'उपक्रम' चा पहिला वाढदिवस

मंडळी, ''उपक्रम' चा पहिला वाढदिवस' हा एक निव्वळ काल्पनिक लेख आम्ही आमच्या sanjopraav.wordpress.com या अनुदिनीवर लिहिला आहे. लेखनाच्या सोयीसाठी सर्व पात्रांचा उल्लेख एकवचनी असून 'मनोरंजन' हा या लेखाचा एकमेव हेतू आहे. सर्व पात्रे अस्सल असली तरी सर्व प्रसंग नकली आहेत. इच्छा व वेळ असणार्‍यांनी जरुर वाचावा.
उपक्रम महोदय, हा लेख ललित लेखन या सदरात येत असल्यामुळे तो आम्ही येथे दिलेला नाही. तो लेख अमुक एका ठिकाणी आहे ही माहिती आम्ही येथे दिली आहे. त्यामुळे हे आमचे स्फुट 'माहितीची देवाणघेवाण' या सदरात स्वीकृत व्हायला हरकत नसावी!
धन्यवाद!
सन्जोप राव

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त! ;)

मस्त लेख!

संजोपशेठ,

बोले तो...आप नही सुधरोगे! ;))

तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

:-))

भन्नाट लेख :-)))

- सूर्य

झकास !

क्या बात है !

"समजा मायबोली हे संकेतस्थळ माझे शब्द या संकेतस्थळाने ६५८ कोटी डॉलर्सना विकत घेतले."
आह !!!!!!!! अहो कमीत कमी १० दिवस आधीतरी हा लेख लिहावयाचा ... नाही आम्ही माझे शब्द विकले नसते हो ! कारण ज्यावेळी आम्ही मायबोली विकत घेऊ शकतो ६५८ कोटी (तरी नशीब तुम्ही कोटी हा शब्द अक्षरामध्ये लिहला नाहीतर आम्हाला अंक लिहताना शुन्य लिहताना खुपच मोठी अडचण झाली असती :)) ) त्या वेळी माझे शब्दची किमत १२५८ कोटी तर नक्कीच असती ना :))
सर्किट तुमची आकडेवारी काय बोलते येथे ?
लवकर लिहा आम्ही आमचा व्यवहार पुन्हा तपासून पाहू ;)

सर्किट राव ! मदत करा ह्या महत्वाच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी....

पण सन्जोप राव लेखन भन्नाटच !
एकदम झकास !

राज जैन

विकलंन?

हे काय राजने माझे शब्द ५०% विकलंन? तरीच तो एवढा मराठी संकेतस्थळाबद्दल नी मराठीबद्दल भरभरून बोलत असतो! ;)

आपला,
(मधल्या आळीतला!) तात्या देवगडकर!

संत तात्याबा गमभन वापरतात!

मस्त

लेख मस्त. सर्किटरावांच्या तोंडचे पर्याय वाचून् ह.ह.पु.वा.
पण काय हो? ह्या वाढदिवस "साजरीकरणा"च्या कार्यक्रमामध्ये स्त्री सदस्यांना मनाई होती की काय?

अपेक्षित प्रतिसाद आणि क्षमस्व

ह्या वाढदिवस "साजरीकरणा"च्या कार्यक्रमामध्ये स्त्री सदस्यांना मनाई होती की काय?
हा प्रश्न अपेक्षित होताच. अशा प्रकारच्या लिखाणात सदस्याचे वैयक्तिक नाव घेऊन लिहावे लागते, नाहीतर मग लिखाणातली गंमत निघून जाते. या पूर्वी मी जेंव्हा अशा प्रकारचे लिखाण केले, तेंव्हा काही स्त्री सदस्यांनी वैयक्तिक उल्लेख केल्याबद्दल आक्षेप घेतला होता (मग ते लिखाण कितीही निर्विष असले तरीही). काही महिलांनी 'आमचा उल्लेख तुमच्या कोणत्याही लिखाणात नको' असे स्पष्ट कळवले होते. ही माहितीजालाच्या गैरवापराची भीती आहे की खिलाडू वृत्तीचा अभाव, कुणास ठाऊक! पण त्यांच्या मतांचा आदर करणे आवश्यक असल्याने मी या लेखात महिला वर्गाचे उल्लेख जाणूनबुजून टाळले आहेत. काही गमतीदार कल्पना मनात होत्या, पण त्या व्यक्त न करणेच मला इष्ट वाटले. लेख त्यामुळे 'पुरुषप्रधान' वगैरे वाटत असल्यास क्षमस्व.
सन्जोप राव

महिला आणि विनोद!

