दारू जास्त प्या आणि रोज जास्तीत जास्त बिड्या फुंका

लेखाचे शीर्षक वाचून हा लेक श्री. ठणठणपाळ यांनी लिहिला असावा असे वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण माझा नाईलाज असल्याने हेच शीर्षक देणे भाग पडले आहे. हा सल्ला रशियाच्या अर्थमंत्र्यांनी रशियामधल्या सर्व नागरिकांना दोन दिवसापूर्वी दिला आहे. रशियाची अर्थव्यवस्था जर जोमदार करायची असली तर असे करणे आवश्यक आहे असे त्याना वाटते. सर्वसाधारण रशियन माणूस वर्षाला 19 लिटर व्होडका पितो. त्यात वाढ होणे आवश्यक आहे असे अर्थ मंत्री ऍलेक्स कुद्रिन यांना वाटते. तसेच रशियातले फक्त 65% लोक सिगारेट्स ओढतात. ही टक्केवारी फारच कमी आहे असेही त्यांना वाटते. दोन महिन्यांपूर्वी कुद्रिन यांनी सिगारेट्स व दारू यांच्यावरचे कर बरेच वाढवले होते. परंतु त्यातून अपेक्षित उत्पन्नवाढ न झाल्याने हा सल्ला त्यांनी रशियन लोकांना दिला आहे.
इंग्रजीमधे म्हण आहे Great men think alike म्हणून. आपल्या महाराष्ट्राच्या व भारताच्या साखर व कृषी उत्पादनांसंबंधी मंत्र्यांना बहुदा श्री. कुद्रिन यांच्यासारखेच वाटत असावे. त्यामुळेच ऊसापासून साखर बनवण्यापेक्षा मद्यार्क बनवा. धान्य सडून वाया घालवण्यापेक्षा मद्यार्क बनवा अशा मोहिमा ते राबवत असतात. या मद्यार्कापासून बनवलेली दारू जास्तीतजास्त लोक पिऊ लागले की महाराष्ट्राचे व देशाचे उत्पन्न नाही का वाढणार? आर्थिक भरभराट ही अशी होते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक साखर कारखान्यासमोर श्री कुद्रिन यांचा पूर्णाकृती पुतळा खरे म्हणजे उभारला पाहिजे.
चंद्रशेखर

लेखनविषय: दुवे:

Comments

पूर्णाकृती पुतळा

श्री. "ठणठणपाळ" आपला आभारी आहे. तुम मुझे युं भुलाना पाओगे जब कभी भी ऐसा वक्त आयेगा संग संग तुम मुझे भी याद करोगे.
श्री कुद्रिन यांचा पूर्णाकृती पुतळा का? आपल्या महान् लोकशाहीत नेते कमी आहेत का?

thanthanpal.blogspot.com

ठायी-ठायी ठणठणपाळ

उपक्रमींना ठायी-ठायी ठणठणपाळ दिसायला लागल्याचे वाचून मला संताजी-धनाजींच्या घटनेची याद आली. होय्, अनेकांचे पुतळे उभे करु शकु असे अनेक थोर्-थोर् मंडळी आहेत आपल्याकडे.

गमतीदार बातमी

ही बातमी खरंच गमतीदार आहे.
सगळ्याच देशाची सरकारे स्वतःचे खर्च कमी करण्यापेक्शा लोकांकडून वेगवेगळ्या मार्गाने कर कसा वसूल करायचा याच्याच विचारात असते असे दिसते.
कालच दुचिवावर श्री. अण्णा हजारे यांना, 'मुदत संपली तरीही बर्‍याच ठिकाणी सरकारने, जी 'वाटमारी' टोलटॅक्सच्या नावाने चालू ठेवली आहे, ती बंद करायला पाहिजे!' असे म्हणताना पाहिले होते ते आठवले.

 
^ वर