गोध्रा दंगलीच्या काळात करण्यात आलेली भाषणे.

गोध्रा दंगलीच्या काळात करण्यात आलेली भाषणे. हि भाषणे सलोखा निर्माण करणारी नक्किच नाहीत.

हिंदुत्व :

प्रवीन तागडिया:

मोदि:

भाजप आणि विहिप:

प्रशासकांना विनंती : सदर लेख "आक्षेपार्ह लेखन" ठरण्याची शक्यता असल्यास लेख काढून टाकावा.

Comments

य संघटना

या संघटनांची कामं काय आहेत ते आपण बाबरी मशिद,१९९३ च्या मुंबई दंगलीत पाहीली आहेत. यांना जर खरोखरोच सलोखा निर्माण करायचा असता तर आतापर्यंत अशा घटना घडल्याच नसत्या.
आपला
कॉ.विकि

झकास !

...यांनीच बाबरी पाडली आणि यांनीच मुंबईची दंगल घडवली आणि यांनीच बॉम्बस्फोट सुध्दा घडवले असतील ना?

नीलकांतजी

यांनीच बॉम्बस्फोट सुध्दा घडवले असतील ना? या वाक्याचा अर्थ कळला नाही.
आपला
कॉ.विकि

त्याचं काय आहे...

हे बघा या देशात हिंदूंना शिव्या देणं म्हणजे आपण पुरोगामी आहोत असं भासवल्याचं मानल्या जातं. उठ सुट हिंदूना शिव्या देणं म्हणजे प्रखर पुरोगामी असनं असा संकेत(?) आहे.

वर दिलेले हिंदूत्ववादी संघटनांचे व्हिडीओ मला उघडून ऐकावेसे सुध्दा वाटलेले नाहित. कारण ते काय बोलतील याची सामान्य कल्पना आहे मला. मी या विहिंप किंवा प्रविण तोगडीया यांचा कार्यकर्ता नाही. त्यांची टोकाची मते मला मान्य नाहित. मात्र असं असून सुध्दा मी हिंदू आहे या बद्दल मला अभिमान आहे.

या संघटनांचा व्हिडीओ वर दिलात मात्र गोध्राचा व्हिडीओ किंवा त्याची चित्रे का नाही दिलीत? त्या काळात गोध्राचा निषेध किती लोकांनी केला आणि त्या नंतर झालेल्या दंगलीनंतर सगळ्या धर्मनिरपेक्षतावाद्यांनी मोदींचा राजीनामा तेवढा हवा होता, त्याची काही दखल घेतल्या गेली आहे का?

मोदींनी जर का निष्पाप लोकांचा बळी दिला असेल तर ते दोषी नक्कीच आहेत. मात्र या सर्व गोंधळात ज्यांनी गोध्रा घडवले त्यांचा निषेध का नोंदवल्या गेला नाही?
जेथे मुस्लीम मारल्या जातात तेथे धर्मनिरपेक्षता मारल्या जाते आणि जेथे हिंदू मारल्या जातात तेथे काय?
मला ह्या दुटप्पी धर्मनिरपेक्षतेचा राग येतो.
त्या तिस्ता सेटलवाड ला गोध्राचा शोध का करावासा नाही वाटला? आणि मोदींनी सुध्दा गोध्राच्या आरोपींवर कुठले आरोप ठेवले आहेत. त्याचे वर्तमान काय याची कुठेच काहीच चर्चा नाही.

सलोखा कुणी निर्माण करायचा? ज्यांनी रेल्वे जाळली त्यांनी की जे त्यात जळले त्यांनी? असो. हा मोठा वादाचा विषय आहे अहो ज्या विषयात राजकारण आले ते वादाचेच होतात.

राम मंदिर हा खरं तर एक धार्मीक मुद्दा होता, आणि तो धार्मीक पध्दतीने सोडवायला हवा होता. भाजपसारख्या संधीसाधू पक्षाने त्याचे राजकारण केले आणि सगळा गोंधळ घालून ठेवला आहे.

या संघटनांची कामं काय आहेत ते आपण बाबरी मशिद,१९९३ च्या मुंबई दंगलीत पाहीली आहेत. यांना जर खरोखरोच सलोखा निर्माण करायचा असता तर आतापर्यंत अशा घटना घडल्याच नसत्या.

या तुमच्या वाक्यातून सुध्दा मला असाच पुरोगामित्वाचा अंश दिसला म्हणून म्हटलं आपण त्याही पुढे जाऊन आपले पुरोगामित्व सिध्द (?) करावे. मग काय... बॉम्बस्फोट सुध्दा यांनीच घडवून आनले असं म्हणायचं, कारण आमच्या देशात १९९३ पुर्वी कधीच दंगल झालेली नव्हती - ती या हिंदूंनी घडवली, १९९२ च्या आधी कधीच कुठले मंदिर पाडल्या गेले नव्हते - हा पायंडा तर ह्या ह्या हिंदूनी घडवला.

