इस्लामचा अपमान - फाशीची शिक्षा

आज माझ्या वाचनात ही बातमी आली (स्रोतः सिएनएन):
पाकिस्तानात एका (ख्रिश्चन) बाईच्या हातून पाणी पिण्यास तिच्या बरोबर काम करणार्‍या लोकांनी नकार दिला (कारण पाण्याला एका मुसलमानेतर व्यक्तीचा स्पर्श झाला होता). ह्यावर ती बाईने "तुमच्या महंमदाच्या तोंडात सुद्धा जिवाणू/विषाणू होतेच ना?" असा सवाल करून इस्लामाचा 'अपमान' केला. ह्याबद्धल पाकिस्तानी कायद्याप्रमाणे (२९५-क) ह्या बाईला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

http://www.cnn.com/2010/WORLD/asiapcf/11/18/pakistan.blasphemy/index.htm...

- हे पाकिस्तानातील एक लहान गाव आहे. संबधित बाई ही तिथे शेतात्/मळ्यात काम करणारी स्त्री आहे.
- मुलाखतकाराने तिथल्या काही "पुरुषांना" ह्या निकालाबद्धल विचारल्यावर सगळ्यांनी एकमताने हा निकाल योग्य असल्याचं म्हटंलं.
- त्या गावच्या काझीच्या मुलाखतीत तो म्हणतो की "हा त्याच्या जीवनातला सर्वात आनंदाचा दिवस आहे. कोर्टाचा निकाल ऐकल्यावर त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले".
- ह्या निकालावर पाकिस्तान सरकारतर्फे कोणीही भाष्य केलेलं नाही.

ह्या निकालावरून् काय निष्कर्श निघतो?

लेखनविषय: दुवे:

Comments

अजून एक

अजून एक विडियो उपलब्ध झाला आहे. ह्यामधे पंजाब प्रांताच्या सरकारी वकिलाने केलेलं हे भाष्य (??)
http://www.cnn.com/video/#/video/world/2010/11/18/sayah.pak.blasphemy.pr...

निष्कर्ष

या दोन्ही बातम्यांच्यावरून एवढाच निष्कर्ष काढणे शक्य आहे की आपण या प्रकारची विचारसरणी असलेल्या देशांच्यात जन्माला आलो नाही हे आपले महा भाग्य आहे.
चंद्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

जागते रहो!

या दोन्ही बातम्यांच्यावरून एवढाच निष्कर्ष काढणे शक्य आहे की आपण या प्रकारची विचारसरणी असलेल्या देशांच्यात जन्माला आलो नाही हे आपले महा भाग्य आहे.
१००० टक्के सहमत. पाकिस्तानातली परिस्थिती भयंकर आणि दयनीय आहे. असो. भारतात असल्या फंडामेंटलिस्टांना (हिंदू आणि मुस्लिम) डोके वर काढू देता कामा नये. त्यासाठी सगळ्यांनी जागरूक राहिले पाहिजे हे पुन्हा एकदा अधोरेखित होते. जागते रहो!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

+१

सहमत.

पाकिस्तानातील परिस्थिती

अबुधाबीला माझ्याबरोबर काम करणारा एक सहकारी सांगत असे की मी मेलो तरी पाकिस्तानात मला पुरु नये. हा सिंध प्रांतातील होता. तिथे सरंजामशाही इतकी वाईट आहे की आजही लोकांच्या मुसक्या बांधून (ते सुशिक्षित/अशिक्षित कसेही असोत) पळवले जाते आणि मजूरी करवून घेतली जाते आणि इथे धर्माचा वगैरे काहीही संबंध नाही.

अशा देशात माझा जन्म झाला नाही हे बरे झाले.

http://www.cnn.com/2010/WORLD

http://www.cnn.com/2010/WORLD/asiapcf/11/18/pakistan.blasphemy/index.htm

हा दुवा चालत नाही.

हा चालतो.

शेवटी l कमी

शेवटी l कमी पडलाय.

माहिती

लेखातून एक रोचक माहिती कळली की इस्लामिक देशात गैर इस्लामिक लोकसुद्धा असतात. मला तर इतकी वर्षे सांगितले जाई की इस्लामी देशात गैर मुसलमान लोकांसमोर मुसलमान होणे किंवा मरून जाणे एवढेच पर्याय असतात.

आपला देश अशा विचारसरणीतून बाहेर पडला आहे हे चांगले आहे.

