अश्या संकट काळी सर्व देश आपल्या पाठीशी आहे
लेह ला ढग फुटीने जीवन उद्धवस्त झाले. अश्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी सरकारला अकस्मात मोठ्या प्रमाणात हजारो करोडो रुपये खर्च करावे लागतात. या खर्चास आपलाही हातभार लागावा आणि अश्या संकट काळी सर्व देश आपल्या पाठीशी आहे हे सांगत काश्मीर पासून कन्याकुमारी आणि मुंबई पासून थेट अरुणाचल पर्यंत लाखो करोडो भारतीय हात पुढे येत, पैश्या पाऊस पडतो इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा नैसर्गिक आपत्ती फंडात जमा होत असे. सोने चांदी, कपडालत्ता,इतकेच काय स्त्रिया आपले सोभाग्य लेणे मंगळसूत्र सुद्धा या फंडात देत असत. पण कारगिल फंडातील नेत्यांच्या भ्रष्ट्राचारा मुळे सामान्य जनता आता अश्या फंडाना मदत करेनाशी झाली आहे आणि सामाजिक संस्था सुद्धा असे फंड गोळा करण्यास पुढे येत नाही. . बंद फ्लट च्या संस्कृती प्रमाणे मला काय मी मजेत आहेना बाकी बांधव गेले खड्यात ही देशवासीयांची प्रवृत्ती वाढत आहे.यामुळे गुन्हा कोणाचा शिक्षा कोणाला असा प्रकार झाला आहे. ज्यांनी गुन्हा केला त्यांना कोणतीही शिक्षा झाली नाही , पण गरजू,आपत्तीत सापडलेली होरपळून जात आहे. मेरा देश महान!!
Comments
एक दिवस अख्खा देशच खड्ड्यात जाणार आहे.
>> पैश्या पाऊस पडतो इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा नैसर्गिक आपत्ती फंडात जमा होत असे
पैश्याचा पाऊस आजही पडतो पण तो फक्त खेळांसाठी (IPL CWG ), लोकांच्या जीवासाठी नव्हे.
>> इतकेच काय स्त्रिया आपले सोभाग्य लेणे मंगळसूत्र सुद्धा या फंडात देत असत.
आजकाल स्त्रिया मंगळसूत्र नाही तर कपडे मागा, लगेच काढून देतील (शक्यतो bollywood मधल्या)
>> बंद फ्लट च्या संस्कृती प्रमाणे मला काय मी मजेत आहेना बाकी बांधव गेले खड्यात ही देशवासीयांची प्रवृत्ती वाढत आहे.
एक दिवस अख्खा देशच खड्ड्यात जाणार आहे.
>> ज्यांनी गुन्हा केला त्यांना कोणतीही शिक्षा झाली नाही
ती होणे हे शक्य नाही.
वकील, न्यायाधीश, न्याय देवता, लक्ष्मी, सरस्वती, शक्ती इतकी अस्त्रे खिशात असताना कोणत्या राजकार्त्याला शिक्षा होणे शक्य आहे ?
>> मेरा देश महान!!
हा हा हा..... joking joking
एक योगा गुरु मला नुकतेच म्हणाले कि हिंदू धर्म शिल्लक राहणार आहे पण तो भारतातल्या लोकांमुळे नव्हे तर जे भारताबाहेर गेले आहेत केवळ त्यांच्यामुळे.
भारतातले एक तर चीन कडून सपाटून मार खाणार आहेत किव्वा पाकिस्तान कडून मारले जाणार आहेत.
http://www.saamana.com/2010/August/19/AGRALEKH.HTM
http://timesofindia.indiatimes.com/india/China-deploys-new-CSS-5-missile...
चीनचा धोका कोणाच कसे ओळखत नाहीये ह्याचा आश्चर्य वाटत आहे.
खरंच इच्छा असेल तर
ज्यांना खरंच काही करायची इच्छा असेल त्यांनी पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत (रिलिफ?) निधीमधे मदत द्यावी. हे पैसे थेट पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून वापरले जात असल्याने भ्रष्टाचाराची शक्यता कमी वाटते.
याशिवाय असे सामाजिक संस्थांकडूनही घेतले जाणारे बरेच निधी आहेत. उदा. हा बघा
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
जालावरील मतभेद विसरून सगळ्यांनी सढळ हाताने लेह पीडितांना मदत करा
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
मी आत्ताच मनुष्य संसाधन विभागाशी ह्या बाबतीती बोललो.
आमची सगळी कंपनीचे कर्मचारी मिळून ह्यात मदत करतील अशी आशा आहे.
जालावरील मतभेद विसरून सगळ्यांनी सढळ हाताने लेह पीडितांना मदत करावी हि विनंती.