इंपोर्टेड चॉकलेटस आणि ...

एका दुकानातून मी इंपोर्टेड चॉकलेटस घेतो. इंडोनेसिया, युएई, चीन, मेक्शिको मधुन आयात केलेले काही ब्रॅन्ड्स चांगले असतात. परवा एका नव्या लुसलुशीत चॉकलेटने लक्ष वेधुन घेतले. त्याच्या गाभ्यात रस आहे असे लिहीले होते. एकंदरीतच सगळा प्रकार पाहुन त्यातील इन्ग्रेडीयंट्स पहायची उर्मी झाली आणि आश्चर्याचा धक्का बसला! चॉकलेटमधे बीफ आहे असे स्पष्ट लिहीले होते.

कोणाला काय चालते आणि नाही हा मुद्दा येथे बाजुला ठेवुन जर विचार केला तर असे जाणवते की, सामान्य माणूस ह्या सिस्टीमचा सगळ्यात खालचा (टीपीकल तळागाळातला) दुवा असल्यामुळे त्याला असे अनेक प्रकार जबरदस्तीने त्याच्या नकळत भोगावे लागतात. अन्नात भेसळ करणारे, दुधात रसायने टाकून वाढवणारे एकाच माळेचे मणी. आपण कधीपर्यंत ह्या सगळ्याकडे असहाय्यतेने पहात राहणार?

लेखनविषय: दुवे:

Comments

जुन्यासारखा दिसणारा नवा पदार्थ

जुन्यासारखा दिसणारा नवा नग विक्रीस ठेवला, तर "तो जुन्या पदार्थाला पर्यायी आहे", असा गैरसमज होऊ शकतो.

कित्येकदा दुकानदार ग्राहकाला विचारतो "यावेळी लक्स साबण संपलेला आहे, रेक्सोना साबण चालेल का?" आता रेक्सोना साबण आणि लक्स साबण यांच्या सामग्रीत काहीतरी फरक आहेच. मात्र तो फरक ग्राहकाला लक्षणीय वाटत नाही याबद्दल काहीतरी अंदाज दुकानदार बांधत असावा. "यावेळी लक्स नाही, रिन साबण चालेल का?" असे दुकानदारांनी विचारलेले कधी ऐकले नाही. लक्स आणि रिनच्या सामग्रीत जो काय फरक आहे, तो ग्राहकाला लक्षणीय वाटेल, असा अंदाज दुकानदार बांधत असावेत.

नग पर्यायी नाही, हे जर दुकानदाराला माहीत नसले, श्री. असा मी असामी यांनी सांगितल्यानंतरच कळले, तर दुकानदाराचे आश्चर्य समजू शकते.

- - -

अन्नात भेसळ करणारे, दुधात रसायने टाकून वाढवणारे एकाच माळेचे मणी. आपण कधीपर्यंत ह्या सगळ्याकडे असहाय्यतेने पहात राहणार?

ही भेसळ नाही, अशी चर्चा वर झालेलीच आहे.

मात्र जर अन्नपदार्थात घटक म्हणून बीफ असणे हे ग्राहकांना लक्षणीय वातत असेल, तर दुकानदाराने ग्राहकाची सोय करून द्यावी. उदाहरणार्थ, ज्या गावात ज्यू ग्राहकांची संख्या पुष्कळ असते, त्या गावातले दुकानदार त्याचे सोवळे "कोशर" अन्न वेगळ्या कपाटात मांडून ठेवतात. असे केल्यामुळे ग्राहकाचे लेबल वाचण्याचे कष्ट थोडे कमी होते. लेबले वाचत-वाचत खरेदी-न-करणार्‍या ग्राहकांची गर्दी कमी झाल्यामुळे दुकानाची कार्यक्षमतासुद्धा वाढते.

वरकरणी पर्यायी वाटणार्‍या उत्पादनांमध्ये ग्राहकांना लक्षणीय फरक वाटत असेल, तर
(१) उत्पादकाने लेबल पूर्ण लिहावे,
(२) दुकानदाराने मालाची सोयीस्कर मांडणी करावी,
(३) जिथे संदेह आहे, तिथेच ग्राहकाने लेबल आवर्जून नीट वाचावे.
जबाबदार्‍यांचा वाटप केल्याने वेळही वाचेल, व्यापार कार्यक्षमही होईल, आणि सर्वांचा फायदा होईल. (फायदा = नफा किंवा उपभोग.)

सहमत आहे

सहमत आहे.

माझे अनुभव

आता ओळखीतलं कोणी ना कोणी सतत परदेशी जात येत असतं व भेट म्हणून चॉकलेटस व कुकीज वगैरे भेटी घेऊन येत असतं. त्यांचे वेष्टन व एकंदरीत दर्शन अतिशय सुखावह असल्याकारणाने अगदी शुद्ध शाकाहारी लोकांना देखील ते तोंडात टाकावेसे वाटतात. मात्र परदेशातील वेज-नॉनवेज इ. पदार्थांची व्याख्या पाहता ते अंडे/बीफ वा इतर तत्सम पदार्थांनी युक्त असतातच हा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी ते सरसकट नाकारतो. उगाच बारीक अक्षरातील घटक वाचा, त्यातील न कळणार्‍या घटकांचा अर्थ शब्दकोष काढून वाचत बसा एवढे उपद्व्याप करत कशाला बसायचे ?
गीता उपदेश आठवा : पार्थ, मोहाला वश होऊ नकोस. नंतर पश्चाताप करुन हाती काही लागत नाही.
गीतेशी वाकडे असेल तर शाहिरांचा उपदेश आठवा (बहुतेक अनंत फंदी यांचे "फटके" हा काव्यप्रकार आठवा) "बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडू नको"
भारतात मिळणारी अमुल, कॅडबरी, (भारतात) बनलेले नेस्ले खा की.

अवांतर : भारतीय ब्रिटानीया ने आता मांसाहारी घटक असलेले बिस्कीटे बनविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मी सध्यातरी "पार्ले" जिंदाबाद !

अमुल

मी आता अमुल चॉकलेटच खाण्याचा निर्णय घेतला आहे.

युक्ती

एखाद्या उत्पादनाची जाहिरात करण्याची ही युक्ती आवडली.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

सुतावरुन स्वर्ग!

:-) सुतावरुन स्वर्ग!

निर्णय

मी बीफ घातलेले लुसलुशीत चॉकलेट खायचा निर्णय घेतला आहे. नाव तर कळवा की.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

पदार्थांची व्याख्या

परदेशातील वेज-नॉनवेज इ. पदार्थांची व्याख्या पाहता ते अंडे/बीफ वा इतर तत्सम पदार्थांनी युक्त असतातच हा माझा अनुभव आहे.

बीफ हे कुठल्याही देशात 'वेज'च्या व्याख्येत बसत नसावे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

मला

मला चाकलेटं आवडत नाहीत.
मात्र काही चाकलेटांमध्ये लिकर किंवा तत्सम द्रव्ये असतात ती मात्र आवडतात. :)

अवांतर : चाकलेटला लवकरात लवकर (एसॅप) प्रतिशब्द शोधून मराठीचे रक्षण करावे ही विनंती.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

 
^ वर