प्रोटेक्शन ऑफ ह्यूमन सब्जेक्टस

मराठी संकेतस्थळांवर झालेल्या वेळोवेळी होत असलेल्या चर्चांच्या संदर्भात काही प्रश्न मनात आले म्हणून ही चर्चा सुरू करते आहे. असे दिसते की मराठी संकेतस्थळांसारख्या सार्वजनिक ठिकाणी जेव्हा नेहमीच्या देव/बुवा/बाबा यांच्यावर श्रद्धा असलेल्या व्यक्ती आणि अशा व्यक्तींवर श्रद्धा नसलेल्या व्यक्तींमध्ये थेट बोलणे होते, तेव्हा अनेकदा असे दिसते की बर्‍याचदा काही फलित निघत नाही, कधीकधी हे बोलणे एका बाजूने समाप्त केले जाते. असे न होता हे बोलणे त्यात सहभागी व्यक्तींना तसेच समाजाला उपकारक ठरावे, म्हणून आपल्याला माहिती असलेल्या काही संशोधनक्षेत्रांकडून यासंबंधीची काही धोरणे स्विकारता येतील का हे पाहणे, असा आहे. आणि त्यावरून काही प्रश्न विचारले आहेत.

यासाठी सध्या आपल्या आजूबाजूला काय घडते आहे ते आपण बघू शकतो. अमेरिकेमध्ये नॅशनल सायन्स फाउंडेशन (एन. एस. एफ.) या केंद्रसरकारी संस्थेतर्फे जे काही संशोधन प्रकल्पांना आर्थिक पाठबळ पुरवले जाते त्यासाठी संशोधकांना या संस्थेला हे संशोधन/चिकित्सा कशाबद्दल असेल, त्यात कोणत्या कार्यपद्धती वापरल्या जातील, या संशोधनातून काय फायदा होईल अशा प्रकारची माहिती विस्ताराने द्यावी लागते. त्याचबरोबर एनएसएफ अशा संशोधनास मदत करताना त्या संशोधनात जिवंत व्यक्तींवर संशोधन करायचे असल्यास उदा. बायोमेडिकलसारख्या क्षेत्रांमध्ये ""Common Rule" for the protection of human subjects." म्हणजेच संशोधनात ज्या माणसांवर संशोधन केले जाईल त्यांच्या सुरक्षेसाठीचा साधारण नियम हे संशोधनपद्धतीत (रीसर्च प्रोटोकॉल अँड डिझाईन) पाळावेत अशी अपेक्षा असते. यासाठी एन. एस. एफ. च्या संकेतस्थळावर खालील मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत.

Basic principles of human subjects protection:

The fundamental principle of human subjects protection is that people should not (in most cases) be involved in research without their informed consent, and that subjects should not incur increased risk of harm from their research involvement, beyond the normal risks inherent in everyday life. The regulations are designed mainly to pertain to biomedical research, based on the philosophical principles contained in a key document, "The Belmont Report: Ethical Principles and Guidelines for the Protection of Human Subjects of Research"http://ohrp.osophs.dhhs.gov/humansubjects/guidance/belmont.htm.

म्हणजेच, संशोधनविषय असलेल्या व्यक्तींच्या सुरक्षेचे मूलभूत सूत्र असे आहे की शक्य तितक्या प्रसंगांमध्ये या व्यक्तींना त्यांची संमती असल्याशिवाय संशोधनात सहभागी करू नये, आणि संशोधनविषय असलेल्या व्यक्तींना संशोधनात भाग घेतल्यामुळे रोजच्या व्यवहारातील धोक्यांपेक्षा अधिक धोका सहन करावा लागू नये. ह्यासाठी "बेलमॉंट रिपोर्टः एथिकल प्रिन्सिपल्स अँड गाइडलाइन्स फॉर द प्रोटेक्शन ऑफ ह्युमन सब्जेक्टस ऑफ रीसर्च" या अहवालाचा संदर्भ दिला आहे.
(सम्दर्भः http://www.nsf.gov/bfa/dias/policy/human.jsp)

अहवाल मोठा आहे आणि त्याचे पूर्ण भाषांतर करणे वेळेअभावी सध्या शक्य नाही. पण ह्या अहवालातील काही व्याख्यांचा सारांश देत आहे:

संशोधनविषय असलेली व्यक्ती (ह्यूमन सब्जेक्ट) - अशी जिवंत व्यक्ती, जिच्याबद्दल कोणी संशोधक (व्यावसायिक किंवा विद्यार्थी) संशोधन करून (१) हस्तक्षेप (इंटरव्हेन्शन) किंवा संपर्क येऊन (इंटरअ‍ॅक्शन) मधून माहिती (विदा) मिळवतो किंवा (२) त्या व्यक्तीला निश्चित करू शकणारी व्यक्तिगत माहिती (जसे वैद्यकीय रेकॉर्डस) मिळवतो.

इजांचे प्रकार - कशाप्रकारची इजा पोचू शकते?

नेहमीच्या जगण्याशी संबंधित इजा - याला खास सुरक्षेची जरूरी नाही. उदा. संशोधनासाठी झालेला संपर्क सोयीस्कर वेळी नसण्यामुळे किंवा वेळखाऊ पद्धतींमुळे होणारी गैरसोय.

ज्या इजांमुळे गंभीर परिणाम होऊ शकतात अशा प्रकारच्या इजा तपासाव्या (असे मार्गदर्शन आहे):

१. भावनिक किंवा मानसिक इजा - जसे - संशोधनासाठी झालेल्या संपर्कामुळे होणारी मानसिक उलथापालथ किंवा माहिती सुरक्षित राहील असा विश्वास न वाटल्याने वाटणारी काळजी

२. सामाजिक इजा - माहिती सुरक्षित न राहिल्यामुळे होणारी सामाजिक कलंक किंवा परवड

याखेरीज शारिरीक इजा, आर्थिक इजा, न्यायालयीन इजा, नैतिक इजा अशा इजाही गंभीर परिणाम करू शकतात असे सांगितले आहे. परंतु सध्याच्या चर्चेसाठी पहिल्या दोन इजांचा विचार अधिक महत्त्वाचा असेल असे वाटते.

कमीत कमी धोका (मिनिमल रिस्क)- म्हणजे असे की संशोधनामुळे जे धोके किंवा अस्वस्थता संभवतात त्यांची शक्यता आणि तीव्रता ही नेहमी ओळखीच्या शारिरीक किंवा मानसिक तपासण्यांमध्ये येणार्‍या धोक्यांपेक्षा कमी असावी. असे नेहमीचे धोके म्हणजे "जास्त संभवनीय आणि कमी तीव्रतेचे" असतात, जसे वाहतुकीमुळे होणार्‍या उशीरामुळे, किंवा लाज वाटल्याने, दमण्यामुळे असतील असे. अशा वेळी संशोधनाचे परीक्षण करणारे बोर्ड संशोधकांना असे प्रश्न विचारू शकते की अशा अशाश्वत (कमी कालावधीच्या) इजा ही बराच काळ टिकेल अशी संभावना असते का आणि अशी इजा कमी व्हावी यासाठी काय पायर्‍या चोखाळल्या आहेत. (Researchers might be asked what the probability of transient harm occurring is; whether the harm is likely to be lasting in any way; and what steps will be taken to ameliorate the harm.) "कमीत कमी धोकापातळीहून अधिक" अशा धोक्यांमध्ये असे धोके येतील जसे उदाहरणार्थ स्वतःबद्दलची माहिती अशा लोकांना देणे जे त्या माहितीचा त्या व्यक्तीस इजा पोहोचवण्यास उपयोग करू शकतात. (This could include disclosure of confidential information to individuals who could use that information to harm a subject in some way. http://www.nsf.gov/bfa/dias/policy/hsfaqs.jsp#minimal)

सामाजिक आणि वर्तणूक क्षेत्रातील संशोधक हे बायोमेडिकल क्षेत्रातील संशोधकांप्रमाणेच नियंत्रित असतात, परंतु हा साधारण नियम संस्थांना तसेच या संस्थांमधील संशोधनाचे परीक्षण करणार्‍या बोर्डाला अशी सवलत देतो की हे परीक्षण संभाव्य इजेच्या तीव्रतेला अनुसरून कमीजास्त तीव्रतेचे करता येईल. (Social and behavioral scientists are subject to the same regulations as their biomedical colleagues, but the Common Rule gives discretion to institutions and IRBs to match the severity of the review to the potential risk of harm to subjects. ) जरी सामाजिक क्षेत्रातील बरेचसे संशोधन या दृष्टीने संशोधनविषय असलेल्या व्यक्तींना इजा पोहोचवणारे नसले तरी सामाजिक आणि वर्तणूक क्षेत्रातील संशोधक हे गोपनीयतेची काळजी घेतात. एखाद्या सामाजिक अभ्यासात भाग घेणार्‍या व्यक्तीला त्या अभ्यासात सहभागी झाल्याने दूरगामी डिप्रेशन किंवा नैराश्याची भावना होऊ शकते. असेही शक्य आहे की मुलाखतीत ज्या गोष्टी चर्चिल्या गेल्या, त्यामुळे अशा व्यक्तींचे जुने अनुभव त्या वेगळ्या नजरेतून बघत स्वतःला कमी लेखू लागतील, किंवा अधिक माहिती मिळवतील ज्याने इतर प्रश्न उद्भवू शकतील. ह्याला काही दिवस किंवा आठवडे वेळ लागू शकतो. संशोधकांना असे विचारता येईल की अशा इजेची संभवनीयता काय आहे आणि ती झाल्यास कमी कशी करता येईल (उदा. काउन्सेलिंगची माहिती दिली जाऊ शकते). (संदर्भः http://www.nsf.gov/bfa/dias/policy/hsfaqs.jsp#minimal )

तसेच महत्त्वाचे असे की ज्यावर आधारित ही संशोधनासाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्या अहवालातील प्रमुख नैतिक तत्त्वे अशी : लोकांबद्दल आदर, सर्वोपकार आणि न्याय. (The report described three ethical principles that should be adhered to when conducting research: respect for persons, beneficence, and justice). अशा संशोधनात सहभागी असलेल्या व्यक्तींची संमती (लिखित आणि तोंडी) घेतलेली असावी असे अपेक्षा आहे.

आता या चर्चेपुरती श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे एकच आहेत असे समजू (त्यावरून चर्चा नको) आणि परीघ केवळ देव, बाबा/बुवा/संत/साधू यांवरील श्रद्धा यांच्यापुरता मर्यादित ठेवू.

अंधश्रद्धा/श्रद्धा निर्मूलन क्षेत्रांमधील कार्यकर्ते किंवा स्वतः होऊन सामाजिक क्षेत्रात श्रद्धेबद्दल काही प्रश्न श्रद्धावंतांना विचारणारे चिकित्सक हे लोकहितवादी असतात असे समजू. यात चिकित्सा ही श्रद्धास्थानांची चाललेली नसून जिवंत व्यक्तींच्या त्यांच्या वर्तणुकीमध्ये हस्तक्षेप करण्याचा हेतू असतो किंवा त्यांच्याशी देवाणघेवाण (इंटरअ‍ॅक्शन) चाललेली असते, आणि निष्कर्षही या व्यक्तींबद्दलच काढले जातात हा मुद्दा लक्षात ठेवण्याचा आहे. याचा अर्थ संशोधनविषय श्रद्धास्थाने नसून या जिवंत व्यक्ती असतात. आपण असे बघतो की हे लोकहितवादी घटक बर्‍याचदा सामाजिक क्षेत्रांमध्ये विचारवंत, लेखक, चिकित्सक आणि कार्यकर्ते म्हणून मग्न असतात, तसेच मराठी संकेतस्थळांवरही लिहीत असावेत. परंतु विचारवंत किंवा लेखक असले तरी त्यांना मानवी चिकित्सेचा अनुभव असेलच असे नाही.

म्हणून प्रश्न असे आहेत -

१. अशा परिस्थितीत सार्वजनिक स्थळी त्यांच्याकडून संशोधनविषय असलेल्या व्यक्तींना विचारले जाणारे प्रश्न हे योग्य पद्धतीने विचारले आहेत का नाही हे बघावे का नाही? उत्तर "बघावे" असे असल्यास हे कोण बघते? "बघू नये" असे उत्तर असल्यास का बघू नये असे वाटते?

२. या विचारलेल्या प्रश्नांमुळे संशोधनविषय असलेल्या लोकांना काही अशाश्वत किंवा शाश्वत इजा पोहोचते का, याचा विचार केला जातो का? केला जावा का?

३. अशा व्यक्तींकडून अशा प्रकारचे संमतीपत्र मिळवण्याची जरूरी आहे का? का सध्याची सामाजिक स्थिती इतकी गंभीर आहे, की या कसल्याही पायर्‍यांचा विचार करण्याची गरज नाही आणि या परिस्थितीत हे इंटरव्हेन्शन किंवा इंटरअ‍ॅक्शन यशस्वी होईल याची संभवनीयता खूप जास्त आहे असे म्हणता येईल इतका अनुभव अशा संशोधकांना असावा का?

