बल

Big Bang theory नुसार विश्वाच्या सुरुवातीला सर्व बलाचा मिळून एकच superforce होता व कालांतराने त्याचे गुरुत्वीय बल , विद्युतचुम्बकीय बल , weak force आणि strong force यात विभाजन झाले. तर अजून पर्यंत शोधले न गेलेले अजून forces अस्तित्वात असू शकतात का ?
English शब्दांना कृपया मराठी प्रतिशब्द सुचवा.

लेखनविषय: दुवे:

Comments

बिग बँग

तुमचा प्रश्न बिगबँग थियरीच्या कक्षेतला असेल तर मला काहीच उत्तर माहित नाही. पण बहुदा या थियरीला इतर फोर्सेस ची गरज लाभली नसावी.

तर अजून पर्यंत शोधले न गेलेले अजून forces अस्तित्वात असू शकतात का ?

हो.
तुमचा प्रश्न संपूर्ण विझानाच्या कक्षेतला असावा असे मला वाटले. म्हणून थोडेसे. अजून शोधले ने गेलेले फोर्सेस (बले?), कणे (पार्टिकल्स), दोरे (स्ट्रिंग्ज) आणि इतर बरेच काही नसणारच असा काही दावा असण्याचे कारण नाही.
मात्र त्यांचे अस्तित्व जेव्हा जाणवेल तेव्हाच त्यावर विचार होईल.

प्रमोद

प्रतिशब्द

बिग बँग थिअरी = महाविस्फोटाचा सिद्धांत
वीक फोर्स = मंदबल
स्ट्राँग फोर्स = तीव्र बल
(ही नावे नारळीकरांनी त्यांच्या मराठी पुस्तकांत वापरली आहेत.)

||वाछितो विजयी होईबा||

प्रतिशब्द

बिग बँग थिअरी = महाविस्फोटाचा सिद्धांत
वीक फोर्स = मंदबल
स्ट्राँग फोर्स = तीव्र बल
(ही नावे नारळीकरांनी त्यांच्या मराठी पुस्तकांत वापरली आहेत.)

||वाछितो विजयी होईबा||

सेर्न संस्थेच्या संकेतस्थळाचा दुवा

सेर्न संस्थेच्या संकेतस्थळावर थोडक्यात माहिती आहे, ती आकलनसुलभ आणि वाचनीय आहे.
("सुपरफोर्स" दुवा)

चार बले

मी उपक्रमवर वर्ष दीड वर्षापूर्वी जेंव्हा लिहिण्यास सुरवात केली होती तेंव्हाचा माझा पहिला लेख (हा चार भागात आहे)याच विषयावरचा असल्याने वर्षभराने का होईना कोणाला तरी या विषयात रुची आहे हे बघून आनंद झाला.
सध्या आपल्याला जे मूल स्वरूपातले कण ज्ञात आहेत त्यांची एकमेकाशी होणारी इंटरऍक्शन व विश्वाची एकूण संरचना ही या चार बलांच्या सहाय्याने समाधानकारक रित्या उलगडून दाखवता येते आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत तरी ही चार बले सर्व गोष्टींचा खुलासा करण्यासाठी पुरेशी आहेत असे वाटते.

उद्या हिग्ज बॉसन सारखा मूल कण प्रयोगशाळेत तयार करता आला व त्याचे गुणधर्म तपासता आले तर हिग्ज बॉसनच्या इंटरऍक्शन्सचा खुलासा करण्यासाठी कदाचित एखादे नवीन बल शोधण्याची गरज लागेलही कोणी सांगावे? चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

धन्यवाद !

तुम्ही सर्वांनी दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे.

विषय

विषय व्यापक आहे.

चार बलांचे एकत्रीकरण करण्याचे प्रयत्न पुंजभौतिकी आणि गुरूत्वाकर्षण यांचे न पटल्यामुळे अजूनपर्यंत पूर्णपणे सफल झालेले नाहीत.
होरावा यांनी या दिशेने बरीच प्रगती केली आहे पण त्यावर आक्षेप आहेत.
याखेरीज गुरूत्वाकर्षण हे बल "खरे बल" नसावे असेही विचार मांडण्यात येत आहेत.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

 
^ वर