उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
इंपोर्टेड चॉकलेटस आणि ...
गिरीश
September 12, 2010 - 8:16 am
एका दुकानातून मी इंपोर्टेड चॉकलेटस घेतो. इंडोनेसिया, युएई, चीन, मेक्शिको मधुन आयात केलेले काही ब्रॅन्ड्स चांगले असतात. परवा एका नव्या लुसलुशीत चॉकलेटने लक्ष वेधुन घेतले. त्याच्या गाभ्यात रस आहे असे लिहीले होते. एकंदरीतच सगळा प्रकार पाहुन त्यातील इन्ग्रेडीयंट्स पहायची उर्मी झाली आणि आश्चर्याचा धक्का बसला! चॉकलेटमधे बीफ आहे असे स्पष्ट लिहीले होते.
कोणाला काय चालते आणि नाही हा मुद्दा येथे बाजुला ठेवुन जर विचार केला तर असे जाणवते की, सामान्य माणूस ह्या सिस्टीमचा सगळ्यात खालचा (टीपीकल तळागाळातला) दुवा असल्यामुळे त्याला असे अनेक प्रकार जबरदस्तीने त्याच्या नकळत भोगावे लागतात. अन्नात भेसळ करणारे, दुधात रसायने टाकून वाढवणारे एकाच माळेचे मणी. आपण कधीपर्यंत ह्या सगळ्याकडे असहाय्यतेने पहात राहणार?
दुवे:
Comments
?
मुद्दा समजला नाही.
इन्ग्रेडियंट छापले, फारतर हल्लीच्या नियमांनी खोक्यावर चॉकोलेटी शिक्का (=मांसाहार) मारला, की पुढे काय अडचण आहे?
दुसरा पर्याय असा की तुम्ही 'दृष्टीआड सृष्टी' म्हणून ते खाल्ले पाहिजे होते ;)
भेसळ हा वेगळा मुद्दा मान्यच आहे.
:-)
माझ्या समजुतीप्रमाणे जे खाद्यपदार्थ दुकानात विकले जातात त्यातले प्रमुख घटक व न्रुटीशनल, कॅलरी संबधी माहीती देणे अनिवार्य आहे असा कायदा आहे. (हो, पुण्यातला कायदा म्हणत आहे)
आपण काय तोंडात घालतो, आपण माउस ने कुठली लिंक दाबतो इ इ गोष्टींची जबाबदारी खुद्द आपली आहे. अनेक लोक त्यांना परिचीत नसलेले पदार्थ खाण्यास नकार देतात. भेसळ वाईटच, चीनी मालातुन अशी भेसळ होउन परदेशात पोहोचल्याची अनेक उदाहरणे आजही दिसतात. अजुन जागरुकता, कडक तपासणी, व शिक्षा इ व्हायला पाहीजे याबद्दल दुमत नाही.
--------------------------------------------------------------------------------
मराठी माणूस आता श्रीखंडाची गोळी, लिमलेटची गोळी, गेलाबाजार रावळगाव टॉफी व्यतिरिक्त इतर काही चॉकलेट, गोळ्यावाले पदार्थ खातो हे पाहून काळजात गलबलले!
चॉकलेटचा गाभा
जगभर अनेक प्रकारचे गाभे असलेली चॉकलेटे विकत मिळतात. रम(एक दारू) चा गाभा असलेली चॉकलेट्स मोठी छान लागतात असा माझा अनुभव आहे. आत काय आहे हे जर बाह्य आवरणावर स्पष्ट छापलेले असले तर त्याला भेसळ म्हणता येणार नाही. चिनी दूध उत्पादकांनी आमच्या दुधात मेलामिन आहे असे बाह्य आवरणावर छापले असते तर त्याला कोणी भेसळयुक्त दूध असे म्हणले नसते. फारतर त्याला विषारी पदार्थ असे म्हणले गेले असते. आपण तोंडात काय टाकतो याचे पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला असतेच. मग बीफचा गाभा असलेले चॉकलेट आपण खाऊ नये. ज्या लोकांना ते आवडते ते खातील.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
अन्नात भेसळ?
चॉकलेट मध्ये बीफ आहे आणि तसे वेष्टनावर स्पष्ट लिहीले आहे. यात भेसळ कशी काय आली बूआ.
बीफ चालत नाही म्हणून या नव्या लुसलुशीत चॉकलेटची चव घेता येत नाही यातली असहायता फार तर समजू शकते.
