परंपरा, चालीरीती या मुळे आपण वस्तूंची नासाडीच जास्त करत असतो.

एकीकडे वस्तूंची टंचाई आणि दुसरी कडे परंपरा, चालीरीती या मुळे आपण वस्तूंचा योग्य वापर करण्या ऐवजी वस्तूंची नासाडीच जास्त करत असतो. पुरातन काळात वीज नसल्या मुळे रात्री प्रकाशा साठी तेला तुपाचे दिवे लावले जात असत. मोठ्यांच्या घरी यात उंची अत्तर मिसळून प्रकाशा बरोबर वातावरण सुगंधमय केले जात असे. पण सन १८८९ मध्ये विजेच्या दिव्याचा शोध एडिसन ने लावला आणि मानवी जीवनाच्या जगाच्या प्रकाशाचा इतिहासच बदलून गेला. जगात मानवी जीवनाला कलाटणी देणारे अग्नी , शेती, गोल चाक, शस्त्र या प्राचीन शोधा बरोबरच आधुनिक छपाई आणि वीज मोठा वाटा आहे. संगणक खूप नंतर १९५० च्या आसपासचा.म्हणजे नवीनच पण याने जगात सर्व शोधांना विकासाच्या बाबतीत मागे टाकले. जुन्या शोधांच्या विकासास शतकोनोशतके लागली.पण संगणकाने अवघ्या ५० वर्षात सर्व जग व्यापले.

तर माझा मुद्दा वस्तूंच्या नासाडीचा. विजेच्या प्रकाशमान जगात आपण अजून ही तेला तुपाचे दिवे मंदिरा न मध्ये, घरातील देवा समोर जाळले जातात.दक्षिण भारतात तर मंदिरा समोर या तेला तुपाच्या दिव्यांची मोठी आरासच असते. थेंब थेंब या प्रमाणे हजारो टन तेल तूप अनावश्यक रीत्या अश्या रीतीने जाळत असतो. ही नासाडी टाळण्या साठी विजेचे छोटे बल्ब वापरण्यास काय हरकत आहे. या साठी खास नमुन्याचे दिवे समया बनवता येईल. तसेच लग्न मध्ये वधूवरांच्या अंगावर अक्षदा म्हणून अन्नधांन्य टाकणे जे वधूवरांच्या डोक्यावर कधीच पडत नाही. निव्वळ धान्याची नासाडी होय. आपली मते महत्वाची.

लेखनविषय: दुवे:

Comments

विचार करण्यालायक

विचार करण्यालायक.

विजेची बचत केलेली बरी.

पश्चिमेतल्या काही देशात अक्षतांच्या ऐवजी रंगीत कागदाचे छोटेछोटे तुकडे टाकतात. अक्षता बर्‍या की "कॉनफेटी" याबाबत नीट हिशोब केला पाहिजे. खाण्यासाठी उपयोगी नाही असा निकृष्ट दर्जाचा तांदूळ वापरला, तर कागदाच्या कपट्यांपेक्षा बरा, असे मला वाटते.

विजेची पणती वगैरे काही घरांत वापरलेली मी बघितलेली आहे. बॅटरीचा खर्च (पर्यावरणाच्या दृष्टीनेही हिशोब करावा) तेल-तुपापेक्षा कमी असला तर हा पर्याय आहे.

+१

अक्षता बर्‍या की "कॉनफेटी" याबाबत नीट हिशोब केला पाहिजे.

सहमत. अन्यथा, सौर विद्युत, इमारतींतील पर्जन्यसंधारण टाक्या, पवनउर्जा, यांप्रमाणे रोगापेक्षा औषध महाग असे व्हायचे.

अर्थात, जरी नासाडी (फटाके, प्राण्यांचे बळी, दुग्धाभिषेक, अक्षता, मूर्तीविसर्जन) टाळणार्‍या धार्मिक सुधारणा चांगल्या असल्या, त्यांचा पुरस्कार धार्मिकांनी करणे योग्य असले, तरी अंनिस सारख्या संस्थेनेही त्यांचा पुरस्कार करणे हे अधःपतनच आहे.

