तीर्थरूप दादां आई ना साष्टांग नमस्कार विनंती विशेष!

तीर्थरूप दादां आई ना साष्टांग नमस्कार विनंती विशेष! ............. घरातील मोठ्यांना नमस्कार, लहान भावंडांना आशीर्वाद . कळावे लोभ असावा ही विनंती
आपला नम्र
अ ब क
एकेकाळी भारताच्या टपाल खात्याचे अभिन्न अंग असलेल्या पोस्ट कार्ड चे स्थान भारतीय कुटुंबात अनन्य साधारण होते जिव्हाळ्याचे होते. आमच्या लहानपणी टपाल सकाळी ९ वाजता आणि दुपारी २.३० असे दोन वेळेस वाटप होत होते. पोस्टमन येवून गेल्यावरच दुकानदारांची कामे सुरु होत. त्याच बरोबर त्या काळी नातेवाईक , पाहुणे यांची ख्याली खुशाली प्राप्त होण्याचा १५ पैश्याचे कार्ड हाच सर्वात स्वस्त ,मस्त आणि विश्वासार्थ पर्याय होता. तार हा संदेश वाहनाचा शीघ्र प्रकार पण तार आली की काळजाचा ठोका चुकायचं. कारण तार बहुतेक कोणीतरी मयत झाले किंवा गंभीर आजारी आहे असे संदेश घेवूनच येत असे. टेलिफोन हा प्रकार फक्त ठराविक लोकान कडेच होता, आणि फोन लागणे हा अजून एक अवघड प्रकार होता. फोन मध्ये बोलण्याच्या आवाजा इतरच चित्रविचित्र आवाजच जास्त येत. त्याकाळी त्वरित फोन लावायचा असेल तर लाईटनिंग हा प्रकार होता. हा कॉल लावला तर फोन चटकन मिळे पण चार्जेस प्रचंड असत. टेलिफोन ऑपरेटरला जास्त भाव होता . कारण फोन लावणे न लावणे हे याच्याच हाती असे. सायंकाळी ७ वाजता सामान्य जनतेला बाहेरगावी काल लावणे अवघड होते .कारण या वेळी संपूर्ण फोन खाते रतन खत्रीच्या मटका आकडे संपूर्ण भारतात पासून ते पाक श्रीलंका ईतर आशियायी देशात पोहचवण्याचे काम इमानेइतबारे करण्यात मग्न असे. कारण लाखो मटका खेळणाऱ्याच्या नशिबाचा हार-जीत चा फैसला ठरत असे. १९८२ साली माझ्या गावापासून जवळ असलेल्या परळी सोलापूर रस्त्यावर आमच्या गाडीला अपघात झाला .तेंव्हा अपघाताची कल्पना देण्यास घरी लाईटनिंग फोन लावण्यास रुपये २००/- सरकारी बिल अधिक टेलिफोन ऑपरेटरचे फोन लावून देण्याचे रुपये २००/- असे ऐकून रुपये ४००/- लागले. न देवून काय करता अडला हरी गाढवाचे पाय धरी अशी त्या वेळी आमची अवस्था झाली होती.
आणि आज तोच निरोप फक्त .६० पैश्यात पोहोचतो. फोन क्रांतीची ही कमाल.सर्व वस्तू अनेक पटीने वाढल्या असताना संदेश वहन पैश्यात होत आहे. याचा सर्वात मोठा फटका पोस्ट कार्यालयाला बसला. पोस्ट कार्डाचा खप एकदम कमी झाला. दुसरी कडे सरकार दरबारी बेकायदेशीर असणाऱ्या कुरिअर कंपन्यांनी पाकीट, महत्वाची कागद पत्रे याचा धंदा हडप केला. या मुळे पोस्ट कार्यालयाचे कंबरडे मोडले आहे. अत्याधुनिक टेलिफोन यंत्राने टेलिफोन ऑपरेटरला चे महत्व कमी झाले. आणि तार टेलिग्राम तर बंद मध्येच जमा आहे. लोक पूर्वी सारखे पोस्टमन ची वाट बघत बसत नाही. मोबाईल मुळे तर लैंड लाईन चा सुद्धा जमाना संपला. हे सर्व आठवण्याचे कारण आज जागतिक पोस्ट ऑफिस दीवस जगभरात साजरा केला जातो. ९ ऑक्टोबर १८७४ ला बर्न या स्विस देशाच्या राजधानीत जगातील सर्व पोस्ट मुख्याधिकाऱ्यांची बैठक भरली होती त्यावेळी हा दीवस साजरा करण्याचा निर्णय झाला. आज जगातील १५० पेक्षा जास्त देशात हा दीवस साजरा केला जातो. पण पत्र लिहिण्याची ती सांभाळून ठेवण्याची परतपरत वाचण्याची जी मजा होती ती आजच्या मोबाईल संवादात नाही . ७०व्या दशकात होणाऱ्या पत्नीला लिहिलेली आणि तिने उत्तर दिलेली पत्रे वाचण्याचा आनंद कांही वेगळाच ,पण ती पत्रे आज वाचताना हसू येते आपल्या पोरकट, भावूक, प्रेम पत्रा बद्दल.

Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Comments

जागतिक पोष्ट दिनाच्या.....

पोष्टमन दिसल्यावर लहाणपणी काय आनंद व्हायचा. खाकी कपडे घातलेला आणि सायकलवरुन पत्र टाकणारा पोष्टमन म्हणजे देवदुतासारखा वाटायचा. पत्रही काय झकास लिहिल्या जात असायचे. 'सनविवि' काय नि लिंबूटींबूचा 'गोडगोड पापा' काय. पत्र लिहून झाल्यावर महत्त्वाचा मजकूर आठवल्यावर 'ताजा कलम' काय. गेले ते दिन गेले. लै पत्र लिहायचो मित्रांना...!

असो, आपण म्हणता तसे सत्तरच्या दशकाचे माहिती नाही. पण नव्वदीच्या दशकातही तो सर्व पोरकटपणा [पोरकटपणा तरी कसा म्हणावा] इंजॉय केला आहे. बरेच दिवसानंतर आलेले पत्र काय आनंद देत असायचे. जाने दो.......!

जागतिक पोष्ट दिनाच्या सर्व पोष्टमनांना, त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांना, एक पत्र वाचक-लेखकाकडून मन:पूर्वक शुभेच्छा.......!!!!

-दिलीप बिरुटे

मजकूर संपादित.

तीर्थरूप आई दादा का दादा आई

तीर्थरूप दादां आई ना साष्टांग नमस्कार विनंती विशेष! .
हे वाक्य तीर्थरूप आई व दादा यांना साष्टांग नमस्कार विनंती विशेष. असे हवे होते असे मला वाटले. का ते माहित नाही.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

लेडीज् फष्ट?

लेडीज् फर्स्ट का?

संपूर्ण

संपूर्ण लेखात बहुदा हे एकच वाक्य खटकले, म्हणजे ठणठणपाळ यांनी उपक्रमावर लिहीण्याच्या बाबतीत प्रगती केली असे म्हणायला हरकत नाही.
अभिनंदन, ठणठणपाळ!

बाकी मध्यंतरी भारतात गेले असताना टपाल सेवेची अशी वाट लागल्याचे पाहून वाईट वाटले होते.
तरी फोनमुळे सगळे खूपच सोपे झाले आहे हे नाकारता येत नाही.
मला भारतातील कुरिअर सेवेचा विशेष अनुभव नाही पण अनुभव वाचून सरकारी टपालसेवेची अशी स्थिती होण्याइतके ते वाईट होते असे वाटत नाही.

मलाही खटकले, पण..

मला बहुदा खटकले. यावरून काय आठवावे? माघ कवीला आणण्यासाठी कालिदासाने पालखी पाठवली होती. पालखीत बसलेल्या कवीने पालखी वाहणार्‍या एका भोयाला विचारले? "कं बलवन्तं न बाधते शीतम्‌? " उत्तर मिळाले, " न बाधते तथा मां हि, यथा बाधति बाधते।"--वाचक्‍नवी

फरक

मला वाटते की "कं सञ्जधान कृष्णः, का शीतलवाहिनी गङ्गा| के दारपोषणरताः, कं बलवन्तं न बाधते शीतम्||" या द्वयर्थी सुभाषिताचा त्या भोयाच्या (जो कालिदासच होता) वाक्याशी संबंध नाही.

पत्र म्हणजे कसं असायचं, जितकं हवं आहे तितकंच. मीठ जसे अन्नात.

