स्तुपांची मंदिरं- भाग 3 ( जगन्नाथपुरी मंदिर)

पुरी येथील जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांची रथयात्रा हि इतर काहि नसुन केवळ बुद्ध अणि सोबत बोधिसत्व यांच्या रथयात्रेचे रुपांतर आहे. फाहीयान या चीनी प्रवाशाने इ.स. च्या ५ व्या शतकात स्वत: आपल्या डोळ्यानी हा बौद्ध सोहळा पाहिला व त्याची नोंद करुन ठेवली. मात्र नंतर काही शतके उलटल्यावर याच बौध्द सोहळ्याचे हिंदुकरण झाले व ते आज जगन्नाथपुरी मंदिर म्हणुन आपन बघतो. ( संदर्भ: सरकार-ईंडिया थ्रु एजेस पृ. ३३)

जातीयबंधने काहि प्रमाणात शिथील आहेत
हे मंदिर मुळात बौध्द मंदिर असल्यामुळे आधिपासुन ते सर्वाना खुले होते. नंतर हळूहळू त्याचे हिंदुकरण झाले पण तुलनेने जातीयवाद मात्र तितका रुजविता आला नाही. पुरीमधे जातीप्रथेत बरिच उदारता दाखविण्यात येते. प्राध्यापक घुर्ये यांचे कथन आहे कि, “जगन्नाथाच्या प्रसिद्ध मंदिराचा कार्यकारी पुरोहित एक न्हावी असतो. भगवंतासाठी त्यानी तयार केलेल जेवणाचे पदार्थ काही सनातनी ब्राह्मणांचा अपवाद सोडल्यास सर्वाना स्विकार्य आहे.” ( संदर्भ: घुर्ये: १९६९: २७)

डॉ. राजेंद्रलाल मिश्रा:
यांच्या म्हणण्याप्रमाणे बौद्ध काळानंतर कृष्ण या विष्णुपुजेचा काळ आला. जगन्नाथ्च्या पुजेची विशिष्टता, येथील धार्मिक उदारता, विस्तीर्ण जणांचा आधार, येथील जातीबंधनाची शिथिलता, बुद्धदंतधातुची रथयात्रा हिची येथील रथयात्रेशी समानता आणि इतरही अन्य काही बाबी अशा आहेत कि, ज्यामुळे पुरी हेच दंतपुर आहे. जेथे पवित्र बुद्धदंत धातु आवशेष ठेवले होते आणि त्याचे जतन केल्या जात होते. या मताची पुष्टी होते. दरवर्षी याच दंतधातुला ब-याच हर्षोल्हासा आणि भक्तिभावाने व मिरवणुकिने फिरविल्या जात असे, आणि नंतरच्या काळात तिला श्रीलंकामधे नेण्यात आले. ( दिवे: १९७०: ४३ , ईमारटल ईंडिया, खंड-१, भारतिय विद्या भवन १९७०)

राजा मुकुंददेव
ब-याच लढाया व परकिय खुन खराब पाह्त हजारो वर्षापासुन उभा असलेला बुद्ध मंदिराचा शेवटचा राजाश्रय होता राजा मुकिंददेव. मुकुंददेव १५५१ मधे गादिवर आला. ह्या राजाच्या शासन काळापर्यंत पुरिच्या मंदिर बुद्ध मंदिरच मानल्या जात असे पण या राजाच्या शासना नंतर बौद्ध धर्म लयास गेला व हिंदुनी मंदिरावर ताबा मिळविला ( संदर्भ: नरसु १०८, “ए स्टडी ऑफ कास्ट”). या राजाच्या नंतर हिंदुनी बुद्धाचं अस्तित्व लपविणार कट रचला. बुद्धाच्या विशाल मुर्तीसमोर एक मोठी भींत बांधण्यात आली त्यामुळे बुद्धाची विशाल मुर्ती लपविल्या गेली. आज ज्याला सुर्यनारायण मंदीर म्हणुन संबोधल्या जाते त्या मंदिराच्या मागे हि भिंत असुन पुरीच्या जगन्नाथा मंदिराच्या आवारातच आहे. मंदिराच्या आवारात विशाल बुद्ध मुर्तीचे अस्तित्व असणे आणि बाहेरुन ती न दिसणे म्हणजेच या मंदिराच्य पुर्व ईतिहासाची कल्पना करता येते.

