गणेशोत्सव, गणेशपूजा आणि गणेश विसर्जन

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे असे मानले जाते. या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने खालील प्रथा पाळल्या जातात. पर्यावरण व प्रदुषण या दोन्ही बाबींचा विचार करता खालील प्रथा बंद करून त्या जागी बदल करण्याची आवश्यकता मला वाटते. उपक्रमींचे या बद्दल मत काय आहे हे जाणून घ्यायला मला आवडेल. याच प्रमाणे बंद कराव्यात अशा आणखी काही अनिष्ट प्रथा आहेत का?

1. गणेश मूर्ती बनवताना प्लास्टर ऑफ पॅरिस व मेटॅलिक रंगांचा वापर.

2. गणेशपूजा केल्यावर निर्माल्य नदी किंवा तलावांच्यात फेकून देणे.

3.दर वर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना व विसर्जन. घरात एकच धातूची बनवलेली मूर्ती आणून ठेवून त्याची दर वर्षी प्रतिष्ठापना का करू नये?

4. सार्वजनिक गणेशोत्सवात ध्वनीवर्धक वापरून होत असलेले ध्वनीप्रदुषण

5. गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीची आवश्यकता आहे का?

6. गणेश मूर्तींचे नद्या तलाव यांच्यात विसर्जन.

लेखनविषय: दुवे:

Comments

मॉर्फींग

फोटो मॉर्फींग तितकीशी बरोबर जमलेली नाहिये. कोणते सॉफ्टवेअर वापरले आहे ?

मुळात

मुळात चित्र फोटोशॉप करून संदेश त्यावर चिकटवला आहे. यातून काय अर्थ अपेक्षित आहे कळले नाही.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

अर्थ अपेक्षित आहे ?

कुणाला ? फोटोचे मॉर्फींग करणार्‍याला की ते येथे उपलब्ध करुन देणारयाला ?

इथे

मॉर्फिंग करणार्‍याचे माहित नाही. पण इथे देण्यामागे काय अर्थ आहे ते कळावे अशी अपेक्षा आहे.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

इथे

एक उपप्रश्न : मॉर्फींग करणारा आणि इथे ते उपलब्ध करुन देणारे ही एकच व्यक्ती असू शकेल काय ?
असो.
कदाचित "वन बिलीयन हिंदूज कॅन बी राँग" अथवा "वन बिलीयन हिंदूज आर राँग"असा म्हणायचे असेल. ही चर्चा तुम्ही वाचली नाही काय ?

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

संशय सिद्धांत

ही शक्यता सोडली तर मॉर्फिंगचा मुद्दा गैरलागू आहे. संदेशाला कापडी बॅनरवर लावणे वा तो मॉर्फ केलेल्या चित्राने इमेल करणे हे दोन्ही मार्ग समानच गर्हणीय ना?

+१

फोटो उपलब्ध करून देणार्‍यांना काय अर्थ अभिप्रेत आहे/त्यांचे काय उद्दीष्ट आहे, हे कळावे.

||वाछितो विजयी होईबा||

म्हण्जे काय् रे भाऊ??

मॉर्फिंग म्हणजे काय् ते मज् पामराला कुणी सांगेल् का?? या तुच्छ् प्रश्नाब्द्दल क्षमस्व्!!

मॉर्फिंग

मॉर्फिंग म्हणजे सुवर्णाताईंना जी कुठली नटी आवडत असेल तिच्या छायाचित्रात सुवर्णाताईंचा चेहरा डिजिटल प्रक्रियेने चिकटवणे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

पण्

पण् मला देविका द्फ्तरदार आवडते. तिच्यावर माझा फोटो चिकटवल्यावर मग् काय उपयॉग्??

आणि मला ताई म्हणू नका हो........... फार्रर्रच् मोठे आहात तुम्ही माझ्यापेक्षा!!! पण् मॉर्फिंग म्ह्णजे कय ते मात्र् समजलं. :P

ताई

मी माझ्या नातीलाही वय वर्षे 5 काही वेळा ताई म्हणतो. मग सुवर्णाताईंना म्हणायला काय हरकत असावी?