जमाना बदलला, पोस्ट-पत्रे गेली, EMAIL आले.

>>पत्नीला लिहिलेली आणि तिने उत्तर दिलेली पत्रे वाचण्याचा आनंद कांही वेगळाच ,पण ती पत्रे आज वाचताना हसू येते आपल्या पोरकट, भावूक, प्रेम पत्रा बद्दल.
भावना त्याच आहेत, पण आता आम्ही GMAIL मध्ये बघून हसतो.

आजकाल इकडे तिकडे कुठे गेलो कि ACTIONVOIP(संपूर्ण जगात १ रुपयात call) , आणि SKYPE जिंदाबाद.

अवांतर : आमच्या मातोश्रींनी वयाच्या ५५ व्या वर्षीही SKYPE , संगणकावरून फोन करणे शिकून घेतले आहे.
(कधी कधी ह्या आधुनिक साधनांचा अतिरेक होतो आहे असे वाटते. पत्र म्हणजे कसं असायचं, जितकं हवं आहे तितकंच. मीठ जसे अन्नात)

>>जागतिक पोष्ट दिनाच्या सर्व पोष्टमनांना, त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांना, एक पत्र वाचक-लेखकाकडून मन:पूर्वक शुभेच्छा.......!!!!
असेच म्हणतो.

.६० पैशे?

आज तोच निरोप फक्त .६० पैश्यात पोहोचतो

.६० पैशात निरोप पोचवणारा कोणताही प्लॅन कोणत्याही कंपनीचा नाही. तुम्ही चुकीची माहिती देत आहात.

खाली वोडाफोन चे भाव पत्रक दिले आहे. केवळ वेळ घालवायचा म्हणून लिह

टैरिफ योजनाओं
एमआरपी (रुपये) 66 67
खाली वोडाफोन चे भाव पत्रक दिले आहे. केवळ वेळ घालवायचा म्हणून लिहित नाही . जे लिहितो ते पूर्ण माहिती घेवून लिहितो. आणि फोन चे भाव आज जितके सेंकंद बोलाल तेव्हडेच लागतात हे आज बालवाडीत जाणाऱ्या मुलानाही माहित आहेत
प्रयोज्यता नए ग्राहक नए ग्राहकों
प्रारंभिक 35 35
सिम कार्ड वैधता आजीवन आजीवन
1 वर्ष के लिए 1 वर्ष के लिए स्थानीय कॉल दरों
वोडाफोन करने वाली वोडाफोन 1p/sec 50p/min कॉल
वोडाफोन - अन्य 1p/sec 50p/min मोबाइलों
Landlines 1p/sec 50p/min करने के लिए
एसटीडी 1 के लिए 1 वर्ष वर्ष के लिए कॉल दरों
वोडाफोन करने वाली वोडाफोन 1p/sec 50p/min कॉल
वोडाफोन - अन्य 1p/sec 50p/min मोबाइलों
Landlines 1p/sec 50p/min करने के लिए
आईएसडी कॉल दरों दुवा

कमीत कमी दर १ पैसा आहे

दरपत्रक पाहिले. कमीत कमी दर हा १ पैसा आहे. ०.६० पैसे इतका कमी दर कुठेच आढळला नाही. म्हणजे तुम्ही पूर्ण माहिती न घेता लिहिले आहे किंवा पूर्ण माहिती असूनही चुकीचे लिहिले आहे. ०.६० रुपये किंवा ६० पैसे असा दर लिहिला असता तर ते योग्य वाटले असते.

जे बालवाडीत जाणाऱ्या मुलालाही माहीत आहे ते तुम्हाला माहीत नाही हे पाहून अंमळ मौज वाटली.

बालवाडीत जाणाऱ्या मुलालाही माहीत

कारण मी आजच्या मुलानं सारखा बालवाडीच्या घाण्याला बांधल्या गेलो नव्हतो.

?

??

.६० पैशाचे स्पष्टीकरण दिले नाहीत

तुम्ही .६० पैशाचे स्पष्टीकरण दिले नाही, ठणठणपाळ. विषय बदलण्यात तरबेज आहात.

