400 वर्षे निद्रिस्त ज्वालामुखीचा उद्रेक

इंडोनेशिया या देशाला प्रशान्त महासागराचा अग्नीपरिघ (Rim of Fire) म्हटले जाते कारण एखाद्या हॉकी स्टिकच्या आकाराच्या व हजारावर बेटांनी मिळून बसलेल्या या देशात, एका वक्र रेषेवर, अनेक जागृत व निद्रिस्त ज्वालामुखीं आहेत. एखाद्या ज्वालामुखींची जागृती ही घटना, इंडोनेशिया साठी काही फार असामान्य घटना नाही तरीही 29 ऑगस्टच्या सकाळी सुमात्रा बेटाच्या उत्तरेस असलेल्या मेदान या शहराच्या जवळ असलेल्या सिनाबुन्ग या ज्वालामुखीचा उद्रेक ही एक चिंताजनक बाब आहे असे मत Indonesian Center for Volcanology and Geological Disaster Mitigation या संस्थेचे प्रमुख मिस्टर . सुरोनो यांनी व्यक्त केले आहे.
एखादे विमान डोक्यावरून जात असताना जसे आवाज येतात त्याच पद्धतीचे आवाज या ज्वालामुखीजवळ राहणार्‍या खेडूतांनी ऐकले. यानंतर एक मोठा स्फोट झाला व 1500 मीट्रर उंचीपर्यंत राख, वाळू व पाण्याची वाफ या ज्वालामुखीने बाहेर फेकली. त्यानंतर या डोंगराच्या टोकावर त्यांना ज्वाला व लाव्हा रस वहाताना दिसू लागला. सुमात्रा शासनाने 12000 पेक्षा जास्त खेडूतांना त्वरित त्यांच्या खेड्यातून हलवले असून त्यांना मास्क दिले आहेत. ज्वालामुखीच्या भोवतीच्या 6 किलोमीटरच्या परिघात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. खेडूतांच्या निवेदनाप्रमाणे 30 किलोमीटर अंतरापर्यंतच्या शेतांच्यावर या ज्वालामुखीने फेकलेली राख पडली आहे व त्यामुळे या शेतात असलेला भाजीपाला संपूर्ण नष्ट झाला आहे.
या ज्वालामुखीचा उद्रेक दोन कारणांसाठी चिंताजनक आहे. पहिले कारण म्हणजे सुमारे 400 वर्षांनंतर या ज्वालामुखीचा उद्रेक कोणतीही पूर्वसूचना न देता झाला आहे. काल झालेला उद्रेक जरी फारसा हानीकारक नसला तरी या विषयातील तज्ञांच्या मताप्रमाणे या ज्वालामुखीने काल बाहेर फेकलेली राख व लाव्हा हा त्याच्या पोटातून आलेला नसून चोंदलेले नाक साफ करावे तशी फक्त त्याच्या बाह्य भागात साठून राहिलेली राख असू शकते. या ज्वालामुखीबद्दल पूर्वीची काहीच माहिती नसल्याने, यानंतर तो काय करेल हे सांगणे मोठे अवघड आहे. कदाचित यानंतर मोठे उद्रेक होण्याची शक्यता आहेच.
यापेक्षा सर्वात मोठी काळजी तज्ञांना या ज्वालामुखीच्या स्थानामुळे वाटते आहे. हा ज्वालामुखी मानवाला ज्ञात असलेल्या सर्वात विशाल अशा टोबा ज्वालामुखीच्या विवरात तयार झालेल्या जलाशयापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. असे मानले जाते की 73000 वर्षांपूवी झालेल्या टोबा ज्वालामुखाच्या स्फोटात जवळ जवळ सर्व मानवजात नष्ट झाली होती. भारतीय उपखंडातले तर सर्व सजीव नष्ट झाले होते.
टोबाच्या सानिध्यात असलेल्या या सिनाबुन्ग ज्वालामुखीच्या उद्रेकाला, म्हणूनच गंभीरतेने घेतले जात आहे. भारताच्या दृष्टीने तर हा अस्तित्वाचा सुद्धा प्रश्न असू शकतो. हा ज्वालामुखी पुढे काय करणार आहे का गप्प बसून राहणार आहे हे फक्त काल सांगू शकेल.
30 ऑगस्ट 2010

या ज्वालामुखीचे स्थान व इतर फोटो माझ्या ब्लॉगवर बघता येतील.

लेखनविषय: दुवे:

Comments

विमानसेवा

ऑस्ट्रेलियाला जाणारी विमानसेवा धोक्यात येईल असे वाटते आहे.