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगला विषय

महत्वाच्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.
उत्तरे:
१) नाही. प्रश्न विचारणे हा चर्चास्थलावरील एक 'मूलभूत हक्क' आहे. प्रश्नाचे उत्तर नाकारण्याचा संशोधनविषय असलेल्यांचा हक्क अबाधितच आहे.
२) अनेकदा केला जात नाही. 'प्रश्नांमुळे इजा' ही संकल्पनाच मला समजलेली नाही.
३) नाही. नाही, 'प्रश्न विचारण्याचा हक्क' मूलभूत ठरविला की सारे डायलेमा (दुविधा) संपतात.

थोडा फरक

चर्चास्थळावर प्रश्न विचारण्याचे अधिकार आहेतच.
मला एवढेच वाटते आहे की चर्चाविषय एवढाच आहे की जेव्हा इंटरव्हेन्शन किंवा सामाजिक जाण म्हणून श्रद्धावंतांशी संपर्क होत असतो, तेव्हा असे सामाजिक कार्यकर्ते इतर क्षेत्रांकडून काही शिकू शकतात का?

खुलासा

सतीबंदी, बालविवाहबंदी, इ. सारखी इंटरवेंशन आणि टीका हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य या दोन प्रकारच्या कृतींमध्ये फरक करावा असे मला वाटते. श्रद्धेला इजा इ. मुद्दे केवळ वैयक्तिक स्पेसचे अतिक्रमण झाल्यासच पहावे, इतर वेळी (=केवळ टीका हे इंटरवेंशन असेल तेव्हा) श्रद्धेला ठेच इ. मुद्दे गैरलागू आहेत. तशा वेळी सामाजिक कार्यकर्त्यांना काही शिकण्याची 'गरज'च नाही.

संशोधनविषय असलेल्या व्यक्तींना विचारले जाणारे प्रश्न

संशोधनविषय असलेल्या व्यक्तींना विचारले जाणारे प्रश्न हे कसे शक्य आहे? संशोधनचा विषय असलेली व्यक्ती चर्चेत भाग घेणे कसे संभवनीय आहे? चित्राताईंना दुसरे काहीतरी म्हणायचे असावे. वाक्य रचनेत गडबड झालेली दिसते. आणि श्रद्धा किंवा देवावर विश्वास यासारख्या अबस्ट्रॅक्ट गोष्टींबद्दल विचारलेले प्रश्न योग्य पद्धतीने विचारले आहेत किंवा नाही? हे कोण ठरवणार? त्या व्यक्तीला योग्यता जिंवा अयोग्यता ठरवण्याचा अधिकार कोणी दिला? व का दिला? असा प्रश्न उपस्थित होणार नाही का?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

हेच.

चंद्रशेखर ह्यांना पडलेले किंवा त्यांनी विचारलेले प्रश्न मलाही पडले आहेत. बाकी चांगला चर्चाविषय.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

का नाही?

सोशल अँड बीहेवियरल सायंटिस्ट संशोधनविषय असलेल्या व्यक्तींना प्रश्न विचारू शकतात असे वाटते.
त्यावरून निष्कर्षही काढले जात असावेत.
मराठी संकेतस्थळांवर तसेच सामाजिक क्षेत्रांमध्ये भाविक किंवा श्रद्धावंत हे अमूक पद्धतीने का वागतात अशा स्वरूपाचे बोलणे होत असते.
त्यासाठी या व्यक्तींना थेट प्रश्न केलेले दिसतात. म्हणून प्रश्न असा आहे की अनेकदा या श्रद्धा चुकीच्या आहेत याची खात्री असल्याने (आणि त्या तशा चुकीच्या आहेत असेच आपण या चर्चेपुरते धरू) जर एखाद्या सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीने अशा भाविकाबाबतीत थेट इंटरव्हेन्शन करायचे ठरवले, आणि प्रश्नावली तयार केली तर अशी प्रश्नावली योग्य आहे का नाही, हे ठरवले जाणे आवश्यक आहे का? असा प्रश्न आहे.

श्रद्धा किंवा देवावर विश्वास यासारख्या अबस्ट्रॅक्ट गोष्टींबद्दल विचारलेले प्रश्न योग्य पद्धतीने विचारले आहेत किंवा नाही? हे कोण ठरवणार? त्या व्यक्तीला योग्यता जिंवा अयोग्यता ठरवण्याचा अधिकार कोणी दिला? व का दिला? असा प्रश्न उपस्थित होणार नाही का?

श्रद्धा चुकीच्याच आहेत असे आपण तूर्तास धरून चालू. त्यामुळे श्रद्धा नसलेल्या विचारवंतांमध्ये स्पष्टता आहे की इंटरव्हेन्शन जरूरी आहे, किंवा माणसाला श्रद्धेमुळे गोत्यात येऊ न देणे महत्त्वाचे आहे.

प्रश्नावली

प्रश्नावली योग्य आहे का नाही, हे ठरवले जाणे आवश्यक आहे का?

योग्य म्हणजे काय? वॅलीड का?

प्रश्नावलीची वॅलीडीटी तपासणार्‍या अनेक चाचण्या आहेत. ज्या कोणत्याही प्रकारच्या प्रश्नावलीला लावल्या जातात. अशा चाचण्या केल्याशिवाय कोणतीही प्रश्नावली वापरू नये असा संकेत आहे. तुम्ही वरती दिलेल्या उदाहरणात 'असे करावे का?' हा प्रश्नच वॅलीड नाही. उद्देश काहीही असो प्रश्नावलीचा वापर करण्यापूर्वी वॅलीडीटी तपासणार्‍या चाचण्या आवश्यक असतात.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

श्रद्धास्थाने

यात चिकित्सा ही श्रद्धास्थानांची चाललेली नसून जिवंत व्यक्तींच्या त्यांच्या वर्तणुकीमध्ये हस्तक्षेप करण्याचा हेतू असतो किंवा त्यांच्याशी देवाणघेवाण (इंटरअ‍ॅक्शन) चाललेली असते, आणि निष्कर्षही या व्यक्तींबद्दलच काढले जातात हा मुद्दा लक्षात ठेवण्याचा आहे. याचा अर्थ संशोधनविषय श्रद्धास्थाने नसून या जिवंत व्यक्ती असतात.

पुर्णतः सहमत होणे कठीण आहे.
ज्ञानेश्वरांच्या समाधीचे उत्खनन करुन नेमके काय तिथे आहे हे शोधण्याचा प्रयत्न केल्यास त्यातुन आलेले निष्कर्ष हे व्यक्तिनिष्ठ नसतील. श्रद्धावंतांचा इथे विरोध असेल. ते म्हणतात कदाचित नाही सापडणार काही पण आमची अशी श्रद्धा आहे कि ज्ञानेश्वरांनी इथे जिवंत समाधी घेतली. त्यामुळे तिथे उत्खनन हा विचार आमच्या श्रद्धास्थानावर घाला आहे. इथे श्रद्धा स्थाने कुठली? ज्ञानेश्वर ही मृत व्यक्ती, ते समाधिस्थान, ज्ञानेश्वरांचे विचार कि अन्य काही?
प्रश्न १ ते ३ मधे योग्य या शब्दात सापेक्षता असल्याने त्याची उत्तरे हो / नाही अशा द्विमितीत देणे कठीण आहे.
प्रकाश घाटपांडे

ज्ञानेश्वर समाधीवरून

ज्ञानेश्वर समाधीवरून संशोधन करू नये असे म्हणणे नाही. चर्चाविषय एवढाच आहे, की जेव्हा भाविकांशी थेट बोलण्याची संधी संशोधकाला उपलब्ध असते/होते, तेव्हा हे बोलणे कसे व्हावे, इंटरव्हेन्शन उपयुक्त व्हावे का, यासाठी या क्षेत्रांकडून असे सामाजिक कार्यकर्ते काही शिकू शकतात का? काही घेऊ शकतात का?

नाही

जेव्हा भाविकांशी थेट बोलण्याची संधी संशोधकाला उपलब्ध असते/होते, तेव्हा हे बोलणे कसे व्हावे, इंटरव्हेन्शन उपयुक्त व्हावे का, यासाठी या क्षेत्रांकडून असे सामाजिक कार्यकर्ते काही शिकू शकतात का?

नाही. दोन्ही क्षेत्रे वेगळी आहेत. त्यांचा परस्परसंबंध 'ठोसपणे' लावता येणार नाही. पण सगळाच 'सैलसर' कारभार असेल तर कुठलाही नितीपाठ कुठेही लागू होऊ शकतो.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

माझी उत्तरे...!

१. अशा परिस्थितीत सार्वजनिक स्थळी त्यांच्याकडून संशोधनविषय असलेल्या व्यक्तींना विचारले जाणारे प्रश्न हे योग्य पद्धतीने विचारले आहेत का नाही हे बघावे का नाही? उत्तर "बघावे" असे असल्यास हे कोण बघते? "बघू नये" असे उत्तर असल्यास का बघू नये असे वाटते?

संशोधनाच्या विविध पद्धतीचा अवलंब करतांना 'प्रश्नावली' चा उपयोग केला जातो. मार्गदर्शक आणि संशोधक यांच्या चर्चेतून प्रश्न तटस्थपणे आणि काय विचारले म्हणजे संशोधनासाठी कोणती अपेक्षीत उत्तरे मिळतील या बाबतीत त्या प्रश्नाचे स्वरुप कसे असावे ते ठरविले जाते.

कोण बघते ?
संशोधनकर्त्याचे मार्गदर्शक ते बघतात.

२. या विचारलेल्या प्रश्नांमुळे संशोधनविषय असलेल्या लोकांना काही अशाश्वत किंवा शाश्वत इजा पोहोचते का, याचा विचार केला जातो का? केला जावा का?

कोणतीही इजा पोहचत नाही, मात्र कधीतरी प्रश्नाचे असलेल्या स्वरुपाविषयी लवचिक भूमिका प्रश्न विचारणार्‍याने घेतली पाहिजे. तेव्हा इजा होण्यापेक्षा योग्य उत्तरे येण्यासाठी काही काळजी घेतली पाहिजे असे वाटते.

अशा व्यक्तींकडून अशा प्रकारचे संमतीपत्र मिळवण्याची जरूरी आहे का?

होय.

का सध्याची सामाजिक स्थिती इतकी गंभीर आहे, की या कसल्याही पायर्‍यांचा विचार करण्याची गरज नाही आणि या परिस्थितीत हे इंटरव्हेन्शन किंवा इंटरअ‍ॅक्शन यशस्वी होईल याची संभवनीयता खूप जास्त आहे असे म्हणता येईल इतका अनुभव अशा संशोधकांना असावा का?

सामाजिक स्थितीचा विचार करावा लागतो.

-दिलीप बिरुटे

धन्यवाद

उत्तरांबद्दल धन्यवाद.

गृहीतक

अंधश्रद्धा/श्रद्धा निर्मूलन क्षेत्रांमधील कार्यकर्ते किंवा स्वतः होऊन सामाजिक क्षेत्रात श्रद्धेबद्दल काही प्रश्न श्रद्धावंतांना विचारणारे चिकित्सक हे लोकहितवादी असतात असे समजू.

माझ्या मते या गृहीतकाच गडबड आहे. सार्वजनिक संस्थळावर कोणी एक उच्चासनावर आणि बाकीचे गिनीपिग्स अशी मांडणी नसते. सर्वांनाच एकाच पातळीवर चर्चा करण्याची मुभा असते. (इथे 'खाज दोन्हीकडे आहे' हा रिकामटेकड्यांचा प्रतिसाद विनाकारण आठवतो आहे. (लिंक शोधण्याचा कंटाळा आला आहे.))
चर्चा कुठल्या दिशेने जाईल हे बहुधा संस्थळाच्या प्रकृतीवर(मऊ माती वगैरे) अवलंबून असावे !

समजला नाही

विषय समजला नाही.

असे काहीसे भासते आहे : चित्रा यांना म्हणायचे आहे, की कधीकधी समाजविषयक चर्चेत बळजबरी होते. त्यांचा असा दृष्टांत आहे, की कधीकधी संशोधनात, मुख्यतः वैद्यकीय संशोधनात, बळजबरी होऊ शकते. वैद्यकीय संशोधनात बळजबरी होऊ नये म्हणून संस्था आणि संशोधक काळजी घेतात. दृष्टांताचे फलित असे आहे, की समाजात सामाजिक चर्चा करताना बळजबरी होऊ नये म्हणून संस्थांनी काळजी घ्यावी. किंवा व्यक्तींनी काळजी घ्यावी. ही काळजी संशोधनातल्या चौकटीसारखी काहीशी असावी. हा सारांश ठीक आहे काय?

असा दृष्टांत असेल तर मला तो अनावश्यक गोंधळ वाढवणारा वाटतो आहे. "बळजबरी होऊ नये" हे नैतिक तत्त्व स्वयंसिद्ध आहे, त्याला दृष्टांताची गरज नाही. बळजबरी कुठे होते, ते थेट दाखवून त्याला आळा घालता येतो. किंवा आळा कसा घालता येईल ते सांगता येते. वैद्यकीय संशोधनातली बळजबरी आधी मनात आणून, तशी समांतर बळजबरी उपक्रमावरील चर्चेत कुठे झाली असा विचार... म्हणजे गोलगोल घुमणारा रस्ता आहे. दृष्टांतातले सामांतर्य काही म्हटले तर अर्धवटच असणार. सामांतर्य पूर्ण नाही, तर मग बळजबरीला आळा घालावा की घालू नये? खरे तर दृष्टांत नि:संदर्भ आहे. चर्चेतली बळजबरी ही वैद्यकीय संशोधनाला समांतर असो किंवा नसो, तिच्यावर स्वतःहून नैतिक बंधन येते.