अहो मला सांगा यांना गरजच काय अयोध्येत राम मंदिर असावं, काशी आणि मथुरेत मंदिर मागायला निघालेत हे मुर्ख.. धर्मांध हिंदू!

नीलकांत

आवडले!

- (पुरोगामी) सर्किट तोगडीया

आवडले!
(मुक्त चुंबनवादी) गुंडोपंत

भावनाविवशता?

भासवल्याचे मानणे जाणे? तोगडियांचा कार्यकर्ता (समर्थक नव्हे)? गोध्राच्या चलचित्राची मागणी.. राममंदीर धार्मिक मार्गाने सोडवणे.. मथुरेत मंदिर मागायला निघालेत हे मुर्ख.. धर्मांध हिंदू!

आपले मत व उपहास यात गल्लत व्हावी अश्या वाक्यरचनांमुळे आपण प्रतिसाद भावनाविवशतेत लिहीला आहे असे वाटले.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

तोगडिया आणि लादेन!

ह्या पुरोगामी लोकांची मला नेहमीच गंमत वाटत आलेय.
स्वत: हिंदू असून हे हिंदूंविषयी नेहमीच अपप्रचार करतात. हिंदू हे जातीयवादी आणि सगळे मुसलमान मात्र 'धर्मनिरपेक्ष' असा ह्यांचा जावईशोध आहे. उठसुठ फतवे काढणारे मुल्लामौलवी ह्यांना कधीच दिसत नाहीत की त्यांच्या फतव्यांच्या बद्दल कधीच काही बोलत नाहीत. सगळी वाईट विशेषणे फक्त हिंदूंनांच लागू होतात. हिंदू धर्मीयांच्या भावना कधीच दुखावल्या जात नाहीत;कारण त्यांना भावनाच नसतात अशी ह्यांची समजूत आहे.
प्रवीण तोगडिया आणि काही तत्सम लोकांना हिंदू धर्मातले बहुसंख्य लोक काडीचीही किंमत देत नाही हे ह्या पुरोगामी लोकांना चांगलेच माहित आहे. त्याचवेळी बिन लादेनचे मुसलमानांच्या मनात असलेले अढळ स्थानही त्यांना माहित आहे. म्हणूनच बिन लादेनच्या बद्दल ते काहीच बोलत नाहीत. प्रवीण तोगडियांच्या नावाने बोटं मोडायला मात्र ते नेहमीच तयार असतात कारण तिथून काहीच धोका नाही. प्रवीण तोगडियांबद्दल बोलताना ते सगळ्याच हिंदूंना सरसकट जात्यंध ठरवत असतात हे त्यांना कळत नाही असे नाही;पण हिंदू हे जात्याच सोशिक असल्यामुळे त्यांच्याकडून प्रतिकार होणार नाही हेही ते जाणून असतात.केवळ मुसलमानांची मते मिळावीत म्हणून हे लांगुलचालन ते करत असतात.
मुसलमान जात्याच जात्यंध आणि धर्माभिमानी आहेत किंबहुना त्यांच्या धर्माची शिकवणच मुळी अशी आहे की गैर मुस्लीम म्हणजेच 'काफिर' आणि त्याला ह्या जगात जगण्याचा अधिकार नाही. तेव्हा त्यांना आपल्या धर्मात घ्या किंवा संपवा. हे सगळे माहित असल्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याची ह्या तथागथित पुरोगाम्यांची हिंम्मतच होत नाहीत. उगाच आपला जीव कोण कशाला धोक्यात घालेल्?
हिंदू धर्मातील वाईट चालीरीती आणि प्रथा ह्यांच्याशी लढा देणार्‍या सुधारकांची आपल्याकडे कमी नाही.वेळोवेळी त्यांनी ह्यासाठी चळवळी उभारल्या आहेत. हिंदू धर्मातल्या ह्या प्रथा नष्ट करण्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे. त्यामुळे आज हिंदू धर्मात बर्‍याच प्रमाणात सुधारणा घडून आलेल्या दिसताहेत. अजूनही व्हायला बराच वाव आहे पण म्हणून जो उठतो त्याने हिंदू धर्मीयांना नैतिकतेचे धडे देण्याचे आणि मुसलमानाना प्रशस्तीपत्र देण्याचे जे आरंभलेले आहे ते सर्वथैव चुकीचे आहे. ह्या असल्या दुट्टपी वागणुकीतून देशाची अखंडता भंग पावते आणि हिंदूंमधील काही अतिरेकी लोकांना तेव्हढेच निमित्त मिळते. कदाचित अशामुळेच त्यांना समाजाची सहानुभूती मिळू शकते हे ह्या पुरोगामी लोकांनी विसरु नये..
म्हणून सरसकट हिंदूंवर कोणतेही लेबल चिकटवू नये आणि जिथे अणि ज्याच्यावर अन्याय झाला असेल त्याबद्दल योग्य भूमिका घेतली तर तोगडियांसारख्यांना अजिबात किंमत मिळणार नाही.सर्वसामान्य हिंदूंना शांत आणि सौहार्दपूर्ण जीवन जगावेसे वाटते हे नजरे आड करू नये ही विनंती!
तो सुदिन कधी उगवणार? की 'फोडा आणि झोडा' हे इंग्रजांची नीती हे लोक अशीच 'मागील पानावरून पुढे' चालू ठेवणार आहेत?

