या कारणासाठी काही काळ संध्याकाळीसुद्धा इंटरनेट तोडले जाई. सर्व सर्वरांवर २४ तास बंदी आली (ती DC++ मुळे लगेचच निष्प्रभ ठरली). रात्री १२ नंतर हॉस्टेलच्या राऊटरना बंद होण्याचा आदेश मुख्य राऊटर कडून येई. ११:५९ ला हॉस्टेलच्या राऊटरच्या तारेला मुख्य राऊटरपासून तोडले की इंटरनेट नाहीतरी बंदच होणार ते तसे बंद होई पण किमान हॉस्टेलचे लॅन तरी चालू राही. मुख्य राऊटरकडे ही चलाखी लॉग होई पण ती पकडली जाण्यास काही दिवस लागले, मग सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटरना (हे विद्यार्थीच असतात) फटके :)
त्यानंतर ऐडिया काढली गेली ही मुख्य राऊटर बंद होण्यास सांगतो तेव्हा हॉस्टेलच्या राऊटरला बंद होऊ द्यावे पण नंतर त्याला पुन्हा सुरू करून पाहू. तर समजले की दर पाच मिनीटांनी तो "बंद व्हा" असा आदेश देई. मग उपाय असा की १२:०१ वाजता मुख्य राऊटरची तार तोडावी आणि मग हॉस्टेलचा राऊटर सुरू करावा!
आता बुद्धिमान राऊटर बसविलेले आहेत. त्यामुळे, मुलांना रात्री केवळ आंतरजालाशीच संपर्क करता येतो, इमेल इ. चालते पण एकमेकांच्या संगणकांशी संपर्क करता येत नाही. त्यामुळे चित्रपट, खेळ (हाय AOE :( ) इ. शक्य नाही. आंतरजाल वापरावर 700MB ही मर्यादा आहे त्यामुळे गेमरेंजर, हमाची इ. माध्यमे वापरून आंतरजालात आभासी लॅन बनविणेही अवघड आहे.
आता वायफाय इ. तंत्रज्ञान स्वस्त झालेले असल्यामुळे खासगी जाळी बनविणे विद्यार्थांना परवडेल असे मला वाटते.

काहीतरी...

प्रशासनाला "आम्ही काहीतरी उपाय केले" असे दाखविणे आवश्यक वाटले.

हे मनापासून पटलं. आत्महत्या ही सनसनाटी बातमी होते, व तिची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला जातो. असे प्रयत्न करणं रास्त असलं, तरी त्यामागे काहीतरी टॅंजिबल कारण सापडणं अपेक्षित असतं. आयायटीच्या बाबतीत 'अभ्यासाचा ताण' हे ढोबळ कारण शोधलं जातं. भारतात सरासरी दहा हजारात एक व्यक्ती दर वर्षी आत्महत्या करते (दुवा). हाच रेट आयायटीला लावला तर आयायटीच्या पाच हजाराच्या लोकसंख्येत दर दोन वर्षांतून एक आत्महत्या 'अपेक्षित' आहे. मुळात या दरापेक्षा आयायटीयनांच्या आत्महत्येचा दर खूप वेगळा आहे का? खरं तर प्रश्न असा विचारायला हवा, की वय वर्षे १८ ते २५मधील (एम.टेक., पी. एच.डी. करणारे धरून) तरुणांसाठी आयायटी बाहेर व आयायटीमधले यांच्या आत्महत्येचा दर वेगळा आहे का? (हाच प्रश्न मला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या दराविषयीही विचारायचा आहे - कोणाकडे विदा असल्यास द्यावा)

मला खात्री आहे की आयायटीच्या डायरेक्टरना इतपत संख्याशास्त्र समजतं. पण ते जाहीरपणे 'काही प्रॉब्लेम नाही' असं म्हणू शकत नाहीत. त्यापेक्षा काहीतरी उपाय केले हे सिद्ध करणं जास्त सोपं असतं.

खरा उपाय आहे तो म्हणजे 'आयायटीयन आत्महत्या का करतात' असा प्रश्न विचारण्याऐवजी 'तरुण मुलं आत्महत्या का करतात' असा प्रश्न विचारून त्याची खोलवर जाणारी उत्तरं शोधणं.

सनसनाटीकरणाची यंत्रणा (माध्यमं) ज्यांच्या हाती आहेत अशांना संख्याशास्त्राचं जुजबी ज्ञान अनिवार्य करावं असं मला बऱ्याच वेळा वाटतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

माहिती

मुळात या दरापेक्षा आयायटीयनांच्या आत्महत्येचा दर खूप वेगळा आहे का? खरं तर प्रश्न असा विचारायला हवा, की वय वर्षे १८ ते २५मधील (एम.टेक., पी. एच.डी. करणारे धरून) तरुणांसाठी आयायटी बाहेर व आयायटीमधले यांच्या आत्महत्येचा दर वेगळा आहे का? (हाच प्रश्न मला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या दराविषयीही विचारायचा आहे - कोणाकडे विदा असल्यास द्यावा)

पण ते जाहीरपणे 'काही प्रॉब्लेम नाही' असं म्हणू शकत नाहीत.

या मुद्यांवर साईनाथभक्त, अँटी फूड-टू-अल्कोहोल, सँडल घालणार्‍या मित्रांशी मी वाद घातले आहेत (पण ते विषयांतर होईल, शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा विषय उपक्रमवर फारसा चालला नाही असे मला वाटते). या दुव्यावर चांगले युक्तिवाद आहेत.

योग्यच!

--खरा उपाय आहे तो म्हणजे 'आयायटीयन आत्महत्या का करतात' असा प्रश्न विचारण्याऐवजी 'तरुण मुलं आत्महत्या का करतात' असा प्रश्न विचारून त्याची खोलवर जाणारी उत्तरं शोधणं.---
+१ - सहमत.

प्यांपर्ड

इंटरनेट नव्हते तेह्वा आय आय टी कोर्स नव्हता की काय? प्यांपर्ड आहेत.

 
^ वर