दुसरा मुद्दा असा की, 'नासाडी करणे' हे 'प्रगत' सजीवांचे एक महत्वाचे लक्षण आहे. मोर प्रियाराधन करण्यासाठी पिसारा दाखवितो तेव्हा 'मला हे परवडते' असे सांगतो. अनेक सस्तन प्राणी 'गंमत म्हणून' शिकार करून पळून जातात. (प्रगत सजीव एकतर नासाडी करतात किंवा लेमिंगसारखे अमर्याद वाढतात.) उलट, किडेमुंग्या खूप काटकसरीने जगतात. मुंगी स्वतःच्या वजनापेक्षा अधिक जड वस्तू उचलून नेते, हत्ती मात्र अजस्र सोंडेने थोडेथोडे गवत उपटत बसतो. 'गंमत म्हणून' प्रवास करून पेट्रोल जाळू नये, मांसाहार करू नये, असे सर्व आयुष्य ठरविले तर जगण्यामागील प्रेरणाच नष्ट होतात असे वाटते.

क्रुपया ह्या बाबतीत काही अधिक माहिती द्याल काय.

>>लेमिंगसारखे अमर्याद वाढतात.
बाकीच्या काही विचारांबाबत संदिग्धता आहे,पण क्रुपया ह्या बाबतीत काही अधिक माहिती द्याल काय. सवडीने व्यनितून दिलीत तरी चालेल.

माहिती

दुवा१, दुवा२.
"Cyclical explosions in population do occasionally induce lemmings to attempt to migrate to areas of lesser population density. When such a migration occurs, some lemmings die by falling over cliffs or drowning in lakes or rivers." अशा गर्दीत जगण्या/मरण्यापेक्षा नासाडी करण्यात किमान थोडी डिग्निटीतरी आहे ना?क्ष्

ठणठणपाळ

तुम्ही जे काय म्हणत आहात ते वर्षानुवर्षे लोकांनी ऐकले वाचले आहेच.

नासाडी टाळावी हे आहेच पण त्यातल्या त्यात ऑरगॅनीक वेस्टचे (??) काही वाटत नाही, नाही मनुष्याला उपयोग अन्य प्राणी, जीवजंतू आहेत ना त्याचा निचरा करायला. पण नॉन ऑरगॅनीक कचरा पर्यावरणाला पर्यायाने प्राणीमात्राला हानीकारक ते टाळण्याकरता प्रयत्न करावेच.

फर्स्ट वर्ल्ड नागरीक व गरीब देशातील नागरीक यांच्या कार्बन फूटप्रिंट मधील एवढा फरक कसा हे समजुन घेताना, प्रगत देशातील शयनगृहात समजा पंखा, एयरकंडीशनर, गादी, मॅट्रेस व पिलो प्रोटेक्ट्रर, साइडबोर्ड बेड, ड्रेसिंग टेबल इ गोष्टी त्यांना बनवायचा खर्च, इंधन, मटेरीयल हे झोपडीत अथवा फुटपाथवर रहाणार्‍या फारतर कोणी टाकून दिलेल्या कापड अंगावर् घेउन झोपणार्‍या लोकांच्या वापरापेक्षा प्रचंड जास्त असणारच. तफावत प्रचंड आहे पण यात कुठे प्रचंड नासाडी आहे असे वाटत नाही. बरेचदा हुशार लोक, विविध स्टॅटीस्टीक्स् सामान्य लोकांना दाखवून बागुलबुवा धाक देत असतात. सगळेच चुकीचे आहे असे म्हणायचे नाही पण ...

तुम्ही तेलाची नासाडी आहे म्हणता, काही देवस्थाने यावर उपाय करत असतीलही. पण तेलाचे व्यापारी, त्यांना पुरवठा करणारे, त्या प्रकल्पातील कर्मचारी, वाती बनवणारे कुटीर उद्योग, समई बनवणारे यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटला नाही तर "कोणाची तरी" ठणठण अजुन वाढेल त्याचे काय?

पुन्हा तंत्रज्ञान अजुन विकसीत होत आहेच, विजेवरचे दिवे, बॅटरीवर चालणारे दिवे असे पर्याय आले मग आता जास्त काळ चालणारे, कमी वीज खर्चणारे दिवे आले, दर दोन चार वर्षानी हे नवे नवे उपाय योजण्यापेक्षा आहे ते चालू दे मग खरच चांगला पर्याय करु असा विचार देवस्थाने करत असतीलही. शिवाय तुम्ही त्यांना दिवा जाळू नये असे सांगणार की पर्याय वापरा असे सांगणार? परत त्यात कोणता चांगला पर्याय? शिवाय त्यांच्या दिवा लावण्याने किती फरक पडतो याचा काय विदा? जेव्हा १०० वर्षापूर्वी वीज नव्हती तेव्हा जितके तेलाचे दिवे लागायचे त्यापेक्षा आता कमी लागतायत की जास्त? त्यावेळी देवळे नव्हती? नासाडी नव्हती? १९४७ मधील तशी नासाडी असतानाचे आकडे व आजचे नासाडी आकडे काय? १९४७ मधील गरीबी, भूकबळी व आजची गरीबी, भूकबळी?

