रस्त्यावर या ४०% लाचेचे खड्डे पडतात हे काय या भ्रष्ट्र राजकारण्यांना माहित नाही.
'खड्डे असणाऱ्या राज्य रस्त्यांवरील टोल वसूल करण्यात येऊ नये, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा मार्गावरील टोल बंद करण्यात येतील. ' अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही रस्त्याची अवस्था वाईट असल्याचेही मान्य केले.
रस्त्याचे काम करीत असताना तांत्रिक बाबींचे पालन होत नसल्याचे रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेतून स्पष्ट होते. तज्ज्ञांच्या मतानुसार रस्ते तयार करताना डांबर आणि खडीचे योग्य मिश्रण नसेल तर रस्ते खराब होऊ शकतात. ब्रिटिशकालीन कंपन्या शंभर वर्षांची खात्री देऊन रस्ते, पुलांची बांधणी करीत होते. तेवढ्या कालावधीपर्यंत ती बांधकामे टिकाव धरतात. अशी अनेक उदाहरणे आजही जिल्ह्यात पाहायला मिळतात; मात्र सध्याच्या बांधकाम विभागाचे कंत्राटदारांवर नियंत्रण नसल्याने तसेच रस्ते पाहणी समितीचेही दुर्लक्ष होत असल्याने महामार्ग दुरवस्थेच्या विळख्यात सापडला आहे. पालिका दर वर्षी पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करते; परंतु रस्त्यांची सुधारणा होत नाही.
अवघ्या आठ दिवसांवर गणशोत्सव येऊन ठेपला आहे. गणेशोत्सव साजरा करताना रस्त्यांवरील खड्ड्यांचा अडथळा त्यात प्रामुख्याने मोठा आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही रस्ते दुरुस्त होत नसल्याबद्दल सर्वपक्षीय सदस्यांनी आज प्रशासनाचे वाभाडे काढले. पावसाची उघडीप मिळताच रस्त्यांची दुरुस्ती झपाट्याने करून गणेशोत्सवापूर्वी मुंबई खड्डेमुक्त करू, अशी ग्वाही प्रशासनाने दिली.
रस्त्यात खड्डे होतातच कसे? अश्या निकृष्ट रस्ते बांधणी करणाऱ्या वर तुम्ही साफ असलात तर खटले का भरत नाही? अश्या खराब बांधकाम करणाऱ्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करा. स्वच्छ प्रशासन करा मग बघा रस्ते कसे चांगले तय्यार होतात का नाही ते. आज टेंडरच्या किमती पैकी ४०% लाच देण्यात गुत्तेदार खर्च करतात २०% त्याचा फायदा .बांधकामावर फक्त ४०% खर्च होतात. मग रस्त्यावर या ४०% लाचेचे खड्डे पडतात हे काय या भ्रष्ट्र राजकारण्यांना माहित नाही. उगाच वेड पांघरून पेडगावला जाण्याचे नाटक करतात . अमेरिका विकसित आहे म्हणून तेथील रस्ते चांगले आहेत असे नव्हे तर चांगल्या रस्त्या मुळे अमेरिकेचा विकास झाला हे खुद अमेरिकन अध्यक्षाचे मत आहे.
http://www.artba.org/about/faqs-transportation--general-public/faqs/#1 या अमेरिका रोड या साईट वर रस्ते बांधणीचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे .फक्त इच्छाशक्ती पाहिजे.
building a better America through transportation construction हे त्यांचे ब्रीद वाक्य आहे.
आपण अमेरिकेचा फक्त चंगळवाद घेतला त्यांची मेहनत, चांगले काम लगन घेतली नाही .
Comments
असहमत
"ब्रिटिशकालीन कंपन्या शंभर वर्षांची खात्री देऊन रस्ते, पुलांची बांधणी करीत होते. तेवढ्या कालावधीपर्यंत ती बांधकामे टिकाव धरतात. अशी अनेक उदाहरणे आजही जिल्ह्यात पाहायला मिळतात"
निराधार दावा.
--------
आजचे सरकार विरुद्ध ब्रिटिशः ठठपा (रँड चे प्रकरण वगळून) ब्रिटिशांच्या बाजूने
कोणाची ही बाजू न घेता शिखंडी सारखे विचार करणे ही चूक आहे.
