बामणोली आणि कासचे पठार
कालच बामणोली आणि कासच्या पठारावर जाऊन आलो.
बामणोली हे ठिकाण सातारा शहरापासून ३४ कि.मि. वर असलेले एक गाव. कोयनाधरणाचे पाणी (बॅकवॉटर) इथपर्यंत येते. अतिशय विस्तीर्ण जलाशयाच्या शेवटचे दर्या डोंगरातले एक गाव. गावातून सरोवराकाठी असणार्या अनेक गावात बोट सेवा चालते. या भागातली गावे सोडल्यास सर्व भाग वनखात्याचा भाग म्हणून येत असावा. विरळ लोकवस्ती, प्रवाशांसाठी राहण्याजेवणाची फारशी सोय नसलेला भाग.
कासपठार हे फुलांच्या मोसमासाठी प्रसिद्ध. हे सातार्यापासून ८ कि. मि. ते २२ किमि. भागात येते. ऑगस्ट सप्टेंबर हे इथले फुलांचे दिवस. (नुकतेच डॉ. शंतनू अभ्यंकरांचे अनुवादित कासपठारावरचे पुस्तक प्रसिद्ध झाले. पण अजून हाती लागले नाही.) यावर्षी पाऊस जरा लांबला म्हणून म्हणावी तेवढी फुले आली नव्हती असे स्थानिक सांगतात.
आम्हाला काही फुले पहायला मिळाली, धुके, दर्यातील सरोवरे (बरीच धरणे आणि त्यांची सरोवरे), हिरवळ, डोंगर, धबधबे, सुंदर हवा यात आमचे दोन दिवस मजेत गेले. काही चित्रे काढता आली आणि खूप छायाचित्रे मिळाली.
भोपळ्याची कळी
धुक्यातली फांदी
गुराखी १
गुराखी २
कासची फुले १
कासची फुले २
फांदी आणि रस्ता
अधिक चित्रांसाठी हे बघु शकता.
Comments
कास पठारावर फुलं फुललीयत...
मित्रहो,
आधीचा प्रतिसाद संपादित केलाय कारण निसर्ग त्याच्या वेळापत्रकानुसार चालतो. कास पठारावर सध्या फुलं फुललीयत आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स अवतरलंय. पावसाचीही उघडीप आहे.
निसर्गाची काळजी घेऊन मजा करा.
फोटो
गुराखी १
गुराखी २
भोपळा कळी
फांदी
फुले
पूर्ण लिंक
प्रमोद
उपक्रमवर फोटो कै दिसेनात राव :(
दुव्यावरुन फोटो पाहता आलेत. धन्यवाद...
गुरे राखणारा म्हातारा,फुलावर बसलेला मुंगळा,मोठ्या वृक्षाखाली असलेले घर, वेगवेगळ्या रंगाची फुले खूप् सुंदर छायाचित्रे.
-दिलीप बिरुटे
धन्यवाद
छायाचित्रे बघून आणि योगप्रभूंचा प्रतिसाद वाचून बामणोली आणि कासला जायलाच हवे असे वाटते आहे. परिसराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. कुठे थांबायचे तेही सांगा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
धुक्यातली फांदी
धुक्यातली फांदी विशेष आवडली.
भोपळ्याचे फूल पिवळे म्हणजे लाल भोपळा असावा. दुधी भोपळ्याचे फूल शुभ्र पांढरे असते. इटलीत या फुलाची भजी बनवतात म्हणे.
फुले छान दिसत आहेत
फुले छान दिसत आहेत.
छोटीछोटी रंगीबेरंगी फुले घाणेरीची वाटतात. जांभळी फुले गोकर्णाच्या चुलत-जातीतली असावीत.
(वासरासह गुराखी छानच. पायवाट चढणार्या गुराख्याचे चित्र कातरून उजवीकडचा अतिरिक्त झुडुपांचा भाग काढून टाकला असता, तर चित्र अधिक आवडले असते. शेवाळ्याने लदलेली फांदी आवडली. शेवटच्या गाडी+फांदी चित्रात मात्र कथानक कळत नाही किंवा पटत नाही.)
फुलं हवीत् फुलं...
कासची फुले १ = लँटाना म्हणजे घाणेरी.
दुसर्याचं नांव हवंय!
राहण्याची सोय
काढलेली छायाचित्रे का दिसत नव्हती (माझीच काही चूक असावी) हे मला कळले नाही. आता दिसू लागण्यात ज्यांचा हातभार आहे त्यांना धन्यवाद.
कास पठारावर जायचे असेल तर सर्वात सोयीचे ठिकाण म्हणजे सातारा शहर. शहरात राहण्याची सोय होऊ शकते. कास पठारावर जाण्यासाठी स्वतःचे वाहन पाहिजे. दुचाकी (मोटरसायकल) चालेल. परिसर मोठा असल्याने हवे तिथे थांबता आले पाहिजे. एस्.टी जाते पण काय पहाल यावर मोठी मर्यादा येऊ शकते.
या परिसरात चहा, बिस्किटे वगैरेची सोय आहे. पण जेवणाची फारशी नाही. कुणाच्या गळी पडून करून घेतले तर गोष्ट वेगळी. त्यामुळे जाताना जेवणाचा डबा बरोबर घ्यायला हवा.
बामणोली सातार्यापासून ३४ किमि. वर आहे. आमची राहायची सोय बामणोलीला झाली. काही ठिकाणी देवळे दिसली जिकडे कदाचित पथारी पसरता येईल. बामणोलीला जेवायची सोय आहे. इतर दुकाने पण आहेत. बामणोलीहून बोटीने इतर गावांना जाता येते. (वीस मिनिट प्रवास) तेथील एका गावात राहायची सोय आहे हे कळले (पण आम्ही गेलो नव्हतो.)
तुम्ही पुण्यात/सातार्यात वा आसपास राहत असाल तर कदाचित पहाटे प्रवासाला सुरुवात करून (पुणे सातारा ११० किमि. वेळ २ तास रस्ता वेगवान) रात्री परतू शकता. अनुभवी लोकांनी सांगितले होते की रविवार टाळा (गर्दी होऊ शकते.)
घाणेरी, तेरडा, गुलबक्षी (सम) या सोबत शेतातला तीळ (पिवळी फुले), गवतातली जांभळी, लाल, पिवळी आणि पांढरी फुले पहायला मिळाली. यातली जांभळी फुले करंगळीच्याहून लहान पण बहारदार वाटली. (अधिक छायाचित्रे पहा) पांढर्या आणि पिवळ्या फुलांचे ताटवे दिसावे एवढी जास्त होती. आदल्या दिवशी आम्हाला ती फारशी जाणवली नाहीत (दिवस वर आल्याने). मात्र दुसर्या दिवशी ती विशेषकरून दिसली.
प्रमोद