विहंगम बोमडीला
बोमडीला हे शहर समुद्रसपाटी पासुन ८००० फुटावर हिमालया च्या बर्फाच्छादित पर्वत रांगांनी वेढलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. येथे जाण्याचा मार्ग मात्र अतिशय खडतर तितकाच मनाला सुखावणारा आहे. मी १९ जुलै २०१० ला अरुणाचल च्या नहरलहगुन येथुन मिनी बस ने प्रवास सुरु केला. संध्याकाळी ६ वाजता निघणारी ही बस बोमडीला येथे सकाळि ७ ला पोचते. वाटेत निमुळत्या रस्त्यावर् पावसामुळे फुटभर माती तुडवत बस जेव्हा मार्ग आक्रमित असते तेव्हा आपल्या काळजाचा ठोका चुकतो. आणि हा मार्ग केवळ ५ कि.मी असुनही त्याला २ तासाचा कालावधी लागतो आणि तो ही रात्री २ वाजता तेव्हा आपल्या मनात केवळ परमेश्वराचाच धावा सुरु असतो. परतीच्या प्रवासात मी मुद्दाम या भागाचे फोटो काढले ते देत आहे.
त्यात हा भाग म्हणजे वेस्ट कामेंग जिल्हा. हा जिल्हा महाराष्ट्रात नुकताच प्रसिध्दिस आला तो बुलढाण्याचे जंगल अधिकारी श्री बर्डेकर यांच्या बोडो अतिरेक्यांनी केलेल्या अपहरणामुळे. आज ही त्यांच्या बद्द्ल अधिकृत माहिती मिळालेली नाही हे अजुन दुर्दैव.
बोमडिला येथे मला घ्यायला श्री राजेश राठोड आले होते. ते त्या भागात गेल्या १२ वर्शापासुन कार्यरत आहेत्. ते बुलढाणा जिल्यातील नांदुरा या गावातील आहेत. मी नांदुरा येथे शाखापबंधक म्हणुन २ वर्षे कार्यरत होतो. हे कळल्यावर आमची चांगली गट्टी जमली. बोमडीला येथे उतरलो तेंव्हा तेथील तापमान १५ से.होते. तेथे कायमच अशी थंडी असते हे माझ्या ३ दिवसांच्या वास्तव्यात मला समजले.
पहिल्याच दिवशी आम्ही तेथील तिबेटी बुध्दिझम चा मठ पहावयास गेलो. हा मठ जवळ जवळ ८० पायर्या चढुन गेल्यावर एका उंच सखल अशा विस्तिर्ण भागात अतिशय सुंदर रित्या बांधलेला आहे. ह्या मठातर्फे शाळा चालविल्या जाते. मठाधिपती हे ३ दा आमदार राहुन या कार्यासाठी वाहुन घेतलेले अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व आहे. त्यांनि आम्हाला भोजनाचा आग्रह केला तेंव्हा अशा महंताबरोबर भोजनाचा योग आल्या बद्दल आम्ही कृतकृत्य झालो. या मठाचे व परिसराचे फोटो खास आपल्या साठी.
Shri Rajesh Rathod and his office |
मठाकडे प्रस्थान
The beautiful Himalayan ranges on way |
View of Bomdilla from monastry |
अस्मादिक मठाचे परिसरात खाली बोमडीला
मठाचे परिसरातील चित्रे
Ascending staircase to Monastry |
The Main building of Monastry |
Residential quarters |
School Building in Monastry |
महाराष्ट्राचे लाडके गायक सुधिर फडके यांचा मानस पुत्र दिपकजी यांची भेट बोमडिला येथे होणे हा एक दुग्ध सर्करा योग. त्यांच्या घरी जेवण व अण्णा(बाबुजी) यांच्या प्रतिभा आणि प्रतीमा मध्ये झालेल्या कार्यक्रमाची १ तासाची बैठक पहावयाला मिळाली ही तर मला मेजवानी च होती. दिपक जी हे शुध्द मराठी बोलतात हे वेगळे सांगणे न लगे. ते राज्य सरकारात उद्योग विभागात जॉइंट डायरेक्टर आहेत् व २ वर्शात निवृत्त् होऊन त्यांच्या मुळ गावी तवांग येथे राहणार आहेत. त्याचे तवांग ला त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण मी घेतलेले आहे आणी निश्चीतच जाणार आहे. त्यांच्याच घरी पुण्याचा ह्रुषिकेश दिवेकर या तरुणाची भेट झाली. हा तिथे गेल्या ३ वर्शांपासुन हिन्दी शिकवतो व ९ आणि १० वि च्या विद्यार्थ्यांचे निषुल्क गणिताचे वर्ग घेतो.