निराधार दावा. आजचे सरकार विरुद्ध ब्रिटिशः ठठपा (रँड चे प्रकरण वगळून) ब्रिटिशांच्या बाजूने. चांगल्या गोष्टीना चांगले म्हणणे हेच ठणठणपाळ ध्येय आहे. आपण कांही म्हंटले तरी सत्य झाकत नाही . आजचे रस्ते भ्रष्ट्राचाराच्या खड्ड्यात गेले आहेत हे सत्य फक्त भ्रष्ट्र व्यक्तीच मान्य करणार नाही आणि बाकी दावे करत बसेल असा माझा कयास १०१% खरा ठरला. कोणाची ही बाजू न घेता शिखंडी सारखे विचार करणे ही चूक आहे.
thanthanpal.blogspot.com
?
आजच्या रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार होतो हे मान्यच आहे पण उगीचच "ब्रिटिशांच्या काळात तसे नव्हते" हा दावा करू नका. "रिकामटेकडा भ्रष्ट आहे" हे तुमचे इम्प्लिकेशनसुद्धा निराधार आहे.
शिखंडी कोणते विचार करीत असे ते मला माहिती नाही.
हे आजचे रस्ते.
हे आजचे रस्ते. अजून कमी पडत असेल तर जरा अहमदनगरला जाऊन या, पण पाठ आणि मान खिळखिळी झाल्यास मी जबाबदार नाही, आधीच सांगून ठेवतो,
खड्ड्या-खड्ड्यांचा चुकवीत रस्ता...!
?
आजचे रस्ते वाईट्ट आहेत हे मला माहिती आहे.
महासत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भारताच्या कलमाडी आणि कंपनीनी ने
परभणी जिल्ह्या तील जिंतूर नगरपालिके च्या हद्दीत ब्रिटीश कंपनीने ११० वर्षा पूर्वी नदीवर पूल बांधला होता . त्याचे आयुष्य १०० वर्षाचे होते. १० वर्षा पूर्वी त्या ब्रिटीश कंपनीने पुलाचे आयुष्य संपले तो आता पाडा आमची गैरंटी संपली आहे असे पत्र पाठवले. त्या नंतर सरकारी नोकरशाहीने आजू ५० वर्ष पुलाला कांही धोका नाही असे प्रशस्ती पत्र दिले तो पूल अजून ही तंदुरुस्त आहे. अशी अनेक उदाहरणे, पत्रे आपण डोळे उघडे ठेवले तर दिसतील.आणि आज कॉमोन वेल्थ गेम करता महासत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भारताच्या कलमाडी आणि कंपनीनी ने बांधलेला लहानसा पूल १०० मीटर फक्त वापरायच्या आधीच मोडला आणि आपली लायकी काय आहे आणि आपण किती खोटी स्वप्ने भारतीय जनतेला दाखवतो हे दाखवून दिले.thanthanpal.blogspot.com
शक्य
त्या पुलासाठी 'ऍडजस्टेड टू इन्फ्लेशन' किती खर्च आला होता ते पाहिले पाहिजे. मजुरांवर अन्याय न करणार पगार दिला असेल तर आजच्या टेंडर पद्धतीत ते कंत्राट त्या कंपनीला मिळालेच नसते असे वाटते.
"कलमाडी यांनी भ्रष्टाचार केला नाही" असे मी मुळीच म्हटले नाही. पण "पूर्वीपेक्षा आज तंत्रज्ञान खराब आहे" असे मात्र वाटत नाही. मुद्दा असा आहे की ब्रिटिशांनी भ्रष्टाचार केलेले पूल आधीच पडून गेले असतील, त्यामुळे आज टिकलेले त्यांचे सारेच पूल चांगले असण्याची शक्यता आहे. त्या विशिष्ठ पुलाच्या बाबतीत भ्रष्टाचार झाला नसेल, उत्तम माल वापरला असेल, पण आज तसे केले तर आजही चांगलेच पूल बनतील.
गोल्डन ब्रीज
गुजराथ मध्ये गोल्डन ब्रीज नावाने ओळखला जाणारा पूल याची साक्ष ठरावा.
तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.
पुणे
पुणे विद्यापीठात एका वर्षी फुटपाथसाठी बरेच पैसे खर्च झाल्याची बातमी होती. हा फुटपाथ कधीच कुणाला दिसला नाही.
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
याचा अर्थ
पुणे विद्यापीठात एका वर्षी फुटपाथसाठी बरेच पैसे खर्च झाल्याची बातमी होती. हा फुटपाथ कधीच कुणाला दिसला नाही.
याचाच अर्थ असा देखील होतो की तेथे फुटपाथला खड्डा पडलाच नाही! ;)
“For myself I am an optimist - it does not seem to be much use being anything else” - चर्चील प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
बरोबर
बरोबर आहे. फुटपाथच नसेल तर खड्डा कुठून येणार? न रहेगा बास... :)
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
खट्टामिठा
काल मी अक्षयकुमारचा खट्टामिठा पाहिला. :)
प्रतिसाद अवांतर नाही.
