रुपये १००१

बंधुंनो, हायकोर्टाचा निकालाला शांतपणे घटनात्मक पद्धतीनं सामोरं गेल्याबद्दल सगळ्या सगळ्यांचे मनापासुन आभार.
इथुन पुढही सर्व काही वैधानिक मार्गानच अधिकाधिक सामंजस्यानं जाइल अशी मी आशा बाळगतो.
माझ्या माहितीप्रमाणं तुमच्या उपासनेमध्ये थेट मूर्ती पूजनास वाव नाही. मूर्तीपूजेस विरोध केला आहे.
तुम्हाला उपलब्ध जागेत मूर्तीविहीन पद्धतीनं तुम्ही उपासनास्थळ उभारणार आहात असं ऐकण्यात येतय.
त्याबद्दल आपणास शुभेच्छा.
तिथल्या बांधकामासाठी मी वैयक्तिक रित्या १००१रुपयांची देणगी जाहिर करतोय.
(नक्की कधी बांधकाम सुरु करणं शक्य आहे, आणि कधी करणार आहात हे मला ठावुक नाही.)
(ती रोख असावी की ऐनजिनसी हे अजुन ठरत नाहिये.)
तुमचा शुभारंभाचा कार्यक्रम ठरला की कृपया कळवा.
मी जाहिरपणे आपणास हे निमंत्रण मागतोय.
एक सद्भावना दर्शवण्यासाठी ही रक्कम आहे.देशातला बंधुभाव वॄद्धिंगत होइल,दृढ होइल ही आशा आहे.

तुम्हाला मूर्तीपूजा मान्य नाही. ह्या मताचा मी आदर करतो. पण एक कळकळीची विनंती आहे की मूर्ती भंजनाचा क्लॉज जर तुम्हाला शिकवण्यात येत असेल तर तुम्ही स्थल्-कालानुरुप त्यात व्यावहारिक बदल करावा.तुम्ही कुठल्याही मूर्तीचं मंदीराचं दर्शन घ्यावं किंवा गणपतीमध्ये बाप्पाची मूर्ती ओक्यावर घेउन नाचाव असा माझा आग्रह नाही. पण strategy अशी ठेवता आली तर बघा:-
कुठल्याच गैरधर्मीय वाटणार्‍या गोष्टीचं दर्शन घ्यायचं नाही.आणि त्याच्या भंजनाच्या आग्रहाला बळीही पडायचं नाही.
भंजनाचा विचारही सोडुन द्यायचा.
बस्स. इतकच.

--सद्भावनेसहित,
आपलाच मनोबा.
(माझं मतः- आपलं सहजीवन(co-existence) अपरिहार्य आहे. अधिकाधिक विधायक कामानं सर्वच जणं समृद्धी मिळवुयात. )

ता कः- उपक्रमाच्या ध्येयधोरणाची कल्पना असली तरी नक्की काय् आहे ह्याची खात्री नव्हती म्हणुन अध्काधिक् ऑड्यन्सपर्यंत पोचण्यासाठी मी हे इथं टाकलय. हे ध्येयधोरणारत बसणारं नसलं तर क्षमस्व. तरीही जमत असल्यास (ह्या लिखाणचं उद्दीष्ट ध्यानात घेउन)ह्या लिखाणाचा अपवाद करावा ही विनंती/हक्काचा आग्रह् (नियमित वाचक म्हणून).

लेखनविषय: दुवे:

Comments

म्हणजे काय?

तुम्हाला मूर्तीपूजा मान्य नाही. ह्या मताचा मी आदर करतो.

रिकामटेकडा१ आणि रिकामटेकडा२ या दोन काल्पनिक व्यक्ती हिंदूधर्मी आहेत. पण त्यांच्यामध्ये केवळ एकच फरक आहे की मुस्लिमांच्या मूर्तीपूजाविरोधाचा रिकामटेकडा१ आदर करतो तर रिकामटेकडा२ मुस्लिमांच्या त्या मताविषयी तुच्छ भाव बाळगतो.
माझा तुम्हाला प्रश्न आहे की रिकामटेकडा१ आणि रिकामटेकडा२ या दोघांचे निरीक्षण करून त्यांची नावे तुम्ही ओळखू शकता काय? रिकामटेकडा१ आणि रिकामटेकडा२ या दोघांच्या मनोवृत्तीतील फरकामुळे काय असा मोठासा फरक पडतो?

सारांशः मूर्तीभंजन ही कृती क्षम्य असल्याचे तुमचे मत असेल तर तुम्हीही मूर्तीभंजनाचे समर्थन केले असतेत. अन्यथा मूर्तीभंजन ही कृती अक्षम्य असल्याचे तुमचे मत असते. 'आदर करणे' हे निरर्थक, भंपक वर्णन आहे.

सॉरी

धार्मिक कुठल्याही स्थळाला आणि कार्याला देणगी किंवा मदत करीत नाही इतरांनीही करू नये असे वाटते.

लेखाचा बाकीचा भाग बकवास आहे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

 
^ वर