पुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल

जॉर्ज ऑरवेलच्या ऍनिमल फ़ार्मवरील चर्चेच्या निमित्ताने त्याच्याच दुसया एका कादंबरीची आठवण अनेकांना झाली. ऍनिमल फ़ार्ममधील "ऑल ऍनिमल्स आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल" या प्रसिद्ध वाक्यासारखेच "बिग ब्रदर इज वॉचिंग" हे १९८४ मधील प्रसिद्ध झालेले वाक्य बहुतेकांना माहिती असते. परंतु प्रत्यक्ष कादंबरी फ़ार जणांनी वाचलेली असण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे त्या कादंबरीचा थोडक्यात परिचय. मला ही कादंबरी वाचून दहाएक वर्षे झाली आहेत पण त्यातली कथावस्तू आणि सोशल कॉमेंट मनावर कोरली गेलेली आहे.

पार्श्वभूमी :

ऑर्वेलने ही कादंबरी १९४८ मध्ये लिहिली आहे आणि १९८४ मधली परिस्थिती कल्पिली आहे. १९४८ हे साल म्हणजे दुसरे महायुद्ध संपून फ़ार काळ लोटला नव्हता. महायुद्धाचा परिणाम म्हणून पूर्व युरोप सोव्हिएट रशियाच्या अंमला खाली आला होता. त्याचप्रमाणे पाश्चात्यांच्या साम्राज्यातून अनेक देश हळूहळू मुक्त होत होते. त्यांतल्या बर्‍याच देशांच्या नव्या नेतृत्वावर साम्यवादी तत्त्वज्ञानाचा पगडा होता. त्यामुळे सर्व जग साम्यवादाकडे वळण्याची शक्यता त्याकाळी वास्तव समजली जाई. त्यानुसार १९८४ पर्यंत सगळे जग साम्यवादी बनलेले असेल अशी कल्पना करून ही कादंबरी लिहिली आहे.

संपूर्ण जग साम्यवादी बनले आहे आणि आता जगात वेगवेगळे देश राहिलेले नसून तीनच देश राहिले आहेत. एक ओशियानिया म्हणजे अटलांटिक महासागराच्या पश्चिमेचा प्रदेश आणि ब्रिटन, दुसरा युरेशिया, म्हणजे सगळा युरोप आणि रशिया, मध्यपूर्वेतला प्रदेश, आफ़्रिका, आणि तिसरा इस्टेशिया म्हणजे पूर्वेकडील आशियाई देश. (ही विभागणी साधारण अशी असल्याचे स्मरते. चूभूदेघे.)

अशा जगातल्या ओशियानिया देशात राहणाया एका सामान्य माणसाची ही कथा आहे. त्या अनुषंगाने राज्यकर्त्यांची वर्तणूक. राज्य करण्याच्या आणि टिकवण्याच्या युक्त्या, सामान्यांचे राज्यकर्त्यांविषयीचे मत, परंतु सर्वंकश सत्तेमुळे ते व्यक्त न करण्याची घ्यावी लागणारी काळजी यांचे अतिशय सिकनिंग वर्णन कादंबरीत आहे.

बिग ब्रदर इज वॉचिंग

या मनुष्याच्या घरात एक टीव्हीचा पडदा आहे आणि त्या पडद्यावर पार्टीच्या सर्वोच्च नेत्याची - बिग ब्रदरची (पार्टीचे सर्व सदस्य म्हणजे ब्रदर आणि हा नेता बिग ब्रदर)- भाषणे सतत चालू असतात. तो टीव्ही बंद करण्याची कोणतीही सोय नाही. इतकेच नाही तर त्या टीव्हीतून या मनुष्यावर नजर ठेवली जाते. आणि तो काही चुकीचे वागताना दिसला तर त्या पडद्यातून त्याची कानउघाडणी केली जाते. ही परिस्थिती देशातील प्रत्येक माणसाच्या घराची आहे. त्यावरून "बिग ब्रदर इज वॉचिंग" हे वाक्य जन्माला आले.
(मला नक्की आठवत नाही पण बहुधा लोकांना लग्न करण्याचीसुद्धा परवानगी नाही).

प्रचार

या मनुष्याच्या कामाचे स्वरूपही रोचक आहे. सरकारी रेकॉर्डस् सांभाळण्याचे काम त्याच्याकडे आहे. रेकॉर्डस् सांभाळणे म्हणजे सध्याच्या सरकारी धोरणाशी रेकॉर्डस् सुसंगत राखणे. उदा. मागच्या आठवड्यात रेशनचा कोटा क्ष आहे आणि या आठवड्यात तो कमी करून य इतका केला गेला आहे. असे असूनही सरकारी घोषणा "सरकारला हे कळवण्यात आनंद होत आहे की या आठवड्यापासून रेशनचा कोटा वाढवून य इतका करण्यात आला आहे. आपल्या शेतकरी बांधवांच्या उत्कृष्ट प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे". आता या घोषणेला अनुसरून मागच्या आठवड्यापर्यंतचे जुने रेकॉर्ड बदलून घेणे हे या माणसाचे काम आहे. मागच्या कुठच्याही रेकॉर्डमध्ये हा कोटा आधी य पेक्षा जास्त होता असे पुरावे राहता कामा नयेत. रेकॉर्ड बदलल्यावर जुने रेकॉर्डचे कागद तो एका नळकांड्यात टाकतो.