नितिन थत्ते

त्यांचे प्रमाण कमी करण्यात येते

गैर इस्लामी लोकांचे प्रमाण कमी असते , हळुहळू कमी होते व करण्यात येते. बांग्लादेशात सध्या तेच चालले आहे. आकडेवारी कोठे ही मिळेल.

+१

सहमत. (शिवाय, तसे करण्यास इस्लामनेच सांगितले आहे. केवळ, राज्यव्यवस्था वाईट आहे असे म्हणता येणार नाही.)

पुढे काय?

हा कायदा असेपर्यंत इतर देशांनी पाकिस्तानशी राजनैतिक संबंध ठेवू नयेत, आर्थिक व्यवहार करू नयेत असे मला वाटते. आपण काय करू शकतो? या दुव्यावर उल्लेखली गेलेली कल्पना चांगली आहे. "आम्हाला तुमच्या मनोवृत्तीची घृणा आहे" हे व्यक्त केले पाहिजे.

ह्म्म!

विविध मत-प्रवाहांमुळे आणि प्रवृत्तींमुळे समाजाची कालांतराने फोड होते—विचारसरणी जुळत असल्याने या तुटलेल्या समाजातून लहान लहान उपसमूह/संघ बनतात, धर्म बनतात, जाती बनतात, समर्थक/विरोधक बनतात. परिणीती शाब्दिक चकमकी, राजकीय वाद, तणाव, चिकलफेक, युद्ध किंवा या चर्चेच्या प्रस्तावात दिलेली घटना, ही घटना किंवा बाबरी मशीद प्रकरण अशा घटनांमध्ये होते. समर्थक व विरोधक यांच्या एकूण संख्येवरुन आणि जवळ असलेल्या शक्तिवर्धक* गोष्टींच्या (ज्या दुसर्‍या गटाकडे नाहीत) आधारे घटनेचा निकाल लागतो जो त्या-त्या काळी विशिष्ट गटांमध्ये योग्य-अयोग्य ठरवला जातो. (उदाहरणार्थ, ही चर्चा!)

निषेध

निषेध.निषेध.निषेध. सर्व देशांनी पाकिस्तानवर राजकीय निर्बंध लादावेत.

तरीही मुस्लिमेतर धर्मियांनी पाकिस्तानात राहणे म्हणजे सर्पोद्यानात सशाने राहण्यासारखे आहे असे माझे वयक्तिक मत आहे. (सापाचा अपमान हा हेतू नसून उदाहरण आहे, अधिक सूचक उदाहरण असल्यास सुचवावे.)

बातमी वाचून व पाहून वाईट वाटले.

बातमी वाचून व पाहून वाईट वाटले. निश्कर्श कसला काढणार? कप्पाळ!
हा वेडेपणा आपल्या देशातही कुठे-कुठे आहे. फक्त तो जातीवर आधारीत असतो. फक्त त्या वेडेपणाला कायद्याचं पाठबळ नाही हेच तेवढे चांगले आहे. पाकिस्तानात ते नाही.

असेच म्हणतो

असेच म्हणतो.
खाप पंचायतीचा विरोध भारतातल्या न्यायालयांत होतो, हे चांगले.

वाईट परिस्थिती

वरील घटनेनंतर त्या ख्रिश्चन महिलेची बाजू घेणारे तेव्हाचे पाकिस्तानातल्या पंजाबचे राज्यपाल सलमान तासीर ह्यांची त्यांचा मलिक मुमताज़ क़ादरी ह्याने थंडपणे गोळ्या घालून हत्या केली. त्याला न्यायालयात नेत असताना वकिलांनी त्याच्यावर पुष्पवर्षाव केला. ह्या कादरीचा गौरव, स्तुती करणारी गाणी अऩेक इस्लामी वाहिन्यांवर नियमितपणे दाखविली जातात. काही दिवसांनी दहशतवाद्यांनी अल्पसंख्याक खात्याचे मंत्री शाहबाज़ भट्टी -- जे धर्माने ख्रिश्चन होते -- ह्यांचीही हत्या केली. असो. परिस्थिती फार वाईट आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

जागते रहो

मुस्लिम पॉप्युलेशन डेन्सिटी राजस्थान, युपि, बिहार, प बंगाल ह्या राज्यातून हळूहळू वाढत चालली आहे. हा कॉरिडॉर पिकिस्तान व बांगलादेशला जोडूद्यायचा प्रयत्न चाललेला आहे.... त्याचे परिणाम येत्या काही दशकात पहायला मिळतील.