असो तुम्ही रॉबीनहूड तत्वज्ञान सुरु करता तिथे राडा होतो. ते या लेखात टाळल्याबद्दल मनापासून धन्यु!

अगदी हेच

--तुम्ही जे काय म्हणत आहात ते वर्षानुवर्षे लोकांनी ऐकले वाचले आहेच.--

अगदी हेच मी त्यांना अनेकदा प्रतिसादातून सांगितले आहे. पण ते सर्व्हरच्या वीजेची, इंटर्नेट कनेक्शनची, लोकांच्या वेळेची नासाडी करणे थांबवत नाहीत.

'नासाडी करणे' हे 'प्रगत' सजीवांचे एक महत्वाचे लक्षण आहे.

>>सर्व्हरच्या वीजेची, इंटर्नेट कनेक्शनची, लोकांच्या वेळेची नासाडी करणे थांबवत नाहीत.
नुकतेच असे समजले आहे कि, 'नासाडी करणे' हे 'प्रगत' सजीवांचे एक महत्वाचे लक्षण आहे.

मार्गक्रमण

बरं मग आता कोणत्या रस्त्यावरुन मार्गक्रमण करायचे ते सांगा बुवा एकदा.

जगण्याची एक समृद्ध अडगळ

मी लिहिलेल्या मुद्या वर लोक युगानयुगे किंवा मानव निर्माण होण्या पूर्वी अश्मयुगातल्या मानवाचे वंशज म्हणून म्हणवली जाणारी माकडे सुद्धा करत असतील हे मी मान्य करतो.याचाच अर्थ हा विचार इतके युगे चर्चिला जात आहे , म्हणजे त्यात कांही समाज हिताचे आहे हे नक्कीच. एका स्नेहाने त्याच्या घरी समईतील तेलाचा वापर महिन्याला ३ लिटर इतका आहे हे सांगितल्यावर मी विचार करू लागलो . आणि मला भालचंद्र नेमाडे सरांचे हिंदू : जगण्याची एक समृद्ध अडगळ ह्याचा प्रत्यय आला. नवीन स्वीकारताना जुन्या परंपरेला आवशकता नसताना आपण धरून बसतो हे अगदी बरोबर आहे. म्हणून आजच्या लाईट च्या जमान्यात तेलातुपाचे दिवे नाही लावले तर देव कांही नाराज होणार नाही. तसेच "कोणाची तरी" ठणठण अजुन वाढेल त्याचे काय? मुठभर वर्गाच्या हिता करता आपण आदिवासी, शेतकरी यांच्या हिताचा विचार कधी करत नाही तर सर्व समाजाच्या हिताचा विचार करताना व्यापारयाच्या हिताचा विचार करण्याची गरज नाही. त्यांना दुसरे उद्योग करता येतीलच की.?

thanthanpal.blogspot.com

असेच म्हणेन.

>>विचार करण्यालायक.
असेच म्हणेन.

खाण्यास अयोग्य तूप व तेल

एखादे तळण काढून झालेले तेल आणि खाण्यास अयोग्य असलेले तूप (दुकानातून विकत आणलेल्या साजूक तुपाला कधीकधी वास येतो) वापरले तर चालेल की. काही घरांमध्ये 'वापरलेले तेल' देवाच्या दिव्यात वापरत नाहीत. हे चूक वाटते.

ठणठणपाळ आजचा धडा

अक्षदा नाही अक्षता.

अ + क्षता अशी फोड करावी म्हणजे लक्षात राहायला सोपे जाईल.

ठणठणपाळ आजचा धडा

धन्यवाद आपल्या शिकवणी बद्दल

मंदिरांबरोबर घरांनाही गोवणे अयोग्य...

मंदिरांपुढे दीपमाळा लाऊन तेलातुपाची उधळण करण्याबाबत मत/नापसंती व्यक्त केली तर एक वेळ समजण्यासारखे असते, पण घरालाही त्यात धरणे हास्यास्पद वाटते.