दुकानदार चपापला
वरील सगळ्या प्रतिसादांला - थोडा खुलासा. -
मी जेव्हा बीफ संबंधी माहीती त्या दुकानदाराला सांगितली तेह्वा तो चपापला- त्यालाही आपण काय विकतोय माहीती नव्हते. मी वाचले म्हणून वाचलो, इतर अनेक शाकाहारी लोक जर हे न वाचता चॉकलेट खात गेले असतील तर मात्र तो खपवुन घेतला नाही पाहीजे. दुकानदार माल विकतांना जर तो माल वेगळा ठेवत असेल किंवा ग्राहकाला सागत असेल तर ठिक आहे. (नाहीतर त्यावर वेगळा असा हिरवा टिपका/ लाल टिपका पाहील्याचे मला स्मरत नाही. )
भेसळीचा मुद्दा थोडा पोटतिडकीने आलाय. मुळ मुद्दा असा आहे की, चॉकलेट इंपोर्ट करणा-या व्यापा-याला ठावुक असावे की, काय माल आणतोय? जर माहीती असेल तर त्याने ते इतरांना न् सांगता किरकोळ विक्रीला पाठवला असेल?- कारण तो दुकानदार चपापला. म्हणजेच काय ह्या देशात कोणीही काहीही इंपोर्ट करावे, खाऊ घालावे- असा अर्थ आहे का? बीफ असलेले चॉकलेट आणण्याला प्रतिबंध करा असा मला म्हणायचे नाय पण जे चाललंय त्यावर काही नियंत्रण असेल असे वाटत नाही.
चिनी चॉकलेट्स
चिनी चॉकलेट्स चुकून सुद्धा, फुकट मिळाली तरी तोंडात टाकू नका. त्यात मेलॅमिन असण्याची बरीच शक्यता असते. त्यापेक्षा बीफ बरे. चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
खुलासा
तुमच्या खुलाशाने तुमची अडचण काय आहे हे अजूनही स्पष्ट होत नाही. भारतात बीफ असलेले खाद्यपदार्थ आयात करण्यास बंदी आहे असे मला वाटत नाही. मग कोणी अशी चॉकलेट्स आयात केली तर त्यावर नियंत्रणाचा प्रश्नच कोठे येतो? दुकानदार चपापला असेल कारण त्याने आणलेला माल खपला नाही तर त्याच्या अंगावर पडेल व त्याचे नुकसान होईल. तुमच्या साठी सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे अमुल चॉकलेट्स खाणे . पूर्ण शाकाहारी.
या बाबतीत जेली क्रिस्टल्सचे उदाहरण देता ये ईल. यात जनावरांच्या हाडापासून मिळवलेले जिलेटिन असते. अनेक वर्षे लोक हे खात होते. कोणीतरी या बाबतीत ओरडा आरड केल्यावर भारतीय जेली उत्पादक आगर आगर किंवा चायना ग्रास वापरतात. हे वापरलेली जेली शाकाहारी असली तरी पूर्वीच्या जेलीसारखी लागत नाही. बाहेरच्या देशात चीज मिळते त्याच्या उत्पादनाच्या प्रक्रियेत जनावरांच्या आतड्यात मिळणारा एक पदार्थ एन्झायमिन म्हणून वापरतात. अमुलने हा न वापरता चीज बनवण्यात यश मिळवले आहे.
थोडक्यात काय तर इम्पोर्टेड चॉकलेट्सचा मोह सोडून अमूल किंवा भारतात बनलेली कॅडबरी चॉकलेट्स खा. म्हणजे पूर्ण शाकाहारी चॉकलेट्स मिळतील
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
दृष्टीआड सृष्टी
मला वाटते असामींनी मुद्दे व्यवस्थित मांडलेले नाहीत परंतु त्यांना असे म्हणायचे असावे की चॉकलेटचे इन्ग्रेडिएनट्स न बघता आपण काही निषिद्ध पदार्थ ;-) तोंडात टाकत असतो. आपण काय खातो याची जबाबदारी विक्रेता आणि ग्राहक दोघांची असावी. केवळ एकाची जबाबदारी नाही. असो.
हल्लीच एका मित्रांशी माझे या संबंधात बोलणे झाले. माझ्या एका प्रतिसादात मी आईसक्रिममध्ये अंडे असते असे लिहिले होते त्यावरून हा प्रश्न उद्भवला. तेव्हा जिलेटिनचा मुद्दाही निघाला. भारतात आता आगर आगर किंवा चायनाग्रास वापरतात हे मला माहित नव्हते म्हणून मी क्रिस्टल जेलीचेच उदाहरण आधी दिले. परंतु जिलेटिन याही व्यतिरिक्त इतर पदार्थांत वापरत असावेत. जसे, टूथपेस्ट, इतर मिठाया, चॉकलेट्स इ.
दही लावण्यास बॅक्टेरियांची मदत होते (खरेतर हे शाळेत शिकवले जाते) आणि ते तुम्हाला उपवासाला चालते असे म्हटल्यावर माझ्या जैन मैत्रिणीला बराच त्रास झाला होता.
