स्तुपांची मंदिरं- भाग 2 (आयाप्पा मंदिर)

श्री. के. आर. वैद्यनाथन यांचे म्हणने आहे कि केरळातील आयप्पा मंदिर सुद्धा एक बौद्ध मंदिर आहे. एवढेच नव्हे तर तेथील मुख्य पुजा “चक्कीयार कुट्टु” हा विधी सुद्धा बौद्ध भिक्षुंच्या ध्र्मोपदेशाचे रुपांतर आहे. (संदर्भ: के. आर. वैद्यनाथन : १९८२: ४ )

प्राथमिक हिंदु वांगमयात आयाप्पाचे उल्लेख नाही

प्राचिन साहित्यात या देवतेच्या उल्लेखाबद्द्ल श्री. टी. ए. गोपिनाथ राव यांचे म्हणने आहे कि ( टी. ए. गोपिनाथराव: १९८५: खंड २ : ४८६) ही देवता जी द्रविड देशाची विशेषता आहे, गोदावरिच्या उत्तरेत अनोळखी आहे. कोणत्याही प्राचिन संस्कृत ग्रंथात या देवतेचा उल्लेख नाही तसेच या देवतेच्या उगमाबद्दल काहि धर्शविले नाही.

विष्णु पुराणात केवळ मोहिनी बद्दल माहिती आहे पण केवळ भागवतामधे आपल्याला प्रथमत: कळते कि, शिवाचे मोहिनी रुपातील विष्णुशी प्रेम झाले आणि हरि तथा हर यांच्य समागमातुन निर्माण झाला आर्य, शास्ता अथवा हरीहर पुत्र.

“सुप्रभेदागम” या ग्रंथात स्पष्ट रुपाने म्ह्टले आहे कि, क्षिरसागराचे मंथन केल्यानंतर अमृताची वाट्णी देवांमधे करण्याच्या हेतुने विष्णूने मोहिनी रुप धारण केल. मोहिनीशी हर याच्या समागमातुन शास्ता याचा जन्म झाला.

हे लक्षणीय आहे कि, भागवत पुराणाचा रचनाकाळ विद्वानांच्या मते इ.स. चे दहावे शतक मानल्या जातो.

आयाप्पाचा काळ

आयाप्पा यांच काळ मलियालम शके ३००-४०० म्हणजेच इ.स. चे ११२५ ते १२२५ यामधे कुठेतरी असल्याचा विद्वानांचा कयास आहे. १८२० इसवी पासुन त्रावणकोर येथील शासकांनी पंडालम ज्यामध्ये सब्रिमलाचा सामावेश होता या भागाला आपल्या राज्याला जोडुन घेतले तेंव्हापासुन राज्यातील सर्व मंदिराचे व्यवस्थापन त्रावणकोर च्या प्रशासनामार्फत चालविण्यात येते. भारताला स्वातंत्र मिळाल्या नंतर हे प्रशासन त्रावणकोर देवस्वम बोर्ड यांच्याकडे आले.

शास्ता या नांवाच्या उगमाबद्दल श्री. राव यांचे म्हणणे आहे कि, या देवतेला शास्ता यासाठी म्हणतात कि, संपुर्ण जगावर याचे नियंत्रण तथा शासन राहत असे. शब्द व्युत्पत्ती शास्त्रीय दृष्टीने या शब्दाचा अर्थ देशाचा शासक असा होतो. कधीकधी हा शब्द गुर किंवा पित्यासाठी वापरल्या जातो. अमरकोषात हा शब्द बुद्धासाठी प्रयुक्त झालेला आहे. तामिल निघंटु मधे त्याचे कित्येक ईतर नावे दिली आहेत. ती नावे अशी आहेत, सातवाहन, श्वेतहत्तीचा स्वार, करी, सेन्डू नामक शस्त्र धारण कर्ता, पुर्णा तथा पुष्कला यांचे पती, धर्माचे ऱक्षक तथा योगी. आणि पुढे ते म्हणतात कि, शास्ताचे वाहन हत्ती आहे आणी त्यांचे निशाण ध्वजावर कोंबडा आहे. “श्वेत हत्तीचे स्वार, योगी, धर्मरक्षक हि स्र्व नांवे तसेच अमरकोषात शास्ता हे बुद्धाचे नांव असणे या सर्वावरुन असा निष्कर्ष निघतो कि, तामिळ देशात मानल्या जाणारा आणि पुजला जाणारा बुद्ध ह्याला शेवटी हिंदु देवता संघात सामील केल्या गेले. आणि त्याच्या उगमासाठी एक कथा पुराणात नंतरच्या काळात रचल्या गेली. असे भारतीय मुर्तीविकास शास्त्राच्या ईतिहासात दिसते.” (संदर्भ: टी. ए. गोपिनाथराव : १९८५ खंड २: ४८७)