अवांतर-

पंकजराव, आपल्याला एक विनंती!

प्रशासकांना विनंती : सदर लेख "आक्षेपार्ह लेखन" ठरण्याची शक्यता असल्यास लेख काढून टाकावा.

किमान इथे तरी ' प्रशासक ' हा शब्द नका उच्चारू! कारण तो शब्द वाचताच आम्ही वेड्यावाकड्या शिव्या देऊ लागतो. आमचा हा वैयक्तिक प्रॉब्लेम तेवढा ध्यानात घ्या आणि सहकार्य करा एवढीच विनंती!

' प्रशासक ' च्या ऐवजी ' उपक्रमराव ', ' संपादक ', ' उपसंपादक ' असे काही सुंदर पर्यायी शब्द आहेत. कृपया त्याचा वापर करावा.

विषयांतराबद्दल सर्वांची मनापासून क्षमा मागतो. चालू द्या...

तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

कळले नाही..

जर
प्रवीण तोगडिया आणि काही तत्सम लोकांना हिंदू धर्मातले बहुसंख्य लोक काडीचीही किंमत देत नाही हे ह्या पुरोगामी लोकांना चांगलेच माहित आहे. ...
तर
प्रवीण तोगडियांबद्दल बोलताना ते सगळ्याच हिंदूंना सरसकट जात्यंध ठरवत असतात हे त्यांना कळत नाही असे नाही;
कसे? तरीही
म्हणून सरसकट हिंदूंवर कोणतेही लेबल चिकटवू नये आणि जिथे अणि ज्याच्यावर अन्याय झाला असेल त्याबद्दल योग्य भूमिका घेतली तर तोगडियांसारख्यांना अजिबात किंमत मिळणार नाही.
कसे? वगैरे कळले नाही.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

ओसामा आणि तोगडिया ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत!

असे माझे म्हणणे आहे. तोगडिया हे समस्त हिंदूंचे प्रतिनिधी नाहीत हे लक्षात असू द्यावे आणि त्यांच्यासारख्या यःकश्चित माणसाला महत्व देऊ नये असे मला सुचवायचेय. ओसामाबद्दल तर पुरोगाम्यांना काही सल्ला देण्याची जरुरच नाहीये. कारण आजच नव्हे तर ह्यापुढेही कधी त्याच्याबद्दल ते काहीही बोलण्याची हिंमत करु शकणार नाहीत .कारण? तुम्हाला माहीतच आहे. फतवा!
मूळ मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे तो गोध्रा कांडाचा. मुळात ते घडले कसे? कोणी केले आणि का केले? ह्याबद्दल जाणून घ्यावे आणि त्याबद्दल कारवाई व्हावी ह्याबद्दल हे तथाकथित पुरोगामी लोक काहीच का बोलत नाहीत? आघात करणार्‍यांबद्दल सहानूभूती आणि प्रत्याघात करणार्‍यांबद्दल मात्र कारवाईची मागणी? हा कुठला न्याय आहे?सतत एकाच समाजाची तळी उचलून धरल्यामुळे दुसर्‍या समाजाचे लोक आपल्यावरच्या अन्यायाची दाद मागताना अलगदपणे अतिरेक्यांच्या ताब्यात जाऊ शकतात. हे असे होऊ नये अशी प्रामाणिक भावना असेल तर कोणताही निष्कर्ष काढण्याआधी पूर्ण विचार करावा.
प्रथम आघात करणार्‍यांवर योग्य ती कारवाई करा आणि मगच प्रत्याघाती लोकांकडे वळा(त्यांनाही सोडू नका).मत्र त्यात राजकारण आणू नका. आपल्याकडच्या सगळ्या समस्या ह्या राजकारण्यांमुळेच निर्माण झालेत.

खरे तर हे प्रकरण होऊन कैक वर्षे लोटलेत;जे झाले (दोन्ही बाजूंनी) ते अत्यंत घृणास्पद होते;पण ते कुणीही टाळू शकले नाही. ते असे का घडले? का टाळू शकले नाही ?ह्या उपर हे असे पुन्हा घडू नये म्हणून काय करता येईल?ह्याचा शोध घेऊन त्यासंबंधी दोन्ही समाजातील तेढ कमी करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी सर्वपक्षीय राजकारणी केवळ आपापली टिमकी वाजवताहेत.

ह्याउपरही कुणाला काही शंका(कुशंका) असल्यास मी समजवायला असमर्थ आहे. कृपया आपण आपलेच समजून घ्यावे.