साखरेचे शुभ्रकरणही अशाच प्रकारे केले जाते असे ऐकून आहे. (चू. भू. दे. घे.)
आर्टीक्युलेट
प्रियालींनी मला जे म्हणायचे आहे ते खूप चांगले आर्टीक्युलेट केले आहे.
बॅक्टेरिया=वनस्पती.
>>दही लावण्यास बॅक्टेरियांची मदत होते
टेक्निकली (जिवशास्त्रीय दृष्ट्या) बॅक्टेरिया आणि व्हायरस हे वनस्पती आहेत असे शाळेत शिकल्याचे आठवते.
अपुष्प बनस्पती: जीवाणू, विषाणू, कवक आल्गी आणि लायकेन
जैन मैत्रिणीचा धर्म सुरक्षित आहे :)
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
जिथे
जिथे बायकांना मोक्ष मिळण्यासाठी पुरुषांचा जन्म घ्यावा लागतो तेथे बॅक्टेरिया वनस्पती आणि की जीव याची निश्चिती कशी होते ते माहित नाही.
बायदवे, जैन मोड आलेले धान्य खात नाहीत. त्याला ते "बालक" म्हणतात.
सेल्युलोज
वनस्पतीच्या पेशीवर सेल्युलोजचे आवरण असते प्राण्याच्या पेशीवर नसते.
अर्थात धार्मिक पुस्तकात जीवाणू हा प्राणी असे लिहिले तर आर्ग्यू करता येणारच नाही. ;)
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
सेल्युलोझ जीवाणूंवरही नसते
सेल्युलोझ जीवाणूंच्या पेशींवरही नसते...
(सध्या प्राणी-वनस्पती-जीवाणू हे तीन वेगवेगळे प्रकार मानतात. पैकी जीवाणू हा प्रकार एकजिनसी नाही. अधिक वर्गीकरण होईल अशी अपेक्षा आहे.)
जीवाणू
जीवाणू वनस्पती नसले तरीपण ते प्राणीही नसल्यामुळे जैन मैत्रिणीचा धर्म सुरक्षित आहे. :)
आता त्या चॉकोलेट आयात करणार्या व्यापार्याविषयी.
बहुधा त्याने परदेशात ही चॉकलेटे* खूप खपतात (भारतीयांमध्येही लोकप्रिय आहेत) असा सर्व्हे केला असेल म्हणून ती आयात केली असतील. परदेशात बीफ हे निषिद्ध समजले जात नसल्याने यात बीफ आहे हे मुद्दाम ओरडून सांगितले जात नसेल. त्यामुळे ते त्या आयात करणार्या व्यापार्यालाही माहिती नसण्याची शक्यता आहे.
अर्थात हे कळल्यावर त्याची चॉकलेटे न खपण्याची शक्यता आहे. परंतु धागा प्रस्तावकाने चॉकलेटांचे नाव न कळवल्याने तो धोकाही टळला आहे.
धाग्याचा उद्देश अमूल चॉकलेटे खावीत असा निष्कर्ष काढण्याचा जाहिरात सदृश असेल तर त्या बीफयुक्त चॉकलेटांचे नाव सांगण्याची गरज नाही.
*आरागॉर्न यांच्यासाठी :- सदर प्रतिसादात चॉकलेटे, चॉकलेटांचे अशी रूपे वापरल्याने चॉकलेट (नपुं) असा मराठी शब्द निर्माण झाल्याचे समजावे. ;)
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
हाहाहा!
म्हणजे परदेशात काय चालते हे व्यापार्याला माहित आहे आणि आपल्या देशात काय चालते हे माहित नाही. बिच्चारा!
त्यापेक्षा आमचे अमेरिकन बरे की. आम्हीच त्यांना त्यांच्या काउंटीच्या बाहेरचे माहित नसते म्हणतो पण त्यांना भारतीय रेश्टॉरंटात सहसा बीफ मिळत नाही हे पक्के ठाऊक असते आणि बर्याच विक्रेत्यांना भारतीय ग्राहक बीफ घेत नाहीत हे देखील आजकाल माहित असते.
तसे काही वाटले नाही.
* प्रश्न बीफ खाणे न खाणे हा नसून कश्टमर रिक्वायरमेंटचा आहे.
?
म्हणजे परदेशात काय चालते हे व्यापार्याला माहित आहे आणि आपल्या देशात काय चालते हे माहित नाही. बिच्चारा!
अधोरेखित तर्क कशावरुन काढला आहे?