मुळात उघड्या चर्चेत कुठली बळजबरी होते की नाही - विशेषतः येथे उपक्रमावर हल्ली झालेल्या चर्चेत बळजबरी झाली आहे का? याबाबत मी साशंक आहे. वैद्यकाच्या दृष्टांतापेक्षा मला येथील थेट उदाहरणे मिळाल्यास पटेल.

- - -

तरी काही अर्थ लावायचा प्रयत्न करतो आहे. वैद्यकीय संशोधनात लोकांकडून अनुमती घेणे, आणि (आय-आर-बी) संस्थेकडून संशोधनाची प्रक्रिया तपासून घेणे, याबाबतीत अनेक लोकांप्रमाणे मला वैयक्तिक अनुभव आहे. त्याचा येथे काही उपयोग व्हावा. माझ्या अनुभवांचे उपक्रमावरील चर्चेशी सामांतर्य दाखवून दृष्टांत चित्रा यांनी अधिक समजावून सांगावा. कदाचित उपक्रमावरील चर्चेत स्वतःहून स्पष्ट नसतील पण माझ्या संशोधन-नीतीत अधिक स्पष्ट असतील अशा गोष्टी निदर्शनास येतील. मग असे म्हणता येईल - अमुक परिस्थिती तुझ्या संशोधनात आली, नेमकी तशीच परिस्थिती उपक्रमावरील चर्चेत आली होती. अमुक वागणे तुला संशोधन करताना मान्य होते ना - मग उपक्रमावरील चर्चेतही तसेच वाग... मग दृष्टांताचा काही फायदा होऊ शकेल.
- - -
संशोधनातली वेगवेगळी नाती
(१) संशोधित आणि संशोधकाच्या मधले नाते :
येथे माझ्या अनुभवांचे वर्णन असे : अल्ट्रासाउंड चित्रणाबाबत माझे काही संशोधन प्रश्न आहेत. ज्या संशोधन-सहभाग्यांचे अल्ट्रासाउंड चित्रण करायचे होते, त्यांची अनुमती घेणे अपेक्षित आहे. अनुमतीपत्राची छाननी करणारी स्वतंत्र संस्था आहे (आय आर बी). शिवाय सहभाग्यांना इजा होते की नाही, याबद्दल ही स्वतंत्र संस्था विचार करते. संशोधन चालावे की बंद करावे, याबाबत संस्थेचे सर्वाधिकार आहेत. अनुमती देताना व्यक्ती माझ्यावर काही बंधने घालू शकतो. सामान्य बंधन असे : व्यक्तीचे नाव-गाव-पत्ता वगैरे गोपनीय राहील. हे तपशील काढूनच विश्लेषणाचे निष्कर्ष प्रसिद्ध केले जातील.
मात्र हे एक बंधन कधीही नसते : अल्ट्रासाउंड करण्याआधी व्यक्ती माझ्यावर बंधन घालू शकत नाही की "अल्ट्रासाउंड मध्ये तू अमुक निष्कर्षच बघशील". एक तर काय दिसणार आहे, ते मला आधी निश्चित ठाऊक नसते. काहीतरी कल्पना असते खरी. पण शहानिशा करायची गरज असते, निश्चिती नसते, म्हणूनच तर संशोधनात खराखुरा अल्ट्रासाउंड करायचा असतो. "अमुकच बघेन" असे बंधन मानून घेण्याची शक्तीच नसते. असे बंधन घालू इच्छिणारा व्यक्ती अर्थात अनुमती नाकारू शकते.

(१-अ) उघड आणि प्रसिद्ध माहिती गोळा करताना संशोधक-संशोधित-संबंध :
नाव-गाव-पत्ता जाहीर करायचा नाही, हे बंधन इतके सार्वत्रिक असते, की आता ते बंधन कायद्यातच आहे. परंतु एखाद्या व्यक्तीला आपली स्वतःची माहिती जाहीर करायचा हक्क अर्थातच असतो. अशी जाहीर केलेली माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण करायला त्या व्यक्तीची पुन्हा अनुमती घ्यावी लागत नाही. माहिती प्रसिद्ध करताना त्या व्यक्तीने कोणीही माहिती विश्लेषित करण्यासाठी अनुमती दिली आहे, असे गृहीत धरले जाते. मागे यू.एस.चे माजी उपराष्ट्रपती डिक चेनी यांच्या हृदयरोगाबाबत बातमी आणि तपशील प्रसिद्ध झाले होते. श्री. चेनी यांनीच प्रसिद्ध केले होते. त्यानंतर त्याबद्दल माझ्या सहकार्‍यांमध्ये चर्चा झाल्याचे मला आठवते. अमुक इलाज सुयोग्य आहे काय... वगैरे. ती चर्चा करण्यासाठी श्री. चेनी यांची पुन्हा अनुमती घ्यावी लागली नाही. आणि नाव-गाव-पत्ता चर्चेत आला तर चालतो.

नाव-गाव-पत्ता नसलेलीसुद्धा थोडी माहिती प्रसिद्ध असते. हल्लीच हृदयरोगातून होणार्‍या मरणाची टक्केवारी मला विश्लेषणासाठी हवी होती. नाव-गाव-पत्ता काढून, नेमकी तारीख खोडून जन्म-मृत्यू नोंदणीचा आलेख मी शासनाकडून मिळवला. (शासन आलेख प्रसिद्धच करते.) आता नाव-गाव-पत्ता-नेमकी तारीख नसली तरी काही माहिती आपोआप निश्चित असते. मागच्या वर्षी माझ्या शेजारचे एक गृहस्थ वारले. बाकी तपशील माहीत नाही. शासकीय माहितीतून "ते कुठल्या रोगामुळे वारले" हे सांगता येत नाही, कारण यादीमध्ये नाव-गाव-पत्ता-तारीख नाही. पण त्या यादीतल्या लाखो ओळींपैकी कुठलीतरी एक ओळ शेजारच्या गृहस्थांच्या मरणाबद्दल आहे, हे निश्चित. तरी मला जाऊन त्या शेजार्‍यांच्या मुलांकडून अनुमती घ्यावी लागत नाही. "हृदयरोगातून मृत्यूंची संख्या मोजण्यालायक नाही" असे त्या दिवंगत गृहस्थांचे ठाम मत असले, तरी माझ्या शेजार्‍यांचा मुलगा माझे संशोधन बंद करू शकत नाही. असे म्हणू शकत नाही. "तुला यादीत बाबा कुठले ते माहीत नसेल तर नसेल - यादीत एकतरी आकडा हा आमच्या वडलांचा आहे हे तूच मान्य करतोस ना? यादीतली संख्या एकाने कमी करच! तो एक आकडा वापरण्यास तुला अनुमती नाही."

(२) संशोधक-संशोधक संबंध :
प्रस्तावाच्या सुरुवातीला "संकेतस्थळांवर चर्चा होत आहे, बोलणे खुंटते..." असे सूतोवाच केलेले आहे. तिथे चर्चा करणारे समसमान पातळीवरचे असतात. त्याला समांतर म्हणजे दोन किंवा अधिक संशोधक एकमेकांच्या संशोधन अनुभवाबद्दल संवाद करतात. अशा परिस्थितीत बेलमाँट अहवालाचा संबंध लागत नाही.

उदाहरणार्थ अल्ट्रासाउंडचे विश्लेषण केल्यावर त्याबद्दल शोधनिबंध प्रसिद्ध करण्याबाबत बघूया. अल्ट्रासाउंड चित्रणाबाबत वेगवेगळ्या संशोधकांमध्ये मतभेद असतात. त्यांच्याबद्दल मतभेद-चर्चा संशोधन-मासिकांत किंवा संशोधन-परिषदांत होते. अशी चर्चा होताना मतभेद असलेले संशोधक एकमेकांची अनुमती बेलमाँट अहवालाच्या अनुसार घेत नाहीत.

(३ अथवा १+२) जर संशोधक हा संशोधितही असेल तर?
आता एखादा व्यक्ती अल्ट्रासाउंड चित्रणातही सहभागी होऊ शकतो, आणि चर्चाही करू शकतो. मी स्वतः अल्ट्रासाउंड चित्रणात सहभागी झालेलो आहे. चित्रणाचे विश्लेषण कसे करावे, याबाबत मतभेद असलेले लोक चित्रणात सहभागी झालेले आहेत. अशा परिस्थितीत चित्रण करताना अनुमती घ्यावी लागते, हे सांगितलेच आहे. चित्रण करताना "चित्रणात अमुकच निष्कर्ष काढेन" असे बंधन नसते, अशीसुद्धा वरती चर्चा झालेली आहे. एकदा का चित्रण झाले, की मग त्याचे विश्लेषण करून संशोधक-संशोधक म्हणून चर्चा करत असताना पुन्हा अनुमती घ्यावी लागत नाही.

(४?)इन्टर्व्हेन्शन = इलाज
पुढे चर्चेत कुठेतरी इन्टर्व्हेन्शन - म्हणजे इलाज - हा मुद्दा आलेला आहे. वैद्यकात इलाज दोन वेगवेगळ्या प्रसंगी होतो.
(४अ) रुग्ण वैद्याकडे आजाराच्या इलाजासाठी येतो तेव्हाचा एक प्रकारचा प्रसंग. येथे बेलमाँट अहवालातील संशोधनविषयक चर्चा गैरलागू आहे. तरी इलाजाची बळजबरी नसते. रुग्ण स्वतःहून वैद्याकडे आला, म्हणजे वैद्याचा सल्ला तरी ऐकण्यास त्याने अनुमती दिलेली आहे, असे अध्याहृत असते. सल्ला देताना वेगवेगळे इलाज सांगितले, तर इलाज स्वीकारण्या-नाकारण्याबद्दल रुग्णाला पूर्ण स्वातंत्र्य असते. इलाजासाठी अनुमती लागते.
येथे पुन्हा सांगावेसे वाटते, की अगदी वैद्यकाची चर्चा असली, आणि इलाजाच्या वेळेला बळजबरी होते, ती रोखायची असेल, तर त्या ठिकाणी बेलमाँट अहवालाचा दृष्टांत गैरलागू आहे, उगाच गोंधळात पाडणारा आहे.
(४आ = १ किंवा ३) इलाजाबद्दल संशोधन
वर सांगितलेलीच सर्व तत्त्वे लागू होतात. वेगळे काही सांगण्यासारखे नाही.

- - -

आता उपक्रमावरील "श्रद्धा" चर्चेत "इलाज"-दृष्टांत कसा लागू पडतो? बेलमाँट-संशोधन किंवा सामान्य-इलाज यांच्यात होऊ शकणारी बळजबरी, आणि त्याचा प्रतिबंध करणार्‍या संस्था - यांच्यातून काय शिकवण घेता येते?

- - -
काही स्पष्टीकरणे : "प्रसिद्ध किंवा उघड माहितीचे विश्लेषण" - हा अनुभव का दिला? कधी कधी बाबा-बुवांचे चमत्कार आणि चरित्रे पुस्तकरूपात किंवा वर्तमानपत्रांत प्रसिद्ध असतात. ज्याप्रकारे "उपराष्ट्रपतीचा हृदयरोग चर्चे"बाबतीत पुन्हा उपराष्ट्रपतींची अनुमती घ्यावी लागली नाही, त्याच प्रमाणे प्रसिद्ध झालेल्या चमत्कारांच्या चर्चेबाबत अनुमती घ्यावी लागणार नाही. माहिती प्रसिद्ध करताना प्रकाशकाने तशी अनुमती दिलेली आहे, असे अध्याहृत असते.

नाही

विस्तृत प्रतिसादासाठी आभारी आहे. एकच खुलासा करत आहे की इथे उपक्रमावरील श्रद्धा.. या चर्चेचा संबंध नाही. हे प्रश्न वेगवेगळ्या वेळी मला पडलेले आहेत, म्हणून ही चर्चा टाकलेली आहे.
इथे विचारांची सुरूवात ही मराठी संकेतस्थळांमुळे असली तरी सामाजिक क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष काम करणारे कार्यकर्त्यांनाही अशी काही प्रश्नावली, संशोधन करताना या मार्गदर्शनाचा उपयोग होऊ शकतो का असे वाटले. या प्रश्नांची जाण सामाजिक कार्यकर्त्यांनाही असते का असाही मला यानिमित्ताने प्रश्न होता. त्याअर्थी मराठी संकेतस्थळांपुरती मर्यादित अशी ही चर्चा नाही.

चित्रा यांना म्हणायचे आहे, की कधीकधी समाजविषयक चर्चेत बळजबरी होते. त्यांचा असा दृष्टांत आहे, की कधीकधी संशोधनात, मुख्यतः वैद्यकीय संशोधनात, बळजबरी होऊ शकते. वैद्यकीय संशोधनात बळजबरी होऊ नये म्हणून संस्था आणि संशोधक काळजी घेतात.