आयाप्पा बोधिसत्वाचे शस्त्र धारण करतो:

अंशुमभेदागम, सुप्रभेदागम तसेच करतांगम इत्यादी शास्त्रात वर्णन केलेल्या प्रमाणे मुर्तीचे वर्णन श्री. राव हे देतात. या वर्णनात लक्षणीय़ बाब अशी आहे कि, “ भगवान पिठावर बसले आहेत, डाव पाय खाली मुडपलेला आहे, उजवा पाय पिठावर मोडुन स्थीर केला आहे. गुडघ्यावर हाताचे कोपर टेकले आहे, आणि उजव्या हातात वज्रदंड घेतला आहे. ( लक्षणिय बाब हि कि वज्र हे बौद्ध बोधिसत्वाचे खास आयुध होय).

केरळमधे संगम काळातील बौद्ध:

अमेरिकेतील नार्दन मिशीगन युनिव्हर्सिटीतील डॉ. झकारियास थुंडी यांनी “ दि केरला स्टोरी” मध्ये केरळातील बुद्ध धर्माच्या इतिहासाबद्दल माहिती दिली आहे. तामीळ संगम ग्रंथावरुन दिसते कि, तामीळनाडुत त्या काळी बौद्ध लोक होते. आणि बौद्ध भिक्षु तामिळनाडुत आणि केरळमध्ये धर्माच्या प्रचार प्रसाराचे काम अतिशय जोमाने करत होते. हे सर्व तामीळ बौद्ध ग्रंथ मनीमेखलाई या संगम युगातील बौद्ध ग्रंथावरुन दिसुन येते. संगम परंपरे प्रमाणे वांची (करुर) येथे एक प्रख्यात बौद्ध चाटी म्हणजे बौद्ध मंदिर होते. आनी त्या काळातील पल्ली बान पेरुमल ह्या राजाने बौद्ध धर्म सिवकारला होता.

चेरा लोक मुलत: मुंडा होते. त्यांच्या पैकी अनेक तामीळनाडुन्त येण्यापुर्विच बुअद्ध होते. हि सर्व मंडळी आनी तसेच मौर्य साम्राज्यातुन आलेले बौद्ध या सर्वानी मिळून बुद्ध धर्माला द्क्षीण भारतात आणले.

“आलविकापथिकम” यात म्ह्टले आहे कि, ६४० इसवी च्या सुमारास एक ब्राह्मण संबंधमुर्ती याने पांड्या राजघराण्यातील मंडळीना आपलेसे करुन मदुराई येथे आठ हजार बौद्ध भिक्षुंची कत्तल घडविली.

या लेखात असे म्हटले आहे कि, हिंदु मंदिर परिसरातील बौद्ध भिक्षुणींचे पतन करुन त्याना देवदासी बनविन्यात आले. अशाप्रकारे राजाच्या छळाला कंटाळुन सर्वच्या सर्व बौद्ध मंडळी केरळात रवाना झाली.

केरळात आलेल्या बौध्द लोकानी वेगवेगळ्या ठिकाणी मठ, मंदिरे आणि विहारांची स्थापना केली. आजची अनेक हिंदु मंदिरे एकेकाळी बौद्ध क्षेत्रे होती. ती येणेप्रमाणे: त्रिचुर येथील वडक्कुनाथ मंदिर, क्रंगनोर येथील कुरूंबा भगवती मंदिर आणि त्रिचुर नजिक पारुवासेरी दुर्गा मंदिर इ..

अलेप्पी आणि क्वीलॉन या तटवर्ती जिल्ह्यात बुद्धाच्या अनेक मुर्त्या फार मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाची म्हणजे अम्बालपुज्झा जवळील करुमती कुट्टन येथील प्रसिद्ध बुद्धमुर्ती फारच महत्वाची आहे.