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
यावरून
बहुधा त्याने परदेशात ही चॉकलेटे* खूप खपतात (भारतीयांमध्येही लोकप्रिय आहेत) असा सर्व्हे केला असेल म्हणून ती आयात केली असतील. परदेशात बीफ हे निषिद्ध समजले जात नसल्याने यात बीफ आहे हे मुद्दाम ओरडून सांगितले जात नसेल. त्यामुळे ते त्या आयात करणार्या व्यापार्यालाही माहिती नसण्याची शक्यता आहे.
यावरून. माझ्या प्रतिसादात हास्य सामिल असल्याने कृपया याला तर्क न मानता गंमत मानावी म्हणजे मला आणखी प्रतिसाद खर्च करायला नकोत.
फाऊल
गंमत की गंभीर हा मुद्दाच नाही. जर चॉकोलेटमध्ये बीफ असल्याचे त्याला माहितीच नसेल तर "परदेशात काय चालते हे व्यापार्याला माहित आहे" हा वाक्यांश, 'जर-तर'च्या नव्या नियमांप्रमाणे अग्राह्य आहे =))
सॉरी!
जर-तरचे नवे नियम मी वाचलेले नाहीत. वाचावे अशी कोणतीही सक्ती माझ्यावर नाही आणि पाळावे अशीही नाही तेव्हा फाऊल मानलेला नाही. ;-)
ओरडून
भारतात दूध वगैरे शाकाहारी समजले जाते. काही देशात ते समजले जात नाही. त्यामुळे भारतात भारतातील ग्राहकांसाठी असलेल्या वस्तूत दूध असेल तर हिरवा ठिपका मारलेल्या पदार्थावर "सावधान : यात दूध आहे" अशी सूचना असण्याची शक्यता नाही. अशी वस्तू एखाद्या परदेशी व्यक्तीने त्या देशात आयात केल्यास त्या देशातल्या दुकानदाराला पदार्थात दूध असल्याचे माहिती नाही असे होऊ शकेल (पदार्थातील घटकांच्या यादीत दूध असल्याचे लिहिले आहेच पण सावधानची सूचना नाही).
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
नाव घ्या
असा मी आसामी यांना विनंती की चॉकेलेटचे नाव प्रसिद्ध करावे.
+१
मलाही उत्सुकता आहे. बीफ घातलेले चॉकलेट माझ्या पहाण्यात परदेशातही दिसले नाही. हा नक्की काय प्रकार आहे जाणून घ्यायला आवडेल.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
येत्या शनीवारी
नक्की. आता आठवत नाहीए. येत्या शनीवारी त्याच दुकानात जाऊन पाहून येइन.
जवाबदारी
ह्यात विक्रेत्याची जवाबदारी कशी काय? मला एका विशीष्ठ प्रकारचे चीझ आवडत नाही म्हणून मी उपाहारगृहात गेल्यावर आधी खात्री करुन घेतो आणि मग ऑर्डर करतो. तशी खात्री न करता अन्न मागवले आणि त्यात माझे नावडते चीझ घातलेले दिसले तर निमूटपणे ते बाजूला करुन खातो. कारण त्यात विक्रेत्याचा काय दोष?
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo
विक्रेत्याची जबाबदारी
आपल्या ग्राहकाला काय हवे/ काय चालते ते पाहणे ही विक्रेत्याची जबाबदारी आहे असे मला वाटते. (तसा कायदा नाही किंवा विक्रेत्यावर सक्ती नाही म्हणूनच जबाबदारी म्हटले.)
हे तुमचे वैयक्तिक उदाहरण झाले. इतरांनीही असेच करावे असे म्हणता येणार नाही. उदा. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की पदार्थात बीफ घालू नका असे सांगितल्यावरही बीफ घातलेला पदार्थ समोर आला आहे. माझ्यावर अशी कोणतीही सक्ती नाही की मी बीफ बाजूला करून खावे. माझा दुसरा अनुभव असा आहे की एकदा पदार्थातील इनग्रेडिएंट्स वाचल्यावरही त्यात बीफ आहे हे मला कळले नव्हते. (बीफ असे न लिहिता वेगळे नाव वापरले होते जे मला परिचित नव्हते.) पदार्थ समोर आल्यावर मी चौकशी करता ते बीफ असल्याचे कळले. तेव्हा हे मी खात नाही, तुमच्या मेनूत तसे स्पष्ट लिहिलेले नव्हते असे म्हटल्यावर हॉटेल मॅनेजरने माफी मागून दुसरा पदार्थ मागवण्यास सांगितले. (अर्थातच आधीच्या पदार्थाचे बिल लावले नाही.)
