सप्टेंबर २०१० चे अंदाज !

सप्टेंबर २०१० मध्ये मराठी संकेतस्थळांवर खालील गोष्टींची चर्चा घडून येईल असे मला वाटते.

१. बाबरी मस्जिद
२. ब्लॅकबेरी आणि भारत सरकार.
३. राष्ट्रकूल स्पर्धा
४. पाक क्रिकेटपटू आणी बेटिंग
५. गणेशोत्सव
६. काही सदस्य १/२ वर्षांपूर्वीच्या धाग्याचा संदर्भ देऊन चर्चा करतील.
७. कसाब आणी मुंबईवरील हल्ला.
८. ग्राऊंड झीरोवरील मस्जिद

बघूया आमचे अंदाज किती खरे ठरते ते.

Comments

आधार

यासाठी आपण फ्यूचरॉलॉजी चा आधार घेतला कि अंतस्फुर्तीचा! कदाचित उपक्रमाची कुंडली मांडली असावी. समजा वरील ८ पैकी विषयावर उपचर्चा वा उपउप चर्चा झाली व ५०% पेक्षा अधिक अंदाज खरे ठरले तरी आपल्याला दखलपात्र ठरवावे लागेल.
प्रकाश घाटपांडे

आधार

प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे.

माझा अंदाज

वरीलपैकी क्र. २,३,५
शिवायः पाऊस आणि त्या अनुषंगाने येणारे इतर विषय जसे पाणी कपात, खड्डे, पूर, निसर्गसौंदर्य इत्यादी.

||वाछितो विजयी होईबा||

हा एक विषय - स्वच्छता गृह भाग - २

स्वच्छता गृह भाग - २ - मराठी ऑनलाईन स्वच्छतागृहांची यादी :)


श्रद्धावान विरुद्ध अश्रद्ध

या चर्चा विसरलात. की वरीलपैकीच काही चर्चा त्या दिशेने जातील असा तुमचा कयास आहे?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

हो

२. ब्लॅकबेरी आणि भारत सरकार.
३. राष्ट्रकूल स्पर्धा
हे अपवाद वगळले तर बाकी सारेच विषय त्या दिशेने जाऊ शकतात.

या चर्चा विसरलात.

रेफर टु मुद्दा नं ५ आणी ६

कोणते विषय येतील यावर

बेटिंग करायचे असेल तर तुमच्याशी संपर्क केला तर चालेल का?
जे बेटिंग घेतले असेल त्यानुसार फिक्सिंग करून देऊ.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

बेटिंग करायचे असेल तर

आपण फारच उदार आणी स्पष्टवक्ते आहात. (आणी जोतिषी सुद्धा)

ठणठणपाळ

ठणठणपाळ जे ठरवतील तेच होईल.

५. गणेशोत्सव

या विषयावर लवकरात लवकर चर्चा करुन सार्वजनिक गणेशोत्सव कायमचा बंद करण्याची व्यवस्था करावी असे मला वाटते.

(त्रस्त) गणपती बाप्पा

मोरया!!

सक्काळी सक्काळी साक्षात गणपती बाप्पांची वाणी वाचण्यास मिळाली. :-) उपक्रमावर स्वागत बाप्पा!! ;-)

:)

ATT00012

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
रोबो नि अगिविनयो, चिट्टि नि वुयथिनयो, मिनसारम वुडलिल रत्तम, नवीन उळगतिल अरविल अधसियम
वायवुंड अनार वयनिल्लय, पेचीवुंड मूचियिल्लय, नाडीवुंड इरथियम इल्लय, गोवर्धन मुंड थिमिर इल्लय

 
^ वर