काय हो रावसाहेब, महिला वर्गाचे नाव जाणूनबुजून टाळले आहेत असे म्हणताना माझे नाव मात्र अगदी अवतरण चिह्नात वापरले आहे. :(???
तुमच्या अशा लिखाणानेच एखाद्या वरकर्णी गाढवाचा ,"साती" हा खराखुरा आय्. डी. नसून एखाद्या पुरुषाने तयार केलेला तोतया आय डी आहे असा गैरसमज होतो ना! :)
बाकी लेख मस्तच आहे आणि प्रतिसाद नोंदवला आहे तुमच्या अनुदिनीवर.
आणि हो, या आणि मागच्या लेखाप्रमाणेच यापुढील लेखातही "साती" हे नाव आणि व्यक्तिरेखा असू द्यायला माझी काहीच हरकत नाही.
मलातरी सभ्यतेच्या मर्यादेतल्या विनोदाचे वावडे नाही. (किती गंभिरपणे हे लिहावं लागतंय :))

साती.

सही...;)

तुमच्या अशा लिखाणानेच एखाद्या वरकर्णी गाढवाचा ,"साती" हा खराखुरा आय्. डी. नसून एखाद्या पुरुषाने तयार केलेला तोतया आय डी आहे असा गैरसमज होतो ना! :)

क्या बात है साते! एकदम सही बोल्लीस बघ..;)

आणि हो, या आणि मागच्या लेखाप्रमाणेच यापुढील लेखातही "साती" हे नाव आणि व्यक्तिरेखा असू द्यायला माझी काहीच हरकत नाही.

आपकी जिंदादिली को मानडा पडेगा! ;)

बाकी बर्‍याच दिवसांनी आमच्या कंपूतली माणसं भेटली याचं बरं वाटलं! ;)

साते जियो...!!

तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

विरंगुळा

काही स्त्री सदस्यांनी वैयक्तिक उल्लेख केल्याबद्दल आक्षेप घेतला होता (मग ते लिखाण कितीही निर्विष असले तरीही). काही महिलांनी 'आमचा उल्लेख तुमच्या कोणत्याही लिखाणात नको' असे स्पष्ट कळवले होते.

कळवणारच त्या असे संजोपसर. त्यांना तुमचा विरंगुळा होणे मान्य नसेल्.

काय म्हणता?

साचा

रावसाहेब,

एकंदर साच्यात तोचतोचपणा जाणवायला लागला आहे. काहीतरी वेगळ्या सेटिंगमध्ये बसवा ना, मंडळींना!

मात्र तुमची बारीक निरीक्षणे, आणि स्वभावविशेष एकत्र आणून विनोदी गोफ गुंफण्याची कला ही हेवा वाटण्याजोगी आहे. वाचायला मजा येते.

- कोंबडी

हम्म

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

;)

लेख आवडला

संजोप,
लेख वाचला व आवडला, पण फार त्रोटक वाटला. आता दीर्घकथा किंवा कादंबरिका लिहिण्याचा विचार करा.
- दिगम्भा

मला चे कौतुक वाटते!

छान.

राव साहेब,
मराठी वाडःमयाचा इतिहास. तसा संकेतस्थळावरच्या मराठीच्या साहित्याचा इतिहास जेव्हा लिहिल्या जाईल,तेव्हा त्या लेखकांची स्वभाव वैशिष्ट्ये समजून घेण्यास या लेखाची मदत होईल असे वाटते.बाकी सर्कीटराव च्या मूखी असलेली वाक्य आवडलीत.तात्याकडचा कटाक्ष, क्या बात है.उत्तम निरीक्षणे. > (त्यांना वगळून संकेतस्थळाचा इतिहास लिहिणे शक्यच नाही असे वाटते,माणूसबी जरा हटकेच आहे हो.)