याचप्रमाणे पदार्थांवरील एक्सपायरी डेट्स पाहून घ्याव्यात हे योग्य आहे परंतु एक्सपायर झालेल्या वस्तू दुकानात ठेवू नयेत ही विक्रेत्याची जबाबदारी आहे. ज्या भागात तो दुकान चालवतो तेथील ग्राहक विशिष्ट पदार्थ खात नाहीत हे जर त्याला माहित असेल तर ते ठळकपणे लिहिणे/ दर्शवणे योग्य असते. उद्या असामींऐवजी इंग्रजी न वाचू शकणारी एखादी व्यक्ती तेथे आली आणि ते चॉकलेट घेऊन गेली तर न वाचण्याचा दोष त्या व्यक्तीला कसा देता येईल? जर विक्रेता जबाबदारीने वागत नसेल तर त्याचा धंदा बसण्याची शक्यताही आहेच.
अनेक दुकांनांमध्ये कोशर म्हणून वेगळा विभाग आढळतो. गल्फ देशात पदार्थांत डुकरापासून बनवलेले जिलेटीन नाही किंवा मांस हलाल केलेले आहे हे मोठ्या अक्षरांत लिहिलेले असते कारण ग्राहक प्रत्येक वस्तू घेताना प्रत्येकवेळी तिचे इनग्रेडिएन्ट्स बघून घेईलच असे नाही. घाईत खरेदी करताना कदाचित तो पाहणार नाही त्यामुळे विक्रेते असा माल वेगळा ठेवायचा प्रयत्न करतात.
अगदी असेच वाटते
+१
धन्यवाद, प्रियाली. मला अगदी असेच वाटते.
तसे नाही..
यू आर मिसिंग द पॉइंट....इथे तुम्ही बीफ घालू नका असे सांगून काळजी घेतली आहे. (जवाबदारी पार पाडली आहे!) ही तुमची सुचना स्विकारुनही तुमच्या पानात बीफ आले तर ती अर्थातच विक्रेत्याची चूक आहे. पण समजा तुम्हीच 'घालू नका' असे सांगायचे विसरला असाल आणि समोर बीफ घातलेला पदार्थ आला तर चूक कुणाची? लेखकाने दुकानदाराला शुद्ध शाकाहारी चॉकलेटेच दाखवा असा आग्रह केलेला होता का?
एक्स्पायरी डेट उलटून गेलेले पदार्थ विक्रिस ठेवणे हा माझ्यामते दंडनीय गुन्हा आहे. एक्स्पायरी डेट उलटून गेलेल्या वस्तू दुकानातून काढून टाकण्यास विक्रेता कायद्याने बांधील आहे. त्याची तुलना इथल्या चॉकलेटच्या उदाहरणाशी होऊ शकत नाही. बीफ नसलेले चॉकलेट विकू नये असा कोणाताही कायदा नाही.
खाली धनंजय ह्यांनी लिहिल्याप्रमाणे धंदा वाढवण्यासाठी ग्राहकांना ही सोय पुरवण्याचा पर्याय दुकानदाराकडे आहे पण ही सोय न पुरवल्यास त्यात ग्राहकाची फकवणूक नाही. इथल्या उदाहरणात लेखकाचा फसवणूक झाल्याचा सूर आहे.
अवांतर: हे बीफ घातलेले चॉकलेट कुठे मिळते/ कसे दिसते? मी जालावर शोध घेतला असता फारशी माहिती मिळाली नाही. बीफ जर्की नावाचा अमेरिकन लोकांचा आवडता आंब्याच्या पापडासारखा आवडता पदार्थ माहित आहे, तो तर नव्हे ना हा?
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo
म्हणूनच....
म्हणूनच मी जबाबदारी दोघांवर सारखीच घातली आहे. :-)
जर लेखकाला चॉकलेटमध्ये नॉनव्हेज असते हेच माहित नसेल तर? मला वाटते असे अनेकजण भेटतील म्हणूनच आईसक्रिममध्ये अंडे असते हे उदाहरण दिले.
नाही. फसवणूक किंवा भेसळ वगैरेशी माझी सहमती नाही म्हणूनच दोघांच्या जबाबदारीचा मुद्दा मी पुढे केला.
अवांतरः
तो नसावा. त्याला गाभा नसतो आणि बीफ जर्की नावाचा पदार्थ लुसलुशीतही नसतो. :-) म्हणजेच चॉकलेटमध्ये बीफ असते हा (जावई)शोध आपण दोघांनाही नुकताच लागलेला दिसतो. याआधी मी कधीही चॉकलेट्स "नॉनवेजसाठी" इन्ग्रेडिएंट्स बघून घेतलेली नाहीत. (गाभ्यात स्ट्रॉबेरी आहे, रास्पबेरी आहे की ऑरेज, पुडींग इ. ते बघून घेतले आहे.)
दोघांवर सारखीच कशी काय?
