उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
उपक्रम दिवाळी अंक २०१०!
दिवाळी अंक
November 5, 2010 - 3:11 pm
'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उपक्रम दिवाळी अंक २०१०
http://diwali.upakram.org/
प्रतिसाद देण्यासाठी उपक्रम वरील वापरायचे नाव आणि परवलीचा शब्द वापरून येण्याची नोंद करावी.
दुवे:
Comments
वाचनीय
आत्ताच अंक पाहीला आणि नजरेखालून घातला. नेहमीप्रमाणेच वाचनीय अंक आहे. संपादक मंडळाचे अभिनंदन तसेच सर्व उपक्रमींना दिवाळीनिमित्त आणि येणार्या वर्षासाठी शुभेच्छा!
+१
+१
आत्ताच अंक पाहीला आणि नजरेखालून घातला. नेहमीप्रमाणेच वाचनीय अंक आहे. संपादक मंडळाचे अभिनंदन तसेच सर्व उपक्रमींना दिवाळीनिमित्त आणि येणार्या वर्षासाठी शुभेच्छा!
--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!
हैयो हैयैयो!
अभिनंदन
अंक चाळला. उत्तम दिसतो आहे. वाचनीय असणार यात शंका नाही.
सवडीने वाचेन.
दिवाळी असल्याने सर्वच व्यग्र आहेत. :-( तूर्तास, सर्व दिवाळी अंकांवर सवडीने वाचेन अशी प्रतिक्रिया देण्यावाचून पर्याय नाही.
+१ (इथेही :) )
अगदी असेच म्हणतो.. उपक्रमरावांचे व उपक्रमींचे अभिनंदन!
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
मुखपृष्ठावरील फोटो आणि अंक
अभिनंदन!!! मुखपृष्ठावरील फोटोनेच घायाळ झालो. अंक चाळला, उत्तम वाटतोय. धनंजयचा लेख आत्तातरी डोक्यावरुन गेला. विवेक वेलणकरांची मुलाखत आवडली.
असेच
असेच म्हणतो. सवडीने वाचतो.
धनंजयांचा लेख आवडला.
धनंजयांचा लेख आवडला. समजला. एक विचारणा : लेखात उल्लेखिलेली कारिका वाक्यपदीयच्या तीनपैकी कुठल्या खंडात आहे? पहिल्या ब्रह्मकांडात सापडली नाही. --वाचक्नवी
माहीत नाही - पूर्ण कारिका
नागेशाने भर्तृहरीची म्हणून कारिका उद्धृत केलेली आहे. माझ्याकडील पुस्तकातल्या टिपणांमध्येही त्याचे वाक्यपदीयातले नेमके ठिकाण दिलेले नाही. पूर्ण कारिका अशी :
ही कारिका बालमनोरमेतही उद्धृत केलेली दिसते (पण बालमनोरमा ही फार अर्वाचीन आहे.)
मृणालकांती गंगोपाध्यायांनी त्यांच्या "न्यायबिंदुटीके"च्या (न्यायबिंदुटीका - ईस ७०० च्या आसपास) इंग्रजी भाषांतराच्या (१९७१) संदर्भात या कारिकेचे उद्धरण केलेले आहे, असे गूगल-शोधातून दिसते. पण त्यात त्यांनी वाक्यपदीयाचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही.
सुंदर अंक
अंक आवडला. वाचनानंतर विस्ताराने प्रतिक्रिया देता येईल.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
नाडी ग्रंथांतील जन्म दिनांक
त्यातील नाडीविषयाच्या आवडीमुळे मला हैयोंचे विशेष अभिनंदन करावेसे वाटते.
त्यानी लेखात उल्लेख केलेल्या उदाहरणातील दिनांकांची व ग्रहमानाची सत्यता पडताळून पहाण्याची तसदी अनेक उपक्रमी घेतील. शिवाय हैयोंच्या तमिळ भाषेच्या व अनुषंगाने लिपीच्या ज्ञानाची चाचणी घेण्यास ही उपक्रमी आपल्या माहितीतील तमिळांना उद्युक्त करतील अशी अपेक्षा बाळगतो.
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
:)
कॉलिंग 'बिनतारी विभाग'...
तोवर प्रथमाग्रासे हे घ्या. (तुम्ही तेथेही असाच प्रतिसाद छापला आहे तद्वतच मीही तेथील प्रतिसाद येथे देतो आहे.)
अंक आवडला
उपक्रमाचे आणि उपक्रमींचे अभिनंदन. अंक सुरेख झाला आहे.
फोटो अतिशय सुंदर आहेत. लेख हळूहळू वाचते आहे.
महाबळ यांचा संगीतावरील लेख आवडला. अशा प्रकारे विश्लेषण केलेला लेख हा दुर्मिळ आहे.