आपला.
चांगल्या लेखनाचा,लेखकांचा
मस्त फ्यान.

गाळीव इतिहास! ;)

बरं का संजोपदादा,

भाईकाकांनी जसं मराठी वांगमयाचा (गाळीव) इतिहास लिहिला, तसा तुम्हीही "मराठी संकेतस्थळांचा (गाळीव) इतिहास" लिहा बरं!

तुम्ही तो अगदी झकास लिहू शकाल याची आपण गॅरेंटी देतो! ;)

आपला,
(मराठीसंकेतस्थळांची एक डोकेदुखी!) तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

हा हा हा

रावसाहेब,
लेख मस्त. मजा आली.

उपक्रम महोदय, हा लेख ललित लेखन या सदरात येत असल्यामुळे तो आम्ही येथे दिलेला नाही. तो लेख अमुक एका ठिकाणी आहे ही माहिती आम्ही येथे दिली आहे. त्यामुळे हे आमचे स्फुट 'माहितीची देवाणघेवाण' या सदरात स्वीकृत व्हायला हरकत नसावी!

हे सुद्धा मजेदार. :)

-- लिखाळ.

पूर्वीसारखेच

मजेदार.
आवडले !
फक्त वाढदिवसाची उत्सवमूर्ती बदलली आहे, इतकेच. मजा तेवढीच, वाढदिवस कुणाचा का असेना, काय फरक पडतो?

खेद वाटतो

हा लेख ललित लेखन या सदरात येत असल्यामुळे तो आम्ही येथे दिलेला नाही. तो लेख अमुक एका ठिकाणी आहे ही माहिती आम्ही येथे दिली आहे. त्यामुळे हे आमचे स्फुट 'माहितीची देवाणघेवाण' या सदरात स्वीकृत व्हायला हरकत नसावी!

माझ्या एका जवळच्या मित्राचा 'बियर बार' आहे.. तिथं नेहमीच असंख्य नमुने पहायला मिळतात.. त्यातलाच एक नमुना कायम दुकानाच्या दारातुनच खुण करतो आणि वेटर पळत जाऊन त्याला दाराबाहेरच ग्लास भरून देतो तिथ उभ्या उभ्याच हा ग्लास रिचवून सदर नमूना निघून जातो.. 'इतक्या कसल्या घाईत असतो हा नेहमी?' असा प्रश्न विचारला असता 'घाई वगैरे काही नाही रे," आयुष्यात कधीही दारुच्या दुकानात पाऊल देखिल ठेवणार नाही !" असा त्याने निश्चय केल्याने असा बाहेर उभ्या उभ्या निघून जातो.' हे उत्तर.

रावसाहेबांची वरील टिप वाचून मला ह्या प्रसंगाची आठवण झाली... असले निश्चय/नियम बनवणारा आणि त्यात पळवाटा काढणारा दोघांनाही सलाम (एकदम पाडगावकरी)!

ललित लेख दुवा म्हणून दिलेला चालतो.. लेखकाने 'ह्याला कविता समजू नये" असं म्हणून टाकलं की कविता देखिल चालते.. भाई काकांची आठवण सुद्धा चालते.. 'राज जैन' ह्यांच्या लेखाला मात्र इथून उडवलेले दिसते.
माहितीच्या देवाण घेवाणी साठी असलेल्या ह्या उच्चभ्रु संकेतस्थळावर हे डिस्क्रिमीनेशन का चालते हे विचारणे सुद्धा आता सोडून दिले पाहिजे.. 'तुम्ही दाखवा संकेत स्थळ काढून!' असा प्रतिसाद यायचा आणि अर्थातच आम्हाला ते शक्य नाही!!

.. आजकाल आपल्या क्रिकेट टीम विषयी नाराजी व्यक्त करताना सुद्धा विचार करतो.. कुणास ठाऊक 'तुम्ही दाखवा खेळून' असं लगेच कुणीतरी म्हणेल..

-वरूण

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

मराठी संकेथळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे मी समर्थन करतो.