दोघांवर सारखीच कशी काय? इथे दुकानदारावर तुम्हाला 'बीफ खाता का?' असे विचारायची जवाबदारी नाही.
लेखकाला चॉकलेटमधे नॉनवेज असते हे माहितच नसणे हा लेखकाचा इग्नोरन्स झाला त्याची जवाबदारी दुकानदाराने का घ्यावी? वेजीटेरियन असणे ही स्पेशल डायेटरी रिक्वायरमेंट आहे आणि त्यासाठी ग्राहकानेच काटेकोर राहिले पाहिजे. जसे मला न आवडाणारे चीझ पानात पडू नये म्हणून मलाच काटेकोर राहावे लागते. ती दुकानदाराची जवाबदारी कशी काय?
----
असा मी असामी ह्यांना,
असा मी असामी, तुमचे मत काय? प्रियाली ह्यांच्या प्रतिसादाला सहमत म्हणून तुम्ही भेसळपणाचा मुद्दा मागे घेतला आहे का?
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo
दोघांचीच जबाबदारी
नव्हे तसे मी म्हटलेले नाही. आपल्या ग्राहकांना काय हवे/ त्यांच्या धार्मिक भावना* दुखावल्या तर जात नाहीत ना हे पाहण्याची जबाबदारी विक्रेत्याची आहे. वर उदाहरणे दिली आहेत. अनेक दुकानांत तसे विक्रेते करताना दिसतात - ठळक अक्षरांत लिहिणे किंवा वेगळा विभाग ठरवणे.
प्रत्येक वेळी ग्राहकाचा इग्नोरंस म्हणून विक्रेता जबाबदारी टाळू शकत नाही.
असो. मला वाटते मी तेच ते मुद्दे पुन्हा लिहिते आहे. जे मला सांगायचे ते पूर्ण सांगितले आहे तेव्हा आता परत उपप्रतिसाद देणार नाही.
* धार्मिक भावना दुखावल्या जाणे हे समाजात ग्राह्य आहे तोपर्यंत हे योग्य मानणे आले.
सर्व्हीस एक्सलन्स
भेसळीचा मुद्दा खूप कंफ्युज करत होता त्यामुळे तो ब्राउनाऔट केला.
राहता राहीले इतर मुद्द्यांचे. एखादा जर भारतातच एकाच प्रकारचे अनुभव घेत आला असेल तर त्याला जगात काही-काही ठिकाणी सर्व्हीस एक्सलन्स कसा दिला जातो आणि त्यातील फिनेस काय प्रकार आहे ते कळणार नाही.
भेसळ
कन्फ्युज वगैरे काही करत नव्हता. तो इथे गैरलागू आहे हे इथल्या प्रतिसादांमधून स्पष्ट झाल्याने मागे घेतला.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo
वरील मत
एखाद्याला आपण "तुम्ही अमुक-अमुक निष्कर्ष काढायचा नाही", असे सांगु शकत नाही. तुम्ही प्रश्न विचारला मी उत्तर दिले. दिलेले उत्तर काहीकारणाने तुम्हाला हवे ते नाही, म्हणून तुम्ही वरील मत मांडले आहे, असे वाटले.
निष्कर्ष
माझ्या सांगण्याने किंवा एखाद्याच्या समजण्याने निष्कर्षाप्रत जायचेच नसते. तुमचा भेसळीचा मुद्दा चुकिचा आहे हे इथे प्रतिसादातून काही सदस्यांनी स्पष्ट केले आहे. तुम्हाला त्यांचे प्रतिसाद खोडून काढायचा पर्याय आहेच. तरीही तुम्ही मुद्दा मागे घ्यायला तयार झालात ह्यातून दोनच अर्थ निघतात
१. तुम्हाला ह्या मुद्यावर चर्चा करायची नाही.
२. मुद्दा चुकिचा असल्याचे पटल्याने तुम्ही तो मागे घेतला.
ह्यात कन्फ्युजन कुठे आले?