नाही, हे विषय वैद्यकीयपेक्षा सोशल आणि बीहेवियरल सायंटिस्टांच्या कक्षेत येत असावे असे मला वाटते. माझा बेलमॉन्ट रिपोर्ट देण्याचा उद्देश केवळ तत्वे काय आहेत (ती सर्वांना मार्गदर्शक आहेत)म्हणून आहे.

धनंजय यांना असे म्हणायचे असावे की चर्चा असल्याने चर्चा ही दोन व्यक्तींमध्ये समान पातळीवर होते, त्यात संशोधनाचा संबंध येत नाही. म्हणून मुद्दे गैरलागू आहेत.
पण जेव्हा चर्चा ही "तुमचे अमूक "क्ष" वर्तन या "य" पुराव्यामुळे बदलता येईल का? " असे होते, तेव्हा इलाज करण्याचा उद्देश (इंटरव्हेन्शनचा) उद्देश स्पष्ट आहे. हे इलाज कसे असणार आहेत याचे पूर्वस्वरूप माहिती नसल्याने मानसिक उलथापालथ होऊ शकते. यानंतर काही कारणाने इलाज नाकारल्यानंतर निष्कर्ष हे तुमच्या संशोधनाप्रमाणे माणसाला ओळखता न येईल अशा पद्धतीने विश्लेषण न करता, ते विश्लेषण हे व्यक्तीला ओळखता येईल अशा प्रकारे, तिच्याविषयी निष्कर्ष सार्वजनिक ठिकाणी मांडून जर केले गेले तर त्यामुळे संशोधनप्रक्रियेत म्हणा, इलाजांमध्ये म्हणा अडथळा येऊ शकतो. तेव्हा हे न व्हायचे असले तर सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या व्यक्तींना काही अनुभव/ ट्रेनिंग पाहिजे का अशा प्रकारची चर्चा व्हावी अशी अपेक्षा होती.

ह्या प्रकारच्या बोलण्याची संशोधनाशी तुलना करता येऊ शकते, हे मान्य नसल्यास आपल्याला पुढे जाता येणार नाही. माझ्यामते तुलना होऊ शकते कारण -(१) ह्यात इलाजांचा उद्देश आहे/निष्कर्ष काढले जात आहेत. (२) इलाज हे एक्सपरिमेंटल आहेत - त्यातून काय होईल ह्याची कल्पना नाही. (३) हे निष्कर्ष बोलण्यात सहभागी झालेल्या एका व्यक्तीबद्दल आहेत.

खुलाशाबद्दल आभारी आहे

एकच खुलासा करत आहे की इथे उपक्रमावरील श्रद्धा.. या चर्चेचा संबंध नाही.

श्रद्धा.... चर्चेत तुमचा शेवटचा प्रतिसाद हा नविन चर्चा सुरु करण्या विषयी होता. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही ही चर्चा सुरू केलेली पाहून माझाही धनंजय ह्यांच्यासारखाच समज झाला होता. ह्या खुलाशा बद्दल आभारी आहे.
तसेच तिकडच्या चर्चेत तुमच्या शेवटच्या प्रतिसादात उल्लेख केलेली नविन चर्चाही लवकर सुरू करावी ही विनंती.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

संबंध असेल तर सामान्य इलाजाशी, संशोधनाशी नव्हे

पण जेव्हा चर्चा ही "तुमचे अमूक "क्ष" वर्तन या "य" पुराव्यामुळे बदलता येईल का? " असे होते, तेव्हा इलाज करण्याचा उद्देश (इंटरव्हेन्शनचा) उद्देश स्पष्ट आहे.

याचे असलेच तर सामान्य (बिनसंशोधनाच्या) इलाजाशी सामांतर्य आहे. मात्र सामांतर्य तरी ओढूनताणून आहे.

म्हणजे कोणी वैद्य रुग्णाला सांगतो - अमुक-अमुक पुराव्यामुळे तुला असे पटावे, की सकाळी-एक-संध्याकाळी-एक अशा या गोळ्या घेतल्यास तुझा ताप उतरेल. रुग्णास पटल्यास, रुग्णाने गोळ्या विकत घेतल्यास, खाल्ल्यास मग आपण म्हणू इंटरव्हेन्शन होते. तरी हे संशोधन नाही. वैद्यकीय सल्लामसलतीची अनुमती मिळवण्यासाठी आय-आर-बी कडे जावे लागत नाही.

हे इलाज कसे असणार आहेत याचे पूर्वस्वरूप माहिती नसल्याने मानसिक उलथापालथ होऊ शकते.

हे कुठल्याही इलाजाबद्दल आहे, संशोधनाबाबत नाही. (खालील तुमचा मुद्दा क्रमांक २, आणि त्यावर प्रतिसाद बघावा.)

यानंतर काही कारणाने इलाज नाकारल्यानंतर निष्कर्ष हे तुमच्या संशोधनाप्रमाणे माणसाला ओळखता न येईल अशा पद्धतीने विश्लेषण न करता, ते विश्लेषण हे व्यक्तीला ओळखता येईल अशा प्रकारे, तिच्याविषयी निष्कर्ष सार्वजनिक ठिकाणी मांडून जर केले गेले तर त्यामुळे संशोधनप्रक्रियेत म्हणा, इलाजांमध्ये म्हणा अडथळा येऊ शकतो.

कठिण वाक्य आहे. इलाज नाकारला तर नकारामुळे इलाजाला आपोआप पूर्ण अडथळा आला. पूर्ण अडथळ्यानंतर आणखी (पूर्णपेक्षा अधिक असा) काय आडथळा येऊ शकणार आहे?

तेव्हा हे न व्हायचे असले तर सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या व्यक्तींना काही अनुभव/ ट्रेनिंग पाहिजे का अशा प्रकारची चर्चा व्हावी अशी अपेक्षा होती.

सांगता येत नाही. प्रशिक्षण असले तर उत्तम. अनुभव असला तर उत्तम. मात्र एकमेकांशी बोलणे, एकमेकांची समजूत पटवणे, ही फार मूलभूत मानवी प्रक्रिया असावी. "प्रशिक्षणाशिवाय एकमेकांना पटवायचा प्रयत्न करू नका" असे म्हटल्यास कोणी ऐकेल असे वाटत नाही. मूल होण्यापूर्वी बालसंगोपनाचे ट्रेनिंग हवे, असे काही आहे काय? :-) "बालसंगोपनाचे प्रशिक्षण घेतल्याशिवाय मुलांना जन्म देऊ नका" म्हटल्यासही कोणी फारसे ऐकणार नाही.

माझ्यामते तुलना होऊ शकते कारण -(१) ह्यात इलाजांचा उद्देश आहे/निष्कर्ष काढले जात आहेत.

एकमेकांशी "बिहेवियर"बद्दल कुठल्याही बोलण्यात "वागणे बदलले तर काय होईल/ नाही बदलले तर काय होईल" असा संवाद असतो. हे खरे आहे. त्यातील शेवटचे विधान "निष्कर्ष" असू शकते. खरे आहे. असे असेल तर मनुष्यांच्या मनुष्यांविषयी जवळजवळ सर्व संवादांना संशोधन म्हणण्याची पाळी येईल. या नामकरणातून काही निष्पन्न होणार नाही. म्हणजे बर्‍याच वर्षंपूर्वी माझ्या आईने मला हाताने अन्नाचा घास तोंडात घालायला शिकवले. माझे हात-तोंड न बरबटता पोषण व्हावे, असा काही इलाज/इन्टर्व्हेन्शन होते. त्यातल्या त्यात स्वच्छ राहून असे पोषण होऊ शकते, असा काही निष्कर्ष होता. याला "संशोधन" म्हणून काही फार फायदा होतो, असे मला कळत नाही. किंवा याबद्दल माझ्या आईला प्रशिक्षण हवे होते की काय? ही चर्चा मला फारशी पटत नाही.

(२) इलाज हे एक्सपरिमेंटल आहेत - त्यातून काय होईल ह्याची कल्पना नाही.

असेल, माहीत नाही. "एक्स्पेरिमेंटल" म्हणजे काय? भविष्यात काय होईल याची कोणालाच निश्चित कल्पना नसते. मात्र भूतकाळातल्या अनुभवामधून कधीकधी बरीच निश्चिती येते. जर बरीच निश्चिती असेल तर बहुधा सामान्य आयुष्यात त्या भूतकाळातल्या अनुभवाला "पुरावा" म्हणतात. आणि "पुरावा" पटल्यास भविष्यकाळात काय होईल त्याला "प्रायोगिक" मानत नाहीत. तुमच्या चौकटीत असे दिसते, की संवादकांपैकी एकाला वाटते, की पुरावा आहे, म्हणून इलाज प्रायोगिक नाही. दुसर्‍याला वाटते की पुरावा नाही. मग "इलाज एक्स्पेरिमेंटल आहे की नाही" याबद्दलच चर्चा होत आहे ना? जर चर्चा याबद्दल आहे, तर इलाज एक्स्पेरिमेंटल आहे, हे आधीच कसे ठरवून चालेल? हां - जर दोन्ही संवादकांना मान्य असेल, की इलाज एक्स्पेरिमेंटल आहे - माहिती असलेले पुरावे तकलादू आहेत, तर इलाज प्रायोगिक आहे, याबाबत काहीच शंका नाही. मग एक दुसर्‍याला "पुरावा" कसला देणार?

(३) हे निष्कर्ष बोलण्यात सहभागी झालेल्या एका व्यक्तीबद्दल आहेत.

म्हणजे इथे समानता नाही, अशी चौकट आहे. निष्कर्ष एका व्यक्तीबद्दल आहेत, पण दुसर्‍या व्यक्तीबद्दल नाहीत. याचासुद्धा संशोधनाशी थेट संबंध नाही. कित्येकदा आई-वडील मुलांना सांगतात "पुरे झाले खेळणे, घरात ये!", किंवा "आज थंडी आहे, स्वेटर घाल" तिथे असमानता असते. इलाज आणि निष्कर्ष संवादातल्या एकाच व्यक्तीला लागू होतात. या मुद्द्याचा "संशोधन" असण्याशी काय संबंध आहे, ते कळत नाही.

(मित्रांमित्रांतही आळीपाळीने असे एकतर्फी सल्ले असू शकतात. कधी एक मित्र सल्लागार, दुसरा सल्ला ऐकणारा असतो. कधी दुसरा सल्ला देणारा, पहिला ऐकणारा असू शकतो. पण दीर्घकाळात समसमानता असते. हा प्रकारसुद्धा "संशोधना"शी संबंधित नाही.)

:)

कुठच्याही तत्वाची खूप ओढाताण केली तर अशी अडचण निर्माण होऊ शकते हे खरे आहे. अति सर्वत्र वर्जयेत अशी म्हण आहेच.

धनंजय यांनी घेतली आहेत ती सर्व उदाहरणे आई-मूल (बालसंगोपन), मित्र-सुहृद ही एस्टॅब्लिश्ड नाती असतात, त्यात विश्वास असतो (मग त्याला हवे तर प्लासिबो म्हणा). त्यामुळे एम्पिरिकल, एक्सपरिमेंटल पद्धती चालवल्या जातात, त्यातही संगोपन नीट न होणे, सल्ला नीट न मिळणे होऊ शकत असले तरी भासमान विश्वासार्हतेमुळे हे वेगळे असते. याउलट जेव्हा सामाजिक कार्यकर्ते किंवा तिर्‍हाईत व्यक्त्ती, ह्या अशा प्रकारच्या संबंधांमध्ये आई-मूल किंवा मित्र-मित्र यांच्यातील विश्वासापेक्षा कमी पातळीवर एकत्र आलेले असतात तेव्हा अधिक प्रोफेशनल, व्यावसायिक, अशी वर्तणूक असते असे आपण बघतो. यामुळे अशा संबंधांच्या बाबतीत काळजी घ्यायला हवी का असा हा विषय होता. म्हणून कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगमध्ये अशी काही काळजी घेतली जाते का, त्यावर काही लोकांना प्रकाश पाडता येईल का असेही या चर्चेतून बघता येईल.

वैद्यकीय सल्लामसलतीची अनुमती मिळवण्यासाठी आय-आर-बी कडे जावे लागत नाही.
नक्कीच. कारण वैद्यकीय सल्लामसलत बरेचदा प्रॅक्टिस असते याचा अर्थ ती एस्टॅब्लिश्ड असते. त्यामुळे आयआरबीकडे जावे लागत नाही.
पण जेव्हा अशी मसलत ही एक्स्परिमेंटल असते तेव्हा आय आर बी चा रिव्ह्यू व्हावा अशी अपेक्षा असावी.

एक्सपरिमेंटलचा नक्की काय अर्थ धनंजय घेतात हे मला माहिती नाही. वैद्यकशास्त्रात कदाचित हे अर्थ वेगळे भासत असतील. पण माझ्या मते एक्सपरिमेंटल म्हणजे ज्याचा आउटकम नक्की माहिती नाही अशी पद्धत, ज्यात संभाव्य धोक्याचे प्रमाण, किंवा धोकेच ह्याबद्दल निश्चित माहिती नाही. म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत, त्यासाठी देण्याची माहिती, तिचे स्वरूप इ. इ. गोष्टी येतील असे वाटते.

उदाहरणे देऊन व्याप्ती सांगता येईल

पण जेव्हा अशी मसलत ही एक्स्परिमेंटल असते तेव्हा आय आर बी चा रिव्ह्यू व्हावा अशी अपेक्षा असावी.

