उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
वी आर लाइक धिस ओन्ली..
आरागॉर्न
November 2, 2010 - 12:17 pm
ब्लॉग आणि संकेतस्थळांवर लेख ढापले गेल्याच्या बर्याच घटना घडल्या आहेत. बरेच लोक आंतरजाल, ब्लॉग वगैरेंना नवीन असतात, प्रताधिकाराची नीट कल्पना नसते वगैरे कारणे असू शकतात. पण इंडिया टूडे च्या एडिटर-इन-चिफनेच ढापाढापी करून लेख लिहावा याला काय म्हणावे?
मूळ लेख इथे.
इंडिया टुडेचे संपादकांचे पत्र इथे. यातील पहिले दोन परिच्छेद स्वल्पविरामाचाही बदल न करता जसेच्या तसे ढापले आहेत.
याचा बोलबाला एडिटर अरूण पूरी यांनी लेखक ग्रेडी हेंड्रिक्स यांना क्षमस्व म्हणून जी मेल पाठवली तीही अशी की जसे काही तुमच्यावर उपकारच करतो आहोत. याला उत्तर म्हणून ग्रेडी हेंड्रिक्स यांनी इंडिया टूडेसाठी लिहीण्याची तयारी दाखवली. तुम्ही कट-पेष्ट करण्याऐवजी मीच सगळे लिहीतो. वर मी जास्त पैसेही मागणार नाही अशी पुस्ती जोडली.
जर इंडिया टुडेचे संपादक या लायकीचे आहेत, तर पुढे काय बोलावे?
दुवे:
Comments
आणखी एक
वाचकांच्या प्रतिक्रियांमध्ये इंडिया टुडेचे आणखी एक उदाहरण सापडले.
--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/
चोरीमारी
हमाम में सब नंगे होते है या उर्दू म्हणीची आठवण होते. रजनीकांत किंवा एकूणच दाक्षिणात्य गोष्टींबाबत बाबत जी साचाबद्ध माहिती उत्तर भारतात आहे, ते पाहून पुरींनी चौर्यकर्म करण्यात आश्चर्य काही वाटत नाही. टाईम्स नाऊ, रॉयटर्स किंवा सीएनएन-आयबीएनचे लेख भाषांतर करून खपविणारे अनेक पत्रकार आहेत. मात्र मिल्स आणि बून बाबतही असा प्रकार व्हावा, हे एकाचवेळी गंमतीचे आणि लज्जास्पद आहे.
'काय वाटेल ते'च्या महेंद्र कुलकर्णींना असे अनेक विदारक अनुभव आहेत. ते त्यांनी मांडलेही आहेत.
बाकी पुरी काय किंवा अन्य संपादक काय, त्यांच्या जागी केवळ स्वतःच्या कुवतीवर पोचतात असे नाही. आंतरजालामुळे अशा चोऱ्या पकडल्या जात आहेत, हे त्यातल्या त्यात उत्तम.
माहिती
रजनीकांतच्या कुठल्याही लेखातील काही माहिती सारखी असेल तर समजू शकतो. त्याचे किती चित्रपट झाले, गाजलेले कुठले वगैरे. पण एकाही स्वल्पविरामाचा बदल न करता आख्खे परिच्छेद ढापणे हे लाजिरवाणे आहे.
यावर पुरींचे स्पष्टीकरण असे की ते जेट-लॅग्ड होते. लेखासाठी त्यांनी हापिसातूने माहिती मागविली होती आणि ती कुठून आली हे तपासले नाही. हे ग्राह्य धरले तर संपादकांचे लेख दुसर्या कुणीतरी लिहीलेले असतात हे मान्य करावे लागते. हे ही भूषणास्पद नाही.
--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/
शॉकींग
शॉकींग. जिनी तो अग्रलेख ढापून पुरीचा पापड केला तिला नोकरी घालवावी लागेल असे वाटत नाही.
चांगला
पीजे चांगला आहे, उशिरा लक्षात आला. ;)
--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/
पीजे
पीजे चांगला आहे? य्क्क्क्क्क्
-डॉन कोर्लिओनी
गमती
पत्र परत वाचल्यावर आणखी गमती दिसल्या.
मूळ लेख मुख्यत्वे पाश्चात्य वाचकांसाठी होता. त्यांना रजनीकांत माहीत असेलच असे नाही. म्हणून If you haven't heard of Rajinikanth before, you will on Oct. 1, when his movie Enthiran (The Robot) opens around the world. हे वाक्य त्यांच्या साठी योग्य आहे. पण भारतात रजनीकांत माहीत नाही असा माणूस सापडणे कठीण. त्यामुळे भारतीय वाचकांसाठी हे वाक्य विनोदी होते.
मूळ लेखात जॉर्ज लूकास यांच्या कंपनीने स्पेशल इफेक्ट केल्याचे म्हटले आहे, ते चूक आहे. ती चूकही जशीच्या तशी छापली.
संपादक इतक्या निष्काळजीपणे आपले मनोगत मांडत असतील तर कठीण आहे.
--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/
लाजिरवाणी गोष्ट
भारताचे "टाईम" मासिक म्हणवून घेण्याची मनीषा असलेल्या "इंडिया टुडे"च्या संपादकाकडून हे वागणे लाजिरवाणे आहे.
+१.
हेच म्हणतो.
-Nile
आश्चर्य नाही
अनेक भारतीय प्रकाशनांमध्ये चोरीमारीच्या घटना नियमितपणे होत असतात. यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अशोभनीय
नक्कीच अशोभनीय कृत्य आहे हे.
ती माफीची मेल मात्र मजेदार (मुजोर !) आहे. विशेषतः त्यावरची मूळ लेखकाची ही टिप्पणी फारच आवडली-
Finally, there is the beauty of, "I would also like to apologize to you as well." OK, go for it. Feel free. I'm waiting. Are you going to—oh, I get it. The expression of the desire to apologize was the actual apology. Psych !
:)
सहमत
मला ही गोष्ट अधिक खटकली. इतक्या मोठ्या पदावरील व्यक्तीकडून अक्षम्य चूक झालेली असताना जर प्रांजळपणे माफी मागितली असती तर लोकांचे मतही सौम्य झाले असते. इथे म्हणजे गिरे तो भी टांग उपर अशातला प्रकार आहे, तो डोक्यात जातो.
--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/
आश्चर्यकारक
काय बोलणार या बातमीसमोर? :-)
ते
ते अरूण पुरी म्हणे कोट्याधीश आहेत. त्यामुळे त्यांनी इ-मेल पाठवली हेच खूप झाले :)
--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/
खेदजनक
ही बातमी पहीली नाही की शेवटची नसेल. कधीना कधी पुन्हा हे असेच घडणार. :-(
जे घडले व माफीचा प्रकार खेदजनक.