खरे तर आजचे जीवन इतके धावपळीचे झाले आहे, की किती घरांमध्ये साग्रसंगीत पूजा होत असेल कुणास ठाऊक? तरीपण काही धार्मिक संस्कार टिकवून ठेवलेली कुटूंबे निदान दिवसातून एकदा देवाला उदबत्ती तरी ओवाळतात. प्रथा अशी आहे, की सकाळच्या पूजेला तुपाचा दिवा लावायचा आणि सांजवात म्हणून तेलाची समई लावायची. याला रोज एक चमचा तूप आणि एक चमचा तेल पुरते. त्यातही एकदा वात लावल्यावर ती आपणहून शांत होईपर्यंतच जळू द्यायची असते. त्यात आणखी तूप-तेल घालायचे नसते.

अगदी टोकाला जाऊन हिशेब मांडायचा ठरवल्यास आपल्यापैकी प्रत्येक घरात ३६५ दिवस रोज सकाळची पूजा आणि संध्याकाळी शुभंकरोती म्हणतात, असे गृहित धरले तरी वर्षाला आपण ३६५ चमचे तूप आणि ३६५ चमचे तेल खर्च करतो. एक चमचा म्हणजे साधारणपणे पाच ग्रॅम्स. याचाच अर्थ घरात वर्षाला देवापुढे जाळण्यासाठी एकूण पावणेदोन किलो तूप व पावणेदोन किलो तेल लागते. जर शुद्ध तूप आणि गोडेतेल वापरले तरी याचा वार्षिक खर्च पाचशे रुपयांच्या आसपास येतो. (डालडा आणि स्वस्त तेल वापरले तर २५० रुपये खर्च) बहुतेक घरांमध्ये निरांजनात जाळण्यासाठी शुद्ध तूप विकत आणावे लागत नाही कारण घरात रोजच्या दुधावर जे सायटे पडते त्यापासून दर चार-पाच दिवसांनी कढवून जे तूप मिळते तेच वापरले जाते. घरात धार्मिक कार्य असेल तर मात्र होमासाठी जादा तूप विकत आणावे लागते. म्हणजे राहिला फक्त तेलाचा खर्च. तो तर १५० रुपयांच्या आसपासच होईल. याला उधळपट्टी म्हणायचे असेल तर म्हणोत बापडे, पण मला वाटते, की आपण हॉटेलातही यापेक्षा अधिक रक्कम एका वेळच्या जेवणासाठी खर्च करत असतो आणि सोसायटीचा मासिक मेंटेनन्स खर्चही यापेक्षा जास्त असतो.

चर्चाच करायची तर ती कुठल्याही विषयावर करता येते आणि त्याची बारीक बारीक सुते काढून चिकित्साही करता येते पण त्यातही काही तारतम्य हवे, असे वाटते. असो. आम्हाला अभ्यासक्रमात राम गणेश गडकरींची (गोविंदाग्रज) एक कविता होती. तिचे नाव 'चिंतातुर जंतू'. यात एका माणसाला जगाची इतकी चिंता लागून राहिलेली असते, की तो सारखा प्रश्न विचारत असतो. या नद्या इतके पाणी वाहून का नेतात? शेवटी ते समुद्राला मिळते ना?. ही उधळणूक बघवत नाही. त्यावर कवी त्याला म्हणतो, 'डोळे झाकुनि घेच गड्या'

यात लाखो मंदिरात जे तेल बरबाद केले जाते त्याचा हिशोब केला नाही.

भारतात अंदाजे एका घरात वर्षाला आपण 3500 ग्राम्स तेल( साडेतीन किलो) आणि चांगले तूप समई साठी वापरल्या जाते असे आपल्या म्हणण्या प्रमाणे मान्य केले , आणि फक्त कमीत कमी
२०,००००००० लोकसंख्या गृहीत धरली तर एका कुटुंबात ४ सदस्य या प्रमाणे 50000000 ( 5 कोटी)
घरे तेल जाळत असतील' ११० कोटी लोकसंख्ये पैकी फक्त २० कोटी.९० कोटी बाकीच्यां जनतेची एव्हढे तेल जाळण्याची क्षमता नाही असे गृहीत धरले आहे. यांचा तेल जाळण्याचा आपल्या किमती प्रमाणे वापर धरून हिशोब केला तर
3.5 kilograms * 50 000 000 = 175 000 000 kilograms एव्हढ्या वजनाचे तेल तूप जळतो.
175 000 000 * 250 = 43 750 000 000 रुपयांचे तेल तूप जाळले जाते.