रुग्ण वैद्याकडे येतो, तेव्हा कधीच आय-आर-बी रिव्ह्यू होत नाही.

सुस्थापित संबंध म्हणजे कुठले, याबाबत आपली पूर्वकल्पना वेगळी असू शकेल. पण उदाहरणांसह सांगितल्यास व्याप्ती सांगता येईल.
- - -
कुटुंबीयांचा एकमेकांस सल्ला (माझ्या मते आय-आर-बी ची गरज नाही)
सुहृदांचा एकमेकांस सल्ला (माझ्या मते आय-आर-बी ची गरज नाही)
गावकर्‍यांचा एकमेकांना सल्ला (माझ्या मते आय-आर-बी ची गरज नाही)
देशवासियांचा एकमेकांना सल्ला (माझ्या मते आय-आर-बी ची गरज नाही)
मनुष्यांचा एकमेकांना सल्ला (माझ्या मते आय-आर-बी ची गरज नाही)

तुमच्या मते वरील उतरंडीत सुस्थापित संबंध संपून आय-आर-बी-लायक संबंध कुठे सुरू होतात?
- - -

"एक्सपेरिमेंटल" शब्दाची आपणा दोघांची व्याप्ती वेगळी असावी हा तुमचा कयास ठीक वाटतो. "अति" केव्हा होते आहे, याबद्दलही आपली व्याप्ती वेगळी असू शकते. असे असताना उदाहरणे दिलेली बरी.
कुटुंबीय, सुहृद वगैरे चर्चा वर उदाहरणांसह झालेलीच आहे.

आता त्याहून व्यापक सामाजिक उपदेश बघूया -
आजच्या न्यू यॉर्क टाइम्स मधील संपादकीये :
"जॉब्स अँड पॉलिटिक्स" यात सामाजिक उपदेश आहे, की संसदेतल्या दोन पक्षांनी भांडणे सोडून नोकर्‍या निर्माण कराव्या. (मात्र प्रत्येक पक्षातील लोकांना असे वाटते, की आपन नोकर्‍या निर्माण करायला मदत करत आहोत...) "पक्षांनी डायनॅमिक बदलावे" हा सल्ला देणे एक्सपेरिमेंटल आहे काय? पक्षांनी खरोखर डायनॅमिक बदलली तर त्यामुळे काय होऊ शकते याबद्दल निश्चित कोणालाच माहिती नाही. न्यू यॉर्क टाइम्स संपादक आणि माझ्यामध्ये किंवा पक्ष-सदस्यामध्ये सुस्थापित संबंध नाही. आणि एक्सपेरिमेंट आहे, म्हणून त्याबद्दल आय-आर-बी बसवावी काय?
बॉर्डर न्यूझ : सल्ला आहे की गरीब आगंतुकांवर कडक कारवाई करून काही फायदा होत नाही, आणि फक्त सरहद्द शीलबंद करून पैशांचा अपव्यय होतो. ऍरिझोना राज्यातील लोकांनी काय फरक करावा, हे विशेष. हा सल्ला एक्सपेरिमेंटल आहे काय... (वरीलप्रमाणे).
इन् सर्च ऑफ द बेडबग सोल्यूशन : अनेक दशकांच्या नंतर पुन्हा अमेरिकेत ढेकणांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यांचा अटकाव करण्यासाठी सरकारने आणि इन्डस्ट्रीने अधिक प्रयत्न केले पाहिजेत असा सल्ला आहे. हा सल्ला एक्सपेरिमेंटल आहे काय?... वगैरे

आता "उजवी"कडच्या वॉशिंगटन टाइम्स मधील काही संपादकीये बघूया :
द राइट टु द फ्रूट्स ऑफ अवर लेबर : यात असा सल्ला आहे, की वॉशिंगटनमधील राजकारण्यांनी नोकर्‍या वाढवण्याबाबत काही करू नये. (हे न्यू यॉर्क टाइम्स वाल्याच्या विरोधात आहे, हे लक्षात घेता...) हा सल्ला एक्स्पेरिमेंटल आहे काय? केंद्र सरकारने नोकर्‍यांच्या अर्थकारणातून आपले अंग काढून टाकल्यास काय होईल ते आपल्याला निश्चित माहिती नाही. वॉशिंगटन टाइम्सचे संपादक आणि मी यांच्यात सुस्थापित संबंध नाही. इ.इ. ...
बॅक टु द फ्यूचर विथ द जिपर : राष्ट्रपती रेगन यांचे एक भाषण उद्धृत आहे. रेगन काळातले अर्थकारण पुन्हा वापरावे, असा मथितार्थ आहे. हा सल्ला एक्सपेरिमेंटल आहे काय? .... इ इ

आता वाटल्यास "द हिंदू" मधील आणि "ऑर्गनायझर" मधील संपादकीय सल्लेही बघता येतील.

ऑर्गनायझरच्या मते काँग्रेस एक गरीब आणि एक श्रीमंत आणि एक गरीब समाज बनवत आहेत, आणि लोक त्यांच्याविरोधात उभे होत आहेत. मथितार्थ विरोध व्हावा.

"द हिंदू"मध्ये आर्मड फोर्सेस स्पेशल पावर्स ऍक्ट चा विरोध आहे.

या सगळ्या प्रकारांत सल्ला मानला तर नेमके काय होईल याबाबत अनिश्चिती आहे. या संपादकांशी माझा सुस्थापित संबंधही नाही.

तरी या सल्ल्यांना "प्रायोगिक" म्हणून काय साधते, ते मला कळत नाही. माझ्या मते यांच्यापैकी कुठेही आय-आर-बी ची गरज नाही.

आय आर बी

धनंजय यांचा मी "आय आर बी बसवा" असे म्हणत आहे असा समज झालेला दिसतो आहे. पण तसे नाही.
पण जसे मानसिक आरोग्यतज्ञ हे प्रशिक्षित असावे अशी अपेक्षा असते, तसेच सामाजिक कार्यकर्तेही प्रशिक्षित असावेत का, किंवा त्यांना मार्गदर्शन मिळत राहावे का? हा प्रश्न व्हॅलिड आहेच.

धनंजय यांनी जी उदाहरणे दिली आहेत - ती अशी आहेत की - ती संपादकीये बर्‍याच लोकांसाठी "इम्पर्सनल" आहेत. लोकांशी "थेट संबंध" असलेली नाहीत. माझा विचार असे दोन व्यक्तींचे (एक हस्तक्षेपक आणि दुसरा हस्तक्षेप झालेला) "थेट" संबंध आल्यानंतर काय करावे असा आहे. दोन व्यक्तींच्या अशा संपर्कातून किंवा एका व्यक्तीने केलेल्या हस्तक्षेपातून म्हणा, दुसर्‍या व्यक्तीबद्दल काढलेला निष्कर्ष हा संशोधनाचे निष्कर्ष म्हणून वापरला जाणार असतो का? जाणार असल्यास त्याबद्दल नक्कीच वरील धोरणांचा विचार व्हायला हवा असे मला वाटते.

तसेच धनंजय ज्याला सल्ले म्हणतात, त्याला मी काही प्रमाणात इंटरव्हेन्शन म्हणते आहे. जेव्हा हे सल्ले दोन व्यक्तींमधले थेट असतील तेव्हा त्यांनाही प्रश्न कसे आहेत याचा विचार करणे लागू व्हायला हवे का? म्हणजे असे, की मी एखादी व्यक्ती खूप खर्चिक वस्तू घेताना पाहिली तर मी म्हणू शकेन (सल्ला देऊ शकेन) - "अरे बाबा, एवढा खर्च करतोस त्यापेक्षा दुसरीकडे कमी पैशात तुला याहून दुसरी एखादी चांगली वस्तू मिळेल. हवे तर जाऊन बघ". त्याउलट मी असे म्हणाले की अरे गाढवा, तुला कळत नाही का ही वस्तू किती महाग आहे? आणि सोने सांगून पितळच देतायत तुला, मामा बनवत आहेत. असली वस्तू विकत घेतो आहेस म्हणजे तू मूर्खच आहेस. बहुतेक तुझी अक्कल कुठेतरी चरायला गेली आहे". (दुसर्‍या प्रश्नात माझे त्या व्यक्तीबद्दलचे खरेखोटे मत आड येते आहे) तर ती व्यक्ती माझ्या संबंधातली असली तर वेगळे समजून घेईल आणि नसली तर वेगळ्या पद्धतीने बोलेल. हे एक उदाहरण झाले.

जितके विचारलेले प्रश्न हे ध्येयाशी विसंगत असतील, तितके ध्येय दूर होऊ शकते, याचा अनुभव आपल्या सर्वांना असतोच. म्हणून प्रश्न असा होता, की या प्रकारच्या प्रश्नांकडे लक्ष देणे आवश्यक आहे का?

शैली, प्रशिक्षण

"अरे बाबा, एवढा खर्च करतोस त्यापेक्षा दुसरीकडे कमी पैशात तुला याहून दुसरी एखादी चांगली वस्तू मिळेल. हवे तर जाऊन बघ". त्याउलट मी असे म्हणाले की अरे गाढवा, तुला कळत नाही का ही वस्तू किती महाग आहे? आणि सोने सांगून पितळच देतायत तुला, मामा बनवत आहेत. असली वस्तू विकत घेतो आहेस म्हणजे तू मूर्खच आहेस. बहुतेक तुझी अक्कल कुठेतरी चरायला गेली आहे". (दुसर्‍या प्रश्नात माझे त्या व्यक्तीबद्दलचे खरेखोटे मत आड येते आहे)

येथे एक शैली मवाळ आहे, आणि दुसरी शैली अपमानकारक आहे. दुसर्‍या वाक्यातील "मूर्ख" "अक्कल चरायला गेली" या शब्दांना तथ्यातला काही अर्थ नाही. मात्र "तुला मामा बनवत आहेत" वाक्याला कदाचित अर्थ आहे. "विकणार्‍याला माल खोटा आहे हे माहीत असून तुला मल खरा आहे असे सांगतो आहे" असे तथ्य असू शकते. जर विकणारा जाणूनबुजून खोटी जाहिरात करत असेल, तर ते तथ्य सांगण्यात काही हशील आहे.

तथ्य नसलेल्या शब्दांनी अपमान करणे म्हणजे बहुधा शिव्या देण्यासारखेच. (नातेवाइकांच्या चारित्र्यावरून शिव्या देतात, त्याही अपमानकारक असतात, आणि त्यात तथ्य काहीच नसते.)

शिव्या देण्याबद्दल काही सामाजिक परिस्थिती असते. त्रागा वगैरे वाटत असेल तर शिव्या देतात. शिव्या देणार्‍याला थोडेसे बरे वाटते, असे म्हणतात.

बहुतेक वेळा शिव्या देऊन संवादात फारसा फायदा होत नाही. जर कुणी शिव्यांच्याच भाषेत बोलत असेल, आणि दुर्बलही असेल, तर अशा व्यक्तीचे हसे होते. जर कोणी व्यक्ती शिव्यांच्याच भाषेत बोलत असेल, आणि बलवान असेल, तर कुठल्यातरी प्रकारची बळजबरी होते. हे चांगले नाही.

समसमान बळ असलेल्या लोकांपैकी एकाने शिव्या दिल्या, तर दुसर्‍ई व्यक्ती ऐकून काय म्हणून घेईल? संवाद बंद करेल किंवा उलट शिव्या देईल. बळजबरीचा प्रतिबंध करण्याचा प्रश्न येतच नाही.

मात्र असा काही प्रकार तुमच्या मूळ प्रस्तावात स्पष्ट नव्हता. वेगळाच कुठलातरी नैतिक मुद्दा होता. दुसर्‍याला "मूर्ख" म्हणण्याचा मुद्दा नव्हता. तथ्य-नसलेले "मूर्ख" म्हणणे-न-म्हणणे या बाबतीत संशोधनाची तटस्थ नैतिक चाचणी, आय-आर-बी, बेलमाँट हे कुठलेही प्रकार नि:संदर्भ आहेत.

- - -

मन वळवण्याबद्दल प्रशिक्षण बहुधा मिळत असावे. जाहिरात-मार्केटिंग करणार्‍यांसाठी प्रशिक्षण देणारी महाविद्यालये असतात. तिथे "दुसर्‍या कंपनीचा साबण कपडे स्वच्छ करत नाही, आमच्या कंपनीचा साबण मात्र लख्ख करतो," असे लाघवीपणे सांगायचे शिक्षण मिळत असावे. सोशल वर्कची सुद्धा महाविद्यालये असतात. काही वकिली महाविद्यालयांत ज्यूरीचे मन कसे वळवायचे (पर्स्युएशन) याबद्दल प्रशिक्षण देतात.

मात्र एकमेकांना "मूर्ख" म्हणू नये (त्रागा वगैरे अपवादात्मक स्थिती सोडता) हे शिक्षण बहुधा माध्यमिक शाळेपर्यंत मिळत असावे. समाजातल्या वावरात मिळत असावे. त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज नसावी, असे वाटते. उलट "प्रशिक्षण असल्याशिवाय एकमेकांचे थेट मन वळवायचा प्रयत्न करू नये" असा नियम कोणी केला तर तो फार जुलुमी वाटेल.

?