टेक अ चिल् पिल्

काही डेटा आहे का तसा?

मुस्लिम लोकसंख्यावाढीचा दर हिंदूंच्या पेक्षा जास्त आहे त्यामुळे 'लवकरच' हिंदू अल्पसंख्य होणार असे ऐकायला लागूनसुद्धा तीन दशकं होऊन गेली. पण तसं काही होण्याच्या दिशेने वाटचाल दिसत नाही. मुस्लिम लोक फारच इनएफिशियंट आहेत ब्वॉ. :-)

दोन दशकांपूर्वीसुद्धा लोकसंख्या वाढीच्या दरात जी तफावत होती त्या फरकामुळेही मुस्लिम बहुसंख्य व्हायला किमान अडीचशे वर्षे लागतील असे साधे चक्रवाढीचे गणित त्या काळी करून पाहिले होते.

नितिन थत्ते

नागपूर् पॅटर्न्.

थत्तेजी,
.एक समाजवादी चळवळीत यदुनाथ थत्ते 'काका' होते. तुम्हाला जे चिच्चा,चाचा म्हणतात त्याचा उगम तिथे असावा असे बर्‍याचदा भासते..
ते चक्रवाढीचे गणित चाचा पॅटर्न होते की नागपूर पॅटर्न?

शंका....

दोन दशकांपूर्वीसुद्धा लोकसंख्या वाढीच्या दरात जी तफावत होती त्या फरकामुळेही मुस्लिम बहुसंख्य व्हायला किमान अडीचशे वर्षे लागतील असे साधे चक्रवाढीचे गणित त्या काळी करून पाहिले होते.
पुढील counter argument माझे नसून 'लवकरच' हिंदू अल्पसंख्य होणार असे ज्यांच्याकडून ऐकवले जात होते त्यांचे आहे.
त्यांच्या सुचवलेल्या कृतीशी व् उचापत्यांशी मी सहमत नसलो तरी खालील विधानांमधील तर्कदोष काय काय आहे ते जाणून घ्यायला आवडेल :-

लोकसंख्येचा तोल बदलण्याचा आलेख linear नसून् exponential असतो. एका मर्यादेपर्यंत संख्या हळूहळू वाढते. breakout बिंदू नंतर मात्र ती कल्पनातीत वेगाने वाढते. प्रचंड आक्रमकता दृश्यमान् होते, निर्णायक दंगेधोपे सुरु होतात, समोरच्या(पूर्वीच्या बहुसंख्य) पार्टीने नाइलाजाने काहीशी "तह" केल्यासारखी स्थिती मान्य केली तर त्याचा अर्थ इतकाच की समोरची पार्टी शंत बसणार. ह्यांच्या इलाख्यातल्या अन्य धर्मियां॰ए जे जबरदस्तीने बाटवणे सुरुच ठेवणार. नवप्रवेशित (slang शब्द बाटगा) जास्त कडवा असतो. तो अधिक वेगानं प्रसार, प्रचार करतो.
लवकरच मूळचे बहुसंख्य नगण्य होतात. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे फाळणीच्या वेळचे पाकिस्तान व बांग्लादेश. १९४५ पर्यंत तिथे अनुक्रमे १०% व २४% जनता तिथल्या "अल्पसंख्य" क्याटेगरित होती. आज पाकमध्ये दोनेक टक्क्याच्या पुढे ती नाही, बांग्लादेशातही सात आठ टक्क्यावर प्रमाण आलाय, सातत्याने कमीच होतय.
तुम्ही म्हणताय त्या अडीचशे वर्षापैकी फारतर शंभरेक वर्षे हे population/demography explosion दबलेले राहील. एकदा काहीशी संघटित ताकद पुनश्च दाखवायचा जोर आला की मग झपाट्याने हा तोल बदलत जाणार.
अशा घटनां॰ए ऐतिहासिक (अर्वाचीन) साक्षीदार पूर्व युरोप(सर्बिया,बोस्निया वगैरे) आहेत, मध्ययुगाच्या शेवटी हाच प्रकार तुर्कस्थानात घडला, मध्याअशियातील पूर्वीच्या सोविएतलाही ह्याचे बरेच चटके बसले, चीनने मात्र बळाचा वापर करत सिक्यांगसारख्या प्रांतामधील असा बदल रोखून धरलाय.
भारताचे सोडा, खुद्द कित्येक युरोपिअनांना काही काळातच ख्रिस्ती युरोपीय मुस्लिम स्थमंतरितांमुळे अल्पसंख्य होणार ह्या भीतीने ग्रासले आहे. (अमेरिका त्याच लायनीवर आहे, पण त्यांच्या भौगोलिक विलगतेमुळे अमेरिका पादाक्रांत करण्यास त्याम्ना जरासा वेळ लागेल इतकेच.)