अलिकडच्या काळातील एक पुरातत्व उत्खनन
ओरिसातिल बुद्ध धर्माच्या क्षेत्रामध्ये अलिकडाच्या काळातील उत्खननामुळे दृष्टिस पडलेले अवशेष झ्या विभागाला फार महत्व प्राप्त करुन देतात. जसे कि ललितगौरी येथील उत्खणनात पवित्र अवशेष असलेले कुंभ मिळाले. रत्नागिरी, उदयगिरी, ललितगिरी ब्रह्मावन, कुरुमा इ. ठिकाणी अलिकडेल काळात झालेल्या पुरातत्वीय उत्खनन सोरिसातिल बौद्ध क्षेत्राना एक नवा आयाम मिळालेला आहे. ओरिसात मिळालेली तांत्रीक-वज्रयानी शिल्पे हि तिबेट, नेपाळ आणि चिन या देशातील बौद्ध कलेशी साम्य दर्शवितात. यावरुन असे लक्षात येते कि हा सगळा प्रांत बौद्धमय होता. पुरी सुद्धा बौद्धमय होते व जगन्नाथ मंदिर हे बुद्ध मंदिर असण्याची शक्यता अधिक दाट होते.

ईतर उल्लेख
१) शंकराचार्यानी ९ व्या शतकात पुरिला भेट दिली व तेथे गोवर्धन मठाची स्थापना केली. याच काळात पुरी एक प्रसिद्ध बौद्ध व हिंदु स्थान होते.
२) “अनर्घाराव नाटकम” हा मुरारी मिश्र यांचा ग्रंथ. इ.स. च्या नवव्या-दहाव्या शतकातील मानल्या जातो. त्यात समुद्र किना-यावर पुरुषोत्तमाची पुजा होत असल्याची नोंद आहे.
३)कृष्णमिश्र रचित “प्रबोध चंद्रिका नाटकम” याची रचना इ.स. १०७८ मधे झाली. त्यात पुरीच्या भगवान पुरुषोत्तमाचे “देवायतन” असल्याचा उल्लेख आहे.
४) मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यातील मैहर येथील शारदादेवी मंदिरातील शिलालेखात ओद्र देशातील पुरुषोत्तमाचा उल्लेख आहे. त्याचा काळ सुमारे इ.स. १० वे शतक असावे.
५) नागपुर येथील माळवा देशांच्या राजांचे शिलालेख इ.स. च्या ११०४ मधिल असुन त्यात पुरुषोत्तमाचा उल्लेख आहे.

वरिल सगळ्य़ा संदर्भांवरुन इ.स. ९५० च्या दरम्यान पुरी मधे जगन्नाथाचे मंदिर असल्याचे सिद्ध होते.

आता इ.स. पुर्व काळातिल पुरिचा थोडासा ईतिहास बघु या
इ.स. पुर्व तिस-या शतकात संम्राट अशोकाच्या शासनकाळा पासुन संपुर्ण पुरी जिल्हा बुद्ध धर्माच्या प्रभावात आलेला होता. महामहोपाध्याय गांगुली यानी उल्लेख केलेली “वेदी” हिच हे बौद्ध क्षेत्र असावी. डॉ. पटेल यांच्या म्हणण्याप्रमाणे जगन्नाथ मंदिराच्या उंचीवरुन असे दिसते कि, हे एका उंच चबुत-यावर बांधलेले आहे. हा चबुतरा म्हणजेच स्तुप होय.

वास्तविकता पुरी शहर संपुर्ण सपाट जागेवर वसले आहे. जवळपास कुठेही टेकडी किंवा डोंगर नाही. म्हणुन जो उंच चबुतरा आहे आणि ज्यावर आजचे जगन्नाथ मंदिर उभे आहे तो चबुतरा मानवनिर्मित आहे. बौद्धानी हा चबुतरा स्तुप बांधण्यासाठी आणी त्या स्तुपात बुद्धावशेष ठेवण्यासआठी निर्माण केला असावा. हे बुद्धावशेष आजही ब्रह्मधातुच्या रुपात लाकडी प्रतिमेत “नवकलेवरा” च्या प्रसंगी ठेवण्यात येतात.