झाले गेले विसरून उद्याच्या उज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यातच समस्त भारतीयांचे हित आहे. रोज उठून तीच धुणी धुण्याऐवजी अथवा तीच दळणे दळण्याऐवजी काही तरी नवा विचार करावा.जखमेवरची खपली काढण्यात कोणता आलाय शहाणपणा?

असे जर...

असे जर असेल, तर ज्या नाण्याची एक बाजू बुश आहेत तर दुसरी कोण?


मराठीत लिहा. वापरा.

भारतात

भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे .त्याला हिंदुराष्ट्र बनवायला कोण निघाले आहे ते आपणा सर्वांना माहीत आहे. गुजरातेत काय घडले. धर्माचा अभिमान कशाला असावा कारण धर्म ही पुर्णपणे व्यक्तिगत बाब आहे सार्वजनिक जीवनात धर्म नसावा.
वाचा- वर्दीतील खुनी दै. लोकसत्ता
वाचा-कलंकप्रतिष्ठा दै.लोकसत्ता ,यातुन काय तो अर्थ काढा.
आपला
कॉ.विकि

नंदिग्राम

विकी साहेब.. नंदिग्राम बद्दल आपले मत जाणून घ्यायला आवडेल. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. असे ज्यांनी केले त्यांना काय हक्क होता भारत धर्मनिरपेक्ष बनवायचा?
मला चारधामची यात्रा करायची आहे. बोला सरकार देईल का मला आणि माझ्यासारख्यांना मदत? हा पण मी धर्म बदलतो आणि हज यात्रेला जातो. मग लगेच मिळेल. त्यासाठी तुम्हाला विचारायचीच गरज पडणार नाही.
अहो, भारत धर्मनिरपेक्ष आहे ना? मग असा भेदभाव का दोन धर्मात? सर्वांना समान कायदा का नको? उगाच आपलं आपल्याच लोकांना खुनी बनवायचं आणि मानवतावादाची फुशारकी मारायची? एकिकडे धर्मनिरपेक्षतेचा झेंडा मिरवायचा अन दुसरीकडे जातीयतेचे विष लिलया पेरायचे?

धर्म हि व्यक्तिगत बाब असली तरी समाज अनेक व्यक्तिंचा मिळुन बनतो. अन जर एका विचारेचे अनेक व्यक्ति एकत्र राहत असतील तर त्या समाजाचा तो धर्म बनतो. भारत सोडता इतर कोणते देश धर्मनिरपेक्ष आहेत? (नेपाळ हे उत्तर लगेच द्याल. ते नको.) इतर विकसीत देश धर्मनिरपेक्ष का नाहित?


मराठीत लिहा. वापरा.

धर्मनिरपेक्ष ?

भारत सोडता इतर कोणते देश धर्मनिरपेक्ष आहेत? (नेपाळ हे उत्तर लगेच द्याल. ते नको.) इतर विकसीत देश धर्मनिरपेक्ष का नाहित?

नंदीग्रामचा धर्मनिरपेक्षतेशी काय संबंध?

धर्मनिरपेक्षता

कुठले विकसित देश धर्मनिरपेक्ष नाहीत असे आपल्याला वाटते?

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

वाटलच होतं...

धर्माच्या नावावर कत्तल-रक्तपात झाला कि लगेच पोटशूळ आणि ज्या ठिकाणी मानवतेची क्रुर चेष्टा केली जाते फक्त पैस्यासाठी तिथे मात्र मुग गिळुन गप्प. लगेच नंदीग्रामचा धर्मनिरपेक्षतेशी काय संबंध?
मुद्दा जर शांतता भंग होण्याचा, रक्त पाताचा आहे, मानवतेचा आहे तर मग ते धर्माच्या नावावर झाले तर बोंबाबोंब. इतर गोष्टींमुळे झाली कि काय संबंध? हा चांगला न्याय आहे...


मराठीत लिहा. वापरा.

वाटलं नव्हतं

असा प्र(ति)साद मिळेल असं त्याला मात्र वाटलं नव्हतं!

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

इतका द्वेष

एखाधा धर्माचा इतका द्वेष ? याबाबत अजुन काही लिहीले तर आपल्याला आवडणार नाही. याचा एकच अर्थ आपण कट्टरतावादी हिंदु नेत्यांना समर्थन देत आहात.
आपला(धर्म नसलेला)
कॉ.विकि