६५० ते ८५० इसवी या दोनशे वर्षात केरळात बुद्ध धर्म अतिशय जोमात होता. “अय राजा वरगुना (८८५-९२५) यांच्या पालियम या ताम्रपत्रा वरुन असे दिसते कि, बौद्धाना दहाव्या शतकात सुद्धा काहि प्रमाणात राजाश्रय प्राप्त झाला होता.

महान केरलियन कवी कुमारन आसन यांच्यावर सुद्धा बुंद्ध धर्माचा फार प्रभाव होता. त्यानी “करुना” “चांडाल भिक्षुणी” व “श्री बुधचरीतम” इत्यादी बौद्ध काव्याचि रचना केली.

ऐतिहासिक आयाप्पा कोण ?

डॉ. झाकरियास थुंडी म्हणतात कि, “आयाप्पा बुद्ध आहे, कारण बुद्धाला शास्ता असे म्हणतात. आणी शरणम म्हनून म्हटल्य जाणारी प्राथना बुद्धासाठीच असते व आयाप्पाच्या काही मुर्त्या बुद्धमुर्तीशी फारच जवळचे साम्य दर्शवितात.”

वेडानचा चेरा राजा अय्यन अडिगल तिरुवटीगल यांच्या शासन काळात पुर्वेकडुन चोल राजे आणी पांड्य राजे यांचे केरळवर आक्रमण झाले. “केरलोत्पत्ती” (अध्याय ५) या ग्रथात देरामन पेरुमल (राजशेखर) ह्या केरळातील राजाच्या शासन काळात पांड्य राजाच्या आक्रमणाचा उल्लेख आहे. तसेच सैन्याचे सेनापती उदयवर्मण याचाही उल्लेख आहे. आयाप्पा दंतकथेत अयप्पनच्या एका उदयनन यांच्यावरिल लष्करी विजयाचा उल्लेख आहे.

“केरलोत्पत्ती” या ग्रंथात केरळातील बुध्दधर्माच्या अस्तित्वाची आणि प्रभावाची माहिती दिलेली आहे. आयाप्पा संप्रदयत ती प्रतिबिंबीत झाली आहे. तसेच मुस्लिम परंपरेप्रमाणे शेवटचा पेरुमल याने मुस्लिम धर्म स्विकारला, आपले नाव अब्दुल रहमान समिरी असे बदलले, एक मुस्लीम स्त्री रहाबीयेत हिच्याशी लग्न करुन अरेबियाच्या किना-यावरिल शाहार येथे तो रहायला गेला असे समजते. म्हणुन वेनाडचा राजा अय्यन याचा काळ हा सिनिकी स्वा-या व बौद्ध आणी मुस्लिम प्रभावाचा काळ होता. आणि एक राजा राजशेखर हा त्यांचा सम्राट होता असे दिसते.

वरिल ऐतिहासिक पार्श्वभुमीवर जेंव्हा आपण आयाप्पाच्या परंपरेचा विचार करतो तेंव्हा डॉ. झकारीयास थूंडी यांच्या मताप्रमाणे भगवान आयाप्पा म्हणजे “Apotheosis of Ayyan Adigal” होय.

त्यांच्या मता प्रमाणे भगवान आयाप्पा हे मानवी वेनाडचा वीर राजा अय्यन अडिगल यांचे दैविकर्ण होय.

आयाप्पा देवतेला शरणं म्हणुन शरण जाण्याची प्रथा, अठरा पाय-याचे रहस्य व इतर विधी व त्या काळातील केरळमधिल बौद्ध धर्माचा ईतिहास बघता हे एक बुद्ध मंदिर असल्याचेच वाटते.

लेखनविषय: दुवे:

Comments

सोमनाथ राहीलेच

सोमनाथ राहीलेच. तिरुपतीचा व्यंकटेश पण बुद्ध असू शकतो. ;-)

धीर

भाग ६ चा विषय तिरुपतीचा व्यंकटेशच आहे ना!

मधुकरराव

हे लेख आधीच लिहीलेले आहेत का? तसे नसेल तर आपल्या लेखनाच्या झपाट्याबद्दल आदरयुक्त भीती किंवा भीतीयुक्त आदर (फरक काय?) निर्माण होऊ पहात आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

पूर्वप्रसिद्धी

हा लेख या ब्लॉगावर सापडला. हा ब्लॉग मधुकर रामटेके यांचा आहे. उपक्रमी मधुकर व मधुकर रामटेके एकच असावेत असे वाटते.