नुकत्याच (केलेल्या डागडुज्जीच्या कामात अशोकस्तंभ सापडला)
उत्खनन कार्यात हजर असलेले डॉ. पटेल यांचे म्हणणे आहे कि, “या बाबतीत महत्वाचे म्हणजे आर्कीऑलॉजीकल सर्वे ऑफ इंडिया यांनी नुकतीच डॉ. टी. पी. सत्यमुर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली काही डागडुज्जीचे काम केले गेले. हे काम नटमंदिर विभागातील गरुड स्तंभाच्या पायथ्याशी केले गेले. त्यामधे एक अशोक स्तंभाचे अवशेष सापडले, ज्यावर मौर्य कालिन पॉलिश केलेली आहे.” हा अशोक स्तंभ चबुत-याच्या ब-याच खाली गेलेला आढळला. स्वत: लेखक व त्याचे सोबती असलेले डि. आर. प्रधान (टिम) यानी त्या स्थळाला नविनीकरण चालु असताना भेट दिली. त्याना आढळले कि, संपुर्ण जगन्नाथ मंदिर परिसर हा मानवनिर्मीत आहे. आणि बौद्ध स्थळाच्या स्तुपाशी त्याच्या चबुत-याची साम्यता हेच दर्शविते कि हे मंदिर पुरातन बौद्ध स्तुपावर बांधण्यात आले.

इ.स. च्या नवव्या शतका नंतर यजाती प्रथम ह्या राजाच्या नेतृत्वात सोमवंशी या जनजातीनी उत्कल काबीज केले. त्या काळापासुन पुरुषोत्तम आनी नरसिंह यांना बरोबरीचे मानण्यात येण्याची प्रथा सुरु झाली. “जगाचा स्वामी” या अर्थाने बुद्धाला जगन्नाथ म्ह्टल्या जात असे. ते शिव व विष्णु याना सुद्धा म्हणने सुरु झाले. जगन्नाथ हा शब्द लोकनाथ किंवा लोकेश्वर या बोधिसत्वांला समानार्थी शब्द म्हणुन वापरल्या जाऊ लागला. नंतरच्या काळात जेंव्हा बुद्ध धर्माला अवनती प्राप्त झाली तेंव्हा लोकेश्वर फक्त शिवालाच म्ह्टल्या जाउ लागले. व जगन्नाथ शब्द विष्णुस्पेशल बनुन गेला.

पुरीचा राजकिय ईतिहास
राजा भानुदेव द्वितीय यांच्य अशिलालेखा वरुन असे सिद्ध होते कि, पुरी येथील प्रमुख देवतेला जगन्नाथ म्हणन्याची प्रथा इ.स. च्या चौदाव्या शतकापासुन पुढे लोकप्रिय झाली. त्या पुर्वी हे पुरुषोत्तम क्षेत्र म्हणुन लोकप्रिय होते. बौद्धांच्या चबुत-यावर सोमवंशीय राजाने हे मंदिर बांधले.
९५० इ.स. पर्यंत ब्राह्मण धर्मिय सोमवंशी राजाने भौमकार या बौद्ध शासकाचा पराभव केला होता. ह्या विजयाचे प्रतीक म्हणुन सोमवंशी राजा यजाती प्रथम यांनी पुरीला पुरुषोत्तमाचे मंदिर बांधले. एका दंतकथे प्रमाणे रजा इंद्रद्युम्न याने बांधलेले पुरी येथील मंदिर रेतीमधे अदृष्य झाले. मदलांजी यांच्या म्हणण्या प्रमाने जेंव्हा आजचे जगन्नाथ मंदिर बांधण्यात आले तेंव्हा यजातीने बांधलेले मंदिर पडक्या अवस्थेत आले होते.

मंदिराती कागद पत्रावरुन समजते कि, लाकडाच्या मुर्ती राजा यजाती यांनी स्थापन केल्या होत्या. के.सी. पाणीग्रही यानी रक्तबाहु या राजाची ओळख राष्ट्रकुट तृतीय गोविंद (इ.स. ८०५ ते ८१५) यांच्याशी केलेली आहे. रक्तबाहु याने यजाती राजाच्या १४४ वर्षे आधी आक्रमण केले होते. याप्रमाणे राजा यजाती यानी पुरी येथे मंदिर बांधण्याचे वर्ष ९४५ ते ९५० हे येते.

स्टिस्टेनक्रॉन यांच्या म्हणण्याप्रमाणे इंद्रद्युम्न प्रकरण ज्या राजांच्याअ काळात घडले ते तीन राजे होते. यजाती प्रथम, यजाती द्वितीय आणी चोडगंग देव. या तिघांची मिळुन एक पौराणिक पुरुष इंद्रद्युम्न मानल्या गेला. मुरारी मिश्र यांचा ग्रंथ “अनर्घरघवम” यावरुन या म्हणण्याची पुष्टी मिळते. यात म्हटले आहे कि, इ.स. च्या ९५० मधे पुरी येथे मंदिर होते.

