उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
सचिनला एलजी जनता पारितोषिक मिळावे म्हणून.....
सुधीर काळे जकार्ता
August 25, 2010 - 12:03 pm
'उपक्रम'वरील सहसभासदांनो,
आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला LG People's Choice Award मिळावे म्हणून कृपया खालील दुव्यावर टिचकी मारून तो उघडा आणि सचिनच्या नावापर्यंत जाऊन तिथे खाली असलेल्या बॉक्समध्ये खूण करून व शेवटी आपली माहिती भरून आपले मत नोंदवा/पाठवा.
त्यानंतर आपण दिलेल्या ई-मेलवर एक खात्री करण्यासाठी विचारणा होईल तिथे Activate वर टिचकी मारा. बस्स. इतकेच.
http://icc-cricket.yahoo.net/events_and_awards/lg_icc_awards/people_choi...
धन्यवाद,
सचिनचा 'आद्य चमचा',
सुधीर काळे
दुवे:
Comments
सच्चुला व्होट दिले.
धन्यवाद, सच्चुला व्होट दिले.
हे "जकार्तावाले" काय प्रकरण आहे? समजावुन घ्यायला आवडेल.
जकार्तात 'पाट्या' टाकतोय् म्हणून ते नांव घेतले.....
मी तसा 'जिप्सी'च, पण आता पुणेकर झालो. पण गेली ६ वर्षें जकार्तात 'पाट्या' टाकतोय् म्हणून ते नांव घेतले इतकेच!
सुधीर काळे
___________
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!
ज्वालामुखी
ज्वालामुखीच्या प्रदेशात सध्या काय परीस्थिती आहे?
सध्या तरी सगळे सुरक्षित आहोत
ज्वालामुखी सुमात्राच्या उत्तरेस झाला आहे. इथून सुमारे २००० किमी अंतरावर असेल. त्यामुळे सध्या तरी सगळे सुरक्षित आहोत.
___________
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!
अर्थ
मीही सचिनचा पंखा आहे. पण आता सचिन जिथे आहे तिथे त्याला आणखी एक पारितोषिक मिळाले किंवा नाही याने फारसा फरक पडणार नाही असे वाटते. तरीही मत दिले आहे. (मागे त्याला भारतरत्न मिळावे यासाठीही मोहिम सुरू होणार असल्याचे ऐकले होते.)
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com
पण आता सचिन जिथे आहे तिथे त्याला आणखी एक पारितोषिक मिळाले किंवा
पण आता सचिन जिथे आहे तिथे त्याला आणखी एक पारितोषिक मिळाले किंवा
सहमत !
पण "एलजी" फरक ला पडतो ना.
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
कौल
ह्या लेखनाला माहितीपर लेख म्हणावे का ललित?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
भारतरत्न
म.टाईम्सच्या एका दुव्यात एकदा वाचले की, ८०+ मध्ये असलेले आजोबा, ६० चे वडील, ५०-५५ ची आई, ३५-४० तील बहिण, २५-३० तील भाऊ, १५-२० मधील स्कूल कॉलेज गोईंग यूथ आणि १०-१२ चे बच्चे कंपनी या सर्वांच्यात अनेक बाबतीत मतभेदाच्या दर्या असू शकतात पण हा विरोधी वयोगट केवळ एकाच मुद्द्यावर एकत्र येतो, आनंदित होतो, एकमताचा होतो.... तो म्हणजे "सचिन तेंडुलकर्" !
त्यामुळे एलजी असो एनजी असो वा एक्सजी असो....सचिन म्हटलं की आमचा उजवा कौल जाणारच (जरी त्या लाडक्याला आता "भारतरत्न" शिवाय दुसर्या कुठल्याही सन्मानाची आवश्यकता नाही ~ भले त्याला तो मिळो वा ना मिळो, तो आहेच 'भारतरत्न' आमच्या दृष्टीने !)