चुकिचा अर्थ

कॉम्रेड लोकं नेहमीच मुद्दाम एखाद्या गोष्टीचा चुकिचा अर्थ लावून लोकांची दिशाभूल करत आले आहेत. चर्चा माझ्या आवडीसाठी वा नावडीसाठी चाललेलीच नाही. माझे मत स्पष्ट आहे. एकतर मुसलमान धर्मियांसाठी भारताची फाळणी झाली. मान्य. पैसे दिले मान्य. हल्ले झेलेले मान्य. अरे पण जिथे निरपेक्षेतेचा नारा द्यायचा तिथे सगळ्यांना एक कायदा एक सोय का नको? यात कट्टर हिंदुत्ववाद आलाच कुठे? मी तर फक्त समानता मागतोय? कारण आम्हाला शाळेत घालण्या पासून आज पर्यंत प्रत्येक सरकारी प्रवेश अर्जावर धर्म, जात, पोटजात, लिंग सगळे काही विचारले आहे आणि आम्ही लिहिले आहे. आपण सुद्धा नक्किच लिहिले असणार आहे. आज 'आपला(धर्म नसलेला)' लिहुन तुम्ही खोटे लिहित आहात हे सत्य आहे.
मी हिंदुत्वाला एक जीवनशैली समजतो अन अनेक अभारतीयांशी या मुद्दावर सकारात्मक चर्चा सुद्धा केली आहे. आपण नक्कि कशाचे समर्थन करत आहात ते ठरवा...

मजकूर संपादित. व्यक्तिगत रोखाचा मजकूर काढून टाकला आहे. असे उल्लेख टाळावेत ही विनंती.


मराठीत लिहा. वापरा.

हाच तो कॉम्रेडपणा

जो विषय शांत झाला आहे. त्याची भाषणे मग ती प्रक्षोभक असतील कदाचित. ती मुद्दाम का प्रसारित करायची? हा गुन्हा आहे हे माहित नाहि का? माझा कोणताही प्रतिसाद तेढ वाढवणारा नाही. मी हिंदुत्वाची पाठराखण केली आणि लोकशाही असलेल्या देशात समानतेची मागणी केली. यात काय ते तेढ वाढवण्यासारखे आहे? शांतपणे विचार केल्यास आणि आत्मपरिक्षण केल्यास आपल्याला हे नक्किच पटेल कि लोकशाही असलेल्या देशात जर धर्मनिरपेक्षतेची जाण आहे तर सर्वांना समान वागणूक हवी. जिथे म्हणणे विचार न करता धमक्या दिल्या जातात वा दडपशाही केली जाते ती एकतर हुकूमाशाही आहे वा ते कम्युनिस्टांचे राज्य आहे. यात धार्मिक तेढ वाढण्यासारखे काहिच नाही....


मराठीत लिहा. वापरा.

हिंदुत्व आणि चाणक्य

जो विषय शांत झाला आहे. त्याची भाषणे मग ती प्रक्षोभक असतील कदाचित -या वाक्यावरुनच चाणक्य धर्मद्वेषी आहे असे म्हणायला जागा आहे.(म्हणजे आयोग नेमायची गरज नाही,काहीही करा)

हिंदुत्व म्हणजे काय तेवढे स्पष्ट करा राव.कोणाचे बाळासाहेबांचे की संघाचे .चाणक्याला कोणाचे हवे. हिंदुत्वाची पाठराखण करून समानतेची भाषा करणारा प्रथमच पाहीला. कोणती समानता. बाबरी मशीद पाडण्याचे समर्थन ,दंगलीचे समर्थन चाणक्याला करायचे आहे का?गुजरातेत काय घडले त्यासाठी लोकसत्ताचे अग्रलेख वाचावे. मला वाटत चाणक्य मुस्लिमांचा द्वेष करणारा आहे. सर्वांना समानवागणुक म्हणजे चाणक्याला कशाबद्दल बोलायचे आहे फाळणीबाबत,शरियत कायधाबाबत(शहाबानो प्रकरंण),मदरसातील शिक्षण,बाबरी मशीद ,हिंदुम्स्लिम दंगल की आणखीन काही.
बहुसंख्य कोण आहेत अल्पसंख्य कोण आहेत. राममंदीर बांधणे चाणक्याला आवश्क वाटते का?
प्रक्षोभक भाषणे करणारे कोण आहेत.
१९९३ च्या दंगा कशामुळे पेटला..
हिंदुओंका हिंदुस्थान म्हणणारे कोण.
अल्पसंख्य समाज कोणत्या न्युनगंडाने पछाडला आहे.
ताक- या विषयावरील माझा शेवटचा प्रतिसाद.
आपला(धर्म नसलेला)
कॉ.विकि

....