छान लेख

नवीन तंत्रज्ञानामुळे माहिती इकडून तिकडे नेणे हे अतिशय स्वस्त बनलेलं आहे. पत्रं, विशेषतः जवळच्यांची, रोज येत नसत. त्यामुळेच की काय पण पत्र मिळाल्यावर एके काळी जो आनंद होत असे तो आजकाल कमी झाला असं वाटतं. अर्थात कमी आनंद देणारी पण तुलनेने खूपच अधिक पत्रं (इमेल वगैरे) आजकाल मिळतात...

पोस्ट खात्याची व्याख्या कागदी पत्रं वा वस्तु इकडून तिकडे नेणारी व्यवस्था अशी केली तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 'पत्र'व्यवहार निश्चितपणे खालावला आहे. पण जर त्याची व्याप्ति वाढवून 'संदेश ने आण करणारी व्यवस्था' अशी व्याख्या केली तर त्यात फोन, इंटरनेट, कागदी पत्रं, कुरियर व्यवस्था या सगळ्या गोष्टी येऊ शकतील. या सर्वांचा एकत्रित वापर वाढत चालला आहे.

>>जागतिक पोष्ट दिनाच्या सर्व पोष्टमनांना, त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांना, एक पत्र वाचक-लेखकाकडून मन:पूर्वक शुभेच्छा.......!!!!

देशातल्या दुर्गम भागांत, शहरांमध्ये (एके काळी) कित्येक मजले चढून दारात पत्रं टाकणारे पोस्टमन, व पोस्ट खातं यांना मनःपूर्वक शुभेच्छा...

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

'संदेश ने आण करणारी व्यवस्था'

पण जर त्याची व्याप्ति वाढवून 'संदेश ने आण करणारी व्यवस्था' अशी व्याख्या केली तर त्यात फोन, इंटरनेट, कागदी पत्रं, कुरियर व्यवस्था या सगळ्या गोष्टी येऊ शकतील. या सर्वांचा एकत्रित वापर वाढत चालला आहे.सहाबजी आपले म्हणणे १०१% खरे आहे . पण नोकरशाही,राज्यकर्ते नामक मांजराच्या गळ्यात घण्टा कोण बांधणार ?
thanthanpal.blogspot.com

घंटा संबंध

हात्तीच्या. या चर्चेतही नोकरशाही आणि राज्यकर्ते यांचा संबंध कसा आला बुवा!

चर्चेतही नोकरशाही आणि राज्यकर्ते यांचा संबंध कसा आला बुवा!

कारण हा देश तुम्ही आम्ही चालवत नाही, तर हे मुठभर शहाणे नोकरशाही आणि राज्यकर्ते राजधानीच्या वातानुकुल हस्तिदंती खोल्यात बसवून चालवतात त्यांचा आणि जनमताचा जनहिताचा संबंध केंव्हाच संपला आहे. राजकर्ते निदान ५ वर्षांनी हात जोडतात पण एकदा नेमणूक झाली की नोकरशाही तुमच्या कडे ढुंकूनही पाहत नाही

ते ठीक आहे

पण पोष्टखात्याबाबतच्या लेखात त्याचा संबंध कसा आलाय ते सांगा ना.

टाईमपास पण पोष्टखात्याबाबतच्या लेखात त्याचा संबंध कसा

टाईमपास पण पोष्टखात्याबाबतच्या लेखात त्याचा संबंध कसा राजेश सरांनी पोस्ट खात्याची जी सर्वांगीण व्याख्या केली ती अतिशय बरोबर आहे . आणि पोस्ट खात्याचे महत्व आणि उत्पन त्यामुळे वाढणार आहे. आता हा निर्णय जनता तर घेवू शकत नाही. आणि प्रत्येक पक्षाला खुष ठेवण्या साठी अनेक मंत्री पदे निर्माण करावी लागतात त्या करता मग खात्यांची चिरफाड करावी लागते मग मंत्री पदे आणि नोकरशाहीची पदे वाढतात. या साठमारीत मग खात्यांचा संकोच होतो. आणि ही मंडळी फक्त स्वस्वार्थ: पाहतात मग खात्याची परवड होते हे पोस्ट बाबत झाले आहे. पोस्ट या मोठ्या खात्यातून अनेक खाती वेगळी केल्या गेली
thanthanpal.blogspot.com

thanthanpal.blogspot.com

अनुभव

नुकतेच एक महत्त्वाचे कागदपत्र दिल्लीला पाठवायचे होते म्हणून पोस्टाच्या स्पीडपोस्ट सेवेचा उपयोग करायचे ठरवले. स्पीडपोस्ट ही सेवा कुरिअरच्या समांतर म्हणून सुरू करण्यात आली होती. त्यामुळे दोन दिवसात पत्र दिल्लीला पोचेल अशी अपेक्षा होती.