उपयोग नाही

ललित लेख दुवा म्हणून दिलेला चालतो.. लेखकाने 'ह्याला कविता समजू नये" असं म्हणून टाकलं की कविता देखिल चालते.. भाई काकांची आठवण सुद्धा चालते.. 'राज जैन' ह्यांच्या लेखाला मात्र इथून उडवलेले दिसते.

याचा उपयोग नाही. अशीच गोष्ट मागे दाखवून दिल्यावर येथील काही जाणती मंडळी माझ्या अंगावर ओरडली होती. आता ती तुम्हाला ओरडतात का ते पहायचे कारण मग तुम्ही त्यांच्यातले आणि मी ना घरका ना घाट का.

दुसर्‍या एका संकेतस्थळावर न् घालता येणारे लेख इथे टाकायचे अशी नवी स्टाइल इथे दिसते. त्यातून खरडवही दिली त्यात द्या ना आपल्या ब्लॉगची लिस्ट, त्यासाठी लेख का?

या संकेतस्थळावर जुन्या जाणत्या मंडळींना काहीही करण्याची परवानगी दिसते त्यामुळे खेद वाटून उपयोग नाही.

- राजीव.

अरे कुठे आहात ?राजिव साहेब.

राजीव साहेब,

मी ना घरका ना घाट का.तसं काही नाही राजिव साहेब,कीती शोधला मी तुम्हाला.तुम्ही लिहीत राहा.कुठे आहात सध्या .मी आहे ना तुमच्या सोबत.मी घेऊन जाईन तुम्हाला जुन्या जाणत्या मंडळीकडे. सांगू एकएकाला समजून. नाहीतर तुम्ही अन मी मिळून राजीनामा देऊन टाकू या संकेतस्थळाचा(जाऊ मिसळपाव डॉट कॉमवर,उधर अपने भाइ को बोल देंगे हमको लेते क्या अशुध्दलेखन के साथ.)

वरूण, मिसळपावचा उपसंपादक बनशील काय? ;)

माझ्या एका जवळच्या मित्राचा 'बियर बार' आहे.. तिथं नेहमीच असंख्य नमुने पहायला मिळतात.. त्यातलाच एक नमुना कायम दुकानाच्या दारातुनच खुण करतो आणि वेटर पळत जाऊन त्याला दाराबाहेरच ग्लास भरून देतो तिथ उभ्या उभ्याच हा ग्लास रिचवून सदर नमूना निघून जातो..

हहपुवा!

क्षणभर माझ्या डोळ्यासमोर रावसाहेब दुकानाबाहेर उभं राहून बियर मागताहेत, आणि आमचा शश्या जोशी ती घाईघाईने त्यांना काळ्या पिशवीत बांधून देतो आहे. रावसाहेबांनाही तेवढीच घाई आहे, ते सुट्टे पैसे परत घेण्याकरतादेखील थांबत नाहीत आणि आपल्या ब्लॉगवर निघून जातात असं चित्र उभं राहिलं! ;)

'इतक्या कसल्या घाईत असतो हा नेहमी?' असा प्रश्न विचारला असता 'घाई वगैरे काही नाही रे," आयुष्यात कधीही दारुच्या दुकानात पाऊल देखिल ठेवणार नाही !" असा त्याने निश्चय केल्याने असा बाहेर उभ्या उभ्या निघून जातो.' हे उत्तर.

अच्छा! म्हणजे "आयुष्यात कधीही 'म' वर पाऊल ठेवणार नाही" असं आम्ही म्हणतो तसं? ;))

ललित लेख दुवा म्हणून दिलेला चालतो.. लेखकाने 'ह्याला कविता समजू नये" असं म्हणून टाकलं की कविता देखिल चालते.. भाई काकांची आठवण सुद्धा चालते.. '

अरे काढा बाबा मेल्यांनो एकदाचा माझा तो लेख! माझी काहीही हरकत नाही... ;)

माहितीच्या देवाण घेवाणी साठी असलेल्या ह्या उच्चभ्रु संकेतस्थळावर

वरील वाक्यातला 'उच्चभ्रू' हा शब्द अत्यंत पटला. खरंच रे बाबा वरुणा, इथल्या चर्चा आणि त्यांचे इषय लय भारी असत्यात! आपल्याला तर कायसुदिक समजत नाय!