Search for documents containing the terms 175000000*250.
हा हिशोब कमीतकमी घरे गृहीत धरून केला तर आकडे पाहूनच डोळे मोठे होतील. यात लाखो मंदिरात जे तेल बरबाद केले जाते त्याचा हिशोब केला नाही. बाकी या रक्कमेत काय होवू शकत याचा हिशोब अभ्यासू ने करावा.
माझे गणित कच्चे आहे त्या मुळे आकडेवारी चुकत असेल तर आपण हिशोब कारणे . आकडे कमी जास्त या पेक्षा होणारी नासाडी लक्षात घ्या. या आधी हा अभ्यास कोणी केला असे तर त्याची LINK कृपया द्यावी.म्हणजे मला अधिक अभ्यास करता येईल.
thanthanpal.blogspot.com

तुप कि वीज

आपल्याला म्हणजे भारताला वीजेची टंचाई आहे तुपाची नाहि

वस्तूंची नासाडी होते

वस्तूंची नासाडी होते, हे निर्विवाद आहे. तेलांच्या दिव्यापेक्षा इतर नैसर्गिक गोष्टींची नासाडी होते त्याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे.

शुभप्रसंगी दरवाज्याला आंब्याचे डाहाळे लावायचे, हार करायचे, फुले, पाने वापरायची अशा नैसर्गिक गोष्टी वापरल्या जातात. पूर्वी या गोष्टी सहज उपलब्ध होत्या, वाढत्या शहरीकरणात हे सर्व विकत आणले जाते आणि मग शहराच्या बाजारपेठा फुलांनी, पानांनी ओसंडून वाहतात. बाजारातील या वस्तूंची प्रचंड नासाडी होत असते. शिवाय शहरात सप्लाय करण्यासाठी बाजूच्या गावातून फुले, पाने अक्षरशः ओरबाडून आणल्यासारखी आणली जातात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

विचार करण्यालायक... +१

विचार करण्यालायक हे खरेच..
मात्र दिव्याबद्दल फारसा सहमत नसलो तरी काहि परंपरांमुळे वस्तूंची नासाडी होते हे पटते.
अनेक उदा. देता येतीलर. एक देतो: अभिषेकांमुळे दुधाची, पाण्याची, तुपाची, मधाची, साखरेची नासाडी होते जे खाण्याचे पदार्थ आहेत. याऐवजी शास्त्रापुरते पळीभर पंचामृत वहावे आणि मग ओल्या वस्त्राने देवाला पुसावे असे सुचवतो.

बाकी,

'नासाडी करणे' हे 'प्रगत' सजीवांचे एक महत्वाचे लक्षण आहे. मोर प्रियाराधन करण्यासाठी पिसारा दाखवितो तेव्हा 'मला हे परवडते' असे सांगतो

असेलही.. मात्र माणूस परवडत नसूनही नासाडी करत असेल तर ते प्रगत पणाचे लक्षण आहे का? एकीकडे दोन वेळचे अन्न सगळ्यांना पोहोचत नसताना, भुकबळीने बालमृत्यू होत असताना दूध तूप वगरेंची नासाडी प्रगतीचे लक्षण नाही असे समजतो.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

कमी जेवावे

आहार माफक प्रमाणात घ्यावा. अन्नाची नासाडी कमी होते.

आहार माफक प्रमाणात घ्यावा. अन्नाची नासाडी कमी होते.१०१% बरोबर आह

१०१% बरोबर आहे. मध्यंतरी सारख्या गोळ्या ओषध घेवून ही आजारी पडत होतो. रोजचे डॉक्टर ओषधाचा डोस सतत वाढवत नेत होते , पण फरक पडत नव्हता. एकदा मित्रा च्या सांगण्या वरून एका डॉक्टर कमी समाजसेवक जास्त असलेल्यास हे सर्व दाखवले. ठणठणपाळ तुम्हाला कांही झाले नाही पोट कमी करा मजेत राहा असे हसत सांगितले.त्यांनी सर्व गोळ्या फेकून दिल्या. तुमचा डॉक्टर अश्यात परदेशी जावून आला का? विचारले.नवीन कमी पावर ची ओषधे दिली. अट एकच उकडलेला भाजीपाला आहारात घ्यायचा . नाही म्हणायची सोय नव्हती . आठवड्यात फरक पडून प्रकृती चांगली झाली. ही काल्पनिक कथा नाही .सत्य आहे.
thanthanpal.blogspot.com

 
^ वर