सुंदर.
सुंदर.
अतिशय सुंदर अंक.!!
छायाचित्रे अत्युत्तम, व्यंग-चित्रांमध्ये 'कल्पनाविलास' कडक. :)
लेख अजून पूर्ण वाचले नाहीत, तरी सवडीने प्रतिक्रिया देईन.
अंक उतरवून घेता येईल काय ?
अंकाची उत्सुकता होतीच. दोन दिवस आधी "रेषेवरची अक्षरे", "कलाविष्कार" "पुस्तकविश्व" चे अंक संगणकावर उतरवून घेतले. "उपक्रम" मायबोलीचा "हितगूज", "मनोगत" हे केवळ संस्थळावर जाऊनच वाचता येत आहेत. अंक खरोखरच संग्राह्य आहेत मात्र ते संगणकावर उतरवून घेता येण्याची सोय दिसत नाहिये. कोणी मार्गदर्शन करील काय ?
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
अभिनंदन...!
उपक्रमचा अंक उपक्रमच्या प्रकृतीला साजेसाच निघाला आहे.
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन..!
-दिलीप बिरुटे
येण्याची नोंद करण्याच्या दुव्यात दुरुस्ती
दिवाळी अंकावर प्रतिसाद देण्यासाठीच्या वर दिलेल्या दुव्यात आता योग्य ते बदल केले आहेत. योग्य दुवा http://diwali.upakram.org/user असा आहे. अजूनही अडचण येत असेल तर कृपया कळवावे.
कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक
फोटोनिरसन
मधुसंचय - विशाल कुलकर्णी - खूप चांगला फोटो- भूंग्याचे पंख फार आवडले. त्याच्या अंगावरील बारीक लव पाहून आश्चर्य वाटले- माणूस जर आकाराने लहान असता तर ह्याच्या कातड्याचे फरकोट केले असते.
कुतूहल - दीपक पट्टणशेट्टी- खूप कल्पक फोटो. पोज मुद्दाल घेण्यास सांगितली होती का असा प्रश्न पडला.
शिशिरातले झाड - धनंजय वैद्य- नाही आवडला हा फोटो.
एकाकी - अभिजित यादव - नाही आवडला हा फोटो- ठिक वाटला.
प्रकाशवाट - शशांक जोशी - घायाळ झाल्याचा रीपोर्ट वर दिलाच आहे. ह्याचा बरोबर मध्यभागी उभे राहून काढलेला फोटो येथे शेअर करता येईल का?
नैसर्गिक उद्गार चिह्न - नंदन होडावडेकर..- फोटो ठिक- निसर्गाची सुदरताच इतकी अप्रतिम आहे की, फोटो काढणा-याला फारसे काही करावे लागत नाही पण चित्राला दिलेल्या कल्पक नावामुळे आवडला- त्या दृष्टीने पाहील्यामुळे.
फोटोनिरसन
मधुसंचय - विशाल कुलकर्णी - चांगला फोटो
कुतूहल - दीपक पट्टणशेट्टी - ठीकठाक फोटो
शिशिरातले झाड - धनंजय वैद्य - छान अँगल मधुन काढलेला ओके फोटो
एकाकी - अभिजित यादव - ओके फोटो पण एकाकी काय ते कळले नाही.
प्रकाशवाट - शशांक जोशी - चांगला फोटो पण जमीनीवर डाग सदृश्य दिसणारे ते अडथळे काढायचा आळस (हाताने उचलण्यासारखे असते तर तसे अथवा तांत्रीक करामतीने) का केला ते कळाले नाही.
नैसर्गिक उद्गार चिह्न - नंदन होडावडेकर - ओके फोटो अर्थात निसर्गाचीच करामत पण उद्गार चिन्ह कोणते?
उद्गारचिह्नातला सोपेपणा फसवा
"उद्गारचिह्न" मध्ये वाटणारा सोपेपणा फसवा आहे.
(मला वाटते की मी हे चित्र "पॅनोरॅमिक" आकारात कातरले असते. आकाशाचा वरील भाग स्वतःहून नाट्यमय असला तरी हे उपकथानक नदीच्या कथानकावर कुरघोडी करत आहे. जमिनीच्या पातळीवरच, दूरवर नदीवर असलेल्या धुक्याच्या/तुषारांच्या ढगाला कथानकाचे गंतव्य करणे मी अधिक पसंत केले असते.)