चन्द्रशेखर

वय

ती ५ वर्षांची असल्यामुळे ऐकून घेत असावी , बहुतेक!! पुढे बघा............ :P म्हणजे काहि वर्षांनी!!

यु टर्न

आता आपली "मॉर्फ़िंग, ताई, नात, वय" वगैरे वगैरे उप प्रेक्षणीय स्थळे पाहून झाली असतिल तर गाडी मुख्य पॉईंटकडे वळवुया ....

इतर प्रथांबाबत नाहि मात्र ध्वनिप्रदुषणाविरोधात एक उपाय सुचवते............ शिवाजी राजांनी / स्वातंत्र्यसैनिकांनी ज्याप्रमाणे आपली एक टोळी बनवली होती त्याप्रमाणेच समविचारी लोकांची (अर्थात डॉल्बीविरोधातिल) एक टोळी बनवणे, शत्रुविरोधात गनिमी कावा वापरुन त्याला नामोहरम कस करता येईल यासाठि विविध युक्त्या योजणे. उदा.-- मिरवणुकीच्या आदल्या रात्री छुप्या पावलाने जाऊन मंडळातिल संपुर्ण डॉल्बी सिस्टीम उध्वस्त करणे >> लक्ष देऊन ऐका की मी स्फ़ोट वगैरे करायला अज्जिबात सांगत नाहीय !!! इतकी मी सनातनी नाही! लगेच माझ्यावर मोक्का लाऊ नका!! ...... विधायक मार्गानेही एखादी सिस्टीम उध्वस्त करता येते. त्याविषयी सखोल अभ्यास करुन युक्त्या प्रयुक्त्या लढवता येतिल. किंवा "विठ्ठलाऽऽ कोणताऽऽ कापुस घालु कानी...??" याप्रकारची गीते तयार करता येतिल...

एखादा वाद निर्माण करणे, त्यानंतर त्यामधे हळुच्‌ उपवादाच पिल्लु सोडणे परत त्यावर तिस-याने उपप्रतिवाद करणे त्यावर परत उपऊपप्रतिवाद (भरकटतय आपल तारु कधि इथे कधि तिथे)..........या आख्यान उपाअख्यान चक्रात अडकण्यापेक्षा हे बरं.

आणि बंद व्हाव्यात अशा अजुन काही प्रथा-----
१. हवामान सर्वसाधारण असताना...काहिही कारण नसताना एसी चालु ठेवणे.
२. २ मिनीटात चालत जाता येऊ शकेल, अशा वेळी आपली ४ किंवा २ चाकी रस्त्यावर काढुन ट्रॅफ़िक-जाम ला हातभार लावणे.
३. खाऊन झाल्यावर उरलेला कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणे.
४. रस्त्यावर, भिंतींवर पचापचा थुंकणे.
५. लाच मागितल्यावर ती देणे.
६. लाच मागणे. (सर्वात अनिष्ट प्रथा)

फरक

३, ४, ५, आणि ६ यांविरुद्ध नियम आहेतच.
१ आणि २ यांमुळे इतरांना होणारा त्रास (सध्याच्या परिस्थितीत) इतका कमी आहे की त्या कृती 'जगण्याचा हक्क' या सदरात मोडतात. पर्यावरण अधिक बिघडले तर तेही नियम केले जातीलच.

नियम व प्रथा

>>३, ४, ५, आणि ६ यांविरुद्ध नियम आहेतच

नियम व प्रथा यामध्ये गफलत होते आहे. ठरवुन दिले जातात ते नियम; आपण पुर्वीपासून पाळतो त्या प्रथा. नियम जरी असले तरि ते कितीसे पाळले जातात? मला वाटत कागदावरच्या नियमापेक्षा प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. विविध झोनमधे विविध डेसीबल् ची मर्यादा कागदावर धुळ खात पडुन आहे. त्यातील किती मर्यादा पाळल्या जातात?

>>१ आणि २ यांमुळे इतरांना होणारा त्रास (सध्याच्या परिस्थितीत) इतका कमी आहे की त्या कृती 'जगण्याचा हक्क' या सदरात मोडतात.

१. जो एसी खोलीतील हवा थंड करत असतो तो कुठून आणतो थंडावा??
ठंडी हवायें यात आपला एसी कुठुन थंड हवेचे पार्सल आणतो त्याचं चित्रमय वर्णन आहे. compressor खोलीतील हवा दाबत असतो आणि ती condenser कडे धाडत असतो, condenser येणारी वाफ़ थंड करतो (म्हणजेच-- येथे वाफ़ प्रसरण पावल्याने आजुबाजुच्या वातावराणात आपल्या अंगातिल जास्तीची उष्णता सोडत असते.) दुव्यातील चित्रामधील लाल भाग जो आग ओकत असतो त्याच्या भक्ष्यस्थानी ति गरिब जनता येते ज्याचाजवळ एसी नसतो. यानंतर उष्णता बाहेर सोडून तयार झालेल वाफ़ेच गरम पाणी expansion valve मधे जोरदार स्फ़ोट होऊन प्रसरण पावल्यामुळे थंड होते आणि evaporator कडे पोहोचते होता होता खोलीतिल उष्णता शोषुन घेते व हि उष्णता पुन्हा compressor कडे पाठवते. compressor पाठवतो condenser कडे बाहेर आग ओकायला ; हे चक्र(vapor compression cycle) चालुच राहते!! आणि "आपल्यामुळे इतरांना होणारा त्रास (सध्याच्या परिस्थितीत) खुप कमी आहे" टाईप सुसंस्कृत जनता या निळ्या प्रभागाच्या(चित्रातील) कृपेने आराम करत असते---हवा सहन करण्या इतपत गरम असली तरी! न जाणो असे किति एसी एकावेळी आग ओकत असतात. आणि अनैसर्गिक उष्णता वाढवत असतात. माझ एवढच म्हणणं आहे कि, जर सहन करण्याइतपत हवा गरम असेल तर एसी का चालु ठेवावा? 'जगण्याचा हक्क' इतरांना नाही का? ही कोणती माणुसकी? हे सहन करण्याइतपत हवेबाबत झालं....पण....जेव्हा ती आतल्यांना सहन करण्याजोगी नसते, तेव्हा ती बाहेरच्यानाही सहन करण्याजोगी नसतेच. तेव्हासुध्दा हाच condenser दुप्पटीने आग ओकत असतो. तेव्हा बाहेरच्याचा 'जगण्याचा हक्क' अबाधित राखण्यासाठी; अत्यावश्यक व तातडीच्या प्रसंगीच एसी वापरणे योग्य आहे. उदा.-औषधे सुरक्षित ठेवण्यासाठी.
पर्यावरणाच्या दृष्टीने यापेक्षाही भयानक परिस्थिती या एसी फ़्रिज मुळे निर्माण झाली आहे. दुवा--भयानक एसी
भारताचा एक नंबरी शत्रु युनियन कर्बाईडचाही यात उल्लेख आलाय.

२. याबाबत कोणाही पुण्यामुंबईतल्या माणसाला विचारा किती नगण्य आहे ही समस्या......त्यापेक्षा वाहतुक पोलिसालाच विचारा.

>>पर्यावरण अधिक बिघडले तर तेही नियम केले जातीलच.
मला वाटत आपण रात्री घर उघड ठेवूनच् झोपता..... येईनात चोर, आल्यावर बघुया. काय घाई आहे? बॅंकांच्या लॉकरांना पण खुल ठेवुया.
अपघाताआधी सुरक्षिततेचे उपाय योजणे वगैरे असल काही नसतं बहुतेक्.
कल्पना करा एखाद माणुस तुमचा फोटो काढताना अंदाज न येऊन खोल कड्याच्या दिशेने मागे मागे जात असेल तर तुम्ही ओरडुन त्याला लवकरात लवकर सावध करणार की

त्याचा कडेलोट होईपर्यंत वाट बघणार? मग पोलिसांना बोलवणार?.......पोस्ट मोर्टम करायला !

खुलासा

जगातले सगळे एसी बंद केले तरी पुण्यामुंबईच्या माणसाला किंवा वाहतूक पोलिसांना किती फरक पडणार आहे त्याचे काही आकडे आहेत काय?

मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या प्रकारची बचत करायला सांगत आहात त्यानुसार फटाके फोडणे, मांसाहार, पर्वतारोहण, मनोरंजनात्मक वाचन, इ. कोणतीही चैन ही उधळपट्टीच ठरते आणि मुले जन्माला घालणे हेही इतरांच्या हक्कांवर आक्रमण ठरते.

युनियन कार्बाईड या विषयावर उपक्रमवर कधी धागा सुरू झाला होता काय?

चिंता करितो...................... फटाक्यांची...

>>>जगातले सगळे एसी बंद केले तरी पुण्यामुंबईच्या माणसाला किंवा वाहतूक पोलिसांना किती फरक पडणार आहे त्याचे काही आकडे आहेत काय?
आधी जगातले सगळे एसी बंद तरी करा. मग बघुया आकड्यांचं..... हळुहळु ते पण पाठवुया. काही कशाला भरपुर पाठवुया.......पण कोणत्या प्रकारचे हवे आपल्याला? काळे, निळे, हिरवे, लाल.....मुली जास्तकरुन ज्या रंगाचे कपडे घालतात त्याच रंगाचे आकडे वापरतात. मी मात्र काळेच वापरणे पसंत करते त्यामुळे एक्दोनच् आकडे बाळगले तरी चालुन जात. बचत्!! तुम्हाला कोणते हवे ते सांगा त्याप्रमाणे पाठवण्याची व्यवस्था करता येइल. जास्त मोठे व जाड केस असतील तर भक्कम आकडे पाठवले पाहिजेत, त्यामुळे केसांचा प्रकारही कळवा.

असही ऐकलय कि मटका या खेळप्रकारातही आकडे वापरले जातात......ते आकडे कसे असतात हे अजुन पाह्यल नाही. त्यामुळे ते हवे असतील तर नाहिय़ेत ते माझ्याकडे. सॉरी एक्सटर्मली.

आणि तुम्हाला जर आकडी म्हणायच असलं तर तो एक आजार असतो अस ऐकलय. तो मेंदुत काहितरी बिघाड झाल्यामुळे होतो व याला फ़ेफ़र असही म्हणतात. इंग्लिशमधे एपिलेप्सी अस म्हणतात. अधिक महितीसाठि हा दुवा . आणि आपल्याला तो न होवो ह्याच्यासाठि देवाजवळही मागुया दुवा. (गरीब विनोद)

>>>मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या प्रकारची बचत करायला सांगत आहात त्यानुसार फटाके फोडणे, मांसाहार, पर्वतारोहण, मनोरंजनात्मक वाचन, इ. कोणतीही चैन ही उधळपट्टीच ठरते आणि मुले जन्माला घालणे हेही इतरांच्या हक्कांवर आक्रमण ठरते.
फटाके या प्रकाराबद्दल मला इतकच माहिती आहे की ते कोणाच्याही कानाखालि वाजवता येतात (एका पक्षाचे पेटंट). हि चैन आहे का?
मांसाहार, पर्वतारोहण, मनोरंजनात्मक वाचन, मुले जन्माला घालणे या गोष्टी चैन, इतरांच्या हक्कांवर गदा.....लई भारी.....( मित्रा ! अस म्हणु शकते का आपल्याला?? ता.क. पण फ़ुंकुन फ़ुंकुन प्याव लागतय्‌...) तोडलस्‌ !

>>>युनियन कार्बाईड या विषयावर उपक्रमवर कधी धागा सुरू झाला होता काय?
फ़ार मोठा संशोधनपर विषय सुचवल्याबद्दल धन्यवाद. संशोधन सुरु करते नोबेल मिळेल ही आशा ठेवुन. एकुण किती रक्कम असते ती??

शिवाजी महाराज

या सगळ्या कल्पना ठीक आहेत हो. पण टोळी बनवण्यासाठी ते शिवाजी महाराज कोठून आणायचे? तुम्ही राणी लक्ष्मीबाई बनून काही करू शकत असलात तर बघा!

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

नक्कि नक्की

नक्कीच् .....
माझ्या सैन्याचे सरसेनापती बनण्याची ऑफर् मी तुम्हाला देउ शकते का??

 
^ वर