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo
सिनारीयो
मुद्दा असा होता की, खालील सिनारीयो असु शकतात-
१. चॉकलेटमधे बीफ आहे असे मुळ व्यापाऱ्याला त्याला माहीती नाही + किर्कोळ विक्रेत्याला माहीती नाही
२. चॉकलेटमधे बीफ आहे असे मुळ व्यापाऱ्याला त्याला माहीती आहे + किर्कोळ विक्रेत्याला माहीती नाही
३. चॉकलेटमधे बीफ आहे असे मुळ व्यापाऱ्याला त्याला माहीती नाही + किर्कोळ विक्रेत्याला माहीती आहे
४. चॉकलेटमधे बीफ आहे असे मुळ व्यापाऱ्याला त्याला माहीती आहे + किर्कोळ विक्रेत्याला माहीती आहे
वरील पैकी सिनारिओ २, ३ व ४ पैकी कोणताही सिनारीयो असला तरी, जर त्यातील कोणत्याही एका एंटीटीने जर हे दुसऱ्यापासुन लपवुन ठेवले की, त्यात बीफ आहे, तर काही कष्टमर त्या दुकानात कायमचे जाणे बंद करतील अशा रीस्कमुळे अशा संवेदनशील गोष्टी लपवल्या जावु शकतात व ती वस्तू (चॉकलेट) कश्टमरच्या माथी मारली जाऊ शकतात. गणपती उत्सवाच्या काळात मी असली वस्तू घरी नेली असती तर माझ्यावर काय प्रसंग गुदरला असता ते मी तुम्हाला सांगु इच्छीत नाही.
त्यामुळे माझे मुळ वाक्य जर तुम्ही वाचलेत तर असे आढळेल की, मी असे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, भेसळ करुन दुध विकणारे व अन्नपदार्थात काही नकोशा वस्तू असुनही ते स्वतःच्या फायद्यासाठी लपवणारे एकाच माळेचे मणी होत. हा माझा विचार करण्याचा मार्ग आहे. तो तुम्हाला पटेलच असे मी म्हणत नाही. मी आताही ही एक प्रकारची भेसळच मानेल.
४ सिनॅरीयो कशाला?
भेसळ करुन दुध विकणे हा कायद्याने गुन्हा आहे. बीफची चॉकलेट्स विकणे हा गुन्हा नाही. दोन्ही गोष्टी एकाच माळेत बसू शकत नाहीत. (तुमची आणि माझी मते काहीही असली तरी)
तुमच्या सिनॅरीओज मधे मूळ व्यापार्याचा काहीच संबंध नाही.
व्यवहार तुम्ही आणि किरकोळ विक्रेता ह्यांच्यात झाला असल्याने (घडणार असल्याने) इथे दोनच सिनॅरीयो उद्भवतात.
१.किरकोळ व्यापार्याला माहिती आहे
२.किरकोळ व्यापार्याला माहिती नाही
समजा किरकोळ व्यापार्याला माहित आहे असे धरले तर त्याने तुम्हाला ते सांगायला हवे होते की नाही हा प्रश्न दुकानदाराच्या ग्राहकाभिमूख असण्याशी आहे. ग्राहकाचे समाधान म्हणजेच आपल्या व्यवसायात वाढ असे धरुन दुकानदाराने विचार केल्यास त्याने तुम्हाला सांगीतले असते. ज्यातून चॉकलेट न खपण्याचा धोका आहे पण तुमचा मनात दुकाना विषयी आस्था निर्माण करायची दूरगामी फायद्याच्या दृष्टीने संधी आहे.
पण ग्राहकांना असे आपणहून सांगीतलेच पाहिजे अशी सक्ती दुकानदारावर नाही. मला बीफचे वावडे नाही त्यामूळे मला अकारण ही माहिती दुकानदारने (न विचारता) पुरवली असता मी, 'माइंड युअर ओन बिझनेस' म्हणालो असतो.
तेव्हा दुकानदाराने ही माहिती पुरवणे ही कर्टसी आहे. रिक्वायरमेंट नव्हे. तसे न केल्यास ती फसवणूक नाही.
सिनॅरीओ २ आउट ऑफ क्वेश्चनच आहे.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo
ओपीनियन
--तुमच्या सिनॅरीओज मधे मूळ व्यापार्याचा काहीच संबंध नाही.--- हे तुमचे ओपीनियन आहे.
--तेव्हा दुकानदाराने ही माहिती पुरवणे ही कर्टसी आहे. रिक्वायरमेंट नव्हे. तसे न केल्यास ती फसवणूक नाही.--- शॉप य्याक्ट मधे असे नाही.
शॉप ऍक्ट
होय. आणि ते बरोबर आहे. नसल्यास कसे नाही ते दाखवून द्यावे.
मला वाटत नाही.
शॉप ऍक्ट नधे दुकानदाराने ग्राहकांना पदार्थात बीफ असण्याविषयी अलर्ट केले पाहिजे का? आणि तसे असल्यास कसे अलर्ट करावे? ह्याविषयी काही दिले असल्यास त्याचा संदर्भ द्या.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo
फायदा होणार?
मी एकदा डिक्लेयर केले आहे की, ते तुमचे ओपीनीयन आहे; मग पुन्हा तसे ते नाही असे दाखवण्याचा काही फायदा होणार असेल तर नक्की करेन.
शॉप ऍक्टची पुस्तिका पाहून कळवेन.