कातरण्याबाबत माझे मत वेगळे का असेना... या चित्रातील घटकांची मांडणी अपघाती नाही, तर विचारपूर्वक आहे. सुंदर निसर्गाची रटाळ चित्रे काढण्याचा अनुभव कोणाला आलेला नाही? येथे नाट्यमयता, कथानकाला आधार देण्यासाठी प्रकाशचित्रकाराने प्रयत्न केलेले आहेत, खास. मात्र हे प्रयत्न बेमालूम केलेले आहेत. नाटकासारखेच निसर्गचित्रणासाठी आहे - नेपथ्यकाराने कौशल्य पणाला लावावे, पण खेळ चालू असताना रंगपटावर "मी किती कुशल" असा आरडाओरडा करता कामा नये.
पार्श्वभूमी
प्रस्तुत छायाचित्र ज्या राष्ट्रीय उद्यानात घेतले, त्या यलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये geysers (गायझर्स/गिझर्स) अर्थात गरम पाण्याच्या झर्यांची, कुंडांची संख्या भरपूर आहे. ठरावीक कालावधीने शेकडो गॅलन पाण्याचा उंचच उंच फवारा वर फेकणार्या 'ओल्ड फेथफुल'पासून वेगवेगळ्या रंगांचे दर्शन घडवणार्या 'ग्रँड प्रिझ्मॅटिक स्प्रिंग'पर्यंत अनेक आकर्षक ठिकाणं येथे आहेत. पण फारशा प्रसिद्ध नसलेल्या, पर्यटकांच्या गर्दीपासून दूर अशा अनेक निवांत पण तितक्याच वेधक जागाही शोधल्यास सापडतात. (अवांतर - या नॅशनल पार्कात येणारे तीन चतुर्थांश पर्यटक आपल्या वाहनापासून तीन मीटरहून अधिक अंतरावर जात नाहीत असं अलीकडेच एनपीआरवर ऐकलं. 'इको पॉर्न' अशी काहीशी वादग्रस्त संज्ञा याला आहे.)
एकंदरीतच अशा भौगोलिक रचनेमुळे, त्या परिसरात अगदी अनपेक्षित ठिकाणीही असाच जमिनीतून धुराचा छोटा ढग निसटताना दिसतो. सुरक्षेच्या नियमांमुळे अशा ठिकाणांच्या फार जवळ जाणे निषिद्ध आहे. सूर्यास्तानंतर अचानक एका अशा अ-टूरिस्टी जागी - वरील छायाचित्रातला धनंजयांनी नोंदवलेला ढग - दिसला. बोरकरांच्या 'उदासता अन सुखात कोठे कौलारांवर धूर दिसावा, असे निसटते बघून काही विषाद व्हावा जीवा विसावा' या ओळींची आठवण व्हावी असा.
त्या निसटत्या धुरावर लक्ष केंद्रित करावं की जसं वाक्याच्या शेवटी एक आफ्टरथॉट म्हणून उद्गारचिन्ह ठेवून द्यावं, तशा असलेल्या त्या झाडावर - या प्रश्नातून मध्यममार्ग म्हणून दोन्ही टिपण्याचा प्रयत्न केला. परिणामी थोडं ओव्हर-एक्स्पोज झालेलं आणि मुख्य विषयापासून कदाचित लक्ष विचलीत करणारं आकाशही त्यात आलं. पण एकंदरीत आळस + शेवटच्या तासाला दिलेली प्रवेशिका यामुळे मूळ छायाचित्रात काही बदल न करता ते तसंच पाठवून दिलं. तेव्हा यात छायाचित्रणाचे कौशल्य किंवा फोटोशॉपची करामत असं काही नाही. जसे-त्या-वेळी-एका-कोनातून-दिसले-तसे इतकेच.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
काराच्या मनातील भाव
[अवांतर -होय, ह्या पिवळ्या बनातील पिवळ्या हरकतींबद्दल ऐकुन-पाहून आहे- हॉलीवुड चित्रपटामुळे. ]
फोटोमागील कथा वाचल्यामुळे काराच्या मनातील भाव वाचता आले.
व्यंगचित्रेरस
डॉक्टर आणि पेशंट - १ - महेंद्र भावसार: नवे पंच असल्यामुळे खुसखुशीत
डॉक्टर आणि पेशंट - 2 - महेंद्र भावसार: जुने दिवाळी अंक स्पेशल पंचांमुळे निरस
प्लॅस्टिक सर्जरी - १ - महेंद्र भावसार: जुने दिवाळी अंक स्पेशल पंचांमुळे निरस
प्लॅस्टिक सर्जरी - २ - महेंद्र भावसार: जुने दिवाळी अंक स्पेशल पंचांमुळे निरस
व्यंगचित्रे - कल्पनाविलास - प्रमोद...: मनातील चित्रे छानपैकी उतर्वलेली आहेत संदर्भ जोडला गेला असल्यामुळे मजा आली.
आवडला
अंक आवडला. वेलणकरांची मुलाखत आणि व्यंगचित्रे झाली. बाकी अंक वाचून सविस्तर प्रतिक्रिया देईन. अभिनंदन.