असावेत

आधी त्यांनी मधुराम असे नाव घेतले होते आणि नंतर बदलून मधुकर असे केले. त्यावरून तेच असावेत असे म्हणण्यास जागा आहे.

असो.

उपक्रमावर मधुकर रामटेके यांचे स्वागत आहे.

चित्तरंजन

चित्तरंजन या उपक्रमींची स्वाक्षरी 'पटता तो टेक, नही तो रामटेक' अशी आहे, त्याची आठवण झाली.

||वाछितो विजयी होईबा||

हार्दिक स्वागत

श्री. मधुकर रामटेके यांचा ब्लॉग डोळ्याखालून घातला.

श्री. रामटेके यांचे उपक्रमावर हार्दिक स्वागत. त्यांची "गोटुल" लेखमाला माहितीपूर्ण आहे.
गोंड-मुंडा समाजाबद्दल उर्वरित महाराष्ट्रात माहिती फार कमी आहे. (श्री. रामटेके यांनी या "स्तुपांची मंदिरे" लेखमालेतही गोंड-मुंडाचा उल्लेख केलेला आहे, म्हणून हा संदर्भ अतिशय अवांतर नव्हे.)

श्री रामटेके यांनी स्वानुभवातून ही उणीव उपक्रमावर भरून काढावी, अशी विनंती. (त्यांचे स्वानुभव आणि प्रत्यक्ष निरीक्षणे ही ज्या प्रकारे ठोस अनुभव आहेत, त्यांचे ऐतिहासिक मनन त्या उच्च प्रमाण दर्जाला पोचत नाही. त्यावर लोक काही-ना-काही टिप्पणी करत राहातील, त्याचा सकारात्मक अर्थ घेऊन श्री. रामटेके यांनी येथे माहिती देत जावी, असे त्यांना प्रोत्साहन देतो.

असेच.

श्री. मधुकर रामटेके यांचा ब्लॉग डोळ्याखालून घातला.

श्री. रामटेके यांचे उपक्रमावर हार्दिक स्वागत. त्यांची "गोटुल" लेखमाला माहितीपूर्ण आहे.
गोंड-मुंडा समाजाबद्दल उर्वरित महाराष्ट्रात माहिती फार कमी आहे. (श्री. रामटेके यांनी या "स्तुपांची मंदिरे" लेखमालेतही गोंड-मुंडाचा उल्लेख केलेला आहे, म्हणून हा संदर्भ अतिशय अवांतर नव्हे.)

श्री रामटेके यांनी स्वानुभवातून ही उणीव उपक्रमावर भरून काढावी, अशी विनंती. (त्यांचे स्वानुभव आणि प्रत्यक्ष निरीक्षणे ही ज्या प्रकारे ठोस अनुभव आहेत, त्यांचे ऐतिहासिक मनन त्या उच्च प्रमाण दर्जाला पोचत नाही. त्यावर लोक काही-ना-काही टिप्पणी करत राहातील, त्याचा सकारात्मक अर्थ घेऊन श्री. रामटेके यांनी येथे माहिती देत जावी, असे त्यांना प्रोत्साहन देतो.

असेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

असेच म्हणतो

उपक्रमावर स्वागत.
येथील टीकाटिप्पणी सकारात्मक ठरून त्यांचे नवे लेखन अधिकाधिक माहितीपूर्ण, चिंतनशील आणि 'उच्च प्रमाण दर्जाचे' होईल अशी अपेक्षा करतो.

देव उत्सव आणि दैवते.

कित्येक देव हे हळूहळू पुराण कथातून समाविष्ट होत असतात. बहुतेक नावाजलेले देव हे पहिल्यांदा लोकदेव मग पुराणदेव झाले. खंडोबा, बिठोबा, बालाजी, अय्याप्पा, मुरुगन, जगन्नाथ यांचा उल्लेख पुराणात नसणे साहजिक आहे. अर्थात हा त्यांच्या बुद्धरूपाचा पुरावा होणार नाही. या सर्वांच्या लोककथा ऐतिहासिक पुरावा म्हणून टाकून देण्यासारख्या नसाव्यात.

प्रमोद

 
^ वर