'तुम्ही दाखवा संकेत स्थळ काढून!' असा प्रतिसाद यायचा आणि अर्थातच आम्हाला ते शक्य नाही!!

का रे बाबा? अरे कालच मी शश्या जोशीशी मिसळपाव डॉट कॉम बद्दल बोललो. तर तो मला म्हण्ला की त्याचा फुल्टू पाठिंबा आहे आणि लागेल ती तांत्रिक मदत करायला तो तयार आहे! (तेवढंच त्या निमित्ताने तात्या इथून टळला तर बरं! ;)))

तो एवढंही म्हणाला की वरूण ची आणि सर्कीटचीही मदत घे म्हणून! आता बोल... तुला मिसळपाव डॉट कॉम चा उपसंपादक करू का? ;)) कुठले लेख ठेवायचे आणि कुठले उडवायचे याचे सगळे अधिकार फुल्टू तुला दिले!!! आहे कबूल? ;)

मी हलके म्हणत नाहीये हां, तेव्हा तूही हलके न घेता जड घे!! ;)

आपला,
(हलकाफुलका!) तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

नक्कीच..

(असो, पण वरूण सोबत योगेशची ही मदत घ्यायला विसरू नकोस हो. तो आपल्या संजोपसरांचा फ्यान आहे.

योगेशची मदतही नक्कीच घेईन. पण तुझीही हवी!

मिसळपाव डॉट कॉम च्या निर्मितीत मला माझ्यासोबत जास्तीत जास्त हलकट लोकं हवीत! ;)

अर्थात, योगेश, शश्या जोशी, नीलकांत यांसारखे काही सन्माननीय अपवाद असतीलंच!

बाकी तू, मी, वरूण, संजोपराव, तर आहोतच!;))

च्यामारी, टवाळकी, उखाळ्यापाखाळ्या, गजाली, ललित, काव्य, झालंच तर माहिती आणि देवाणघेवाणीच्या चर्चा, अशी सगळी मस्तपैकी एक मिसळ तयार करू. वर कांदा, लिंबू, कोथिंबीर मारू आणि दे धम्माल करू! च्यामारी मिसळपाव डॉट कॉम दणाणून सोडू! पुरे झाला औपचारिकपणा!!

तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

काय करणार सांगा....

"संजोपरावांच्या तल्लख डोक्यातून हे माहितीपूर्ण ललित लेखनाचं उपक्रमावर कसं प्रकाशित करावं ह्याचा एक उपाय सापडला होता.
तुम्ही लोकांनी बडबड करून सगळं घालवलं. आता मिसळपाव करा नाहीतर आणखी काही.
आम्ही खट्टू झालोय.
काय करणार सांगा! आम्ही मारे तासनतास विचार करुन एखादी फट शोधून काढली की लोक लगेच 'ही फट बघा हो!' असा गाजावाजा करुन वाराणसी करतात!

सन्जोप राव

बीयर खरेदी करताना...

क्षणभर माझ्या डोळ्यासमोर रावसाहेब दुकानाबाहेर उभं राहून बियर मागताहेत, आणि आमचा शश्या जोशी ती घाईघाईने त्यांना काळ्या पिशवीत बांधून देतो आहे. रावसाहेबांनाही तेवढीच घाई आहे, ते सुट्टे पैसे परत घेण्याकरतादेखील थांबत नाहीत आणि आपल्या ब्लॉगवर निघून जातात असं चित्र उभं राहिलं! ;)

हा हा हा - आपल्या ब्लॉगवर निघून जातात हे खासच!
सन्जोप राव

तात्या, लवकर कर हो सुरु तुम्ही!

तात्या,
या (दिसायला) साध्या भोळ्या गुंडोपंताला विसरले का तुम्ही?
आम्ही पण आहोत मिसळ पाव साठी!

... का तुम्ही पण ते उच्च्चभ्रु?

गुंडोपंत

बस काय!

या (दिसायला) साध्या भोळ्या गुंडोपंताला विसरले का तुम्ही?