चूक
"ते तुमचे ओपीनीयन आहे" या विधानाचा अर्थ होतो "ते मला पटत नाही". ते न पटण्यामागची कारणमीमांसा करण्याचे उत्तरदायित्व टाळू नका.
"मूळ व्यापार्याचा काहीच संबंध नाही" या विधानाचे एक अगदी सोपे समर्थन असे की तुमचा तो तथाकथित शॉप ऍक्ट त्याला नक्कीच लागू नाही. ती चॉकलेटे भरलेली खोकी उचलणार्या मजुरालाही तुम्ही दोष देणार आहात काय?
ओपीनीयन
हा मुद्दाच कळला नाही. माझे ओपीनीयन माझे नाही हे तुम्ही कसे काय दाखवू शकाल?
जरुर! वाट बघतो आहे.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo
उगीच सोवळेपणाचा आव आणू नये
चॉकलेट इंपोर्ट करणा-या व्यापा-याला ठावुक असावे की, इंग्रज गेले तरी भारतीयांना स्वदेशी वस्तू पेक्षा परदेशी वस्तूचे, त्यांच्या अनेक गोष्टीचे आकर्षण आकर्षण जास्त आहे. म्हणून त्या वस्तू ते आयात करत असतात. आणि आपण सुद्धा परदेशी भक्ती पायी भारतीय वस्तू सोडून परदेशी वस्तू घेत असतो. त्यामुळे आयतदाराचा, विकणर्याचा कांही दोष नसून आपल्या आंधळ्या परदेश प्रेमाचा हा दोष आहे. एकदा मांस खायचेच म्हणटल की ते कोंबडीचे, बकऱ्याचे, बेडूक,बैल डुकर मासे याने कांही फरक पडत नाही मांस ते मांस . उगीच सोवळेपणाचा आव आणू नये.thanthanpal.blogspot.com
अवती-भोवती पहा
तुमच्या अवती-भोवती पहा- एकही भारतीय वस्तू दिसली तर कळवा.
काय बाजारात एकाही भारतीय वस्तू नाही काय?
तुमच्या अवती-भोवती पहा- एकही भारतीय वस्तू दिसली तर कळवा. काय बाजारात एकाही भारतीय वस्तू नाही काय? आपण भारतातच राहतात का चीन मध्ये? बाजारात स्वदेशी वस्तू सुद्धा आहेत . काय खरेदी करायचे आणि काय खरेदी करायचे नाही याचे तारतम्य आपणास असले की झाले.
thanthanpal.blogspot.com
भारतीय चॉकलेट्स्
ठिक आहे, चॉकलेट पासुन सुरुवात करु. जरा सांगा पाहू कोणकोणते चॉकलेट्स् भारतीय आहेत?
भारतीय आहेत?
भारतीय आहेत? भारतीय याची आपली व्याख्या जरा सांगता का?
ठणठणपाळ
स्वदेशी चॉकलेट्स
अमूल व कॅडबरी डेअरी मिल्क, मात्र कोको बिया आयातच केलेल्या असतात.
चन्द्रशेखर
केरळातील कोको
केरळमधून मागे मी उत्तम प्रतीचा कोको आणला होता. मात्र तिथे विकत घेतलेल्या चॉकलेटच्या वड्या मात्र यथातथाच होत्या.
केरळात उत्पन्न केलेले कोको बहुतेक निर्यातच केले जाते.
समजले नाही
सगळे इनग्रॅडीएंट्स प्रामाणिकपणे छापणार्याला तुम्ही भेसळ करणार्यांच्या माळेत का बसवले आहेत समजले नाही. बीफचे सोवळे तुम्हाला आहे मग तुम्हीच काळजी नको का घ्यायला? दुकानदारावर कशाला खापर फोडता?
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo
सामान्य माणसाची कदर
हा निष्कर्ष काहीसा ओढूनताणून आणल्यासारखा वाटतो. तुमच्या उदाहरणात तरी सामान्य माणसाला ज्ञान देऊन त्याला हवा तो निर्णय घेण्याची मुभा दिलेली आहे. चॉकोलेट बनवणाऱ्याने जेव्हा ते छापलं तेव्हा 'बीफ न खाणारे लोक हे वाचून हा पदार्थ विकत घ्यायचं टाळतील' हा धोका पत्करला, यातच सामान्य माणसाच्या मताची किंमत आहे असं दिसून येतं.
एक काळ असा होता, की कशावरच यात काय घातलंय हे लिहिलेलं नसायचं. मला अंड्याची किंवा काजूची अॅलर्जी असलेले लोक माहीत आहेत. पूर्वीच्या काळी त्यांना सगळंच शंकास्पद टाळणे याशिवाय पर्याय नव्हता.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी