ठोकशाही

कसाबचे वकीलपत्र घेणार्‍या वकिलांवर दबाव आला होता. अंजली वाघमारे यांनी त्याचे वकीलपत्र मागे घेतले. आता जर्मन बेकरी बॉम्बस्फोट खटल्यामध्ये मिर्झा हिमायत बेग याचे वकीलपत्र घेण्यास सुशील मंचरकर या (काँग्रेसशी संबंधित) वकिलांनी तयारी दाखविली आहे. त्याविरुद्ध भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली तर त्याकडे राजकारण म्हणून दुर्लक्ष करणे एकवेळ ठीक आहे. परंतु पुण्याच्या बार असोसिएशननेही "बेगचे वकीलपत्र घेऊ नका" असे आवाहन केले आहे.
बार असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांवर कडक कारवाई आवश्यक नाही काय?
वृत्तपत्रात/दूचिवा वाहिनीवर एखादे छायाचित्र बघितले, वृत्तांत वाचले की लोक स्वतःला जज, ज्यूरी, प्रोसेक्यूशनर आणि एक्जेक्यूशनर समजतात काय? असे घडण्याचे प्रमाण वाढले आहे काय? असल्यास का? लोकशाहीचे, ड्यू प्रोसेसचे खच्चीकरण होते आहे काय?

Comments

स्पष्टीकरण

त्यांची कल्पकता आवडली.

आणखी

कृपया स्पष्टीकरणाचा विस्तार करावा. चाउसेस्क्यूने विरोधकांना सरळ गोळ्या घातल्या होत्या. ही कल्पकता आवडली का?

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

नाही

चाउसेस्क्यूने विरोधकांना सरळ गोळ्या घातल्या होत्या. ही कल्पकता आवडली का?

नाही. पण मुद्यांवर आधारित प्रेरणा घ्यावी असे वाटते.

कोणते

या उदाहरणात कोणते मुद्दे?

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

मूले कुठार:

ध्वनिक्षेपक यंत्रांच्या निर्मिती आणि मालकीवर निर्बंध लादले तर ध्वनिप्रदूषणाच्या संकटावर मात करता येईल.

या

याऐवजी लोकशाही पद्धतीमधील उदाहरणे शोधलीत तर बरे.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

नक्की

पण सापडली नाहीत.
रस्त्यात नमाज पढण्याविरुद्ध डॉम मोरेस यांनी तक्रार केली तेव्हा शिवसेनेच्या मनपाने मुस्लिमांचे लांगूलचालन केले.

बार कौन्सिलचे आवाहन चुकलेले

असे दिसते की "बार कौन्सिल" या संघटनेला सरकारकडून काही एकाधिकार दिलेले आहेत.
"बार कौन्सिल"चे सदस्यत्व असल्याशिवाय वकिली करता येत नाही, असे मुंबई बार कौन्सिलच्या संकेतस्थळावरून कळते.

म्हणजे हा प्रकार थोडाफार मेडिकल कौन्सिलसारखा असावा.

अशी कायद्याने एकाधिकार दिलेली संस्था म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असलेले एकक नसते. ज्या-ज्या कृती करण्यास घटना स्वातंत्र्य देते, त्या-त्या कृतींचा निषेध या संस्थेला करता येणार नाही.

ज्या कायद्यानुसार बार कौन्सिलांना एकाधिकार दिलेला आहे (१९६१चा ऍडव्होकेट्स ऍक्ट), त्या कायद्यानुसार घटनात्मक पीठे या संस्थेचे नियंत्रण करू शकतात.

- - -
आताच स्पष्टीकरण मिळाले, की आवाहन पुण्यातील "बार असोसिएशन"चे आहे "बार कौन्सिल"चे नव्हे. अर्थात अशा बिगर-घटनात्मक संस्थेला अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. तरी जर या संस्थेचा "वकील-संस्था-बाजारात" एकाधिकार असला, तर काही धोका आहे.
- - -

कायद्याची व्यवस्था चालणे हे लोकशाही-सुव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे.

न्यायालयात न्यायाधीश नसलेले लोक ऐकीव माहितीवरून आपले वाटेल ते मत करू शकतात. (म्हणजे लाक्षणिक/वैयक्तिक अर्थाने जज आणि ज्यूरी होऊ शकतात.) मात्र एक्झिक्यूशनर होऊ शकत नाहीत. तो कार्यभार आपण स्वखुषीने शासकीय अधिकार्‍यांकडे सोपवलेला आहे.

@विकास : बहुतेक सहमतीत ही जोड. जर कायद्याच्या चौकटीत आरोपीचे समर्थन कुठल्याही प्रकारे केले जाऊ शकते, तर ते करण्यास आरोपीचा वकील बांधील आहे. अशा युक्तिवादांना कोर्टाबाहेरचे लोक वेळकाढू तमाशा मानतील, हा धोका आहे. जर अमुक एक स्पष्टीकरण कायद्याच्या चौकटीत "असंबद्ध" असले, तर तसे स्पष्टीकरण न्यायाधीश बाद करू शकतो. अशी तरतूद कायद्यातच आहे. न्यायाधीशाने जर युक्तिवाद बाद केला नाही, तर तो तेवढ्यापुरता तरी "असंबद्ध" नाही, असे मानायला हरकत नाही. लोकांमध्ये प्रवाद काही का असेना. न्यायाधीशाने युक्तिवाद थांबवण्याचा निर्णय अस्तित्वातल्या कायद्याच्या चौकटीतच द्यावा, लोकांमधील प्रवादावरून देऊ नये.

"अमुक प्रकारचे युक्तिवाद उद्यापासून असंबद्ध मानले जावेत" असे बहुसंख्य लोकांना वाटत असेल, तर तसा कायदा लोकसभेत पसार करून घ्यावा. अशी सोय भारताच्या लोकशाही घटनेने मतदार-नागरिकांना दिलेली आहे. पण कोर्टावर यावेगळा थेट परिणाम करण्याची सोय घटनेने दिलेली नाही. भारतात न्यायाधीशांची नेमणूक थेट मतदानाने नसणे मला पटते.

 
^ वर