हा एक उदाहरण देण्यासारखा पक्का ढोंगी पुरोगामी प्रतिसाद आहे. आपण पुन्हा पुन्हा तेच तेच लिहित आहात. मी लिहिलेले मुद्दे परत वाचा. कारण मला तेच तेच लिहिण्यात रस नाही. काही मुद्दे लिहित आहे. जमलं तर आत्मपरिक्षण करा आणि स्वतः जवळ ठेवा. तेही तुम्ही लिहिले आहे कि वरचा तुमचा शेवटचा प्रतिसाद आहे म्हणून.
हिंदुत्व हि एक जीवनशैली आहे धर्म नव्हे. त्यामुळे ही जीवनशैली मान्य करणारा आणि या ठिकाणी राहणारा प्रत्येक भारतीय मी हिंदू मानतो. म्हणूनच अशा हिंदुंचा/भारतीयांचा मी हिंदुस्थान मानतो.
माझे स्वतःचे अनेक चांगले मित्र आहेत. त्यांची आणि माझी निखळ मैत्री आहे. त्यात धर्म म्हणून कधी कोणती गोष्ट आडवी नाही आली. हे ज्या मित्रांबद्दल लिहिले आहे ते मुसलमान आहेत. त्यांच्याशी मी या सर्व विषयांवर दिलखुलास, मनमोकळेपणाने बोलतो आणि विचारांची देवाण घेवाण करतो. मी कोणत्याच धर्माचा द्वेश करत नाही. हिंदू विरोधाची पट्टी तुम्ही डोळ्यावर बांधली आहे. त्यामुळे हिंदू बद्दल बोलणारा तुम्हाला मुसलमान द्वेष करणारा वाटतो.
मला तुम्ही धर्मद्वेषी म्हणलात म्हणून मला वाइट नक्किच वाटणार नाही. हां, जिथे राम जन्मला ती जागा बळकावून त्यावर राजकारण, रक्तपात होतो म्हणून नक्किच राग येतो. मला राममंदीर व्हावे असे नक्किच वाटत पण ते शांततेच्या मार्गाने हव आहे.
धर्मनिरपेक्ष भारतात आज हिंदू एवढे आक्रमक का झाले आहेत? तुमचे मुद्दे आक्रमकपणे मोडायचा प्रयत्न केला तर तुम्ही जाहिरपणे लिहित आहात कि याला आवरा. आपण जाहिर लिहिता आपण कॉम्रेड आहात म्हणून. हा काय राजकिय मंच आहे? कारण नसताना आपण राजकारण घुसडता. मग आम्ही जर आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे असे लिहिले तर एवढा राग का येतो?
मेलेले मुडदे तुम्ही उकरून काढता आणि आम्ही शवविच्छेदन केले तर म्हणता आम्ही द्वेष करतो? हा कुठला न्याय? जर तुम्हाला सर्वांना समान न्याय हेच कळत नसेल तर पुढे बोलणे म्हणजे ... .. समोर गायली गीता कालचा गोंधळ बरा होता हेच खरे.

अवांतर: सरकारला बाहेरून पाठींबा देणे आणि त्याच सरकारला विधायक निर्णय घेताना मागे खेचणे हा लोकशाहीचा द्वेष आहे. अनेक वर्षे राज्यकर्ते असून राज्याला औद्योगिक दृष्ट्या मागास ठेवणे हा विकासाचा द्वेष आहे. भारतावर आक्रमण करणारया कम्युनिस्टांना स्वतःचा आदर्श मानणे हा भारता बद्दलचा द्वेष आहे. असो जेवढे लिहु तेवढे कमीच आहे. आपल्या या विचारांना आमचा लांबूनच नमस्कार... 'सलाम' नव्हे...


मराठीत लिहा. वापरा.

शेवटचा प्रतिसाद या चर्चेचा

मला राममंदीर व्हावे असे नक्किच वाटत पण ते शांततेच्या मार्गाने हव आहे.एवढा रक्तपात,देशाची मानसिक फाळणी होऊनही चाणक्याला असे वाटते काय बोलणार . असल्या चाणक्याला शेंडी कापुन सलाम.
हिंदुत्व ही जीवनशैली आहे अस फक्त यांना वाटत बाकिच्यांच काय. कोणता मुखवटा तुम्ही वापरता..मी तर धर्मनिरपेक्ष भारतात राहणार्‍याला भारतीय नागरीक मानतो.
जाऊ दे शेवटी काय मानायचे काय नाही ही ज्याची त्याची मर्जी .
पण भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहो ही मनपुर्वक इच्छा.
आपला(डोक्यावरची शेंडी कापलेला)
कॉ.विकि

पुरोगामी कोण व किती ?

"..........हे बघा या देशात हिंदूंना शिव्या देणं म्हणजे आपण पुरोगामी आहोत असं भासवल्याचं मानल्या जातं. उठ सुट हिंदूना शिव्या देणं म्हणजे प्रखर पुरोगामी असनं असा संकेत(?) आहे.

..........ह्या पुरोगामी लोकांची मला नेहमीच गंमत वाटत आलेय.
स्वत: हिंदू असून हे हिंदूंविषयी नेहमीच अपप्रचार करतात."

--- नक्की पुरोगामी कोण व किती आहेत, असा मला बर्‍याचवेळा प्रश्न पडतो. हिंदूंबद्दल एक शब्दही बोलला तरी तो पुरोगामी ठरतो, असा माझा व्यक्तीगत अनुभव आहे. माझ्या पुरोगामीपणाला साथ देणारे मला बरेच कमी भेटले, आणि जे भेटले ते प्रामुख्याने वर्तमानपत्रातील लेखातच भेटले. म्हणजे प्रत्यक्ष अशी माणसं मला भेटलीच नाहीत. ती माणसं खरच व्यक्तीगत जीवनात पुरोगामी आहेत की नाही ते माहीत नाही. तरीदेखिल हिंदूंमध्ये " पुरोगामी लोकांची " लाट आलीय असं मला सारखं वाटत राहतं. बर्‍याच चर्चांमध्येदेखिल प्रत्येकाच हेच मत असतं.