अरे

अरे अस्से होय? मला वाटले भारतीयांबद्दल काहीतरी माहिती आहे :)
येथे जी माहिती दिली आहे त्यावरुन चिंताजनक प्रकार आहे असे वाटते आहे. गंमत हि वाटते कि भारतीयांना पुराचे व्यवस्थापन ढिसाळ असल्याने पुराचा सामना करावा लागतो. नाहीतर कधीतरीच एखादी त्सुनामी अथवा भुकंप अनुभवावा लागतो. ज्या देशात ज्वालामुखींची जागृती ही घटना, काही फार असामान्य घटना नाही असे ठिकाण भारतात असते तर भारतीयांचे काय झाले असते?






ह्म्म्म्

२००५ मधील पूरपरिस्थितीला भारतातल्या यंत्रणांनी दिलेला प्रतिसाद त्याचवर्षी अमेरिकेत आलेल्या कॅतरीना वादळाला अमेरिकन यंत्रणांनी दिलेल्या प्रतिसादापेक्षा चांगला असल्याचे वाचले होते. (आत्ता दुवा सापडला नाही)

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

तसे तर

तसे तर भारतीय कोणत्याही नैसर्गिक संकटाला अमेरिकन नागरीकांपेक्षा जास्त धीराने सामोरे जातात. (दुसरा पर्याय तरी कुठे आहे?) हा आता ब्रिटीश, आफ्रिकन, चीनी, जपानी, जर्मन, फ्रेंच, इत्यादी यंत्रणांबद्दल तुलना नाही कारण माझ्याकडे दुवे देण्याची इच्छा नाही.






कारण

२००५ मधील पूरपरिस्थितीला भारतातल्या यंत्रणांनी दिलेला प्रतिसाद त्याचवर्षी अमेरिकेत आलेल्या कॅतरीना वादळाला अमेरिकन यंत्रणांनी दिलेल्या प्रतिसादापेक्षा चांगला असल्याचे वाचले होते.

त्याचे कारण कत्रिनावादळ झालेल्या लुइजियाना प्रांताचा गव्हर्नर हा (मुळचा) भारतीय आहे. ;)

असो. जोक अपार्ट - आपल्या विधानात तथ्य नक्की आहे. तसे (कत्रिनाच्या वेळेस) का झाले वगैरे याची अनेक कारणे आणि "राज"कारणे आहेत. पण त्यातून करेक्टीव्ह ऍक्शन्स नक्कीच घेत आहेत असे वाटते. ते जर आपल्याकडे नंतर झाले असले तर आधी चूक झाली ती विसरून जायला हवी.

लवकर जागा व्हावा

भारताच्या दृष्टीने तर हा अस्तित्वाचा सुद्धा प्रश्न असू शकतो. असे असेल तर हा ज्वालामुखी लवकरात लवकर जागा व्हावा अशी प्रार्थना राष्ट्रकुल खेळ स्पर्धा 2010 आयोजन समिती आणि कलमाडी गन्ग करत आहे .या मुळे या ज्वालामुखीच्या राखे खाली सर्व भ्रष्ट्राचार दडपला जाईल असे आमच्या खास प्रतिनिधीने कळवले आहे.मै भ्रष्ट्राचारी common wealth 2010 tv देखते जायींये

सध्या काय परिस्थिती आहे?

पुन्हा एकदा स्फोट? की तूर्तास थांबला आहे?

तेथील विमानसेवा खंडीत झाली आहे का?

म.टा.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6465258.cms

ह्यांना दशक व शतक ह्यातील फरक माहित नाही वाटतं ;)

राज जैन
*********
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

चालायचेच

कदाचित म.टा. ला एक शतक एका दशकासारखेच वाटत असेल.
चन्द्रशेखर

हे नेहमीचे आहे का?

यंदा ज्वालामुखीचे खुप ऐकु येते आहे? प्रमाण वाढले आहे का?
प्रत्येक वर्षी कुठले ज्वालामुखी फुटले हे कोणत्या साईटवर मिळते का? हे बघायचे आहे की हे ज्वालामुखी फुटणे अचानक आहे की इतक्या संख्येने व तीव्रतेने दरवर्षीच ज्वालामुखी फुटतात?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

दुवे

हम्म

२०१२ जवळच आहे!

:)

अगदी हेच डोक्यात आल्याने प्रतिक्रीया दिली होती :)
कितीही काहि म्हटलं तरी २०१२ चा (पद्धतशीर पणे सोडलेला )किडा प्रत्यक्षात २०१२ येऊन जाईपर्यंत डोक्यातून जाईलसे वाटत नाही

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

२०१२

एकूण हा चित्रपट फार्ररच् सुरेख आहे..आणि शेवट पण!
यातिल बिच्चारा साइंटिस्ट् (पक्षी/पुढिल अर्थाने- संशोधक) ज्याला न्यायला विमान् येत नाहि तो भारतीयच् का दाखवलाय् बरं?? any guess??

 
^ वर