पोस्टात चौकशी केली असता मुंबईहून सोमवारी सकाळी दिलेले पत्र शुक्रवारी दिल्लीला पोचेल असे सांगितले. इतके दिवस का? असे विचारल्यावर त्या प्रश्नाचे उत्तर न मिळता "तुम्हाला नसेल पाठवायचे तर नका पाठवू" असे उत्तर मिळाले. ग्राहकाचा किमान शब्दात कमाल अपमान करण्याच्या प्रवृत्तीत राजकारण्यांचा कुठे संबंध येतो हे कळत नाही.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

सविस्तर आणि डोळसपणे वाचन केले तर मी काय म्हणतो काय संदर्भ देतो

एक प्राचीन म्हण आहे यथा राजा तथा प्रजा .श्रीकृष्ण अर्जुनास कर्मवादाचा व अनासक्त कर्माचा उपदेश करत होते; याचे कारण त्याने स्वार्थ वा त्यागाचा विचारही मनात न आणता युद्ध करावे हा होताच; शिवाय अर्जुन राजा असल्यामुळे त्याने आपल्या प्रजेसमोर आदर्श घालून द्यावा, असेही श्रीकृष्णांस वाटत होते. 'यथा राजा तथा प्रजा' असे सुभाषित आहे. 'राजा कालस्य कारणम्' असेही वचन आहे. म्हणजेच राजावर इतरेजनांपेक्षा वेगळी आणि महत्त्वाची जबाबदारी असते. ती लक्षात घेऊन त्याचे वर्तन असावे, अशी अपेक्षा असते. समाजातील श्रेष्ठ लोक जसे वागतात, ती गोष्ट सामान्य लोक प्रमाण मानतात. श्रीकृष्णांनी ही शिकवण अर्जुनास दिलेली असली, तरी ती जगातील तमाम नेतेमंडळींना लागू पडते. नेते जसे वागतात, तसेच जनता ही वागते कर्मयोगाचा हा सिद्धांत असा राजास, नेत्यांस विशेष लागू आहे. याबाबत ज्ञानेश्वर म्हणतात, 'एथ वडील जें जें करिती। तया नाम धर्मु ठेविती। तेंचि येर अनुष्ठिती। सामान्य सकळ।। हें ऐसें असे स्वभावें। म्हणोनि कर्म न संडावें। विशेषें आचरावें। लागें संतीं।।' वडील माणसे जसे वागतात, त्यालाच सामान्य लोक 'धर्म' मानतात. याचे भान ठेवून नेत्यांनी कर्म न सोडता अधिक दक्ष राहावे, असे ज्ञानेश्वर म्हणाले असले, तरी नेत्यांवर त्यांचा काहीच प्रभाव नाही, हे दुदैर्व. सविस्तर आणि डोळसपणे वाचन केले तर मी काय म्हणतो काय संदर्भ देतो हे लक्षात येईल http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1657168 ही लिंक वाचा.

thanthanpal.blogspot.com

अडचण

पण राज्यकर्ते सविस्तर आणि डोळसपणे वाचन करायला शिकत नाहीत तोवर संदर्भ समजण्याची कुवत थत्तेंना कशी येणार?

इट ह्यापन्स

ग्राहकाचा किमान शब्दात कमाल अपमान करण्याच्या प्रवृत्तीत राजकारण्यांचा कुठे संबंध येतो हे कळत नाही.

इट ह्यापन्स वन्ली इन इंडिया :)
पोष्ट खाते, इतर कुठलेही सरकारी खाते, पुणे विद्यापीठ, जयकर ग्रंथालय, महाराष्ट्र ब्यांक या सर्व ठिकाणी किमान शब्दात कमाल अपमान करण्याच्या पात्रतेवरच उमेदवार निवडले जातात.

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

धादांतवाद

पुणे विद्यापीठात त्रास होतो हे खरे आहे.