तुम्ही अशा किती पुरोगामी लोकांना प्रत्यक्ष भेटलाय?

शाब्बास,मित्र हो.

आमच्या शाब्बासकीची गरज नाही.पण चाणक्य साहेब,आणि विकी साहेब, आपण चांगली चर्चा घडवून आणली.अर्थात आवरा आवरीवर(आवळा- आवळी नव्हे) येणे अशा भडक विषयावर शक्यता आहेच. पण उपक्रम च्या ध्येय धोरणात असे भडक विषय,वादविवाद ठिक आहे पण जातियतेकडे जाणारे विषय नसावेत,असे वाटते.

विकी

अहो हे काय?
येथे आवरा आवरी व्हावी ती मुद्यांतून अशी कॉम्रेड स्टाईल वर्तनुक करायला हे का नंदीग्राम आहे का? तुमचे मुद्दे संपले का? नाही.. उगाच गुद्यांची भाषा आली म्हणून विचारलं.

तुमचा वरील एक मुद्दा आवडला बुवा... भरपूर प्रश्न विचारायचे आणि इतरांना लिहायला लावायचं . आपण प्रश्न - प्रतिप्रश्न करायचे, हा प्रतिसाद शेवटचा म्हणून धमकी द्यायची, हे शोभतं का?

येथे चर्चा करायची आहे, आपली बाजू मांडायची आहे ती मुद्यांआधारे. खरंच कुठल्या विषया बद्दल पोटतिडीक असेल , तर लिहीने वहावत जाते कधी कधी आणि ते त्याला खटकतेही. असो.

जसे तुम्ही प्रश्न विचारलेत तसेच मला सुध्दा काही प्रश्न पडताहेत. विचारू का?

धर्मनिरपेक्षता म्हणजे काय?

परधर्मसाहिष्णुता म्हणजे काय?

ह्या दोन्ही संकल्पना एकच का?

यातील भारतीय कुठली आणि आपण जगातून घेतलेली कुठली?

भारत हे धर्मनिरपेक्ष आहे असं संविधान निर्मात्यांनी लिहिलेलं आहे का?

अल्पसंख्यांक म्हणजे किती?

भारत आणि इतर देशांच्या अल्पसंख्यांकाच्या तुलना करता येतील का?

काश्मिरमधे हिंदू अल्पसंख्यांक आहे का?

कॉम्रेडांच्या वागणुकीचा एक दाखला देत आहे.

पॅलेस्टाईन मधे मुस्लीमांच्या होणार्‍या हत्येंसाठी भारतातील धर्मनिरपेक्ष कॉम्रेडस इस्त्रायलचे पंतप्रधान एरियल शेरॉन भारतात येतात तेव्हा त्यांचा जाहिर निषेध करतात. मात्र हे धर्मनिरपेक्ष कॉम्रेडस् त्यानंतर चार सहा महिण्यांनी भारतात आलेल्या मुशर्रफ बद्दल काहीच बोलत नाहीत. हा तो मुशर्रफ ज्याने १९९९ ला आमच्या हजार भारतीय सैनिकांचा बळी घेतला. हा बुचर होत नाही का? त्याचा निषेध का नको? आता कोठे जाते ही धर्मनिरपेक्षता? वरिल दोन्ही घटना काही महिण्यांच्या अंतराने घडल्या होत्या त्यामुळे हे प्रकर्षाने जाणवले.

मुळात मार्क्सवादात धर्माला जागा नाही. मग मार्क्सवाद्यांनी किंवा या धर्मनिरपेक्षतावाद्यांनी कधी काश्मिरात होत असलेल्या हिंदूंच्या कत्तलींविरुध्द का निषेध केला नाही? समान नागरी कायद्याची मागणी हे धर्मनिरपेक्षतावादी का करित नाहीत?

धर्म सगळे समान ना? मग 'हज' ला सवलत का? मानसरोवराला किंवा अमरनाथ यात्रे ला का नाही? एकाच धर्माला वैयक्तीक कायदा मंडळ का असावे? संविधान सर्वोच्च् आहे ना?

अशी अनेक छिद्रे आहेत भारतातील धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या कार्याला.

मी मुळात धर्मनिरपेक्षता विरोधी नाही. खरं तर आमच्या ग्रामीण भागात धर्मनिरपेक्षता शिकवावी लागत नाही. आमच्या सोमाजी महाराजांची पालखी सजवण्याचा मान गावातील मुस्लीमांना आहे , तर सैलाणी बाबाच्या दर्ग्यावर जे अन्नदान होते ते हिंदू करतात. आमच्या विद्यावाचस्पती श्रीधरस्वामी पंचगव्हाणकर महाराजांचा कार चालक मुस्लीम आहे. यांमधील कुणालाही हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे अथवा नाही या बद्दल कसलंच सोयरसुतक नाही. त्याबद्दल ते गळाही काढत नाही.

