रेषेवरची अक्षरे २०१०

‘रेषेवरची अक्षरे’चा तिसरा अंक प्रकाशित करत आहोत.

इथे जाऊन आवर्जून पाहा नि कसा वाटतोय जरूर कळवा. तुमच्या टीकेचं आणि सूचनांचं मनापासून् स्वागत आहे.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! :)

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

दिवाळी अंक आवडला.

धन्यवाद.

आभार

आभार, घाईत आहे. सवडीने येते...

या या

या या, सवडीने या.

अरे वा!

अरे वा! यंदा कंपूबाहेरील लेखनही दिसते आहे. अभिनंदन. ११० नोंदींपैकी ज्यांनी संमती दिली नाही त्यांचीही यादी द्याल का? आंतरजालीय लेखनाचा विशेष म्हणजे इंप्रेशनमारूपणा. पण बाकी अंक प्रथमदर्शनी छान झाल्यासारखा वाटतो आहे. स्वाती आंबोळे ह्यांच्या कविता आवडल्या.मागच्या वर्षीचे प्रतिसाद पाहता 'उपक्रमातून प्रोत्साहन मिळेल' अशी आशा संपादकांनी प्रस्तावनेत व्यक्त केलेली दिसली. असो. आंतरजालीय लेखनाचा विशेष म्हणजे इंप्रेशनमारूपणा. तूर्तास "अबोध जाणिवांपलिकडे उत्तर शोधणारे आपले आपणच." हाहाहाहाहा.

बाकी मेघना भुस्कुटे ह्या सदस्या उपक्रमावर फक्त जाहिराती करायलाच येतात की काय!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

इंप्रेशनमारूपणा

आंतरजालीय लेखनाचा विशेष म्हणजे इंप्रेशनमारूपणा.

इंप्रेशनमारूपणा म्हणजे नेमके कसे?

मेघना भुस्कुटे ह्या सदस्या उपक्रमावर फक्त जाहिराती करायलाच येतात की काय!

शक्य आहे. उपक्रमावर सदस्य येतात हेच खूप आहे सध्या. असो. मध्यंतरी हे संकेतस्थळ स्पॅम बॉट्सचेच होईल की काय अशी शंका आली होती पण सध्या त्यांचे दर्शन होत नसल्याने त्यांचा निकाल लागला असावा असे वाटते.

असो. अंक चाळला. चांगला वाटला.

अंक जालावरून गायब

उदाहरणे देणार होतो. पण अंक जालावरून गायब झाला आहे. एक आठवले माझ्या प्रियकराची प्रेयसी असे काहीसे होते. ते भलतेच मनोरंजक होते. ;) असो. बघतो. कुठे जतन केला आहे काय.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अंक येथे आहे.

रेघेवरची अक्षरे येथे आहे. --- वाचक्नवी

चांगला अंक

दिवाळी अंक छान आहे. नचिकेत गद्रे यांच्या ब्लॉगची यानिमित्ताने ओळख झाली. बी.पी.ओ. या कथेतील वातावरणनिर्मिती झकास आहे. बाकीचे लेखही नेहमीप्रमाणेच.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यवाद

बर्‍यावाईट प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद मंडळी.

- मेघना भुस्कुटे

छान अंक

क्लोज एन्काउंटर्स ऑफ चायनीज काईंड हा चिमण यांचा लेख आधीही वाचला होता. आता परत वाचताना तितकाच आवडला. या वर्षी राबविलेली परिसंवादाची कल्पना फार उत्तम. एकच गोष्ट खटकली ती म्हणजे फक्त ऑगस्ट महिन्यातील नोंदींचाच यात समावेश झाला आहे. पुढील वर्षी शक्य झाल्यास पूर्ण वर्षातील नोंदींचा विचार व्हावा. तसेच अंक सहज व वर्षभर उपलब्ध होईल अशी काही सोय (उदा. स्वतंत्र डोमेन) करावी.

 
^ वर