मुखपृष्टावरील छायाचित्र अप्रतिम.
भरगच्च
भरगच्च अंक आहे. अश्विनी कुलकर्णींची मुलाखत तेवढी चाळली. वाचून प्रतिक्रिया द्यायला अर्थात वेळ लागेल. तोवर अंकाचे मनापासून स्वागत.
- मेघना भुस्कुटे
सुंदर
अंक सुंदर आहे. विषयांची वैविध्यता कौतुकास्पद आहे.
बिपिन कार्यकर्ते
वैविध्यता?
म्हंजे काय? तुम्हाला वैविध्य म्हणायचंय का?
उत्तम अंक
उत्तम दिवाळी अंक आहे. अंक वरचेवर चाळला! आवडला!!!
आवडला...
अंक आवडला, उत्तम झाला आहे हा दिवाळी अंक् !
राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
अंक छानच आहे
अंक छानच आहे. एका चांगल्या कार्याबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन..
मुखपृष्ठावरील फोटो कुठला आहे? ती माहिती अंकात कुठे मिळेल?
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
धन्यवाद,
माहिती मिळाली..
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
मुखपृष्ठ फोटो
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
लक्षवेधक मुखपृष्ठ हे उपक्रम दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य आहे. तीन अंकांची मुखपृष्ठे एकाहून एक वरचढ आहेत.या अंकावरील फोटो लक्ष खिळवून ठेवतोच. दारातून आत येणार्या लख्ख सूर्यकिरणांनी जमीन उजळते. तिथून परावर्तित होणार्या किरणांनी कमानी प्रकाशात येतात.मोठा फोटो बघण्यापेक्षा जो लहान आकारात दिसतो तोच अधिक परिपूर्ण वाटतो.(तरी जमिनीवर जे दोन काळे डाग दिसतात ते नसते तर बरे झाले असते असे सारखे वाटत राहाते.दृष्टी पुन्ह:पुन्हा त्या काळ्या वस्तूंकडे जात राहाते.)
छान,
अंक आवडला.
('उपक्रम' नावाचा फाँट जुन्या- ७०/८० च्या दशकातल्यासारखा वाटतो.)
सर्वोत्तम
हा दिवाळी अंक उपक्रमाचा असल्याने सर्वोत्तम झाला आहे ह्याबद्दल दुमत नाहीच.
वाचलेल्या लेखांबद्दल
प्राची देशपांडे ह्यांचा कलकत्ता कॅलेडोस्कोप (की कॅलिडोस्कोप की कलायडोस्कोप) आवडला.
विवेक वेलणकर ह्यांची मुलाखत मस्त झाली आहे प्रकाशराव.
सा रम्या नगरी! उत्तम....
आणि हो सहस्रबुद्ध्यांचा कल्पनाविलासही छानच आहे.
इतर लेख लौकरच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
प्रवेश जमत नाही
दिवाळी अंकाच्या सदस्य प्रवेश प्रक्रियेचे पान पुढे सरकत नसल्याचा अनुभव गेले ३ दिवस येतो आहे, ह्याल्प.
--------
पुरवणी: हा प्रतिसाद टंकून १०च मिनिटांनी पुन्हा प्रयत्न केला तेव्हा प्रवेश सफल झाला! धन्यवाद.
ब्लॉग/संकेतस्थळावर उपक्रम दिवाळी अंकाची माहिती
नमस्कार,
उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल उपक्रम सदस्यांचे आणि वाचकांचे मनःपूर्वक आभार!
दिवाळी अंकाची माहिती आणि छोटे चित्र आपल्या ब्लॉग, संकेतस्थळावर देण्यासाठी कृपया खालील मजकूर चिकटवावा.
<div style="text-align: center;"><a href="http://diwali.upakram.org/" target="_blank"><img src="http://diwali.upakram.org/files/2010/mukhprushtha_image_small.JPG" /></a>
<p style="font-size: 0.9em;"><a href="http://diwali.upakram.org/" target="_blank">उपक्रम दिवाळी अंक २०१०</a></p></div>
म्हणजे असे दिसेलः
उपक्रम दिवाळी अंक २०१०
कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक
ब्लॉग
ब्लॉगवर पोस्ट टाकले होतेच. आता हे पण टाकतो. धन्यवाद.
"येण्याची नोंद" करण्याची पर्यायी सोय
आता कोणत्याही लेखाच्या पानावर उजव्या हाताला लेखांच्या यादीच्या खाली "येण्याची नोंद" करण्याची सोय देण्यात आली आहे. ज्यांना येण्याची नोंद करण्यात अडचण येत होती त्यांनी याचा वापर करून पाहावा. काही अडचणी असल्यास कळवाव्यात.
कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक