जिवंत शिल्प

पेरियार अभयारण्य, टेकडी येथे काढलेला एक फोटो -

कॅमेरा : कोडॅक Z712 IS
आयएस्ओ: ६४
एक्स्पोजर: 1/320 sec
एपर्चर: 4.0
फोकस : 52.2mm

आपल्या मतांचे स्वागत आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

शब्दातीत

शब्दातीत! भाग्यवंत आहात.

सहमत

सहमत. वर्णनापलीकडचे प्रकाशचित्र.

छान

छानच!

अप्रतिम !

फोटो फारच आवडला.

अप्रतिम

वेळ व अँगल अचूक टिपणे हे कौशल्य व भाग्य दोन्हीवर अवलंबून असते.
लेखाचे नावही सुसंगत...

||वाछितो विजयी होईबा||

प्रकाटाआ

अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/
क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती....... क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.......

उत्तम

पक्षी उडायच्या तयारीत असावा किंवा आत्ताच येऊन बसत असावा किंवा पंख झटकत असावा.
कुठल्याही परिस्थितीत हा क्षण पकडायला कौशल्य हवेच. थोडा ऑफ सेंटर असल्याने अधिक रंगत आहे. सुंदर शिल्प.
--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

झकास!

एकच शब्द. झकास! गॉदिक मिनारावरील शिल्प वाटते आहे. त्या गिधाडावर जो प्रकाश पडला आहे त्यामुळे तर अद्भुत वाटते आहे. बाकी तांत्रिक बाबींबाबत बोलायला तज्ज्ञ आहेतच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

गरगॉयल

गॉदिक मिनारावरील शिल्प वाटते आहे. त्या गिधाडावर जो प्रकाश पडला आहे त्यामुळे तर अद्भुत वाटते आहे.

अगदी अगदी! गरगॉयलच. ;-) समोयोचित चित्र आहे. :-)

आवडले हे. वे.सां. न.

कोर्मोरँट

छान चित्र. कोर्मोरँट पक्ष्याची पंख पसरून बसण्याची विशेष शैली छान दिसते आहे. (गूगलवर या पक्ष्याचे मराठी नाव शोधता "पाणकावळा" असे आहे.)

सुंदर चित्र टिपण्याचे अवधान असणे महत्त्वाचे. प्रकाशाचा स्रोत "उलट" असल्याकारणाने पक्षी आणि भग्न खोड काळेकभिन्न दिसते आहे - सिल्हुएट् चित्रण-पद्धतीचे उत्तम उदाहरण आहे.

सुंदर

पार्श्वभूमी धूसर पण काहीतरी पोत असलेली आल्यामुळे चित्र आणखीन बहारदार झालं आहे. चित्राचा फोकल पॉइंट १/३ अंतरावर ठेवण्याचा 'नियम' असतो - तो इथे प्रत्यक्षात आलेला दिसतो. उजव्या कोपऱ्यात दिसणारी प्रकाशशलाकाही छान.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

छान

चित्र आवडले.

त्या सुळक्याच्या खालचाही भाग आला असता तर अधिक आवडले असते. पण चित्र सुंदर आहे.

अहा!

अहा! अप्रतिम!!!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

लै भारी.

विसुनाना, लै भारी फोटो.
दोन बोटांच्या चिमटीत पक्षी पकडला आहे, असे वाटले.

-दिलीप बिरुटे

पंख वाळवणारा सूरमार

मोठा पाणकावळा - (याला पाणकावळा का म्हणायचे ते कळले नाही.)
पाण्याखाली सूर मारून मासे पकडण्यात तरबेज पक्षी.
बदकासारखे तेलकट पंख नसलेल्या या पक्ष्याला डुबकीनंतर पंख वाळवावे लागतात. म्हणून तो सूर्याकडे पाठ करून बसतो.
मी पाहिलेले पाणकावळे जवळजवळ २ मिनिटे पाण्याखाली जात होते.
ते जिथे तरंगत असत तेथून अचानक पाण्याखाली नाहीसे होत आणि काही वेळाने कोणत्याही दिशेला वीसेक मीटर दूर पाण्यातून बाहेर येत.
ते कोठून बाहेर येतील त्याचा अंदाज लावणे हा एक मजेदार खेळ होता.

हा फोटो एकाच प्रयत्नात आला आहे. वेळ सकाळी आठ-सव्वा आठ.
पेरियार नदीवरील धरणामुळे तयार झालेल्या जलाशयात कुजून वाळलेल्या झाडांची बरीच खोडे आहेत. त्यातल्याच एका जुळ्या खोडावर हा पक्षी बसला होता.
दुरून पाहिला तर खोटाच (कृत्रिम) वाटत होता.
या अँगलसाठी पुढे सरकणार्‍या लाँचमध्ये काही काळ दबा धरून बसावे लागले, इतकेच!

सर्व प्रतिसाददात्यांचे आभार.

फार सुंदर

फार सुंदर - दिवाळी अंकासाठी राखून ठेवायला हवा होत :)






बॅकलाईट

अप्रतिम! बॅकलाईटने या प्रचित बहार आणलेली आहे. सुंदर रचना!

सुंदर चित्र

चित्रातले सगळेच गुण जमले आहेत. विशेषतः पंखांची किनार आणि मागून येणारा प्रकाश खूप आवडला.
फोकस ५२.४ वरून वाटते की चांगलाच जवळून काढला गेला असणार.

प्रमोद

मस्त

एकदम मस्त!
चित्राचे नावही सुसंगत! :)

छान

सुरेख चित्र. फार आवडले.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हॅरि

हॅरी पॉटर ऍन्ड ऑर्डर ऑफ फिनिक्स् मधला पक्षी हाच काय??

 
^ वर