बस काय! तुला कसा विसरेन? अरे तुझ्यासारखे 'प्रसिद्धी एक्स्पर्ट' लेखक तर हवेतच आपल्याला! ;)

... का तुम्ही पण ते उच्च्चभ्रु?

नाही रे बाबा. अरे तो ' उच्च्चभ्रु ' शब्द मला धड नीट उच्चारताही येत नाही रे! नुसताच भू भू असा आवाज निघतो! ;)

अनवधानाने तुझं आणि धोंडोपंताचं नांव राहूनच गेलं बघ!

तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

हम भी साथ है !

चला प्रतिसाद टाकल्याचा हेतू सफल झाला म्हणायचा.. मिसळ पाव तर मिसळ पाव.. नविन संकेत स्थळाची चाकं जोरात फिरायला लागली..
बाकी "संत तात्याबा आगे बढो, हम तुमारे साथ है !" हे आहेच!!

मराठी संकेथळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे मी समर्थन करतो.

कृपया, येथे (/div) वापरून स्वाक्षरी संपवावी अन्यथा प्रतिसादाखालील भाग त्यात खेचला जातो.

रौशनी..१

राम राम मंडळी,

आमच्या रावशेठनी सुरू केलेली ही सर्कीटच्या भाषेतली 'ब्यॅकडोरची' कल्पना छानच आहे. आम्हीही याच संधीचा फायदा घेऊन सर्व उपक्रमींना असे कळवू इच्छितो की आम्ही 'रौशनी' या आमच्या व्यक्तिचित्राचा पहिला भाग http://www.maayboli.com/hitguj/messages/75/125871.html?1179458485 आम्ही इथे प्रसिद्ध केला आहे. इच्छुकांनी तो अवश्य वाचावा ही विनंती.

दुसरा भाग आम्ही मंगळवार दि २२ मे रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध करू!

रौशनीचा प्रथम भाग आम्ही आधी उपक्रमावर प्रसिद्ध केला, परंतु थोड्याच अवधीत तो उपक्रमपंतांनी येथून उडवला. परंतु त्या बाबतीत आम्ही काहीच तक्रार नसून आम्ही उपक्रमपंतांच्या निर्णयाचा एक उपक्रमी म्हणून आदरच करतो!

धन्यवाद,

आपला,
(मुंबईकर!) तात्या.

संत तात्याबा आंब्यांची उस्तवारी करण्याकरता दोन दिवसांकरता देवगडात गेले होते. आज संध्याकाळी कदाचित त्यांना पुन्हा देवगडास जावे लागेल.

रोशनी

तात्या तुमचा रोशनीवरचा पहिला भाग आजच वाचला. छानच आहे. . पुढच्या भागांची वाट पहात आहे..
सगळा भाग सुंदर झाला आहे पण शेवटी आलेली, ''माधुरी दिक्षीत ला काय माहित असेल आमचा मन्सूर तिचा दिवाना आहे?' असली वाक्ये खूपच घिसी पिटी (क्लिशे) आणि शाळकरी निबंध टाइप (मला) वाटली.. ती टाळता आली तर पुढचे भाग अजुनच दर्जेदार होतील असे वाटते.. पुढिल भागांस शुभेच्छा!

-वरूण

मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे मी समर्थन करतो.

उत्कंठावर्धक.

तात्या,

तुम्ही छानच लिहिता. रोशनीच्या व्यक्तिचित्राबद्दल जाणण्याची उत्कंठा वाढली आहे. खरंच, कशी असेल रोशनी?

--ईश्वरी.

आम्हीही येऊ का?

संत तात्याबा आंब्यांची उस्तवारी करण्याकरता दोन दिवसांकरता देवगडात गेले होते. आज संध्याकाळी कदाचित त्यांना पुन्हा देवगडास जावे लागेल.

तात्या, आम्हीही सगळे उपक्रमाचे सभासद देवगडला तुमच्या घरी आंबे खायला येऊ का? :)
शाळेत असताना मिळणारा मे महिन्यातल्या सुट्टीचा आनंद काही वेगळाच!

-ईश्वरी.

वाट पहातोय.