With Shri Dipakji/ Lekhi Phuntso |
ह्रुषिकेश दिवेकर् सोबत प्रतिभा आणि प्रतिमा कार्यक्रम पहातांना
बोमडिलातील ३ दिवस म्हणजे निसर्गानी भरभरुन दिलेल्या सौंदर्याचा आस्वादाची मेजवानीच होती.
श्री निरि फोन्ग्रोजु, बि.जे.पी चे जिल्हा अध्यक्षांचे घरी त्यांच्या बगिच्यात.
Comments
खूप छान
व्वा ~~ केवळ देखण्या फोटोमुळेच नव्हे तर श्री.विश्वासरावांनी केलेल्या तितक्याच सुंदर वर्णनामुळे हा धागा वारंवार भेट द्यावा असे वाटते. श्री.दिवेकर सारखे तरूण त्या भागात कशाचीही अपेक्षा न ठेवता ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत हे या मुळे माहित झाले. फार आनंद झाला.
>>> महाराष्ट्राचे लाडके गायक सुधिर फडके यांचा मानस पुत्र दिपकजी यांची भेट <<<
.... हा भाग नीट समजला नाही. "श्री.दीपक" बाबुजींचे शिष्य होते का?
खुलासा
अरुणाचल चा हा मुलगा बाबुंजींकडे रहावयास होता. त्याचे शिक्षण बाबुजींनि केले. त्याला संघाचे संस्कार दिले. त्याच्या कार्यक्रमाचे निमीत्ताने दिपक त्याचा ड्रायवर् म्हणुन नेहमी त्यांचे सोबत असावयाचा. माईंचा॑ जितका लोभ श्रीधर वर असे तितकाच किंबहुना मोठा म्हणुन दिपक वर असे ही आठवण दिपकजींनीच मला सांगितली.
विश्वास कल्याणकर
दीपक
धन्यवाद. ही माहिती मला नविनच आहे आणि त्यांचे शिक्षण बाबुजींनी केले यातच सर्व काही आले. कारण हेच "दीपक" ड्रायव्हर ते सरकारी खात्यात जॉईंट डायरेक्टर सारख्या मानाच्या पदापर्यंत वाटचाल करतात, त्याचे उत्तर त्यांना बाबुजी आणि ललितामाईंकडून मिळालेले मोलाचे मार्गदर्शन.
संघ
बाबुजींचे कार्य थोरंच आहे. तुम्ही हे संघाचे संस्कार पुसून टाकून ह्या मुलाला स्वतःची विचारशक्ती देण्याचे काम केलेत की नाही?
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo
अगदी
व्वा ~~ केवळ देखण्या फोटोमुळेच नव्हे तर श्री.विश्वासरावांनी केलेल्या तितक्याच सुंदर वर्णनामुळे हा धागा वारंवार भेट द्यावा असे वाटते. श्री.दिवेकर सारखे तरूण त्या भागात कशाचीही अपेक्षा न ठेवता ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत हे या मुळे माहित झाले. फार आनंद झाला.
अगदी हेच!
येथे संघाचे चाललेले कार्य वाचून बरे वाटले. हे होणे आवश्यकच आहे. फक्त ख्रिस्ती धर्म प्रसारकांनी किंवा माओवाद्यांनीच आपला पाय तेथे ठेवावा, असे मला तरी वाटत नाही.
संघाचे कार्य उत्तरोत्तर वृद्धींगत होवो हीच सदिच्छा!
विश्वासराव तुम्ही भटकण्या आणि भेटीगाठींच्या बाबतीत भाग्यवान आहात! :)
आपला
गुंडोपंत
प्रतिसाद
तुमची प्रतिक्रिया मला नेहमीच उत्साहवर्धक असते. धन्यवाद
विश्वास कल्याणकर
सहमत
गुंडोपंतांशी सहमत !
सुटका...
आजच त्यांच्या सुटकेची बातमी आली आणि मनापासून आनंद झाला...
||वाछितो विजयी होईबा||
ला म्हंजे?
छान छायाचित्र.. बोमदिला हा आजुबाजुची अनेकथाथळे पाहण्यासठी चांगला पडाव आहे असे ऐकून होतोच. माहिती व चित्रांबद्दल आभार
साधारणतः "ला" म्हणजे पास अर्थात खिंड. जसे नथुला, खार्दुंगला (यापुढे पास जोडणे ही द्वीरुक्ती). तर हा बोमदिला (मी स्थानिक मित्राकडून हे नाव बोम्दिल्ला असे ऐकले आहे) तला "ला" म्हणजे खिंड आहे की नावातीलच भाग आहे?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
ला
ला या शब्दाचा अर्थ खिंड असाच आहे त्यामुळे बोमडी(दी) खिंड किंवा बोमडी(दी) ला या पैकी काही म्हटले तरी अर्थ एकच आहे. बोमडी(दी)ला खिंड हा मात्र चुकीचा शब्द आहे.