प्रतिसाद
तुमचा प्रतिसाद अवांतर नाहीच.
आख्खा पिच्चरच अवांतर आहे.
(ह.घ्या. नाहीतर धागा (ब्रिटिशकालीन) रस्त्यांवरून सद्यकालीन मल्टिप्लेक्सात भरकटायचा ;-))
||वाछितो विजयी होईबा||
कारणे
खड्डे ४० टक्के लाच द्यावी लागते म्हणूनच पडतात हे खरे का?
-की सध्या ज्या प्रमाणात रस्त्यावर ट्रॅफिक+पाऊस आहे त्याला टिकतील असे रस्ते बनवण्याचे तंत्रज्ञानच आपल्याकडे नाही?
-की तंत्रज्ञान माहिती आहे पण कमीत कमी पैशात काम करून द्यायचे (लोएस्ट टेंडर) म्हणून अधिक अकुशल कामगारांकडून काम करून घेतले जाते म्हणून दर्जा कमी?
-की इनग्रेडिअंट आणि त्यांचे प्रमाण माहिती आहे पण प्रोसेस स्टेप्स् वर कंट्रोल नाही म्हणून दर्जा मिळत नाही. [डांबर आणि खडीचे प्रमाण काटेकोर बरोबर असले तरी ते मिसळण्याचे तापमान, ते वाहून नेण्याची पद्धत, ते किती वेळात रस्त्यावर पसरायचे, पसरताना किती तापमानाला ते असले पाहिजे वगैरे. तिळगुळाचे लाडू वळणार्यांना याचा चांगला अनुभव असेल. :-) ]
इथे कोणाची बाजू घ्यायची नाही पण मला हल्ली असे वाटू लागले आहे की यांपैकी काही किंवा सर्व कारणांनुळे रस्त्यांवर खड्डे पडत असावेत.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
सही.....अल्टी...जबरी.......
नवीन माहिती मिळाली, (खरतर टाळ्या वाजवणार होतो पण जाऊ द्या )
धन्यवाद.
आपल्याकडे तंत्रज्ञानच नाही? आपल्याकडे दर्जा कमी ? प्रोसेस स्टेप्स् वर कंट्रोल नाही ?
पण काहीही झाले तरी माझा देश महान तो महानच, त्यात शंका नाही. बरोबर ना ?
उगाचच उठसुठ देशाच्या नावे खडे फोडण्याची fashion आहे सध्या.
आज साधा चपराशी नेमण्या करता मैंट्रीक पास माणूस लागतो.
जगभरात सर्व ठिकाणी पाऊस पडतो पण रस्त्यात असे खड्डे पडत नाहीत. हे मी नाही माझे जे मित्र विदेशात आहेत, किंवा जावून येतात ते सांगतात. आणि जर तेथील रस्ते खड्डे विरहित असतील तर आपल्या कडे का असे रस्ते होवू शकत नाही .तंत्रज्ञान नाही ही सबब लंगडी आहे.४०% लाच दिल्यावर प्रोसेस स्टेप्स् वर कंट्रोल, तापमान , डांबर आणि खडीचे प्रमाण यावर साहजिकच कोणाचे नियंत्रण नसते या मुळे तेरी भी चूप मेरी भी चूप असा हा भ्रष्ट्र प्रकार आहे. आज साधा चपराशी नेमण्या करता मैंट्रीक पास माणूस लागतो. पण राजकारण करत देशाचा कारभार चालवणारा नेता आणि रस्ते महामार्ग बांधणारा गुत्तेदार यांना मात्र कोणत्याही शिक्षणाची,पात्रतेची अट नाही . ज्याला कांही येत नाही फक्त लांडी-लबाडी चांगल्या प्रकारे करता येते तेच लोक मग या दोन क्षेत्रात जातात. आणि या क्षेत्राची वाट लावतात.महामार्गावर खड्डे पाडतात आणि देशाचे तुकडे पडेल असे राजकारण करतात.
thanthanpal.blogspot.com
कोण म्हणतो अमेरिकेत खड्डे नाहीत?
अमेरिकेतले रस्त्यांवरील खड्डे आणि त्यावरून ५०-६० मैलांच्या वेगाने पळणार्या गाड्या पाहिल्या की धडकी भरेल. खड्डे बुजवण्याचे काम मात्र "कधीकधी" किंवा भारतातल्या मानाने चटकन होते.
अमेरिकेतल्या खड्ड्यांवर एक लेख येथे वाचा.