समसमान बळ असलेल्या लोकांपैकी एकाने शिव्या दिल्या, तर दुसर्‍ई व्यक्ती ऐकून काय म्हणून घेईल? संवाद बंद करेल किंवा उलट शिव्या देईल. बळजबरीचा प्रतिबंध करण्याचा प्रश्न येतच नाही.
दोनांपैकी एका व्यक्तीने संवाद थांबवला तर व्यक्ती समान बळ असलेल्या नसून एका व्यक्तीला संवाद असह्य होतो आहे (मानसिक उलथापालथ) ही देखील एक शक्यता तपासायला हवी. मी आधी म्हटल्याप्रमाणे - दोन व्यक्तींच्या अशा संपर्कातून किंवा एका व्यक्तीने केलेल्या हस्तक्षेपातून म्हणा, दुसर्‍या व्यक्तीबद्दल काढलेला निष्कर्ष हा संशोधनाचे निष्कर्ष म्हणून वापरला जाणार असतो का? जाणार असल्यास त्याबद्दल नक्कीच वरील धोरणांचा विचार व्हायला हवा असे मला वाटते. शिवाय यातून संशोधनात्मक निष्कर्ष मांडले जात असले तर धोरणांबद्दल चर्चा निदान अशा संशोधकांमध्ये होणे आवश्यक आहे असे मला वाटते. (आय आर बी बसवा किंवा बसवू नका).

माझा मुद्दा काही वेगळा आहे, असे धनंजय यांना का वाटते हे मला कळत नाही. किंवा लाघवी पद्धतीने, जाहिरातीच्या तंत्राने बदल घडवण्याची प्रक्रिया करावी असे मी सुचवत आहे असे होपफुली वाटले नसू दे, कारण माझा तोदेखील हेतू नाही.

मला वाटते धनंजय यांनी हा प्रश्न या चौकटीत न बघण्यामागे काही विशेष कारण असावे. ते कारण ही चौकट जुलुमी वाटते आहे, असे आहे काय? ही चौकट सोशल अँड बीहेविअरल सायन्सेसच्या (सामाजिक किंवा वर्तणूक) क्षेत्रात चालत असली तर ती इथे फार जुलुमी ठरण्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही. संशोधन करू नये, चर्चा करू नये असे कसलेही निष्कर्ष यातून निघत नाहीत. तर संशोधन करायचे असल्यास ते कसे करावे? इंटरव्हेन्शन करायचे तर ते कसे करावे? एवढाच प्रश्न इथे आहे.
याची चर्चा आय आर बी ची बैठक न बसवता देखील संशोधकांनी अंतर्गत एकमेकांत केली तरी हरकत नसावी. ती चर्चा मात्र व्हावी, संशोधकांच्या मनात असे प्रश्न नक्की आले पाहिजेत हे मात्र मी नक्की म्हणते आहे. ते न येत असले तर माझे अशा संशोधनाबद्दलचे मत हे फार उत्तम होणार नाही.

किंबहुना "एकमेकांना "मूर्ख" म्हणू नये (त्रागा वगैरे अपवादात्मक स्थिती सोडता) हे शिक्षण बहुधा माध्यमिक शाळेपर्यंत मिळत असावे. समाजातल्या वावरात मिळत असावे. त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज नसावी, असे वाटते. "

हे मत पटत नाही. हे शि़क्षणही दृढीकरण करण्यासाठी वारंवार द्यावे लागत असावे. शिक्षणखात्यात अशी प्रोफेशनल डीवेलपमेंट चाललेली असते असे दिसून येते. अनेकदा माहिती असलेल्याच गोष्टी दृढीकरणासाठी परत परत शिकवाव्या लागतात.

नेमके उदाहरण द्या

नेमके आणि खरेखुरे उदाहरण देऊन समजावून सांगता येईल काय?

कुटुंबीयांतील निष्कर्षांना तुमचे विवेचन लागू नाही. वर्तमानपत्रांतील निष्कर्षांना तुमचे विवेचन लागू नाही. विवक्षित व्यक्तीला लागू पाहिजे. सुस्थापित संबंध नको.

मागे माझ्या घरी (फ्लॅटमध्ये) एका रात्री मसाला कुटत होतो. तर खालच्या मजल्यावरची शेजारीण आली आणि म्हणाली "कुटू नका, झोप मोडते". "मसाला कुटणे" हे बिहेव्हियर आहे. तिने माझ्यावर बिहेव्हियरल इन्टर्व्हेश्न केले. "हा सध्यातरी रात्री गोंगाट करणारा बुवा आहे" असा वैयक्तिक निष्कर्ष काढला. तिच्याशी माझा पूर्वीचा सुस्थापित संबंध नव्हता. नवीच आलेली होती. तिने काय करायला हवे होते? (माझ्या मते तिने केले ते ठीकच केले.) उद्या माझ्या शेजारची व्यक्ती रात्री गोंगाट करत असेल, माझी झोप मोडत असेल तर मी काय करावे? शेजार्‍यापाशी जावे की जाऊ नये? "गोंगाट करू नका" सांगावे की सांगू नये? जाण्यापूर्वी शेजार्‍याला माझ्या सांगण्याचा त्रास होईल याचा विचार करावा? केला विचार. शेजार्‍याला वाईट वाटेल. माझे मसाला कुटणे थांबवले तेव्हा मला वाईट वाटले होते, ते आठवते. आपल्याला गोंगाटाचे इतके कसे विसरायला झाले, असे ओशाळल्याचे आठवते. बहुधा माझ्या शेजार्‍यालाही ओशाळल्यासारखे होईल. मग काय करू - शेजार्‍याला सांगायला जाऊ की नको? की सांगण्यापूर्वी अनुमती घेऊ - अनुमतीसाठी काय वाक्य वापरू?

मला वाटते धनंजय यांनी हा प्रश्न या चौकटीत न बघण्यामागे काही विशेष कारण असावे. ते कारण ही चौकट जुलुमी वाटते आहे, असे आहे काय? ही चौकट सोशल अँड बीहेविअरल सायन्सेसच्या (सामाजिक किंवा वर्तणूक) क्षेत्रात चालत असली तर ती इथे फार जुलुमी ठरण्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही. संशोधन करू नये, चर्चा करू नये असे कसलेही निष्कर्ष यातून निघत नाहीत. तर संशोधन करायचे असल्यास ते कसे करावे? इंटरव्हेन्शन करायचे तर ते कसे करावे? एवढाच प्रश्न इथे आहे.

सोशल अँड बिहेव्हियरल सायन्स मध्ये तरी ही चौकट कुठे चालते. **(मी खुद्द सोशल-बिहेव्हियरल संशोधनही करतो म्हणून कोड्यात पडलेलो आहे.)** समसमान पातळीवरचे लोक एकमेकांना सोशल आणि बिहेव्हियरल निष्कर्ष सांगतात तेव्हा अशी कुठलीही अनुमती घेत नाहीत. फक्त जिथे संशोधक वि. संशोधित अशी असमानता असते, आणि निष्कर्षाचे सामान्यीकरण होणार असते, तिथेच अनुमती/नैतिकता वगैरे मुद्दे उद्भवतात. वैयक्तिक निष्कर्षांसाठी हे कधीच लागू नसते.

- - -
बेलमाँट अहवालात "संशोधन" म्हणजे काय, "प्रायोगिक" म्हणजे काय, याविषयी थेट विवेचन केले आहे.

इंटरव्हेन्शन मध्ये "प्रॅक्टिस" काय आणि "प्रायोगिक" काय हे नीट समजले नाही तर गोंधळ होतो याबद्दल स्पष्ट चर्चा आहे (अहवालाचा दुवा) :
It is important to distinguish between biomedical and behavioral research, on the one hand, and the practice of accepted therapy on the other, in order to know what activities ought to undergo review for the protection of human subjects of research.
एकीकडे जीववैद्यकीय अथवा वागणुकीबाबत संशोधन आणि दुसरीकडे मान्य इलाजांची प्रॅक्टिस यांच्यात फरक करणे महत्त्वाचे. (फक्त "संशोधना"बाबत मानवी संशोधितांचे संरक्षण लागू आहे, असा मथितार्थ.)

तुमच्या चर्चेत "प्रॅक्टिस" म्हणजे काय यासाठी कुठलीतरी आंतरिक व्याख्या आहे, असे वाटते, पण ती तुमच्या लेखनातून मला कळून येत नाही.

"संशोधन" संज्ञेची व्याप्ती वैश्विक होऊ नये, म्हणून अहवाल लिहिणारे सांगतात :
the term ”research' designates an activity designed to test an hypothesis, permit conclusions to be drawn, and thereby to develop or contribute to generalizable knowledge (expressed, for example, in theories, principles, and statements of relationships). Research is usually described in a formal protocol that sets forth an objective and a set of procedures designed to reach that objective.
तुम्ही म्हणता त्या प्रकारचे वैयक्तिक निष्कर्ष या संज्ञेत येतच नाहीत. (निष्कर्ष व्यक्तीबद्दल असतो, हे तुम्ही पुन्हा-पुन्हा सांगितलेले आहे.) या वाक्यांत "जनरलायझेबल" हा शब्द कळीचा आहे, असे आय-आर-बी प्रशिक्षणात मला सांगितले. वेगवेगळी उदाहरणे देऊन "सामान्यीकृत" काय "विवक्षित" काय अशा प्रकारे वर्णन बळकट केले.

अहवालात नैतिक पायासुद्धा सांगितलेला आहे :
Respect for persons incorporates at least two ethical convictions: first, that individuals should be treated as autonomous agents, and second, that persons with diminished autonomy are entitled to protection. The principle of respect for persons thus divides into two separate moral requirements: the requirement to acknowledge autonomy and the requirement to protect those with diminished autonomy.
मथितार्थ : ज्यांना स्वातंत्र्य आहे, ते मान्यच करायचे असते (रक्षणाची वेगळी गरज नाही), मात्र ज्यांचे स्वातंत्र्य कमी केलेले आहे, त्यांच्या बाबतीतच संरक्षणाची अपेक्षा असते. हे दोन वेगवेगळे नैतिक मुद्दे आहेत, याबाबत अहवालाचे लेखक ठाम आहेत.

तुमच्या चर्चेत कोणाचे स्वातंत्र्य सीमित आहे? की स्वातंत्र सीमित झाले नाही तरी संरक्षणाची नैतिक अपेक्षा आहे. अशी जर कुठली तुमची नैतिक अपेक्षा आहे, तर बेलमाँट अहवालाचा पाया तुम्हाला पटणार नाही. तो सोडून नवीन-स्वतंत्र नैतिक इमारत बांधली पाहिजे.

बेलमाँट अहवालातील "रिस्पेक्ट"चा भलताच काहीतरी अर्थ घेतला तर खालील वाक्य कोड्यात पाडू शकेल.
To show lack of respect for an autonomous agent is to repudiate that person's considered judgments, to deny an individual the freedom to act on those considered judgments, or to withhold information necessary to make a considered judgment, when there are no compelling reasons to do so.
अधोरेखित मुद्दा बघा. आता क्ष विषयात पुरावा दाखवला नाही तर समोरची व्यक्ती अपूर्ण माहितीमुळे चुकीचा निर्णय घेऊ शकते, असे आपल्याला वाटले. मात्र पुरावा बघितल्यामुळे त्यांना मानसिक दु:ख होणार असेल. तर काय घ्या? त्यांना माहिती दिली तरी अनैतिक, आणि माहिती दिली नाही तरी अनैतिक! त्यापेक्षा हे बरे की "रिस्पेक्ट"चे भलतेच अर्थ काढू नयेत.

हे तर खर्‍याखुर्‍या अनुभवांशी निगडित आहे. माझ्या संशोधनाचे अनुमतीपत्र वाचून चर्चा केली पाहिजे, असे विद्यापीठाचे धोरण आहे. कधीकधी लोक म्हणतात - आमचा तुमच्यावर विश्वास आहे, सगळे तपशील ऐकायचा आम्हाला कंटाळा आहे. तरी आम्ही त्यांना समजावून सांगतो - "बघा सगळे काही समजून अनुमती दिली तरच ग्राह्य मानायचे आमचे धोरण आहे. विश्वास आहे, म्हणून न वाचताच सही केली, तर संस्था ती अनुमती अपूर्ण मानते." असे म्हटले म्हणजे आम्ही लोकांना अनुमती मागताना बळेच माहिती पुरवत आहोत काय? "कंटाळू नये" या हक्कावर कुरघोडी करत आहोत काय? या ठिकाणी मला संस्थेचे धोरण पटते. नको-नको म्हणले तरी माहिती देऊन अनुमती घेणे, हेच योग्य. अर्थात "हे कंटाळवाणे अनुमतीपत्र वाचण्यापेक्षा इथून चालते व्हावे" असे लोकांचे स्वातंत्र्य नेहमीच अबाधित राहाते.