तात्या,
दुस-या भागाची वाट पहातोय,त्याही पेक्षा तुम्हारा उस तरफ का देखकनेका नजरीया पसंद आया.तशी नजर लागते आणि शब्दही तसेच असावे लागतात.आगे बढो तात्या.

धन्यवाद,

सर्कीटराव, बिरुटेशेठ, वरूण, ईश्वरी,

रौशनीचा पहिला भाग आवडल्याचे कळवल्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभारी आहे.

आंब्यांच्या उस्तवारीकरता कोकणात गेलो होतो त्यामुळे बराच गडबडीत होतो. त्यामुळे रौशनीचा पुढचा भाग लिहायला वेळच मिळाला नाही. देवगडातले काम आता संपत आले आहे त्यामुळे येत्या २-४ दिवसातच रौशनीचा पुढचा भाग मायबोलीवर प्रकाशित करेन.

कोकणातल्या आंबा, नारळ, कोकमे, सुपारीच्या उस्तवारीमुळे सध्या मिसळपाव डॉट कॉमचे कामही मंदावले आहे. त्यामुळे मिसळपाव डॉट कॉम सुरू होईपर्यंत रौशनीचे सर्व भाग मायबोलीवरच पूर्ण करीन. त्यानंतर पुढचे सर्व लेखन अर्थातच मिसळपाव डॉट कॉमवर! ;)

तात्या.

मिसळपाव डॉट कॉमच्या संपादक मंडळात प्रवेशभरती सुरू आहे. इच्छुकांनी संत तात्याबांकडे अर्ज करावेत! ;)

रौशनी भाग २ प्रसिद्ध!

राम राम मंडळी,

नुकताच मी माझ्या 'रौशनी' या व्यक्तिचित्राचा भाग दोन प्रसिद्ध केला आहे. इच्छुकांनी तो कृपया इथे वाचावा,

रौशनी भाग दोनचा दुवा मला इथे देता आल्याबद्दल उपक्रम प्रशासनाचे अनेक आभार...

तात्या.

सही.

रौशनीचा दुवा आभारी आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रौशनी २

तात्या, रौशनी २ वाचला, पहिल्या २,३ परिच्छेदांमधील भयानक वास्तवाचे वर्णन काटा आणणारे आहे.

मजकूर संपादित. व्यक्तिगत प्रतिसादासाठी खरडवहीचा वापर करावा.

स्वाती

धन्यवाद..

रौशनी भाग दोन ला खरडवही, व्य नि द्वारे,दाद दिलेल्या योगेश, बिरुटेसाहेब, स्वाती, मृदुला, विसूनाना, अत्त्यानंदशेठ, प्रियाली, या सर्व मंडळींचे मनापासून आभार..

तात्या.

धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

मैत्री-कट्टा संगीत महोत्सव!

हा लेखइथेवाचा.

अत्त्यानंदशेठ,

अत्त्यानंदशेठ,

आता आपल्याला काय, कशी आणि किती दाद देऊ तेवढं सांगा! ;)

मस्तच लिहिलं आहे बॉस! वाचून खरंच खूप फ्रेश वाटलं!

मोदबुवांचं रंगीलं रसाळ गाणं आम्हाला पुन्हा ऐकायचा योग लवकरच येऊ द्या आणि आपलंही असंच हलकंफुलकं, आयुष्याच्या दोन घटका सुखाच्या करणारं लेखन आम्हाला नेहमी वाचावयास मिळू द्या, हीच त्या आई शारदेपुढे प्रार्थना!

आपलाच,
तात्या.

धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

मोदबुवांचे गाणे

मोदबुवांचे गाणे आवडले.
पुढच्या महोत्सवाला इतर थोर गायकांनाही बोलवावे.

- दिगम्भा

धन्यवाद!

दिगम्भा धन्यवाद!

तात्या दाद महत्वाची!

आणि ती आपल्यासारख्या रसिकाग्रणी कडून अशी भरभरून मिळाली की अजून काय हवे.सगळे भरून पावले.

हे वाचा.

मैत्री-कट्टा संगीत महोत्सव! ह्या माझ्या लेखातील एक तबलजी विकिखां ह्यांच्या शब्दात त्याच मैफिलीचा वृत्तांत इथेवाचा.

 
^ वर