खड्डे
हा हा हा
प्रियालींनी दिलेला दुवा वाचून तंत्रज्ञान उपलब्ध नाही ही शंका खरी वाटू लागली आहे.
अमेरिकेत किती टक्के लाच देतात?
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
वाहवा
मस्त दुवा दिलात.
'घरोघरी हीच बोंब'च्या चालीवर 'देशोदेशी खड्डेदार रस्ते'
यूसातच ही अवस्था... ते बघणार युरोपकडे - युरोप कुणाकडे पाहतो कुणास ठाऊक?
लेखात सूचित केल्याप्रमाणे -नव्या गाड्या लवकरात लवकर खिळखिळ्या होऊन लोकांनी पुन्हा नव्या गाड्या घ्याव्यात
आणि हे चक्र असेच सुरू राहून अर्थव्यवस्थेला उर्जितावस्था यावी या उदात्त हेतूनेच भारतातील सरकारे रस्त्यांवर
खड्डे 'बनवत' आहेत हे पटले. :)
गंभीरपणे म्हणायचे तर - सरकारने आता काँट्रॅक्टरकडून रस्त्याची '५ वर्षे ग्यारंटी' मागायला हवी.
आश्चर्य
अमेरिकेबद्दलची बातमी वाचून आश्चर्य वाटले. ५-६ वर्षांच्या युरोपमधील वास्तव्यात एकदाही सिग्निफिकंट म्हणावा असा खड्डा बघायला मिळाला नाही.
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
सहमत
कोण म्हणतो अमेरिकेत खड्डे नाहीत?
आमच्या भागात तर अक्षरशः पुनरपी जननम् पुनरपी मरणम् असा प्रकार असतो. कारण एक बर्फाचा मोसम होऊन गेला की खड्डे हे पडलेले असतातच. लहानसहान खड्ड्यांना पॅचेस लावले जातात आणि त्यानंतर येणार्या उन्हाळ्यात बरेचसे रस्ते परत नीट केले जातात. दर ४-५ वर्षांनी प्रत्येक रस्त्याचे नुतनीकरण (किमान रीसर्फेसींग) असे वेळापत्रक असते.
येथील अर्थ आणि राज्यव्यवस्था जरा वेगळ्या पद्धतीची आहे - साध्या शब्दात खर्या अर्थाने विकेंद्रीकरण... त्याचे फायदे तोटे या संदर्भात देखील होत असतात. मात्र एकूणच चांगले राहण्याची (जिते है शानसे) सवय आणि हौस असल्याने या गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष होत नाही अथवा आपल्याकडच्या प्रमाणे भ्रष्टाचार होत नाही. (भ्रष्टाचार होतच नाही असे नाही!)
प्याचेस
माझ्या ऑफिसला जाणार्या तीनपदरी रस्त्यावरील सर्वात उजवीकडील भागावर असे प्याचेस लावले आहेत. उन्हाळा आला आणि गेला. फक्त प्याचेसच आहेत आणि तेही इतके ओबडधोबड आहेत की त्यावरून रोज गाडी नेणे म्हणजे रोलरकोस्टरची एक फुकट राईड करणे आहे.
अमेरिकन रस्त्यांबद्दल असे निरीक्षण आहे की ज्या काउंटीमध्ये हाय इन्कम किंवा टॅक्स देणार्या लोकांची वस्ती आहे तेथले रस्ते लगोलग रिपेअर होतात. त्यामानाने लो इन्कम भागात आनंदच आनंद असतो.
उत्सुकता
खड्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर खड्डेच खड्डे वाचा.
तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.
रस्त्यांवरचे खड्डे
रस्त्यांवरचे खड्डे हा काही माझ्या व्यावसायिक कौशल्याचा भाग नाही. पण शैक्षणिक कौशल्याचा एक भाग होता. त्यामुळे थोडेसे जास्त माहिती आहे.
आमच्या कडे एक म्हण आहे ती कॉक्रीट बद्दल आहे. कॉन्क्रीट बद्दल तीन कठीण सत्ये आहेत ते कठीण आहे, काळे आहे आणि ते त्याला तडा पडतात. रस्त्यांचे तसेच असते.
रस्ते डिजाईन केले जातात तेव्हा जमीनीची प्रत पाहून त्यावर किती जाड थर (सबग्रेड) द्यायचा हे निश्चित केले जाते. जमीन भुसभुशीत असेल (आणि तिला खोलवर कॉम्पॅक्ट करता येअत् नसेल) तर रस्त्यांवर नियमित खड्डे पडतात. दरवर्षी असे खड्डे बुजवत कधीतरी जमीनीत (रहदारीच्या वजनाने) काठींण्य जमा होते आणि मग खड्यांचे प्रमाण कमी होत जाते. मुंबईत आय मॅक्स वरून जाणारा रस्ता वा हल्ली मुंब्रा बायपास हे कदाचित या कारणाने नादुरुस्त होत असतील.