असो. हा बेलमाँट अहवाल म्हणजे शब्दप्रमाण सिद्धांत (स्क्रिप्चर, गॉस्पेल) नव्हे. संशोधक समसमान स्वातंत्र्याच्या परिस्थितीत एकमेकांना विशेष संरक्षण देत नाहीत याबद्दल तुम्हाला वैषम्य वाटते, संशोधकांबद्दल तुमचे मत आता उतरले आहे.
(या व्यक्तींबद्दल मत उतरवण्याचा निष्कर्ष काढताच संशोधकांना वाईट वाटत असेल, बेलमाँट अहवाल लिहिणार्‍यांना "दुष्ट" म्हणल्याबद्दल फारच वाईट वाटत असेल. त्यांची पूर्वपरवानगी चर्चा करण्यापूर्वी घेतली नाही, ही बाब सध्या सोडून देऊया. नाहीतरी माझ्या मते मानसिक दु:खाबाबत समसमान लोकांत पूर्वानुमतीची गरज नाहीच. तुमच्याच मते गरज आहे.)

पण बेलमाँट अहवाललेखक जो काही नैतिक पाया वापरतात, त्यापेक्षा वेगळा नैतिक पाया काय ते तरी सांगूया. त्या नैतिक विचारसरणीत सामान्यीकृत नसलेल्या वैयक्तिक इन्टर्व्हेन्शनांना संशोधन म्हणण्यात काही हशील आहे, असे दाखवूया. त्या विचारसरणीत प्रॅक्टिसला संशोधन म्हणून हशील काय ते दाखवूया. पण तुमच्या नजरेत पडू नये म्हणून संशोधकांचे योग्य वागणे काय आहे ते सुस्पष्ट करून सांगूया.

(आणि हे राहिलेच. जर आपल्या विचारविनिमयापूर्वी संशोधकांची अनुमती ["तुम्हाला वाईट वाटेल, चालेल ना"] अपरिहार्य आहे, असे आपण ठरवणार असू, तर काहीही विचारविनिमय ते वाचतील अशा ठिकाणी अभिव्यक्त करण्यापूर्वी त्या सर्वांची एक-एक करून अनुमती घेऊया. मेजॉरिटीने अनुमती दिली तरी चालेल की झाडून प्रत्येकाने अनुमती दिली पाहिजे?)

नेमके आणि खरेखुरे उदाहरण

नेमके आणि खरेखुरे उदाहरण देऊन समजावून सांगता येईल काय?

श्रद्धावंतांना त्यांच्या श्रद्धेविषयी शंका उपस्थित करताना नक्की कसे प्रश्न विचारावेत? हेच ते "खरेखुरे" उदाहरण आहे. चित्रा ह्यांनी ह्या चर्चेचा 'श्रद्धा...' चर्चेशी काहीही संबंध नाही असा खुलासा दिला असला तरी त्यांचे (तिथले आणि इथले) प्रतिसाद वाचून फिरुन फिरुन त्यांना ह्याच मुद्यावर यायचे आहे असे दिसते आहे.

असे असताना त्यांनी,

एकच खुलासा करत आहे की इथे उपक्रमावरील श्रद्धा.. या चर्चेचा संबंध नाही.

हा प्रतिसाद का दिला आहे समजले नाही.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

अहवालातले आणखी एक उद्धरण

अहवालातले आणखी एक उद्धरण येथे देण्यायोग्य आहे :
When a clinician departs in a significant way from standard or accepted practice, the innovation does not, in and of itself, constitute research. The fact that a procedure is ”experimental,” in the sense of new, untested or different, does not automatically place it in the category of research.
जेव्हा वैद्यकीय इलाज करणारा वहिवाटीच्या आणि मान्य पद्धतीपेक्षा लक्षणीय फारकत करतो, ते नाविन्य स्वतःहून "संशोधन" होत नाही. पद्धत नवी, चाचणी न-झालेली आणि वेगळी आहे, या अर्थाने ती "प्रायोगिक" आहे, म्हणून ती आपोआप "संशोधन" होत नाही.

बेलमाँट अहवालाच्या लेखकांनी "नाविन्य-चाचणी झालेली नाही-मान्य पद्धत नाही" असे असून "हे संशोधन होत नाही" असे मुद्दामून सांगायला घेतले. "नाविन्य-म्हणून-प्रायोगिक" आणि "संशोधन-म्हणून-प्रायोगिक" यांच्यात फरक विशद करणे त्यांना महत्त्वाचे वाटले. त्यांचे म्हणणे आपण मानले पाहिजे असे मुळीच नाही. पण त्यांच्या व्याख्येच्या पेक्षा वेगळ्या व्याख्येने "प्रायोगिक" शब्द वापरला, तर मग त्यांचा युक्तिवाद नि:संदर्भ होतो. नव्या व्याख्येशी सुसंगत असा नवा युक्तिवाद मांडायला पाहिजे.
क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती. क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती. क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती. क्षुद्राक्षरकार्त्स्न्यक्षि!१२क्षांती.

स्क्रिप्चर

वेळ काढून हा प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. प्रतिसादात बरेच मुद्दे आहेत - जमेल तसे उत्तर देते.

उदाहरण चर्चाप्रस्तावात दिले आहे. याखेरीज अधिक वेगळे उदाहरण देण्याची गरज वाटत नाही. मी वर असेही म्हटलेले आहे की असे प्रश्न मला अनेकदा पडलेले आहेत.
--
शेजारणीचे उदाहरण चांगले आहे. यात धनंजय किंवा क्ष व्यक्तीने काही एक वेळ न सांभाळून चूक केली आहे. तेव्हा शेजारणीने येऊन बोललेले जरी लागले असले तरी समजण्यासारखे आहे. येथे धनंजय किंवा क्ष व्यक्ती यांनाही कल्पना आहे की रात्री खूप आवाज करणे चुकीचे आहे. अशी चूक पदरात पडली तर वाईट वाटतेच. पण शेजारीण जाऊन जर भारतीय लोक रात्री मसाला कुटतात किंवा 'क्ष' सारखी माणसे रात्री मसाला कुटतात, अजिबात कोणाची पर्वा करीत नाहीत, असे वर्तमानपत्रात छापून आणू लागली तर मात्र कठीण होईल. मग तिचे संशोधन क्ष या व्यक्तीपर्यंत मर्यादित राहिले नाही. क्ष चे नाव तर उदाहरणासकट छापून आणलेच.
---

कोड्यात पडण्यावरून- माझ्या माहितीप्रमाणे सोशल आणि बिहेविअरल शास्त्रांमध्ये रिस्क मिनिमल असली तरी - http://www.nsf.gov/bfa/dias/policy/hsfaqs.jsp#minimal

येथे दिल्याप्रमाणे -

Most social and behavioral scientists, however, subscribe to a strict standard involving confidentiality:

•Confidentiality should be guaranteed, unless the respondent explicitly agrees to disclosure. The release of any information that can be linked to an individual, potentially damaging or not, should be agreed upon.

•"Delayed harm": It is conceivable that as a result of participating in a social science study a subject may experience some longer term psychological reaction, such as depression. .... (For example, counseling referral information can be made available for participants.)
हे मी वर चर्चाविषयातही सांगितले आहेच. आपण होऊन काही गोष्टी करतात. आय आर बी बसवली नाही तरी काही प्रश्नांचा विचार होतोच.

--
प्रॅक्टिसची व्याख्या अशी -
the term ”practice” refers to interventions that are designed solely to enhance the well-being of an individual patient or client and that have a reasonable expectation of success. The purpose of medical or behavioral practice is to provide diagnosis, preventive treatment or therapy to particular individuals.

अनुभव नसताना, यशाची खात्री नसताना जे केले जाते ती प्रॅक्टिस नाही. तीही अनुभव असलेल्यानेच करावी अशी अपेक्षा असते. तेव्हा अननुभवी व्यक्तीने केलेल्या सर्जरीला प्रॅक्टिस म्हणता येणार नाही, ते कायद्याला धरून नाही.

By contrast, the term ”research' designates an activity designed to test an hypothesis, permit conclusions to be drawn, and thereby to develop or contribute to generalizable knowledge (expressed, for example, in theories, principles, and statements of relationships).

बरोबर. समजा, हायपोथीसीस असा आहे की क्ष पद्धतीचे लोक ---- याचा विचार करत नाहीत ते का, म्हणून "य" ला प्रश्न विचारला, त्याने/तिने दिलेल्या उत्तरावर "क्ष" पद्धतीच्या लोकांना ---- या पद्धतीचा विचार करायचाच नसतो कारण .... असे निष्कर्ष य च्या नावासहित प्रसिद्ध केले गेले. तर ह्या उदाहरणात जनरलायझेशन आहे का? येथे इंटरव्हेन्शनचा हेतूही असेल.
(या पद्धतीच्या संशोधनासाठी फॉर्मल प्रोसेस असेलच असे नाही, समोर थोडीफार सामग्री आहे आणि इच्छा आहे.).

---
क्ष विषयात पुरावा दाखवला नाही तर समोरची व्यक्ती अपूर्ण माहितीमुळे चुकीचा निर्णय घेऊ शकते, असे आपल्याला वाटले. मात्र पुरावा बघितल्यामुळे त्यांना मानसिक दु:ख होणार असेल. तर काय घ्या? त्यांना माहिती दिली तरी अनैतिक, आणि माहिती दिली नाही तरी अनैतिक! त्यापेक्षा हे बरे की "रिस्पेक्ट"चे भलतेच अर्थ काढू नयेत.

रिस्पेक्टचा मी भलता अर्थ काढला असे का वाटते आहे, कळले नाही. रिस्पेक्ट म्हणजे कोणाचा मान राखून बोलणेच टाळणे असा नव्हे. हाती आलेली माहिती लपवणे असे नव्हे. तर ती माहितीबद्दल काही पूर्वकल्पना देऊन, ऐकण्याची तयारी असली तर वेळप्रसंग बघून बोलणे, शब्द कळीचे, समजतील असे वापरणे, माहिती योग्य शब्दांत किंवा कॉन्फिडेन्शियली देणे. इ..इ. असा साधाच मी घेते. अनुभवाने हे जमत असावे.

परत, येथे हे सर्व धोरण जसेच्या तसे लागू करायलाच हवे असे मी म्हटलेले नाही. बेलमॉन्ट रिपोर्ट स्क्रिप्चर /गॉस्पेल माना असे मी कधी म्हटले? मी ते मार्गदर्शक ठरेल का, एवढेच विचारले आहे. मुळात या सर्वाला संशोधन समजण्यास नकार आहे. आणि म्हणून बेलमॉन्ट रिपोर्ट नि:संदर्भ आहे असे म्हणणे आहे असे दिसते आहे. म्हणून जसेच्या तसे ऍप्लिकेशन करणे नाकारले तरी, बेलमॉन्ट रिपोर्ट किंवा काही सूत्रे यातील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरतील का हा प्रश्न राहतोच. त्यात वर दिलेले तीनही मुद्दे लक्षात घेण्यासारखे असावेत, असे मला वाटते.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

नमनाला घडाभर तेल

ताकाला जाऊन मांजर पिशवीत ठेवू नये.
मला खात्री वाटते की वसुलि यांच्याकडून तुम्हाला "हू केअर्स" असे काही वदवून घ्यायचे असेल तर तेही काहीही खळखळ करणार नाहीत. उगीच फुटेज का खाता?

लायबेल, प्रायव्हसी, संधोधन यांच्यात गोंधळ

शेजारणीने "धनंजय अपरात्री मसाला कुटतो" असे वर्तमानपत्रात दिल्यास वाईट वाटेल, पण त्याचा संशोधनाशी काही संबंध नाही. त्याला न्यूझ व्हॅल्यू असेल तर वर्तमानपत्र छापेलही.

मागे थेऊरमधल्या एका फार्महाऊसमध्ये कॉलेजमधली मुले धिंगाणा घालत होती अशी बातमी "सकाळ" वर्तमानपत्रात छापून आली होती. ( उपक्रम स्थळावर चर्चा झाली होती, असे आठवते.) ती बातमी वर्तमानपत्राला कोणीतरी दिली, आणि त्याला न्यूझ व्हॅल्यू आहे, म्हणून "सकाळ" वर्तमानपत्राने छापली. (नावे होती की नाही ते आठवत नाही. अशा बातम्यांमध्ये कधीकधी नावेसुद्धा असतात.)

मग येथे किंवा अन्य संकेतस्थळावर चर्चा झाली की (क्षसारखे) परप्रांतीय लोक धिंगाणा घालतात. इथे सामान्यीकरण करण्यात आले. वाईट वाटते. पण त्याचा रिसर्च एथिक्सशी काही संबंध नाही. सामान्यीकरण वादग्रस्त होते. इतकेच.

कॉन्फिडेन्शियॅलिटी : हा मुद्दा मी अगदी पहिल्या प्रतिसादापासून सांगितलेला आहे. व्यक्तीनेच आपली माहिती प्रसिद्ध केली असेल, तर प्रसिद्धीस अनुमती दिलेली आहे, हे अध्याहृत आहे. तुम्ही दिलेल्या वाक्यात हे स्पष्टच आहे :
Confidentiality should be guaranteed, unless the respondent explicitly agrees to disclosure.
"इफ रिस्पॉन्डंट हॅझ एक्स्प्लिसिटली डिस्क्लोझ्ड हिमसेल्फ" असे वेगळे पुन्हा लिहायची गरज आहे काय?