मात्र ह्या राजकारणी लोकांना कुठल्याही गोष्टीचे राजकारण करायला फार आवडते. कम्युनिस्ट लोक वैयक्तीक चारित्र्यात खुप चांगले आहेत मात्र त्यांच्या कामाबद्दल कधीच विश्वास वाटत नाही.

वरील काही प्रश्नांना उत्तरे देतो...
हिंदूत्व म्हणजे काय?
- भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने हिंदूत्वाचा अर्थ भारताची संस्कृती आणि परंपरा असा दिला आहे. संघाचा जन्म १९२५ चा आणि शिवसेनेचा १९६१ चा. भारतातील हिंदू धर्म किमाण पाच हजार वर्षे पुरातन आहे. आता सांगा हिंदूत्व कुणाचे? माझ्या मते त्या बहुसंख्य , परधर्म सहिष्णु सामान्य हिंदू मानसाचे जो मुळातच शांत आहे. फाळणी नंतरही त्यानेच मुस्लीम कायम ठेवलेत. त्यालाच मुळात 'प्रति कृतीदिन' करावासा वाटला नाही, नाहीतर 'तोगडीया' तेव्हाही होतेच, कदाचित नाव वेगळे असेल, पक्ष संघटना वेगवेगळ्या असतील.

मुळतत्ववाद आणि आमचे तेवढे खरे किंवा तेवढेच योग्य ही अतातायी भुमिका विहींप किंवा तोगडीया घेतात म्हणून ते वाईट, असे गेले कित्येक वर्षे हे धर्मनिरपेक्षतावादी अतिशय कणखरपणे पटवून देतात. यांच्या वागणूकीत जो कणखरपणा आहे तोच केवळ योग्य आहे आणि यांना जे म्हणायचे आहे तेच केवळ योग्य आहे असा यांचाही(धर्मनिरपेक्षतावादी) दावा असतो.
अहो येथे फक्त शब्द बदलताहेत, मुळ वृत्ती तर तीच आहे ना? हे दोघे समानच आहेत. दोघांनाही देशाच्या प्रगतीबद्दल काहिच सोयरसुतक नाही. यांना धर्म हवा आहे तर त्यांना तो मुळीच नको आहे. अहो पण देशाचं काय? तर त्याचा विचारकरणे कदाचित यांच्या विचारधारेला मान्य नसेल.

दासकॅपीटल मधे जगातील सगळ्या समस्यांचे निदान आहे असं कॉम्रेड्स मानतात तर जगातील सर्वोच्च ज्ञान आमच्याच धर्मग्रंथात आहे असं विहिंपवाले मानतात. भारताच्या संविधानाबद्दल कुणाला काहीच संबध नाही.

या विषयावर चर्चा होण्यास भरपुर वाव आहे. चर्चा मुद्यांआधारित व्हावी अशी अपेक्षा आहे.

नीलकांत

वाह नीलकांत

नीलकांत तुमचे मुद्दे मान्य.
कम्युनिस्ट लोक वैयक्तीक चारित्र्यात खुप चांगले आहेत मात्र त्यांच्या कामाबद्दल कधीच विश्वास वाटत नाही. हे तर एकदम बरोबर. येथे हा माझा शेवटचा प्रतिसाद असे जाहिर लिहायचे आणि नंतर लगेच एक प्रतिसाद टाकायचा. आणि काही सुचेना म्हणून शेंडीवर घसरायचं. बोला कसा ठेवणार विश्वास? असो. आपण योग्य मुद्दे मांडले आहेत.


मराठीत लिहा. वापरा.

सहमत.

सर्किट साहेब,
आपल्या मताशी सहमत.राममंदिरासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या नेत्यांची नावे हवी आहेत.

सर्किट दादा..

आपल्याशी पुर्णपणे सहमत. थेट बाण मारलात नशीब मला लागला नाही.
आपला
कॉ.विकि

विरोध

आता सर्व जणांचे कट्टर हिंदुत्वाविषयी एकमत झाल्यावर मी विरोध करुन काय फायदा.
भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणण्याचा प्रघात आहे.तसा उल्लेख १९७६ च्या घटनादुरुस्तीत आहे.
आपल्या धर्माप्रमाणे वागताना अन्य धर्मियांच्या श्रध्दांना तडा जाणार नाही किंवा त्याची अवहेलना होणार नाही याची जवाबदारी आपल्या प्रत्येकावर येते.
चर्चा प्रस्तावात जी प्रक्षोभक भाषणे आहेत त्या भाषणाचा कट्टर हिंदुत्वाशी संबंधच येतो कि नाही . त्यांच्याशी चाणक्य सहमत आहे वाटत.आपला तर कट्टर धार्मिकतेला पुर्णपणे विरोध आहे.
आपला(धर्म नसलेला)
कॉ.विकि

 
^ वर