जिकडे ब्रेकिंग होते तिथे खड्डे पडतात. आणी खड्यांमुळे ब्रेकिंग होऊन खड्यांच्या आवाका वाढत जातो. अशा वेळी पहिले खड्डे तातडीने बुजवणे हे पुढील परिणाम टाळणारे होऊ शकते. हे होत नाही. मुंबई महानगरपालिकेत हा रिऍक्शन टाईम कमी असतो तर ठाण्यात तो खूप जास्त असतो असा माझा अनुभव आहे. यासाठी दप्तर दिरंगाई/वा कंत्राट देण्याचे कौशल्य सुधारायला हवीत.
पाऊस आणि डांबर यांचे विळा भोपळ्याचे नाते आहे. भारतातले डांबर हे जास्त हायड्रोफोबिक असते (असे मी कुठेतरी वाचले होते.). मुंबईत पाऊस ज्यावेळेला खूप पडतो त्यावेळी म्हणून खड्डे उद्भवतात. (याशिवाय जमीन भुसभुशीत होणॅ हे आलेच.) ज्यावेळी पावसाची रिपरिप काही दिवस चालू असते त्यावेळेला खड्डे डांबराने भरायला मिळत नाही हे देखील त्यातले एक कारण.
रस्त्यांचे पृष्टभाग हे काही वर्षांनी नव्याने करावे लागतात. कित्येकदा हे होत नाही (कारण बरेचदा पैसा असतो.).
रस्त्याला नीट उतार नसणे हे देखील एक कारण (पाणी तुंबून राहिल्याने खड्डे पडतात.)
अजुन एक तांत्रिक कारण राहिले. भारतातील वाहनांचे शॉक ऍब्सॉर्बर्स. म्हणजे तुम्ही मर्सिडीस/वोल्वो वगैरेतून फिरा तुम्हाला खड्डे कमी जाणवतील. तेच सायकल (सगळ्यात वाईट), रिक्षा वा कमी वजनाच्या दुचाक्या यांच्यातून गेलात तर तुमची हाडे खिळखिळी होतील.
वरील कारणे तांत्रिक आहेत. भ्रष्टाचार हे कारण तांत्रिक नाही. पैसे खाऊनही चांगली कामे केली जाऊ शकतात (याचे कारण कामाचे पैसे जास्त लावले जातात.). मात्र नीट सबग्रेड नसणे, पृष्टभागाच्या मालातील दर्जा इत्यादी भ्रष्ट कारणांचा हात कमी नसावा.
प्रमोद
+
माहितीपूर्ण प्रतिसादाबाबत धन्यवाद.
खड्डे पडण्याची तांत्रिक कारणे चांगली विषद केली आहेत.
आपण धक्का शोषण्याबाबत उदाहरण दिले आहे. तेच उलटही काम करत असावे का? म्हणजे चांगले सॉक ऍबसॉर्बर असलेल्या गाडीला कमी धक्का बसत असेल तर त्याची रिऍक्शन म्हणून रस्त्याला बसणारा धक्का पण कमी असेल का? मग रिक्षांचे अफाट प्रमाण असल्यामुळे (रिक्षाला शॉक ऍबसॉर्बर असतो की नाही याबाबत साशंक आहे) खड्डे जास्त पडत असतील का?
>>पृष्टभागाच्या मालातील दर्जा इत्यादी भ्रष्ट कारणांचा हात कमी नसावा
हे तर आहेच. पण वापरलेल्या मालाचा दर्जा उत्तम असला तरी रस्त्याचा दर्जा प्रोसेस कंट्रोल नसल्यानेही खराब होईल. ती प्रोसेस तंतोतंत न पाळणे (कदाचित ती माहितीही नसणे) ही कारणेही असू शकतात.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
प्रश्न आहे इच्छाशक्तीचा
अहो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत आणी काम करणार्यांना नाहीत असे आहे का ? प्रश्न आहे तो इच्छाशक्तीचा. तांत्रिक अडचणींवर मात करणे सहज शक्य आहे. भ्रष्टाचारावर मात करणे भारतात तरी अशक्य दिसतेय.
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
+१
बरोबर. पण पहिली पायरी तांत्रिक सुद्धा अडचणी आहेत हे जाणण्याची आहे.
खड्ड्यांचे कारण भ्रष्टाचारच असा विचार केला तर उत्तर शोधण्याची शक्यता दुरावते.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)