पण आजकाल अनेक सरकारी खाती एफिशियंट झाली आहेत.
माझ्या अनुभवानुसार आश्चर्यकारकरीत्या सुखद सेवा देणारी नमुन्यादाखल काही सरकारी कार्यालये
१. बेंगळूरः इन्कमटॅक्स कार्यालयाचे सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर
२. पुणेः एनएसडीएल - पॅन प्रोसेसिंग सेंटर बाणेर
३. पुणेः शिवाजीनगर पोस्ट ऑफिस
४. स्टेट बँक वगळता इतर सार्वजनिक बँका (महाराष्ट्र बँकेचे अनुभव चांगले आहेत - एकदा आयसीआयसीआय बँकेचा अनुभव घेऊन पाहाः

मला चांगला अनुभव आला आहे

पोस्टखात्याच्या स्पीडपोस्ट सेवेचा मला अतिशय उत्तम अनुभव आला आहे. पुण्याहून बेंगळुरूला दोन दिवसात पत्र पोचले.

पोष्टाच्या इतर सेवांच्या बाबतीतही मी समाधानी आहे. पुण्यातील अनेक पोस्ट ऑफिसांमध्ये कामाच्या तुलनेत कामगारांची संख्या फार कमी असल्याने कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. अमेरिकेतील पोष्ट ऑफिसांमध्ये मला रेसिस्ट आणि अपमानकारक अनुभव दोन ठिकाणी आले. मात्र अपमानकारक अनुभव भारतात -पुण्यात असूनही- कुठे आला नाही. एकदोनदा तर अमुकतमुक पत्ता कुठे सापडेल हे शिवाजीनगर पोस्ट ऑफिसात विचारले तर पोष्टमनने कागदावर नकाशा काढून दिला.

योग्यच!

हात्तीच्या. या चर्चेतही नोकरशाही आणि राज्यकर्ते यांचा संबंध कसा आला बुवा!

नाहीतर धागा ललित होईल ना!
तो तसा होऊ नये म्हणून माझीही मदतः

पत्रं, विशेषतः जवळच्यांची, रोज येत नसत. त्यामुळेच की काय पण पत्र मिळाल्यावर एके काळी जो आनंद होत असे तो आजकाल कमी झाला असं वाटतं.

स्टोकॅस्टिक नसलेल्या जगात, संवेदना जाणविण्यास शिकण्यापेक्षा संवेदनांतील केवळ बदल जाणविण्यास शिकणे सजीवांना स्वस्त असते. त्यामुळे, बहुतेक संवेदना, मग त्या आनंददायी असोत वा दु:खद, जर सतत जाणवत राहिल्या तर त्यांची तीव्रता कमी होते. परंतु या नियमाचा (गैर)फायदा घेण्यास मानव शिकला आहे. रोलरकोस्टरचा प्रवास, वेगवेगळ्या चवींचे/टेक्स्चरचे एकत्रीकरण केलेले अन्न, अशी उदाहरणे देता येतील. विरहानंतरच्या भेटीतील आनंद हेही असेच उदाहरण म्हणता येईल. माझ्या एका मित्राचा असे प्रतिपादन होते की लघवीस जाणे बराच काळ टाळल्यास नंतर लघवी केल्यावर खूप आनंद मिळतो म्हणून तसा प्रयोग शक्य तेव्हा मुद्दाम करावा.

झालंय खरं असं!

ह्यालाच म्हणतात 'कालाय तस्मै नमः!'
प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो...तेव्हा त्याला जे महत्व असतं ते कधीकाळी दुसर्‍या एखाद्या गोष्टीच्या आगमनाने कमी होतं इतकंच...पण कधीही संपूर्ण खच्चीकरण होत नसतं...ह्याचं साधं उदाहरण द्यायचं झालं तर...वीज आली तरी अजूनही घरातले तेलाचे/रॉकेलचे दिवे/मेणबत्त्या वगैरे संपूर्णपणे नष्ट झालेले नाहीये...कधीतरी त्यांनाही महत्व प्राप्त होतंच...मात्र दैनंदिन जीवनातला त्यांचा वापर कमी होणं हे स्वाभाविकच म्हणायला हवं.
पोस्टाचंही तसंच झालंय...मात्र हल्ली पोस्टखातंही निव्वळ जुन्या गोष्टींवर अवलंबून राहिलेलं नाहीये...त्यांनीही कालाप्रमाणे आपल्यात बदल करायला सुरुवात केलेली आहे...त्याचा वेग मंद का असेना...पोस्टाचं महत्व कमी झालं तरी संपूर्ण पोस्ट खातं निदान तुमच्या माझ्या हयातीत तरी बंद होण्याची शक्यता नाही.
जागतिक पोस्ट दिनाच्या समस्त पोश्ट्यांना(हा शब्द पुलं कडून उधार) हार्दिक शुभेच्छा!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