बाकी फोटो उत्कृष्ट. बघायला मजा आली. व्यक्तींचे फोटो टाळले असते जर जास्त आवडले असते.
चन्द्रशेखर
प्रतिक्रिया
तसे केले असते तर मी त्या सर्व ठिकाणी खरेच गेलो होतो हे कळले नसते आणी अन्य् व्यक्ती ज्या तिथे कार्यरत आहेत् ते कोण आणि कसे दिसतात हे देखील कळले नसते म्हणुन ही चुक झाली.
विश्वास कल्याणकर
विहंगम म्हंजे?
विहग=पक्षी; 'ऊर्ध्व दृष्टिकोनातून (टॉप पर्स्पेक्टिवने) खूप अंतरावरून' म्हणजे विहंगम ना? मी पळतो.
तसा एकही फोटो नाही म्हणून विचारले.
किस
काय हो उगा किस काढताय ;)
असो तरीही "View of Bomdilla from monastry" हे चित्र तुमच्या व्याखेने विहंगम म्हणता यावे :)
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
शी बै अच्रत
'कीस' काढायची सुरुवात कोणी केली? ;)
View of Bomdilla from monastry हे चित्रसुद्धा 'उडत्या जागेतून नाही', शिवाय त्याचा कोन ४५° असेल, मला ९०° अपेक्षित होते.
:प
पक्ष्याने नेहमी शहराच्या अगदी वरूनच (९० अंशात) उडावे असे थोडेच आहे :प्
बाकी बोमदिलाविषयी माझी शंका फार जुनी आहे. आज आठवली पुन्हा
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
विहंगमचा एक अर्थ स्वर्गीय-अध्यात्मिक असाही असावा
मी कालच 'विहंगम का ? चित्रे तर आयसोमेट्रिक साईडव्ह्यूचीच आहेत' अशी प्रतिक्रिया देणार होतो. पण तत्पूर्वीच इथे अर्थ सापडला.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सुंदर चित्रे. रोमांचक प्रवास
सुंदर चित्रे. रोमांचक प्रवास.
**"विहंगम" शब्द आध्यात्मिक संदर्भात वापरला तरी या संदर्भात टाळावा, असे वाटते.
विहंगम = पक्षी,
पक्षी-मार्ग जसा लक्ष्याकडे आडवळणे न घेता थेट उडत जाणारा असतो, तसा योगमार्ग मोक्षाकडे आडवळणे न घेता थेट जाणारा असतो. म्हणून योगमार्गाला लक्षणेने "पक्षीमार्ग"="विहंगममार्ग" म्हटले आहे.
मात्र उपमेवर व्याज उपमा चढवणे, तितके बरे नाही.
योगमार्ग जसा मोक्ष देतो, तसा अतिशय आनंद बोम्दीला येथील निसर्ग देतो, म्हणून बोम्दीला हा योगमार्ग अशी एक उपमा, असा लाक्षणिक अर्थ ठीक आहे. म्हणून बोम्दीलाला "पक्षीमार्गासारख्या योगमार्गासारखा" असे म्हणणे म्हणजे उपमेवर दुसर्या उपमेची पुट चढवणे. अर्थाचा र्हास होतो, रसपरिपोष मात्र होत नाही.
- - -
मी खुद्द लेख वाचताना "विहंगम शब्द घाईच्या लेखनामुळे चुकीचा टंकलेला आहे" असे मानले. ध्वनिसाधर्म्यामुळे त्याचा अर्थ "हृदयंगम=रमणीय" असा लावून घेतला. सुंदर चित्रे बघताना हा शब्ददोष टंकनदोषाइतका क्षुल्लक त्रासदायक मानला.**
विहंगम..
म्हणजे मोल्सवर्थ-कॅन्डीच्या मते विहंगम हे विशेषण नाहीच. ते फक्त एका पक्षाचे नांव आहे. त्यामुळे स्वर्गीय-आध्यात्मिक वगैरे अर्थ असण्याची शक्यता नाही. अर्थात, विहंगमदृश्य आणि विहंगम बोमदिला हे दोन्ही शब्दप्रयोग मोडीत निघाल्यात जमा आहेत.--वाचक्नवी
सुंदर आणि निसरडे
खुपच सुंदर छायाचित्रे
संघाचे संस्कार
काही जागा मात्र खुपच निसरड्या वाटल्या.
छान चित्रे...
चित्रे आवडली. पर्वतरांगा, वळणावळणाचे रस्ते, धुके सगळे आवडले.
-सौरभ.
==================
फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.