दलित अत्याचार आणि प्रसारमाध्यमे.

पाण्यासाठी दलितांना जाळणे/मारणे अशा घटना भारतात घडतच असतात. महाराष्ट्र त्याला अपवाद नाही. महाराष्ट्र पुरोगामी असल्यामुळे या घटना तुरळक प्रमाणात घडतात.
सातारा जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. आणि ती बातमी मला www.chennaionline.com या संकेतस्थळावर वाचायला मीळाली. इतर ठीकाणी या घटनेचा उल्लेख आहे की नाही हे कळायला मार्ग नाही. मात्र या घटनेने काही प्रश्न निर्माण केले.

१. अशा घटनांना प्रसिध्दी का मीळत नाही?
२. अशा घटना वृत्रपत्रांच्या/प्रसारमाध्यमांच्या दृष्टीने किती महत्वाच्या असाव्यात/आहेत?
३. या प्रकारच्या घटनांना प्रसिध्दी द्यावी की नको? आणि का?

http://www.chennaionline.com/colnews/newsitem.asp?NEWSID=%7B205348B9-E9D...

Comments

बगल मे त्रिशुल आणि शासनाची भुमिका

येथे टिचकी मारा
आपला
कॉ.विकि

आणखी एक

सोलापूर मध्ये घडलेली घटना.

उत्तरे

१. प्रसारमाध्यमांचा उद्देश जास्तीत जास्त नफा कमावणे हा असल्याने, ज्या बातम्या प्रेक्षकांना आवडतात, आवडतील त्या ते दाखवतात. शिवाय, प्रसिद्धी मिळाल्यानंतरही शक्यता अशी की राजकीय लाभासाठी घटनांचे भांडवल केले जाईल, अमक्या गटाने तमक्या गटाला त्रास दिला म्हणून तमका गट अमक्या गटाला दुसर्‍या ठिकाणी त्रास दिला.
२. उत्तर वरील प्रमाणेच. घटनांबाबत जनजागृती झाली, दोषी लोकांना गुन्हेगार म्हणून पाहिले, त्यांचे सामाजिक मूल्य कमी केले तर फायदा होईल असेही वाटते.
३. योग्य प्रमाणात प्रसिद्धी द्यावी. पीडितांना मदत मिळावी. व अशी कुप्रसिद्धी हीच त्रास देणार्‍यांना शिक्षा व्हावी.
--
मला वाटते, दुर्बल घटकांची पीळवणूक होणे थांबवता येण्यासारखे नाही. त्यांना सबल करणे हाच एक उपाय आहे.
--
तेलातून पैसे ही बातमी नीट वाचता आली नाही. मुलगा बौद्ध होता म्हणून असे झाले का?

प्रसार माध्यमे

प्रसार माध्यमांचे मूळ उद्देशापासून वरील कारणांसाठी दूर जाणे ह्यावर 'नोआम चॉम्स्की' ह्यांचे उत्कृष्ट विवेचन असलेले 'मॅनुफॅक्चरींग कन्सेंट' हे पुस्तक जरूर वाचावे.

- वरूण
---------------------------------------------------------------------------------------------------------
मराठी संकेथळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे मी समर्थन करतो.

 
^ वर