पाकिस्तानमध्ये काय मागील चौदाशे वर्षे मुस्लिम् ९८%च होते का? अगदि मुघलांचे आगमन झाले, त्याही वेळी तोल बराचसा स्थानिक संस्कृतींच्या बाजूनेच होता.

--मनोबा

प्याटर्न

प्रतिसाद मन यांना नसून नागपूर थिअरीला आहे. नागपूर पॅटर्नला उत्तर इथे देण्यात खरे तर काही हंशील नाही पण द्यायचा प्रयत्न करतो.

>>लवकरच मूळचे बहुसंख्य नगण्य होतात. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे फाळणीच्या वेळचे पाकिस्तान व बांग्लादेश. १९४५ पर्यंत तिथे अनुक्रमे १०% व २४% जनता तिथल्या "अल्पसंख्य" क्याटेगरित होती. आज पाकमध्ये दोनेक टक्क्याच्या पुढे ती नाही, बांग्लादेशातही सात आठ टक्क्यावर प्रमाण आलाय, सातत्याने कमीच होतय.

???. अल्पसंख्य नगण्य होतात असे म्हणायचे आहे का?

>>लोकसंख्येचा तोल बदलण्याचा आलेख linear नसून् exponential असतो. एका मर्यादेपर्यंत संख्या हळूहळू वाढते. breakout बिंदू नंतर मात्र ती कल्पनातीत वेगाने वाढते. प्रचंड आक्रमकता दृश्यमान् होते, निर्णायक दंगेधोपे सुरु होतात, समोरच्या(पूर्वीच्या बहुसंख्य) पार्टीने नाइलाजाने काहीशी "तह" केल्यासारखी स्थिती मान्य केली तर त्याचा अर्थ इतकाच की समोरची पार्टी शंत बसणार. ह्यांच्या इलाख्यातल्या अन्य धर्मियां॰ए जे जबरदस्तीने बाटवणे सुरुच ठेवणार. नवप्रवेशित (slang शब्द बाटगा) जास्त कडवा असतो. तो अधिक वेगानं प्रसार, प्रचार करतो.

किती प्रमाणापर्यंत लोकसंख्या वाढली तर असे होते ? भारतात सुमारे इ स् १००० पासून इ स १७०० पर्यंत (७०० वर्षे) लुटणे बाटवणे सत्ता गाजवणे असा क्रम अव्याहत सुरू होता असे नागपूर पॅटर्ननुसार सांगितले जाते. तरी हिंदु अल्पसंख्य काही झाले नाहीत. इतरत्रसुद्धा मध्ययुगानंतर (परधर्मीय सत्तेत राहून) असे घडल्याची काही उदाहरणे आहेत का? तसे (परधर्मीय सत्तेत राहूनही) खरेतर ख्रिश्चन लोक ईशान्य भारतात यशस्वीपणे करत आहेत असे नागपूरपॅटर्नचेच लोक आम्हाला सांगतात. मग ख्रिश्चन लोकांना भीती वाटावी याचे आश्चर्य वाटते.

वर वर्णन केलेली परिस्थिती खरे तर नागपूरकरांना लागू आहे. १९४८ च्या जानेवारीअखेर पासून १९८० च्या दशकापर्यंत त्यांच्या समर्थकांची संख्या कमी होती. तह केल्यासारखी परिस्थिती होती. प्रचार प्रसार चालूच होता. त्यांच्या समर्थकांची संख्या एका थ्रेशोल्डपर्यंत वाढल्यावर प्रचंड आक्रमकता दृश्यमान् होऊ लागली, निर्णायक दंगेधोपे सुरु झाले वगैरे वगैरे.

नितिन थत्ते

नितिन साहेब

मी येथे लोकसंख्येची गोष्ट करत नाहीये तर लोकसंख्या डेन्सिटीची गोष्ट करत आहे. आपण कधी (कोणजाणे कधी. भेटलो की मी तुम्हाला ह्याची पुर्ण माहिती देईन (किंवा मी आर्मी मधून निवृत्त झालो की देईन).

 
^ वर