असमान कॉम्पिटिशन

सध्या कॉम्पिटिशनच्या जमान्यात पोष्टखात्याचा वराच धंदा कुरिअरवाल्यांनी खेचला आहे.

परंतु जेथे पोस्टखाते कमी पैशात सेवा देते अशा निममहत्त्वाच्या कामासाठी लोक पोष्टाचा भरभरून वापर करतात असे दिसते. उदा. बुक-पोस्ट. ही सेवा कुरिअर कंपन्या देत नाहीत.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

सहमत

जेथे पत्र पोहोचविणे फायद्याचे आहे तेथे कुरियरवाले पोस्टाचा धंदा खात आहेत. ते मुक्त बाजाराशी सुसंगत असून कल्याणकारी धोरणाच्या विरुद्ध आहे. त्याविरुद्ध काही कायदे येणार होते परंतु कुरियर लॉबीने ते हाणून पाडले असावेत.

कुरियर कंपन्या धुतल्या तांदळाच्या नाहीत

मला पुण्याहून डोंबिवलीला एक कुरियर पाठवायचे होते. माझ्या कार्यालयात 'ब्लू डार्ट' या कुरियर कंपनीचा प्रतिनिधी दररोज येतो. पोस्टात जाणे येणे कार्यालयीन कामाच्या वेळेत शक्य नसल्याने, कुरियर करण्याचे ठरवले. 'सामान्य प्रतीची' सेवा स्वीकारुन २५ रुपये व कुरियरचा लिफाफा प्रतिनिधीला दिला. तीन दिवसांनी ब्लूडार्ट कंपनीने 'डोंबिवलीला सेवा नाही' असे कारण देऊन कुरियर मलाच आणून दिले. २५ रुपये त्यांनीच खाल्ले. वर 'श्रेष्ठ दर्जाची - २५० रुपये प्रति कुरियर' सेवा घेतल्यास डोंबिवलीला कुरियर करता येईल असा सल्ला दिला.

कुरियर कंपनीचा आणखी एक अनुभव

आयसीआयसीआय बँकेने माझे क्रेडिट कार्ड 'एक्सप्रेसइट' नावाच्या कंपनीद्वारे पोचवण्याची व्यवस्था केली. मला एसएमएसही आला. पाच दिवसांनी 'एक्सप्रेसइट' कंपनीने मला फोन करुन 'आमची सेवा तुमच्या क्षेत्रात नाही. तुम्ही कुरियर घेण्यासाठी जगताप डेअरीजवळ या' असे सांगितले.

नोष्टाल्जिया

Nostalgia isn't what it used to be :)

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

बेत

पण ती पत्रे आज वाचताना हसू येते आपल्या पोरकट, भावूक, प्रेम पत्रा बद्दल.

१९९८ ते २००८ मधला आमच्यातला पत्रव्यवहार माझ्या ब्लॉगपोस्टवर टाकायचा बऱ्याच दिवसांपासून बेत केला आहे. पण मी पाठवलेली तिच्याकडली पत्रे काही केल्या परत मिळत नाहीत. थोडी वाट बघू... मग नंतर वाटल्यास मला आलेली पत्रेच टाकू म्हणतो.

( सत्तरीच्या दशकात आणि या दशकातला फरक कळण्याचे मोठे काम साधेल असे वाटते)

पत्रसंग्रह

नवीन संपर्क माध्यम सुविधांची कितीही कौतुक होत असले तरी विश्रब्ध शारदा, अमुक अमुक लेखकाचे अप्रकशित पत्रे अशा पुस्तकांना वाचक मुकणार हे मात्र नक्की!

अप्रकाशित व्यनि

अमुक तमुक लेखकाचे अप्रकाशित व्यनि, आयपी ऍड्रेस बघायला मिळतील की.

आणि

आणि आय डी पण.....

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

 
^ वर