माझ्या शेजारणीपर्यंत मीच कुटायचा आवाज पोचवला - तिने आपणहोऊन येऊन मला "तू आवाज करतोस का?" असे गोपनीयतेसह विचारले नाही. गोपनीयता पाळायचे तिच्यावर कुठलेही बंधन नाही. (असा भांडकुदळपणा तिने केला नाही. प्लीज-सॉरी वगैरे म्हणाली. ती माझ्याशी मवाळपणे वागली, तर मी तिच्याशी मवाळपणे वागेन... धोरण काही का असेना.)

अननुभवी व्यक्तीने केलेल्या सर्जरीला प्रॅक्टिस म्हणता येणार नाही, ते कायद्याला धरून नाही.

आणि रीसर्चही म्हणता येणार नाही. मी वेगळ्या प्रतिसादात दिलेले उद्धरण वाचले ना? ("केवळ नाविन्य म्हणून रीसर्च नव्हे"...)
- - -

समजा, हायपोथीसीस असा आहे की क्ष पद्धतीचे लोक ---- याचा विचार करत नाहीत ते का, म्हणून "य" ला प्रश्न विचारला, त्याने/तिने दिलेल्या उत्तरावर "क्ष" पद्धतीच्या लोकांना ---- या पद्धतीचा विचार करायचाच नसतो कारण .... असे निष्कर्ष य च्या नावासहित प्रसिद्ध केले गेले. तर ह्या उदाहरणात जनरलायझेशन आहे का? येथे इंटरव्हेन्शनचा हेतूही असेल.
(या पद्धतीच्या संशोधनासाठी फॉर्मल प्रोसेस असेलच असे नाही, समोर थोडीफार सामग्री आहे आणि इच्छा आहे.).

"समोर थोडीफार सामग्री आहे" ती पब्लिक डोमेनमधले आहे काय? खाजगीत मिळवलेल्या गौप्याचा स्फोट अनैतिक आहे, हे समजण्यासाठी रिसर्च एथिक्स बघावे लागत नाही. सामान्य एथिक्स पुरतात. आणि पब्लिक डोमेनमधील माहितीबद्दल काय? क्षचे वागणे हे नावासहित आधीच प्रसिद्ध असते. "क्ष पद्धतीच्या लोकांना" हे सामान्यीकरण करण्यासाठी "क्ष"ची अनुमती अपेक्षित नाही, आणि अन्य लोकांची अनुमती अपेक्षित नाही. इंटरव्हेन्शन करायची इच्छा असली तर असेल. "क्ष"वर बळजबरी केली तर गुन्हा आहे. सामान्य गुन्हा आहे. रीसर्च एथिक्सचा द्राविडी प्राणायाम का करावा? "क्ष"वर बळजबरी होत नसेल, तर अशी इच्छा असण्याचे काही विशेष नाही. नको असेल तर क्ष "नको" म्हणेल. "नको" म्हटल्यानंतरही कोणी "बदल रे" म्हणत वैयक्तिक त्रास देत राहिले, तर "रिस्ट्र्निंग ऑर्डर", पोलिस-कारवाई वगैरे करता येते. "अशा प्रकारच्या लोकांनी बदलावे" अशा प्रकारचे लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध करत राहिले तर काही अनैतिक नाही, आणि बेकायदेशीरही नाही.

- - -
सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना
ठीक. माझ्या मते रिसर्च एथिक्स ऐवजी सोशल एथिक्स वापरणे अधिक सोपे. गेली हजार वर्षे सामाजिक चळवळी करणार्‍यांनी थेट अशा कामाकरिता लागू असलेली नैतिक मूल्ये सांगितलेली आहेत.
आजकाल येथे एका संकेतस्थळावर अनिकेत आमटे यांनी काही लेख लिहिले. हे जर प्रकाश/बाबा आमटे यांचे नातेवाईक असतील, तर त्या संस्थेच्या लोकांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य बर्‍यापैकी सुप्रसिद्ध आहे. त्यांनी संकेतस्थळ वगैरे प्रसिद्ध केले आहे, तर उदाहरणादाखल त्यांचे नाव वापरायची अनुमती अध्याहृत आहे. अनिकेत आमटे लिहितात :

...जन जागृती ही केलीच पाहिजे....गावा-गावात जाऊन, झोपडपट्टी मध्ये जाऊन, आदिवासी पाड्यात जाऊन...लोकांना शिक्षण घ्यायला भाग पडावे लागेल....म्हणजेच तो आयुष्यात चांगला मार्ग स्वीकारेल...अन्यायाला वाचा फोडू शकेल....हे सर्व आपल्या सारख्या सामान्य माणसाने एकत्र येऊन करण्याचे काम आहे...

वगैरे, वगैरे. सामाजिक कार्याचे प्रॅक्टिशनर म्हणून तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. कुटुंब बर्‍यापैकी निगर्वी असावे असे त्यांच्या लेखनावरून वाटते. समाजकार्याबाबत त्यांना प्रशिक्षणाची गरज असल्यास नक्की मान्य करतील. किंवा जर आधीच प्रशिक्षण प्राप्त केले असेल, तर कुठे मिळते, त्याबद्दल माहिती देतील. किंवा ते कार्य करण्यापूर्वी काय नैतिक विचार करतात, याबद्दल सांगू शकतील. तो नैतिक विचार रिसर्च एथिक्सशी मिळता-जुळता आहे, की वेगळाच आहे? याबद्दल आपल्याला कल्पना येईल. पण तोवर येथे सांगा - वरील सामान्यीकृत निष्कर्ष काढण्यापूर्वी त्यांनी कोणाकोणाची अनुमती घ्यायला हवी होती? सर्व आदिवासींची? आपणासारख्या [?बिगरआदिवासी?] सर्व सामान्यांची? सर्वांची?

श्री. आमटे यांच्याशी वैयक्तिक संवाद होऊ शकत नाही तर डॉ. अभय बंग यांचे लेखन-भाषण-वेबसाईट वगैरे तपासता येईल. त्यांची संस्था आहे "सोसायटी फॉर एज्युकेशन, ऍक्शन अँड रीसर्च इन् कम्यूनिटी हेल्थ." एज्युकेशन, ऍक्शन आणि रिसर्च या तिन्ही गोष्टींमध्ये फरक असतो, हे त्यांच्या संस्था-वर्णनामधून लक्षात येऊ शकेल. इथे व्यक्ती ऍक्शन आणि रिसर्च दोन्ही बाबतीत कार्यरत असल्यामुळे "रिसर्च कळत नाही, फक्त ऍक्शन कळते" असे होणार नाही.

(वाटल्यास त्यांना असेसुद्धा विचारता येईल, की त्यांच्या संस्थेच्या नावातले "रीसर्च" असे एकच खरे आहे, की खरोखर ऍक्शन आणि रीसर्चमध्ये काही फरक आहे? तुम्ही पुन्हापुन्हा पटवण्याचा प्रयत्न करीत आहात की समाजकार्य हे संशोधन असते. आणि समाजकार्य+रीसर्च दोन्ही करणारी जितकी काय उदाहरणे माझ्या डोळ्यासमोर येतात, ते लोक दोन्हींना एकच मानत नाहीत.)

- - -
सामाजिक कार्याला नैतिकचे बंधन असते. असतेच. पण ते रीसर्चच्या कप्प्यात का घालत आहात? त्यामुळे काय साधते, हे मला कळत नाही.

लोकशाहीच्या नैतिकतेबाबत पुष्कळ विचार झालेला आहे. लोकशाहीत आपण एकमेकांची मते बदलून सामान्यीकृत कायदे, वैयक्तिक वर्तने बदलायचा प्रयत्न करत असतो. "समसमान मनुष्यांचे एकमेकांच्या समाजातले कार्य" यासाठी "लोकशाही" ही नैतिक चौकट अधिक तंतोतंत आहे. ती तंतोतंत नैतिक चर्चा इतकी काय तोकडी पडलेली आहे, की "संशोधन" शब्दाची व्याप्ती वाढवण्याची वेळ आली.

ठीक!

हल्ली धनंजय यांच्याकडे ग्रॅड स्टुडंट जास्त झालेले दिसतात, म्हणून मलाही त्या कॅटेगरीत घातलेले दिसते. हे वाच, आणि त्याच्याशी चर्चा कर.

सामाजिक कार्याला नैतिकचे बंधन असते. असतेच. पण ते रीसर्चच्या कप्प्यात का घालत आहात? त्यामुळे काय साधते, हे मला कळत नाही.
रीसर्चच्या कप्प्यात नाही. मी तुलना होऊ शकते असे म्हटले आहे. आणि धोरण स्वीकारा असे म्हटलेले नाही. ते स्वीकारता येईल का, असे विचारले आहे.
नसल्यास नाही असे म्हणा. मला चालेल. तुम्हाला माझे म्हणणे पटवू शकले नाही, याचा अर्थ माझ्या पटवून देण्याच्या पद्धतीत किंवा गृहितकात काही चूक असण्याची शक्यता मी विचारात घेतली पाहिजे.

हलकेच घेतलेले आहे पण असमान संबंध अमान्य

हलकेच घेतलेले आहे.

पण असमान संबंध अमान्य आहे. "हे वाचा, त्याच्याशी चर्चा करा" हे समसमान लोक एकमेकांना सांगू शकतात.

"स्वीकारा किंवा स्वीकारू नका" अशी ही बाब नाही. मी स्वीकारले नाही, पण अन्य कोणी स्वीकारले, तर "धनंजय अनैतिक वर्तणूक करतो" अशी सिद्धता त्यातून त्या स्वीकारकर्त्यासाठी आपोआप निघते.

(धनंजय अनैतिक वर्तणूक करतही असेल म्हणा. [१] माझी अशी साक्ष आहे की "अनैतिक वर्तणूक नाही करत", पण अर्थात हे मी खोटेही सांगत असेन + [२] वरील नैतिक विवेचनातून हे सिद्ध होतही नाही, आणि हे तो तिर्‍हाईत स्वतःहून तपासून घेऊ शकतो.)

त्या तिर्‍हाइत वाचकासाठी ही बाब सांगणे आवश्यक आहे, की वरील नैतिक विवेचन अस्वीकारार्ह आहे.

ठीक

एक खुलासा करते - मी प्रस्तावात नैतिक/अनैतिक असे काहीही म्हटले नव्हते. असा उद्देशही नव्हता. मी "सैलसर " अर्थाने मार्गदर्शन म्हटले होते. शिकता येईल का, काही घेता येईल का, असे विचारले होते.

सैलसर

तुमचा सगळाच प्रकार सैलसर आहे. धनंजय मागत आहेत तसे एकही ठोस उदाहरण तुम्ही देऊ शकला नाहीत. चर्चाप्रस्तावाचा उद्देश कळला नाही.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdooक्ष्

समजले नाही

वैद्यकिय संशोधनात मानवी जिवांना इजा पोहचवल्याची ट्स्केजी किंवा न्युरेंबर्ग सारखी उदाहरणे ज्ञात असल्याने 'human subjects protection' हा प्रकार संशोधनात अस्तित्वात आला. लोकहिताच्या कामामधे मानवी जिवांना इजा पोहचल्याची अशी ठळक उदाहरणे देता येतील का? मूळात इजा पोहचवणे हे 'हित' होऊ शकत नाही त्यामुळे अशी कृत्ये लोकहितवादी नाहीत.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo

उदाहरणे

हा वैद्यकीय क्षेत्रापेक्षा सामाजिक क्षेत्राशी संबंधित प्रश्न आहे.
त्याच पद्धतीच्या (सोशल आणि बिहेविअरल सायन्सेस) मधील इजांचे प्रकार भाषांतरित केले आहेत. मानसिक/भावनिक इजा आणि स्टिग्मा/कलंक लागल्याची भावना यामुळे आलेले डिप्रेशन असे प्रकार वर्णन केले आहेत असे दिसते. हे संभाव्य इजांचे प्रकार आहेत. त्या इजा होत असतील का? इजा हे हित धरले नसून, इंटरव्हेन्शन करण्याची इच्छा हे हितकारक आहे असे धरले आहे. त्यातून इजा झाली तर ती संभाव्यता आहे, आणि ती टा़ळण्यासाठी काही उपाय असतील का याबद्दल प्रश्न होते.

फरक

काही कारणाने जुने धागे उचकताना येथे पोहोचलो तेव्हा एक मुद्दा नव्या प्रकारे सुचवावासा वाटला:

मुळात, हक्क, कर्तव्ये कशी ठरविली गेली? तर, गेम थिअरीने! कारण, प्रत्येकाने विचार केला की मी आज कोणाला त्रास दिला तर उद्या मला त्रास झाला तर मी दाद मागू शकणार नाही, "डू अन्टू अदर्स...", इ.
समजा एका समूहात दोन प्रकारच्या व्यक्ती आहेतः क आणि ख. 'क' गटाच्या व्यक्ती 'ख' गटाच्या व्यक्तींना त्रास देऊ शकतात पण 'ख' गटाच्या व्यक्तीही केवळ 'ख' गटाच्या इतरांनाच त्रास देऊ शकतात. अशा समाजात, त्रास देण्याविरुद्ध नियम येणारच नाहीत. जोवर 'क' गटातील व्यक्तींना 'ख' बनण्याचा धोका नसेल तोवर ती पेकिंग ऑर्डर टिकून राहील. त्याचप्रमाणे, आजच्या समाजात, प्रश्न विचारण्याविरुद्ध नियम येऊच शकत नाहीत.

 
^ वर