पुरिवर परकिय आक्रमणामुळे तेथील मुर्तीला सोनेपुर इथे आणावे लागले. सोनेपुर येथे १४४ वर्षे मुर्तिला गाडुन ठेवले गेले होते. सोनपुरचे सोमवंशीय राजा यजाती प्रथम याने मुर्तीचा शोध घेतला आणि आदिवासिंच्या (सवर जमातीच्या ) मदतीने नविन मुर्तीची पुनर्स्थापना केली असे मंदिराच्या कागद पत्रावरुन दिसते.
यावरुन हे स्पष्ट होते कि, सोमवंशीय राजानेच सर्व प्रथम जगन्नाथ पुरिचे मंदिर (स्तुपाच्या चबुत-यावर) बांधले.

लेखनविषय: दुवे:

Comments

भाग २ कोठे आहे?

तो सोमनाथावर आहे का?? ;-)

दुसरा भाग...!

दुसरा भाग मला काही क्षण दिसला होता, की मला भास झाला ?

-दिलीप बिरुटे

भास असावा

उपक्रमावर स्वसंपादनाची सोय नाहीये ना! ;-) त्यामुळे भास असावा.

पुढे काय?

या लेखमालेतील सर्व माहिती खरी आहे असे धरू. (खरे म्हणजे आहे त्यापेक्षा अधिक सबळ पुरावे आवडले असते पण तरीही ती खरी आहे असे क्षणभर धरण्यास मला प्रत्यवाय नाही.)

एक राज्यसत्ता गेली, दुसरी आली की प्रार्थनास्थळांमधील बदल अपेक्षितच आहेत. असे म्हणतात की वैदिक देवतांच्या पुजेसाठी भव्य मंदिरे बांधली जात नसत. मंदिरांची संकल्पना बौद्धांनी सर्वप्रथम ग्रीकांकडून घेतली. स्तुपांना खांब वगैरे बांधण्यास सुरुवात केली. बुद्धाच्या मूर्तीही ग्रीक शिल्पकलेतून आलेल्या आहेत. जेव्हा बौद्ध धर्माचे भारतातून उच्चाटन होण्याची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा हिंदू धर्माचा पुनर्प्रसार होताना स्तुपांची देवळे झाली असणे सहज शक्य आहे.

११व्या १२व्या शतकात बांधलेले आंग्कोर वट हे हिंदू मंदिर होते. राज्यकर्त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यावर त्याचे बुद्धमंदिर झाले. असे बदल होतातच. त्यात वावगे काय आहे?

सदर लेखांचे उद्देश केवळ माहिती देणे किंवा सत्याला वाचा फोडणे आहे असे असल्यास मला ते आवडले असे मी म्हणेन. (तरीही यापेक्षा अधिक विश्वासार्ह पुरावे आणि मांडणी आवडले असते.) लेखाचा उद्देश "राममंदिर बनाके रखेंगे|" धर्तीने जाणारा असल्यास मला त्यात रुची नाही.

मंदिर वहि बनायेंगे

"राममंदिर बनाके रखेंगे|" >> मंदिर वहि बनायेंगे प्रकार् नाहिच् नाही. फक्त् माहिती म्हणुन् हा लेख लिहला.

-----------------
भवतु सब्ब मंगलम.

धन्यवाद

मंदिर वहि बनायेंगे प्रकार् नाहिच् नाही. फक्त् माहिती म्हणुन् हा लेख लिहला.

माहिती म्हणून येणार्‍या प्रत्येक लेखाचे स्वागतच आहे. आपलेही पुन्हा एकदा उपक्रमावर स्वागत. मी माहिती या नजरेतून सर्व लेख पुन्हा एकदा वाचेन.

वावगे नाहीच

असे बदल होतातच. त्यात वावगे काय आहे?

सहमत
खरे तर राज्यकर्ता हा आपल्या विचाराने आपली जनता चालावी असा प्रयत्न करणारच असतो. आणि त्याच्या मते आपण जे करतोय ते निर्विवादपणे सत्कर्मच असते. हिंदू राज्यकर्त्यांनी बौध्द स्तुपांची देवळे केली असतील किंवा नंतरच्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी देवळांच्या मशीदी केल्या असतील हे सगळे सत्तास्थापना व सत्ता दृढ करण्याच्या मार्गातील टप्पेच असतात. आजही पून्हा या सत्तास्थापनेसाठी मंदिर वही बनायेंगे सारख्या घोषणा होत असतात. जिज्ञासू आणि विवेकी लोकांनी मात्र फक्त सामाजिक आणि ऐतिहासिक स्थित्यंतरे म्हणून यांच्याकडे बघितले तर बरेच वाद टळण्यासारखे आहेत.

 
^ वर