सरकारी प्रचाराचा दणका एवढा असतो की पूर्वी हा कोटा जास्त होता हे हा रेकॉर्डची अफरातफर करणार्‍या माणसालाही नीटसे आठवत नाही.

हे तीनही देश एकमेकांशी कायम युद्ध करीत असतात. देशातल्या बहुतेकांसाठी हे युद्ध कुठेतरी लांबवर सीमेवर चालू असते. पण त्या युद्धाशी संबंधित प्रचार मात्र प्रसारमाध्यमातून चालू असतो.
तीन देशातले कोणतेतरी दोन देश युतीत असतात. आणि ते तिसर्‍याविरुद्ध लढत असतात. पण या युत्या स्थिर नसतात आणि युती बदलेल त्यानुसार शत्रू आणि मित्रांची नावे प्रचारात बदलतात. आपल्या सैन्याने मोठा विजय मिळवला असल्याची बातमी अधूनमधून सांगितली जाते. प्रत्यक्ष वस्तुस्थितीत काहीही फरक पडत नाही.

क्रमश:

Comments

चांगला परिचय

चांगला मांडलात. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

प्रमोद

असेच

चांगला मांडलात. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
असेच

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

चांगला

चांगला परिचय. क्रमशः थोडे लवकर आल्यासारखे वाटले.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास http://rbk137.blogspot.com

मोठा भाऊ

"बिग ब्रदर केवळ समाजवादातच उद्भवतो" हे गृहीतक पटत नाही.
"लोकांनी शीतपेय प्यावे" हे खानत्रयीच ठरविते. लोकांनी काय कार्यक्रम बघावे ते केकता कपूर, इंडिया टीवी, आणि मर्डॉक ठरवितात.
या पार्श्वभूमीवरच, भारत सरकारने लादलेले दोन निर्णय संतापजनक आहेत.
भ्रमणध्वनीसंचामध्ये IMEI असण्याला सक्ती करून किंवा ब्लॅकबेरी वर बंदी घालून (आजच्या बातमीनुसार संपूर्ण VOIP, उदा. जीटॉक, स्काईप, वरच निर्बंध येणार आहेत.) दहशतवाद्यांना मुळीच फरक पडणार नाही. IMEI वरील बंदीचा निर्णय कदाचित चिनी संचांच्या निर्मात्यांवर बंदी घालण्यासाठी इतर देशांनी दडपण आणल्यामुळे घेतला असण्याची शक्यता आहे, त्यातून लोकांचे फारतर आर्थिक नुकसान होईल परंतु 'गुप्त संदेश पाठविण्याचा हक्क' हा मूलभूत हक्क आहे.

धक्कादायक

बातमी धक्कादायक आहे.

अशीच दुसरी संतापजनक बातमी म्हणजे गूगल-व्हेरीजन डीलनंतर अधिक पैसे भरले तर ठराविक सायटी (पक्षी : गूगल आणि त्यांचे मित्रमंडळ) अधिक वेगाने बघता येतील. हे सध्या अमेरिकेपुरते आहे पण लवकरच येथील लुटारू कंपन्या याचे अनुकरण करण्याची दाट शक्यता आहे.

गूगल आणि बिग ब्रदर यातील साम्य जाणवल्यावाचून रहात नाही.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

गूगलचे स्पष्टीकरण

यावर गूगलचे स्पष्टीकरण इथे.

यात स्पष्टीकरण फारसे दिसले नाही किंवा मला समजले नसावे. उदा.

MYTH: Two corporations are legislating the future of the Internet.

FACT: Our two companies are proposing a legislative framework to the Congress for its consideration. We hope all stakeholders will weigh in and help shape the framework to move us all forward. We’re not so presumptuous to think that any two businesses could – or should – decide the future of this issue. We’re simply trying to offer a proposal to help resolve a debate which has largely stagnated after five years.

हे वाचल्यावर डब्ल्यूटीएफ म्हणावेसे वाटते.
--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही. स्पेस टंकून पापक्षालन होत नाही.

बिग ब्रदर

>>"बिग ब्रदर केवळ समाजवादातच उद्भवतो" हे गृहीतक पटत नाही.
सहमत आहे. हे वर्णन सर्व राज्यव्यवस्थांना लागू पडते.
बिग ब्रदर समाजवादातही उद्भवतो असे गृहीतक असावे.

अवांतर: ब्लॅकबेरीला 'अक्सेस की' मागितली आहे. ती द्या नाहीतर बंद करा असे सांगितले आहे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

बिग ब्रदर

तो कुठल्याही सर्वव्यापी सरकारमधे असू शकतो.
कॉम्रेड आणि आपल्याकडे पूर्वीचे भाई (हल्लीचे दादा आणि भाई नाहीत) ही भूषणे साम्यवादी/समाजवादी गटात चालत असत त्याची आठवण आली.
प्रमोद

चांगला परिचय

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

 
^ वर